Skip to main content

कादंबरी

हॅट घातलेली बाई

हॅट घालणारी बाई बुंगाटून टाकते .

ती आणि तिची हॅट.
तिच्या हॅटवर फुलं आहेत

चार कंटाळवाणे लोक असतात . प्रत्येकजण पछाडलेला आहे . एक खूप साऱ्या सुखाने . त्याचं नाव राम असलं तरी अजिबात वनवास नाहीय त्याच्या नशिबी .
त्याला मनसोक्त आयुष्याला भिडायचंय .
एक रजनी मेहता आहे . तो मुलीच्या अकाली मृत्यूने जगता जगताच त्याच्या अवाढव्य बंगल्यात पुरला गेलाय .
अजुनी एक दोन आहेत .

त्यांच्या आयुष्यात हॅट घातलेली बाई आलीय . तिने सगळ्यांना ढवळून काढलंय .

समीक्षेचा विषय निवडा

ककल्ड/प्रतिस्पर्धी

ककल्ड (जारिणीचा यार ) या किरण नगरकर यांच्या कादंबरीचा रेखा सबनीस यांनी केलेला अनुवाद 'प्रतिस्पर्धी' वाचला .
ऐतिहासिक कादंबरी असूनही भाषा सुदैवाने नेहमीची मराठीच आहे .
कमल देसाई यांची उत्तम प्रस्तावना आहे . नेहमी प्रस्तावना न वाचणार्यांनीही ती आवर्जून वाचावी .
संपूर्ण कादंबरी युवराजच्या नजरेतून आपल्याला वाचयला मिळते . कादंबरीच्या कथनाची तिरकस विनोदी शैली रंजकता वाढवते .

संत मीराबाई , तिचा नवरा चितोडचा युवराज भोज आणि मीरेचा प्रियकर कृष्ण यांचे अजब नाते दाखवणारी ही कादंबरी आहे .
अगदी पहिल्या पानापासून शेवटापर्यंत खिळवून ठेवते .

समीक्षेचा विषय निवडा

झिम्मा – नाट्यचरित्र

नुकतेच विजया मेहता लिखित झिम्मा वाचले. पुस्तकाचे मुखपृष्ठ अत्यंत कलात्मकतेने केले आहे जे विजयाबाईंच्या पुस्तकाला साजेसे आहे. खरेतर या मुखपृष्ठानेच माझे लक्ष वेधले आणि मी पुस्तक खरेदी केले.

झिम्माची सुरुवात जरा वेगळ्या पद्धतीने बाई करतात. त्या आपल्या बालपणाकडे आणि तारुण्यातल्या विजया जयवंतकडे फक्त त्रयस्थपणे पाहताच नाहीत तर स्वत:चा उल्लेखदेखिल त्रयस्थपणे करतात जे सुरुवातीला वाचताना थोडेसे विचित्र वाटते आणि नंतर सवय होते हा आकृतिबंध नंतर नाहीसा होऊन त्या नेहमीप्रमाणे चरित्र सांगतात.

समीक्षेचा विषय निवडा

काळा सूर्य

काळा सूर्य आणि ह्याट घातलेली बाई हे अनेक वर्ष वाचायचे राहून गेलेले पुस्तक अखेरीस वाचून झाले .
पुस्तकं तुमची वेळ आल्याशिवाय भेटत नाहीत यावर परत एकदा विश्वास बसला .

काळा सूर्य हे विलक्षण झपाटून टाकणारे लिखाण आहे . त्यातले प्रतिमा , जग , एक एक व्यक्तिरेखा.... गूढ अदभूत आहे सगळं .
काळ्या रंगासारखे आकर्षक , वेगळे . अफाट सुंदर तरीही दूर ठेवणारे, घाबरवणारे , रहस्य पोटी वागवणारे . स्वतःचा एक असा अवकाश घट्ट मिटून घेतलेले .
अंधार काळ्या पोकळीचे लिखाण आहे .

