Skip to main content

उत्क्रांतीच्या नावानं

पृथ्वीवर जीवन अस्तित्वात आले, ते कसे बहरत/बदलत जात आहे, त्यातून अतिशय प्रगत, बुद्धीमान जाती तयार,झाल्या होताहेत, बदलत आहेत अशा मोठ्या पसार्‍याचा हा विषय. आपल्या "सांस्कृतिक" चलनवलनाच्या अतिशय गाभ्याशी असलेला हा विषय इथे चर्चेसाठी ठेवताना असंख्य मर्यादा येणार आहेत हे मान्य.
तरीही :

१) इथे होणार्‍या बहुतांश चर्चांमध्ये उत्क्रांती हमखास असते.
२) उत्क्रांतीबद्दल प्रत्येकाच्या मनात काही बर्‍यावाईट संकल्पना आहेत. त्या मुळातून 'अतिशय प्राथमिक दर्जाच्या जुजबी माहितीवर आधारित' ते 'कटींग एज जेनेटीक्स' ते 'प्रचंड आवाक्याने भंजाळून एका ठराविक सुसंगत निष्कर्षाप्रती येताना होणारा गोंधळ' अशा विविध स्वरुपांत वावरत आहेत.
३) उत्क्रांतीवादामुळे आपले बदललेले "नैसर्गिकतेचे" निकष वाद घालताना मुळाशी येतात असे दिसते. उदा-समलैंगिकता/'स्त्रीमुक्ती'-उत्क्रांती-नैसर्गिकतेचा तिढा इथे नवीन नाही.
४) उत्क्रांतीवादाचे, उत्क्रांतीच्या सतत बदलत राहणार्‍या आपल्या ज्ञानसंचिताचे प्रमाणीकरण कसे करावे/ त्यांचे कायदे-कानू अशा गोष्टींत उपयोजन/बदल कसे होतील याबद्दलच्या कल्पना/आढावे इत्यादी.
५) मानवी व्यवहारांचा, संपर्कक्षमतेचा, वैज्ञानिकतेचा, लैंगिकतेचा, पर्यावरणवादाचा उत्क्रांतीशी असलेला परस्पर संबंध, त्याविषयीचे कल्पनारम्य भविष्य-विचार

अशा मुद्द्यांवर, मनात रेंगाळणार्‍या प्रश्नांवर ऐकायला आवडेल.

मन Thu, 06/03/2014 - 15:42

सोप्या भाषेत उत्क्रांती म्हणजे काय ते समजेल अशी ; सोदाहरण लिहिलेली मालिक ऐसीवर उपलब्ध आहे.
ती वाचली नसल्यास हा त्याचा दुवा :-
http://www.aisiakshare.com/node/1785
दहा भाग आहेत. हा दहाव्या भागाचा दुवा आहे.
मागील नऊ भागांचे दुवे त्याच लेखात आहेत.

राजेश घासकडवी Thu, 06/03/2014 - 16:10

'नैसर्गिक निवडीतून जीवांमध्ये होत जाणारे बदल - त्यातून नवनवीन प्रजाती तयार होतात' या स्वरूपात डार्विनने उत्क्रांतीची कल्पना मांडली - १८६० च्या दशकात. मात्र तत्त्वज्ञान, मानववंशशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र, सौंदर्यशास्त्र या विषयांचा अभ्यास त्याही आधीपासून सुरू होता. या सर्वच शास्त्रांत मानव म्हणजे काय, मानवी मन म्हणजे काय याबाबत विधानं करण्यावाचून गत्यंतर नसतं. मात्र मानव तयार कसा झाला व का झाला याबाबत डार्विनआधी काहीच उत्तर नसल्यामुळे या सर्व शास्त्रांमध्ये मानवाविषयी काही ना काही गृहितकं घेतलेली असत - अजूनही असतात. उत्क्रांतीला १५० वर्षं होऊन गेली तरी अजूनही उत्क्रांतीचा विचार या शास्त्रांत काहीतरी मूलभूत म्हणून होतोच असं नाही. याची सुरूवात गेल्या काही दशकांत झालेली दिसते.

नैसर्गिकता हा थोडा निसरडा शब्द आहे. निसर्गतः मानवाची निर्मिती कशी झाली आणि त्याचे कल कसे आहेत हे नैसर्गिक. नैसर्गिक असलेलं सगळंच न्याय्य, योग्य असतं असं नाही.

उत्क्रांतीच्या ज्ञानसंचिताचं प्रमाणीकरण वगैरे भाग कळला नाही. मला वाटतं सामान्यांना समजण्यासाठी जी तत्वं आवश्यक आहेत ती शोधून झालेली आहेत. प्रश्न मानवाच्या जन्माविषयीच्या आधीच्या चुकीच्या कल्पना सोडून देणं हे महत्त्वाचं आहे.

लिहिताना लक्षात आलं की चर्चाप्रस्ताव फारच अस्ताव्यस्त आहे. जरा अधिक नेमके प्रश्न असते तर बरं झालं असतं.

अजो१२३ Thu, 06/03/2014 - 17:30

१. एक क्षण आपण मानून चालू कि उत्क्रांती झाली आहे. ती अर्थातच जगातल्या पदार्थांच्या, उर्जांच्या, इ इ च्या भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्मांचा परिपाक आहे. या प्रकारे व्यक्तिला जर एक भौतिक एकक मानले तर त्याचे सर्व गुणधर्म निश्चित होतात. म्हणजे मी काय विचार करणार आहे, काय बोलणार आहे, काय लिहिणार आहे, काय वागणार आहे हे प्रथमपासूनच सुनिश्चित आहे. तसेच इतर सर्वांचे व इतर सर्व बाबींचे आहे. समजा माझा माइंडसेट उत्क्रांतीविरोधी असला तर असू शकते कि तो ही माझा एक भौतिक गुणधर्म आहे. यात कोणाकडे कोणते स्वातंत्र्य आले? उत्क्रांत म्हणजे अस्वतंत्र. त्यामुळे उत्क्रांती मानणारे लोक व्यक्तिस्वातंत्र्य मानतात यात एक तांत्रिक विरोधाभास आहे. यापुढे जाऊन (त्यांना तसे स्वातंत्र्य असेल वा त्यांच्यात तसा भौतिक गुणधर्म असेल तर) त्यांनी इतरांकडून (उत्क्रांती झाली नाही म्हणणारांकडून)स्वतंत्र विचार अपेक्षिणे अजूनच विचित्र वाटते.

२. अप्प्लाईड उत्क्रांतीचा विचार सध्याला घाईचा ठरू शकतो. लोक उत्क्रांती कशी झाली आहे यावरून मानवजातीसाठी काय इष्ट आणि अनिष्ट हे ठरवून मोकळे होत आहेत. पण मूळ उत्क्रांतीचा कशी झाली हे विज्ञान अजूनही प्राथमिक अवस्थेत आहे. प्रथम उत्क्रांत जीव तयार व्हायला पृथ्वी निर्माण झाल्यापासून १-१.५ बिलियन वर्षे लागली होती असे आताआतापर्यंत वाचून होतो. अलिकडे सिद्ध झाले आहे कि पृथ्वी फार लवकर , म्हणजे १.५ मिलियन वर्षांतच वयात आली. यावरून आतापर्यंत पहिल्या १-१.५ बिलियन वर्षांत काय काय उलथापालथी पृथ्व्वीवर झाल्या आणि जे निष्कर्ष काढले गेले ते सगळे वाया गेले. सगळा इतिहास पुन्हा वेगळा लिहायला लागणार. मग आतापर्यंत मनुष्यजीवनात वापरलेले निष्कर्ष , त्यांचे काय?

३. देव, धर्म यांना पिटण्याची हौस वेगळी, ज्या शास्त्रज्ञांना धार्मिक संस्थांमुळे अन्याय सोसावा लागला त्यांना न्याय मिळवून देण्याची हौस वेगळी, स्वतःला इन व्होग कल्चरशी जोडून प्रगत म्हणवून घेण्याची हौस वेगळी आणि चिकित्सक दृष्टीने पाहून नविन शोधांना मानवी कल्याणाकरता वापरणे वेगळे.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 06/03/2014 - 18:40

In reply to by अजो१२३

वरचा प्रतिसाद मला फारसा समजला नाही. अगदी पहिल्या वाक्यालाच अडखळले. (माझ्या आकलनानुसार उत्क्रांती झाली - मानायला काहीच हरकत नाही - आणि अजूनही सुरूच आहे; बहुदा सगळे जीवजंतू मेल्याशिवाय थांबणार नाही.) पण पुढचा प्रतिसादही काहीही समजला नाही. अधिक उदाहरणं, संदर्भ किंवा काही दिलं तर नक्की काय म्हणायचं आहे हे समजेल.

राजेश घासकडवी Thu, 06/03/2014 - 19:09

In reply to by अजो१२३

तुम्ही उत्क्रांती आणि डिटरमिनिझम यात गल्लत करत आहात बहुतेक. उत्क्रांतीतून सजीवांमध्ये बदल घडून 'माकडापासून माणूस' झाला यासाठी असंख्य पुरावे आहेत. त्यामुळे 'घटकाभर समजू उत्क्रांती झाली' हे 'घटकाभर समजू गुरुत्वाकर्षण आहे' या वाक्यासारखं आहे. उत्क्रांतून सजीवांची निर्मिती आणि मानवाची प्रत्येक भौतिक अवस्था, प्रत्येक क्षण हा आधीच ठरल्याप्रमाणे आहे या संकल्पनेचा तसा अर्थाअर्थी संबंध नाही.

उत्क्रांतीच्या प्रत्येक कालखंडात प्रत्येक प्रजाती कशी बदलली याचं चित्र स्पष्ट नाही. पण याचा अर्थ उत्क्रांतीला अर्थ नाही असं नाही. म्हणजे एखाद्या नकाशावर प्रत्येक गाव, प्रत्येक रस्ता, त्यावरचा प्रत्येक दगड अचूक नोंदलेला नसेल तर तो नकाशा 'वापरताच येणार नाही' असं कसं म्हणणार? पुन्हा, मला वाटतं मला तुमचा आक्षेप नीट कळलेला नाही.

क्रमांक ३ चा मुद्दा बाउन्सरसारखा सप्पकन डोक्यावरून गेला. डार्विनने काही इन-व्होग गिरी केली नाही. त्याने एक शक्तिशाली थियरी मांडली आणि नंतरच्या शास्त्रज्ञांनी प्रचंड अभ्यास करून ती पुराव्यांनी सिद्ध केली.

