तेलंगण
तेलंगणचा प्रश्नाने सध्याच्या सरकारसाठी एका चिघळलेल्या गळूचं स्वरूप धारण केलं आहे. मुळात भारतीय संघराज्य संरचनेत, स्वतंत्र राज्यांसाठी इतका टोकाचा संघर्ष करण्याची गरज पडू नये अशी लवचीकता आहे. पण तरीही हा प्रश्न चिघळतच गेला आहे. याला काँग्रेसचे सद्य सरकारच जबाबदार आहे हा निष्कर्ष आततायी ठरावा. मुळात हा प्रश्न नवा नाही किंवा "तेलंगण हे स्वतंत्र राज्य असावे का?" यावरील उहापोहही स्वतंत्र भारताला नवीन नाही. हैदराबाद संस्थान भारतात समाविष्ट केल्यापासून हा प्रश्न अस्तित्वात आहे. अर्थातच, हैदराबादच्या विलिनीकरणाच्याही आधी किंबहुना भारतीय स्वातंत्र्यपूर्व काळापासून या प्रांताचा इतिहास आहे.
सध्याच्या तेलंगण प्रश्नाच्या स्वरूपावर काही लिहिण्याआधी या प्रांताचा राजकीयतेलंगणचा प्रश्नाने सध्याच्या सरकारसाठी एका चिघळलेल्या गळूचं स्वरूप धारण केलं आहे. मुळात भारतीय संघराज्य संरचनेत, स्वतंत्र राज्यांसाठी इतका टोकाचा संघर्ष करण्याची गरज पडू नये अशी लवचीकता आहे. पण तरीही हा प्रश्न चिघळतच गेला आहे. याला काँग्रेसचे सद्य सरकारच जबाबदार आहे हा निष्कर्ष आततायी ठरावा. मुळात हा प्रश्न नवा नाही किंवा "तेलंगण हे स्वतंत्र राज्य असावे का?" यावरील उहापोहही स्वतंत्र भारताला नवीन नाही. हैदराबाद संस्थान भारतात समाविष्ट केल्यापासून हा प्रश्न अस्तित्वात आहे. अर्थातच, हैदराबादच्या विलिनीकरणाच्याही आधी किंबहुना भारतीय स्वातंत्र्यपूर्व काळापासून या प्रांताचा इतिहास आहे.
सध्याच्या तेलंगण प्रश्नाच्या स्वरूपावर काही लिहिण्याआधी या प्रांताचा राजकीय इतिहास अतिशय थोडक्यात मांडायचा प्रयत्न करतोय. बहुतांश माहिती विकिपीडिया, TOI, द हिंदू, काही नियतकालिकांतील लेख, काही जालीय लेख यांच्या एकत्रित आधारावर लिहिणार आहे. शक्य (व लक्षात) राहील तिथे संदर्भ द्यायचा प्रयत्न करेल. तसे न दिसल्यास संदर्भ मागितल्यास पुरवायचाही प्रयत्न करेन. खरंतर इथे - ऐसीवर - या घटनाक्रमाचे साक्षीदार आहेत किंवा या प्रांतात राहिलेले, काही गोष्टी प्रत्यक्ष अनुभवलेले अनेक जाणकार आहेत/असतील. अशावेळी या विषयावर, मी इथे लेख लिहिणेच खरंतर गैर आहे, पण त्यांच्या लेखणीवरचा गंज झटकला जाण्यापुरता जरी या लेखाचा उपयोग झाला तरी हा टिझर उपयुक्त ठरला असे मानेन.
स्वातंत्र्यपूर्व इतिहासः
हैदराबादच्या निजामाच्या आणि इंग्रजांच्या तहानुसार निजाम संस्थानाच्या हैदराबाद प्रांताला प्रिन्सली स्टेटचा दर्जा होता. (इथे परराष्ट्र व्यवहार, सैन्य इत्यादी गोष्टी इंग्रज बघत). उर्वरित निजाम संस्थानातील भाग (जे आता सीमांध्रात व रायलसीमा प्रांतात येतात) ते इंग्रजांना देऊन टाकले होते व इंग्रजांनी ते 'मद्रास प्रेसिडेन्सी'मध्ये समाविष्ट केले होते.
सर्वप्रथम आपण हैदराबाद संस्थानाची प्राशासनिक रचना बघूयात. हे संस्थान चार मुलुखांत/प्रांतात विभागलेले होते:
औरंगाबाद प्रान्तः औरंगाबाद, बीड, नांदेड व परभणी.
गुलबर्गा प्रान्तः बिदर, गुलबर्गा, उस्मानाबाद, रायचूर.
गुलशनाबाद प्रान्तः हैदराबाद प्रांत, महबुबनगर, मेडक, नळगोंडा, निजामाबाद.
वारंगळ प्रान्तः अदिलाबाद, करीमनगर व तत्कालीन वारंगळ (सध्या वारंगळ+खम्मम).
इथपर्यंत तेलंगण नावाचा स्वतंत्र 'प्रशासकीय' प्रांत अस्तित्वात नव्हता. पण सांस्कृतिक दृष्ट्या इथे चार महत्त्वाचे प्रवाह होते:
१. मराठी संस्कृती जपणारा विभाग
२. कन्नड संस्कृती जपणारा विभाग
३. तेलुगू संस्कृती जपणारा विभाग
४. (शिया)मुस्लिम संस्कृती जपणारा लहान पण राजधानीचा भाग.
यापैकी मराठी विभागाला 'मराठवाडा' तर तेलुगू विभागाला 'तेलंगण' संबोधायची पद्धत होती. तेलंगण या प्रांतच नव्हे तर एकूणच हैदराबाद संस्थान इंग्रजांच्या आधिपत्याखाली असलेल्या भागापेक्षा बरेच मागास राहिले होते- अजूनही काही प्रमाणात हा भेद संपलेला नाही. महाराष्ट्रातील इतर प्रांत व मराठवाडा किंवा कर्नाटकातील गुलबर्गा, बेल्लारी वा उत्तर/ईशान्य विभाग वा आंध्रातील तेलंगण प्रांत यांच्यातील व मुख्य इंग्रज भूमीवरील लोकांच्या राहणीमानात, शिक्षणात व एकूणच व्यवहारात मोठी दरी या काळातच निर्माण झाली.
त्यात निजामाने रझाकारांना पोसले होते. मदरशांतून शिक्षणाला जोर दिला जात होता. रझाकारांचे इतरधर्मीयांना बाटवणेही चालू होते. त्यात सक्तीची करवसुली वगैरेमुळे काही भागातील नागरिक वैतागलेले होते. दुसरे असे की या प्रांतातील अनेक जण भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होते. आपल्या मूळच्या भागातील स्थिती व उर्वरित इंग्रज अखत्यारीत असणार्या भारताची स्थिती यांतील ढळढळीत फरक त्यांना दिसत होता. त्यामुळे जेव्हा भारताने स्वातंत्र्यानंतर कारवाई केली तेव्हा त्यांना फार निकराचा प्रतिकार झालाच नाही. तेलंगण प्रांत (एकूणच हैदराबाद संस्थान) मागास आधीच झाला होता. त्या भागातल्या प्रश्नांना राजकीय स्वरूप देण्याचे काम मात्र स्वातंत्र्योत्तर काळात झाले.
स्वातंत्र्योत्तर घटना
हैदराबाद संस्थानाचे विलिनीकरण स्वेच्छेने न झाल्याने, भारत जेता असल्याने, त्याचे काय करायचे यात निजामाचे मत फारसे लक्षात घ्यायचा प्रश्नच नव्हता. अर्थात त्या भागातील नैसर्गिक संपत्तीवरही अनेकांचा डोळा होताच. १९४८मध्ये निजामाचा पाडाव झाल्यावर, १९५० साली श्री.एम्.के.वेलोडी यांना हैदराबाद राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. पुढे १९५२मध्ये स्वतंत्र हैदराबाद राज्याची निवडणूक होऊन डॉ.बी आर राव हे पहिले लोकनियुक्त मुख्यमंत्री झाले.
जेव्हा 'भाषावार प्रांतरचने'ची घोषणा झाली, तेव्हा हैदराबाद प्रांतामध्ये या रचनेला मोठा विरोध झाला. या प्रांतात मुलकी स्टेट कायद्याच्या प्रश्नावरून उजव्या गटांनी जोमदार मोहीम सुरू केली. हैदराबादमधील नोकर्यांमध्ये स्थानिकांना मोठा वाटा आरक्षित होता व प्राधान्य होते. भाषावार प्रांत रचनेमुळे मोठा धक्का हैदराबाद प्रांताला बसणार होता. मराठी बहुल, कन्नड बहुल व तेलुगू बहुल प्रांतात हे अविकसित राज्य त्रिभाज्यित होणार होते. शिवाय नवीन तयार झालेल्या राज्यातील उर्वरित भागापेक्षा हा भाग मागास असणार होता. यामुळे डावे पक्ष व MIM सारखे उजवे पक्ष वेगवेगळ्या कारणांनी सरकारविरुद्ध , या प्रांतरचनेविरुद्ध वातावरण तापवू लागले. (हे खरंतर जवळजवळ प्रत्येक भागांत होऊ लागले होते. तत्कालीन बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्येही कन्नड, मराठी व गुजराती असे तीन प्रकारचे भाषिक होते, तर मद्रास प्रेसिडेन्सीमध्येही तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळी भाषिक लोक होते)
हैदराबाद पुरते बोलायचे तर या तीन प्रांतापैकी राजधानीहून दूरच्या मराठीभाषिक प्रदेशात अर्थात मराठवाड्यातून महाराष्ट्रात सामील होण्यासाठी इतका टोकाचा विरोध झाला नाही. तुलनेने कन्नड व तेलुगू प्रांतात चढत्या क्रमाने हा विरोध होत होता. त्यातही हैदराबाद ज्या भागात आहे त्या तेलंगण विभागात तर केवळ भाषिक कारणेच नाही तर धार्मिक व राजकीय पार्श्वभुमीमुळे हा विरोध अतिशय कडवा होता. त्यातच डाव्या-उजव्या युतीने मुल्की कायद्याच्या रद्द होण्याविरुद्ध रान तापवायला सुरुवात केली होती (संदर्भः द हिंदू)
स्टेट रेकग्निशन कमिटी १९५३:
या कमिटीचे काम मुख्यतः भाषावार प्रांतरचना सुचवण्याचे होते. या समितीने हैदराबाद राज्य तीन भागात विभागायची सूचना त्यांच्या रिपोर्टमध्ये केली. ज्यानुसार मराठी बहुल प्रांत तत्कालीन द्वैभाषिक बॉम्बे प्रांतात, कन्नडबहुल प्रांत मैसूर प्रांतात (कर्नाटकात) तर उर्वरित भाग आंध्र राज्यात मध्ये समाविष्ट करायचे ठरत होते. या रिपोर्टमध्ये या भागाबद्दल काय लिहिलेय ते बघा:
opinion in Andhra is overwhelmingly in favour of the larger unit; public opinion in Telangana has still to crystallise itself. Important leaders of public opinion in Andhra themselves seem to appreciate that the unification of Telangana with Andhra, though desirable, should be based on a voluntary and willing association of the people and that it is primarily for the people of Telangana to take a decision about their future.
