जुलै दिनवैशिष्ट्य

जुलै

१०
११ १२ १३ १४ १५
१६ १७ १८ १९ २०
२१ २२ २३ २४ २५
२६ २७ २८ २९ ३०
३१

१ जुलै
जन्मदिवस : गणितज्ञ गटफ्रीड लिबनिझ (१६४६), कवी, संपादक एकनाथ रेंदाळकर (१८८७), अभिनेता चार्ल्स लॉटन (१८९९), सिनेदिग्दर्शक विली वायलर (१९०२), साहित्य अकादमी विजेते लेखक अमर कांत (१९२५), पंतप्रधान चंद्रशेखर (१९२७), सिनेदिग्दर्शक सिडनी पोलॅक (१९३४), बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया (१९३८), धावपटू कार्ल ल्यूईस (१९६१), अंतराळवीर कल्पना चावला (१९६१), गायक उस्ताद रशिद खाँ (१९६६)
पुण्यस्मरण : विचारवंत मिखाईल बाकुनिन (१८७६), लेखिका हॅरिएट बीचर स्टो (१८९६), 'इंडियन होम रूल लीग'च्या संस्थापक सदस्यांपैकी एक व लो. टिळकांचे सहकारी ग. श्री. उर्फ दादासाहेब खापर्डे (१९३८), कादंबरीकार, नाटककार लक्ष्मण नारायण जोशी (१९४७), स्वातंत्र्यसैनिक डॉ. बी.सी.रॉय (१९६२), हिंदीला भारताची अधिकृत भाषा बनवण्यासाठी झटलेले स्वातंत्र्यसैनिक भारतरत्न पुरुषोत्तम दास टंडन (१९६२), पर्यावरणवादी वास्तुरचनाकार रिचर्ड बकमिन्स्टर फ्युलर (१९८३), कवी व शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य ग. ह. पाटील (१९८९), दिग्दर्शक व नेपथ्यकार राजाभाऊ नातू (१९९४), अभिनेता रॉबर्ट मिचम (१९९७), अभिनेता वॉल्टर माथाऊ (२०००), लेझर, मेझर बनवण्यासाठी मूलभूत संशोधन करणारा नोबेलविजेता निकोलाय बसॉब (२००१), अभिनेता मार्लन ब्रँडो (२००४), मराठी लोकसंस्कृतीचे संशोधक रा. चिं. ढेरे (२०१६)
---

महाराष्ट्र कृषी दिवस
राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : घाना, सोमालिया (१९६०), रवांडा, बुरुंडी (१९६२), कॅनडा (१८६७)
राष्ट्रीय डॉक्टर दिवस (डॉ. बी.सी. रॉय यांच्या स्मृतिदिनानिमित्त)

१७७० : लेक्सेलचा धूमकेतू पृथ्वीपासून सगळ्यात कमी अंतरावरून (०.०१४६ खगोलीय एकक) गेला.
१८७९ : भारतात पोस्टकार्डांचा वापर सुरू.
१८५८ : चार्ल्स डार्विन आणि आल्फ्रेड वॉलस यांनी उत्क्रांतीवरचे संशोधन एकत्रितरित्या लिनीयन सोसायटीत वाचून दाखवले.
१८८१ : कॅनडा आणि अमेरिकेतल्या दोन शहरांमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय दूरध्वनी झाला.
१९०३ : 'तूर द फ्रान्स' या सायकलशर्यतीची सुरुवात.
१९०८ : SOS हा आणीबाणीचा इशारा म्हणून मान्य झाला.
१९०९ : क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांनी सर विल्यम कर्झन वायली याची हत्या केली.
१९१६ : पहिले महायुद्ध : सोमची लढाई सुरू. नोव्हेंबरपर्यंत लांबलेल्या लढाईत सुमारे दहा लाख सैनिक मृत.
१९३३ : नाट्यमन्वंतर संस्थेच्या ’आंधळ्यांची शाळा’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
१९५५ : 'इंपीरिअयल बॅंके'चे 'स्टेट बॅंक ऑफ इंडिया' नामकरण झाले.
१९६१ : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची (एस.टी.) स्थापना.
१९६७ : युरोपीय समुदायाची पायाभरणी.
१९६८ : ६२ देशांनी अण्वस्त्रप्रसारबंदी कराराला मान्यता दिली.
१९७९ : सोनी कंपनीने 'वॉकमन' बाजारात आणला.
१९९१ : वॉर्सा करार अधिकृतरीत्या बरखास्त.
१९९७ : हॉंगकॉंगवर चीनचा ताबा.
२००२ : युद्धगुन्हे, वंशहत्याकांड अशा गुन्ह्यांसाठी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाची स्थापना.
२००४ : कसिनी-हॉयगन्स यान शनीच्या कक्षेत शिरले.
२००६ : चीनमध्ये किंगहाइ-तिबेट रेल्वेचे उद्घाटन.
२०१७ : भारतभर वस्तू व सेवा कर (GST) लागू.

२ जुलै
जन्मदिवस : क्ष किरण वापरून स्फटिकांचा अभ्यास करणारा नोबेलविजेता विल्यम हेन्री ब्रॅग (१८६२), नोबेलविजेता लेखक हर्मन हेस (१८७७), अभिनेते गणपतराव बोडस (१८८०), छायाचित्रकार आंद्रे कर्तेश (१८९४), 'पोलो शर्ट' बनवणारा टेनिसपटू, व्यावसायिक रेने लकोस्त (१९०४), ताऱ्यांच्या इंजिनाचा शोध लावणारा अणुवैज्ञानिक, नोबेलविजेता हान्स बेथे (१९०६), नोबेलविजेती कवयित्री विश्वावा षंबोर्स्का (१९२३), लेखक वि. आ. बुवा (१९२६), 'साईनफेल्ड'चा लेखक लॅरी डेव्हीड (१९४७), अभिनेत्री लिंडसी लोहान (१९८६)
पुण्यस्मरण : दुर्बिण वापरून चंद्राचे पहिले चित्र काढणारा थॉमस हेरियट (१६२१), तत्त्ववेत्ता जॉं-जाक रुसो (१७८८), उडीया कवी, कादंबरीकार, समीक्षक, विधवाविवाहाचे पुरस्कर्ते, बालविवाहाचे कडवे विरोधक नंदकिशोर बल (१९२८), वैमानिक अ‍ॅमेलिया इअरहार्ट (१९३७), समाजवादी नेते युसूफ मेहेरअली (१९५०), नोबेलविजेता लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे (१९६१), लेखक व्लादिमिर नाबोकोब (१९७७), अभिनेता जेम्स स्ट्यूअर्ट (१९९७), लेखक मारियो पुझो (१९९९), चित्रकार तय्यब मेहता (२००९), अभिनेते, दिग्दर्शक व लेखक मधुकर तोरडमल (२०१७)
---
स्वातंत्र्यदिन : ब्राझील.
जागतिक 'युएफओ' दिवस.
१६९८ : थॉमस सेव्हरी याने वाफेवरच्या इंजिनासाठी पेटंट मिळवले.
१८६५ : 'साल्वेशन आर्मी'ची स्थापना.
१८९७ : मार्कोनी याने रेडिओसाठी पेटंट मिळवले.
१९४० : सुभाषचंद्र बोस यांना अटक होऊन कलकत्ता तुरुंगात रवानगी.
१९६४ : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी सर्व नागरिकांना समान हक्क देणाऱ्या 'सिव्हिल राईट्स बिल'वर स्वाक्षरी केली. कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठीच्या लढ्यातला एक महत्त्वाचा टप्पा.
१९७२ : तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी व पाकचे राष्ट्राध्यक्ष झुल्फिकार अली भुत्तो यांनी ऐतिहासिक सिमला करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
१९८३ : कल्पकम येथे भारताची पहिली अणुभट्टी सुरू.
१९९७ : ग्रेट ब्रिटनने हाँगकाँग चीनला परत केले.
२००१ : बिहारमधील केसरिया येथे जगातील सर्वात मोठा स्तूप सापडला.
२००२ : स्टीव्ह फॉसेट याने गरम हवेचा फुगा वापरून सर्वप्रथम पृ‌थ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.

३ जुलै
जन्मदिवस : लेखक फ्रांझ काफ्का (१८८३), तत्त्वज्ञ गुरूदेव रामचंद्र रानडे (१८८६), पहिल्या महिला कुलगुरू हंसा मेहता (१८९७), स्वातंत्र्यसैनिक न्यायमूर्ती बॅ. वि.म. तारकुंडे (१९०९), गायक अभिनेते श्रीपाद नेवरेकर (१९१२), लेखक, नेपथ्यकार, वेशभूषाकार, कलासमीक्षक, इतिहास आणि लोकसंस्कृतीचे अभ्यासक द. ग. गोडसे (१९१४), राष्ट्रपती पुरस्कार विजेता अभिनेता, दिग्दर्शक एस. व्ही. रंग राव (१९१८), लेखिका सुनीता देशपांडे (१९२६), सिनेदिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन (१९४१), लेखक रोहिंटन मिस्त्री (१९५२), क्रिकेटपटू सर रिचर्ड हॅडली (१९५२), अभिनेता टॉम क्रूझ (१९६२), 'विकीलीक्स'चा संस्थापक, पत्रकार ज्यूलियन असांज (१९७१), क्रिकेटपटू हरभजनसिंग (१९८०)
पुण्यस्मरण : संतकवी नामदेव (१३५०), 'द डोअर्स' गायक जिम मॉरिसन (१९७१), सिनेअभिनेता राजकुमार (१९९६), संगीतकार, गायक, गोवा-स्वातंत्र्यसैनिक सुधीर फडके (२००२), अभिनेता सतीश तारे (२०१३)

---

स्वातंत्र्यदिन : अल्जिरीया (१९६२)

१८५० : इस्ट इंडीया कंपनीने राणी व्हिक्टोरियाला कोहिनूर हिरा सुपूर्त केला.
१८५२ : म. फुले यांनी दलितांसाठी पहिली शाळा सुरू केली.
१८८४ : न्यू यॉर्क शेअर बाजारातला 'डाऊ जोन्स' इंडस्ट्रीयल अॅव्हरेज सर्वप्रथम प्रकाशित.
१९३६ : 'सायकल कर' आकारणीचा पुणे नगरपालिकेचा ठराव नागरिकांच्या एकजुटीमुळे फेटाळला गेला.
१९३८ : मॅलराड या वाफेच्या इंजिनाने वेगाचा जागतिक विक्रम स्थापित केला (प्रतितास २०२ किमी).
१९९८ : 'सत्या' चित्रपट प्रदर्शित.
२००५ : स्पेनमध्ये समलैंगिक विवाहांना मान्यता.
२००८ : पहिल्या राष्ट्रीय विमुक्त-भटके-निमभटके आयोगाने भटक्या समाजाच्या सर्वांगीण स्थितीचा आढावा घेणारा अहवाल भारत सरकारला सादर केला.