कान्होजी पार्थसारथी Thu, 06/03/2014 - 20:08

In reply to by राजेश घासकडवी

अजुन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सतत कानावर आढळणारा हा शब्दप्रयोग : "माकडापासून माणूस"
त्यामुळे उत्क्रांती(वादा)ची एकरेषीय कल्पना सुरुवातीलाच डोक्यात बसते. परंतु ते अतिशय गुन्तागुंतीचे आहे, हे उपयोगी पडेल:

राजेश घासकडवी Thu, 06/03/2014 - 21:25

In reply to by कान्होजी पार्थसारथी

बरोबर. विशेषतः अनेक मोठे बदल जेव्हा आपल्याला समजावून घ्यायचे असतात तेव्हा हे चित्र उपयोगी पडतं. मात्र 'माकडापासून माणूस' हे त्या मानाने छोटं स्थित्यंतर आहे. त्यामुळे या छोट्या बदलासाठी आपण खालील प्रकारचा कल्पनाप्रयोग करू शकतो.

समजा एक आत्ताच्या काळातली २० वर्षांची तरुणी आहे. तिच्या शेजारी तिची आई (२० वर्षांची असतानाची) एक मीटर अंतरावर उभी करा. या दोन तरुणींमध्ये बरंच साम्य असेल. तसाच काही फरकही असेल. सर्वसाधारण आईमुलीत साम्य फरक असतात तसेच. दोघींनाही आपण खात्रीलायकरीत्या 'मनुष्य' म्हणू. आता असंच दर मीटरवर आधीच्या पिढीतली तरुणी - आजच्या तरुणीची आजी - उभी करा. म्हणजे आपण जसं एक एक मीटर पुढे जाऊ तसं आईची आईची आई... असं करत पिढ्यांमध्ये मागे जाऊ. आपण जर शंभर मीटर गेलो (शंभर पिढ्या मागे गेलो) तर आपल्याला फार फरक जाणवणार नाही. साम्य पाच-दहा पिढ्यांत संपलेलं असेल. पण शंभर मीटरमध्ये उभ्या असलेल्या सगळ्यांना आपण मानव म्हणूनच सहज ओळखू. हजार मीटरपर्यंतही काही प्रश्न येऊ नये. मात्र आपण जसजसे अजून पुढे जाऊ - दहा वीस किलोमीटर जाऊ तसतशा उभ्या असलेल्या तरुणी आपल्याला माहीत असलेल्या मानवी तरुणींपेक्षा थोड्या वेगळ्या दिसायला लागतील. अंगावरचे केस वाढलेले दिसतील, कवट्यांचा आकार बदललेला दिसेल... हे चालू असताना अर्थातच प्रत्येक आई आणि मुलीमध्ये असतं तितकं साम्य/फरक प्रत्येक दोन पिढ्यांमध्ये दिसतील. पंचवीस-पन्नास किलोमीटर प्रवास केल्यानंतर दिसणाऱ्या स्त्रिया ह्या मानव आहेत का याचा आपल्याला प्रश्न पडेल. आणि शंभर किलोमीटरवर उभ्या असलेल्या स्त्रीसाठी आपण निश्चितच मानव ऐवजी दुसरा काहीतरी शब्द शोधू. या अर्थाने 'माकडापासून माणूस' हे खरं आहे. आत्ता ज्यांना आपण माकड म्हणतो त्याच प्रजातीतली ती स्त्री असेल की नाही हे सांगता येत नाही.

अजो१२३ Fri, 07/03/2014 - 14:17

In reply to by राजेश घासकडवी

उत्क्रांतीतून सजीवांमध्ये बदल घडून 'माकडापासून माणूस' झाला यासाठी असंख्य पुरावे आहेत. त्यामुळे 'घटकाभर समजू उत्क्रांती झाली' हे 'घटकाभर समजू गुरुत्वाकर्षण आहे' या वाक्यासारखं आहे.

१. अर्थाअर्थी हे लिहिण्याचा संबंध नव्हता. हे सगळं माझ्या 'समजून चालू' इतक्याच शब्दांवर झालेलं भाष्य आहे.
२.समजा मी एक गोष्ट आहे असे मानत नाही तेव्हा मी ती आहे असे गृहीत धरून कसा विसंगत निष्कर्ष येतो हे दाखवू शकतो.
३. उत्क्रांती म्हणजे फक्त माकडापासून माणूस बनणे नव्हे. http://en.wikipedia.org/wiki/Timeline_of_evolutionary_history_of_life
या पानावर सांगीतल्याप्रमाणे गेल्या ३,६००,०००,००० आणि त्यापूर्वीच्या १,०००,०००,००० वर्षात काय काय झाले आहे ते सगळे. आता तो नकाशा अस्पष्ट म्हणजे खोटा असे मला म्हणायचे नाही. पण त्याचा पायाच डळमळीत असेल तर तो नकाशा वापरू नये असे माझे मत आहे. करिता पहिला सजीव कसा तयार झाला यावर आपली तांत्रिक चर्चा झाली पाहिजे. ही कालरेखा/माहिती जेव्हा खात्रीलायक/पुरेशी वाटत नाही तेव्हा मनुष्य त्यामागच्या काळाचा/पार्श्वभूमीचा म्हणजे अबायोजेनेसिस थेरीचा विचार करू लागतो. http://en.wikipedia.org/wiki/Abiogenesis इथे त्यावर चर्चा आहे. येथील संकल्पनांचा एकत्रित विचार करून मग मत बनवले पाहिजे. याकरिता चर्चा करणार्‍या दोन्ही व्यक्तिंस भौतिक, रासायनिक, जैविक, भौगोलिक, इ इ शास्त्रांची सखोल माहिती असणे आवश्यक आहे. मी पुस्तके वाचत नाही (१९९४ पूर्वी या विषयावर वाचली होती), पण उत्क्रांती आणि अबायोजेनेसिस वर बरीच माहीती नेटवर आणि बातम्यांत वाचतो, खूप आर्टीकल्स वाचतो. अबायोजेनेसिस उत्क्रांतीचा पाया आहे. पण त्यात कितीतरी "alternative models" मांडलेले आहेत. यातील alternative शब्दावर मला भयंकर आपत्ती आहे. (शिवाय मॉडेल्स बनवण्यापूर्वी जी स्थिती निर्माण व्हावयास लागते ती निर्माण व्हायची शक्यता हा ही माझ्या रसाचा दुसरा विषय आहे. दोहोंचे निरसन झाले तर उत्क्रांती झाली आहे हे समजायला काही हरकत नाही.)
४. उत्क्रांती स्वीकारणे म्हणजे मी स्वतः कसा झालो आहे ते स्वीकारणे. आता प्रत्येकाला आपण, आपले पालक, वंश यांबद्दल जशी उत्सुकता असते तशी सर्वात अगोदर काय झाले याबद्दल असणे साहजिक आहे. मी उत्पत्ती काय आहे हा विषय माझ्यादृष्टीने गौण नाही. म्हणून कोणी काहीही सांगावे आणि मी ते स्वीकारावे असे होणार नाही. अबायोजेनेसिसची क्रिस क्रोसिंग मॉडेल्स आणि भलतीच गृहितके मला नेहमीच अति, अस्वीकार्य वाटतात. विशेष करून वातावरण निर्मितीचा इतिहास, प्रथम ऑर्गॅनिक रेणूंचे बनणे, रेणूंच्या मधे कोड निर्माण होणे आणि सोबतीला execution mechanism निर्माण होणे, अशा रेणूंची एक पेशी बनणे, अशी पेशी जिवंत होणे, खाऊ-पिऊ लागणे, पुनरुत्पादन करू लागणे, बहुपेशीय जीव बनणे, शरीरातल्या वेगवेगळ्या संस्था बनणे (एका म्य्यूटेशनने हृदय बनले तरी त्याच वेळी पहिले फुफ्फुस बनायला पाहिजे, रक्त बनायला पाहिजे), बहुलिंगी स्पेसिज बनणे, consciosness येणे, आणि बेसिक प्राणिय बुद्धिमत्ता येणे यांचे रिजनेबल स्पष्टीकरण हवे. हे नसेल तर उत्क्रांती "जशी" झाली आहे हे आपण मानत आहोत ते निराधार ठरते. mhanoon we should hold our horses.
५. उत्क्रांती संतोषजनक वाटत नाही आणि धार्मिक वा अन्य स्पष्टीकरण संतोषजनक वाटत नाही तेव्हा माणसाने काय करावे. तर for all practical purposes हे ज्यान मला जगायला आवश्यक नाही. म्हणून दोहोंबद्दल शंका उपस्थित करून विराम घ्यावा.
६. बहुतांश लोकांना उत्क्रांती म्हणजे जोक वाटतो. क्ष ग्रहावर पाणी "असावे" तेव्हा तिथे जीवन असण्याची "शक्यता आहे" अशी विधाने पाहून संताप होतो.

उत्क्रांतून सजीवांची निर्मिती आणि मानवाची प्रत्येक भौतिक अवस्था, प्रत्येक क्षण हा आधीच ठरल्याप्रमाणे आहे या संकल्पनेचा तसा अर्थाअर्थी संबंध नाही.

फक्त इतक्याच वाक्याची चर्चा करायला हवी. माझे म्हणणे असे आहे कि नियमबद्ध अशा निसर्गात काही probability ने मानवजात निर्माण झाली. आपण ज्या ज्या गोष्टीने बनलो आहोत त्यांचे फिक्स नियम आहेत असे उत्क्रांती/विज्ञान म्हणते. ते नियम तसे होते म्हणून उत्क्रांती झाली (देवाची गरज लागली नाही). आता जर आपण पहिल्यापासून ठरवलेल्या नियमांनी बांधलेले advanaced robots असू तर व्यक्तिस्वातंत्र्याचा प्रश्न येतोच कूठे? इथे किफलकावर मी पुढची कोणती कि दाबणार आहे हे माझ्या मेंदूत सुनिश्चित आहे (त्याला ३६० कोटी वर्षांचा इतिहास आहे) तर मी अन्य काही लिहायचे स्वातंत्र्य आले कुठून? उत्क्रांतीवादी व्यक्तिस्वातंत्र्यवादी असतात याला तात्रिक अर्थ नाही असे मी म्हणतोय. इथे तांत्रिक शब्दाला एक अर्थ आहे. जे नियमबद्ध आहे असे मानतात त्यांनी फ्री वील असावी असे म्हणणे म्हणजे विचित्र नव्हे का? If you are evolved in a fixed way out of your chemical properties, where is the question of free will?

क्रमांक ३ चा मुद्दा बाउन्सरसारखा सप्पकन डोक्यावरून गेला. डार्विनने काही इन-व्होग गिरी केली नाही. त्याने एक शक्तिशाली थियरी मांडली आणि नंतरच्या शास्त्रज्ञांनी प्रचंड अभ्यास करून ती पुराव्यांनी सिद्ध केली.

