..वर्क फ्रॉम होम..
वर्क फ्रॉम होम मी ..
सुटीच्या दिवशी..
कामाच्या बहाण्याने..
लॅप टॉप वर ..
टाईम पास करत असताना
वर्क फ्रॉम होम ती..
गहु निवडताना..
गव्हात आलेला एक खडा..
माझ्याकडे..
तिरपा कटाक्ष टाकुन..
तिने असा काही फेकला कि..
कि.. मी लगोलग..
खुर्ची टेबल सोडुन..
तिच्यासमोर फतकल मारुन..
मटर सोलु लागलो..!!
समटाईम्स..
अॅक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स...
है सौ(!) टक्का खरे आहे..
एकदम पटेश..
+योगेशु
विवाहसंस्था?
माझी एक मैत्रीण हल्लीच पहिल्यांदा एकटी राहायला लागली. अमेरिकेत २७-२८ वर्षांची व्यक्ती आतापर्यंत एकटी राहिलेलीच नाही, याचं मला थोडं आश्चर्य वाटलं. पण मीही कधी एकटी राहिलेले नाही, असं माझ्या लक्षात आलं. आमचा दोघींचा माजी बॉसही तिथेच होता, तोही तेच म्हणाला.
"मग, काय म्हणणं पडलं, एकटं राहण्याबद्दल?", असं मी तिला विचारलं. घरची कामं फार पडतात, असं ती म्हणाली.
विवाहसंस्थेबद्दल काहीही मत असेल, पण कुणाबरोबर राहिलं की घरकामं निम्मीच करावी लागतात. मी स्वयंपाक करते, जेवते आणि तंगड्या पसरून लॅपटॉप उघडते. मी केलेला पसारा, ओटा आणि गॅसवर सांडलेलं अन्न वगैरे गोष्टी साफ होतात, किंवा मी त्याकडे दुर्लक्ष करते.
माजी बॉस त्यांच्या घरचा स्वयंपाकी आहे. त्यानंही मान्य केलं की सज्ञान व्यक्तीबरोबर राहिलं की घरकामं निम्मीच करावी लागतात.
भारतीय पुरुष कधी सज्ञान होणार कोण जाणे! किमान आपण सज्ञान नाही, याची जाहिरात करण्यापेक्षा लाज वाटून घेतली तरी चिकार!
.
भारतीय पुरुष कधी सज्ञान होणार कोण जाणे! किमान आपण सज्ञान नाही, याची जाहिरात करण्यापेक्षा लाज वाटून घेतली तरी चिकार!
ज्या दिवशी यातली एखादी जरी गोष्ट घडेल, त्या दिवशी हिंदू संस्कृती बुडेल.
परंतु, याला दुसरीही एक बाजू आहे. (सगळ्याच हिंदू स्त्रियांबद्दल हे विधान नक्कीच करणार नाही मी, याला सन्माननीय अपवाददेखील आजकाल ‘अपवाद’ म्हणण्याइतकेही कमी नसावेत, परंतु तरीही,) There is a large class of Hindu women (viz., non-working middle-to-upper-middle-class Hindu women) who thrive in exactly that sort of an arrangement. नवऱ्याने एकट्याने भरपूर पैसे कमावून आणावेत, नि यांनी घरी बसून फार फार तर स्वयंपाक करावा, नि फावल्या वेळात टीव्हीवर टुकार सीरियल्स पाहाव्यात, गावभर हिंडावे, कुचाळक्या कराव्यात, ही हिंदू बायकांची कॅटेगरी दुर्दैवाने अद्याप नामशेष झालेली नाही. या सहसा तशा शिकलेल्याबिकलेल्या असतात, परंतु नोकरीबिकरी करण्यात यांना काडीचाही रस नसतो. आणि, स्त्रीपुरुषसमानता वगैरे भानगडींशी यांना काहीही घेणेदेणे नसते; किंबहुना, समानता यांना नकोच असते, कारण मग नवऱ्यावर सगळ्या जबाबदाऱ्या टाकून नवऱ्याच्या जिवावर खुशाल जगता येते. दुर्दैवाने, असलेही नमुने पाहण्यात आहेत. (महाराष्ट्रीय समाजात सुदैवाने यांचे प्रमाण त्या मानाने कमी असावे, परंतु, व्यापक हिंदू समाजात ही जमात तितकीही लहान नसावी.)
असो चालायचेच.