मात्र शेवटी या समितीचा रिपोर्ट तेलुगू भाषीयांसाठी एकाच आंध्र प्रदेश राज्याची शिफारस करतो. मात्र अशीही शिफारस करतो की तेलंगण राज्य १९६१ पर्यंत वेगळे राहू द्यावे. त्यानंतर त्या सभागृहाच्या २/३ बहुमताने ते आंध्र राज्यात समाविष्ट केले जावे. डाव्यांनी या विरोधाला हिंसक परिमाणही द्यायला सुरुवात केली होती. अशावेळी विविध स्तरावर वाटाघाटी होत होत शेवटी १९५६मध्ये जंटलमेन्स अॅग्रीमेंट अस्तित्वात आले. यामध्ये तेलंगणच्या प्रगतीसाठी काही विशेष पावले उचलायचे आश्वासन उर्वरित आंध्रप्रदेशाच्या प्रतिनिधींनी दिले होते. त्यामुळे समितीने सुचवलेल्या वेळेआधीच, शेवटी १९५६मध्ये, तेलंगण प्रांत १९५३ साली मद्रास प्रांतातून तयार झालेल्या 'आंध्र स्टेट" मध्ये समाविष्ट झाला व नव्या प्रदेशाला "आंध्र प्रदेश" म्हटले जाऊ लागले. (श्री पोट्टी श्रीरामलु यांचे १९५२चे उपोषण एकत्र/बृहद् आंध्रासाठी नव्हते तर मद्रास प्रांतातून तेलुगू लोकांसाठी वेगळे राज्य काढून देण्यासाठी होते. ज्यातून "आंध्र स्टेट" चा जन्म झाला. मात्र १९५६ पर्यंत त्यात तेलंगण समाविष्ट नव्हते.)
तेलंगण प्रश्न व चळवळीचे समकालीन राजकारण
आंध्र प्रदेशाच्या ~४१% जमीन बाळगणाऱ्या तेलंगणमध्ये ~४०% लोकसंख्या राहते. आर्थिक आघाडीवर तर (केंद्रीय रेव्हेन्यू वगळता) ७६% रेव्हेन्यू या भागातून निर्माण होतो. शिवाय गोदावरी व कृष्णा खोर्यावर असणारी धरणे आणि फुगवटा दोन्ही तेलंगण भागात आहे. मात्र रोजगार, शासकीय नोकर्यांत संधी, शेतकर्यांना पाणीपुरवठा इत्यादी निकषांवर उर्वरित राज्यालाच प्राथमिकता मिळत आली आहे. आधी म्हटल्याप्रमाणे मुळातच शिक्षणात उजव्या असणार्या तेलंगण बाह्य आंध्र प्रदेशातील जनतेमधून बहुतांश शासकीय, प्रशासकीय, शैक्षणिक अधिकारी आले. मात्र गेल्या ५० वर्षांत या डिस्ट्रीब्युशनमध्ये फार मोठा फरक पडला नाहीये. राजकीय दृष्ट्याही तेलंगणला क्वचितच नेतृत्व करायची संधी दिली गेली आहे. पाणीपुरवठासुद्धा उर्वरित आंध्रात तेलंगणपेक्षा अधिक विस्तारीत जमिनींनवर आहे.
दरम्यानच्या काळात विविध पक्षांनी यावर वेगवेगळी भूमिका घेतली आहे. संयुक्त आंध्र हा सुद्धा आंध्र प्रदेशात एक भावनात्मक मुद्दा आहे. यावर स्वतंत्र भारतात अनेकदा आंदोलने झाली आहेत. तूर्तास केवळ तेलंगण राष्ट्र समितीच्या भूमिकेकडे पाहूया. २००१ मध्ये तेलुगू देसम पार्टीचे श्री चंद्राबाबु नायडू यांच्याशी न पटल्याने श्री चंद्रशेखर राव यांनी वेगळे होऊन तेलंगण राष्ट्र समिती नावाचा पक्ष स्थापन केला. अपेक्षेहून बर्याच वेगाने या पक्षाला यश मिळू लागले. २००४ मध्ये काँग्रेसने तेलंगणच्या बाजूने उघड भूमिका घेत 'तेरास'सोबत युती करत निवडणुका लढवल्या. मात्र दोनच वर्षात, २००६मध्ये, तेरासने काँग्रेस सरकारचा पाठिंबा काढला. त्यानंतरच्या झालेल्या हंगामी निवडणुकांत तेरासला मोठा पराभव पत्करावा लागला. २००९ मध्ये तेरासने "तिसर्या आघाडी" त सामील होत तेलुगू देसम पार्टीच्या "ग्रँड अलायन्स" मध्ये सहभागी होण्याचे ठरवले. मात्र शेवटच्या क्षणी "रालोआ" मध्ये सहभागी झाले व पुन्हा एकदा पराभूत झाले.
त्यानंतर मात्र, आंध्रप्रदेशात वायएसाअर यांच्यामुळे मजबूत असलेली काँग्रेसही, त्यांच्यानंतर फुटली व त्यांच्या मुलाने वायएसाअर काँग्रेसला जन्म दिला. "संयुक्त आंध्र प्रदेश" साठी वाय एस आर तर स्वतंत्र तेलंगणच्या बाजूने तेरास अशी दोन टोके निर्माण झाली तर काँग्रेस व तेदेप ला दोन्हीच्या मधली भूमिका घ्यावी लागली. आता २०१४च्या निवडणूकीत तेराससोबत युतीवर डोळा ठेवत काँग्रेसने तेलंगण निर्मिती विधेयक मांडले आहे. ते लोकसभेत मंजूरही झाले आहे. आज कदाचित राज्यसभेतही मंजूर होईल आणि भारताला आपले २९वे राज्य मिळेल!
(चित्रे: साभार विकिपीडीया) इतिहास अतिशय थोडक्यात मांडायचा प्रयत्न करतोय. बहुतांश माहिती विकिपीडिया, TOI, द हिंदू, काही नियतकालिकांतील लेख, काही जालीय लेख यांच्या एकत्रित आधारावर लिहिणार आहे. शक्य (व लक्षात) राहील तिथे संदर्भ द्यायचा प्रयत्न करेल. तसे न दिसल्यास संदर्भ मागितल्यास पुरवायचाही प्रयत्न करेन. खरंतर इथे - ऐसीवर - या घटनाक्रमाचे साक्षीदार आहेत किंवा या प्रांतात राहिलेले, काही गोष्टी प्रत्यक्ष अनुभवलेले अनेक जाणकार आहेत/असतील. अशावेळी या विषयावर, मी इथे लेख लिहिणेच खरंतर गैर आहे, पण त्यांच्या लेखणीवरचा गंज झटकला जाण्यापुरता जरी या लेखाचा उपयोग झाला तरी हा टिझर उपयुक्त ठरला असे मानेन.

(चित्रे: साभार विकिपीडीया)
चेन्नै
श्री पोट्टी श्रीरामलु यांचे १९५२चे उपोषण एकत्र/बृहद् आंध्रासाठी नव्हते तर मद्रास प्रांतातून तेलुगू लोकांसाठी वेगळे राज्य काढून देण्यासाठी होते. ज्यातून "आंध्र स्टेट" चा जन्म झाला.
बरोबरच. पण त्यांची अजून एक मागणी होते - ह्या नव्या आंध्र स्टेटची राजधानी चेन्नै (तेव्हाचे मद्रास) ही असायला हवी! जी अर्थातच मान्य झाली नाही. आणि कुर्नूल हे शहर तात्पुरती राजधानी म्हणून मान्य झाले.
ड नाही
बिदर/बेदर हा उच्चार करेक्ट आहे.
बाकी बिदर आणि बेरर एकच नसावेत.
आत्ता विसरलो पण बहामनी राज्य फुटून पाच शाह्या तयार झाल्या त्या अशा :-
बिदरची बरीदशाही
गोवळकोंडा/बहगानगर/हैद्राबदची कुतूबशाही
नगरची निजामशाही
विजापूर्/बिजापूरची आदिलशाही
बेररची इमादशाही
इमादशाही ही सर्वात आधी खलास झाली.(इस १६००च्या आधीच)
निजामशाही शहाजीराजांच्या काळात मलिक अंबरनंतर संपली.
कुतुबशाही व आदिलशाही औरंगजेबाच्या रपाटयत सर्वात शेवटी १६८५नंतर संभाजीराजांच्या हयातीत संपल्या.
बरीदशाहीची कल्पना नाही.
कुतूब निजाम आदिल, बरीद हे एकत्र येउन तालिकोटा/राक्षसतागडी च्या रनात लढले.
त्यांनी विजयनगर सामराज्य एका रपाट्यात झोपवले.
तर सांगायचे म्हणजे बिदर आणि बेरर एकच नसावेत.
मान्य. ते विशिष्टाद्वैत
मान्य. ते विशिष्टाद्वैत अर्थातच तिथे आहे. नुक्तावाला ड़ अर्थात स्ट्रेस्ड नसतो, पण तरी त्यासाठी 'डी' हे साधे सरळ चिन्ह आलरेडी अव्हेलेबळ असताना आर काये म्हणोन वापरले ते तो चॉसरच जाणे. असो, त्यामुळे घोळ असा झाला की आपल्याला त्यांची स्पेलिंगे पाहून चुकीचे उच्चार करावे लागले.