आनंद देणारे लिखाण खूप मिळते . हे लिखाण ही आनंद देते , त्याबरोबर देते सैरभैरत्व .

समीक्षेचा विषय निवडा

मुलॉं रूज

'मुलॉं रूज ' हे हेन्री तुलूस लोत्रेक या चित्रकाराच्या जीवनावर आधारित पुस्तक वाचले . जयंत गुणे यांनी पिअर ल मूर यांच्या मूळ कादंबरीचा अनुवाद केला आहे.

समीक्षेचा विषय निवडा

‘द नाईव्ह अँड द सेंटिमेंटल नॉव्हेलिस्ट’ - ओरहान पामुक

नोबेल पुरस्कारविजेता तुर्की लेखक ओरहान पामुक याची काही साहित्यविषयक व्याख्यानं ‘द नाईव्ह अँड द सेंटिमेंटल नॉव्हेलिस्ट’ या पुस्तकात समाविष्ट आहेत. त्यांचं मराठी भाषांतर लवकरच प्रकाशित होत आहे. त्या निमित्ताने भाषांतरकारांच्या प्रस्तावनेतला हा संपादित अंश.

डॉक्टर झिवागो

डॉक्टर झिवागो ही कादंबरी प्रख्यात रशियन लेखक बोरिस पास्टरनॅक यांने लिहिली. बोरिस लिओनिडोविच पास्टरनॅक हा केवळ एक कादंबरीकार नव्हे तर एक कवी , संगीतकार आणि अनुवादकही होता ज्याचा कालखंड १८९० ते १९६० असा आहे. मॉस्कोतील एका श्रीमंत ज्यू कुटुंबात जन्मलेल्या पास्टरनॅकने लहानपणीच कविता करायला सुरुवात केली. माय सिस्टर, लाइफ., हा १९२२ मध्ये प्रकाशित केलेला पहिलाच कविता संग्रह गाजला. त्यानंतर १९३२ साली प्रकाशित झालेला सेकंड लाईफ आणि १९४५चा टेरेस्ट्रीअल एक्सपान्स या दोन कविता संग्रहांनी पास्टरनॅकला साहित्यिक उंचीवर नेऊन ठेवले.

समीक्षेचा विषय निवडा

प्ले इट ॲज इट लेज - जोन डिडियन

ऐंशीच्या दशकात, जगाच्या दुसऱ्या टोकावर जन्माला आलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीला साठ आणि सत्तरच्या दशकातील अमेरिकेचं - विशेषतः कॅलिफोर्नियाचं, त्या काळच्या रॉक संगीतामुळे एक वेगळंच आकर्षण होतं. पण जोन डिडियनचं लिखाण वाचून त्या पिढीची दिशाहीनता अंगावर येते. त्यातले अनेक सामाजिक, राजकीय मुद्दे - अगदी स्थानिक पातळीवरचेही - वाचून लक्षात येतं की हा काळ अमेरिकेसाठी किती क्रांतिकारी होता.

समीक्षेचा विषय निवडा

द एज्युकेशन ऑफ यूरी

Yuri

एकटं होणं, एकटं असणं, एकटं वाटणं, एकटं पडणं अशा अनेक प्रकारची रूपं माणसाचा एकटेपणा घेत असतो. आपल्याला एकटेपणातून सुटका हवीही असते आणि नकोही. नेमका हवा तेवढा एकटेपणा किंवा नेमकी हवी तेवढी सोबत मिळवणं हाच आयुष्याचा मूळ संघर्ष असेल का? जेरी पिंटोंची 'द एज्युकेशन ऑफ यूरी' ही कादंबरी वाचताना वारंवार हा प्रश्न पडतो. जेरी स्वतःच या कादंबरीचं वर्णन 'एकटेपणावर लिहिलेली कादंबरी' असं त्यांच्या मुलाखतींतून करून देतात.

समीक्षेचा विषय निवडा