Skip to main content

समर्थ रामदास - अलिकडील लेखन, संशोधन, टीका

समर्थ रामदासांवर, खासकरून दासबोधावर आणि त्यांच्या अन्य काव्यावर मराठीत अलिकडे (म्हणजे गेल्या २०-३०झालेल्या) झालेल्या संशोधनपर लेखनाबद्दल कोणी माहिती देऊ शकेल का? 'धार्मिक' किंवा 'अध्यात्मिक' दृष्टीकोनातून चालेल, पण थोड्या अ‍ॅकॅडेमिक, भाषाशास्त्रीय दृष्टीकोनातून असल्यस उत्तम.
(मी या आधी न. र. फाटकांचे पुस्तक वाचले आहे, पण ते आता बरेच जुने झाले.)

धाग्याचा प्रकार निवडा:

मन Thu, 30/01/2014 - 14:59

संशोधन टाइप माहित नाही. ललित म्हणता यावंं असं रवींद्र भटांनी लिहिलय(हे तुम्हालाही माहित असणारच.)
आपल्यापैकी कुणाच्या ते संपर्कात असतील तर त्यांना संपर्क करुन थेट मूळ संशोधनपर पुस्तकं जी त्यांनी रेफर केली होती ती विचारता यावीत एवढ्याचसाठी आठवण करुन देत आहे.
बादवे, त्यांची दोन्ही पुस्तकं आवडली, एक रामदासांवरील होतं; दुसरं होतं "भगीरथ" ह्या रघुवंशातील राजाबद्दल, रामाच्या पूर्वजाबद्दल. दोन्ही एकदा तरी वाचावीत अशी आहेत.

मन Thu, 30/01/2014 - 16:40

In reply to by ऋषिकेश

ललितच आहे.
त्यामुळेच डाय्रेक भटांचं पुस्तक सुचवलं नाही.

म्हणून तर मी म्हणतोय :-
त्यांना संपर्क करुन थेट मूळ संशोधनपर पुस्तकं जी त्यांनी रेफर केली होती ती विचारता यावीत
.
.
भटांनी लिहिलेलं पुस्तक पहा असं म्हणत नाहीये. पण भटांनी जे रेफर केलं आहे, ते पहावं.
उदा :- "पानिपत" कादंबरी विश्वास पाटलांनी लिहिली. "पानिपत" रेफर करु नका.
पण पानिपत लिहिण्यासाथी जर पाटलांनी ग्रँट डफ किम्वा सरदार कुळांच्या उत्कर्ष व इतिहासाचे धागेदोरे शोधत थेट "सभासदाची बखर " वाचली असेलच.
तर असलं काहीतरी संदर्भमूल्य असलेल्या वस्तूंची नावं मिळवा असं मी म्हणतोय.
उदा :-
मला उद्या " आग्र्याहून सुटकेपूर्वीची एक रात्र " ह्या नावाची एक एकांकिका लिहायची आहे. तर मी काही ती हवेतून लिहिणार नाही.
ह्या बखरी, पत्रे वगैरे वाचूनच मला ते लिहावे लागणार.
लोकांना मी कशाकशाचा संदर्भ घेतला आहे, ते मी सांगू शकणार.
उदा :- पोर्तुगीज, मुघल, ब्रिटिश व मराठे व तत्कालीन पत्रसंग्रह, आज्ञापत्रे व आख्खा दप्तरखाना.

मी Thu, 30/01/2014 - 17:51

माझ्यामते न.र.फाटकांएवढं समर्थ चरित्राचे रॅशनलायझेशन दुसरं कोणी केल्याचं स्मरणात नाही, त्याला पुर्णपणे संशोधन कितपत म्हणता येईल ह्याबद्दल साशंक आहे.

तुर्तास नविन एखादे नाव लक्षात नाही, पण जरा भांडारात बघून हाच धागा उद्या/परवात अपडेट करतो.

सन्जोप राव Thu, 30/01/2014 - 18:06

हा एक दुवा मला ठाऊक आहे. किती उपयुक्त आहे याची कल्पना नाही

विवेक पटाईत Thu, 30/01/2014 - 19:24

समर्थ रामदासांवर प्रा. रमेश देशपांडे यांचे पुस्तक आहे 'समर्थ रामदासांची व्यवस्थापन दृष्टी" पुण्यात पुस्तक उपलब्ध असू शकते. यात नियोजन संकल्पना, संघटन कौशल्य, सुसंवाद, मानवी मनाचा विचार, माणूस घडविणे, कर्मचारी व्यवस्थापन ,प्रशिक्षण, नेतृत्व इत्यादी विषयांवर समर्थांचे विचार आहेत.

विवेक पटाईत Thu, 30/01/2014 - 19:25

समर्थ रामदासांवर प्रा. रमेश देशपांडे यांचे पुस्तक आहे 'समर्थ रामदासांची व्यवस्थापन दृष्टी" पुण्यात पुस्तक उपलब्ध असू शकते. यात नियोजन संकल्पना, संघटन कौशल्य, सुसंवाद, मानवी मनाचा विचार, माणूस घडविणे, कर्मचारी व्यवस्थापन ,प्रशिक्षण, नेतृत्व इत्यादी विषयांवर समर्थांचे विचार आहेत.

रोचना Fri, 31/01/2014 - 08:51

सर्वांचे आभार - रमेश देशपांड्यांच्या पुस्तकात समर्थ रामदास हे मॅनेजमेंट गुरू झाले आहेत असे दिसते!
वेबसाइट चांगलीच व्यापक आहे, तिथेही शोधून पाहते.
एकूण समर्थांच्या वाङ्मयाच्या भाषाशैलीवर, काव्यरचनेवर काही चिकित्सक लेखन आढळल्यास या धाग्यात प्लीज कळवणे!