'ऐसीला विचारा ' : घरगुती व जनरल प्रश्न - भाग २
मागच्या पाच्-सात महिन्यांत कधीतरी सकाळ चे रविवारचे सप्तरंग (किंवा कदाचित लोकसत्ताचे चतुरंग सुद्धा असावे; नक्की आठवत नाहिये) वाचत असताना एका समाजाबद्दल वाचलं होतं.
हे लोक धार्मिक ख्रिश्चन आहेत. कल्ट म्हणता यावी अशी त्यांची जीवनशैली आहे. दीड दोन शतकांपूर्वी ते अमेरिकेत आले. बहुतेक जर्मनी-स्वित्झर्लंड ह्या भागातून ते आले असावेत.
प्रथम त्यांची नोंदणी केली गेली तेव्हा केवळ पाच हजार असतील १९०५च्या आसपास . आता त्यांची संख्या तीन-साडे तीन लाखांच्या पुढे गेली आहे.
त्यांची जीवनशैली वैशिष्ठ्यपूर्ण आहे. ते संततिनियमन वापरत नाहित. मोठ्या शहराम्त ते रहात नसून स्वतःपुरते घोळका करुन राहतात. सामायिक शेतीसारखा प्रकारच म्हणा ना.
म्हणजे त्यांचे स्वतःचे एक जणू स्वतंत्र शहर असते. आधुनिक कोणतीही औषधेही ते वापरत नाहित कारण तर बायबल मध्ये दिलेले नाही.
दाढी वाढवितात. मूर्तीपूजा मानत नाहित. सिमेंटच्या अपार्ट्मेंट्स बांधतही नाहित, त्यात रहातही नाहित.
थोडक्यात अमेरिकेसारख्या आधुनिक , संपन्न ठिकाणी राहूनही ह्यांची जीवनशैली ह्यांनी कटाक्षाने पारंपरिक अशीच जपलेली आहे.
तेव्हा लेख भलताच घाईघाईत चाळल्याने त्या समूहाचे नाव आणि अधिक तपशील आत्ता आठवत नाहित.
इथे अमेरिकेत वास्तव्य असणार्यांची संख्या बरीच आहे आणि इतर सभासदही बहुश्रुत असल्याने माहिती मिळण्याची शक्यता वाटली.
कुणी तपशील देइल का प्लीझ?
--मनोबा
डेलावेअर जवळ लँकॅस्टर भागात
डेलावेअर जवळ लँकॅस्टर भागात अमिश लोकांची वस्ती आहे. हे लोक काळे/गडद नीळे कपडे घालतात. बायका डोक्यावर "बॉनेट" आदि परीधान करतात. त्यांची गुटगुटीत, गोरीपान मुलं खेळगाड्यांवर खेळताना पहायला फार मजा वाटायची. एकदा एक नवपरीणीत जोडपे गोडागाडीतून रपेटला जाताना पाहीले होते. गाई, लामा, बकर्या वगैरे पाळीव प्राणीही तिथे खूप दिसायचे. रात्री अंधारात घोडागाडी दिसत नाही म्हणून घोडागाडीला "रिफ्लेक्टर्स" लावलेले असायचे. एकंदर समाजात कधी कोणी "जाडे (ओबीस/ओव्हरवेट)" कोणी आढळले नाही बुवा. सर्व श्रमाची कामे स्वतः करत असल्याने का कायकी कोण जाणे.
त्यांनी विणलेल्या व लाकडापासून बनविलेल्या वस्तू खूप सुंदर होत्या, विशेषतः क्विल्ट्स (गोधड्या). त्यांचे पाय वगैरे गोड पदार्थ, घरी केलेली रूट बीअर (हा प्रकार बीअर म्हणून प्रसिद्ध असला तरी त्यात मद्यार्क (अल्कोहोल) नसते)खाल्ले आहेत.
(अवांतर) रूट बियरबद्दल
घरी केलेली रूट बीअर (हा प्रकार बीअर म्हणून प्रसिद्ध असला तरी त्यात मद्यार्क (अल्कोहोल) नसते)
या प्रकाराचा वस्तुतः बियरशी काहीही संबंध नसतो. तरी त्यास रूट 'बियर' का म्हणतात, देव जाणे.
चवीस साधारणतः माउथवॉश प्यायल्यासारखा लागतो. लहान मुलांना खूप आवडतो, अशी किंवदंता आहे, परंतु तीत बहुधा फारसे तथ्य नसावे.
(कदाचित, मुलांनी बियरचा हट्ट केल्यास त्यांस 'बियर' म्हणून खपवून द्यायचे (अश्वत्थामीय?) पेय, म्हणून तर यास रूट 'बियर' म्हणत नसावेत ना, अशी कोणाही विचार करणा(रा म्हणवणा)र्या माणसास शंका यावी.)
मेननाइट, आमिश. मॉर्मन इ.
१५व्या-१६व्या शतकात कॅल्विनिझम-प्रॉटेस्टंटिझम चा उदय झाला त्याच काळात ख्रिश्चन धर्माच्या मूळ उगमाकडे जाऊ पहाणारे अनेक उपपंथ युरोप-रशियामध्ये निर्माण झाले. ह्या सर्व विषयाचा आवाका खूप मोठा असून मला त्याबद्दल केवळ वरवरचीच माहिती आहे.
हेच पंथ जगभर पसरले आणि वेगवेगळ्या देशांमधून त्यांचे आपापल्या पंथांना धरून राहणारे छोटे समुदाय अजूनहि दिसतात. मेननाइट हा असाच एक पंथ. ह्याच्या पंथाचे आणि त्याच्या शाखोपशाखांचे समुदाय अमेरिका-कॅनडामध्ये बर्याच जागी आहेत. आमिश हा मेननाइट पंथाचा एक उपभाग. ह्याविषयी अधिक माहिती येथे आणि येथे पहा.
साल्ट लेक सिटीमध्ये प्रमुख केंद्र असलेला मॉर्मनिझम (The Church of Jesus Christ of Latter-day Saints) हा असाच एक पंथ आहे. ह्या पंथाची फुटून निघालेली एक उपशाखा आपल्या बहुपत्नी (polygamy)प्रथेवरील विश्वासामुळे आणि २१व्या शतकातहि ती चालू ठेवण्याच्या आपल्या आग्रहामुळे अलीकडे बरीच प्रकाशझोतात आली आहे. ही उपशाखा अरिझोना आणि यूटाह ह्या राज्यांमध्ये आणि कॅनडाच्या पश्चिमेस ब्रिटिश कोलंबिया प्रांतात आढळते. तिचा प्रमुख वॉरन जेफ्स हा अप्रौढ वयाच्या मुलींबरोबर लैंगिक व्यवहार करण्याच्या आरोपावरून सध्या तुरुंगात आहे.
ह्याशिवाय गावोगावी तंबू उभारून श्रद्धाळू लोकांसमोर प्रवचने करणारे बरेच प्रवचनकार अमेरिकेत जुन्या काळापासून आपापली दुकाने चालवीत असतात. आपल्या आसारामबापू/निर्मलादेवी/रजनीश इत्यादींचे हे अमेरिकन अवतारच. दक्षिणेच्या राज्यांमधील 'बायबल बेल्ट'ची आणि तेथील 'नीग्रो स्पिरिच्युअल्स'ची वेगळीच कथा आहे.
मोर्मोन?
तो लैच भन्नाट प्रकार आहे. लॅटर डे सेंट्स शी संबंधित असावा. पन तो रशियाशी संबंधित वआटत नाही.
इस्राइअलमध्ये क्रूसावर खिळून ठार केल्यावर तीन दिवसांनी ख्रिस्त पुन्हा जिवंत झाला. ही मेनस्ट्रीम ख्रिश्चनांची श्रद्धा आहे.
जिवंत झाल्यावर तो कित्येकांना भेटला आणि नंतर अनंताच्या प्रवासासाठी चालू लागला अशी त्यांची भावना/मान्यत आहे.
लॅटर डे सेंट्स वाले तर त्याही पुढे जाउन म्हणतात की अमेरिका खंडातही येशू प्रकट झाला होता.
आपल्याला कोलंबस अमेरिकेला भेटलेला ठाउक असतो.
त्यापूर्वी व्हायकिंग्स वगैरे मंडळी गेलेली ठाउक असतात.
पण ती क्षुद्र माणसे गटागटाने ,समूहाने आणि विविध साधने,होड्या वगैरे वापरुन गेली होती.
प्रेषिताला मानवत्वाचे काहिच बंधन नसल्याने तो डायरेक "प्रकटला".
आमच्याकडे अश्वत्थामा भेटतो परिक्रमेला तसाच.