४ जुलै
जन्मदिवस: कवी, काव्य समीक्षक नारायण बेहरे (१८९०), स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीता राम राजू (१८९७), पंतप्रधान गुलजारीलाल नंदा (१८९८), गायक निवृत्तीबुवा सरनाईक (१९१२), गीतकार पी. सावळाराम (१९१४), अभिनेत्री जिना लोलोब्रिजिडा (१९२७)
पुण्यस्मरण: दर्यासारंग सरदार कान्होजी आंग्रे (१७२९), दुहेरी नोबेलविजेती वैज्ञानिक मेरी क्यूरी (१९३४), पहिली महिला टेनिसस्टार सूझन लँगलेन (१९३८), चित्रकार बार्नेट न्यूमन (१९७०), सामाजिक प्रश्नांवर कथेच्या माध्यमातून जागृती करणारे लेखक र.वा. दिघे (१९८०), गीतकार भरत व्यास (१९८२), लेखक विठ्ठल पारगावकर (१९८९), रहस्यकथालेखक बाबुराव अर्नाळकर (१९९६), अभिनेता वसंत शिंदे (१९९९), इतिहासविषयक लेखक प्रा. डॉ. अरविंद देशपांडे (२००२), समाजसेवक डॉ. एम्. व्ही. श्रीधर (२००३), आसामी कवी हिरेन भट्टाचार्य (२०१२), चित्रपट दिग्दर्शक अब्बास किआरोस्तामी (२०१६)

---

स्वातंत्र्यदिन : अमेरिका (१७७६), फिलीपाईन्स (१९४६)

पृथ्वी अपभू स्थितीत (लंबवर्तुळाकार भ्रमणामुळे सूर्यापासून सर्वात जास्त अंतर - १५ कोटी २० लाख कि.मी.)

१०५४ : चिनी आणि अरब निरीक्षकांनी आकाशात अतिनवतारा पाहिल्याची नोंद. आता त्याच्या उर्वरित भागाला 'क्रॅब नेब्युला' असे नाव आहे.
१८६२ : पुढे 'ॲलिस इन वंडरलँड' म्हणून प्रकाशित झालेली गोष्ट लेखक ल्यूईस कॅरॉलने आपल्या बालमैत्रिणीला सांगितली.
१८८१ : कृष्णवर्णीयांसाठी ऐतिहासिक महत्त्व असणारी टस्कगी संस्था सुरू झाली.
१८९९ : कैदेतून सुटल्यावर लो. टिळकांनी पुन्हा केसरीचा कारभार हाती घेतला.
१९३४ : लेओ शिलार्ड याने अणुबॉंबमध्ये वापरल्या जाणाऱ्या साखळी-प्रक्रियेचे पेटंट घेतले.
१९४१ : नाझी सैन्याने पोलिश शास्त्रज्ञ आणि लेखकांचे शिरकाण केले.
१९४३ : नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची सूत्रे हाती घेतली.
१९४७ : भारताची फाळणी करण्याचे विधेयक ब्रिटिश संसदेत सादर.
१९५१ : विल्यम शॉकलीने जंक्शन ट्रान्झिस्टरचा शोध लावला.
१९६६ : अमेरिकन अध्यक्षांनी माहिती अधिकारावर सही केली.
१९७७ : मराठी प्रकाशक परिषदेची स्थापना.
१९९१ : तत्कालीन वाणिज्यमंत्री पी. चिदंबरम यांनी आपले पहिले व्यापार धोरण सादर केले. आयातीवरील निर्बंध त्यात उठवले होते. भारताच्या आर्थिक उदारीकरणाची ही सुरुवात होती.
१९९१ : पृथ्वी क्षेपणास्त्राची चौथी यशस्वी चाचणी.
१९९४ : रवांडात वंशविच्छेदाची अखेर. सुमारे आठ लाख मृत.
१९९७ : नासाचे 'पाथफाईंडर' प्रोब मंगळावर उतरले.
१९९९ : लिएंडर पेस व महेश भूपती यांनी विंबल्डनवर आपले नाव कोरले.
१९९९ : कारगिल युद्ध : भारतीय सैन्याने "टायगर हिल्स" घुसखोरांच्या ताब्यातून सोडवत विजय प्राप्त केला.
२००८ : अमरनाथ देवस्थान ट्रस्टला जमीन देण्याविषयीचा निर्णय जम्मू-काश्मीर सरकारने फिरवला.
२०१२ : 'देव कण' नावाने परिचित असणारा हिग्ज बोसॉन सापडला.

५ जुलै
जन्मदिवस : डेव्हिसकपचे जन्मदाते ड्वॉईट फीली डेव्हिस (१८७९), गायक इनायतखाँ (१८८२), लेखक, सिनेदिग्दर्शक व चित्रकार जॉं कोक्तो (१८८९), लेखक आनंद साधले (१९२०), सहकारमहर्षी कलप्पा बाबुराव आवाडे (१९३०), लेखक वसंत मिरासदार (१९३२), उद्योगपती महादेव रामचंद्र बुघले (१९३६), ऑलिंपिक पदकविजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू (१९९५)
पुण्यस्मरण : फोटोग्राफीच्या आद्य संशोधकांपैकी एक जोसेफ निसेफोर द निएप्स (१८३३), न्यूक्लीक आम्लांची रासायनिक रचना शोधणारा नोबेलविजेता आलब्रेख्त कोसेल (१९२७), शिक्षणतज्ज्ञ डॉ. दि.धों. कर्वे (१९८०), साहित्यिक, डावे विचारवंत तिरुनल्लूर करुणाकरन (२००६), कवी तुळसी परब (२०१६)
---
जलसंपत्ती दिन.
स्वातंत्र्यदिन : व्हेनेझुएला (१८११), अल्जिरीया (१९६२), केप व्हर्दे (१९७५)
१६८७ : न्यूटनचे प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका हे पुस्तक प्रकाशित.
१८६५ : वाहनांच्या वेगावर नियंत्रण घालणारा पहिला कायदा इंग्लंडमध्ये लागू.
१९०५ : लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली.
१९१३ : बालगंधर्वांनी गंधर्व नाटक मंडळीची स्थापना केली.
१९१६ : पुण्यात महर्षी कर्वेंच्या पुढाकाराने महिला विद्यापीठाचे वर्ग सुरू झाले. याच दिवशी भारतवर्षी महिला विद्यापीठाची (एस. एन. डी. टी) स्थापना.
१९४६ : पारी (पॅरीस) फ्रान्समध्ये बिकिनी हा वस्त्रप्रकार प्रथम बाजारात.
१९५४ : बीबीसीने पहिले दैनंदिन टीव्ही वार्तापत्र सुरू केले.
१९७५ : आर्थर अ‍ॅश विंबल्डन टेनिस स्पर्धा जिंकणारा प्रथम कृष्णवर्णीय व्यक्ती ठरला.
१९७७ : निवडून आलेले पहिले पाकिस्तानी पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो यांना जनरल झिया उल हक यांच्या नेतृत्वाखालील लष्करी उठावाद्वारे पदच्युत केले गेले.
१९८४ : भारतीय विमान लाहोरला पळवून नेले, पण दुसऱ्या दिवशी चाचे शरण येऊन सर्व २६४ प्रवासी सुखरूप मुक्त.
१९८७ : एलटीटीईकडून श्रीलंकन सैन्यावर पहिला आत्मघातकी हल्ला.
१९९६ : 'डॉली' या जगातील पहिल्या 'क्लोन' मेंढीचा जन्म.
२००० : 'आकाश' या भारतीय बनावटीच्या मिसाईलची यशस्वी चाचणी.

६ जुलै
जन्मदिवस : प्राच्यविद्या संशोधक, संस्कृतपंडित, धर्मसुधारक डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर (१८३७), संत गुलाबराव महाराज (१८८१), चित्रकार फ्रीडा काहलो (१९०७), लेखक व्यंकटेश माडगूळकर (१९२७), गायक, संगीतकार पंडित एम. बालमुरलीकृष्ण (१९३०), अभिनेता सिल्व्हेस्टर स्टॅलोन (१९४६), अभिनेता रणवीर सिंग (१९८५)
पुण्यस्मरण : चित्रकार जॉर्ज ग्रोस (१९५९), जाझ संगीतकार व वादक लुई आर्मस्ट्रॉन्ग (१९७१), सिनेदिग्दर्शक, निर्माता चेतन आनंद (१९९७), उद्योगपती धीरूभाई अंबानी (२००२), सिनेदिग्दर्शक मणि कौल (२०११)
---
स्वातंत्र्यदिन : मलावी (१९६६), कोमोरोझ (१९७५)
प्रजासत्ताक दिन : मलावी
१३४८ : युरोपमधल्या प्लेगमुळे पोप क्लेमेंट सहाव्याने फतवा काढून ज्यू व्यक्तींना अभय दिले.
१७८५ : अमेरिकेत पूर्णतः दशमान पद्धतीवर आधारित डॉलरला चलन म्हणून मान्यता.
१८८५ : लुई पास्तरने आपल्या श्वानदंशावरच्या लशीचा एका मनुष्यावर प्रथम यशस्वी प्रयोग केला.
१८९२ : दादाभाई नौरोजींची ब्रिटीश संसदेचे सर्वप्रथम भारतीय सभासद म्हणून निवड.
१८९७ : लो. टिळकांनी लिहिलेल्या "सरकारचें डोकें ठिकाणावर आहे काय?" या सुप्रसिद्ध अग्रलेखाचे 'केसरी'मध्ये प्रकाशन.
२००३ : कॉर्सिकातील निवडणुकीत नागरिकांनी फ्रान्सपासून स्वातंत्र्य नाकारले.
२००६ : भारत व तिबेटमधील नथु ला (खिंड) व्यापारासाठी खुली.

७ जुलै
जन्मदिवस : चेतासंस्थेचा अभ्यास करणारा नोबेलविजेता कमियो गॉल्जी (१८४३), संगीतकार ग्युस्ताव्ह माहलर (१८६०), क्ष-य-लिंग गुणसूत्रांचा शोध लावणारी नेटी स्टीव्हन्स (१८६१), चित्रकार मार्क शागाल (१८८७), सिनेदिग्दर्शक जॉर्ज क्यूकर (१८९९), सिनेदिग्दर्शक व्हित्तोरिओ द सिका (१९०१), संगीतकार अनिल विश्वास (१९१४), 'बीटल' रिंगो स्टार (१९४०), सिनेदिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा (१९६३), गायक कैलाश खेर (१९७३), क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी (१९८१)
पुण्यस्मरण : 'शेरलॉक होम्स'चा जनक लेखक आर्थर कॉनन डॉयल (१९३०), अभिनेत्री व्हीव्हीयन ली (१९६७), क्रिकेटपटू एम. एल. जयसिंहा (१९९९), 'पिंक फ्लॉइड' सिड बॅरेट (२००६), अभिनेत्री रसिका जोशी (२०११), अभिनेते दिलीप कुमार (२०२१)
---
स्वातंत्र्यदिन - सोलोमन आयलंड्स (१९७८)
१४५६ : मृत्यूदंडानंतर २५ वर्षांनी जोन ऑफ आर्क निरपराध ठरली.
१७९९ : रणजितसिंहच्या सैन्याने लाहोरला वेढा घातला.
१८५४ : कावसजी दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली.
१८९६ : ल्यूमिए बंधूंनी सिनेमाचा भारतातला पहिला खेळ मुंबईत वॉटसन हॉटेल येथे आयोजित केला.
१९१० : इतिहासाचार्य वि. का राजवाडे आणि सरदार मेहेंदळे यांनी पुण्यात भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली.
१९२८ : 'स्लाइस्ड ब्रेड' बाजारात विक्रीस प्रथम उपलब्ध.
१९४६ : पंडित जवाहरलाल नेहरू अखिल भारतीय कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी.
१९५९ : शुक्र आणि मघा ताऱ्याची पिधानयुती. यातून शुक्राचा व्यास आणि वातावरणाचा अभ्यास करता आला.
१९८५ : १७व्या वर्षी विंबल्डन टेनिसस्पर्धा जिंकून बोरिस बेकर सर्वात तरुण विंबल्डनविजेता ठरला.
२००५ : लंडन भुयारी रेल्वेवर दहशतवादी हल्ला; ५२ ठार, ७०० जखमी.