त्यांना जसे ऐकू आले तसे त्यांनी केले
त्यासाठी 'डी' हे साधे सरळ चिन्ह आलरेडी अव्हेलेबळ असताना आर काये म्हणोन वापरले ते तो चॉसरच जाणे. असो, त्यामुळे घोळ असा झाला की आपल्याला त्यांची स्पेलिंगे पाहून चुकीचे उच्चार करावे लागले.
त्यांना जसे ऐकू आले, तसे त्यांनी, त्यांच्या सोयीकरिता केले; साधी गोष्ट आहे. ते ठीकच आहे, पण आपल्याला आपल्याच देशातील जागांचे उच्चार त्यांची स्पेलिंगे पाहून करण्याचे कंपल्शन का असावे, म्हणतो मी.
गोम अशी आहे, की आपल्याला आपल्याच तथाकथित देशातल्या (पण आपल्या क्षेत्राबाहेरच्या) जागांची ओळख इंग्रजांमार्फत (/ इंग्रजीमार्फत) झाली/होते, आणि त्यापलीकडे आपण प्रयत्नही कधी केला नाही, की करत नाही. असो चालायचेच.
बाकी, स्पेलिंग कन्वेन्शनाचेच म्हणाल, तर ते कन्वेन्शन बनवणार्याच्या सोयीप्रमाणे / लहरीप्रमाणे स्थापन होते; त्यात 'असेच का' या प्रश्नाला अर्थ नाही. कधी रोमी लिपीत लिहिलेली (गोमंतकीय) कोंकणी वाचलीयेत? त्यामागेसुद्धा एक भक्कम कन्वेन्शन आहे, मेथड इन द म्याडनेस आहे. फक्त, 'आपल्या बाजूच्या' कन्वेन्शनात नि त्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे, इतकेच. त्यामुळे, तुमच्याआमच्यासारख्या पूर्वाङ्ग्लहिन्दोद्भवांना 'Quexava' म्हणजे 'केशव', 'Esvonta' म्हणजे 'यशवंत', 'Manguexa' म्हणजे 'मंगेश', झालेच तर 'Xennoi' बोले तो 'शेणई'/'शेणोई'/'शेणवी', 'Quenim' मतलब 'केणीं' हे समजण्याकरिता - आणि सार्वजनिक ठिकाणी लावलेली 'Ogi Ravchem' असे लिहिलेली पाटी ही कोण्या अगम्य यौरोप्यभाषेतील नसून, 'गप्प बसा / शांत रहा' अशा अर्थाची 'उगी रावचें' अशी शुद्ध कोंकणीतील पाटी आहे हे लक्षात येण्याकरिता - केवळ दिव्यदृष्टी लागते. पण गोमंतकीयांना ते व्यवस्थित समजते. असो.
पण आपल्याला आपल्याच देशातील
पण आपल्याला आपल्याच देशातील जागांचे उच्चार त्यांची स्पेलिंगे पाहून करण्याचे कंपल्शन का असावे, म्हणतो मी.
नेमका हाच मुद्दा आहे, तो नीट मांडला गेला नव्हता.
गोम अशी आहे, की आपल्याला आपल्याच तथाकथित देशातल्या (पण आपल्या क्षेत्राबाहेरच्या) जागांची ओळख इंग्रजांमार्फत (/ इंग्रजीमार्फत) झाली/होते, आणि त्यापलीकडे आपण प्रयत्नही कधी केला नाही, की करत नाही. असो चालायचेच.
तसे वाटत नाही. जुन्या कागदपत्रांतून, यात्रा सर्किटमधून बर्याच गावांची नावे माहिती होती याचे पुरावे आहेत अन तेही बर्याच जुन्या काळापासूनचे. पेशवा काळातल्या कैक नोंदींतून, काही नकाशांतून अशी कैक नावे येतात. अर्थात ब्रिटिश राज्य स्थिरावल्यावर त्या ओळखीचे माध्यम इंग्रजी झाले म्हणून तसे झाले असावे हे जास्त पटणीय वाटते.
बाकी, स्पेलिंग कन्वेन्शनाचेच म्हणाल, तर ते कन्वेन्शन बनवणार्याच्या सोयीप्रमाणे / लहरीप्रमाणे स्थापन होते; त्यात 'असेच का' या प्रश्नाला अर्थ नाही. कधी रोमी लिपीत लिहिलेली (गोमंतकीय) कोंकणी वाचलीयेत? त्यामागेसुद्धा एक भक्कम कन्वेन्शन आहे, मेथड इन द म्याडनेस आहे. फक्त, 'आपल्या बाजूच्या' कन्वेन्शनात नि त्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे, इतकेच. त्यामुळे, तुमच्याआमच्यासारख्या पूर्वाङ्ग्लहिन्दोद्भवांना 'Quexava' म्हणजे 'केशव', 'Esvonta' म्हणजे 'यशवंत', 'Manguexa' म्हणजे 'मंगेश', झालेच तर 'Xennoi' बोले तो 'शेणई'/'शेणोई'/'शेणवी', 'Quenim' मतलब 'केणीं' हे समजण्याकरिता - आणि सार्वजनिक ठिकाणी लावलेली 'Ogi Ravchem' असे लिहिलेली पाटी ही कोण्या अगम्य यौरोप्यभाषेतील नसून, 'गप्प बसा / शांत रहा' अशा अर्थाची 'उगी रावचें' अशी शुद्ध कोंकणीतील पाटी आहे हे लक्षात येण्याकरिता - केवळ दिव्यदृष्टी लागते. पण गोमंतकीयांना ते व्यवस्थित समजते. असो.
सहमत.
प्रयत्न
शुद्ध मराठी ऊर्फ वाचक्नवी यांनी या विषयावर दिलेला एक विस्तृत प्रतिसाद शोधण्याचा प्रयत्न केला मात्र हे(http://mr.upakram.org/node/547#comment-8155) वगळता तो प्रतिसाद अद्याप सापडलेला नाही. मात्र इंग्रजांनी केलेली स्पेलिंगे ही कशी बरोबर होती याचे त्यांनी दिलेले उदाहरण आठवते. पुणं हे गावाचं नाव poona या इंग्रजकृत स्पेलिंगाने उत्तमरीत्या उच्चारिले जाते. मात्र आपण त्याचे pune करुन प्यून वगैरे चुकीच्या उच्चारांची सोय करुन दिली.
पुणं हे गावाचं नाव poona या
पुणं हे गावाचं नाव poona या इंग्रजकृत स्पेलिंगाने उत्तमरीत्या उच्चारिले जाते. मात्र आपण त्याचे pune करुन प्यून वगैरे चुकीच्या उच्चारांची सोय करुन दिली.
अतिशय चुकीचे उदाहरण आहे. पुणं या उच्चारातील शेवटचा स्वर हा मराठी स्पेशल असा 'दीर्घ अ-कार' आहे. तो इंग्लिश स्पेलिंगने आजिबात दाखवला जात नाही आणि मराठी माणूस पुणं असा उच्चार त्या स्पेलिंगमुळे न करता डिस्पाईट दॅट करतो. अन्यभाषीय माणूस मात्र पूना असा चुकीचा उच्चार करेल ते स्पेलिंग पाहून. पुण्यातला पु हा र्हस्व आहे तो अशामुळे दीर्घ होतो. शेवटचा स्वरही चुकतोच आहे. pune या स्पेलिंगने किमान पुने असा उच्चार तरी होतो. त्यातली एकमेव चूक म्ह. ण च्या जागी न येतो, बाकी सर्व जागच्याजागी आहे. असे असतानाही जर ब्रिटिश स्पेलिंगच बरोबर असे म्हणणार असाल तर औघड आहे.
मूळ प्रतिक्रियेतून साभार
पुणं हे नाव ऐकल्यानंतर त्याचे स्पेलिंग कसे करायचे याची कारणमीमांसा मूळ प्रतिसादातून साभार खाली पाहा.
मूळची नावे सातारे. लोणावळे, पुणे अशी होती हे खरे. पण इंग्रजांनी ती आकारान्त केली हे तितकेसे बरोबर नाही. या नावांचा उच्चार त्यांनी सातारं, लोणावळं, पुणं असा ऐकला. त्यामुळे स्पेलिंग्ज़ a-कारान्त झाली. Indiaचा इंग्रजी उच्चार इंडिअं असा होतो. इंग्रजीत आकारान्त उच्चार हवा असेल तर --ए एच् वापरावे लागते. उदाहरणार्थ - Allah. त्यांनी पीयूएन्ए-एच् असे केले असते तरच ते आकारान्त झाले असते. मग पुणं चे स्पेलिंग कसे करावे? इंग्रजीत 'ण' नाही. Puna केले तर प्यूना होते. त्यामुळे Poo करणे भाग आहे. Pune केले तर प्यून होते. oo म्हणजे दीर्घ ऊ असेच काही नाही. टुक्, शुक्, फ़ुट्, हुड् इत्यादी शब्दात oo आहे तरी उच्चार ऱ्हस्व 'उ' आहे. त्यामुळे Poona या स्पेलिंगला पर्याय नाही.
हे रिझनिंग ब्रिटिशांसाठी ठीक
हे रिझनिंग ब्रिटिशांसाठी ठीक आहे. आपली उच्चारपद्धती ब्रिटिशांसारखी नसल्याने ते स्पेलिंग आपल्याला मार्गदर्शक होणे अशक्यच. त्यात परत लिहिणे अन बोलणे यांच्यात इंग्रजीच्या तुलनेत आपल्याकडे विशिष्टाद्वैताची डिग्री जास्त असल्याने आपला विचारही वेगळा पडतो.