अमेरिका दौर्यात 'ओहायो' मधील
अमेरिका दौर्यात 'ओहायो' मधील शेकर्स (Shakers) नामक अशाच एका पंथाच्या कम्युनिटीला भेट दिली होती.
https://www.facebook.com/media/set/?set=a.10151621450149233.1073741826…
चिरंजीवासाठी
माझा चिरंजीव सहा साडेसहा वर्षांचा आहे. (त्याचा सहावा वाढदिवस साजरा केला नाही याची वारंवार जाणिव करून देण्यासाठी तो मी पाचच वर्षांचा आहे असे सांगत असतो.) तो हिंदी/इंग्रजी भाषिक आहे (मराठी येत नाही).
तर प्रश्न असा आहे कि त्याच्यासाठी कोणकोणत्या गमतीजमतीच्या, गाण्यांच्या, गोष्टींच्या, माहितीच्या, खेळांच्या, इ इ सीडीज विकत घ्याव्यात?
कोणती पुस्तके, खेळणी घ्यावीत? कोणते एलेक्ट्रॉनिक उपकरण घ्यावे? ह्या सीड्या आणि पुस्तके कोठून (प्रेफरेबली ऑनलाइन) घ्यावीत?
माझे मतः आधी तुम्ही
माझे मतः
आधी तुम्ही त्याच्यासमोर मराठीत बोलावे. रात्री मराठी पुस्तकांतून गोष्टी वाचुन सांगाव्यात. स्वतः बडबडगीते / गोष्टी / अंगाई वगैरे मराठीत म्हणावे.
मग त्याला बेसिक शब्द ओळख झाल्यावर गाण्याच्या सीडीज/खेळणी/पुस्तके वगैरेचा वापर करता येईल.
शिवाय माधुरी पुरंदर्यांची काही अगदी बेसिक पुस्तके आहेत (जसे चित्रवाचन) वगैरे ज्याच्या योग्य त्या टप्प्यावर लाभ घेण्यास सुचवेन.
अशक्य
अहो, त्याची मातॄभाषा मणिपूरी आहे. शालेय भाषा इंग्रजी. सामान्य भाषा हिंदी. मिंत्रांची भाषा पंजाबी.
बाकी मराठीत लहान मुलांची गाणी (सांग सांग भोलानाथ छाप) त्याला चिकार ऐकवली आहेत तो अगदी लहान असताना. तेव्हा त्याला नको म्हणता यायचं नाही म्हणून ऐकायचा. आता सरळ काही मराठी लावलं तर निघून जातो. शिंगं आली आहेत.
आम्ही तिघे जेव्हा १५ दिवस पुण्यात येतो तेव्हा माझ्या माहेरचे (शब्द्प्रयोग ठिक आहे ना?) सारे लोक हिंदीच बोलतात. माझी आई सुनेशी हिंदी बोलते (आई इतरांशी बोलते तेव्हा 'सासुपुरते' माझ्या बायकोला १००% मराठी कळते ;) ). ईशान्यचे चुलतभाऊही त्याच्याशी हिंदीच बोलतात. तुमचा विश्वास बसणार नाही पण सून पुण्यात आल्यावर आई उत्साहाने शेजार्यांशीपण हिंदीतूनच बोलणे चालू करते ...अन् तुमी मला मराठी बोलायला सांगताय!
खेळणी वगैरे
माझा मुलगाही जवळपास त्याच वयाचा आहे. त्याला खालील दुव्यांवरचे खेळ काही महिन्यांपूर्वी आवडत असत.
http://pbskids.org/lions/videos/
http://pbskids.org/
इथे त्याला वाचता येतील अशा गोष्टी, खेळ इ आहेत
http://www.shenet.org/karigon/k_library/Newpages/Gr_K/K_LA.html
सध्याची आवड रबरबँडचे ब्रेसलेट आणि नेकलेस बनवणे
http://www.michaels.com/Rainbow-Loom-Kit/kd4167,default,pd.html
स्नॅप सर्किटस्
http://www.yoyo.com/p/elenco-snap-circuits-jr-sc-100-129694?site=CA&utm…{keyword}
चिकणमातीची चित्रे, वस्तू इ बनवणे. ही माती ओव्हनमधे भाजली की कडक होते. नुसती वाळवून कडक होणारीही मिळते. उन्हाळ्याच्या सुटीत त्याने माझ्यासाठी मण्यांचे कडे केले होते.:)
http://www.michaels.com/Craft-Smart-Polymer-Clay/gc1542,default,pd.html
वरील तीन दुवे परदेशातील असले तरी भारतात मोठया शहरांतून अशी मिळत असेल असे वाटते. माझ्या लहानपणी कडक न होणारी विचित्र वासाची रंगीत चिकणमाती मिळत असे.
http://arvindguptatoys.com/ इथे सहज घरी बनवता येतील अशी रंजक आणि शैक्षणिक खेळणी आहेत. बरीचशी खेळणी थोड्या मोठया मुलांसाठी असली तरी कितीतरी इशान्यच्या वयाच्या मुलांनाही आवडतील अशी आहेत. ती तयार करताना मुलाचाही थोडाफार सहभाग जमला तर उत्तमच, पण तो नसला तरी अशा खेळण्यांचा एक फार मोठा फायदा आहे- एखादी रोजच्या वापरातली प्लॅस्टिकची बाटली, तार, बॉलपेन रीफिल, यांसारखी गोष्ट तिचा आकार, कशापासून बनली आहे त्याचे गुणधर्म इत्यादींचा विचार करून कितीतरी वेगवेगळ्या प्रकारे वापरता येते. अशा प्रकारे विचार करण्यास शिकवणे हा मुलांच्या बौद्धिक विकासातला खोक्याबाहेर विचार करणे प्रकारचा खूप मोठा टप्पा आहे. विकतची खेळणी सहज परवडत असलेल्या पालकांनीदेखील आवर्जून करून बघावी अशी ही खेळणी आहेत.
'द मॅजिक स्कूलबस'
अतिशय माहितीपूर्ण कार्यक्रम. पण मुलांना अजिबात कंटाळवाणा वाटत नाही. ह्या वयाच्या मुलांना कळतील अशा अनेक वैज्ञानिक संकल्पना आणि माहिती स्कूलबसमधली मुले आणि शिक्षिका ह्याच्या साहसी सफरींमधून उलगडत जातात.
http://www.scholastic.com/magicschoolbus/
http://www.imdb.com/title/tt0108847/
पपेट शो मधून गोष्ट सांगणे आणि मुलाला सांगायला शिकवणे.
ह्या वयाच्या मुलांना दोन ते तीन आवाज काढून गोष्ट सांगता येते. ह्या बाहुल्या विकत आणता येतील किंवा घरीही बनवता येतील. जुने पायमोजे, ब्राउन पेपरची पिशवी, अगदी बोटांवर पेनाने नाक डोळे तोंड काढूनही पपेट बनवता येतात.
http://www.youtube.com/watch?v=R-NmTMum-6I
+१
मुलांच्यात ही 'रबरबँडचे ब्रेसलेट' बनविण्याची आंतरराष्ट्रीय साथ वगैरे आलीय की काय? आमच्या इथल्या स्थानिक दुकांनात त्या रेनबो लूम्सचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे! :-S
या शिवाय सध्या 'केंडामा' या जपानी पारंपारिक खेळण्याची लोकप्रियताही कमालीची वाढली आहे. अलिकडेच झालेल्या सर्वेक्षणाप्रमाणे या वर्षी मुलांचा इलेक्ट्रॉनिक खेळण्यांऐवजी अशा प्रकारच्या खेळण्यांकडे जास्त कल आहे.
माझ्या मुलीला विणकाम वगैरे गोष्टींची आवड आहे त्यामुळे तिला मी लहान मुलांसाठी मिळणार्या विणकामाच्या सुया आणि जाड लोकर आणून दिली आहे आणि ती त्याच्याशी खेळत बसते. इथे पहा. त्या पॅकेजवर मुलीचेच चित्र पाहून मात्र मला भयंकर वैताग आला होता.
याशिवाय मुलांना खरीखुरी पण छोट्या आकाराची बेकिंग वगैरेची साधने आणून दिली तर त्यांना ते आवडते आणि त्यांच्यात स्वयंपाकाची आवड तयार होते असे लक्षात आले आहे.
बीबीसीचे सीबीबीज नावाचे चॅनेल मुलांच्या कार्यक्रमांसाठी फार छान आहे, जाहिराती नाहीत आणि कार्यक्रम मनोरंजक असूनही त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शैक्षणिक असतात. इथे कॅनडात बीबीसी आयप्लेयरचे सदस्यत्व घेतल्यास हे कार्यक्रम टॅब्लेटवर दिसतात, भारतात उपलब्धता आहे की नाही ठाऊक नाही पण ही सोय अमेरिकेत उपलब्ध नाही.