+/-
मी पाहिलेल्या अशा प्रकारच्या मराठी बायकांमध्ये खालील प्रकार आहेत:
१. स्थळ बघतानाच मुलाची आई ठणकावून सांगते की आमची सून नोकरी करणार नाही. किंवा मूल होईपर्यंत काय करायची ती नोकरी करा. मुलगी आयटी कॉर्पोरेट वगैरेमधली असली तर मूल झाल्यानंतर तिचं आयुष्य कोणत्याही मदतीविना अशक्य करून टाकायचं. (पाळणाघरात मूल ठेवणाऱ्या बायकांना विशेष क्रूर मानले जाते)
२. काही तरुण मुलींना त्यांच्या आयाच चांगला नवरा पटकावून घरी बसायला शिकवतात. शेवटी जर स्त्री पुरुषसत्तेची वाहक असेल तरीही ती पुरुषसत्ताच म्हणायला हवी (जरी घरात सत्ता स्त्रीची चालत असली तरी!)
३. काही बायकांना "नोकरी करावी लागते" (म्हणजे त्यांच्या पगारावर घरचे हफ्ते वगैरे अवलंबून असतात). त्यामुळे याही मनातून पुरुषसत्तेच्या वाहकच असतात. आणि घरची परिस्थिती बरी झाली की नोकरी सोडतात.
४. काही स्त्रियांना आपल्या बँकेत आपले हक्काचे पैसे हवे असं मनापासून वाटत असतं. त्या अगदी २० हजार रुपयांपासून ते लाखो रुपये असं काहीही कमावतात. पण यातल्या बऱ्याच घरातली कामं वाटून देत नाहीत. त्यांना माहेरी किंवा सासरी तशी शिकवण मिळालेली असते. काही कामवाल्या लावतात (पण त्यातही घरातल्या कामाचा भार बाहेरून येणाऱ्या बाईवरच टाकला जातो! पुरुष बसून राहतो). शिवाय मूल आजारी असेल तर बाईने सुट्टी घ्यायची हे ठरलेलं
५. काही बायका लग्न आणि मूल करायच्या फंदातच पडत नाहीत. आणि छान जगतात.
अजून लग्न न करता मुलं जन्माला घालायची प्रथा (कोणतीही कटकट न होता) समाजमान्य नसल्याने माझ्यासारख्या बायकांची वर्गवारी करता येत नाही. पण लग्नाच्या अकराव्या वर्षात पदार्पण करताना असं वाटतं की नवरा सोबत असणं छान आहे. एकटं असण्यापेक्षा हे अधिक बरं आहे.
या सगळ्या निरीक्षणामुळे मी एखाद्या कुटुंबात वरवर काय दिसतं त्यावरून मत बनवत नाही. कारण सगळ्या स्त्रिया स्त्रीमुक्तीच्या वेगवेगळ्या पायऱ्यांवर असतात.
तरीही १०० वर्षांपूर्वी कर्व्यांनी जे लिहून ठेवलं आहे त्यावर माझी दृढ श्रद्धा आहे. की काहीही असलं तरी लग्न हे स्त्रीच्या उदरनिर्वाहाचं साधन असू नये. कारण कितीही श्रीमंत घरात कितीही लोळून दिवस काढले तरी तिच्या बुद्धीचं, सर्जनशीलतेचं मोल तिला मिळेलच असं नाही.

त्यामध्ये एक nuance असा आहे की माझ्या आईच्या पिढीने (ज्या ७० ते ८० या काळात नोकऱ्या करू लागल्या) डबल ड्युटी केली. कारण तेव्हा नोकरी करायची असेल तर घरचं सगळं चुपचाप करावं लागेल असं एक ओझं असायचं. कारण घरी कुठे कमी पडलं तर सगळं कुटुंब मिळून नोकरीवर गदा आणेल ही भीती. त्यामुळे माझ्या पिढीतल्या अनेक मुली उलटी बंडखोरी करू लागल्या. मी दोन्ही ठिकाणी काम करणार नाही. म्हणून मी घरीच बसते. हे एक. आणि अलीकडे जगभरातच परंपरावाद पुन्हा रुजू लागला आहे. अगदी इंस्टाग्रामसारखी संकेतस्थळं देखील #tradwife ने भरलेली असतात. हळदी कुंकू जोमाने होऊ लागली आहेत (आज आमच्या सोसायटीत आठ जणी एकत्र येऊन हळदी कुंकू करत आहेत. मला "तुम्ही कधीच येत नाही. नक्की या (नाहीतर बघा!) अशी धमकीवजा आमंत्रणं आली आहेत. वटसावित्रीला एकदा आमच्या ऑफिसमधली एक मुलगी नऊवारी नेसून, नथ आणि त्यावर लॅबकोट घालून काम करताना दिसली तेव्हा मला फक्त घेरी यायची बाकी होती.