मुद्दा इतकाच, की स्पेलिंगकडे पाहून उच्चार करायचा अर्थबोध धडपणी झाला पाहिजे. इंग्रजी ही परकीय भाषा असली तरी तिची वर्णमाला भारतीय उच्चारांत आपण शंभरेक वर्षांच्या अनुभवाने ठाकून ठोकून बसवलेली आहे. तस्मात आपल्या 'इंडियन इंग्लिश' उच्चारांप्रमाणे लिहिणे हे मूळ नावांचा अर्थबोध करून देण्यासाठी आपल्याकरता जास्त सोयीचे आहे. वरिजिनल ब्रिटिश पद्धत आपल्याला अडचणीची आहे कारण अपरिचित उच्चारपद्धती दोनवेळेस आडवी येते- उच्चारलेले लिहिताना व लिहिलेले उच्चारताना. त्यापेक्षा तो थर उडवून सोयीचे स्पेलिंग लिहिले तर बिघडले कुठे? अजूनही आपण सगळे ब्रिटिश इंग्लिश बोलत नाही (देव करो अन तशी वेळ न येवो) तेव्हा प्राप्त परिस्थितीत असे स्पेलिंग लिहिणेच सोयीचे आहे असे वाटते.
हे ठीकच, पण...
तस्मात आपल्या 'इंडियन इंग्लिश' उच्चारांप्रमाणे लिहिणे हे मूळ नावांचा अर्थबोध करून देण्यासाठी आपल्याकरता जास्त सोयीचे आहे. वरिजिनल ब्रिटिश पद्धत आपल्याला अडचणीची आहे कारण अपरिचित उच्चारपद्धती दोनवेळेस आडवी येते- उच्चारलेले लिहिताना व लिहिलेले उच्चारताना. त्यापेक्षा तो थर उडवून सोयीचे स्पेलिंग लिहिले तर बिघडले कुठे?
तत्त्वतः हे ठीकच आहे; फक्त, 'इंडियन इंग्लिश' भाषा आणि स्पेलिंग कन्वेन्शन दोहोंतही अखिलभारतीय पातळीवर एकवाक्यता नाही, स्थानिक कन्वेन्शनांत प्रचंड भिन्नत्व असू शकते, एवढेच नम्रपणे निदर्शनास आणून देऊ इच्छितो.
अस्सल इंग्रज
ते अस्सल इंग्रज गेले हो पण आपले पुण्यातील गावठी इंग्रज मात्र अजूनही पुण्यातील काही उपनगरांच्या नावाचा हिंदी+इंग्रजी धेडगुजरी नावाने उल्लेख करतात तेव्हा संताप होतो.
उदा हिंजवडी चा उच्चार हिंजेवाडी
बावधन चा उच्चार बावधान
वानवडी चा उच्चार वनावरी
येरवडा चा उच्चार येरवरा
लवळे चा उच्चार लावले
पिसोळी चा उच्चार पिसोली
म्हणावे वाटते अरे भ**हो पोटं भरायला ज्या गावात येत तिथल्या नावांचा (आणि पर्यायाने स्थानिक भाषेचा ) पण आदर तुम्हाला करता येत नाही का?
सहमतीकडे कल
या नावांचा उच्चार त्यांनी सातारं, लोणावळं, पुणं असा ऐकला. त्यामुळे स्पेलिंग्ज़ a-कारान्त झाली. Indiaचा इंग्रजी उच्चार इंडिअं असा होतो.
हे ठीक वाटते. किंबहुना, Atlantaचा स्थानिक उच्चार 'अटलॅऽण'च्या जवळपास (शेवटचा 'ण' अकारान्त, अकार र्हस्व) होतो, हे शपथेवार सांगू शकतो१. (मराठीभाषकांमध्ये मात्र तोच उच्चार 'अटलाण्टा' असा होतो.)
इंग्रजीत आकारान्त उच्चार हवा असेल तर --ए एच् वापरावे लागते. उदाहरणार्थ - Allah.
मात्र, इंग्रजांमध्येच Poonah असाही एक स्पेलिंगविकल्प क्वचित का होईना, पण पाहिलेला आहे.
oo म्हणजे दीर्घ ऊ असेच काही नाही.
हे ठीक वाटते. मात्र, त्याकरिता दिलेले दाखले पटत नाहीत (कसे, ते पुढच्या मुद्द्यात), आणि योग्य असे दाखले या क्षणी सुचत नाहीत.
(शिवाय, इंग्रज कान आणि इंग्रज मेंदू यांच्यामध्ये असलेल्या गाळणीत र्हस्वदीर्घाचा फरक गाळला जाऊन, त्यांना तो उच्चार 'पूणं' असा ऐकू आला असण्याची शक्यताही अगदीच नाकारता येत नाही.)
टुक्, शुक्, फ़ुट्, हुड् इत्यादी शब्दात oo आहे तरी उच्चार ऱ्हस्व 'उ' आहे.
याबद्दल अॅट बेष्ट साशंक आहे. एक म्हणजे 'कोणाचा उच्चार प्रमाण' वगैरे भानगडी यात याव्यात. (Eggचा एऽग असाही एक उच्चार ऐकलेला आहे, आणि तो तत्त्वतः 'प्रमाण इंग्रजी' म्हणता येण्यासारखा नसला, तरी आमच्या दक्षिण संयुक्त संस्थानांत तोच प्रचलित आहे. शिवाय, इंग्लंडातीलही किमान काही बोलींत तसा उच्चार प्रचलित असावा, अशी शंका वुड्डहौससाहेबाच्या पुस्तकातील काही फुटकळ प्रसंगांतील काही अवांतर वर्णनांतून येते.) आणि दुसरे म्हणजे, 'राणीच्या प्रमाण इंग्रजी'ची प्रस्थापित व्याख्या जरी गृहीत धरली, तरीही प्रस्तुत उदाहरणे पडताळून पाहावी लागतील - भारतीयेतर 'प्रमाण' इंग्रजीत यातील किमान काही उच्चार तरी दीर्घ असावेत, अशी शंका आहे. (सवडीने पडताळून पाहीन.)
मात्र,
त्यामुळे Poona या स्पेलिंगला पर्याय नाही.
किंवा, त्यापेक्षासुद्धा, Poona हे (कदाचित अगदी अचूक नाही, तरी) इंग्रजकृत (/ इंग्रजी दृष्टिकोनातून) बेष्ट अप्रॉक्झिमेशन असावे, याबद्दल सहमतीकडे कल आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ कितीदा तेचतेच सांगू?
अवांतर
तेलंगण असा शुद्ध मराठी उच्चार असताना राम, योग या शब्दांचे रामा-योगा असे 'चुकीचे'१ आकारान्त उच्चार करणाऱ्या उत्तर व दक्षिण भारतीयांच्या प्रभावाखाली आपण तेलंगणाही चालवून घेतोच की. मग इंग्रजांनाच काय मूर्ख म्हणायचे.
१ द.दि.पुंडे यांच्या पुस्तकातील उदाहरणावरुन आठवते त्यानुसार.
तत्सम-तद्भवीकरण हे प्रत्येक
तत्सम-तद्भवीकरण हे प्रत्येक भाषेत चालतेच. ब्रिटिशांनी रूढ केलेल्या रूपांमुळे चुकीची नावे रूढ होतात म्हणून ते नको इतकाच मुद्दा आहे. तुलनेने भारतीय पद्धतीचे स्पेलिंग मानक म्हणून ठेवले तर भारतीयांच्या उच्चारणात कमी चुका होतात. बाकीच्या जगात काही का होईना! आपल्यापुरतं क्लीअर असलं की बास इतकाच मुद्दा आहे. असो.
असेच काही नाही.
वानवडी या गावाशी संबंध आलेल्या इंग्रजांनी त्याचे wanowrie करुन बऱ्यापैकी उच्चारी पावित्र्य राखले. तो उच्चार कितीही भ्रष्ट केला तरी वानवरी (वानवडीशी अत्यंत साधर्म्य राखणारा आहे) मात्र मर्द मराठ्यांनी हिंजवडीचे भारतीय मानक पद्धतीने hinjewadi करुन हिंजेवाडी वगैरे कंप्लीट उच्चारी बलात्कार केला. इंग्रजांनी hinjowrie करुन ते व्यवस्थित ठेवले असते असे वाटते.
अशी उदाहरणे उभयपक्षी देता
अशी उदाहरणे उभयपक्षी देता येतील. हिंजेवाडीसारखी अजून किती उदा. आहेत याबद्दल साशंक आहे. रेल्वे स्टेशनवर म्हणाल तर हिंदी अन स्थानिक भाषा या दोहोंतही नाव असल्याने टेन्शन नाही. इंग्रजांनी वाट लावलेली कैक उदा. आहेत- cossipore cawnpore इ.इ. यांबद्दल काय म्हणाल?
कानांचा वाद नाही
मूळ स्थानिक भाषा न जाणणाऱ्या आणि त्यातुलनेत इंग्रजी बऱ्यापैकी जाणणाऱ्या व्यक्तीच्या मदतीसाठी किंवा सोयीसाठी इंग्रजी स्पेलिंग बनवले आहे हे मान्य केल्यास kanpoor चा उच्चार (पूर हा शब्द मुळात माहीतच नसल्याने) मी कॅनपुअर आणि kanpur चा उच्चार कॅनपर करण्याची बरीच शक्यता आहे. त्यातुलनेत मला इंग्रजी आधीच माहीत असल्याने cawnpore चा उच्चार कॉनपोर असा कानपूरशी बराच साधर्म्य राखणारा करण्याची शक्यताही त्यातुलनेत जास्तच आहे.
आता मुळात मला जर कान आणि पुर हे दोन्ही शब्द माहीत असतील तर मी इंग्रजी स्पेलिंग वाचून उच्चार करीलच कशाला? सरळ देवनागरीत काय लिहिले आहे तेच वाचील ना.
उदाहरणे पटली नाहीत
इंग्रजांनी वाट लावलेली कैक उदा. आहेत- cossipore cawnpore इ.इ. यांबद्दल काय म्हणाल?
Cossipore, Cawnpore ही इंग्रजांनी वाट लावण्याची उदाहरणे नसून इंग्रजांच्या बेष्ट अप्रॉक्झिमेशनची उदाहरणे असावीत, असे वाटते.
उलटपक्षी, इंग्रजांनी वाट लावलेल्याचीच उदाहरणे जर द्यायची होती, तर Trivandrum, Trichinopoly, Burdwan, Chittagong, Bombay, Trombay, Cambay, Midnapore, Balasore, Tipperah अशी अनेक देता आली असती, आणि कदाचित ती सयुक्तिकही ठरली असती. मात्र, प्रस्तुत उदाहरणे पटली नाहीत.
ओके. वाट लावणे हे जे म्हणालो
ओके.