साथच आहे बहुतेक.
साथच आहे बहुतेक. आमच्या शेजारचा एक मुलगा रोज शाळेच्या बसमध्ये बसून रबरबँडचे गोफ विणत असतो.
शिवाय मुलांना खरीखुरी पण छोट्या आकाराची बेकिंग वगैरेची साधने आणून दिली तर त्यांना ते आवडते आणि त्यांच्यात स्वयंपाकाची आवड तयार होते असे लक्षात आले आहे.
अगदी सहमत. पण त्यासाठी लहान साधने हवीतच असे मात्र नाही. उष्णतेशी संबंध येणारी कामे आपण केली तर आपल्या स्वयंपाकघरातही मुलांना खूप काही करता येते.
उदाहरणार्थः
चाळणीतून पिठीसाखर भुरभुरवणे / पीठ चाळणे,
काहीतरी जोरात ढवळून एकत्र करणे,
सोप्या सोर्यातून चकलीचे तुकडे पाडणे,
वड्या/ शंकरपाळे / फळ बोथट सुरीने कापणे,
देखरेखीखाली मिक्सर/ हातात धरायचा मिक्सर, किसणी वापरणे,
वड्या गुंडाळणे
अशा गोष्टी पाच- सात वर्षांच्या मुलांना आवडतात आणि जमूही शकतात. (अर्थात अशा शिक्षणाची दुसरी बाजू म्हणजे सांडलवंड, पसारा, गोष्टी वाया जाणे, बेचव नवा पदार्थ आवडीने खावा लागणे इ चा फार बाऊ करून चालत नाही. )
माझा मुलगा दोन अडीच वर्षांचा असल्यापासून आमच्याबरोबर स्वयंपाकात भाग घेतो. अर्थात त्याच्या लहरीप्रमाणे. सुरुवात आम्ही काय करतो ते बघण्याने झाली. लवकरच मायक्रोवेव्हमध्ये पॉपकॉर्न करता येऊ लागले. थोडा मोठा झाल्यावर पुरी लाटणे आणि चांदणीच्या आकारात कापणे, बिस्किटे (कुकी) भाजायला ठेवताना चमच्याने पिठाचे गोळे टाकणे, गाजर बटाटे सोलणे इत्यादी तो आवडीने करत असे. सध्याची आवड म्हणजे तो केक/ पाव करताना घटक पदार्थ मोजून मिक्सरमध्ये टाकायला मदत करतो. मागे एक- दोनदा त्याने त्याच्या मनाच्याच पाककॄतीने अंडी, साखर, बेकींग पावडर, पीठ, स्ट्रॉबेरी इ. सिरप एकत्रकरून मला भाजायला सांगितले होते.
विणकामावरून आठवले, सोप्या आणि जलद विणकामासाठी 'लहान माग' दुकानात बघितले आहेत. आपल्या विक्षिप्तबै अशाच मागावर कायकाय विणून लोकांना वाटत असतात.
अशा गोष्टी पाच- सात
अशा गोष्टी पाच- सात वर्षांच्या मुलांना आवडतात आणि जमूही शकतात
सहमत आहे.
अवांतरः
याहून लहान वयाच्या दिड-दोन वर्षांच्या, मुलांनाही वेगवेगळ्या कामात सामावून घेतल्याने, वेळ बरा जातो (त्यांचा-आपला दोघांचाही ;) ) असा स्वानुभव आहे. पालेभाजी निवडणे (म्हणजे पाने देठापासून वेगळी करणे), कांदे/बटाटे पिशवीतून टोपलीत भरणे, उकडलेल्या बटाट्यांची साले (बटाटे गार झाल्यावर) काढणे, (व त्यातीलच काही भाग गट्टम करणे ;) ), खणात चपला भरणे ( व त्याआधी प्रत्येक चप्पल घालून बघणे) वगैरे खेळात कितीतरी वेळ जातो
त्या पॅकेजवर मुलीचेच चित्र
त्या पॅकेजवर मुलीचेच चित्र पाहून मात्र मला भयंकर वैताग आला होता.
खरे आहे.
नुसते चित्रच नाही. लोकर आणायला जा, सुया आणायला जा. मी दुकानात शिरलो की आता दुकानदार नाही पण गिर्हाईके हा कुठे इथे "बायकांच्या दुकानात" आलाय अश्या नजरेने बघत असतात. ;) [त्या दुकानात बायकांच्या म्हणाव्यात असे काही मिळत नाही. कसल्या कसल्या टिकल्या, लेसेस, विणकाम, भरतकाम, शिवणकाम वगैरेचे साहित्य मिळते]
आता सवय झालीये त्यामुळे वैताग वगैरे येत नाही, प्रसंगी आलेच तर त्यांचे हसू + कीव येते :P
स्लो कुकर.
मुलांच्यात ही 'रबरबँडचे ब्रेसलेट' बनविण्याची आंतरराष्ट्रीय साथ वगैरे आलीय की काय?
होय. जिथे बघावं तिथे हे लूम्स बोकाळलेत. सगळीकडेच ब्रेसलेट, अंगठ्या आणि केसांना लावायचे बँड्स बनवत असणारी मुलं/मुली दिसत असतात.
आता माझा प्रश्न. सवलतीत मिळत होता, म्हणून नुकताच स्लो कुकर घेतला. त्यात छोले, पावभाजी व मांसाहारी पदार्थ अनेकजण बनवतात असे ऐकले आहे. बासुंदीही कमी कष्टात छान बनते म्हणे. इतरांनी अजून काय काय बनवलं आहे ते जाणून घ्यायला आवडेल.
फक्त वाफ आणायला
मी स्लो कुकर फक्त वाफ आणायलाच वापरला. गाजर, फरसबी, फ्लॉवर व मिनी सोया चंक्स आधी शिजवून + कांदा + गरम मसाला + घट्ट दही यात परतून घेतले होते. वाटाणे शिजवून घेतले नाहीत. साधारण तासभर वाफ आणली.
खालील पाककृती संदर्भासाठी वापरली होती. मात्र तांदूळ ८० ते ९० टक्केच शिजवून घेतले होते. वरील भाज्या पूर्ण शिजवून घेतल्या होत्या.
http://www.yummytummyaarthi.com/2012/04/vegetable-dum-briyani-made-in-o…
धन्यवाद.
तुम्ही दिलेल्या लिंकवर पाककृती दिसली नाही, पण सोया चंक्सची दुसरी एक पाककृती दिसली, त्यावरून अंदाज आला.
स्लो कुकर वारंवार उघडायचा नसतो म्हणे. उघडल्यास हवे असलेले तापमान परत यायला खूप वेळ लागतो. सारखे उघडल्यामुळे तुम्ही बनवलेली बिर्याणी कोरडी झाली असावी काय?
प्रयोग.
करणार! करणार! म्हणून गाजत असलेला स्लो कुकरचा प्रयोग काल केला शेवटी. पहिल्यांदाच वापरत होते, म्हणून सावधगिरी बाळगून राजस्थानी डाळ बनवली. करण्यापूर्वी डाळी ३ तास कोमट पाण्यात वेगगेवळ्या भिजत घातलया होत्या. साधारण ६ तासात डाळ शिजली पण मिळून आली नव्हती. एरवी आपण तेला-तूपात मसाले परततो, तसे न करता आल्याने(संपूर्ण कृती स्लो कुकरमधे केली.) मसाल्यांचा किंचीत कच्चेपणा (मलातरी) खाताना जाणवला. पुढच्या वेळी काही बदल करून बघेन.
स्लो कुकर राजम्यासाठी नाही
स्लो कुकरमध्ये कडधान्ये शिजवू नयेत असे ऐकले आहे. विशेषत: लिमा बीन, राजमा. त्यातील विषारी द्रव्य पूर्णपणे निकामी होण्यासाठी ते उच्च तापमानाला आणि पूर्णपणे शिजावे लागतात. राजमा स्लो कुकरच्या कमी तापमानाला शिजवला तर उलट ते बरेच वाढते म्हणतात. कसे ते माहित नाही. स्लो कुकरमध्ये राजमा शिजवायचा झाल्यास बाहेर शिजवून घेऊन किंवा डबाबंद मिळतो तो वापरावा.
विजेचा दर आणि सब्स्क्रिप्शनचा प्रकार
शहराजाद, रुचि, ऋषिकेश धन्यवाद. शहराजादजींचा प्रतिसाद तर अत्युत्तम आहे.
@नवीबाजू - धन्यवाद.