डार्विन थोर होता. त्याच्यामुळे कामाचे वा बिनकामाचे सजीवांचे वर्गीकरण झाले. बरेच इतिहासाचे तुकडे जोडता आले. मी त्याच्याबद्दल बोलत नाहीय. कोणत्याही थोर माणसाबद्दल मी व्यक्तिगत आरोप का करू? ते विधान हौश्या, नवश्या, आणि गवश्यांबद्दल होते. उत्क्रांती म्हणजे काय ते काही कळत नसताना कुठल्या कूठे जाणारे.

राजेश घासकडवी Fri, 07/03/2014 - 17:25

In reply to by अजो१२३

३ बिलियन वर्षांपूर्वी काय झालं ते आपल्याला अचूकपणे माहीत नाही याचा अर्थ असा नाही की ते कुठच्या नियमांनी झालं हे नियमच अयोग्य आहेत. मी मुद्दामून 'नैसर्गिक निवडीतून होणारी उत्क्रांती' हा शब्दप्रयोग वापरतो. याचं कारण साध्या प्राण्यांपासून अधिकाधिक क्लिष्ट प्राण्यांची निर्मिती (उत्क्रांती) कशी होते याचं उत्तर नैसर्गिक निवडीच्या तत्त्वातून मिळतं. त्यामुळे उत्क्रांतीची थियरी हा नकाशा नसून गायडिंग प्रिन्सिपल आहे. रेणू ते पेशी प्रवास नक्की कुठच्याकुठच्या टप्प्यांनी झाला हे सांगणं अवघड आहे. आल्टरनेटिव्ह मॉडेल्सचा फायदा असा की त्या प्रवासासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत, म्हणजे तो प्रवास शक्य आहे हे तरी आपल्याला समजून घेता येतं.

(एका म्य्यूटेशनने हृदय बनले तरी त्याच वेळी पहिले फुफ्फुस बनायला पाहिजे, रक्त बनायला पाहिजे)

ही पूर्णपणे चुकीची अपेक्षा आहे. यातूनच इर्रिड्यूसिबल कॉंप्लेक्सिटीचा युक्तिवाद निर्माण होतो. वेगवेगळे अवयव उत्क्रांत होण्यासाठी केवळ खालील गोष्टींची आवश्यकता असते

१. कुठल्यातरी मूळ प्राण्यात त्या अवयवासदृश काहीतरी अवयव किंवा शरीराचा भाग असायला हवा.
२. त्या मूळ 'अवयवा'चा तो प्राणी टिकून राहण्यासाठी किंचित का होईना फायदा होत असायला हवा. (इव्होल्यूशनरी अॅडव्हांटेज हवा)
३. तो मूळ अवयव ते आत्ता दिसणारा अवयव यांच्यामध्ये अगदी लहान लहान पायऱ्या अशा हव्या की ज्यातली प्रत्येक वरची पायरी ही अधिक इव्होल्यूशनरी अॅडव्हांटेज असलेली हवी.

या तीन अटी भागल्या की नैसर्गिक निवडीने आपोआप ते साध्य होतं. जुन्या काळपासून 'डोळा हा इतका प्रचंड क्लिष्ट आहे की तो आपोआप बनणं शक्यच नाही' असा युक्तिवाद होत असे, अजूनही लोकांच्या मनात तो असतो. प्रकाशकिरण ग्रहण करू शकणाऱ्या काही पेशी तयार झाल्या की त्यापासून अत्यंत क्लिष्ट लेन्सवाला डोळा टप्प्याटप्प्याने तयार होतो हे लोकांनी दाखवून दिलेलं आहे.

आडकित्ता Sat, 08/03/2014 - 23:00

In reply to by अजो१२३

करिता पहिला सजीव कसा तयार झाला यावर आपली तांत्रिक चर्चा झाली पाहिजे.

"आपले" क्रेडेन्शिअल्स एस्टॅब्लिश करा, की गूगल किंवा विकीपेडियापलिकडले जीवशास्त्र, जिवाश्मशास्त्र, सजिवांचा इतिहास, इ.इ. मधील आपली अर्हता काय. तद्नंतर तुमच्या तुकडे जोड थ्येरीबद्दल बोललेले वाचवले जाईल.

अजो१२३ Sat, 08/03/2014 - 23:26

In reply to by आडकित्ता

हा प्रतिसाद वाचून मी भाषेतील उणिवांबद्दल धागा काढला होता तेव्हा आपण (त्यातले काहीच न समजल्याने) मला अंतर्ज्ञान विषयावर लिहायचा खवचट सल्ला दिला होता याची आठवण झाली. स्टेस्थोस्कोप गळी मिरवला म्हणजे उत्क्रांतीबद्दल बोलण्याची, ती झाली आहे असे सर्टीफिकेट देण्याची अर्हता येते असा आपला फार गोड गैरसमज झाला आहे. असो.

आडकित्ता Sun, 09/03/2014 - 07:24

In reply to by अजो१२३

माझ्या आठवणीप्रमाणे त्या प्रतिसादास विनोदी अशी श्रेणी मिळाली होती. तिथेही, भाषा इतकी अपुरी वाटते, तर उत्क्रांतीतली नेक्स्ट स्टेप आंतरज्ञान/टेलिपथी हीच असेल, असे माझे मत मांडले होते. अर्थात तेही तुम्हाला समजले नाहीच, ही भाषेपेक्षा समजून घेणार्‍या भाषिकाची 'लिमिटेशन' तुम्ही पुन्हा एकदा लक्षात आणून दिली.
तुम्हाला दिलेले इतरही प्रतिसाद माझ्या लक्षात आहेत.
पण तो मुद्दा नाहिये.
मुद्दा, 'तांत्रिक' चर्चेबद्दल आहे.
उद्या उठून भारताच्या बजेटबद्दल मी 'चर्चा' जरूर करू शकतो, पण त्याबद्दल 'तांत्रिक' चर्चा करण्याआधी मला काहीतरी बेसीक अर्हता असावी लागते. अन्यथा गुगलून मांडलेले भाकड पुरावे वाचण्यात अन त्यांचा प्रतिवाद करण्यात लोकांचा वेळ वाया जातो अशी माझी समजूत आहे.
अर्थात वेळ वाया घालविणे (मराठीत टाईमपास) हाच उद्देश असेल, तर तो भाग अलाहिदा!
तेव्हा, गळ्यात स्टेथो नव्हे तर इतर काय घातल्याने 'उत्क्रांती झालीच नाही' अशी पिंक टाकता येते, ते सांगितले तर बरे होईल. असला 'तांत्रिक' प्रभाव असलेली व गळ्यात घालून कानातही लटकविता येते अशी अजून एकच वस्तू माझ्या माहितीत आहे.

'तांत्रिक' = टेक्निकल, टेक्नॉलॉजिकल
'तांत्रिक' = तंत्रमंत्र ;)

कान्होजी पार्थसारथी Thu, 06/03/2014 - 19:14

In reply to by अजो१२३

व्यक्तिस्वातंत्र्य(अधीक योग्य - फ्री विल) आणि उत्क्रांती यांचा काय संबंध आहे या बद्दल माझाही जाम गोंधळ आहे. सध्यापुरतं ह्या लिंक्सः
ह्या लेक्चर्संनी काही मुद्दे समजून घेण्यास थोडीफार मदत केली.
दुवा
दुवा

राजेश घासकडवी Thu, 06/03/2014 - 19:50

In reply to by कान्होजी पार्थसारथी

थोडक्यात सांगायचं झालं तर सजीव आणि मनुष्यांच्या निर्मितीचे दोन प्रकारचे सिद्धांत आहेत
१. देवाने सगळं तयार केलं. देवाने माणसाला फ्री विल दिली, त्या फ्री विलनुसार पाप-पुण्याचे निर्णय जो योग्य घेतो त्याचं देव भलं करतो.
२. देव वगैरे काही नाही, सर्व प्राणी नैसर्गिकरीत्या, अणूरेणूंपासून सुरूवात होऊन हळूहळू उत्क्रांत झाले. आज आपल्याला जो पसारा दिसतो आहे तो 'नैसर्गिक निवडीतून उत्क्रांती' ही प्रक्रिया अब्जावधी वर्षं चालल्यामुळे दिसतो.

आता पर्याय १ मध्ये खरं तर फ्रीविल आहे की नाही हा प्रश्न येतो. कारण जर देवाने सगळं तयार केलं तर माणसं अशी दुष्टपणा-चांगूलपणा का करतात? त्यावरचं उत्तर असं काहीसं - 'देवाने माणसाला फ्रीविलही दिली आहे जेणेकरून कोण चांगलं वागतो हे ठरवता येईल'

पर्याय २ मध्ये तो प्रश्न मेंदूंच्या क्षमतेचा बनतो. फ्रीविल किंवा तिचा आभास कसा निर्माण होतो यावर संशोधन चालू आहे. पण म्हणून उत्क्रांती चुकीची ठरत नाही.

कान्होजी पार्थसारथी Thu, 06/03/2014 - 20:29

In reply to by राजेश घासकडवी

उत्क्रांती चुकीची ठरत नाही हे मान्यच. मला याविषयी अजुन एक प्रश्न आहे- फ्री वील किंवा देवाची संकल्पना ही स्वत: उत्क्रांतीचे एक प्रॉड्क्ट धरले, तर ती बुद्धीमान गुंतागुंतीच्या सजीवांचे व्यवच्छेदक लक्षण ठरेल का? म्हणजे, य वर्षांनी र या ग्रहावर उत्क्रांतीला पोषक वातावरण मिळून अतिशय गुंतागुंतीची बुद्धीमत्ता तयार झाली तर वरील संकल्पना तयार होण्याची शक्यता कशी तपासावी?

आडकित्ता Thu, 06/03/2014 - 21:04

In reply to by कान्होजी पार्थसारथी

र ग्रहावर जावून तेथिल अतिशय गुंतागुंतीच्या बुद्धीमत्ताधारक प्राण्यांचा एक सर्वे (सर्वेक्षण : व्हय मर्‍हाटी सबूद हाय ह्यो) करावा, व त्याचे निष्कर्ष हितं पब्लिश (प्रकाशित) करावेत. यामुळे तेथिल बुद्धीमान प्राण्यांनी देव ही संकल्पना उत्स्फूर्तपणे निर्माण केली व तिचा उगम भीतीमधे आहे, हे सिद्ध होईल.

आडकित्ता (from Uranus)

Nile Fri, 07/03/2014 - 14:25

In reply to by कान्होजी पार्थसारथी

फ्री वील किंवा देवाची संकल्पना ही स्वत: उत्क्रांतीचे एक प्रॉड्क्ट धरले

संकल्पना ह्या उत्क्रांतीच्या प्रॉडक्ट्स आहेत हे आधी कसे सिद्ध करणार ते सांगा. तुम्ही म्हणता त्या 'बुद्धिमान' सजीवांचे या ग्रहावरती फ्री वील आणि देव या संकल्पनेवर प्रचंड मतभेत आहेत, हे ही विसरू नये.