वाट लावणे हे जे म्हणालो ते सापेक्ष आहे. भारतीय कानांना मूळ नाव शक्य तितके नि:संदिग्धपणे कळावे हा मुख्य हेतू. या निकषावर ब्रिटिश स्पेलिंग उपयोगी नाही हा आणि इतकाच मुद्दा आहे. ब्रिटिश उच्चारशास्त्र समजून घेऊन मग ती स्पेलिंगे कशी बेष्ट अप्रॉक्सिमेशन्स आहेत हे कळवून घेण्याचा अँग्लोसॅक्सनी प्राणायाम करण्यापेक्षा भारतीय स्पेलिंगपद्धती वापरावी असे म्हणणे आहे. ही स्पेलिंगपद्धती आपल्या अंगवळणी पडल्याने त्याचे विशेष टेन्शन नाही.
तदुपरि दिलेल्या उदाहरणांशी सहमत आहे, पण भारतीय कानांना/डोळ्यांना ते कॉसिपोर इ.इ. ऑड वाटतेच. असो.
hinjewadi असं स्पेलिंग
hinjewadi असं स्पेलिंग केल्यामुळे हा उच्चार हिंज्वडी किंवा हिंज्वाडी असा नसून हिंजवडी असा आहे (ज पूर्ण) असा माझा समज झाला/होतो. Swades चा सायबी उच्चार स्वेड्स असा बऱ्याच ब्रिटीशांकडून ऐकला आहे. एकार नाही. e या स्वराचा उच्चार अनेक इंग्लिश शब्दांमधे, अगदी often म्हणता यावा, आपल्या अ सारखा होतो. पण भारतीयांच्या किंवा मराठी भाषिकांच्या सोयीनुसार स्पेलिंग करायची असतील आणि मराठी उच्चार हिंज्वडी असा असेल तर स्पेलिंगमधला e गैरसोयीचा आहे, हे मान्य.
अवांतर - सध्या सुरू आहे तसं भारताचं अमेरिकेकरण चालू राहिलं तर याच स्पेलिंगचा उच्चार हिंजीवाडीसुद्धा होईल.
baugh की baag
wanowrie प्रमाणेच सतावणारी शंका म्हणजे
baugh की baag
?
बरोबर काय?
का?
शिवाय
किंकवडी धनकवडी वानवडी ह्याच्याच लयीत हिंजवडी हेच बरोबर वाटते. हिंजेवाडी नव्हे.
(बाकी, नाव काही का असेना, पोटापाण्याला तिथेच मिळते आहे हे काय कमी आहे?
भाकर म्हणा नैतर भाकरी ; पोट भरल्याशी मतलब.
)
बादवे, पुणे-सुपे-चाकण्-इंदापूर ह्या चौकोनापैकी "सुपे"चे स्पेलिंग व उच्चार काय आहे म्हणे?
त्यांचे सोडा...
देसी-मराठी इंग्रजांचे सोडा. ते हूच-ब्रू गटात असतील नाहीतर होम-ब्रू.
आमच्यासारख्या देसी-मराठी अमेरिकनांची गणना कोणत्या गटात कराल? आम्ही 'हिंजवडी'ला 'हिंजवडी'च म्हणतो.१
===================================================================================================
१ हं, आता आम्ही जेव्हा पुण्यात राहत-वाढत होतो, तेव्हा पुण्यात (किंवा पुण्याच्या जवळपास) 'हिंजवडी' नावाचे काही आहे, याची आम्हांस कल्पनाही नव्हती, हा भाग वेगळा.२
२ फॉर द्याट म्याटर, हिंजवडी नेमके कोठे आहे, हे आम्हांस आजमितीसही ठाऊक नाही. पण ते एक असो.
नावाच्या मुद्द्यावर tune in
वो पंगाशेट तुमची गणना कोणत्याहि गटात करणारे आमी कोण वो ??
आणि केले तरी मेगाबायटी प्रतिसादांनी धागा नाकातोंडात जाऊन आंतरजालात बुडण्याची वेळ येणार वो. ( ह. घे. हे. वे. सा. न. ल.)
अपेक्षा हीच कि आपण जेव्हा एखाद्या गावाचे नाव उच्चारतो तेव्हा त्या नावामागे काहीतरी इतिहास असतो,ज्याच्याशी त्य भागातील जनतेच्या भावना
जुळलेल्या असतात. केवळ मला उच्चारण्यास सोपे जावे म्हणून उच्चार आणि नाव बदलणे हि प्रवृत्ती त्या लोकांच्यात आढळते. स्थानिक लोकांशी
किमान नावाच्या मुद्द्यावर tune in न होता स्वतःच्या भाषेचा आग्रह रेटणे हा निंदनीय प्रकार आहे.
ओsss नाय ओ
इस. ११९१. दिल्लीवर मुहम्मद घोरीची स्वारी. पृथ्वीराज पराभूत.
दिल्ली व आसपासचा इलाखा घोरीच्या ताब्यात. तिथून पुढे शतकभर तरे परकीय मुस्लिमांची सत्ता केवळ दिल्लीच्या आसपसच्या बहगात. अजाचा भारत, दक्षिण आशिया अनेकानेक विभाजित लहान लहान राज्यात. विविव्ध राजपूर्त राज्ये होती, तसेच हे एक अजून एक मुस्लिमांचे दिल्लीचे राज्य.साम्राज्य नव्हे.
इस १२९०, घोरीनंतर शतकभराने खिल्जी घराणे सत्तेवर.
ह्यांनी न भूतो न भविष्यति अशा अचात मोहिमा काढल्या.
दिल्लीतून बाहेर पडत पूर्वेस बंगाल (मधले आख्खे यूपी बिहार कव्हर करत) ते पश्चिमेस गुजरात्-महाराष्ट्र पर्यंत मुसंडी.
इस१३१० - १३१८ पर्यंत ह्यांनी चक्क सुदूर दक्षिणेत मदुरै, तमिळनाडू पर्यंत धडक मारली.(मधला महाराष्ट्र- कर्नातक्-आंध्र इतका कॉरिडॉर कव्हर करत!)
त्याचा
त्याचा आणि कुतूबशाहाचाही संबंध नाही, मी टंकत होतो, तोवर कोल्हटकरांनी थोडक्यात प्रतिसाद दिला.
हैद्राबाद मुक्तिसंग्रामाबद्दल भालेरावांचे पुस्तक अहे. त्यात विस्तृत माहिती दिली आहे ह्यांच्या कुळाची.
.
.
वरील अर्धवट राहिलेला प्रतिसाद इथे पूर्ण करत आहे :-
इस. ११९१. दिल्लीवर मुहम्मद घोरीची स्वारी. पृथ्वीराज पराभूत.
दिल्ली व आसपासचा इलाखा घोरीच्या ताब्यात. तिथून पुढे शतकभर तरे परकीय मुस्लिमांची सत्ता केवळ दिल्लीच्या आसपसच्या बहगात. अजाचा भारत, दक्षिण आशिया अनेकानेक विभाजित लहान लहान राज्यात. विविव्ध राजपूर्त राज्ये होती, तसेच हे एक अजून एक मुस्लिमांचे दिल्लीचे राज्य.साम्राज्य नव्हे.
इस १२९०, घोरीनंतर शतकभराने खिल्जी घराणे सत्तेवर.
ह्यांनी न भूतो न भविष्यति अशा अचात मोहिमा काढल्या.
दिल्लीतून बाहेर पडत पूर्वेस बंगाल (मधले आख्खे यूपी बिहार कव्हर करत) ते पश्चिमेस गुजरात्-महाराष्ट्र पर्यंत मुसंडी.
इस१३१० - १३१८ पर्यंत ह्यांनी चक्क सुदूर दक्षिणेत मदुरै, तमिळनाडू पर्यंत धडक मारली.(मधला महाराष्ट्र- कर्नातक्-आंध्र इतका कॉरिडॉर कव्हर करत!)
इस १३२८ हरिहर - बुक्क बंधूंनी बंड करत दिल्लीच्या सत्तेपासून बाहेर पडत स्वतंत्र राज्य स्थापले, ते पुढे विजयनगर साम्राज्य बनणार होते. ह्यात दक्षिणेकडील अर्धा कर्नाटक, अर्धा आंध्र, बराचसा तामिळनाडू व बराचसा केरळ आला.(झामोरिन सारखे काही फुटकळ भाग वगळता). पूर्वेला ह्यांनी अगदि ओरिसापर्यंत मुसंडी मारली.
.
.
ह्या पाठोपाठ नर्मदेच्या दक्षिणेतील मुस्लिम सरदारांनीही दिल्लीविरुद्ध बंड करुन हसन गंगू बहामनशाह (ब्राम्हणशहा) ह्याच्या नेतृत्वाखाली बहामनी राज्य स्थापित केले. इस १३५०च्या असपास.
हे राज्य नर्मदेच्या दक्षिणेला व तुंगभद्रेच्या उत्तरेला असे होते. तुंगभद्रेच्या दक्षिणेला विजयनगर.\
ह्यावरून ह्यांच्या सदैव मारामार्या होत. बहुतांशी विजयनगर जिंके. (पण बहामनी सत्ता त्यांनी निर्णायक संपवली नाही, they didnt overrun entire state of Bahamanis;despite of victory. The just concluded truce in their favor.) इमाद
.
.
हे बहामनी राज्य शंभरेक वर्षे टिकले. इस १४५० च्या असपास ह्यांचे पाच स्वतंत्र तुकडे पडले. पाच सरदारांनी पाच स्वतंत्र शाह्या तयार केल्या.
गोवळकोंडा/भागानगर/हैद्राबादची कुतूबशाही
नगरची निजामशाही
विजापूर्/बिजापूरची आदिलशाही
बेररची इमादशाही
इमादशाही ही सर्वात आधी खलास झाली.(इस १६००च्या आधीच)
निजामशाही शहाजीराजांच्या काळात मलिक अंबरनंतर संपली. (इस १६३० च्या आसपास, शिवजन्माच्या आसपास.)
कुतुबशाही व आदिलशाही औरंगजेबाच्या रपाटयत सर्वात शेवटी १६८५नंतर संभाजीराजांच्या हयातीत संपल्या.