आता पुढचा प्रश्न
मला कधी कधी विजेच्या बिलासोबत एक नोटीस येते. तुमचा सँक्शन्ड लोड क्ष आहे, तो वाढवून य करून घ्या, नाहीतर प पेनाल्टी लाऊ. नेहमीच नाही, कधी कधी येते. सेंक्शन्ड लोड जास्त असेल तरी विजेचा दर तोच असतो असे वाटते. मग याचा काय फायदा. समजा मी ती धमकी नाही मानली, तर काय होईल?
शिवाय ही सूचना माझ्या उच्च्ग्रहणाबद्दल (पिक कंजंशन व्होल्टेज) आहे कि एकूण मासिक किती एकके घेतली त्याबद्दल?
साधारणपणे कनेक्शन मंजूर
साधारणपणे कनेक्शन मंजूर करताना काही विशिष्ट लोड मंजूर केलेले असते उदा. ३ किलोवॅट. या मंजूर लोडच्या नुसार मीटर बसवलेला असतो. आपण त्यापेक्षा जास्त लोड लावला असेल तर त्या मीटरवर अतिरिक्त भार पडू शकतो. तुम्ही भार वाढवून घेतला की ते बहुधा दुसरा मीटर बसवून देतील.
तुम्ही मंजूर लोडपेक्षा जास्त लोड लावत असाल तर कंपनीचे आर्थिक नुकसान होते. लोड प्रमाणे काही फिक्स्ड चार्जेस असतात तुम्ही कमी भार मंजूर करून घेतलेला असल्याने हा फिक्स्ड चार्ज कमी रेटने लागतो.
म्हणून ते तुम्हाला दंड लावू असे म्हणत असावेत. पूर्वी जे मीटर होते त्यात मॅक्झिमम लोड मोजण्याची सोय नसे. आता नव्या मीटर मध्ये ती सोय असेल तर तुम्ही किती लोड वापरता याची नोंद होत असेल.
आर्थिक फ्रॉड होण्याचा संभाव्य आरोप
आर्थिक फ्रॉड होण्याचा संभाव्य आरोप होण्याचा धोका टाळण्यासाठी सेबी च्या वेबसाइटकडे नुकतीच तक्रार नोंदवली.
माझ्या नावावर कुणीतरी रिलाय्न्स म्युच्युअल फंडात काहीतरी ट्रान्झॅक्शन्/उलाधाल करणयचा प्रयत्न करत आहे असं दिसलं.
रिलायन्सच्या संपर्क अधिकार्यांकडून समाधानकारक उत्तरं मिळाली नाहित.
म्हणून थेट सेबी ला गाठलय.
आमचा पत्रसंवाद खाली देत आहे:-
Hi Team,
Currently I do not hold any account with reliance mutual fund.(I have
closed all my operations with Reliance mutual fund some 3-4 years ago.
I used to have reliance infrastructure fund. But currently it should be
closed or should have Nil balance.)
However, still, I am getting SMS at my mobile number XXXXXXXXXX which has
following text:-
From :customer_care@reliancemutual.com
To :xxxxr@xxxx.co.in
Dear Investor,
We have received your request for transaction however
same has been rejected due to invalid format.
RelianceMF
I have got this SMS on 26th november 2013, 28th november 2013, and today,
that is 3rd december 2013.
I smell something fishy/fraudulent about it. And would like to reassert
that I am doing no transaction with RelianceMF.
Could you please have a look at this on priority?
i am copying my personal mail ID with this mail so that i will be
reachable there as well.
.
.
माझ्या वरील इ मेल ला उत्तर जे आलं ते खालीलप्रमाणे:-
We thank you for writing to Reliance Mutual Fund.
With reference to your email dated 03/12/2013, regarding SMS on your registered mobile number, we request you to confirm us that whether you has used Pull SMS service and used an incorrect syntax due to which you has received the below SMS.
For any further information or assistance please visit our website reliancemutual.com or get in touch with your nearest Investor Service Center. You may also contact us on 022 30301111 or 1800-300-11111 or write to us at customer_care@reliancemutual.com.
.
.
त्याला एका ओळीत उत्तर दिलं :-
HI,
I have NOT used pull SMS service.
.
.
ह्यावर काहीही प्रतिसाद न आल्यानं खालील इ मेल लिहावा लागला:-
Hi All,
Can you please provide me any updates ?
If I have not requested for anything, what malicious/suspicious activity is being undertaken against my name?
In case I do not get any reply from your side, I will be compelled to reach to regulatory authority ,government
agencies including investigation agencies.
.
.
गंमत म्हणजे सेबीची जी साइट सामान्यांना ठाउक असते, www.sebi.gov.in त्यात ही तक्रार करायची सोय नाही.
त्यासाठी scores.gov.in ही वेगळीच साइट आहे.
.
जमेल तशा तोडक्या मोडक्या आंग्ल भाषेत पत्र लिहिलित. खिडकीवरील पलिकडल्या माणसाला कळतील अशी अपेक्षा.
मला एक दोन जण "कशाला उगीच इश्यू बनवतोयस. दे सोडून ." असं म्हणताहेत. पण मी पडलो पापभिरु माणूस. शिवाय जमाना वाईट आहे, कुणाचे क्रेडेन्शिअल्स वापरुन
कोण कसली मनी लाँडरिंग करेल किंवा कुठल्या दहशतवादी कारवाईसाठी पैसा वळवला जाइल सांगता येत नाही. आपण आपल्या बाजूनं म्याटर स्वच्छ ठेवावं म्हणून ह्या उचापत्या.
.
.
.
गंमत म्हणजे ह्याच वेळी माझं टाटा डोकोमोशी भांडण सुरु आहे ब्रॉडबॅण्ड सेवेबाबत. मला फक्त बिलिंग सायकल बदलून हविये, बाकी काही नाही.
पण ह्यांची ऑफिसेस ते करु शकत नाहित. ह्यांच्या नोडल ऑफिसरचा इमेल सक्रिय नाही. हेल्पलाइन्स चालत नाहियेत बिलावर दिलेल्या.
खुद्द ऑफिसमध्ये गेल्यावर लोकं "आम्ही फक्त टाटा डोकोमो मोबाइलच्या सर्विसेस देतो. वायर्ड ब्रॉडबॅण्ड आमच्या अख्त्यारित येत नाही. तुम्ही हेल्प डेस्क ला फोन करा."
असं म्हणतात. काही नम्बर्स हाती ठेवतात. त्यातील एकही चालत नाही.
आता निर्वाणीचे म्हणून टाटाअच्या अपिलात ऑथोरिटीस इ मेल केले आहे.
ते नच झाल्यास ग्राहक मंच हा एकमेव उपाय उरतो. मात्र त्याचा काही अनुभव नाही.
.
.
एअरटेल वाल्यांशीही भांडण सुरु आहे. त्यांनी एकाएकी भलताच बिल प्लॅन सुरु केला माझ्या क्रमांकावर.
"अव्वाच्या सव्वा लावलेलं बिल काढा" हे सांगण्यासआथी,भांडण्यात लै वेळ गेला. पण शेवटी तो भुर्दंड waive off झालाच.
पण त्यासाठी मनःस्ताप फारच सहन करावा लागला.
एकाएकी एकसाथ हे सारे असे का होते आहे ते कळत नाही.
तारीख - ३/१२/२०१३ वेळ - स्थळ
तारीख - ३/१२/२०१३ वेळ -
स्थळ - पुणे
विषय - complaint regarding unknow/fraud investment on account
तपशील - sms/email received -------------------------------
तारीख - १२/१२/२०१३ वेळ -
स्थळ - पुणे
विषय - follow-up regarding complaint
तपशील - details-------------------------------
ह्या पद्धतित अपडेट करत रहा, शेअर करत रहा, शेअर करायला सांगा, लाईक करायला सांगा, समाधानकारक उत्तर मिळण्याची शक्यता वाढेल.
हात्तेच्या....
आत्ता रिलायन्स म्युच्युअल फंद वाल्यांकडून कॉल आला होता. पलिकडून स्त्री आवाज होता. जॉब नवीन लागलेली फ्रेशर व्यक्ती असावी. दडपणाखाली वाटत होती.
"आम्ही मुद्दाम नाही पातह्वला. कसा काय आला ठाउक नाही" वगैरे त्या सांगत होत्या.
मी म्हटलं ठीक आहे "माझ्या नावावर संभाव्य आर्थिक घडामोडी सुरु असलयचं निदर्शनास आणून देणे इतकाच उद्देश आहे.
फार मोठी तक्रार वगैरे नाही.(मनातल्या मनातः- बावचळून वगैरे जाउ नका . मी काही खाणार नाहिये.)"
तिने ओके, ठीक आहे म्हणत फोन ठेवला.
पुन्हा पाच मिनिटात कॉल आला, तुम्ही "9664001111 ह्या नम्बरवर मेसेज केल्याने तुम्हाला तसा रिप्लाय आला" असे ती म्हणाली.