८ जुलै
जन्मदिवस : चित्रकार आर्टेमिसिया जेंटिलेशी (१५९३), नीतिकथालेखक जाँ द ला फोंतेन (१६२१), तेलसम्राट जॉन डी. रॉकफेलर (१८३९), शिल्पकार व चित्रकार केट कोलवित्झ (१८६७), तत्त्वज्ञ अर्न्स्ट ब्लॉक (१८८५), 'बॉस' या फॅशन कंपनीचा संस्थापक ह्यूगो बॉस (१८८५), हेलियमच्या अतिद्रवतेचा अभ्यास करणारा प्योत्र कापित्सा (१८९४), अर्थशास्त्रज्ञ व्ही. के. आर. व्ही. राव (१९०८), लेखक गो. नी. दांडेकर (१९१६), साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक गिरिराज किशोर (१९३७), अभिनेत्री नीतू सिंग (१९५८), अभिनेत्री रेवती (१९६६), क्रिकेटपटू सौरव गांगुली (१९७२)
पुण्यस्मरण : कवी पी.बी. शेली (१८२२), तबला उस्ताद बाळासाहेब मिरजकर (२००१), ज्ञानपीठविजेते लेखक सुभाष मुखोपाध्याय (२००३), लेखक राजा राव (२००६), पंतप्रधान चंद्रशेखर (२००७)
---
१४९७ : वास्को द गामाने भारताकडे समुद्रमार्गे प्रयाण केले.
१८९९ : 'द वॉल स्ट्रीट जर्नल'चा पहिला अंक प्रकाशित.
१८८८ : बंगळूरूहून कन्याकुमारीला जाणारी 'आयलंड एक्सप्रेस' पेरुमन पुलावर रुळावरून घसरल्यामुळे १०५ ठार आणि २००हून अधिक जखमी.
२०११ : अटलांटिस या अवकाशयानाच्या शेवटच्या फेरीची सुरुवात.

९ जुलै
जन्मदिवस : शिवणयंत्राचा संशोधक एलियस हावे (१८१९), सिनेदिग्दर्शक व अभिनेता गुरुदत्त (१९२५), चित्रकार डेव्हिड हॉकनी (१९३७), अभिनेता संजीव कुमार (१९३८), अभिनेता टॉम हँक्स (१९५६)
पुण्यस्मरण : चित्रकार यान व्हान आईक (१४४१), संत चैतन्य महाप्रभू (१५३३), शनीची कडी, दोलकाचे घड्याळ शोधणारा ख्रिस्तीयन हॉयगन्स (१६९५), संत वाङ्मयाचे अभ्यासक सोनोपंत दांडेकर (१९६८), कवी बा.भ. बोरकर (१९८४), चंद्रावर पाऊल ठेवणारा तिसरा अंतराळवीर चार्ल्स पीट कॉनरॅड (१९९९), साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या सुंदरी उत्तमचंदानी (२०१३)

---

स्वातंत्र्यदिन : अर्जेंटिना (१८१६), दक्षिण सुदान (२०११)

१८७५ : मुंबई शेअर बाजार एका वडाच्या झाडाखाली सुरू झाला.
१८७७ : विंबल्डन टेनिसस्पर्धेला सुरुवात.
१९१८ : मॉन्टेग्यू-चेम्सफर्ड अहवाल प्रसिद्ध झाल्यावर लो. टिळकांनी लिहिलेला 'उजाडले पण सूर्य कोठे आहे' हा अग्रलेख प्रकाशित.
१९५१ : भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली.
१९६९ : वाघाला राष्ट्रीय प्राणी म्हणून मान्यता.
१९६२ : अँडी वॉरहॉलच्या 'कँपबेल सूप कॅन' प्रदर्शनाचे उद्घाटन.
२००७ : विश्वनाथन आनंदने वेसलीन टोपोलोवचा पराभव करत लिऑन बुद्धीबळ स्पर्धेत विजेतेपदाची हॅटट्रिक साधली.

१० जुलै

जन्मदिवस : कॅल्व्हिनिझमचा उद्गाता विचारवंत जाँ कॅल्व्हिन (१५०९), 'चेंबर्स' प्रकाशनाचा सहनिर्माता, भूगर्भशास्त्रज्ञ रॉबर्ट चेंबर्स (१८०२), चित्रकार कामिय पिसारो (१८३०), आल्टर्नेटिंग करंटचा प्रणेता, भौतिकशास्त्रज्ञ-अभियंता निकोला टेस्ला (१८५६), अवयवारोपण तंत्राचा आद्य प्रणेता सॉर्ज व्होरोनॉव्ह (१८६६), लेखक मार्सेल प्रूस्त (१८७१), चित्रकार जॉर्जिओ द किरिको (१८८८), कृत्रिम रबर शोधणारा नोबेलविजेता कुर्ट आल्डर (१९०२), लेखक रा. भि. जोशी (१९०३), कवयित्री पद्मा गोळे (१९१३), नोबेलविजेता लेखक सॉल बेलो (१९१५), टेनिसपटू आर्थर अॅश (१९२०), प्रतिप्रोटॉन शोधणारा नोबेलविजेता ओवेन चेंबरलेन (१९२०), मुष्टियोद्धा जेक लामोटा (१९२१), 'स्मायली' बनवणारा हार्वी बॉल (१९२१), 'स्पेशल ऑलिंपिक'ची सहप्रणेती युनीस केनेडी श्रीव्हर (१९२१), लेखक जी. ए. कुलकर्णी (१९२३), अर्थशास्त्रज्ञ मेघनाद देसाई (१९४०), टेनिसपटू व्हर्जिनिआ वेड (१९४५), गायक संगीतकार आर्लो गथ्री (१९४७), क्रिकेटपटू सुनील गावसकर (१९४९)
पुण्यस्मरण : इतिहासकार पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर (१९६९), विचारवंत, लेखक प्रभाकर ऊर्ध्वरेषे (१९८९), 'गरिबांचे डॉक्टर' म्हणून प्रसिद्ध डॉ. रामकृष्ण उर्फ दादासाहेब विष्णू केळकर (१९९५), गायक जयवंत कुलकर्णी (२००५), नर्तिका, अभिनेत्री जोहरा सहगल (२०१४)

---

स्वातंत्र्यदिन : बहामा (१९७३)
मातृसुरक्षा दिन

१७९६ : कोणताही आकडा जास्तीत जास्त तीन त्रिकोणी आकड्यांची बेरीज असतो, याचा कार्ल गॉसला शोध लागला.
१८०० : कोलकाता येथे फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना.
१८०६ : वेल्लोरचे बंड; भारतीय शिपायांनी ब्रिटिशांविरुद्ध केलेले पहिले बंड
१९३८ : हॉवर्ड ह्यूजेस याने विमानाने ९१ तासात पृथ्वीप्रदक्षिणा मारून विश्वविक्रम रचला.
१९६२ : टेलस्टार या जगातील पहिल्या संदेशवाहक उपग्रहाचे प्रक्षेपण.
१९७३ : पाकिस्तानने बांगलादेशचे स्वातंत्र्य मान्य केले.
१९७६ : इटलीत सेव्हेसो येथे विषारी वायुगळती. ३,००० प्राणी मृत्युमुखी. ७०,००० प्राण्यांची कत्तल.
१९९१ : वंशद्वेष्टे धोरण रद्द केल्यामुळे द. आफ्रिकेला पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिलमध्ये प्रवेश
१९९२ : स्वदेशी बनावटीच्या 'इन्सॅट २ ए' उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोउरू येथून उड्डाण. त्याच दिवशी पुण्याजवळील आर्वी येथील विक्रम इनमरसॅट भू-केंद्र राष्ट्राला समर्पित.
१९९७ : निअँडरथल सापळ्याचे डीएनए विश्लेषण करून ब्रिटिश संशोधकांनी आफ्रिकेतून मानववंशाची सुरुवात झाल्याच्या सिद्धांताला पुरावा दिला आणि आदिम 'अदिती' (African Eve) एक ते दोन लाख वर्षांपूर्वीची असल्याचे सिद्ध केले.

११ जुलै

जन्मदिवस : समाजसुधारक, राजकारणपटू, कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष सर सी. शंकरन नायर (१८५७), लेखक ना. ह. आपटे (१८८९), लेझर आणि मेझरवर मूलभूत संशोधन करणारा नोबेलविजेता अलेक्झांडर प्रोखोरोब (१९१६), अभिनेता यूल ब्रायनर (१९२०), लेखक शंकरराव खरात (१९२१), संगीत दिग्दर्शक नाशाद (१९२३), 'अर्मानी' कंपनीचा निर्माता जॉर्जिओ अर्मानी (१९३४), सिनेदिग्दर्शक जाफर पनाही (१९६०), लेखिका झुंपा लाहिरी (१९६७)
पुण्यस्मरण : संगीतकार जॉर्ज गर्शविन (१९३७), अभिनेता लॉरेन्स ऑलिव्हिए (१९८९), लेखक सुहास शिरवळकर (२००३)

---
जागतिक लोकसंख्या दिन
१७३५ : प्लूटो काही काळापुरता नेपच्यूनच्या कक्षेच्या अलीकडे आला.
१८०१ : सर्वात जास्त (२७ वर्षांत ३६) धूमकेतू शोधणाऱ्या जॉं-लुई पॉं याने पहिला धूमकेतू शोधला.
१८५९ : चार्ल्स डिकन्सची 'अ टेल ऑफ टू सिटीज' ही कादंबरी प्रकाशित.
१८९३ : पहिला कृत्रिम (कल्चर्ड) मोती बनवला गेला.
१८९५ : ओग्युस्त आणि लुई ल्युमिए यांनी चलतचित्रांचे तंत्रज्ञान शास्त्रज्ञांना दाखवले.
१९३० : डॉन ब्रॅडमन यांनी एका दिवसात ३०९ धावा करण्याचा विक्रम रचला.
१९५५ : अमेरिकेने आपल्या चलनावर 'In God We Trust' असे मुद्रित करण्याचे ठरवले.
१९६० : हार्पर ली यांची 'टु किल अ मॉकिंगबर्ड' कादंबरी प्रकाशित.
१९६१ : ब्रिगेडियर बेदी, कर्नल ब्रगान्झा आणि त्यांच्या दोनशे जवानांनी अथक प्रयत्न करून पानशेत धरण रात्री फुटण्याचा धोका टाळला. पण एका दिवसानंतर ते फुटले.
१९६२ : पहिले अटलांटिकपार दूरचित्रवाणी प्रक्षेपण.
१९७९ : 'स्कायलॅब' पृथ्वीवर कोसळली.
१९८७ : जगाची लोकसंख्या पाच अब्ज झाली.
१९९५ : स्रेबेनिका हत्याकांड - ८००० पेक्षा अधिक बोस्नियाक लोकांना मारले.
१९९७ : मुंबईत रमाबाई आंबेडकर नगरात दलित मोर्चावर पोलिसांचा गोळीबार; १० ठार, २६ जखमी.
२००३ : १८ महिने बंद असलेली लाहोर-दिल्ली बस सेवा पुन्हा सुरू.
२००६ : मुंबईत पश्चिम रेल्वेमध्ये सात बॉंबस्फोट, सुमारे २०० मृत, ७०० जखमी.
२०१२ : महाराष्ट्रात गुटखाबंदी.

