Skip to main content

कोजागरी पौर्णिमा

कोजागरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा . शारद ऋतूची सुरुवात झालेली असते, थंडीची चाहूल लागलेली असते. हवेमध्ये उष्मा नसतो आणि हवा फार थंडही नसते, एकंदरीत हवामान आल्हाददायक असते. आणि अशा ऋतूमधील पौर्णिमा म्हणजे पर्वणीच. पूर्णचंद्राच्या साक्षीने प्रियजनांच्या सोबतीमध्ये काही आनंदाचे क्षण व्यतीत करण्यासाठी कोजागरी पौर्णिमेचे निमित्त मिळते.

कोजागरी पौर्णिमा सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करीत असतात आणि त्यात दोन एकसमा न मुख्य घटक असतात -- एक म्हणजे रात्री उशीरापर्यंत नातेवाईक आणि मित्रमंडळीच्या समवेत जागरण आणि आटीव, सुमधुर केशरी दूध. कोजागरीसाठीचे हे खास दूध करण्याच्या पद्धती वेगळ्या असतील, आजकाल दुधाचा मसाला बाजारात देखील उपलब्ध असतो. चंद्रप्रकाशामध्ये केशरी दुधाची गोडी काही न्यारीच असते.

कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीतलावर विहार करण्याकरता आलेली असते. संचार करीत असताना ती विचारते "को ss जागर्ति?" म्हणजे (रात्रीच्या या प्रहरी) कोण जागृत आहे? आणि जे कोणी जागृत असतील त्यांना लक्ष्मीचा कृपाप्रसाद प्राप्तं होतो. आजच्या पौणिमेला सर्वांच्या मस्तकी लक्ष्मीचा वरदहस्त राहो ही शुभकामना!

https://www.youtube.com/watch?v=cH41SALHX_k

आवड/नावड

अहिरावण Fri, 10/10/2025 - 14:10

>>>>कोजागरी पौर्णिमा सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करीत असतात आणि त्यात दोन एकसमा न मुख्य घटक असतात -- एक म्हणजे रात्री उशीरापर्यंत नातेवाईक आणि मित्रमंडळीच्या समवेत जागरण आणि आटीव, सुमधुर केशरी दूध.

छे हो !! ती ब्राह्मणांची पद्धत.

आम्ही दारु पितो.....

मारवा Fri, 10/10/2025 - 15:54

सतत फिरवत राहण्याची मेहनत तर आहेच
पण महत्वाचा घटक केशर हा आहे.
जैन लोकांच्या मंदिरात सर्वोत्कृष्ट केशर वापरात येत असते. त्यांच्या मंदिराच्या सप्लायर कडून घ्यावी.
Everest चा पाकिटातला मसाला पण छान असतो
मराठवाड्याच्या शहरात "केशरी पारा" नावाचा प्रकार मिळतो. तो म्हणजे हेच आटवलेल दूध असतो. पण बराच वेळ आटवल्याने भारी लागतो चवीला.