कान्होजी पार्थसारथी Fri, 07/03/2014 - 15:28

In reply to by Nile

आपण, आपला मेंदु उत्क्रांत आहोत.
शिवाय प्रत्यक्ष देवाच्या अस्तित्वावर कोणाला विश्वास असो वा नसो, देव या संकल्पनेचं अस्तित्व कुणीच नाकारत/नाकारु शकत नाही.

मन Fri, 07/03/2014 - 15:36

In reply to by कान्होजी पार्थसारथी

http://www.aisiakshare.com/node/1404
ह्या धाग्यावरून साभार.
.
.
अँड्रोमिडा गॅलॅक्सीमध्ये M319 या ताऱ्याच्या थोडासा पलिकडे एक बॉस्को नावाचा गुलाबी उंट राहतो. जर घरात एखादी वस्तू सापडत नसेल तर 'बॉस्को, बॉस्को, शिवणाचा दोरा कुठे अाहे?' असं म्हटलं अाणि त्याचं मायाळू अस्तित्व अाजूबाजूला feel केलं तर पुष्कळदा दोरा सापडतो. पण यासाठी मन सश्रद्ध हवं. बॉस्को कशावरून अस्तित्वात अाहे, पुरावा काय, त्याला कुणी निर्माण केलं, अशा शंका काढत बसलं तर या prescription चा काही उपयोग होत नाही.
.
.
वरील परिच्छेद वाचला असेल तर बॉस्को नावाच्या गुलाबी उंटाच्या संकल्पनेचं अस्तित्वही कुणीच नाकरु शकत नाही.
.
.
संकल्पनेचं अस्तित्व नाकारणं म्हणजे काय हेच समजलं नाही.
.
.
कुणी उठून काहीही संज्ञा तयार करेल. म्हणजे त्या त्या संज्ञेला आणि संकल्पेला अस्तित्व प्राप्त झालं.
ok.
so what ??

कान्होजी पार्थसारथी Fri, 07/03/2014 - 15:55

In reply to by मन

मन, तुमचा मुद्दा टी पॉट चा आहे.
पण याच विकी पानावर जेम्स वूड म्हणतो: God is a "grand and big idea"!
असो, ह्यावर वितंड्वाद घालता येतो. मला म्हणायचं आहे, ह्या संकल्पना केवळ कुणा एकाच्या/ काही एक समूहांच्या 'प्रसुत' कल्पना असतील्/नसतील, त्यादेखील आपल्या बरोबर चालत आलेल्या दिसतात. त्या भितीतुन आल्या असतील, मान्य, पण त्या भितींहुन कितीतरी प्रगल्भ ही झालेल्या दिसतात. म्हणून मला हे उत्क्रांत बुद्धीमत्तेचे लक्षण वाटते इतकंच.

राजेश घासकडवी Mon, 10/03/2014 - 18:11

In reply to by कान्होजी पार्थसारथी

तुमच्या प्रश्नाचे दोन भाग आहेत.
१. देवाची कल्पना, श्रद्धा यांना उत्क्रांतीचं प्रॉडक्ट म्हणता येईल का?
अर्थातच. प्रगत मेंदूला आसपासच्या परिस्थितीचं आकलन आहे, तिचं निरीक्षण करून तीमध्ये आकारबंध, समान सूत्रं शोधण्याची क्षमता आहे. ही क्षमता उत्क्रांत झालेली आहे, आणि अधिभौतिकविषयक कल्पना त्या क्षमतेतून निर्माण झालेल्या आहेत. अर्थातच उत्क्रांती झाली नसती, किंवा प्रगत मेंदूंपर्यंत पोचलेली नसेल तर या कल्पना बाळगणारे जीव दिसून येणार नाहीत.
२. जिथे जिथे उत्क्रांतीमुळे तयार झालेले मेंदू दिसतील तिथे या कल्पना दिसतील का?
या प्रश्नाचं उत्तर शोधणं शक्य नाही, केवळ अंदाजच बांधावे लागतील. तेव्हा माझा अंदाज सांगतो. आसपासच्या जगतात काहीतरी पॅटर्न शोधून काढणं हे प्रगत मेंदूंचं व्यवच्छेदक लक्षण आहे. बहुतेक वेळा हे पॅटर्न पुरेशा विद्याअभावी शोधले जातात. तसंच आसपास ज्या हालचाली होतात, घटना घडतात त्यामागे 'कोणीतरी आहे' हे भीतीपोटी गृहित धरणारा मेंदू उत्क्रांतीत टिकून राहण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे 'कोणीतरी आहे' असा निष्कर्ष काढणारा मेंदू असलेला जीव 'ही हालचाल निरर्थक, रॅंडम आहे' असा निष्कर्ष काढणाऱ्या जिवापेक्षा न मरण्याची शक्यता अधिक आहे. कारण निष्कर्ष चुकण्याची किंमत पहिल्या बाबतीत कमी आहे, आणि दुसऱ्या बाबतीत मोठी आहे. यावरून मला असं वाटतं की आपल्यासारख्या बुद्धिमत्तेचे जीव दिसले तर त्यांच्यातही काही ना काही प्रमाणात देवाची, श्रद्धेची संकल्पना असेल. ती किती शक्तिवान असेल, समाजात तिचा किती प्रादुर्भाव असेल, परस्परांना विरोध करणारे धर्म तयार होतील का याबद्दल अंदाज करणंही कठीण वाटतं.

अजो१२३ Fri, 07/03/2014 - 14:30

उत्क्रांतीतून सजीवांमध्ये बदल घडून 'माकडापासून माणूस' झाला यासाठी असंख्य पुरावे आहेत. त्यामुळे 'घटकाभर समजू उत्क्रांती झाली' हे 'घटकाभर समजू गुरुत्वाकर्षण आहे' या वाक्यासारखं आहे.

मला संस्थळाचे तापमान वाढवायचे नाही, पण हे सत्य आहे आजही गुरुत्वाकर्षण "थेट" मोजता येत नाही.

अजो१२३ Fri, 07/03/2014 - 15:18

In reply to by मन

समांतर उदाहरण द्यायचे झाले तर -
वस्तुमान असलेल्या दोन वस्तूंत आकर्षण असते असे निरीक्षण आहे. जेव्हा अशा दोन वस्तू आकर्षणामुळे एकमेकांकडे येऊ लागतात तेव्हा त्यांच्यात गुरुत्वाकर्षण आहे असे आपण "म्हणतो."
आईचे मुलावर प्रेम आहे असे आपण म्हणतो. पण हे प्रेम निरीक्षणांवरून आहे असे आपण मानतो. प्रेम थेट मोजणारे, डिटेक्ट करणारे कोणते उपकरण नाही. तसेच गुरुत्वाकर्षणाच्या लाटा थेट पकडणारे कोणते उपकरण नाही. तो एक इन्फरन्स आहे.

नितिन थत्ते Fri, 07/03/2014 - 15:20

In reply to by अजो१२३

जररल रिलेटिव्हिटीमध्ये असे म्हटले आहे की गुरुत्वाकर्षण खरोखरचे आहे की भासमान हे कळण्याचा कुठलाही मार्ग नाही. [त्यावरूनच प्रकाशकिरण गुरुत्वाकर्षण क्षेत्रात वाकतील असा निष्कर्ष निघाला]. [प्रिन्सिपल ऑफ इक्विव्हॅलन्स]

घनु Fri, 07/03/2014 - 16:05

In reply to by अजो१२३

गुरुत्वाकर्षण "थेट" मोजता येत नाही >>>
http://en.wikipedia.org/wiki/Gravimetry

शिवाय :
Microgravimetry

Microgravimetry is a rising and important branch developed on the foundation of classical gravimetry. Microgravity investigations are carried out in order to solve various problems of engineering geology, mainly location of voids and their monitoring. Very detailed measurements of high accuracy can indicate voids of any origin, provided the size and depth are large enough to produce gravity effect stronger than is the level of confidence of relevant gravity signal.

अजो१२३ Fri, 07/03/2014 - 16:28

In reply to by घनु

मला काय म्हणायचं आहे ते लिहिता येणार नाही. (पहा - A certain observation is attributed to a cause. There is dependable consistency in observations. However, there is no direct detection of cause. Assume a ball is resting on snooker table. There is no instrument that detects separate waves from sun, moon, and earth on it. However, the stability/motion of ball is consistent with assumed forces by these three.) पण विकिपेडियावर विश्वास असेल तर त्यात गुरुत्वाकर्षण प्रत्यक्ष डीटेक्ट झालेले नाही असे लिहिले आहे.
http://en.wikipedia.org/wiki/Gravitational-wave_detector

बाकी मायक्रोग्रॅव्हीटी, आम्ही ऑईल आणि गॅस एक्सप्लोरेशन क्षेत्रात असल्याने (होतो तेव्हा), काय चीज आहे त्याची कल्पना आहे. मायक्रोग्रॅव्हीतीचे किचकट उदाहरण का देता, भरती ओहोटीचे पुरेसे आहे.

या धाग्यावर हे लैच अवांतर आहे पण प्रकाशाला वस्तुमान नसताना तो गुरुत्वाकर्षणाने का वळतो हे कळले नाही. क्लासिकल, मॉडर्न आणि क्वांटम भौतिकशास्त्रांत इतकी विसंगती आहेत कि चक्क डोके बाजूला ठेऊन (गीता वाचताना करावे लागते तसे) वाचावे लागते. असो.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 08/03/2014 - 00:21

In reply to by अजो१२३

प्रकाशाला वस्तुमान नसताना तो गुरुत्वाकर्षणाने का वळतो हे कळले नाही.

तुम्ही बॉबस्लेडींग पाहिलं आहेत का? या इथे एक व्हीडीओ आहे. ती स्लेड आतले लोक वळवत नाहीत, ती आपोआप वळते. किंवा गूगल मॅप्स उघडा. आणि त्यात मॉॅस्को ते व्लाडीव्होस्टॉक अंतर मोजा (get directions नाही, सरळ रेषेतलं अंतर). त्यातही 'सरळ' रेष वाकडी दिसेल. याचं कारण तर्काने शोधायचं ठरवलंत तर असं म्हणता येईल, ज्या रस्त्याने जायला कमीतकमी वेळ लागेल, तो सगळ्यात जवळचा रस्ता. अवकाश आणि काल एकत्र होतात, असं जे म्हणतात ते हे, अंतर मोजताना किती काळ प्रवासाला लागतो हे मोजलं जातं.

प्रकाश असाच 'वळतो', कारण तिथे सरळ रेषा हीच 'वाकडी' असते. सगळ्यात कमी वेळ लागणारा रस्ता प्रकाश अवलंबतो, ती सरळ रेष.