१२ जुलै

जन्मदिवस : लेखक व विचारवंत हेन्री डेव्हिड थोरो (१८१७), इतिहासाचार्य वि. का. राजवाडे (१८६४), शेतीतज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर (१८६४), चित्रकार, शिल्पकार अमेदेओ मोदिग्लिआनी (१८८४), शांततावादी, मानवतावादी, नोबेलविजेते कवी पाब्लो नेरुदा (१९०४), सिनेदिग्दर्शक बिमल रॉय (१९०९), कथाकार, लघुनिबंधकार गोविंद दोडके (१९१०), कादंबरीकार मनोहर माळगावकर (१९१३), माजी सरन्यायाधीश यशवंत चंद्रचूड (१९२०), अभिनेत्री, गायिका सुलक्षणा पंडित (१९५४), क्रिकेटपटू संजय मांजरेकर (१९६५)
पुण्यस्मरण: संत व कवी सावता माळी (१२९५), रोल्स रॉईसचे सहसंस्थापक चार्ल्स स्ट्युअर्ट रोल्स (१९१०), कवी अच्युत साठे (१९२९), पटकथालेखक वसंत साठे (१९९४), अभिनेता राजेंद्रकुमार (१९९९) खगोलशात्रज्ञ संतोष सरकार (१९९९), कुस्तीपटू व अभिनेता दारासिंग (२०१२), अभिनेता प्राण (२०१३), श्राव्यक्रांती घडवणाऱ्या 'बोस कॉर्पोरेशन'चे जनक डॉ. अमर बोस (२०१३)

---
स्वातंत्र्यदिन : साओ तोमे आणि प्रिन्सिप (१९७५), किरिबाती (१९७९)
१६७४ : ईस्ट इंडिया कंपनीबरोबर शिवाजी महाराजांनी मैत्रीचा करार केला.
१७९९ : लाहोर जिंकून रणजितसिंग पंजाबचे महाराज झाले.
१८२३ : पहिले भारतीय बांधणीचे वाफेवर चालणारे जहाज 'डायना' देशाला समर्पित.
१९६० : बिहारमध्ये भागलपूर विद्यापीठाची स्थापना.
१९६१ : मुठा नदीच्या आंबी या उपनदीवरील पानशेत आणि खडकवासला धरणे फुटून पुण्यात महापूर; २००० पेक्षा जास्त मृत्युमुखी.
१९६२ : रॉकगट 'रोलिंग स्टोन्स'ची पहिली जाहीर मैफल.
१९७१ : ऑस्ट्रेलियात प्रथमच मूलनिवासींचा झेंडा फडकवला गेला.
१९८६ : न्यू झीलंडमध्ये नव्या कायद्याअन्वये समलैंगिक कृत्ये कायदेशीर.

१३ जुलै
जन्मदिवस: गायिका केसरबाई केरकर (१८९२), नोबेलविजेता लेखक वोले सोयिन्का (१९३४), नाट्यकर्मी पं. सत्यदेव दुबे (१९३६), अभिनेता हॅरिसन फोर्ड (१९४२), गायक मास्टर सलीम (१९८०)
पुण्यस्मरण: वीर बाजीप्रभू देशपांडे (१६६०), आद्य मराठी शब्दकोशकार जेम्स टी. मोल्सवर्थ (१८६३), छायाचित्रकार अल्फ्रेड स्टीग्लित्झ (१९४६), संगीतकार आर्नॉल्ड शॉनबर्ग (१९५१), चित्रकार फ्रीडा काहलो (१९५४), गायक पंडित के. जी. गिंडे (१९९४), शिक्षणतज्ज्ञ डॉ. ग. शं. कोशे (१९९८), कवयित्री इंदिरा संत (२०००), अभिनेता निळू फुले (२००९), सॅक्सोफोन वादक मनोहारी सिंग (२०१०), समाजशास्त्र, स्त्रीवादाच्या अभ्यासक, लेखिका शर्मिला रेगे (२०१३), क्रिकेटपटू यशपाल शर्मा (२०२१)

---

१९०८ : लोकमान्य टिळकांवर दुसर्‍या राजद्रोहाच्या खटल्याचे काम सुरू.
१९०८ : ऑलिंपिक स्पर्धांमध्ये स्त्रियांना भाग घेण्यास परवानगी.
१९१२ : मौलाना अबुल कलाम आझाद यांनी 'अल हिलाल' या उर्दू नियतकालिकाचे प्रकाशन सुरू केले.
१९२९ : जतींद्रनाथ दास यांनी उपोषण सुरू केले.
१९५२ : श्रीलंकेत नगरपालिका निवडणूकांमध्ये भाग घेण्यासाठी भारतीयांना बंदी. वांशिक संघर्षाची नांदी.
१९७७ : सात तास वीज गेल्यामुळे न्यू यॉर्कमध्ये लुटालूट आणि दंगे. आणीबाणी जाहीर.
१९८३ : श्रीलंकेत वांशिक हत्याकांड. ३,००० तामीळ व्यक्तींची हत्या. ४,००,०००हून अधिक तामीळ व्यक्तींचे पलायन.
१९८८ : 'एएसएलव्ही' उपग्रहाचे असफल प्रक्षेपण.
२०११ : मुंबईत लोकल गाडीतल्या तीन बाँबस्फोटात २६ ठार, १३० जखमी.

१४ जुलै
जन्मदिवस : समाजसुधारक विचारवंत गोपाळ गणेश आगरकर (१८५६), चित्रकार गुस्टाफ क्लिम्ट (१८६२), लेखक यशवंत देशपांडे (१८८४), कवी, स्वातंत्र्यसैनिक गरिमेल्ला सत्यनारायण (१८९३), 'टॉम अँड जेरी'चा रेखाटनकार विल्यम हॅना (१९१०), फोक गायक व गिटारवादक वूडी गथ्री (१९१२), संगीतकार रोशन (१९१७), नाट्य व सिनेदिग्दर्शक इंगमार बर्गमन (१९१८), असेंद्रिय रसायनशास्त्राचा जनक, नोबेलविजेता जेफ्री विल्कीन्सन (१९२१), मॉडेल मधू सप्रे (१९७१)
पुण्यस्मरण : पहिला भारतीय 'मॅन ऑफ लेटर्स' धन गोपाल मुखर्जी (१९३६), संगीतकार मदनमोहन (१९७५), अभिनेत्री लीला चिटणीस (२००३), माजी सरन्यायाधीश यशवंत विष्णू चंद्रचूड (२००८)
---
राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : फ्रान्स, इराक
१६३६ : शहाजहाँकडून त्याचा मुलगा औरंगजेब याची दख्खनचा सुभेदार म्हणून नेमणूक.
१७८९ : बास्तियचा तुरुंग क्रांतिकारकांनी फोडला. फ्रेंच राज्यक्रांतीची ही सुरुवात मानली जाते.
१९३३ : जर्मनीत नाझी पक्षाव्यतिरिक्त सगळ्या राजकीय पक्षांवर बंदी.
१९५८ : इराकमध्ये राजेशाहीविरुद्ध उठाव. अब्दुल करीम कासम सत्तेवर.
१९६० : जेन गुडॉल गोंबे झऱ्याच्या भागात आली. तिथे तिने मुक्त चिंपांझींचा सखोल अभ्यास केला.
१९७६ : कॅनडात मृत्युदंडावर बंदी.
१९९२ : लिन आणि विल्यम जॉलिट्झ यांनी पहिली मुक्तस्रोत संगणक प्रणाली, 386BSD वितरित करायला सुरुवात केली.
२००१ : परवेझ मुर्शरफ अटलबिहारी वाजपेयींना भेटण्यासाठी भारतात आले.
२०१३ : भारतात शेवटची तार पाठवली गेली. व्यावसायिक तारखाते बंद.

१५ जुलै
जन्मदिवस : चित्रकार रेम्ब्रॉं (१६०६), ब्रिटनमध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळण्यासाठी आंदोलन करणारी एमेलिन पँकहर्स्ट (१८५८), कवी दत्तात्रय गोखले (१८९९), लेखक कवी व चरित्रकार चांगदेव खैरमोडे (१९०४), जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका मोगूबाई कुर्डीकर (१९०४), न्यूट्रॉन विकीरणासाठी नोबेल पुरस्कार मिळवणारा बर्ट्राम ब्रॉकहाऊस (१९१८), मूलभूत कणांवर संशोधन करणारा नोबेलविजेता लेऑन लेडरमन (१९२२), नाट्यकर्मी बादल सरकार (१९२५), 'डिकन्स्ट्रक्शनिझम'चा प्रणेता तत्ववेत्ता जॅक देरिदा (१९३०), समीक्षक, विचारवंत नरहर कुरुंदकर (१९३२), ज्ञानपीठ पुरस्कार विजेते एम. टी. वासुदेवन नायर (१९३३), लेखक, कवी अनंत कदम (१९३५), 'पल्सार' शोधणारी जोसलिन बेल बर्नेल (१९४३), लेखक माधव कोंडविलकर (१९४९)
पुण्यस्मरण : लेखक व निष्णात डॉक्टर अण्णा कुंटे (१८९६), लेखक आन्तोन चेकॉव्ह (१९०४), संगीत नाट्यकलावंत बालगंधर्व उर्फ नारायण श्रीपाद राजहंस (१९६७), 'केसरी', 'मराठा'चे संपादक गजानन केतकर (१९८०), फॅशन डिझायनर जियान्नी व्हर्साची (१९९७), सामाजिक कार्यकर्त्या इंदूताई टिळक (१९९९), वैज्ञानिक, विज्ञानप्रसारक वि. गो. कुलकर्णी (२००२), लेखक प्रकाश नारायण संत (२००३), लेखिका माधवी देसाई (२०१३).

---

१७९९ : 'रोझेटा स्टोन' नावाने प्रसिद्ध असणारा शिलालेख नेपोलियनच्या सेनाधिकाऱ्याला मिळाला.
१९१० : एमिल क्रेपेलिनने अल्झायमर्स रोगाला आपल्या अलॉईस अल्झायमर या सहकर्मचाऱ्याचे नाव दिले.
१९१६ : 'पसिफिक एरो प्रॉडक्ट्स' या नावाने आताच्या 'बोईंग' विमानकंपनीची सुरुवात.
१९२६ : पहिली बस सेवा अफगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केट या मार्गावर मुंबईत सुरू झाली.
१९२७ : समाजाला कुटुंबनियोजन आणि लैंगिक समस्यांसंबंधी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने र. धों. कर्वे यांच्या 'समाजस्वास्थ्य' या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित.
१९५५ : अठरा नोबेल पुरस्कार विजेत्यांनी मेनाऊ जाहीरनाम्यावर सही करून अण्वस्त्रांना विरोध जाहीर केला.
१९७५ : अपोलो-१८ आणि सोयूझ-१९ ची अवकाशात यशस्वी जोडणी.
२००२ : अमेरिकन पत्रकार डॅनियल पर्लची निर्घृण हत्या करण्याबद्दल अहमद शेख याला पाकिस्तानी न्यायालयाने मृत्युदंड जाहीर केला.
२००३ : एओएल टाईम वॉर्नर यांनी नेटस्केप बंद केले; याच दिवशी मोझिला फाऊंडेशनची स्थापना.
२००६ : ट्विटरची सुरुवात.