(संभाजी राजे थेट लढाईत पूर्णतः पराभूत होत नाहित; हे ध्यानी आले. तोवर त्या आघाडीवर अल्पविराम देउन औरंगजेबाने आपले लक्ष दख्खनमधील इतर शाह्यांकडे वळवले. त्याने एक- दोन वर्षाच्या अंतरात आदिलशाही व कुतूबशाही संपवल्या.)
बरीदशाहीची कल्पना नाही.
कुतूब निजाम आदिल, बरीद हे एकत्र येउन तालिकोटा/राक्षसतागडी च्या रणात १५६५साली लढले.
त्यांनी विजयनगर सामराज्य एका रपाट्यात झोपवले. नंतर निजामशाहीही संपल्याने
त्याचे राज्य आपसात वाटून घेतले. दख्खनच्या फार मोठ्या भागावर आदिलशहा + कुतूबशहा ह्यांचा अंमल सुरु झाला.
.
.
आता असे दोन मोठे भूभाग जिंकले म्हटल्यावर त्यांची व्यवस्था लावणे मोठे काम. त्यासाठी कुशल प्रशासक व मोठ्या औद्याचा मनुष्य नेमणे आवश्यक. तो जो माणूस औरंगजेबाच्या कारकिर्दित नेमला गेला, त्याच्या वंशजांनी औरंगजेबाच्या मृत्यूनंतर अधिकाधिक स्वतंत्र वागणे सुरु केले. हे वंशज म्हणजे हैद्राबादचे निजाम.
ह्यांचा निजामशाहीशी संबंध नाही; तसाच कुतूबशाहीशीसुद्धा नाही.
हे आसफजाही घराणे.
(जुन्या हैद्राबादी मुस्लिमात आजही आसफजाही घराण्याशी नाते सांगण्याचा प्रयत्न सुरु दिसतो. आपली राजघराण्याशी लिंकिंग सांगून खानदानीपणा सिद्ध करण्याचा तो प्रयत्न.)
.
.
मराठी इतिहासाच्या शालेय पुस्तकात दाखवतत तसा मराठ्यांनी निजामाचा कैकदा पराबह्व केलाही.
पण मराठ्यांसाठी तो निरर्थक विजय ठरे. मुत्सद्द्देगिरीत निजाम मराठ्यांना पुरून उरला.
इस १७१२ ते १७९८ पेशव्यांच्या पाचेक पिढ्या झाल्या. (बाळाजी विश्वनाथ भट, बाजीराव थोरले, नानासाहेब, नारायणराव्,माधवराव, सवाई माधवराव). तर निजामाच्या फक्त दोन. बाजीरावाशी लढलेल्या निजामाच्या मुलाची सवाई माधवराच्या काळात मरआठ्यांशी लढाई झाली खर्ड्याला.
थोडक्यात, निजामानी लाँग इनिंग्ज खेळल्या. त्यामुळे दीर्घकाली एकसलगता धोरणात येउ शकली.
युद्धसामर्थ्यात मराठे वरचढ असले तरी निजमाचा नायनाट होउ शकला नाही.
कुशल प्रशासक, धूर्त -चाणाक्ष मनुष्य , यशस्वी राजकारणी व सुदैवी माणसे असे मी दोन्ही निजामांचे वर्णन करेन.
.
.
.
थोडक्यात , "निजाम व निजामशाही, कुतूबशाही ह्यांचा आपसात संबंध नाही" इतकेच सांगणे पुरले नसते का >?
फापटपसारा कशाला ?
तो इतक्याचसाठी की इतर शाह्या कुठून उपटल्या व त्यांचे पुढे नेमके काय झाले हे कळावे; म्हणून जमेल तितकी अतिसंक्षिप्त माहिती ह्या संदर्भात दिली आहे.
हैदराबादचे निजाम
गोळकोंड्याची कुतुबशाहीच पुढे हैदरबादेतून राज्य करू लागली. हैदराबादेचे निजाम हे त्या कुतुबशाहीचेच वंशज.>
गोवळकोंड्याची कुतुबशाही आणि नंतरचे निजाम हे दोघेहि हैदराबादचेच पण त्यांचा एकमेकात संबंध नाही. हैदराबादच्या निजाम घराण्याचा मूळ पुरुष कमरुद्दीन खान आसफजाह चिनकिलीच खान, जो मुघलांच्या वतीने दख्खनच्या सुभ्याचा कारभार पहात होता. त्याला 'निजाम-उल-मुल्क' असा किताब होता. औरंगजेबानंतरच्या काळत तो मुघलांचा वजीरहि होता. ह्या आसफजहाने औरंगजेबानंतर मुघल सल्तनत खिळखिळी होऊ लागल्यावर हैदराबादमध्ये आपला सवतासुभा निर्माण केला आणि 'निजामी' राज्य तेथे सुरू झाले. १७२७ मध्ये बाजीरावाविरुद्ध पालखेडची लढाई आणि १७३९ मध्ये नादिरशहापासून मुघलांची उरलीसुरली इज्जत वाचविणे ह्या दोन घटनांमुळे तो सर्वपरिचित आहे.
पहा http://en.wikipedia.org/wiki/Qamar-ud-din_Khan,_Asif_Jah_I.
खोडसाळपणा
खोडसाळपणा करु का ?
त्यात निजामाने रझाकारांना पोसले होते. मदरशांतून शिक्षणाला जोर दिला जात होता. रझाकारांचे इतरधर्मीयांना बाटवणेही चालू होते. त्यात सक्तीची करवसुली वगैरेमुळे काही भागातील नागरिक वैतागलेले होते. दुसरे असे की या प्रांतातील अनेक जण भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होते. आपल्या मूळच्या भागातील स्थिती व उर्वरित इंग्रज अखत्यारीत असणार्या भारताची स्थिती यांतील ढळढळीत फरक त्यांना दिसत होता. त्यामुळे जेव्हा भारताने स्वातंत्र्यानंतर कारवाई केली तेव्हा त्यांना फार निकराचा प्रतिकार झालाच नाही.
म्हणजे ह्यात तथ्य असेलही/आहेच. पण "रझाकार म्हणजे वाईट " हे शिकवतात; हे सुद्धा ठीक.
पण तिथवर सांगून आपली कथा संपते. शांततेने व अगदि हळूवारपणे निजामी राज्य कल्याणकारी भारत सरकारच्या अखत्यारित आले; असा ग्रह आपोआप होतो.
दाबून ठेवलेल्या सुंदरलाल रिपोर्टबद्दल कुणीच काहिच बोलत नाही.
थेट रिपोर्ट
थेट रिपोर्ट मीही वाचलेला नाही.
पण रिपोर्टबद्दल भारतीय मिडियातील काही जणांकडून व पाकिस्तानी मिडियाकडून, त्यातही पाकमधील अतिकडव्या, अतिकट्टर,
अतिरेकी विचारसरणीवाल्यांकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात ऐकले/वाचले आहे.
त्या रिपोर्टचा आशय असा दिसतो :-
भारतीय सेनेने सप्टेंबर १९४८ मध्ये हैद्राबाद संस्थान जिंकले. हे अगदि सरळ व सुरळित झाले. जीवित हानी झाली; पण ती अचाट - अफाट वगैरे नव्हती.
( "पोलिस कारवाईत " होउन होउन किती/काय मोठे होणार ? लष्करी "युद्ध" वगैरे कुठे काय होते ? अशी भारताची भूमिका. वस्तुस्थितीची कल्पना असलेल्यांना
ह्यात कोणती गोष्ट बदलून सागितली गेली आहे, लष्कर लढले की पोलिस लढले, ह्याचा अंदाज असतो.)
ह्याच्या पुढची गोष्ट अगदिच सारे काही सुरळित नव्हते हे सांगणारी आहे.
विजयोन्मादात भारतीय सेनेतील काहिंनी प्रचंड सूडसत्र आरंभले. त्यातही संस्थानातील मुसलमानांना टार्गेट केल्यासारखे लुटालूट्,जाळपोळ , स्त्रियांवर अत्याचार व एकूणच आख्ख्या "पूर्व सत्ताधारी" ठरलेल्या समाजाला "अद्दल" घडवायला इतरही काही प्रकार केले; असा आरोप आहे.
आणि हे एखाद दुसर्या जवानाने केलेले तात्कालिक कृत्य नव्हते. खूप मोठ्या प्रमानावर, निदान काही हजार ते लाखभर तरी ह्यात पिडीत असावेत असाही आरोप आहे.
आता हे फक्त आरोप आहेत. पण इतक्या मोठ्या स्केलवर काही होत आहे अशी चर्चा आहे, तर त्याची पुरेशी चौकशी व्हावी, ती तशी झालेली नाही अशी तक्रार जुना काळ आठवणार्यांकडून करण्यात येते. १९८४चं शीख हत्याकांड व इतर काही मोठ्या दंगली ह्या त्यांच्या स्केलमुळे फार चर्चेचा विषय ठरतात. चर्चा, वादंग वगैरे त्यावरून होते.
पण ह्यात निर्देश केलेल्या गोष्टी खर्या असतील तर हीसुद्धा एक तितकीच मोठी घटना ठरते.त्याबद्दल कुणी काही बोलत नाही.
थोडक्यात सिव्हिलिअन्स विरुद्ध भारतीय सेनेच्या atrocities ही त्याची थीमलाइन आहे.
पाकी मिडियात ह्याचा उल्लेख करुन भारताविरुद्ध लै आगखाउ बकबक करण्यात येते.
पाकींना आत्मघाती मानवी स्फोटकं बनवायला भरपूर कंटेंट त्यात आहे.
.
.
बादवे, रिपोर्टची सत्यासत्यता वगैरे बद्दल काहीही कल्पना नाही. नेहरु सरकारने त्रिसदस्यीय समिती नेमली होती प्रकरणांची माहिती घेण्यासाठी. त्यात दोन मुस्लिम होते व तिसरे होते समितीचे अध्यक्ष सुंदरलाल.इतकेच माहित आहे.
तेलंगणा निर्मितीच्या
तेलंगणा निर्मितीच्या अनुशंगाने या रिपोर्टात गुप्त/गोपनीय/मुद्दाम लेखात न देण्यासारखे काही वाटले नाही.