म्हटलं; मी कशाला करायला जाउ असलं काही हो.
पण ती म्हटली की नक्की मेसेज आला आहे. हा नम्बर मी चेक केला तेव्हा माझ्या फोनबुकमध्ये एका मित्राचा निघाला.
मी काही मित्राम्वर आधीच चिडचिड करीत असतो. ही मंडळी अमुक राज्यात वापरायला एक, कॉल करायला एक, वॉट्सअॅपला एक, फिरायला गेल्यावर एक असे अनंत नम्बर मेंटेन करतात.
ही मंडळी एखाद्या नम्बरचा वापर बंद झाल्यावर कळवतही नाहीत. "मनोबा, तिकडे लावू नकोस कॉल. माझा xyz हाच क्रमांक कायमचा आहे. तू इथेच केलास तरी चालेल"
असे कधी विषय निघाल्यावर सांगतात.
अरे बाबा, पण तुझा "कायमचा नम्बर निम्म्याहून अधिक वेळी आउट ऑफ रेंज -डिस्चार्ज वगैरे झालेला असतो. तुझ्याशी बोलायचं असलं, की त्या-त्या वेळेसचे तुझे इतर पर्यायी नम्बर्सच लावावे लागतात."
हे सांगितलं तरी मंडळींच्या डोक्यात का शिरत नाही कोण जाणे.
ते शेवटी दोस्तच असल्याने त्यांच्यावर चिडचिड करण्याव्यतिरिक्त काहिच करु शकत नाही.
.
तर सांगायचं म्हणजे त्यानं हा नम्बर फार पूर्वी वापरायचा सोडून दिला. मला ह्याची कल्पना नव्हती.
"कुठेस रे भाड्या? कॉल टाकू का" असा sms मी ह्याला ह्याच्या दोन्-तीन नम्बरवर करत असे.
(त्याचा व्यवसाय व दिनचक्र लक्षात घेता जवळचे मित्र व कुटुंबीयही मेसेज वर परवानगी मिळाली तरच कॉल करतात.)
तसाच तो २६ नोव्हेंबर ह्या तारखेसही केला.
दरम्यान त्याच्या नम्बरपैकी 9664001111 हा नम्बर रिलायन्स म्युच्युअल फंडाकडे गेला होता.
मला त्याची कल्पना नव्हती. मी सरळ तो मेसेज त्याच्या मूळ्/पर्मनंट नम्बरव्यतिरिक्त ह्या नम्बरलाही पाठविला.
आणि बिचार्या रिलायन्स च्या हेल्पडेस्कला हैराण केले.
त्या मुलीने फोनही इतकय पटकन ठेवला की मला "सॉरी, उगीच त्रास झाला माझ्यामुळे तुमच्या टीमला" हे ही म्हणण्याची तिने संधी दिली नाही.
असो.
कहाणी संपूर्णम्.
चुलत सून- शंका
चुलत सून हा शब्द्प्रयोग आधी सुचला होता. पण 'हे माझे चुलत सासरे' असे ऐकण्यात येते त्याप्रमाणे 'ही माझी चुलत सून' हा शब्द्प्रयोग मी ऐकलेला नव्हता. फार तर 'ही माझ्या पुतण्याची बायको' असे म्हटलेले ऐकले आहे. त्याप्रमाणे भाचेसुनेला मावस/आते/मामे सून म्ह्णत नाहीत. याउलट या नात्यातील ज्येष्ठ नातेवाइकाबद्दल बोलताना 'मावस/चुलत/मामे+सासरा' असे म्हटले जाते.
साधारणपणे कुठल्या विशिष्ट भागात 'चुलत सून' हा शब्द्प्रयोग प्रचलित आहे का? इतरत्र आणखी काय म्हटले जाते?
वॉटर प्युरिफायर ....जलशुद्धक
वॉटर प्युरिफायर ....जलशुद्धक कोणता चांगला आहे?
फक्त किंमत ह्या दृष्तीने म्हणत नाही, एकूणात पर्फॉमन्स चांगला हवाय.
RO सुद्धा चालेल. (ro शिवाय कोण्ते पर्याय आहेत, बादवे?)
इथल्य अकुणलाअ अनुभव आहे का?
आमच्या इथे मुन्शिपाल्टीचे पाणी बोर/हापशा च्या पाण्यात मिसळतात.
त्या दृष्टीने कोणता चांगला राहील ?
घ्यायचा झाल्यास इथे कुणाकडे आघाडीच्या ब्रॅण्ड्सपैकी डायरेक डिलर्/होलसेलर चा संपर्क क्रमांक आहे काय?
BSNL
एका जवळच्या नातेवाइकाच्या वतीने ही शंका टंकत आहे.
BSNL ची त्यांना लॅण्डलाइन जोडणी हवे आहे. (का हवे,मोबाइलच वापरा आजवर वापरलात तसा वगैरे ती मंडळी ऐकत नाहित.
एक कारण हे ही असावे की घरी केवळ ज्येष्ठ सदस्य आहेत. फ्लॅटमध्ये रेंज व्यवस्थित येत असली तरी
त्यांना लॅण्डलाइन सोयीचा पडतो, भरवशाचा वाटतो . )
ह्यांना मदत करत आहे. आदित्य बिर्ला हॉस्पिटल थेरगाव ह्याच्या मागेच ही मंडळी राहतात.
डांगे चौक ते चाफेकर चौक जाताना आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या चौकात डावीकडे वळल्यास बोट क्लबला रस्ता जातो; तिथे ह्यांचे वास्तव्य आहे.
डांगे चौक ते चाफेकर चौक जायला निघायचे, चौकात शंभर मीटर आतमध्ये सरळ जायचे, ह्यांची सोसायटी येते.
मधे सलग वस्ती आहे. लहान मोठी दुकाने आहेत.
BSNL ने ह्यांना कनेक्शन देण्यास नकार दिला आहे. कारण ??
"आमची त्या एरिअयतली केबलवायर तुट्येल ह्ये" असं तो इसम मी काकांसोबत गेलो असताना म्हणाला.
केबलवायर तुट्येल ह्ये तर दुरुस्त करुन घ्यावी असे त्याला वाटले नाही.
डांगे चौक ते चाफेकर चौक जाताना त्याच चौकात डावीकडे वळण्याऐवजी उजवीकडे वळलो तर ज्या बिल्दिंगा लागतात तिथे मागेल त्याला कनेक्शन मिळत आहे.
(space नावाची एक खास फ्रँचायझी त्या इलाख्यासाठी BSNL ने नेमली आहे. त्याच्याशी बोललो, तर रस्त्याच्या उजवीकडेचेच काम आम्ही घेतो असे तो म्हणाला.)
काका नाद सोडायला तयार नाहित.
काका जराशे कटकटे नि नको तितके आग्रही वाटत असले तरी शिक्षणकाळात त्यांनी बरीच मदत न मागता केली आहे.
त्यामुळे त्यांच्यासाठी स्वतःहून काही करावं असं वाटतं.
मुख्य रस्त्यापासून आत फक्त शंभर मीटर येणे BSNL ला इतके अवघड आहे का?
BSNL ही सध्या पूर्ण खाजगी कंपनी नसावी.
ती खाजगी नसल्यास :- "जनतेसाठी" अमुक अमुक काम करण्याचा त्यांच्यावर दबाव टाकता येउ शकतो,
आग्रह करता येउ शकतो, मागणी लावून धरता येउ शकते, असा माझा अंदाज.
हे करण्याचे वैध मार्ग कोणते ? लिखित अर्ज कुणाकडे करावा ?
सरकारचा कोणता अधिकारी ह्यात मदत करु शकेल ? (ब्यांकींगच्या कामात काही अडलं की नोडल ऑफिसरकडून समाधान न झाल्यास ब्यांकिंग ओम्बुड्समन मदत करु शकतो,
इतरत्र कन्झ्युमर फोरम, सेबी वगैरे आहेत रेग्युलेटर य्म्त्रणा म्हणून. तसे इथे काही आहे का? कोणाला पकडावे लागेल?)
.
.
.
डांगे चौक ते चाफेकर चौक हा आता अगदि वाहतुकीचा वाहता, वर्दळीचा रस्ता आहे.
बिर्ला हॉस्पिटल ते काकांचे घर हा १०० मीटर एरिया सुद्धा निर्मनुष्य नाही. सलग वस्ती आहे. त्या दरम्यान मोरया मंगल कार्यालय आहे, त्याच्याशेजारी गोठा आहे. हे झालं रस्त्याच्या एका बाजूचं.
दुसर्या बाजूला लहान लहान दुकाने व घरे आहेत. ती म्हआडा स्टाइल सेमी स्लम वाटतात. ते पूर्वीपासून वास्तव्य करुन असलेले चिंचवडकर्/थेरगावकर गावकरी आहेत.