१६ जुलै

जन्मदिवस: चित्रकार कामिय कोरो (१७९६), तुकारामाच्या अभंगांचे इंग्रजीत भाषांतर करणारे काशिनाथ बाळकृष्ण मराठे (१८४४), अमेरिकन स्त्रीवादी, सामाजिक कार्यकर्ती आयडा वेल्स (१८६२), दक्षिण ध्रुवावर प्रथम पाऊल ठेवणारे नॉर्वेजियन संशोधक रोआल्ड आमुंडसन (१८७२), पेशी न मारता त्यांचा अभ्यास करण्याचे तंत्र शोधणारा नोबेलविजेता फ्रीट्झ झर्निकी (१८८८), स्वातंत्र्यसेनानी, समाजसेविका अरुणा असफ अली (१९०९), अभिनेत्री, गायिका व नर्तकी जिंजर रॉजर्स (१९११), मराठी कथाकार, विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक वामन चोरघडे (१९१४), 'आकाशवाणी' आणि 'दूरदर्शन' ही नावे सुचवणारे लेखक जगदीश चंद्र माथुर (१९१७), राष्ट्रपती पुरस्कार विजेता निर्माता श्रीनगर नागराज (१९३९), लेखक प्र. ई. सोनकांबळे (१९४३), 'विकीपीडीया'चा प्रवर्तक लॅरी सँगर (१९६८), हॉकीपटू धनराज पिल्ले (१९६८), अभिनेत्री कतरीना कैफ (१९८४)
पुण्यस्मरण: लेखक नारायण दाजी लाड (१८७५), लेखक गी द मोपासाँ (१८९३), रोगप्रतिकारकशक्तीबद्दल संशोधन करणारा नोबेलविजेता एली मेचनिकॉब (१९१६), अश्लीलताविरोधी विचारांना तर्कशुद्ध विचार देणारे लेखक दत्तात्रेय गोडबोले (१९७४), नोबेलविजेता लेखक हाइनरिश ब्यॉल (१९८५), इतिहासकार वा. सी. बेंद्रे (१९९३), ख्यालगायक उस्ताद निसार हुसेन खाँ (१९९३), अभिनेत्री सुरेखा सिक्री (२०२१)

---

६२२ : प्रेषित महंम्मद पैगंबर यांचे मदिनेहून प्रयाण; हिजरी सनाची सुरुवात.
१६६१ : युरोपमधल्या पहिल्या बँकेकडून आलेल्या नोटा स्वीडिश बँकेने चलनात आणल्या.
१८५६ : हिंदू विधवांना पुनर्विवाहाचा हक्क देणारा कायदा जाहीर.
१८५७ : कानपूरच्या लढाईत ब्रिटिश सैन्याने नानासाहेब पेशव्यांचा पराभव केला. नानासाहेब पेशवे परागंदा.
१९१८ : रशियन झार दुसरा निकोलस आणि त्याच्या पत्नी-मुलांची बोल्शेविकांनी हत्या केली.
१९३५ : जगातले पहिले पार्किंग मीटर अमेरिकेत ओक्लाहोमा सिटी या शहरात बसवले गेले.
१९४५ : अमेरिकेने तयार केलेल्या अणुबॉम्बचा न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात पहिला प्रायोगिक स्फोट.
१९४८ : चाच्यांनी प्रवासी विमान ताब्यात घेण्याची पहिली घटना.
१९५१ : जे. डी. सॅलिंजरची 'कॅचर इन द राय' प्रकाशित.
१९६४ : चीनच्या पहिल्या अणुबॉम्बची लॉपनोर येथे यशस्वी चाचणी.
१९६९ : अपोलो ११चे चंद्राच्या दिशेने उड्डाण.
१९९० : यूक्रेन सोव्हिएत संघातून स्वतंत्र
१९९४ : शूमेकर लेव्ही-९ हा उपग्रह गुरूवर आदळायला सुरूवात झाली. २२ जुलैपर्यंत धूमकेतूचे तुकडे गुरूवर आपटत होते.
१९९१ : जगातला पहिला धावता दवाखाना म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या 'जीवनरेखा' या गाडीचा मुंबईहून प्रथम प्रवास.
२०१३ : बिहारमध्ये माध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत मिळणाऱ्या जेवणातून झालेल्या विषबाधेमुळे २३ विद्यार्थी दगावले.

१७ जुलै

जन्मदिवस : लेखक अर्ल स्टॅन्ली गार्डनर (१८८९), विश्वरचनाशास्त्रज्ञ जॉर्ज लमेत्र (१८९४), फोटोग्राफर बर्नीस अबॉट (१८९८), अभिनेता जेम्स कॅग्नी (१८९९), संगीतकार स्नेहल भाटकर (१९१९), प्रा. शिवाजीराव भोसले (१९२७), लेखक व दलित चळवळीचे प्रवर्तक बाबुराव बागुल (१९३०), संगीतकार वॉयचेक किलार (१९३५), अभिनेता डोनाल्ड सदरलँड (१९३५), लेखिका मृणालिनी जोगळेकर (१९३६), लेखक अनिल बर्वे (१९४८), सिनेदिग्दर्शक वाँग कार वाई (१९५८)
पुण्यस्मरण : विचारवंत व अर्थतज्ज्ञ अ‍ॅडम स्मिथ (१७९०), भारतातल्या कोळशाच्या साठ्याचा अभ्यास करणारे भूवैज्ञानिक थॉमस ओल्डम (१८७८), गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, अभियंता आँरी प्वॉंकारे (१९१२), सिनेदिग्दर्शक रॉबर्ट वीन (१९३८), अभिनेत्री शांता हुबळीकर (१९९२), गायिका अभिनेत्री कानन देवी (१९९२), नाट्य-चित्र समीक्षक वा. य. गाडगीळ (२००१), कामगार नेते आर.जे. मेहता (२००३), कार्यकर्त्या, लोकनेत्या मृणाल गोरे (२०१२), गणितज्ञ मंगला नारळीकर (२०२३)
---
स्वातंत्र्यदिन : स्लोवाकिया
आंतरराष्ट्रीय न्याय दिन
१८०२ : मोडी लिपीतून प्रथम मुद्रण.
१९१८ : रशियन राज्यक्रांती : झार निकोलस २ आणि कुटुंबाची हत्या.
१९४२ : दुसरे महायुद्ध : स्टालिनग्राडचा लढा सुरू.
१९४७ : सकाळी आठ वाजता मुंबईहून रेवसकडे निघालेले 'रामदास' नावाचे जहाज वादळी हवेमुळे अवघ्या दोन तासांच्या आत धरमतर ते मुंबई दरम्यान बुडाले.
१९४८ : भारतीय प्रशासन सेवा आणि पोलीस सेवा यांमध्ये महिलांना प्रवेश देण्याची सरकारी घोषणा.
१९७६ : वंशद्वेष्ट्या द. आफ्रिकेशी क्रीडासंबंध न तोडणाऱ्या न्यू झीलंडचा निषेध म्हणून २५ आफ्रिकन देशांनी मॉंट्रीयाल ऑलिंपिकवर बहिष्कार टाकला.
१९९८ : युद्धगुन्हे, वंशविच्छेद आदिंसाठी कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना.
२००१ : जुलै २००० च्या अपघातानंतर कॉंकॉर्ड पुन्हा सेवेत रुजू.
२००४ : कुंभकोणम शहरात शाळेला आग लागून ९० विद्यार्थी ठार.
२००६ : इंडोनेशियाजवळ समुद्रात ७.२ रिश्टर तीव्रतेचा भूकंप. नंतरच्या त्सुनामीत ८० व्यक्ती मृत्युमुखी.

१८ जुलै

जन्मदिवस : बहुवेधी शास्त्रज्ञ रॉबर्ट हूक (१६३५), लेखक डब्ल्यू.एम. थॅकरे (१८११), 'लॉरेंट्झ ट्रान्सफॉर्मेशन' शोधणारा, झीमन परिणामाचे स्पष्टीकरण देणारा नोबेलविजेता हेंड्रिक लॉरेंट्झ (१८५३), ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कवी विष्णू डे (१९०९), दक्षिण आफ्रिकेचे नेते व वर्णद्वेषविरोधी चळवळीचे नेते नेल्सन मंडेला (१९१८), लेखक हंटर थॉम्सन (१९३७), अभिनेत्री प्रियांका चोप्रा (१९८२)
पुण्यस्मरण : चित्रकार काराव्हाज्जिओ (१६१०), कादंबरीकार जेन ऑस्टेन (१८१७), मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय न्यायाधीश जनार्दन आगासकर (१८९४), कादंबरीकार, लोकशाहीर, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतले अग्रणी अण्णाभाऊ साठे (१९६९), संस्कृत-नाट्यतज्ज्ञ डॉ. गोविंद केशव भट (१९८९), अभिनेता राजेश खन्ना (२०१२), गायिका मुबारक बेगम (२०१६), गायक भूपिंदर सिंह (२०२२)
---
संविधान दिन - उरुग्वे
आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिन

१८५७ : मुंबई विद्यापीठाची स्थापना.
१८७२ : जगभर गुप्त मतदान पद्धती रूढ होण्यामागचे आद्य 'बॅलट' विधेयक इंग्लंडमध्ये मंजूर.
१८९८ : मेरी क्यूरी आणि पिएर क्यूरी यांनी पोलोनियम या नवीन मूलद्रव्याचा शोध लावला.
१९२५ : अॅडॉल्फ हिटलरच्या 'माईन काम्फ' ह्या आत्मचरित्राची पहिली आवृत्ती प्रकाशित.
१९६८ : इंटेल कंपनीची स्थापना.
१९७६ : नादिया कोमानेची हिने ऑलिंपिकच्या इतिहासात जिम्नॅस्टिक्समध्ये सर्वप्रथम दहापैकी दहा गुण मिळवले.
१९८० : स्वदेशी बनावटीचा 'रोहिणी' हा उपग्रह श्रीहरीकोटा या केंद्रावरून अवकाशात यशस्वीरीत्या सोडण्यात आला.
२०१३ : अमेरिकेच्या डेट्रॉइट शहराच्या महानगरपालिकेने २० अब्ज अमेरिकन डॉलरचे कर्ज फेडण्याची क्षमता नसल्याने दिवाळे जाहीर केले.

१९ जुलै

जन्मदिवस : १८५७ च्या उठावाची सुरुवात करणारा मंगल पांडे (१८२७), चित्रकार एडगर दगा (१८३४), इतिहास संशोधक, लेखक यशवंत केळकर (१९०२), रक्तचाचणीसाठी नवीन पद्धत शोधणारी नोबेलविजेती रोझालिन यालो (१९२१), लेखक, समीक्षक मधुकर पाटील (१९३१), शास्त्रज्ञ, विज्ञानकथालेखक जयंत नारळीकर (१९३८), 'व्हर्जिन' समूहाचा जनक रिचर्ड ब्रॅन्सन (१९५०), क्रिकेटपटू रॉजर बिन्नी (१९५५), अभिनेता बेनेडिक्ट कंबरबॅच (१९७६)
पुण्यस्मरण : संत विसोबा खेचर (१३०९), वीरपुरुष राणोजी शिंदे (१७४५), ब्रह्मदेशातील क्रांतिकारी स्वातंत्र्यवीर ऑंग सान (१९४७), लेखक धों. वि. देशपांडे (१९९३)
---
स्वातंत्र्यदिन : लाओस

६४ : रोमच्या व्यापारी भागात मोठी आग लागली. या वेळेस निरो फिडल वाजवत होता अशी असत्य लोककथा प्रचलित आहे.
१८४८ : स्त्रियांच्या हक्कांसाठी पहिले अधिवेशन अमेरिकेत सेनेका फॉल्स इथे भरले.
१९०५ : लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी घोषित केली.
१९१२ : अमेरिकेतील हॉलब्रुक शहरावर अशनीपात. सुमारे १६००० उल्का जमिनीपर्यंत पोचल्या.
१९३७ : मुंबई प्रांतिक विधानसभा अस्तित्वात आली. महाराष्ट्रात काँग्रेस मंत्रिमंडळ अधिकारावर येऊन मुख्यमंत्रिपदी बाळासाहेब खेर यांची निवड झाली.
१९५५ : भारत-पाकिस्तान यांच्यात व्यापारी करारावर सह्या होऊन सरहद्दीवरच्या व्यापारासाठी खास सवलती देण्यात आल्या.
१९६९ : १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण

