आणि ही कविता

या कवितेचं टायटल आहे -
''बँकेत पुरेसा बॅलन्स नसताना,
तरीही त्याविषयी शंका येऊ नये
एवढं पुण्य चेहर्‍यावर दिसत असताना,
मनात एक वीकेन्ड होम, एक कार,
एक शरीर,एक मन, एक जॉब, एक
फॅन्टॅस्टिक अचिव्हमेंट, एक ओळख
इ. स्थूल गोष्टींसकट एका
लाल रंगाच्या टोरुक पक्ष्यासोबतीने
अवकाश हिंडण्याची सूक्ष्म इच्छा
करत असताना म्हणायची कविता.''

या कवितेचं सबटायटल आहे -
''एक क्रिटिकल कर्मपुराण -
उठून उभं राहून तशीच्या तशी
अव्यवस्थित जगण्याची गाथा
गुंडाळू्न बकल लावताना
तोंड न उघडता, जीभ न हलवता
फक्तच उच्छवासावाटे
बाहेर टाकायची कविता.''

आणि ही कविता आहे -

''उंअह्''.

field_vote: 
2.666665
Your rating: None Average: 2.7 (3 votes)

प्रतिक्रिया

फक्तच उच्छवासावाटे
बाहेर टाकायची कविता...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जुई

("४२"चा मथितार्थ : उत्तर सुटसुटीत असले, तरी ते समजण्यासाठी प्रश्न काय ते कळावे लागते, आणि प्रश्न मोठा गुंतागुंतीचा असू शकतो.)

पुण्यात कोणी "बरे" म्हटले तर त्याचा अर्थ काय? हे समजण्यासाठी पूर्ण संदर्भ लागतो - त्याचा अर्थ "चांगले" पासून "वाईट" येथपर्यंत काहीही असू शकतो, त्यापैकी संदर्भानुसार निवड मात्र नेमकी असते.

तसाच काही प्रकार "शीर्षक/उपशीर्षक" आणि कविता यांच्यात करून दाखवलेला आहे.

प्रकार विनोदी आहे.

पण नाकापेक्षा मोती जड झाला आहे काय? अशी अंधुक शंका येते. शंका येण्याचे कारण असे : "आणि ही कविता" असे शीर्षक सुद्धा दिलेले आहे. म्हणजे "या कवितेचं टायटल आहे..." वगैरे पहिले कडवे आहे, असे मानायला काहीच हरकत नाही. ते शीर्षकच आहे, असे म्हणणे म्हणजे मग केवळ नखरा वाटतो. (नक्कल वठवताना "आपण नक्कल करत आहोत" असे भान दिसले, तर बरे वाटत नाही.)

- - -
"थ्रू द लुकिंग ग्लास" मध्ये पांढरा घोडा अ‍ॅलिसला एक गाणे ऐकवतो, त्याबाबत :
The White Knight explains a confusing nomenclature for the song.
* The song's name is called Haddocks' Eyes
* The song's name really is The Aged Aged Man
* The song is called Ways and Means
* The song really is A-sitting On a Gate
This complicated terminology entails the use–mention distinction. (विकिपेडियावरून उद्धृत.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

युज-मेन्शन डिस्टिंक्शन वापरण्याचा प्रयत्न आवडला. खरं तर 'आणि ही कविता' या टायटलऐवजी 'उअह' आलं असतं तर ते छान स्ट्रेंज लूप झालं असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रचना गिमिकी आहे. कविता नाहीये हे गृहीत धरून वाचली आणि आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साचेबध्द आयुष्य / धनावलंबी निवांतपणा किंवा त्याची आशा-अपेक्षा / धनाभाव ओळ्खू न येण्याइतपत मध्यमवर्गी सभ्यपणा इ अर्थ लागले..कविता मुद्दामहून ब्लंट करणे कधीकधी प्रभावी ठरते खरे, पण साठोत्तरी / महानगरी कवितांमधील अतिरेकामुळे हे ' पोएटी़क इंस्ट्रूमेन्ट' आजकाल नकोसे वाटू लागले आहे..

आपल्याकडे सांगण्यासारखे ठोस असे भरपूर काही आहे असे आपल्या कविता वाचून निश्चीत जाणवते. फॉर्मवरील महानगरी प्रभाव जाणिवपूर्वक असेल तर ठीक आहे, पण तो नसला तरी फारसा फरक पडणार नाही असेही वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टायटल-सबटायटल एवढीच कविता की टायटल-सबटायटल नंतर शून्य कविता की नमनाला घडाभर की नमनच नमन. कवितेच्या मांडणीसकट येणारा आशय रोचक वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाटाआ.
इम्पल्सिव्हली प्रतिसाद टंकायची माझी सवय कधी सुटणार कोण जाणे.
पुनर्विचारानंतर माझा प्रतिसाद अर्वाच्य वाटल्याने काढून टाकत आहे.
असा प्रतिसाद दिल्याबद्दल क्षमस्व.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक प्रयोग म्हणून ठिक आहे
अजुन रोचक करता यावी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कविता मला आवडली. फक्त इथे मुद्दाम - 'कवितेचे टायटल आहे', ' हे सबटायटल', 'आणि ही कविता' असे वेगळे न लिहिता शीर्षकासारखे दिसणारे शीर्षक, उपशीर्षकासारखे दिसणारे उपशीर्षक आणि कवितेच्या जागी कविता (म्हणजे तो एक उच्चार) असे लिहिले असते तर दृष्य स्वरूपातही ती जास्त आवडली असती.
अशा गिमिक (हा शब्द वाईट अर्थाने नव्हे) असलेल्या कविता पूर्वी जुन्या सत्यकथेत पाहिल्याच्या/वाचल्याच्या स्मरतात. तिथे शब्दांबरोबरच दृष्यस्वरूपही आशयाचा परिपोष करत असे.
असे काहीसे -
बँकेत पुरेसा बॅलन्स नसताना, तरीही त्याविषयी शंका येऊ नये एवढं पुण्य चेहर्‍यावर दिसत असताना, मनात एक वीकेन्ड होम, एक कार, एक शरीर,एक मन, एक जॉब, एक
फॅन्टॅस्टिक अचिव्हमेंट, एक ओळख इ. स्थूल गोष्टींसकट एका लाल रंगाच्या टोरुक पक्ष्यासोबतीने अवकाश हिंडण्याची सूक्ष्म इच्छा करत असताना म्हणायची कविता.

(एक क्रिटिकल कर्मपुराण - उठून उभं राहून तशीच्या तशी अव्यवस्थित जगण्याची गाथा गुंडाळू्न बकल लावताना तोंड न उघडता, जीभ न हलवता फक्तच उच्छवासावाटे बाहेर टाकायची कविता.)

उंअह्.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बँकेत पुरेसा बॅलन्स नसताना,
तरीही त्याविषयी शंका येऊ नये
एवढं पुण्य चेहर्‍यावर दिसत असताना

हे आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0