सोसायट्या त्यांच्याच जमीनीवर बनल्यात.
दुसर्या कंपनीची लॅण्डलाइन
दुसर्या कंपनीची लॅण्डलाइन घ्यायची नसेल तर बीएसएनएलचाच वायरलेस इन लोकल लूप असा ऑप्शन असेलच तो घ्यावा.
यात बाहेरून येणारा सिग्नल वायरलेस असतो. आतला बेसयुनिट + हॅण्डसेट वायर्ड फोन सारखा असतो.
मुंबईत डॉल्फिन नावाने एमटीएनएल ही सेवा देते. बीएसएनएलचीसुद्धा असेल.
अन्यथा टाटासुद्धा अशी सेवा देते (Walky) या नावाने.
नितिन थत्तेंशी सहमत आहे. ते
नितिन थत्तेंशी सहमत आहे. ते डब्लू एल एल कनेक्शन देउ शकतात. केबलची उपलब्धता हा खरोखरीच प्रॉब्लेम असतो.
http://maharashtra.bsnl.co.in/ssa/pune/offdir.htm या ठिकाणी सिनिअर अधिकार्यांचे फोन नं आहेत. त्यातील डीजीएम चिंचवड यांना भेटुन परिस्थिती सांगावी. खर तर चिंचवड एक्सचेंज चे डिव्हिजन अभियंता डीई यांना प्रत्यक्ष भेटून सांगितले तरी ते त्यांच्या अधिकारात डब्लूएल एल कनेक्शन देउ शकतात.
पिक्चर साईज
माझ्याकडे ४२ इंचाचा टीवी आहे. मी जेव्हा सीडी लावून पिक्चर वैगेरे पाहतो तेव्हा तो फुलस्क्रीन येत नाही. चारी बाजूंनी काळी पट्टी असते. एरवी टीव्ही पूर्ण दिसतो.
टीवी - एल जी ३ डी सिनेमा
डी वी डी प्लेअर - सॅमसंग ३ डी ब्लू रे डिस्कप्लेअर
या सीडीज टीवी घेताना त्यासोबत फ्री मिळाल्या होत्या.
फुल स्क्रीन पाहण्यासाठी दोन्ही रिमोटच्या बर्याच सेटींज बदलून पाहिल्या. काय करावे?
४ मिटर म्हणजे १३ फुटांच्या वर
४ मिटर म्हणजे १३ फुटांच्या वर झाले. मुंबई-पुण्यातील हॉलची लांबी १०-११ फुट त्यात सोफा वगैरे गणला तर ७-८ फुटांवरून टिव्ही बघावा लागतो. थत्ते चाचा म्हणतात तसे ठिपकेदार चित्र अनेकांकडे दिसते हे अनुभवले आहे म्हणूनच विचारले.
३२ इंच स्क्रीनवरील चित्र ७-८ फुटांसाठी योग्य वाटते. ४२ इंची टिव्ही साठी किमान १८ ते २० फुट अंतर हवे असे वाटते.
असो यात लोकांच्या निर्णयावर टिका करण्याचा हेतू नाही. मात्र कंपन्या आपले टिव्ही विकायसाठी ज्या ट्रिक्स करतात त्याला अधोरेखीत करणे आहे.
एल जी
आहे. मी जेव्हा सीडी लावून पिक्चर वैगेरे पाहतो तेव्हा तो फुलस्क्रीन येत नाही. चारी बाजूंनी काळी पट्टी असते. एरवी टीव्ही पूर्ण दिसतो.
एल जी चे कोणते मॉडेल आहे? (मॉडेल नं सांगा)
माझ्या एल जी च्या रिमोटमध्ये सेटिंग्मध्ये मेन्यू -> पिक्चर सेटींग मध्ये हे सेटिंग आहे.
तुमचा टीव्ही ३डी आहे यावरून अंदाज, तो १०८०पी असणार.
अदितीने म्हणल्यानुसार सीडीमध्ये जर लो क्वालिटी (कनॉट प्लेससमोरील रस्त्यावर घेता ना विकत?) ७२०पी किंवा कमी असेल तर टीव्ही आपोआप चित्र छोटे करेल, क्वालिटी चांगली ठेवण्याकरता. थत्ते म्हणतात त्यानुसार वाईड केलेत तर स्ट्रेच होण्याची शक्यता आहे.
सीडी असो, डिवीडी असो वा
सीडी असो, डिवीडी असो वा अवतारची ३डी ब्लू रे दिस्क असो, फूल स्क्रीन होत नाही.
खालील मॉडेल आहे. स्क्रीनच्या केवळ ७०%-७५% भागच वापरला जात असल्याने मी बर्यापैकी खट्टू झालो आहे.
http://www.snapdeal.com/product/lg-42-inches-lm7600-cinema/419929?utm_s…
पिण्याच्या जागा ; स्वस्त आणि मस्त ढाबे
आताच पुण्यात नवीन असलेल्या एका मित्राचा कॉल आला.
त्याला पुण्यातील ढाबे स्टाइल जागा हव्या आहेत.
पोरं पोरं मिळून जाणार आहेत.
स्वतः बाटल्या घेउन त्यांना जायचे आहे. आणि ढाब्यावर बसून प्यायची आहे.
त्यांना चांदणीचौकाहून निघून मुंबैच्या दिशेला जाताना अशा कोनकोणत्या जागा असू शकतात हे सांगितले, पण उपयोग नाही.
ग्यांग विमाननगर्,विश्रांतवाडी,नगररोड पट्ट्यातली आहे. तिथले अड्डे हवे आहेत.
राजरोस व्यवस्थित गप्पा मारत बसता यायला हवे.
जर टिपिकल ढाबे(सुतळीच्या बाजा/खाटा असलेले) उपलब्ध नसतील तरी चालेल. पण मग बाहेरुन नेउन प्यायची सोय तिथे हवी आहे म्हणे.
जाणकार ऐसीकर सल्ला देतील काय?
( "पिउ नका" हा सल्ला नको. तो देउन झालाय. पुढचे बोला.)
आधार् लिंकिंग -मदत हवी
नमस्कार. माझ्याकडे आधार कार्ड आहे. आधार - बँक खाते, व आधार- गॅस जोडणी अशा दोन लिंकिंग करणे जरुरी आहे सबसिडीसाठी.
माझ्या बचत खात्यास आधार जोडले गेले आहे. त्याचा रेकॉर्ड अपडेट झाल्याबरोबर मला स्वयंचलित यंत्रणेकडून sms सुद्धा आला.
तर एक लिंक करुन झाली.दुसरी बाकी.
भारत गॅस हा माझा सेवादाता आहे सिलिंडरचा. त्यालाही गॅस जोडणीशी आधार क्रमांक लिंक करण्यास सांगितले आहे.
त्याला वारंवार अर्ज दिला आधारसाठी. दरवेळी "काम होउन जाइल" असे सांगितले गेले.
अर्जाची पोचपावती acknowledgement तर दिली गेली नाहिच. प्रत्यक्षात आधारही गॅसला जोडले गेले नाही.
आता शेवटी डाय्रेक हेल्प डेस्कला फोन करुन "आधार लिंक होण्यास काय अडचण आहे? " हे विचारले. व सेवादाता पोचपावती देत नसल्यास काय करावे हे ही विचारले.
त्याने सेवादात्याबद्दल तक्रार लिहून घेतली.
"आधार लिंक होउ शकत नाही कारण तुमच्या आधार कार्डला कोणतेही बँकखाते जोडले गेलेले नाही " असे सांगितले.
पुन्हा बॅम्केशी बोललो . तिथे असलेला नम्बर बरोबर आहे, खात्री करुन घेतली.
गॅसवाले ऐकत नहैयेत.
काय झोल आहे बुवा?
लोकमत पान नं ९ ला आधार विषयी
लोकमत पान नं ९ ला आधार विषयी एफ ए क्यु दिले आहे. त्यात काही माहिती दिली आहे.
दुवा
दुवा हापिसातून उघडत नाही. घरी जाउन पाहणे जमतच नाहिये.
सध्या contact@npci.org.in ह्यांना इमेल टाकलाय. कारण शेवटी प्रत्यक्ष पेमेंट करणारी मंडळी हीच आहेत.
झोल ह्यांनीच निस्तरावा. ( http://www.npci.org.in/home.aspx )
तो घोळ नाही
अॅपचा प्रॉब्ल्मे नाहिये. आता गॅस कनेक्शन - आधार लिंकिंग करेक्ट आहे असे वेबसाइटवर दिसते.
पण तीच वेबसाइट आधार ब्यांकेशी जोडला गेलेला नाही असे म्हणते.