२० जुलै
जन्मदिवस : संतकवी तुलसीदास (१५३१), अनुवांशिकतेचे नियम मांडणारा ग्रेगॉर मेंडल (१८२२), खगोलविद्, लेखक शं. बा. दीक्षित (१८५३), प्रांतवादावर प्रहार करणारा नोबेलविजेता कवी एरीक कार्लफेल्ड्ट (१८६४), 'बीबीसी'च्या जनकांपैकी एक जॉन रीथ (१८८९), गोलंदाज बाका जिलानी (१९११), गिर्यारोहक सर एडमंड हिलरी (१९१९), सिनेअभिनेता राजेंद्र कुमार (१९२९), स्कॅनिंग टनलिंग मायक्रोस्कोप शोधणारा नोबेलविजेता जर्ड बिनीग (१९४७), अभिनेता नसिरुद्दीन शहा (१९५०), क्रिकेटपटू देबाशिष मोहंती (१९७६)
पुण्यस्मरण : तारायंत्र बनवणारा गुलेल्मो मार्कोनी (१९३७), लेखक वामन मल्हार जोशी (१९४३), क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त (१९६५), गायिका गीता दत्त (१९७२), मार्शल आर्टनिपुण सिनेदिग्दर्शक व अभिनेता ब्रूस ली (१९७३), म. गांधींच्या शिष्या मीराबेन (१९८१), गायक शंकर काशिनाथ बोडस (१९९५), सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पुरंदरे (२०१९)

---

स्वातंत्र्यदिन : कोलंबिया (१८१०)

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन

१७६१ : माधवराव पेशवे यांना पेशवाईचे वस्त्रे मिळाली.
१८२८ : बहुधा पहिलेच मराठी वृत्तपत्र 'मुंबापूर वर्तमान'चा पहिला अंक प्रकाशित.
१९०३ : फोर्ड मोटर कंपनीने आपली पहिली कार विकायला पाठवली.
१९०८ : बडोद्याचे महाराज सयाजीराव यांच्या पुढाकाराने 'बँक ऑफ बडोदा'ची स्थापना.
१९२२ : लीग ऑफ नेशन्सने आफ्रिकेतले टोगोलँड फ्रान्सला आणि टांगानिका युनायटेड किंग्डमला दिले.
१९३३ : लंडनमध्ये ज्यू व्यक्तींना सहानुभूती दाखवण्यासाठी ५,००,००० लोकांचा मोर्चा.
१९३७ : फ्लोरिडातील टॅलाहासी शहराच्या तुरुंगात असलेल्या दोन कृष्णवर्णीय कैद्यांना श्वेतवर्णीय जमावाने पळवून नेले व जाहीर फाशी दिली.
१९४९ : एकोणीस महिन्यांच्या युद्धानंतर इस्रायल आणि सिरियामध्ये तह.
१९६० : जगातील प्रथम निर्वाचित स्त्री राष्ट्रप्रमुख सिरिमाओ भंडारनायके श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी.
१९६८ : पहिले विशेष ऑलिंपिक शिकागोमध्ये सुरू; बौद्धिकदृष्ट्या विकलांग अशा १०००पेक्षा अधिक खेळाडूंचा सहभाग.
१९६९ : अपोलो ११चे चंद्रावतरण यान ईगल चंद्रावर उतरले. सात तासांनंतर पहिली 'छोटी पावले' चंद्रावर पडली.
१९७३ : केनियाच्या अर्थमंत्री ज्युलियस कियानोने आशियाई लोकांचे उद्योग-धंदे वर्षअखेरीस सक्तीने बंद करण्याची घोषणा केली.
१९७५ : सरकारी सेंसॉरशिप नाकारल्यामुळे भारताने पाश्चिमात्य पत्रकारांना देशातून हाकलले.
१९७६ : व्हायकिंग-१ अवकाशयान मंगळावर यशस्वीरित्या उतरले.
१९८९ : म्यानमारच्या सरकारने ऑँग सान सू की यांना नजरकैदेत टाकले.
१९९८ : तालिबानच्या हुकुमावरून २०० स्वयंसेवी डॉक्टर व इतर संस्थांनी अफगाणिस्तान सोडले.

२१ जुलै

जन्मदिवस : लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे (१८९९), समाजशास्त्रज्ञ व माध्यमतज्ज्ञ मार्शल मॅकल्युहान (१९११), संतसाहित्याचे अभ्यासक, संशोधक, लेखक डॉ. रा. चिं. ढेरे (१९३०), गीतकार आनंद बक्षी (१९३०), क्रिकेटपटू चंदू बोर्डे (१९३४), क्रिकेटपटू चेतन चौहान (१९४७), अभिनेता रॉबिन विल्यम्स (१९५१), क्रिकेटपटू रविंद्र पुष्पकुमार (१९७५)
पुण्यस्मरण : कवी रॉबर्ट बर्न्स (१७९६), रोमँटिक कवी डॅनिएल अ‍ॅमॅड्यूस अ‍ॅटरबॉम (१८५५), संगीतकार सज्जाद हुसेन (१९९५), अभिनेता शिवाजी गणेशन (२००१), चित्रकार गोपाळराव कांबळे (२००२), गायिका गंगूबाई हंगल (२००९)
---
मुक्ती दिन : गुआम (१९४४)
१८८३ : कोलकात्यातील सुप्रसिद्ध 'स्टार' नाट्यगृह सुरू. बंगालातील व्यावसायिक नाट्यगृहांच्या (आणि यथावकाश सिनेगृहांच्या) परंपरेत त्याला महत्त्वाचे स्थान आहे.
१९२५ : अमेरिकेच्या टेनेसी राज्यात डेटन शहरात उत्क्रांतीवाद शिकवल्याबद्दल जॉन टी. स्कोप्स या शिक्षकाला १०० डॉलरचा दंड. (हा निर्णय पुढे फिरवला गेला.)
१९४७ : भारतीय संसदेने (Constituent Assembly) तिरंग्याला राष्ट्रध्वज म्हणून मान्यता दिली.
१९७० : इजिप्तमध्ये आस्वान धरणाचे बांधकाम पूर्ण.
१९७३ : म्युनिक ऑलिंपिकमधल्या हत्याकांडाचा बदला घेणाऱ्या इस्रायली मोसाद एजंटांनी नॉर्वेमध्ये चुकीच्या माहितीतून एका वेटरचा खून केला.
२००७ : सर्वाधिक खपाची, पहिल्या २४ तासात दीड कोटी प्रती खपणारी 'हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज' ही कादंबरी प्रकाशित झाली.
२०११ : नासाचा स्पेस शटल कार्यक्रम संपुष्टात.
२०१२ : अर्दन एरूच याने एकट्याने, इंधन न वापरता पहिली जगप्रदक्षिणा पूर्ण केली.

२२ जुलै

जन्मदिवस : गणितज्ञ फ्रेडरिक बेसेल (१७८४), चित्रकार एडवर्ड हॉपर (१८८३), अणूंमधला पुंजवाद दाखवणाऱ्यांतला नोबेलविजेता गुस्ताव हर्ट्झ (१८८७), स्ट्रेप्टोमायसिन आणि अन्य प्रतिजैविकांच्या संशोधनाचा पाया घालणारा नोबेलविजेता सेलमन वाक्समन (१८८८), चित्रकार व शिल्पकार अलेक्झांडर कॉल्डर (१८९८), कवी वसंत बापट (१९२२), गायक मुकेश (१९२३), साक्षेपी संपादक गोविंद तळवलकर (१९२५), गोलंदाज वसंत रांजणे (१९३७), अभिनेता ऱ्हीस इफान्स (१९६८)
पुण्यस्मरण : सर्वात मोठा लघुग्रह शोधणारा ग्युसेप्पे पियाझ्झी (१८२६), 'स्टँडर्ड टाईम' निर्माण करणारा अभियंता सँडफर्ड फ्लेमिंग (१९१५), दलित नेते पा.ना. राजभोज (१९८४), लेखक ग.ल. ठोकळ (१९८४), लेखक नंदा खरे (२०२२)

---

रस्ता सुरक्षा दिन
अदमासी पाय दिवस (Pi Approximation Day)

१६७८ : शिवाजी महाराजांनी वेल्लोर किल्ला जिंकला.
१८९४ : जगातली पहिली मोटर शर्यत फ्रान्समध्ये झाली.
१९०० : ब्रिटिश इंडियाच्या नॉर्मन प्रिचर्ड या खेळाडूने ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पॅरिस येथे २०० मीटर स्पर्धेचे रौप्यपदक मिळविले.
१९०८ : 'देशाचे दुर्दैव' या जहाल अग्रलेखाबद्दल लोकमान्य टिळक यांना सहा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा.
१९३० : महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात जंगल सत्याग्रहाची सुरुवात.
१९३३ : विली पोस्ट हा पृथ्वीला प्रदक्षिणा घालणारा पहिला मानव ठरला. ७ दिवस १८ तास ४९ मिनिटात त्याने हा विक्रम केला.
१९५१ : देझिक आणि त्सिगान हे अवकाशयात्रा करणारे पहिले कुत्रे ठरले.
१९५४ : पोर्तुगीजांच्या ताब्यातून दादरा मुक्त.
१९८१ : भारताचा पहिला भूस्थिर उपग्रह 'अ‍ॅपल' कार्यान्वित.
१९९२ : सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला अयोध्या येथील बाबरी मशीद परिसरातील बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले.
२००५ : ७ जुलैच्या लंडन बाँबहल्ल्यातला संशयित समजून जॉन चार्ल्स दी मेनेझेस या निरपराध ब्राझिलिअन तरुणाची लंडन पोलिसांनी निष्काळजीपणे हत्या केली.
२०११ : नॉर्वेमध्ये दहशतवादी हल्ल्यात ७७ ठार.

२३ जुलै

जन्मदिवस : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (१८५६), व्हॅक्यूम ट्यूब आणि पेंटोड शोधणारा वॉल्टर शॉटकी (१८८६), रहस्यकथालेखक रेमंड चँडलर (१८८८), ज्ञानेश्वर वाङ्मयाचे भाष्यकार पांडुरंग ज्ञानेश्वर कुलकर्णी (१८८८), लेखक ताराशंकर बंदोपाध्याय (१८९८), क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद (१९०६), अभिनेत्री माई भिडे (१९१७), अभिनेता डॉ. मोहन आगाशे (१९४७), लेखक लक्ष्मण गायकवाड (१९५६), अभिनेता फिलीप सेमूर हॉफमन (१९६७), संगीतदिग्दर्शक हिमेश रेशमिया (१९७३), बुद्धिबळपटू युडिथ पोलगर (१९७६), अभिनेता डॅनिएल रॅडक्लिफ (१९८९)
पुण्यस्मरण : नोबल वायू शोधणारा नोबेलविजेता विल्यम रॅमसे (१८५२), आधुनिक शिवणयंत्राचा निर्माता आयझॅक सिंगर (१८७५), अमेरिकन सिनेमाचा एक आद्यप्रवर्तक सिनेदिग्दर्शक डी.डब्ल्यू. ग्रिफिथ (१९४८), डॉक्युमेंटरी चित्रपटांचा एक आद्यप्रवर्तक सिनेदिग्दर्शक रॉबर्ट फ्लॅहर्टी (१९५१), चेतापेशींमधल्या संदेशवहनाचे रासायनिक गुपित शोधणारा नोबेलविजेता हेन्री डेल (१९६८), हॉकीपटू बंडू पाटील (१९८८), इतिहाससंशोधक डॉ. र. वि. हेरवाडकर (१९९४), आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते दादासाहेब रुपवते (१९९९), सिनेअभिनेता मेहमूद (२००४), स्वातंत्र्यसैनिक कॅ. लक्ष्मी सहगल (२०१२), चित्रकार सय्यद हैदर रझा (२०१६)
---
वन संवर्धन दिन.
इ. स. पू. ७७६ : पहिल्या ऑलिंपिक स्पर्धांना ग्रीसमध्ये प्रारंभ.
१८२९ : विल्यम बर्टने टायपोग्राफरचे (टाईपरायटरचा पूर्वावतार) पेटंट घेतले.
१८८८ : जगभरातल्या सामाजिक चळवळींसाठी आणि क्रांतिकारकांसाठी प्रेरणादायी असलेले 'इंटरनॅशनल' हे गाणे प्रथम गायले गेले.
१९०३ : पहिल्या फोर्ड मोटारगाडीची विक्री.
१९०४ : पहिला आइसक्रीम कोन उपलब्ध.
१९२७ : पहिल्या सार्वजनिक रेडिओ केंद्राचे मुंबई येथे उद्घाटन व आकाशवाणीची मुंबईत नियमित सेवा सुरू.
१९५२ : इजिप्तमध्ये लष्करी उठाव सुरू. ही राजेशाहीची मृत्युघंटा ठरली.
१९७५ : आणीबाणीच्या जाहीरनाम्यास संसदेची बहुमताने मान्यता.
१९८३ : संपूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या कल्पक्कम अणुवीज केंद्राच्या पहिल्या संचाचे इंदिरा गांधी यांच्या हस्ते उद्घाटन.
१९९५ : 'शतकाचा धूमकेतू' म्हणवला गेलेल्या हेल-बॉप धूमकेतूचा शोध; वर्षभराने या धूमकेतूला मोठी शेपूट फुटली.
२००३ : मुंबईतील घाटकोपरमध्ये बसमध्ये बॉम्बस्फोट होऊन ३ ठार व ३० जण जखमी झाले.

