Skip to main content

"हे पोलिस स्टेशनच राजकारण्यांना विका आता!"

काल काही कामासाठी पोलिस स्टेशनमध्ये गेलो असतानाचा प्रसंग. एक बारा-तेरा वर्षांची मुलगी आईवडिलांसोबत तक्रार नोंदवायला आली होती. समाजातील सध्याच्या दुर्दैवी परिस्थितीस साजेशी अशी छेडछाडीची तक्रार. परिसरातील दोन मवाली तिची रोज क्लासला जाताना छेड काढतात अशी तक्रार तिने नोंदवली आणि पोलिसांनी ताबडतोब त्यांना पकडून आणले. आधी पोलिसांसमोर दोघांनी साळसूदपणाचा आव आणला, पण पोलिसांनी शिव्या घालायला सुरुवात केल्यावर ते दोघे भडकले आणि पोलिसांनाच शिविगाळ आणि जातीवाचक धमक्या द्यायला सुरुवात केली. राजकीय कनेक्शन वापरुन एकाला बोलावूनही घेतले, आणि मग पोलीस स्टेशनमध्येच पोलिसांना 'भxxx बघा आता तुमची कशी xx मारतो' वगैरे धमक्या दिल्या आणि हाणामारी सुरु केली. मात्र पोलिसांनी त्या राजकीय हस्तक्षेपाला, धमक्यांना आणि हल्ल्याला न जुमानता त्यांना विविध चार्जेस लावून आत टाकले आणि 'आता तुम्ही मागं फिरुन तक्रार मागे घेऊ नका असे त्या मुलीला आणि तिच्या आईवडिलांना सांगितले. तसेच त्यांना त्यांचच्या सुरक्षिततेची हमी दिली. सगळा गोंधळ आटोपल्यावर एका हवालदाराने वैतागून "हे पोलिस स्टेशनच राजकारण्यांना विका आता!" असे उद्गार काढले.
पोलीस स्टेशनमधून बाहेर आलो तेव्हा डोकं सुन्न झालं होतं. अनेक प्रश्न डोक्यात घोंघावत होते....
१. त्या मुलीला होणारा त्रास थांबण्याऐवजी उलट आता तिच्या जिवाला आणि अब्रूृला धोका वाढला तर नाही ना?
२. स्रियांचे कपडे अत्याचारांना आमंत्रण देत असते तर त्या लहानग्या मुलीन हा त्रास होण्यासाठीे असे कोणते कपडे घातले होते?
३. प्रामाणिकपणे काम करुनही शिव्या खाणार्‍या आणि दबाव सहन करणार्‍या पोलिसांचं मनोबल खच्ची कसं नाही होणार?
४. xxवर फटके बसल्यावरच असल्या भxxx जात का आठवते? आपल्या घाणेरड्या कृत्याने आपण आपल्या जातीला बट्टा लावतोयअसा विचार मनात का येत नाही?
* Edited

अजो१२३ Sun, 23/11/2014 - 17:08

समाजाची मूल्ये ढासळत आहेत. व्यवस्था पक्की करणे अशात असंभव आहे. तितकी कोणाची इच्छाशक्ती नाही. समाजातल्या सगळ्या चांगल्या मूल्यांचा आधार* नविन समाजव्यवस्थेतेने खिळखिळा केला नि त्याला प्रणित असलेल्या मूल्यांचे हसे केले. अल्पबुद्धिच्या, अल्पशिक्षित समाजाला पर्यायी मूल्ये तिही प्रश्नांकित स्वरुपात दिली. असे अनंत प्रसंग भारतात मन:शांतीसहित राहायचे असेल तर पाहायची सवय करून घ्यायला पाहिजे.
-------------------
*ईश्वर

'न'वी बाजू Sun, 23/11/2014 - 21:01

३. प्रामाणिकपणे काम करुनही शिव्या खाणार्‍या आणि दबाव सहन करणार्‍या पोलिसांचं मनोबल खच्ची कसं नाही होणार?

यावरून एक जुना (आणि ष्टीरियोटिपिकल) विनोद आठवला.

एका खोलीच्या मध्यभागी एक मोठा खजिना असतो, आणि त्यावर त्या खोलीच्या चार कोपर्‍यांतून अनुक्रमे बॅटमॅन ('ऐसी'वरचा नव्हे!), सुपरमॅन, एक हुशार सरदारजी आणि एक बिनडोक सरदारजी असे चौघेजण एकसमयावच्छेदेकरून झडप घालतात. तर तो खजिना (त्या चौघांपैकी) कोणास मिळेल?

नितिन थत्ते Mon, 24/11/2014 - 11:12

In reply to by 'न'वी बाजू

आम्ही हा ज्योक अ‍ॅस्ट्रिक्स, ऑब्लिक्स, डम्ब सरदार आणि हुषार सरदार असा ऐकला होता.

ज्योक ऐकला तेव्हा पहिल्या दोनांचा उल्लेख प्रथमच ऐकला होता. =))