किंबहुना सैन्याधिकार्यांचे नागरजनांशी वागणे व सैन्याधिकार्यांचे देशांतर्गत अत्याचार हा एक वेगळाच विषय आहे. इथे काही थोडा काळ असणार्या, ब्रिटीश सैन्याधिकार्यांच्या हाताखाली ट्रेन झालेल्या, नुकतेच महायुद्ध संपल्याने, ताज्या विचारांचे सैन्य असणे कठीण असल्याने असे होणे फार चकीत करत नाही. शिवाय हा प्रकार मर्यादीत काळात चालु होता. AFSPA सारख्या कायद्यांमुळे या प्रकारांना पुर्वोत्तरात, काश्मिरात अनेक नागरजनांना कायमचे सामोरे जावे लागत आहे. असो. अगदीच विषयांतर होईल त्यामुळे मी इथे थांबतो.
जाता जाता: फ्रंटलाईनने अख्ख्या सुंदललाल रिपोर्टचा गोषवारा छापला त्यालाही दशकाहून अधिक काळ उलटून गेला आहे. तो इथे वाचता येईलच
Trombay
@ 'न'वी बाजू,
'Trombay'या शब्दाची इंग्रजांनी फारशी वाट लावली आहे असे वाटत नाही. या शब्दाचा स्थानिक उच्चार 'तुरुंबे' असा आहे. त्यातूनही आगरी-कोळ्यांचा अतिस्थानिक उच्चार हा थोडासा 'त्रुंबे' म्हणजे त हलन्त असा आहे. जर इथे कुणाला 'कोलंबी', 'सरंगा' हे शब्द स्थानिक बोलीत कसे उच्चारले जातात हे माहीत असेल तर त्याला हा उच्चार कळेल. लं (ल अर्धा), रं (र अर्धा) असा काहीसा तो उच्चार असतो. त्यामुळे 'कोलंबी'मधला आद्य को हा उच्चार र्हस्व होतो. तसेच 'सरंगा' मध्ये मध्य अनुस्वारितामुळे प्रमाण भाषेत दीर्घ झालेला स हा स्थानिक बोलीत र्हस्व उच्चारला जातो. स्रंगा उच्चारताना स् आणि र् हे एकापाठोपाठ एक पण एकत्र नव्हेत असे भर्कन उच्चारायचे. तसाच 'तुरुंबे'चा उच्चार आहे. म्हणून 'Trombay' हे लेखन जास्तीत जास्त मुळाबरहुकूम उच्चार घडवणारे आहे.
रोचक आणि सयुक्तिक
या शब्दाचा स्थानिक उच्चार 'तुरुंबे' असा आहे. त्यातूनही आगरी-कोळ्यांचा अतिस्थानिक उच्चार हा थोडासा 'त्रुंबे' म्हणजे त हलन्त असा आहे. ... म्हणून 'Trombay' हे लेखन जास्तीत जास्त मुळाबरहुकूम उच्चार घडवणारे आहे.
हम्म्म्म... हे सयुक्तिक वाटते.
रोचक माहितीकरिता आभार.
चांगला लेख, भौगोलिक नावे
विषय चांगला आहे.
गंमत म्हणजे मीसुद्धा लेखातील मुद्द्यांऐवजी भौगोलिक नावांच्या लेखनाबाबतच प्रतिसाद लिहिणार होतो. माझ्यासारखाच विचार बर्याच जणांनी केलेला दिसतो.
--- मुद्दा १ : जमल्यास रोमन लिप्यंतराची मध्यस्थी टाळणे ---
इतर भारतीय भाषा जिथे प्रचलित आहेत, त्या भाषांच्या प्रमाण लेखनासारखे (जमेल तितपत देवनागरी करून) भौगोलिक नाव मराठीत लिहावे. हे आधुनिक भारतात शोभेल. उदाहरणार्थ तेलुगु->रोमन->देवनागरी असे लिप्यंतराचे टप्पे केले तर काही चुका होऊ शकतात, तेलुगु->देवनागरी असे थेट लिप्यंतर केल्यास संदिग्ध ठिकाणे खूपच कमी येतात. प्रत्येकाने तेलुगु लिपी शिकावी, असे नाही. पण प्रमुख वर्तमानपत्रांच्या उपसंपादकांनी शहानिशा करून घ्यावी. उदाहरणार्थ, लोकसत्ता आणि सकाळ वर्तमानपत्रांत तरी आज "तेलंगण" असे सुयोग्य लिप्यंतर केलेले दिसते.
देवनागरीमध्ये "कलकाता" लिहावे असे मला वाटते - हे "কলকাতা"चे साधे लिप्यंतर आहे. भौगोलिक आणि विशेषनामांची लिप्यंतरे करताना आपल्याला उच्चारांची नक्कल करणे अपेक्षित नसते.
मराठी आणि हिंदीमध्ये "कोलकाता" असे लिप्यंतर करण्याची प्रथा आहे. बांङ्ला->रोमन-बाङ्ला->रोमन-हिंदी->देवनागरी असे नको तितके टप्पे घेतल्यामुळे असे होते. परंतु महाराष्ट्रातील प्रमुख वर्तमानपत्रे "कोलकाता" असे वापरतात.
--- मुद्दा २ : जुन्या रोमनीकरणांबाबत वृथा तक्रार ---
पूर्वी मीसुद्धा "इंग्रजांनी/पोर्तुगिजांनी स्पेलिंगांचे वाट्टोळे केले" अशी तक्रार करत असे. वर कित्येक लोकांनी सोदहारण सांगितले आहे, की अशी तक्रार योग्य नाही. त्यांचे म्हणणे मला पटते.
पूर्वीच्या काळी काही स्पेलिंगे बनवली गेली : उदाहरणार्थ, Cawnpore, तेव्हाच्या इंग्रजी उच्चारी कॉनपोर, सध्या प्रमाण देवनागरी कानपुर; Quepem, पोर्तुगीज उच्चारी केपें, सध्या प्रमाण कोंकणी लेखन/उच्चार केपें.
त्यावेळी सध्याची दोन-तीन भारतीय रोमनीकरण प्रमाणे उपलब्ध नव्हती. उत्तर भारतीय प्रमाण : t = त/ट, th = थ/ठ, वगैरे; दक्षिण भारतीय प्रमाण : t = ट (ठ), th = त (थ), वगैरे; बंगाली प्रमाण "o/a" आणि "s/sh" रोमनीकरण वापरण्याबाबत विशेष नियम.
सध्याचे लेखन जमेल तितपत सध्याच्या प्रमाणानुसार करावे, हे म्हणणे योग्यच आहे : रोमन Madgaon, देवनागरी : मडगांव
आणि पूर्वीचे प्रमाण सध्या न वापरणे हेसुद्धा योग्यच - (जमल्यास Margão असे न वापरणे)
परंतु जुने स्पेलिंग जुन्या प्रमाणानुसार न उच्चारता नव्या प्रमाणानुसार उच्चारून "मरगओ" म्हणावे, मग "पोर्तुगिजांनी वाट्टोळे केले म्हणावे... हा घोटाळलेला युक्तिवाद आहे. असा चुकीचा युक्तिवाद न करतासुद्धा नवीन प्रमाणानुसार स्पेलिंगे वापरावीत, असा आग्रह आपण करू शकतो.
------
मोम्बाइम?
कित्येक वर्षांपूर्वी महाराष्ट्र टाइम्स मध्ये एक पोर्तुगीज् दस्तऐवज छापला होता. त्यात मुंबईसाठी वापरलेल्या (बोम्बाइम किंवा अशा काहीतरी) पोर्तुगीज शब्दाचे स्पेलिंग 'बी' ने सुरू होत होते आणि त्या 'बी'वर किंवा 'बी'खाली नुक्ता किंवा रेघ असल्याचे दिसत होते. त्यावरून असा निष्कर्ष काढला होता की या सुरुवातीच्या 'बी'चा उच्चार पोर्तुगीजमध्ये म असा होतो आणि त्यामुळे पोर्तुगीजांनी मुंबई हे नाव मोंबई (उच्चार कदाचित मुंबई) असेच लिहिले किंवा वापरले होते. पुढे ब्रिटिशांकडे मुंबईचा ताबा गेल्यानंतर हा सूक्ष्म फरक त्या इंग्लिश-भाषकांना कळला नसावा आणि त्या नुक्ता/रेघयुक्त 'बी' चे त्यांनी शुद्ध 'बी'मध्ये लिप्यंतर करून बॉम्बै हा उच्चार कायम केला.
या वृत्तांताची कात्रणे माझ्याकडे नाहीत. कदाचित टाइम्सच्या आर्काइव्ज़ मध्ये काही सापडू शकेल. त्या काळी अर्थातच ई-आवृत्ती नव्हती.
'मुंबई' शब्दाचा उगम.
ह्या विषयी माझ्या दोन महिन्यांपूर्वी येथेच आलेल्या 'मुंबईतील काही रस्त्यांची आणि जागांची नावे - भाग १' ह्या धाग्यात पुढील मजकूर आहे. संदर्भासाठी तो पुनः देत आहे'
बॉंबे - मुंबई - ह्या शब्दाच्या उगमाबाबत आता फारसा वाद उरलेला नाही असे वाटते. मुंबईचे मूळचे रहिवासी कोळी ह्यांची देवी मुंबा अथवा मुंबाई हिच्या नावावरून १६व्या शतकापासून उपलब्ध युरोपीय भाषांमधील उल्लेखांमध्ये ह्या गावाचे नाव Bombaim अथवा त्याचीच रूपान्तरे Mombayn (1525), Bombay (1538), Bombain (1552), Bombaym (1552), Monbaym (1554), Mombaim (1563), Mombaym (1644), Bambaye (1666), Bombaiim (1666), Bombeye (1676), Boon Bay (1690) असे उल्लेखिलेले सापडते. (संदर्भ विकिपीडिया http://en.wikipedia.org/wiki/Mumbai)
ह्या Bombaim शब्दाच्या उगमाबाबत दोन परस्परविरोधी मते आढळतात. पहिले मत म्हणजे हा शब्द ’मुंबाई’ ह्या शब्दाचा अपभ्रंश आहे. दुसरे मत म्हणजे ब्रिटिशांपूर्वी ह्या बेटांवर अधिकार असलेले पोर्तुगीज ह्या जागेस Bom Bahia (Bombahia) (Good Bay) असे म्हणत असत आणि त्याचे अपभ्रष्ट रूप म्हणजे ’मुंबई’. १९व्या शतकातील एक अधिकारी अभ्यासक डॉ. जे. गर्सन दा कुन्हा ह्यांनी ह्या दोन मतांची विस्तृत चर्चा आपल्या Words and Places in and about Bombay (Indian Antiquary, Vol III, 1874, p. 248) ह्या लेखामध्ये केली आहे आणि शब्दाचा उगम ’मुंबाई’कडे लावला आहे. Bombahia विरुद्ध त्यांचा प्रमुख आक्षेप असा आहे की Bom हे विशेषण पुल्लिंगी असून Bahia हे नाम स्त्रीलिंगी आहे आणि त्यामुळे Bombahia हे व्याकरणात बसणारे रूप नाही. ते Boabahia असे असावयास हवे होते पण तसा उपयोग कोठेच आढळत नाही.>
ब्रिटिश संकेत
बर्याच गोष्टी चुकीच्या उच्चारांना कारणीभूत असतात. आपण भारतीय, ब्रिटिश पद्धतीने भारतीय शब्दांचे स्पेलिंग करीत नाही त्यामुळेही गोंधळ उडतो. शिवाय मराठी माध्यमाच्या शाळेत इंग्लिश उच्चारांचे वेगळेच संकेत असतात.