२४ जुलै

जन्मदिवस : लेखक अलेक्झांद्र द्यूमा (१८०४), चरित्रलेखक व कादंबरीकार चिं. गं. भानू (१८५६), चित्रकार अल्फॉन्स मुचा (१८६०), कवी रॉबर्ट ग्रेव्ह्ज (१८९५), विमानातून अटलांटिक पार करणारी पहिली महिला वैमानिक अमेलिया एअरहार्ट (१८९८), ट्रंपेटवादक कूटी विलियम्स (१९१०), हैदराबाद मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ (१९११), बासरीवादक पन्नालाल घोष (१९११), विचारवंत प्रा. दि. य. देशपांडे (१९१७), क्रीडालेखक बाळ ज. पंडित (१९२९), अभिनेते, दिग्दर्शक मधुकर तोरडमल (१९३२), अभिनेता, दिग्दर्शक मनोज कुमार (१९३७), उद्योगपती अझीम प्रेमजी (१९४५), अभिनेता मायकल रिचर्ड्स (१९४९), गायिका जेनिफर लोपेझ (१९६९)
पुण्यस्मरण : सिनेदिग्दर्शक साशा गित्री (१९५७), उद्योगपती पीटर नरोन्हा (१९७०), वनस्पतिशास्त्राबद्दल लेखन करणारे विष्णू नारायण गोखले (१९७१), न्यूट्रॉन शोधणारा नोबेलविजेता जेम्स चॅडविक (१९७४), अभिनेता उत्तम कुमार (१९८०), अभिनेता पीटर सेलर्स (१९८०), लेखक व संपादक सतीश काळसेकर (२०२१)
---
१४८७ : नेदरलंड्समधल्या लीरवार्डन गावातल्या गावकऱ्यांनी परदेशी बिअरवर बहिष्कार घातला.
१७०४ : इंग्लंडने जिब्राल्टरवर ताबा मिळवला; तो अजूनही सोडलेला नाही.
१८२३ : चिलेमध्ये गुलामगिरीवर बंदी.
१९११ : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची बंगळुरू येथे स्थापना.
१९११ : आधुनिक जगाला माचु पिचु हे इंका शहर सापडले.
१९४९ : नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन उर्फ नाटो करारानुसार पश्चिम युरोपातील देश आणि अमेरिका यांची लष्करी संघटना स्थापन. ही शीतयुद्धाची सुरुवात मानण्यात येते.
१९५९ : ऋत्विक घटक दिग्दर्शित 'बारी थेके पालिए' चित्रपट प्रदर्शित.
१९६९ : अपोलो-११चे अवकाशवीर चंद्रावरून पृथ्वीवर सुखरूप परतले.
१९६१ : पानशेत, खडकवासला धरणफुटीच्या चौकशीसाठी न्यायाधीश बावडेकर आयोगाची नेमणूक.
१९७४ : वॉटरगेट प्रकरण - राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनने स्वतःविरुद्धचा पुरावा अवैधरीत्या दडवून ठेवला होता असा निकाल अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाने दिला.
१९९१ : आर्थिक उदारीकरणाचा अर्थसंकल्प तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी सादर केला.
२००० : विप्रो आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत चेन्नईची विजयालक्ष्मी सुब्रह्यण्यम भारताची पहिला महिला ग्रँडमास्टर बनली.
२००५ : मुंबईत २६ जुलैला आणि इतरत्र हाहाकार माजवणारा पाऊस सुरू. दक्षिण आशियात एकूण सुमारे ५,००० मृत.

२५ जुलै

जन्मदिवस : चित्रकार थॉमस एकिन्स (१८४४), लेखक आणि शिकारी जिम कॉर्बेट (१८७५), सॅक्सोफोनिस्ट जॉनी हॉजेस (१९०६), गायक पद्मविभूषण सेम्मन्गुडी श्रीनिवास अय्यर (१९०८), मराठी गायक व संगीत दिग्दर्शक सुधीर फडके (१९१९), डीएनएच्या रचनेच्या शोधाबद्दल नोबेल पुरस्कार न मिळालेली रोझालिंड फ्रँकलिन (१९२०), कवी वसंत बापट (१९२२), समीक्षक व लेखक द.भि. कुलकर्णी (१९३४), सिनेदिग्दर्शक राऊल रुईझ (१९४१), अभिनेता मॅट लब्लाँक (१९६७)
पुण्यस्मरण : कवी व समीक्षक सॅम्युएल टेलर कोलरिज (१८३४), पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका (१८८०), नाटककार नारायण कानिटकर (१८९७), चित्रकार ऑटो डिक्स (१९६९), लष्करी शिक्षणाचे प्रसारक कॅप्टन शिवरामपंत दामले (१९७७), संगीतकार जी.एस. कोहली (१९९६), सिनेदिग्दर्शक जॉन श्लेज़िंजर (२००३), सिनेदिग्दर्शक बी. आर. इशारा (२०१२)
---

सामाजिक न्याय दिन.
१९०८ : अजिनोमोटो - मोनोसोडियम ग्लुटामेटचा शोध. किकुनी एकीडा याने ते बनवण्याच्या पद्धतीचे पेटंट मिळवले.
१९२० : पहिले अटलांटिकपार दुतर्फा रेडिओ प्रसारण.
१९५५ : पोर्तुगीजांनी गोवा सरहद्द बंद करून गोव्यात दहशतीचा वरवंटा फिरवायला सुरुवात केली.
१९६३ : अमेरिका, ब्रिटन आणि रश्याचा अण्वस्त्र चाचण्यांवर मर्यादित बंदी करण्याचा करार.
१९६५ : बॉब डिलनने इलेक्ट्रिक गिटार वाजवून लोकसंगीत आणि रॉक संगीतामध्ये बदलाची सुरुवात केली.
१९७८ : जगातल्या पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म.
१९८४ : सोव्हिएत संघाची स्वेतलाना साव्तोस्काया अंतराळात चालणारी प्रथम महिला अंतराळवीर ठरली.
१९८५ : अभिनेता रॉक हडसनला एड्स झाल्याचे जाहीर; समलैंगिकता आणि एड्सविषयी जनजागृती होण्यामधला हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
२००० : पारीच्या विमानतळाबाहेरच कॉन्कॉर्ड विमान कोसळले; कॉन्कॉर्डला घरघर लागण्याची सुरुवात.
२००१ : एकेकाळची डाकू व नंतर खासदार झालेल्या फूलनदेवीची तिच्या घरासमोर हत्या करण्यात आली.

२६ जुलै
जन्मदिवस: अर्थशास्त्रज्ञ आल्फ्रेड मार्शल (१८४२), नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ (१८५६), समाजसुधारक राजर्षी छत्रपती शाहूमहाराज (१८७४), मानसोपचारतज्ञ कार्ल गुस्ताव युंग (१८७५), चित्रकार जॉर्ज ग्रॉस (१८९३), लेखक ऑल्डस हक्सली (१८९४), माजी भारतीय क्रिकेट कप्तान जी. एस. रामचंद्र (१९२७), चित्रपट दिग्दर्शक स्टान्ले कुब्रिक (१९२८), अभिनेत्री हेलन मिरन (१९४५), अभिनेता, निर्माता केव्हीन स्पेसी (१९५९), अभिनेत्री, निर्माती सँड्रा बुलक (१९६४),
पुण्यस्मरण: संगीतकार भास्कर चंदावरकर (२००९)

---

स्वातंत्र्यदिन : लायबेरिया (१८४७), मालदीव (१९६५)
विजय दिन : भारत (कारगिल युद्धाची समाप्ती)

१५०९ : कृष्णदेवराय याचा विजयनगरच्या राज्यावर राज्याभिषेक.
१८०३ : लंडनमध्ये जगातल्या पहिल्या सार्वजनिक रेल्वेचा आरंभ.
१९५१ : वॉल्ट डिस्नेची 'अॅलिस इन वंडरलँड' लंडनमध्ये प्रदर्शित.
१९५३ : क्युबन क्रांतीला सुरुवात.
१९५६ : जागतिक बँकेने आस्वान धरण बांधण्यासाठी अर्थसाहाय्य करण्यास नकार दिल्यावर ईजिप्तचा राष्ट्राध्यक्ष गमाल नासरने सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले.
२००५ : मुंबईमध्ये ९९.५ सेमी पाऊस पडून दोन दिवस शहर ठप्प झाले.

२७ जुलै
जन्मदिवस: गणितज्ज्ञ योहान बर्नोली (१६६७), रक्त, पित्त, हरितद्रव्य यांना रंग देण्याचे काम करणारे घटक शोधणारा नोबेलविजेता हान्स फिशर (१८८१), लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य (१९२६), साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कथाकार आशा बगे (१९३९), क्रिकेटपटू अॅलन बॉर्डर (१९५५), अभिनेता, दिग्दर्शक राहुल बोस (१९६७)
पुण्यस्मरण: अणुविज्ञानाची पायाभरणी करणारा जॉन डाल्टन (१८४४), बीनकार बंदे अली खाँ (१८९५), थायरॉईड ग्रंथीचा अभ्यास करणारा नोबेलविजेता एमिल कोचर (१९१७), लेखिका व कलासंग्राहक गर्ट्र्यूड श्टाईन (१९४६), अभिनेता अमजद खान (१९९२), सुदानमधल्या हलाखीचे फोटो काढणारा पुलित्झर विजेता केव्हीन कार्टर (१९९४) , शास्त्रज्ञ व राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम (२०१५)

---

१८८९ : ब्रिटिश इंडिया कमिटी या संस्थेच्या कामाला लंडनमध्ये सुरुवात. पुढे चार वर्षांतच या संस्थेच्या प्रयत्नांमुळे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भारतप्रेमी खासदारांचा गट निर्माण झाला.
१८९० : व्हिन्सेंट व्हॅन गॉने स्वतःला गोळी घालून घेतली; दोन दिवसांनी त्याचा मृत्यू झाला.
१९२१ : फ्रेडरिक बेंटिंगने इन्सुलिन रक्तशर्करा नियंत्रित करते याचा शोध लावला.
१९२५ : पुणे रेल्वे स्थानकाचे उद्घाटन.
१९४० : 'अ वाईल्ड हेअर' या चित्रपटातून बग्ज बनीचे चित्रपटसृष्टीत पदार्पण.
१९४९ : डी हॅविलँड कॉमेट या जगातील पहिल्या प्रवासी जेट विमानाचे पहिले उड्डाण.
१९८७ : टायटॅनिक जहाजाचे उरलेसुरले भाग वाचवण्याचे काम 'आरएमएस टायटॅनिक इन्क.' या कंपनीने सुरू केले.
१९९० : युक्रेन, उझबेकिस्तान व बेलारूसने सोविएत संघापासून स्वातंत्र्य जाहीर केले.