ब्यांकवाले म्हणतात जोडला गेला आहे.
जोडणी झाली आहे की नाही ह्याबद्दल खालील दुव्यावर तुम्ही कुणाचाही फोन नम्बर किंवा आधार क्रमांक टाकून तपशील पाहू शकता .
http://www.ebharatgas.com/ebgas/faces/CC_include/ConsumerAadhaarStatus…
चिडचिड होते आहे. एकही काम सरळ का होउ नये?
सारं काही वैध असताना , कागदपत्रं क्लिअर असतानाही दरवेळी खेटे का घालावे लागावेत?
मीही अधार-गॅस कनेक्शन-बँक या
मीही अधार-गॅस कनेक्शन-बँक या जोडणीच्या प्रयत्नात आहे. तुम्ही दिलेल्या दुव्यावर माझे आधार कार्ड गॅस कनेक्शनशी जोडलेले आहे असे दिसते (आधार नंबर एजन्सीवाल्याला फोनवर कळवला आणी लगेच तिथे हिरवा गोळा आला) पण आधार-बँक यात नॉट नोन असे येते आहे. गॅस एजन्सीवाल्याने त्यांच्याकडून एक फॉर्म घेऊन तो बँकेत द्यावा लागेल असे सांगितले आहे- हा फॉर्म ऑनलाईन उपलब्ध नाही असे तो म्हणाला....असा कोणता फॉर्म आहे का?.
कानातली कापुस काण्डी
नमस्ते मण्डळी
नुकतीच एका इएन्टी डॉक्टर कडे गेलो असता त्याने सान्गितलेले ऐकून थक्क झालो अन भीतीही वाटली .
आजकाल इअरबड (म्हणजे कान साफ करण्यासाठी वापरतात ती कापुसकाण्डी) सगळेजण वापरतात .जॉन्सन अॅन्ड जॉन्सन कम्पनीच्या एअरबड खुपच चान्गल्या आणि हायजेनिक पण महाग असतात . त्यामुळे बरेच लोक रस्त्यावर किम्वा फेरीवाल्याकडे १०/- रुपयात पाकिट मिळणार्या इअरबड वापरतात .
परन्तु या १०/- रुपयात पाकिट मिळणार्या इअरबड साठी वापरलेला कापूस अतिशय निक्रुश्ट दर्जाचा असून हॉस्पिटलच्या कचर्यात असणारा वेस्टेज कापूस देखील पुन्हा वापरला जातो. त्यामुळे घातक जिवाणू चे इन्फेक्शन होण्याचा फार मोठा धोका सम्भवतो .
तरी या सन्दर्भात जनजाग्रुती होवून अशा स्वस्त व टाकावू १०/- रुपयात पाकिट मिळणार्या इअरबड वापरणॅ बन्द व्हावे ,अशी अपेक्षा ...
विशेशतः आन्घोळीनन्तर काही
विशेशतः आन्घोळीनन्तर काही वेळाने कानात खाज उठते ,तेव्हा काय करावे?
टॉवेलने कान पुसावा. लहानपळी आमच्या डॉक्टरांनी सांगितलेले आठवले. ते म्ह्णत, ' देवाने करंगळी ही कान कोरडा करण्यासाठी दिलेली आहे. पातळ टॉवेल / पंचा करंगळीभोवती गुंडळायचा आणी बाहेरचा, आतला कान पुसायचा. कानाच्या भोकात योग्य ठिकाणी ती थांबते. त्यापुढला कान काही घालून साफ/ कोरडा करण्याची गरज नाही.
तसेच आंघोळ करताना कानात आतपर्यंत पाणी जाऊदेऊ नये.
काडी वा कापसाचा दर्जा
काडी वा कापसाचा दर्जा महत्वाचा नाही. ९९% ईएन्टी सर्जन्स कुल्फीच्या काड्यांना गुंडाळून साधा कापुस वापरतात. सिंपल रीझन, जॉन्सन वा तत्सम बड्स या कामासाठी नाहीत. ते फक्त पिन्ना, उर्फ बाहेरचा कान. कर्णा साफ करण्यासाठी आहेत. कानाच्या भोकात घालू नयेत.
जॉन्सनचे बड्स सग्ळ्यात जास्त ड्यामेजिंग आहेत.
एक्स्टर्नल ऑडीटरी क्यानालची संरचना, तिथल्या त्वचेला अस्लेला 'नर्व्ह सप्लाय' (कान कोरताना ठसका लागतो. जास्त जोरात कोरला, तर हृदय बंद पडु शकते. व्हेगस नामक नर्व्ह ती स्कीन अन हृदय दोघांना जोडते) इ. ठाऊक नसताना कान कोरू नये.
बड्स मुळे कानातला 'मळ' जो अॅक्चुअली, कानात पाणी जाऊ नये, कीटकांना कडू चव लागून त्यांनी आत घुसायच्या फंदात पडु नये, गेलेच तर चिकटून अडकून पडावेत म्हणून तिथली त्वचा बनवते, तो मळ, बड्स मुळे आत कुटून पक्का बसतो. (याला काढायला डॉक्टरच, किंवा क्वचित ऑपरेशन, तेही जनरल अॅनास्थेशियावाले करावे लागू शकते)
नॉर्मली, जेवताना होणार्या जबड्याच्या हलचालीने हा मळ आपोआप बाहेर येतो.
आंघोळीनंतर कानाच्या कर्ण्यात, म्हणजेच बाहेर दिसतो तितकाच कान, हळूच पुसले तितके पुरते.
नाही पुसले तरी पुरते.
जास्त चूळ येत असेल तर कान वाल्यास दाखवा. तिथे अॅलर्जिक वा कोंड्याचा प्रॉब्लेम असू शकतो.
तो डाक्टर सांगेल ते ऐका.
ऐकू नाही आले तर तोच डॉक्टर उपचार करू शकतो ;)
मला "ऐसी" वर काही काही
मला "ऐसी" वर काही काही धाग्यात "नवीन प्रतिक्रिया वर, जुन्या खाली" असं दिसतं तर काही काही धाग्यांत बरोब्बर उलटं - "जुन्या वर, नवीन खाली". हा ब्राऊझरचा प्रॉब्लेम आहे का ऐसीवरचं माझं काही सेटिंग चुकलंय/बदलायचं राहिलंय?
(उपप्रतिक्रिया आणि उप-उप-उप वगैरे मात्र बरोबर खाली खाली दिसतात.)
दोन्ही ठिकाणी लॉगिन केलेलं
दोन्ही ठिकाणी लॉगिन केलेलं आहे का?
"नवीन प्रतिक्रिया वर, जुन्या खाली" असं दिसत असेल तर धाग्याखाली जे पर्याय आहेत, त्यात Display: Threaded असं केल्यास "जुन्या वर, नवीन खाली" दिसतील.
माझ्या नेहेमीच्या ब्राऊजरवरच, लॉगाऊट झाले तर "नवीन प्रतिक्रिया वर, जुन्या खाली" असं दिसतं.
दोन वेगवेगळ्या प्रकारचे
दोन वेगवेगळ्या प्रकारचे डिस्प्ले (नवे आधी, जुने खाली किंवा जुने वर, नवे खाली) दिसतात तिथे.
पुढचं जे वर्णन आहे हे का होतं हे माहित नाही, पण ही ड्रुपॉलची खासियत आहे. समजा तुम्ही ऐसीवर लॉगिन केलेलं आहे, ब्राऊजरमधे पासवर्डही ठेवलेला आहे, तरीही एखाद्या ऐसीच्या लिंकवर क्लिक केलं तर लॉगाऊट झालेले असता. संस्थळात बनवलेल्या दुव्यांच्या बाबतीत हे होत नाही, म्हणजे पानाच्या वर किंवा डाव्या बाजूला जे दुवे आहेत त्यात हे होत नाही. पण प्रतिसादात ऐसीची लिंक असेल किंवा इमेलवरून आलेली लिंक उघडली तर प्रत्येक वेळा या नव्या लिंकमधे आपण लॉगिन असू याची खात्री नसते.
(हे वर्णन फार किचकट केलंय का?)
माझ्याकडे slow chess म्हणून
माझ्याकडे slow chess म्हणून एक सॉफ्टवेअर आहे. माझ्याकडे माझ्या संगणकाचा अॅडमीन राईट नाही. तरीही त्याची executive file रन होते आणि मी त्याचा पूर्ण आनंद घेऊ शकतो. जेव्हा की मी इतर काहीही install करू शकत नाही. असे का?
आणखी
कोणी चेसप्रेमी या स्लो चेस चे मनूंचे options आहेत ते discuss करण्यास क्षम आहे का?