कधीतरी मी रत्ना पाठकची एक मुलाखत बघितली होती. ती म्हणाली की ७० आणि ८० च्या दशकात भारतात स्त्री सबलीकरणासाठी जे काही प्रयत्न झाले आणि जी प्रगती झाली त्या तुलनेत आता आपण मागे मागे जाऊ लागलो आहोत. यामध्ये टीव्हीवरील मागासलेल्या सासू सुनेच्या मालिकांपासून ते आता जे उघडच संस्कृतीचं स्तोम माजवलं जातं आहे ते सगळं आहे.
+१
गेली बरीच वर्षं मी अमेरिकेतच आहे, त्यामुळे अमेरिकेत दिसणाऱ्या भारतीय स्त्रियांच्या काही कॅटेगऱ्या:
१. आपण आपल्या संस्कृतीपासून तुटलेलो आहोत, आणि अमेरिकेला काही संस्कृतीच नाही; यांमुळे परंपरा जपण्याचा आटोकाट प्रयत्न करणे. यातला मला कधीही न समजलेला भाग म्हणजे गणपतीच्या काळात नौवार-नटणं. तेव्हा इथे भीषण उन्हाळा असतो. दिवसाचं तापमान ३६-३८ सेल्सियसपर्यंत जातं आणि ह्या बायका गर्भरेशमी साड्या नेसून, दागिने घालून गरमगरम मोदक बनवून, त्यांवर तूप घालून खातात.
मागे एका वर्षी मी अशी आमंत्रणं आल्यावर "मला अगोराफोबिया आहे, त्यामुळे मी येऊ शकणार नाही", असं अगदी विनम्रपणे कळवलं होतं.
२. स्वयंपाकघर हे आपलंच राज्य आहे आणि ते मायक्रोमॅनेज केल्याशिवाय पर्यायच नाही, असं मानणाऱ्या स्त्रिया.
सुरुवातीला मलाही त्रास झाला बऱ्या अर्ध्याला भांडी घासताना बघून. मी ते बघणंच बंद केलं. भांडी स्वच्छ असतात ना, आणि ती वेळेत स्वच्छ होतात ना; मग घालायचा तो घोळ घाल! घरात पसारा पडलेला असतो; मी त्याकडे दुर्लक्ष करते.
मागे बाबांचे एक मित्र आले होते; काका-काकू दोघंही होते. काकांना मी म्हणाले, "तुमचा जावई तुमच्या मुलीशी जसा वागायला पाहिजे, तसे तुम्ही काकूशी वागता का?" आणि काकूलाही म्हणाले, "काकांनी आता पीएचडीसुद्धा केली आहे. ज्यांना पीएचडी करता येते, त्यांना चहा किती गरम-गार पाहिजे हे समजतं आणि मायक्रोवेेव्हही वापरता येतो. तुम्ही दुर्लक्ष करायला शिका." त्यांचं वर्तन किती बदललं माहीत नाही; पण किमान त्यांना हे पटलं तरी.
या सगळ्या स्त्रिया आपल्या आधीच्या पिढीपेक्षा जरा अधिक स्वतंत्र असतील, हे मला मान्य आहे. मात्र ...
इथे कुठल्या भारतीय स्त्रियांबरोबर माझं जुळेल याबद्दल माझी सोपी चाचणी आहे - हवा छान असण्याच्या दिवसांत गुडघे उघडे टाकणारी बाई असेल तर ती आपली मानावी.
.
अवांतर...
कविता वाचन करणारा कुणी चांगला असेल तर कविता ऐकायला आवडतात. एडगर अॅलन पो ची रेव्हन ही कविता विकीपेजवर ऐकली. https://en.wikipedia.org/wiki/The_Raven त्यात एक नाद आहे. पार्श्व ध्वनी मध्ये ढगांच्या गडगडाटीचे आवाज, शेवटला कावळा उडून गेल्याचा आवाज खूप मस्त जमला आहे.
रेव्हनवर बेतलेली केशवसूतांची घुबड इथे (९३ वी कविता.. पान नं. १६३). https://sahitya.marathi.gov.in/scans/Keshavsutanchya%20kavita.pdf
आवडले.
आवडले.