२८ जुलै
जन्मदिवस : सूक्ष्मदर्शी शोधणारा वैज्ञानिक रॉबर्ट हूक (१६३५), लेखिका, चित्रकार, निसर्गतज्ज्ञ बिएट्रिक्स पॉटर (१८६६), चित्रकार व माध्यमकलाकार मार्सेल द्युशॉं (१८८७), तत्त्वज्ञ कार्ल पॉपर (१९०२), टपरवेअरचा जनक अर्ल टपर (१९०७), ब प्रकारच्या काविळीवर संशोधन करणारा नोबेलविजेता बरूक ब्लूमबर्ग (१९२५), अष्टपैलू क्रिकेटपटू गारफील्ड सोबर्स (१९३६), अभिनेत्री आयेशा झुल्का (१९७२)
पुण्यस्मरण : संगीतकार योहान सेबॅस्तियन बाख (१७५०), मोतिबिंदूवर भिंगाचा उपाय शोधणारा नोबेलविजेता अल्वार गुलस्ट्रँड (१९३०), अणुभंजन शोधणाऱ्यांपैकी एक, नोबेलविजेता ऑटो हान (१९६८), साम्यवादी क्रांतिकारक चारू मुजुमदार (१९७२), क्रोमॅटोग्राफी शोधणारा नोबेलविजेता आर्चर जॉन पोर्टर मार्टीन (२००२), डीएनए शोधणाऱ्यांपैकी एक नोबेलविजेता फ्रान्सिस क्रिक (२००४), ज्ञानपीठविजेत्या लेखिका व मॅगसेसे पुरस्कारविजेत्या सामाजिक कार्यकर्त्या महाश्वेता देवी (२०१६)
---
स्वातंत्र्य दिन : पेरू (१८२१)
जागतिक कावीळ दिन
१६८२ : स्वराज्याला उपद्रवी पोर्तुगीज जहाजे संभाजी महाराजांनी पकडली.
१७९४ : फ्रेंच राज्यक्रांतीतील एक महत्त्वाचा क्रांतिकारक रोबेस्पिएर याला क्रांतिकारकांनी गिलोटिनवर चढवले.
१८२१ : पेरूने स्वतःला स्पेनपासून स्वतंत्र जाहीर केले.
१८३० : (२७-२९ जुलै) क्रांतीसाठी फ्रेंच जनता पुन्हा एकदा रस्त्यावर उतरली. २०० सैनिक व ८०० नागरिक मृत्युमुखी.
१९१४ : पहिल्या महायुद्धाची सुरुवात.
१९२८ : पहिली ऑलिंपिक ज्योत प्रज्वलित.
१९६७ : प्रागैतिहासिक मनुष्यांचे अवशेष अमेरिकेत वॉशिंग्टन राज्यात सापडले.
१९७६ : चीनमध्ये मोठा भूकंप; दोन लाखांहून अधिक ठार.
२००१ : इयन थॉर्पने जलतरणाच्या जागतिक विजेतेपद स्पर्धेमध्ये सहा सुवर्णपदके पटकावली.
२००५ : आयरिश रिपब्लिकन आर्मीने सुमारे ३५ वर्षे चालू असलेला आपला सशस्त्र लढा संपवत असल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले.

२९ जुलै
जन्मदिवस: विचारवंत अ‍ॅलेक्सिस द तोकव्हील (१८०५), कुष्ठरोगाचे जंतू शोधून काढणारे डॉ. गेरहर्ड हॅन्सेन (१८४१), उद्योगपती जे. आर. डी. टाटा (१९०४), सिनेदिग्दर्शक क्रिस मार्कर (१९२१), शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (१९२२), व्यंगचित्रकार शि. द. फडणीस (१९२५), कवी फ. मुं. शिंदे (१९४८), माहितीपटनिर्माता व दिग्दर्शक केन बर्न्स (१९५३), अभिनेता संजय दत्त (१९५९)
पुण्यस्मरण: संगीतकार रॉबर्ट शुमान (१८५६), चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉ (१८९०), समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर (१८९१), गीतकार राजा मेहदी अली खान (१९६६), सिनेदिग्दर्शक लुई ब्युन्युएल (१९८३), लेखक बिभूतीभूषण मुखोपाध्याय (१९८७), नोबेलविजेती रसायनशास्त्रज्ञ डोरोथी हॉजकिन (१९९४), अर्थतज्ज्ञ वि. म. दांडेकर (१९९५), स्वातंत्र्यसेनानी अरुणा असफ अली (१९९६), प्रकाशक स. कृ. पाध्ये (१९९७), अभिनेता जॉनी वॉकर (२००३), सिनेदिग्दर्शक क्रिस मार्कर (२०१२)

---

आंतरराष्ट्रीय संस्कृतिवैविध्य दिन
जागतिक व्याघ्र दिन
१९०७ : सर रॉबर्ट बेडन पॉवेल यांनी इंग्लंडमध्ये आठ दिवसांचा कँप भरवण्याची तयारी सुरू केली. ही स्काऊट चळवळीची सुरुवात मानली जाते.
१९५७ : आंतरराष्ट्रीय अणुउर्जा संस्थेची (IAEA) स्थापना.
१९५८ : 'नासा' या अमेरिकी अवकाश संशोधन संस्थेची स्थापना.
१९६८ : रोमन कॅथलिक चर्चच्या पोपने संततिनियमनावर असणारी बंदी सुरू ठेवली.
१९८० : मॉस्को ऑलिंपिकमध्ये भारताला हॉकीचे सुवर्णपदक.
१९८७ : भारत-श्रीलंका शांतता करारावर जयवर्धने आणि राजीव गांधी यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
१९८७ : ब्रिटिश पंतप्रधान मार्गरेट थॅचर आणि फ्रेंच अध्यक्ष फ्रॉन्स्वा मितरॉं यांनी इंग्लिश खाडीखाली युरोटनल खोदण्याच्या करारावर सह्या केल्या.

३० जुलै
जन्मदिवस : लेखिका एमिली ब्रॉंटे (१८१८), मोटरउद्योगात क्रांती घडवणारा उद्योजक हेन्री फोर्ड (१८६३), भातखंड्यांना शास्त्रीय संगीत सूत्रबद्ध करण्यास प्रवृत्त करणारे शिक्षणतज्ज्ञ राय राजेश्वर बाली (१८८९), अभिनेत्री सुलोचना (१९२८), लेखक दोमिनिक लापिएर (१९३१), अभिनेता आर्नोल्ड श्वार्झनेगर (१९४७), एड्सचे कारण एचआयव्ही आहे हे दाखवणारी नोबेलविजेती फ्रान्स्वाज बारे-सिनूसी (१९४७), लेखक सदानंद देशमुख (१९५९), अभिनेत्री लिसा कुद्रो (१९६३), गायक सोनू निगम (१९७३), अभिनेत्री हिलरी स्वॅन्क (१९७४)
पुण्यस्मरण : शिल्पकार हेन्री मूर (१९८६), लेखक शंकर पाटील (१९९४), सिनेदिग्दर्शक इंगमार बर्गमन (२००७), सिनेदिग्दर्शक मिकेलांजेलो अंतोनियोनी (२००७)
---
जागतिक मैत्री दिन.
स्वातंत्र्यदिन : व्हानुआतु (१९८०)
१९३० : उरुग्वेने पहिला फुटबॉल विश्वचषक जिंकला.
१९३७ : अंदमानच्या तुरुंगातल्या राजकीय कैद्यांच्या मागण्या सरकारने नाकारल्यामुळे त्यांनी अन्नसत्याग्रह सुरू केला.
१९७१ : अपोलो-१५ मधले अंतराळवीर डेव्हिड आर. स्कॉट आणि जेम्स बी. आयर्विन चंद्रावर उतरले.
१९८७ : राजीव गांधी श्रीलंकेच्या दौऱ्यावर असताना लष्करी सलामी होत असताना त्यांच्यावर हल्ला झाला.
२०१२ : उत्तर भारतातली ग्रिड तात्पुरती कोसळल्यामुळे ३६ कोटी लोक अंधारात.

३१ जुलै
जन्मदिवस : लेखक, पत्रकार कृष्णाची बाबाजी गुरुजी (१८४७), प्राचीन वाङ्मयाचे इतिहासकार व संतचरित्रकार ल. रा. पांगारकर (१८७२), लेखक मुन्शी प्रेमचंद (१८८०), प्राच्यविद्यापंडित व गणितज्ञ दामोदर धर्मानंद कोसंबी (१९०७), अर्थत्ज्ज्ञ मिल्टन फ्रीडमन (१९१२), लेखक प्रिमो लेव्ही (१९१९), क्रिकेटपटू ले. कर्नल हेमू अधिकारी (१९१९), अभिनेत्री मुमताझ (१९४७), लेखिका जे. के. रॉलिंग (१९६५)
पुण्यस्मरण : विचारवंत, ज्ञानकोशकार व लेखक दनि दिदेरो (१७८४), स्वातंत्र्यसैनिक धीरन चिन्नमलाई (१८०५), समाजसेवक जगन्नाथ शंकरशेठ (१८६५), संगीतकार फ्रान्झ लिस्ट (१८८६), भारतीय काँग्रेसचे आद्य संस्थापक अ‍ॅलन हयूम (१९१२), क्रांतिकारक उधमसिंग (१९४०), वैमानिक लेखक आन्त्वान द सँ-एक्झ्यूपेरी (१९४४), वैदिक तत्त्वज्ञानाचे भाष्यकार श्रीपाद दामोदर सातवळेकर (१९६८), पार्श्वगायक मोहम्मद रफी (१९८०), साहित्य समीक्षक कीर्तीनाथ कुर्तकोटी (२००३), लेखक गोर व्हिडाल (२०१२)
---
१४९८ : कोलंबसाचे जहाज त्रिनिदाद बेटाच्या किनाऱ्याला लागले.
१६५८ : औरंगजेब मुघल तख्तावर आला.
१७९० : पोटॅश बनवण्याच्या प्रक्रियेसाठी अमेरिकेतले पहिले पेटंट दिले गेले.
१८६५ : जगातल्या पहिल्या नॅरो गेज रेल्वेचे ऑस्ट्रेलियात उद्घाटन
१९२१ : मुंबई येथे महात्मा गांधीच्या उपस्थितीत परदेशी कपड्यांची होळी.
१९५४ : जगातील उंचीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर के-२ (पूर्वीचे नाव - माउंट गॉडविन ऑस्टिन) इटालियन गिर्यारोहकांनी सर केले.
१९५६ : जिम लेकरने एकाच कसोटी सामन्यात १९ बळी मिळवून विश्वविक्रम स्थापला.
१९७१ : डेव्हिस स्कॉट आणि जिम आयर्विन यांनी मूनबर्गमधून चंद्रावर चक्कर मारली.
१९९१ : अण्वस्त्र एक तृतियांशाने कमी करण्याच्या स्टार्ट करारावर अमेरिका आणि सोव्हिएत संघाने सही केली.
१९९८ : यू.के.ने भूसुरुंगांच्या वापरावर बंदी घातली.
२००८ : 'फीनिक्स' प्रोबने मंगळावर पाणी असल्याचे सिद्ध केले.