काही निरीक्षणे : पडु़कोणे हे ग्रामनाम आपण पदुकोन असे उच्चारतो. काही वर्षांपूर्वी गाणगापूर स्थानकातल्या पाटीवर देवनागरीत 'गणंगपुर' (अर्थात हिंदीत, कारण हिंदीत संस्कृतसारखे 'पुर' लिहितात, मराठीसारखे 'पूर' नाही.) लिहिलेले पाहिले आणि खरेच मूळ शब्द गणंगपुरच असावा की काय अशी शंका आली. पनवेल-देहू मुक्तमार्गावर अनेक ग्रामनामे चुकीच्या पद्धतीने लिहिली गेली आहेत. कामशेट हे ठळक उदाहरण. इंग्लिश 'ओओ' चा उच्चार बहुतेक वेळी 'उ'च होतो. जसे फुड, ब्रुक्लिन,वगैरे. त्यामुळे पूना उच्चारण्याचे कारण नव्हते. (पुन्हा तेच. ओओ चा उच्चार ऊ करण्याचे शाळांतले संकेत.) ठाणे-नवी मुंबई रेल मार्गावरच्या कित्येक स्थानकांत ग्रामनामे चुकीच्या मराठीत लिहिली गेली आहेत. महाराष्ट्रातील बँकांच्या चेक-बुक वा तत्सम साहित्यावर स्थानिक पत्ता असतो तो देवनागरीमध्ये हमखास चुकीचा छापलेला असतो. पणदरे, पाषाण रोड हे शब्द देवनागरीमध्ये पंडारे, पासन रोड असे लिहिलेले कित्येक वर्षांपूर्वी पाहिलेले आहेत. (आता कदाचित सुधारणा झाली असेल.) रेल मार्ग स्थानकांतही 'शहद', 'मीराँ रोड' असे लिहिलेले पाहिले आहे. आता शहाड असते. मीराँचे मात्र 'मीरा' झाले, पण 'मिरा' झाले नाही. काही वेळा पाट्या रंगवणार्या रंगार्याकडून झालेल्या चुका देखरेखी अभावी तशाच कायम रहात असाव्यात. सध्या डोंबिवलीतल्या 'पालव' या ठिकाणी सुरू असलेल्या एका वजनदार बांधकामदाराच्या भव्य प्रकल्पाची जोरदार जाहिरात 'पलावा गृहसंकुल' अशी केली जाते. मूळ इंग्लिश जाहिरातीचे मराठीकरण करताना अनुवादकर्त्याकडून ही चूक झालेली असावी. शिवाय मालक मारवाडी असल्यामुळे त्यांना स्वतःला ती जाणवलीही नसावी.
वगैरे वगैरे.
ता. क. अवांतरच झाले आहे हे सगळे म्हणा, शब्दलेखन आणि उच्चारासंबंधीचे प्रतिसाद वेगळ्या धाग्यात हलवता आले असते तर बरे झाले असते.
नुक्ता
तसे असेल तर इंग्लिश स्पेलिंग बनवण्यात चूक झाली आहे असे म्हणता येईल. कारण मूळ शब्द 'ज़ैनुल अब-दीन (झैनुल अब-दीन)' असा असावा. गुजराती मुसलमान गुजरातीत आणि देवनागरीत लिहिताना हे नुक्त्याचे नियम पाळत नाहीत. उत्तरप्रदेशात मात्र नुक्ता आवर्जून वापरतात.
ह्या प्रकरणाला 'रिवर्स अॅप्रॉक्ज़िमेशन' म्हणावे काय?
काही मते
भारतात सध्याला ज्या प्रकारे राज्यांचे गठन झाले आहे त्याद्वारे भाषिक अस्मितांच्या नावाखाली जातीय अस्मितांना खतपाणी दिले आहे. कोणत्या राज्यात कोणत्या २-३ जातींचे २-३ नेते सर्वेसेवा आहेत हे सहज सांगता येते.
मला काही प्रश्न आहेत.
१. अमेरिकेत, कॅनडात, ब्राझिलमधे कोणत्या आधारावर नवी राज्ये बनवतात?
२. आर्थिक, भौगोलिक, ऐतिहासिक, भाषिक, धार्मिक, जातीय इ सर्व घटकांना विचारात धरून राज्ये बनवावीत. फक्त भाषेला इतके महत्त्व १९५० च्या काळात का दिले गेले? आता ज्या समभाषिक नव राज्यांची निर्मिती झाली आहे तीत अशी कोणती नविन अस्मिता पाहिली गेली आहे. मातीचा एकसंध भाग याशिवाय तेलंगणामधे कॉमन काय आहे? चार पाच सीमेवरचे जिल्हे प्लस मायनस का नाही?
३. छोट्या राज्यांचे प्रशासन चांगले असते म्हणतात? उत्तर प्रदेश सारखे मोठे राज्य असताना आंध्र प्रदेशाच्या विभाजना प्राधान्य का? म्हणजे यात प्रशासनिक मागणी किती आणि अस्मिताजन्य किती?
४. आज राज्याचे विभाजन करताना स्रोतांची न्याय्य वाटणी झाली आहे याची काळजी घेतली गेली असेल. पण उद्या सीमांध्रात प्रचंड तेल सापडले तर राज्य सरकारची रॉयल्टी तेलंगणाच्या लोकांना मिळणार नाही (जी विभाजन झाले नसते तर वाटून मिळाली असती). असे कितीतरी permanent imbalances निर्माण होतात ते हाताळण्याचा काही mechanism आहे का?
५. लोकांच्या अस्मिता न चाळवता राज्य विभागण्याची कला केंद्राला शिकली पाहिजे. विदर्भ, इ साठी पून्हा राडा नको. हे होतेय का?
क्र १
क्र १ बद्दल बोलू शकतो.
अमेरिकेची स्वतःची स्वतःबद्दलची धारणा व भारताची स्वतःबद्दलची तात्विक भूमिका किमान शब्दांत मांडायची तर :-
USA is destructible union of indestructible states.
India is indestructible union of destructible states
असं काहीतरी म्हणता यावं.
नाही म्हणायला अमेरिकेत चार्-दोन राज्य नव्यानं निर्माण झालीत, पण एकूणात त्यांची भूमिका
"आम्ही एकत्रित आलेले काही देश आहोत" ह्या छापाची आहे. एक देश दुसर्यात अंतर्गत बाबींत नाक खुपसत नाही!
भारतात राज्ये ही एकत्रित केंद्राच्या तुलनेत वध्य्/विभाजनीय मानली आहेत.
भारतात राज्यांचे तुकडे होणं, दोन तुकडे जोडणं हे प्राशासनिक सोयींचे कारण देउन करता येते.
अमेरिकेत मात्र एक राज्य हे एक स्वतंत्र युनिट असल्यासारखे आहे तात्विकदृष्ट्या.
नेमक्या शब्दांत सांगता येणे कठीण आहे.
अमेरिका ही काहिशी confederate ह्या संकल्पनेच्या जवळ जाते.
तात्विकदृष्ट्या अमेरिकेचा एकत्रित कारभार आवडला नाही म्हणून राज्ये त्यातून बाहेर पडू शकतात.
(अमक्या देशाने तमक्या संघटनेचा राजीनामा दिला, तसे काहिसे. किंवा युरोझोन वा युरोपिअन युनिअन मधून ग्रीस नावाचा देश बाहेर पडणे; अशी एखादी बातमी येउ शकते तसे काहिसे.
युरोपिअन युनिअन व USA ह्या संकल्पना बर्याच जवळ जातात एकमेकांच्या .
पण युरोपिअन युनिअनचे fiscal union, monetory union पूर्णपणे होणे, जितके झाले आहे ते consolidate होणे हे बाकी आहे. ते झाल्यास USA व EU ह्या संकल्पना फारच जवळ जातील.
फरक इतकाच रहिल की EUचे एकच एक केंद्र सरकार व एकच कॉमन लश्कर नाही.
)
, पण चीन काय, भारत काय हे केंद्र मजबूत व राज्ये तात्कालिक ह्या भूमिकेवर चालतात.
असो.
हे नेमक्या भाषेत सांगता येणे मला अशक्य आहे.
वॉव
मस्त माहितीपूर्ण लेख.
बरीच माह्तिई अधिक तपशीलात, काही नव्याने समज्ली.
उदा :-
श्री पोट्टी श्रीरामलु यांचे १९५२चे उपोषण एकत्र/बृहद् आंध्रासाठी नव्हते तर मद्रास प्रांतातून तेलुगू लोकांसाठी वेगळे राज्य काढून देण्यासाठी होते.
हे माहित नव्हते.
मात्र १९५६ पर्यंत त्यात तेलंगाणा समाविष्ट नव्हते.
हे माहित होते.
बाकी एकूण अशा घटना व विखारी वातावरण पाहता "राज्यांकडे स्वतःची लष्करी ताकद नाही हे किती बरे आहे" असे वाटून जाते खरे.