छायाचित्रण पाक्षिक आव्हान ३६ : इमारती
बरेच दिवस झाले म्हणून आता छायाचित्रण स्पर्धा परत सुरू करत आहे.
या वेळचा विषय आहे "इमारत/इमारती". सर्वांना सहज शक्य आहे असा सोप्पा विषय देत आहे. यात शक्यतो इमारत हा मूळ उद्देश हवा आहे, आयफेल टॉवरसमोर उभे राहून काढलेला फॅमिलीचा फोटो अपेक्षित नाही. अगदी भव्यदिव्य पाहिजे असे काही नाही,एखाद्या चाळीचे छायाचित्र पण चालेल, एखाद्या इमारतीचा रोचक भाग पण चालेल. अनेक इमारती पण चालतील, पण हेतू आहे की लक्ष इमारतीकडे जायला हवे.
तर सुरुवात करा मंडळी.
अनेक वेळा कच्चे फोटो हे काहीसे धूसर आणि रंगांनी कमी संपृक्त असतात. गिंप, पिकासासारख्या चित्रसंस्करण प्रणाली वापरून छायाप्रकाशभेद, रंगप्रमाण बदलून तर चित्र खुलविता येतील. तसेच योग्य प्रमाणात कातरल्याने मांडणीही संतुलित आणि आकर्षक होऊ शकते. कृपया या वेळच्या स्पर्धेसाठी शक्यतो तसे करू नये. कातरकाम ठीक आहे, पण संस्करण जर केले तर केलेले संस्करण नमूद करावे.
स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:
१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही. स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी धरले जाणार नाही.
२. एका सदस्याला जास्तीत जास्त ३ चित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करता येतील. जर/जी छायाचित्रे स्पर्धेसाठी नसतील तर प्रतिसादात ठळकपणे तसे नमूद करावे.
३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परिक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व निरीक्षक असे चालू राहील.)
४. आज सुरू होणार्या स्पर्धेचा शेवट २४ मार्च ५ एप्रिल रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल. २५ मार्च ६ एप्रिल रोजी निकाल घोषित होईल व विजेती व्यक्ती पुढील विषय देईल.
५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिपण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. अर्थात तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त, निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.
६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठराविकच निकष लावावेत असे बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाची व्यक्ती आव्हान देईल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले, तरी अपेक्षा जरूर आहे.
७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच विजेता/विजेती घोषित करणे बंधनकारक आहे.
८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.
९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.
१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.
----------
सूचना : 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर आपली चित्रे कशी प्रदर्शित करावीत, याबद्दल अधिक मार्गदर्शन या धाग्यावर आहे. त्याचा लाभ घ्यावा.
स्पर्धा का इतर?
उत्तम काम
उत्तम काम केलंत. लवकरच फोटो काढते आणि/किंवा इथे चढवते.
---
चित्रे या संकेतस्थळावर टाकताना, जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर ते फोटो इंटरनेट एक्सप्लोरर् (९) वर दिसत नाहीत. (पण फायरफॉक्सवर दिसतात.) यावर उपाय म्हणजे Width आणि Height दोन्ही रोमन अंकांमध्ये द्यावेत किंवा त्यांचा उल्लेखच इमेज टॅगमधून वगळावा. कृपया याची नोंद घ्यावी.
आता ही अडचण दूर केलेली आहे. Width, Height पैकी एकच टॅग वापरा. दोन्ही वापरायचे असतील तर एकतर गणित करून लांबी-रुंदीचं प्रमाण बदलणार नाही याची काळजी घ्यावी लागेल, किंवा फोटो एका दिशेला खेचलेला दिसेल. आता Width आणि Height पैकी जो टॅग वापराल तेवढाच कोड प्रतिसादात उमटेल आणि इंटरनेट एक्सप्लोररची अडचण येणार नाही.
कृपया या वेळच्या स्पर्धेसाठी
कृपया या वेळच्या स्पर्धेसाठी तसे करू नये. कातरकाम ठीक आहे, पण संस्करण जर केले तर केलेले संस्करण नमूद करावे.
संस्करणाला आक्षेप का ते कळलं नाही. तसंही कॅमेऱ्याने फोटो काढणं यात मोठ्या प्रमाणावर आंतर्गत संस्करण होतंच. जेव्हा आपण कॅमेऱ्यात एखादा मोड निवडतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या संस्करणातला एक पर्याय निवडतो. ते चालेल पण नंतर स्पर्धकाने केलेलं संस्करण चालणार नाही असं का?
ग्रे अँड ब्ल्यू

Link (पूर्ण फोटो दिसण्यासाठी) http://i.imgur.com/iCc9uj3.jpg
स्मार्टफोन ने काढलेला, १२ mp, unedited.
निकाल
कालावधी वाढवूनपण म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून जरा वाईट वाटले.
काही वैयक्तिक मते:
सखी यांच्या फोटोत झाड घेतले नसते तर फोटो चांगला आला असता, असे वाटले. लक्ष झाडामुळे विचलित होते असे वाटले. तसंच काहीसं धनंजय यांच्या फोटोत पण वाटले. लक्ष सर्वप्रथम डाव्या खिडकीकडे जाते असे वाटले. (खिडकीतून येणारा प्रकाश डावीकडे जात आहे, म्हणून कदाचित तसे वाटले असेल).
माऊली कृपा आणि चेंदणी कोळीवाडा ही चित्रे रोचक वाटली, पण अदितीने पूर्वी प्रकाशित केलेल्या बॉस्टनमधील (?) इमारतीसारखी आकर्षक वाटली नाहीत.
शिवाजी विद्यापीठ , कोल्हापूर मध्ये काँपोजिशन जरा वेगळे हवे होते, फोटोत पुढील मैदान्/मोकळा भाग कमी हवा होता असे वाटले.
बोका यांचा फोटो आवडला. नदीच्या पात्रातून कथीड्रल, लंडन यामधील काँपोजिशन आवडले, पण इमारत खूप छोटी वाटली आणि आकाश आणि वळणदार रस्ता मोठे वाटले.
माउंट वॉशिंग्टन हॉटेलमधील पांढरा आणि लाल या रंगांचा काँट्रास्ट छान दिसतोय, पण इमारतीच्या दोन्ही टोकांना दिसणार्या झाडांमुळे विरस झाला.
३ रा क्रमांक:
सिद्धि यांचा किल्ले शिवनेरी
२ रा क्रमांक:
अनु राव यांचा फोटो: क्रॉप करायला हवा होता.
१ ला क्रमांकः
प्रणव यांचा ग्रे अँड ब्ल्यू: उभ्या-आडव्या, काटकोनातल्या रेषांचा संगम चांगला जमला आहे, इमारतीची भव्यता लगेच नजरेत भरते.
मला अचरट यांचा पहिला फोटो आवडला. यात इमारत, त्यावरील कोरीवकाम, सूर्याची किरणे असा सुंदर मिलाप झाला आहे, पण त्यांनी फोटो स्पर्धेसाठी नाही असे म्हटले आहे, म्हणून त्याला १ ला क्रमा़ंक दिला नाही.









वा छान विषय आहे.. टाकतो फोटोज
वा छान विषय आहे.. टाकतो फोटोज