जितक्या लोकांनी ते घर विकत
जितक्या लोकांनी ते घर विकत घेतले आहे त्या सर्वांची अॅग्रीमेंट्स
सोसायटीचे एनओसी (ज्यामुळे विकणारा माणूस सोसायटीचा मेंबर आहे हे दिसून येते).
शेअर सर्टिफिकेट (त्यावरची आधीची सर्व नावे).
घरावर लोन असेल तर ते सहसा सोसायटीला ठाऊक असते.
सध्याच्या विकणार्याचे ओरिजिनल अॅग्रीमेंट (लोन असेल तर हे बँकेकडे असते) + रजिस्ट्रेशनची पावती.
एवढे तरी हवे
बिल्डरकडून घर घ्यायचे असल्यास हे लागू नाही. आयडिअली ही प्रोसेस जास्त कॉम्प्लेक्स होऊ शकते.
टायटल सर्च घेतलेला बरा.
टायटल सर्च
एखाद्या कडक रेग्युलेशन असणआर्या बँकेकडून कर्ज घेतल्यास; उदा :- sbi टायटल सर्च आपोआप होतो अशी माझी समजूत आहे.
तुमच्याकडे कॅश तयार असेल तरीही घर लोनवरच घ्यावे. पाचेक वर्षे लोन फेडू नये.
सगळे सुरळित सुरु आहे असे जाण्वल्यासच लोन फेडावे.
दरम्यान काही उचापती घडाल्यास बँक त्याच्या तारनाचय सुरक्षेपायी का असेना पण कोर्ट्-कचेर्या वगैरे करते.
तिथे आपण फक्त "मम" म्हणायचे.
अर्थात सारे सोपस्कार करुनही "कॅम्पा कोला " प्रकरणात भल्याभल्यांची वाट लागली आहेच.
त्यामुळे घर खरेदी बद्दल कुणालाही सल्ला देताना जरा जपूनच बोलतो.
किंवा "मी त्यातला तज्ञ नाही" हे जाहीर करुन मगच पुढचे बोलतो.
सोपस्कार
माझ्याकडिल ऐकिव माहिती मांडतोय :-
सोपस्कार म्हणजे पब्लिकनं ब्यांकांकडून कर्जं घेतली. दहा - दहा, पंधरा वर्षे ती भरली. ब्यांकानीही व्यवहारास आक्षेप घेतला नाही.
त्या नफा मिळवून मोकळ्या झाल्या. नंतर कोर्टाचा दट्ट्या पडला तो त्या क्षणी त्या जागेचे जे मालक होते, त्यांच्या टाळक्यात.
ग्मंमत म्हणजे जागा अवैध आहे, इल्लिगल आहे असे प्रशासन सांगते. पण प्रशासनाने त्यांचय कडून प्रॉपर्टी ट्याक्स्/मिळकत कर घेतला होता.
नळ जोडणी दिली. वीज दिली.
अरे अवैध आहे, तर बांधतानाच नव्हता का थांबवू शकत?
जर प्रॉपर्टी इल्लिगल आहे तर प्रॉपर्टी ट्याक्स कसा काय घेता?
लोकांनी उदा:- १० लाखाचं घर घेतलं, लोन व त्यावरील व्याज पकडून १५ते अथरा लाख वगैरे ब्यांकेस परत केले.
आणि वीस वर्सहनी कोर्ट येउन जागा सोडायला सांगते.
.
दुरुस्ती असल्यास सुचवावी.
तपास
>> त्यामुळे बँकेनंच तपास केला असणार याच भरवशावर मी निवांत होते - आहे.
बँकांनी कर्ज देताना इमारतीची कागदपत्रे पाहणे/तपासणे हे बँकांचे "कर्जदारांप्रती" कर्तव्य नसते. ते त्यांच्या "भागधारकांप्रती" कर्तव्य असते. म्हणजे बँका जो तपास करतात तो त्यांच्या कर्जाच्या सुरक्षिततेसाठी करतात. कर्जदाराच्या सुरक्षेसाठी नव्हे.
बँकेने ड्यू डिलिजन्स केला किंवा नाही यासाठी रहिवासी बँकांना दोष देऊ शकत नाहीत. :(
हो काहीसं असं आमच्या जुन्या
हो काहीसं असं आमच्या जुन्या जागेबाबत घडलय. जागा रिसेल मध्ये घेताना बँकेकडून कर्ज घेतलं नव्हतं पण वकिलाचा सल्ला घेतला होता, रजिस्ट्रेशन केलं पण काही वर्षांनी कलेक्टरच्या ध्यानात आलं की जमिन सरकारी नोकरांना घर बांधण्यासाठी ९९ वर्षंआंच्या लीज वर दिली होती. ज्याला दिली त्याने ती परस्पर कोणाला तरी विकली त्या कोणीतरी ती बिल्डरला विकसित करायला दिली. बिल्डरने फ्लॅट्स बांधून विकले. आम्हाला नोटीशी आल्या. आता ना आम्ही ती विकू शकत ना भाडेकरु ठेवू शकत कारण आम्हीच म्हणे कलेक्टरचे भाडेकरु आहोत.
गेली १२-१५ वर्षं घोंगडं भिजत पडलय. हो यादरम्यान आम्ही टॅक्स भरतोय
एक प्रश्न आहे.
पागडी सिस्टीम ही कायद्याला मान्य आहे का? यातील समस्या कश्या असतात म्हणजे पागडीने घर घेताना कोणते रिस्क फॅक्टर असतात?
बिल्डरकडून घर घेताना
नदी- नाले इ ची पत्रे पूर्ण किंवा अंशतः भरून जागा बळकावण्यावे प्रकार हल्ली मोठेमोठे बिल्डरही करत असल्याचे ऐकून आहे. हे बिल्डर महानगरपालिकेकडून खोटी प्रमाणपत्रे मिळवून 'ऑल क्लिअर' असल्याचे ग्राहकंना दाखवू शकतात. आपण घेत असलेली जागा या प्रकारात नाही याची शहनिशा कशी करून घ्यावी?
'प्राचीन मराठी कोरीव लेख'
प्रा. तुळपुळे यांचं 'प्राचीन मराठी कोरीव लेख' हे पुणे विद्यापीठाने १९६२ सालात प्रकाशित केलेलं पुस्तक हवं आहे. कोणाकडे आहे का ? पाठवू शकत असल्यास व्यक्तिगत निरोप पाठवा.
किंवा ते कुठे मिळेल याची माहिती असल्यास कृपया द्यावी. धन्यवाद.
गुगलवर शोध घेतला तर पहिलीच लिंक academia.edu वर राजेंद्र देवरे यांची आली.तिथे पुस्तकासाठी मागणी नोंदवली आहे.
धन्यवाद. तशी ग्रंथालयांमध्ये
धन्यवाद. तशी ग्रंथालयांमध्ये उपलब्ध आहे. पण प्रत संग्रहासाठी विकत मिळाल्यास हवी आहे (किंमत रू.५०/- अशी माहिती मिळाली)...कदाचित माझ्या प्रश्नात तसे स्पष्ट नसावे. स्कॅन केलेली प्रत असेल तरी चालेल.
आंतर जालावर 'महाराष्ट्रातील काही ताम्रपत्रे व शिलालेख' हे प्रा. कोलते यांचं पुस्तक मिळालं. तसच तुळपुळ्यांचं पुस्तक उपलब्ध आहे का ह्यासाठी इथे चौकशी केली.
कोलते यांचं पुस्तक
कोलते यांचं पुस्तक https://msblc.maharashtra.gov.in/download इथल्या यादीत उपलब्ध आहे. या पुस्तकाची नेमकी लिंक नाहिये माझ्याकडे पण यादीत मिळणे तसे सोपे आहे.
अवांतरा बद्द्ल धन्यवाद, तूर्तास नको आहेत. एखादी वेबसाईट असल्यास चाळायला आवडेल.
मिळालं
मला पुणे विद्यापीठाच्या प्रकाशन विभागातून 'प्राचीन मराठी कोरीव लेख' हे ४८० पानांचं पुस्तक (ग्रंथच म्हणायला हवा), चित्रांच्या पुरवणीसहित मिळालं. विखुरलेल्या पानांच्या गठ्ठ्यातून ते मिळवावं लागलं पण अनुक्रमणिकेचे पृष्ठ मिळाल्याने १५-२० मिनिटांमध्ये ते जमवता आलं. पुरवणीतील पानं एकमेकांना चिकटलेली आहेत ती फारशी माहिती न गमावता कितपत सोडवता येतील माहित नाही.
प्रकाशन विभाग विभाग अॅलिस गार्डनच्या छोट्या हिरव्या गेट समोर आहे. मेन गेट पासून एक ते दीड किमी. अंतरावर आहे.
आमिश? ऐसीला विचारा असा धागा
आमिश?