गुरूत्त्वीय लहरी कदाचित अस्तित्त्वातच नसतील असाही एक सिद्धांत आहे. पण गुरुत्त्वाकर्षाची देवघेव होण्यासाठी गुरुत्त्वीय लहरी असल्याच पाहिजेत असं काही नाही.

ग्रेटथिंकर Wed, 12/03/2014 - 20:24

In reply to by अजो१२३

प्रकाशाला वस्तुमान नसताना तो गुरुत्वाकर्षाने का वळतो..>>>>>
why gravity only attracts? why it doesnt repel? हा प्रश्न जात मूलभूत आहे..
विद्युतचुंबकीय बल, न्युक्लियर स्ट्राँग फोर्स,न्युक्लियर विक फोर्स हि तीन बले आकर्षण आणि प्रतिकार्षण दाखवतात. पण गुरुत्व बल फक्त आकर्षण बलच आहे ..
मग विश्व या गुरुत्व बलाच्या प्रभावखाली एका बिंदुत केंद्रीत का होत नाही???.. इथेच डार्क एनर्जीचा सैद्धांतीक शोध लागला.. ग्रव्हीटीलाही पुरुन विश्वाला प्रसरणशील बनवणारी अदृश्य उर्जा.." डार्क एनर्जी".

नगरीनिरंजन Fri, 07/03/2014 - 19:03

In reply to by अजो१२३

काय काय थेट मोजता येते?
अंतर अमुक मीटर आहे असे म्हणतो म्हणजे ज्याला आपण मीटर म्हणतो त्या अमुक इतक्या पट्ट्या त्या दोन बिंदूंमध्ये बसतील असे म्हणतो. उद्या मीटरची पट्टी बदलली तर अंतर बदलले. अंतर आहे आणि किती आहे हे थेट मोजता येते का?
वजन मोजण्यासाठी तर प्रत्यक्ष गुरुत्वाकर्षणाचीच गरज पडते. एकच गोष्ट पृथ्वीवर आणि चंद्रावर वेगवेगळ्या वजनाची असते. वजन थेट मोजता येते का?
२५ सेंमी लांबीच्या लंबकाला एक हेलकावा पूर्ण करण्यासाठी लागणार्‍या वेळाला आपण एक सेकंद म्हणतो. वेळ थेट मोजता येतो का?
वस्तुमान थेट मोजता येते का?
बळ थेट मोजता येते का?
त्वरण थेट मोजता येते का?
आयक्यू थेट मोजता येतो का?

अजो१२३ Fri, 07/03/2014 - 18:31

३ बिलियन वर्षांपूर्वी काय झालं ते आपल्याला अचूकपणे माहीत नाही याचा अर्थ असा नाही की ते कुठच्या नियमांनी झालं हे नियमच अयोग्य आहेत. मी मुद्दामून 'नैसर्गिक निवडीतून होणारी उत्क्रांती' हा शब्दप्रयोग वापरतो. याचं कारण साध्या प्राण्यांपासून अधिकाधिक क्लिष्ट प्राण्यांची निर्मिती (उत्क्रांती) कशी होते याचं उत्तर नैसर्गिक निवडीच्या तत्त्वातून मिळतं.

१. ते ३०० कोटी वर्षे नसून ३६० +- कोटी वर्षे आहे. मानव ०.२२ कोटी वर्षांचा आहे तेव्हा यामुळे चर्चेत फार फरक पडू शकतो.
२. नैसर्गिक निवडीचा नियम म्हणजे १८ वी पर्यंतच्या सिलॅबसमधला एक विषय आहे. माझी इच्छा बाराखडी पासून ते आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र सगळे विषय चर्चायची आहे.

आल्टरनेटिव्ह मॉडेल्सचा फायदा असा की त्या प्रवासासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत, म्हणजे तो प्रवास शक्य आहे हे तरी आपल्याला समजून घेता येतं.

हे अजागळ ludicrous विधान वाटलं. म्हणजे जवळजवळ असं म्हटलं आहे कि ३३ कोटी देव आहेत असं म्हणल्याने देव असल्याची शक्यता आपल्याला समजून घेता येते.

१. कुठल्यातरी मूळ प्राण्यात त्या अवयवासदृश काहीतरी अवयव किंवा शरीराचा भाग असायला हवा.
२. त्या मूळ 'अवयवा'चा तो प्राणी टिकून राहण्यासाठी किंचित का होईना फायदा होत असायला हवा. (इव्होल्यूशनरी अॅडव्हांटेज हवा)
३. तो मूळ अवयव ते आत्ता दिसणारा अवयव यांच्यामध्ये अगदी लहान लहान पायऱ्या अशा हव्या की ज्यातली प्रत्येक वरची पायरी ही अधिक इव्होल्यूशनरी अॅडव्हांटेज असलेली हवी.

उत्क्रांतीला दिशा (म्हणजे मानव ज्याला प्रगत, बुद्धिमान, क्षम, अजून जास्त इंद्रिये असलेला, इ इ समजतो तिकडे) नसते हे आपणास ठाउक असावेच. म्य्यूटेशन जिकडे घेऊन जातात तिकडे ती होते. आपण आता एक उदाहरण घेऊ. Let's take the organism before the circulatory system was evolved. त्याच्याकडे हृदय नाही, फुफुस नाही, रक्त नाही, रक्तवाहिन्या नाहीत आणि ही सिस्टीम बनायची आहे. तुमचे वरचे नियम वापरून काय काय झाले असेल ते सांगू शकता का?

या तीन अटी भागल्या की नैसर्गिक निवडीने आपोआप ते साध्य होतं. जुन्या काळपासून 'डोळा हा इतका प्रचंड क्लिष्ट आहे की तो आपोआप बनणं शक्यच नाही' असा युक्तिवाद होत असे, अजूनही लोकांच्या मनात तो असतो. प्रकाशकिरण ग्रहण करू शकणाऱ्या काही पेशी तयार झाल्या की त्यापासून अत्यंत क्लिष्ट लेन्सवाला डोळा टप्प्याटप्प्याने तयार होतो हे लोकांनी दाखवून दिलेलं आहे.

जे निर्जिव द्रव्य आहे, त्याचे नंतर रेणू झाले. नंतर एकपेशीय साधे जीव झाले. मला हेच उमगत नाही कि बाह्य जगात प्रकाश (electromagnetic radiation) म्हणून एक गोष्ट आहे आणि मेंदू - ऑप्टेकल नर्व्स - डोळा - किरणे या काँबिनेशने आपल्याला दिसू शकते वा पाहायचे आहे हा साक्षात्कार या पेशींना का झाला असावा? बाह्य जगातील प्रकाश आणि पेशींचे रोजचे शेड्यूल यात काय संबंध होता?

राजेश घासकडवी Sat, 08/03/2014 - 12:55

In reply to by अजो१२३

तुमचे वरचे नियम वापरून काय काय झाले असेल ते सांगू शकता का?

माझा जीवशास्त्राचा तितका अभ्यास नाही. पण जुन्या प्राण्यांना हे अवयव नव्हते, आता तसे अवयव असलेले प्राणी दिसतात. उत्क्रांती झाली आहे याचा पुरावा पृथ्वीच्या जुन्या प्रस्तरात सापडणारे प्राणी बिन फुफ्फुसांचे दिसतात आणि आताचे प्राणी फुफ्फुसवाले दिसतात यावरून सिद्ध होतं. नैसर्गिक निवड हे हा प्रवास होण्याचं कारण आहे. हे कारण समजून घेणं हे पहिलीच्या अभ्यासक्रमात येतं, आणि नक्की फुप्फुसं कशी तयार झाली हे बारावीच्या अभ्यासक्रमात. तेव्हा नैसर्गिक निवड म्हणजे काय हे आधी शिकून घेतलेलं बरं.

दिसू शकते वा पाहायचे आहे हा साक्षात्कार या पेशींना का झाला असावा?

नैसर्गिक निवड. दिसणं, पाहणं वगैरे प्रगत मेंदूची लक्षणं आहेत. त्या आधी साधे बिनबुद्धीचे सेन्सर मेकॅनिझम म्हणून या गोष्टी वापरल्या जातात. तेवढ्याचाही इव्होल्यूशनरी अॅडव्हांटेज असतो म्हणून त्या गोष्टी पुढच्या पिढ्यांत प्रादुर्भावाने दिसतात. आणि मगप्रत्येक छोटी म्यूटेशन जीमुळे हा डोळा सुधारतो, ती टिकवली जाते.

अजो१२३ Sun, 09/03/2014 - 14:51

In reply to by राजेश घासकडवी

नैसर्गिक निवड?
म्हणजे दुसर्‍या गॅलेक्सीमध्हून येणारी प्रारणे पाहायची कि शेजारची वस्तू पाहायची यांच्यात्ली नैसर्गिक निवड?

राजेश घासकडवी Mon, 10/03/2014 - 18:16

In reply to by अजो१२३

तुमचा प्रश्न कळला नाही. मी नैसर्गिक निवड हा शब्दप्रयोग नॅचरल सिलेक्शन या उत्क्रांतीवादातल्या तांत्रिक संकल्पनेसाठी प्रतिशब्द म्हणून वापरला होता.

अजो१२३ Mon, 10/03/2014 - 22:57

In reply to by राजेश घासकडवी

अर्थातच डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत आपण साइट करताय!

आपण पाहण्याबद्दल बोलतोय. पाहणे कसकसे शक्य आहे? ultraviolet electromagnetic, infrared eectromagnetic, alpha, beta, gamma, x-ray, radio waves, ultra-sound (mechanical waves), etc, etc ही सगळी प्रारणे पाहण्यासाठी कामात आली असती. असे असताना केवळ visible spectrum of electromagnetic waves प्रोसेस करणारा डोळा उत्क्रांत होणे नवलच. माझ्या मनात येणारे प्रश्न असे-
१. डोळे उत्क्रांत व्हावेतच का? जसे आता आपल्या गुरुत्वाकर्षणाच्या लाटा दिसत्/जाणवत नाहीत तसेच काही दिसले नसते तर काहीच फरक पडायला नको होता?
२. इतक्या सगळ्या प्रारणांतून electromagnetic waves आधारित डोळाच का?
३. electromagnetic waves च्या इतक्या मोठ्या रेंजमधे विविध रंग वैगेरे दाखवणारा visible spectrum च का?
४. आता असा डोळा आधी बनला कि bat ही स्पेसिस आधी इवोल्व झाली. कारण ती वेगळीच रेंज प्रोसेस करते. आपण वटवाघूळ एक केस म्हणून घेतले तर काय काय वटवाघूळ होण्याआधी उत्क्रांत झाले आणि काय काय नंतर? (जसे पंख आणि डोळा यांचा क्रम)
५. घारीला खूप उंचावरून स्पष्ट दिसते. तिचे उंचावरून उडण्याचे स्किल आधी निर्माण झाले कि डोळा?
६. व्हिज्यूअ सिस्टिमचे एकूण किती भाग आहेत?

