Skip to main content

पिकनिक

एकोणिसाव्या शतकातील न्यू गिनीमधील एक किस्सा:

काही मित्र पिकनिकची तयारी करत होते.

अगोलाव्हे म्हणाला, "मी चकमकीचा दगड, आणि मांस धुरावायची सामुग्री आणीन."
बारूनोमा म्हणाला, "मी यॅम नावाचे कंद आणीन."
पिंकेटा म्हणाला, "मी कोंबड्या आणीन."
लोवाई म्हणाला, "मी अननस आणि पाॅपाॅ फळे आणीन."

सगळे ऊलालीनकडे पाहू लागले.

ऊलालीन म्हणाला, "अगोलाव्हे, तू चकमकीचा दगड, आणि मांस धुरावायची सामुग्री नक्की आणशील?"
अगोलाव्हे म्हणाला, "अलबत!"

ऊलालीन म्हणाला, "बारूनोमा, तू यॅम नावाचे कंद नक्की आणशील?"
बारूनोमा म्हणाला, "नि:संशय!"

ऊलालीन म्हणाला, "पिंकेटा, तू कोंबड्या नक्की आणशील?"
पिंकेटा म्हणाला, "निःसंदेह!"

ऊलालीन म्हणाला, "लोवाई, तू अननस आणि पाॅपाॅ फळे नक्की आणशील?"
लोवाई म्हणाला, "शपथेवर सांगतो."

ऊलालीन म्हणाला, "छान! मग मी माझा चुलतभाऊ गसोवे याला पिकनिकला घेऊन येतो."

आता यावर काय बोलणार?

पिकनिक छान साजरी झाली. अंगतपंगत करून, गप्पा मारत, मित्रांनी यॅम नावाचे कंद, कोंबड्या, गसोवे, अननस आणि पाॅपाॅ फळे यांचा फन्ना उडवला.

Node read time
1 minute

ललित लेखनाचा प्रकार

1 minute

अबापट Tue, 27/11/2018 - 06:45

राजाध्यक्ष मोकाट सुटू शकतात असा संशय त्यांच्याशी बोलताना येत नाही. एकदम सभ्य आणि स्कॉलर वाटतात .पण उत्तम . असेच मोकाटा हो देवदत्त !!!
( धनंजय, धनुष ,अमुकराव वगैरे विद्वान मंडळीसुधा कधीतरी कदाचित मोकाटू शकतील अशी आशा निर्माण होते यांच्यामुळे)

तिरशिंगराव Tue, 27/11/2018 - 16:31

खूपच आवडलं! अशाच धक्का कथा लिहा ! अरेबियन नाईटस मधल्या ,'पक्ष्यांच्या जिभांची भाजी' आठवली.

'न'वी बाजू Tue, 27/11/2018 - 18:23

In reply to by तिरशिंगराव

अशाच धक्का कथा लिहा !

'धक्का कथा लिहा' या भागाशी सहमत. 'अशाच'बद्दल... वेल...

...प्रॉब्लेम इज़, या कथेत धक्का काहीही नव्हता. किंबहुना, शेवटी असेच काही घडेल, याची जबरदस्त शंका/कुणकूण/काहीशी अपेक्षासुद्धा होती. (विशेषतः, ते एकोणिसावे शतक, न्यू गिनी वगैरे वाचून.)

विच ब्रिंग्ज़ मी टू अनदर पॉइंट. हे एका प्रकारे त्या लोकांचे कल्चरल डेनिग्रेशन नव्हे काय? भले त्या लोकांत तेव्हा (किंवा कदाचित अजूनही) तशा (बोले तो कॅनिबलिष्टिक) प्रॅक्टिसेस असतीलही. पण म्हणून? आपण - अॅज़ औटसैडर्स - त्यांची खिल्ली उडविणारे कोण? भलेही माझे स्वतःचेसुद्धा या गोष्टीने माफक रंजन झाले असेल - आय स्टँड गिल्टी, अॅज चार्ज्ड - परंतु तरीही?

(मग आपल्यात आणि व्हाइट-मॅन्स-बर्डनछाप युरोपियनांत फरक काय राहिला?)

'न'वी बाजू Fri, 10/01/2025 - 02:55

(धागा वर आणण्याकरिता तथा जुने प्रतिसाद दृश्य करण्याकरिता.)