(दिसते म्हणजे नक्की काय होते हे अजूनही माहित नाही हा भाग अलहिदा)

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 10/03/2014 - 23:30

In reply to by अजो१२३

२. इतक्या सगळ्या प्रारणांतून electromagnetic waves आधारित डोळाच का?

असं काही नाही. माध्यमातून प्रसारित होणाऱ्या ध्वनिलहरी ग्रहण करण्यासाठी कान आहेत; कानही चांगल्यापैकी क्लिष्ट यंत्रणा आहे.

विद्युतचुंबकीय प्रारणांमधे दृष्य प्रकाश हा फार लहान भाग आहे. पण सूर्यातून बाहेर पडणारी प्रारणं, प्रकाश ५५० नॅनोमीटर (हिरवा रंग) या भागात सगळ्यात जास्त आहेत; आपले डोळे त्याच तरंगलांबीच्या आसपास सगळ्यात जास्त संवेदनशील असतात. हे उत्क्रांतिमधून आलेलं उपयुक्त फीचर आहे. हरितद्रव्य त्याच प्रकारचा प्रकाश सगळ्यात जास्त, चांगल्या प्रकारे शोषून घेऊ शकतं.

इतर काही प्राणी याच तरंगलांबीत आंधळेही असतील. पण डोळे तसे असल्यामुळे त्यांना पुरेसं अन्न मिळत असेल, लैंगिक पुनरुत्पादनासाठी जोडीदार मिळत असेल आणि पुनरुत्पादनाआधी हे प्राणी इतर प्राण्यांची शिकार बनत नसतील, तर आहे ती रचना बदलण्यासाठी काही incentive नाही. ते तसंच राहण्याची शक्यता बरीच जास्त आहे.

प्रश्न क्र 4-5 यात एक गोष्ट आधी बनली आणि मग दुसरी आली असं गृहितक आहे, जे गैरलागू आहे. घारींचे पूर्वज फार उंच उडत नसतील आणि त्यांच्या डोळ्यांची क्षमता कमी असेल. दोन्ही गोष्टी हळूहळू बदलत गेल्या. या संदर्भात जिराफांच्या उंच मानेचं उदाहरण बरेचदा दिलं जातं.

दिसतं म्हणजे नक्की काय, याचं भौतिकशास्त्रातलं उत्तर, एखाद्या वस्तूमधून निघालेली, किंवा वस्तूने परावर्तित केलेली प्रारणं डोळ्यापर्यंत येतात आणि मेंदूला त्याचा आकार, रूप, रंग समजतात. वस्तूमधून अवरक्त प्रारणं बाहेर आलेली मांजरांना दिसत असतील, तर मांजरांनाही ती वस्तू दिसते. आपल्याला दिसते तशीच दिसते असं नाही, पण त्या वस्तूचे आकार, रंग, रूप असे गुणधर्म समजतात.

आडकित्ता Tue, 11/03/2014 - 13:31

In reply to by अजो१२३

(दिसते म्हणजे नक्की काय होते हे अजूनही माहित नाही हा भाग अलहिदा)

हे तुम्हाला माहीत नाही असे म्हणत आहात, की कुणालाच माहीत नाही असे म्हणायचे आहे?

तुमच्या प्रश्नांची उत्तरे :
१. 'डोळा' नसला, तरी अमिबासारखे एकपेशिय जीवही उजेडास 'सेन्सिटिव्ह' असतात. उजेड व अंधार (म्हणजे उजेडाचा आभाव) या दोन गोष्टी रिमोट सेन्सिंगसाठी उपयोगी आहेत, व त्यामुळे तिथपासून आपल्या डोळ्यापर्यंत अनेक प्रकारच्या डोळ्यांची उपपत्ती झालेली आहे. ऑफ्थॅल्मॉलॉजीचे ड्यूक एल्डर यांनी संपादित केलेले सिस्टीम ऑफ ऑफ्थॅल्मॉलॉजी नावाचे १४ व्हॉल्युम्सवाले पुस्तक आहे. यातला एक व्हॉल्यूम फक्त डोळ्याची उत्पत्ती व उत्क्रांती कशी झाली, व दुसरा त्याच्या एम्ब्रियॉलॉजीवर आहे. अधिक वाचनासाठी उपयुक्त ठरेल.
२. ब्याटम्यान यांचेकडे साऊंड वेव्ह्ज वापरून बघावे कसे, याबद्दल चौकशी करावी.
३. मानवेतर प्राणी स्पेक्ट्रममधील इतर प्रकारचे 'रंग' बघू शकतात, कुत्री इतर प्रकारचे ध्वनी ऐकू शकतात, तसेच.
४. वटवाघूळास डोळा आहेच. व तो कामही करतो. पण रात्री बघण्यासाठी उजेड नसल्याने, त्यांनी कंदिल इव्हॉल्व्ह करण्याऐवजी साऊंड वेव्ह्स वर बेस्ड सिस्टीम डेव्हलप केली. संपूर्ण आयुष्य जमीनीखाली काढणार्‍या काही घुशींचे डोळे उत्क्रांती होउन गायब झालेले दिसतात.
५. मॅरेथॉन रनरला काटक पाय, मोठा दम, उत्तम पंपिंग करणारे हृदय हवे असते. यापैकी काय आधी तयार होते? (यातील प्रत्येक घटक 'ट्रेन' करून त्याची कपॅसिटी वाढवत नेली जात आहे, हे गृहित धरलेले आहे.) आपण गाडीचे हेडलाईट आधी डिझाइन झाले, की इंजिन? असा प्रश्न विचारीत आहात :)
६. ऑफ्थॅल्मॉलॉजीचे ड्यूक एल्डर यांनी संपादित केलेले सिस्टीम ऑफ ऑफ्थॅल्मॉलॉजी नावाचे १४ व्हॉल्युम्सवाले पुस्तक आहे. यातला एक व्हॉल्यूम फक्त डोळ्याची अ‍ॅनाटॉमी व एक फिजिऑलॉजी यावर आहे. प्रत्येक व्हॉल्यूम आदमासे हजार-पंधराशे पानी आहे. यात व्हिज्युअल सिस्टिमच्या भागांबद्द्लचा अभ्यास केलेला आढळेल :)

(एक्झॅक्टली याच कारणासाठी क्रेडेन्शिअल्स एस्टॅब्लिश करा हे म्हटले होते. हे बेसिक वाचन केलेले असेल, तर 'डोळ्या'बद्दलच्या वरच्या ५-७ हजार शब्दांच्या चर्चेची गरजच रहात नाही, डोळा आला कुठून यावर भरपूर संशोधन ऑलरेडी उपलब्ध आहे. आपल्याला पडलेत ते प्रश्न इतरांना पडून गेलेले आहेत. त्याची उत्तरे शोधणारे संशोधन, पुराव्यांसकट आधीच पियर रिव्ह्यूड पद्धतीने उपलब्ध आहे.इ.इ.. पण, .. असो.)

वरील पुस्तक System of ophthalmology by Sir Stewart Duke-Elder, येथे प्रतधिकारमुक्त असे संपूर्ण उपलब्ध आहे.

मन Tue, 11/03/2014 - 13:47

In reply to by आडकित्ता

---/\--
पुस्तक भन्नाट आहे.
फार अवांतर न करता, सरधोपट शंकेवर नेमकं उत्तर दिलत; भारिच.
पुस्तकाची विषयसूची आताच पाहिली. अत्यंत रोचक वाटते आहे.

बॅटमॅन Wed, 12/03/2014 - 01:45

In reply to by आडकित्ता

जबरी माहितीपूर्ण प्रतिसाद.

तदुपरि आमच्या जातीची माहिती दिल्याबद्दल अजूनच धन्यवाद.

अवांतरः आमच्या जातीची अधिक माहिती कुठे अन कशी मिळेल याबद्दल काही सूचना? तो डॉळ्यावरचा ठोकळा आहे तसलं काही?

अमुक Wed, 12/03/2014 - 05:09

In reply to by बॅटमॅन

आमच्या जातीची अधिक माहिती कुठे अन कशी मिळेल
......................सोप्या भाषेत - 'Echoes of Bats and Men' फुकटात उपलब्ध.
या पुस्तकाचा लेखक 'डोनल्ड ग्रिफिन' याने याच क्षेत्रात पायाभूत संशोधन केले आहे. 'एकोलोकेशन्' ही संज्ञाही त्याचीच.

अजो१२३ Wed, 12/03/2014 - 19:49

In reply to by आडकित्ता

हे तुम्हाला माहीत नाही असे म्हणत आहात, की कुणालाच माहीत नाही असे म्हणायचे आहे?

कोणालाच माहीत नाही. http://www.stanford.edu/class/cs379c/archive/2012/suggested_reading_lis…
ही लिंक वाचा. तुम्ही दिलेली लिंक १९५२ कि १९५६ च्या लेखनाची आहे (ती कमी महत्त्वाची आहे असं नाही.)इथे गेल्या २० वर्षांत दॄष्टी क्षेत्रात काय काय प्रगती झाली आहे याचा आढावा आहे. तो २०१२ चा आहे. लेखकाने या क्षेत्रातले काही अनुत्तरीत प्रश्न इथे मांडले आहेत. उत्तर मिळालेले प्रश्न, न मिळालेले प्रश्न आणि विचारलेच न गेलेले प्रश्न असे लेखाचे विभाजन आहे. विचारले न गेलेले प्रश्न मांडताना प्रारंभी लेखक खालिलप्रमाणे म्हणतो-

There is very little that neuroscience per se has taught us about the principles of vision.
That we know there is a ventral and dorsal stream, a hierarchy of visual areas, and
neurons that selectively respond to certain visual features in these areas does not tell
us what problems are being solved and how.
यातले तत्त्वे, काय आणि कसे हे शब्द इटॅलिक्स मधे आहेत. "दिसते म्हणजे काय हे कळले नाही." असे जेव्हा मी म्हणालो तेव्हा मला हेच म्हणायचे होते.

लेखक महाशय उत्क्रांतीवादी आहेत. लेखाच्या अंती ते म्हणतात.
Finally, it is important to bear in mind that vision did not evolve as a stand-alone
function, but rather as part of the perception-action cycle. As philosopher Robert
Cummins asks, "Why don't plants have eyes?" We have much to gain by building vision
systems with tight sensorimotor loops and learning what problems need to be overcome
in doing so. This area remains vastly under investigated, and is likely to uncover to
many questions that have yet to be asked.
दृष्टीशास्त्राच्या अभ्यासामध्ये असे कोणते प्रश्न आहेत जे अजून विचारयचे आहेत (सोडवायचे जाउ द्या) ते ही अजून नीट माहीत नाही असे इथे लिहिले आहे. हे यासाठी कोट केलं कि मला कर्मठ क्लबात

अंततः कोणती visual perception theory आजच्या घडीला प्रमाण मानली जाते तीचे नाव सांगाल का? म्हणजे मी लगेच तिच्या उणिवा आणि तिचे इतर माहीतींशी किती विरोधाभास आहेत ते सांगतो.

जाता जाता, बाय द वे, प्रकाशसंवेदना असणारा हा पहिला सजीव अमिबा होता कि अजून कोणी त्याबद्दल अगोदर एकमत असू द्या. त्या फायलोजेनेटिक वृक्षाचं खोड नेहमी स्थान बदलत असतं. पण असो.

आडकित्ता Wed, 12/03/2014 - 20:42

In reply to by अजो१२३

वरील पुस्तक, हे मेडिकल टेक्स्टबुक आहे. व ते मी संपूर्ण (सर्व खंड) 'अभ्यासलेले' आहे. नुसते वाचलेले नाही.

त्या पुस्तकातील कोणताही मुद्दा गाळून टाकावा असा नाही. फक्त या प्रचण्ड व्याप्तीच्या पुस्तकात रिसेंट अ‍ॅडव्हान्सेसची भर घालून संपादन करीत रहाणे हे गेल्या १०-१५ वर्षांत बंद झाल्याने ते 'करंट' नाही. बेसिक इव्होल्युशन अ‍ॅनाटॉमी, फिजिऑलॉजी इ. साठी ते अजूनही रिफर केले जाते. याव्यतिरिक्तची ताजी पुस्तके, व दरमहा येणारी अनेक जर्नल्सही मी वाचीत असतोच. तेव्हा रिसेंट अ‍ॅडव्हान्सेस मला ठाऊक आहेत, असे नोंदवितो. अशी अभ्यासाची इतरही अनेक पुस्तके आहेत. ;)

तुम्ही दिलेली लिंक, ही 'काँप्युटेशनल न्यूरोसायन्स' नामक शाखा, (वा याला आपण टूल म्हणूयात), 'दिसते म्हणजे काय' याच्या आपल्या आजच्या आकलनात जितकी आहे त्यापेक्षा फार जास्त भर घालू शकलेली नाही, असे म्हणते. हे, ऑप्टोमेट्रिस्ट नामक नेत्रचिकित्सा सहायक टेक्निशियन्सना समजावे असे पुस्तक/पेपर्/पीडीएफ आहे. यांच्या अभ्यासाचा स्कोप फक्त रिफ्रॅक्टिव एरर्स इतकाच असतो. ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट थोडा अधिक अभ्यास करीत असतात.

एकंदरित, या प्रकरणाला उत्तर देत बसणे, यालाच मी गूगलून दिलेल्या लिंकांचा प्रतिवाद असे म्हणतो.

तुम्ही विचारलेल्या डायरेक्ट प्रश्नांची उत्तरे मी वर दिली होती. व मी त्या क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून बोलत असल्याने, त्याला माझ्या मते थोडे वजन आहे. ;) (मी उत्क्रांत झालेलो आहे.)

आता,

दिसते म्हणजे काय होते, याचे आजच्या घडीला यच्चयावत मानवजातीस झालेले अद्ययावत आकलन काय व किती, असे तुम्हास ठाऊक आहे, ज्याच्या आधारावर तुम्ही "कोणालाच माहीत नाही." असे विधान करीत आहात, ते तुम्ही मला सांगितलेत, तर त्यापुढचा विदा व उत्तरे देईन.

(If instead of making a vague statement that 'nobody understands what is vision", if you tell me your understanding of current state of knowledge about 'what is vision', then i shall give you next data and explanation, AND i shall support my statements with appropriate backing. Just because new discoveries are made everyday in this world, it doesn't mean, that there is no understanding at all.)

अर्थात, चर्चेसाठी बेसिक प्रिमायस तयार करा, तिथून पुढे बोलूयात. तेही तुम्हाला यात खरेच रस असेल तर.

***

टीपः
१. करड्या रंगातील वाक्य विनोदाने वा गमतीत म्हटलेले आहे. व ते त्याच अंगाने घ्यावयाचे आहे.
२. त्यातला मी तज्ज्ञ असण्याचा भाग खरा आहे. ;)

आडकित्ता Tue, 11/03/2014 - 13:52

In reply to by अजो१२३

हा त्या पुस्तकातील सुरुवातीचा उतारा:

PART I
THE EFFECT OF LIGHT ON LIVING ORGANISMS

Introduction

The Effect of Light on Metabolism
The Effect of Light on Movement
The Effect of Light on Pigmentation
The Emergence of Vision

CHAPTER I
INTRODUCTION

We begin with a drop of viscid protoplasm the reactions of which we do not understand, and we end lost in the delicacy of the structure of the eye and the intricacies of the ten thousand million cells of the human brain. We begin with photosjnithesis in a unicellular plant, or with a change in the viscosity produced by light in the outer layers of the amoeba, and we end with the mystery of human perception. We begin some one or two thousand million years ago in the warm waters of the Archeozoic era and we end with the speculations of tomorrow. And as we travel together tracing the responses of living things to light from the energy liberated by a simple photochemical reaction to the faculty of appreciating and interpreting complex perceptual patterns, neither in fact nor in fiction does a story more fascinating unfold. It is a story which traces a development from a vague sentiency to apperception, from vegetative existence to the acquisition of the power to mould the environment, from passive reactivity to the ability to create history.
Nor is there a story more important. Even at the physiological level some 38% of our sensory input is derived from the retinae,^ impulses from which, even in the complete absence of visual stimuli, are largely responsible for maintaining a tonic influence upon the level of spontaneous activity in the brain. ^ From the psychological point of view the importance of vision is still greater. If, indeed, the proper study of mankind is Man, and if (as we must agree) his behaviour and his contact with the outside world are mediated through his senses, what can be more fundamental than the study of the sense which, more than any other, determines his intelligence and regulates his conduct, of the faculty which eventually played the preponderant role in assuring his dominance and determining his physical dexterity and intellectual supremacy ? We are indeed highly visual creatures.

हे मुळातूनच वाचण्यासारखे व इंटरेस्टिंग आहे खूप!

राजेश घासकडवी Wed, 12/03/2014 - 01:25

In reply to by आडकित्ता

मस्त. नुसती रोचक श्रेणी देऊन भागलं नाही म्हणून हा प्रतिसाद. डोळा या विषयावर एखादं खंडकाव्य लिहिण्याच्या तयारीनेच ही प्रस्तावना लिहिलेली वाटते.

ग्रेटथिंकर Sun, 09/03/2014 - 11:21

the least darwinian event in life is the way it(evolution) started.it was just chemistry, no natural selection, it was random process.
उत्क्रांती जरी सुसंगत असली, तरी वरती आला तसा बेनीफीशीअल म्युटेशनचा मुद्दा अन्नुतरीत राहतो.
मिसिंग लिंक हा एक मुद्दा आहेच. उभयचर प्राण्यांच्या पुढच्या पायांचे रुपांतर पंखात झाले व पक्षी अस्तित्वात आले असे ठोकुन देण्यात अर्थ नाही. उभयचर प्राणी व पक्षी यांच्या मधल्या अवस्थांचे जीवाश्म सापडलेले नाहीत...व सिद्धांतात असे प्राणी जगु शकत नाहीत, त्यामुळे उभयचर ते पक्षी असे नॅचरल सिलेक्शन फीटनेसलाच बाजूला ठेवते.उत्क्रांतीवाद्यांचा क्रिएशनिस्टसारखा कल्ट तयार झाला आहे, उत्क्रांती क्वेश्चन करणेच अनसायंटीफीक समजले जातेय..उत्क्रांतीपेक्षाही एखादा वेगळी सिस्टीम अस्तित्वात असु शकेल..

अजो१२३ Sun, 09/03/2014 - 14:39

In reply to by ग्रेटथिंकर

नेमके आणि मार्मिक.
मी याच आशयाची वाक्ये लिहिली आहेत.

.it was just chemistry, no natural selection,

मी म्हटले होते - बालवाडी ते अठरावी पर्यंतच्या अभ्यासक्रमात नैसर्गिक निवड हा एक धडा आहे.

उत्क्रांतीवाद्यांचा क्रिएशनिस्टसारखा कल्ट तयार झाला आहे, उत्क्रांती क्वेश्चन करणेच अनसायंटीफीक समजले जातेय..उत्क्रांतीपेक्षाही एखादा वेगळी सिस्टीम अस्तित्वात असु शकेल..

समजा क्ष या सजीवात दोन लिंगे निर्माण झाली. त्यानंतर त्या सजीवापासून कितीतरी स्पेसिज निर्माण झाल्या. अर्थातच नंतरच्या स्पेसिजमधे दोन लिंगे नैसर्गिक निवडीमुळे येणार. पण या क्ष सजीवाला डोळा नव्हता. आता या द्विलिंगी सगळ्या स्पेसिजमधे डोळा उत्क्रांत होणे म्हणजे महदाश्चर्य आहे. म्हणून उत्क्रांतीवाद्यांना सजीवांची सारी फिचर्स कोणत्या क्रमाने निर्माण झाली ते स्पष्ट करण्यास ही थेरी फेल ठरली आहे.

अनुप ढेरे Mon, 10/03/2014 - 18:25

सध्या मान्य असलेली उत्क्रांतीची थिअरी ही आत्तापर्यंत सापडलेल्या पुराव्यांना एकत्र बांधणारी थिअरी आहे. त्रिकालाबाधित सत्य नाही असं म्हणता येईल का?

राजेश घासकडवी Mon, 10/03/2014 - 19:31

In reply to by अनुप ढेरे

आत्तापर्यंत सापडलेल्या पुराव्यांना एकत्र बांधणारी थिअरी यापलिकडे 'त्रिकालाबाधित सत्य' म्हणजे नक्की काय ते कळलेलं नाही. गुरुत्वाकर्षणाबद्दलही तसं म्हटलं तर 'आत्तापर्यंत काही त्याविरुद्ध पुरावा दिसलेला नाही' हे लागू होतंच. किती पुरावे मिळाले की एखादी थियरी ही सत्य मानली जाते? किंवा मानली जावी?

एक कल्पनाप्रयोग करू. समजा तुमच्याकडे एक नाणं आहे. त्यावर दोन्ही बाजूंना काय चित्र आहे हे तपासून बघण्याची तुम्हाला परवानगी नाही. तुम्हाला फक्त एकच करता येतं की ते नाणं उडवायचं आणि कुठचं चित्र वर येतं ते पहायचं. तुम्ही ते पाच वेळा उडवलं, आणि पाचही वेळा छापा आला. असं होणं काहीसं कमी शक्यतेचं आहे. म्हणजे पाचवेळानाणीउडवणं प्रयोग शंभर वेगवेगळ्या वेळा केला तर त्यातल्या तीन वेळा तुम्हाला हे दिसेल. मग तुम्ही अजून पाच वेळा उडवलं. पुढच्या पाचही वेळा छापा आला. म्हणजे लागोपाठ दहा वेळा छापा आला. आता हे होण्याची शक्यता तर फारच कमी म्हणजे हजारात एक आहे. हे पाहून कोणीतरी म्हणालं, की अरे, या नाण्याला दोन्ही बाजूला छापा तर नसेल? ही थियरी झाली - प्राथमिक निरीक्षणांवरून मांडलेली. मग ती तपासायची कशी? तर त्या थियरीनुसार भाकित करायचं. 'जर हे नाणं उडवलं तर प्रत्येक वेळी छापा येईल' ही थियरी फॉल्सिफायेबल आहे. म्हणजे एकदा जरी हेच नाणं उडवून छाप्याशिवाय दुसरं चित्र आलं तर तुमची थियरी चुकली. आता ही थियरी तपासण्यासाठी कोणीतरी ते नाणं घेतं आणि पाचवेळा उडवून पाहतं. पुन्हा सर्व छापच आले. मग दुसरा कोणीतरी हा प्रयोग पुन्हा करून पाहतो. त्यालाही पाचही वेळा छाप दिसतात. आता ही थियरी बळकट झालेली आहे. कारण लागोपाठ वीस वेळा नाणं उडवून सतत छापाच दिसलेला आहे. आता शक्यता हजारात एक वरून दहा लाखात एक वर आलेली आहे. आता तुमचा विश्वास बसायला लागलेला आहे, की हो खरंच, या नाण्याच्या दोन्ही बाजूंना छापाच असेल. आता याच नाण्यासाठी पाचवेळानाणीउडवणं प्रयोग एकंदरीत वीस वेगवेगळ्या लोकांनी केला, आणि वेगवेगळ्या पद्धतीने करून बघितला. काहींनी उडवण्याच्या पद्धती थोड्या बदलल्या, काही जणांनी उडवण्याऐवजी जमिनीवर जोरात गोल फिरवून छापकाटा करून बघितला. प्रत्येकाला कायम छापा दिसला.

एवढं सगळं झाल्यावर मुळातली 'दोन्हीबाजूलाछापा' थियरी ही लोक सत्य मानून चालायला लागले. म्हणजे पुढच्या वेळी त्या नाण्यावर पैज लावताना छाप्यावर पैज लावायला लागले, आणि जिंकू लागले. मग बुकींनीही त्या नाण्याबाबत पैज लावण्याचंच थांबवलं. नाण्याच्या दोन्ही बाजूला छापाच आहे हे लोक सत्य मानायला लागले. कारण इतक्या वेळेला उडवूनही छाप्याशिवाय दुसरं काहीही दिसलेलं नाही.

आता ज्यांनी पूर्वीपासून त्या नाण्याच्या दुसऱ्या बाजूला काटा आहे असा विश्वास बाळगला त्यांची पंचाइत झाली. मात्र तरीही ते म्हणायला लागले की 'सध्या मान्य असलेली दोन्हीबाजूलाछापा थिअरी ही आत्तापर्यंत सापडलेल्या पुराव्यांना एकत्र बांधणारी थिअरी आहे. त्रिकालाबाधित सत्य नाही. कारण कदाचित एक टॉस असाही येईल की जेव्हा आपल्याला दुसरंच चित्र वर दिसेल. मग जाईल की नाही सध्याची थियरी बाराच्या भावात?'

वरच्या प्रतिसादात तुम्ही तसं म्हणत आहात असा माझा दावा बिलकुल नाही. मी पुन्हा माझा प्रश्न मांडतो. किती वेळा लागोपाठ छापा दिसला तर तुम्ही 'दोन्हीबाजूलाछापा थियरी ही निव्वळ थियरी राहिलेली नसून त्रिकालाबाधित सत्य आहे' असं मान्य कराल?

तुमच्या प्रश्नाचं सरळ उत्तर द्यायचं झालं तर उत्क्रांतीची थियरी सिद्ध किंवा असिद्ध करण्याचे इतके प्रयोग झालेले आहेत आणि त्यातून इतका प्रचंड मोठे पुरावे वेगवेगळ्या पद्धतीने मिळाले आहेत की पृथ्वीवर उत्क्रांती झाली याला त्रिकालाबाधित सत्य म्हणायला काहीच हरकत नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 10/03/2014 - 19:38

In reply to by राजेश घासकडवी

यात एकच भर -

पृथ्वीवर उत्क्रांती झाली याला त्रिकालाबाधित सत्य म्हणायला काहीच हरकत नाही.

इतर कोणत्या ग्रहावर अशासारखीच परिस्थिती असेल तर जीवसृष्टी तयार होईलच असं छातीठोकपणे सांगता येणार नाही. पण एकदा जीवसृष्टी निर्माण झाली आणि मर्यादित स्रोत असतील तर तिथेही उत्क्रांती होण्याची शक्यता बरीच वाढते. (अर्थात ही उत्क्रांती पृथ्वीसारखीच होईल याची काही खात्री नाही. पृथ्वीवरही समान पूर्वजापासून प्रचंड विविधता दर्शवणारे जीव तयार झाले.)

अनुप ढेरे Mon, 10/03/2014 - 22:44

In reply to by राजेश घासकडवी

मुद्दा समजला बर्‍यापैकी. पण अजूनही given the same conditions तशीच्या तशी उत्क्रांती दुसरीकडे का होणार नाही हे नाही समजल नीट. उत्क्रांती मधले एवढे बदल luckily झालेत हे समजून घ्यायला जड जातय अजून.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 10/03/2014 - 22:50

In reply to by अनुप ढेरे

"given the same conditions" यात साधर्म्य किती असा एक प्रश्न येतो. म्हणजे यात तापमान, ग्रहाचं त्याच्या ताऱ्यापासूनचं अंतर, अक्षाचा कल, ग्रहाला एखादा उपग्रह असणं-नसणं, एखादी उल्का पडून डायनोसॉरसारखी प्रचंड जमात नष्ट होऊ शकते का (या सिद्धांताबद्दल बरीच भवति-न-भवती होते, पण मोठी उल्का पडून आजही पृथ्वीवरची जीवसृष्टी खलास होऊ शकते), डायनोसोर टिकले असते तर आपण आलो असतो का, असे बरेच प्रश्न येतात.

त्यामुळे सिद्धांत म्हणून "given the same conditions" असं म्हणता आलं तरी प्रत्यक्षात ते तसंच्या तसं असेलच असं म्हणता येत नाही.

पण लैंगिक पुनरुत्पादनाची सुरूवात झाली तर ते तसं टिकेल, तसं झालं तर दुसऱ्या लिंगाचे जोडीदार ज्या शारीरिक गुणधर्मांना प्राधान्य देतील ते टिकून राहतील अशा प्रकारच्या मूलभूत गोष्टी, नियम तसेच राहतील. मोराचा पिसारा तसाच असेल का, असे तपशील देता येणार नाहीत.

राजेश घासकडवी Tue, 11/03/2014 - 00:51

In reply to by अनुप ढेरे

उत्क्रांती मधले एवढे बदल luckily झालेत हे समजून घ्यायला जड जातय अजून.

उत्क्रांती झाली ती नशीबाने नाही, तर विशिष्ट पद्धतीने झाली. जे छोटे बदल प्राण्याला टिकून राहण्यासाठी मदत करतात, ते बदल पुढच्या पिढीत वाढलेले दिसतात. त्यामुळे मुळात छोटासा बदल म्यूटेशनमुळे झाला तरी तो टिकून राहील, आणि पुढच्या पिढ्यांत वाढत राहतो. असे अनेक छोटे छोटे बदल गोळा होत राहतात. लाखो पिढ्यांमध्ये झालेली हजारो म्यूटेशन्स अशी टिकून राहिली, त्यांची बेरीज झाली की आपल्याला नवीन, खूप बदललेली प्रजाती दिसते.

इतर कुठच्या ग्रहावर अशीच परिस्थिती असेल तर सजीवांची निर्मिती आणि उत्क्रांती होण्याची शक्यता (माझ्या मते) खूप आहे. मात्र उत्क्रांतीची वाट हीच असेल याची काहीच शाश्वती नाही. आपल्याला ओळखूच येणार नाहीत असेही प्राणी निर्माण होऊ शकतील, टिकू शकतील.

नगरीनिरंजन Tue, 11/03/2014 - 09:59

In reply to by राजेश घासकडवी

अत्यंत समर्पक प्रतिसाद!
उत्क्रांतीसारख्या बेसिक गोष्टीत शंका घेणार्‍यांची मानसिकता मला कधीच पूर्णपणे कळलेली नाही पण त्यामागे प्रचंड इगो असावा अशी शंका आहे.
निव्वळ योगायोगाने आपण अस्तित्वात आलो हे या लोकांना पचायला फार जड जात असावे बहुतेक. त्यामुळेच आपल्यासारख्याच दिसणार्‍या देव नामक व्यक्तीने आपल्याला प्रयत्नपूर्वक निर्माण केले आणि पृथ्वीवर खर्डेघाशी करायला पाठवले असा विचार सुखावह वाटत असेल.
ही मानवी बुद्धीची मर्यादाच आहे असे वाटते. कितीही तर्ककठोर मनुष्य असला तरी भावना विचारांमधे अशा बेमालूमपणे मिसळतात की त्या माणसाला पत्ताच लागत नाही.
उत्क्रांती वगैरे सगळं व्यवस्थित समजणार्‍या लोकांनाही साधे फीजिक्सचे व थर्मोडायनॅमिक्सचे नियम आणि त्यांचा परिणाम समजून घेताना अडचण येतेच की!

मी Tue, 11/03/2014 - 11:34

In reply to by राजेश घासकडवी

माझ्यामते उत्क्रांतीच्या सिद्धांताबद्दल शंका निर्माण व्हायला कारण वेगळंच आहे, ज्या गोष्टींचं उत्तर उत्क्रांती देत नाही आणि त्याबद्दलचं त्रिकालाबाधीत सत्य आपल्या नैतिकसिद्धांताशी अलाइन्ड् नाहीये त्यामुळे उत्क्रांतीच्या पलिकडे काहीतरी आहे ह्याबद्दल विचार निर्माण होतात. ह्या गोष्टी कोणत्या आहेत तर त्या म्हणजे अमुक एक गोष्ट माझ्याच बरोबर का घडते आहे, किंवा का घडत नाहिये, घडणार्‍या घटनांचा आणि नैतिकतेचा संबंध लावायचा का नाही? अशा गोष्टींची उत्तरे उत्क्रांतीत शोधणे व्यर्थ आहे, पण म्हणजे उत्तरे शोधणे व्यर्थ आहे का? का शिट हॅपन्स ह्या तत्त्वावर हॅपी गो लकी होउन रहायचं आहे?