Skip to main content

पैसोबा पुराण

2 minutes

माझ्या अल्प ज्ञानानुसार आणि अल्प अनुभवानुसार मी लिहिलेले पैसोबा पुराण-
माणसे जिंका. माणसे जोडा. पण ती पैशांनी नव्हे! आपल्या चांगल्या कृत्यांनी. चांगल्या स्वभावाने!
पैशांनी जोडल्यास पैसा संपल्यावर माणसे पण दूर जातील. पैसा जवळ असो किंवा नसो, काही लोक पैशांचा खोटा बडेजाव दाखवतात. एक उदाहरण द्यायचे तर एखादी वस्तू विकत घेतल्यावर न विचारता काहीजण त्याची किंमत सांगत सुटतात. असे जे करतात तेच पैशांना नकळत त्यांच्या जीवनात अवाजवी महत्व देत असतात, पण त्यांच्या मनात मात्र पैशांबद्दल द्वेष असतो. पैशांचा द्वेष करू नका. कारण पैसे निर्जीव आहेत. पैसे जवळ असणार्‍या माणसांचा द्वेष करू नका. कारण त्यांनी तो मिळवण्यासाठी केलेली मेहेनत आपल्याला माहित नसते. आणि जर कुणी वाईट मार्गाने पैसा मिळवला असेलच तर त्याला त्याचे फळ मिळेलच. त्याची चिंता आपण कर्मफल सिद्धांतावर सोडून द्यावी. अर्थात पैशांचे महत्व आहे आणि ते नाकारून चालणार नाही. तेव्हा पैशाला तुमचे गुलाम बनवा. पैशाचे गुलाम बनू नका. पैशाने पैसा वाढवा. कारण मोठमोठया उद्योगपतींनी मोठमोठी स्वप्ने पाहिली नसती आणि करोडोंचे भांडवल टाकून, मोठमोठया कंपन्या उभारल्या नसत्या तर आपल्यासारख्या लाखो करोडो लोकांना आज चरितार्थ चालवायला नोकर्‍या मिळाल्या असत्या का? त्या उद्योगपतींनीही आणि सगळ्यांनीच जर हाच विचार केला असता की, "जास्त पैसा नाश करतो, चला आपण अल्पसमाधानी राहू आणि एखादा जाॅब शोधू" तर मग या जगात इतरांना नोकरी देणार्‍या कंपन्या कारखाने उभेच राहिले नसते. मेहेनत करा. पैसा कमवा. पैसा टिकवा. पैसा वाढवा. माणसे जोडा. माणसे टिकवा. पण पैशाच्या प्रभावाने नव्हे तर चांगल्या स्वभावाने!
पाच हजार रूपये जेवढे महत्वाचे तेवढेच पाच पैसे सुध्दा महत्त्वाचे हे जो जाणतो तोच खरे पैशाचे मोल जाणतो. इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत की शाही घराणे, राज घराणे यांना वारसा हक्काने पैसा मिळतो पण त्यांना तो टिकवता आला नाही. उलट तो विकून खाल्ला गेला. पैसा टिकवणे आणि वाढवणे हे एक कौशल्य आहे. ते ज्या राजघराण्यांना जमलं त्यांची रया कधीच लयाला गेली नाही. एखाद्या व्यक्तीने आपल्याला पैशांची मदत केली नाही म्हणून त्याला जर आपण अशी दूषणे देत असू की "याच्या लेखी पैसाच सर्वकाही आहे" तर त्याच न्यायानूसार आपण सुद्धा दोषी ठरतो कारण "फक्त पैशांची मदत केली नाही म्हणून त्याला वाईट समजतो" म्हणजेच त्या व्यक्तीशी असलेल्या मैत्री अथवा नात्याला आपण सुद्धा फक्त पैश्यांपुरते महत्व देतो आहे असा त्याचा अर्थ होतो, नाही का? हे जर खरे असेल तर माणसे जोडण्यामागे स्वार्थ असतो हे सिद्ध होते. महागुरू आचार्य चाणक्यांनी सुद्धा यासंदर्भात बरंच काही लिहून ठेवलंय ते सुद्धा कालातीत म्हणजे कोणत्याही काळाला लागू होणारं.. काय वाटते आपल्याला? पटतंय का अापल्याला मी माझ्या अल्पज्ञानानुसार लिहिलेलं हे पैसापुराण? आवडल्यास जरूर लाईक करा आणि शेअर करायला तर करायला तर मुळीच विसरू नका बरं का!

Node read time
2 minutes

आदूबाळ Wed, 29/04/2015 - 18:56

In reply to by अनु राव

खरेक्ट. लष्करातून डच्चू दिलेल्या एका जुगार्‍याने हा लेख आपल्या इन्स्टाग्रामवरून शेअर केला, आणि आज बघा तो कुठे आहे!

नगरीनिरंजन Wed, 29/04/2015 - 20:58

कारण मोठमोठया उद्योगपतींनी मोठमोठी स्वप्ने पाहिली नसती आणि करोडोंचे भांडवल टाकून, मोठमोठया कंपन्या उभारल्या नसत्या तर आपल्यासारख्या लाखो करोडो लोकांना आज चरितार्थ चालवायला नोकर्‍या मिळाल्या असत्या का?

=)) =)) =)) हे माझ्या लक्षातच आलं नाही कधी. उद्योगपती नसते तर आत्महत्या करावी लागली असती मला.
नंदनवनानंतर आदम-ईव्ह निर्माण करण्याआधी देवाने एकतरी उद्योगपती निर्माण केला असणारच.

पिवळा डांबिस Wed, 29/04/2015 - 23:36

In reply to by नगरीनिरंजन

नंदनवनानंतर आदम-ईव्ह निर्माण करण्याआधी देवाने एकतरी उद्योगपती निर्माण केला असणारच.

तसं नाय, देवाने आदम निर्माण केला.
पण त्या आदमने उद्योगपती होण्याऐवजी पती-उद्योग करून बाकी सगळा घोळ करून ठेवला!!
:)

बॅटमॅन Thu, 30/04/2015 - 00:09

In reply to by पिवळा डांबिस

फेबुवरती एक फोटो पाहिला होता त्यात अ‍ॅडम अन ईव्ह निवांत स्वर्गातच दाखवलेत- ते चिनी असल्याने सफरचंद तसेच ठेवून सापाला तळून खातात आणि सुखाने स्वर्गात राहतात.

पिवळा डांबिस Thu, 30/04/2015 - 00:20

In reply to by बॅटमॅन

ईऽऽऽऽऽ!!
नाही ते सापाला तळून खाण्याबद्दल ईऽऽ नाही.
तर मी चिनी लोकांपासून निर्माण झाल्याचं एक चित्र मनात उभं राहिलं, त्याबद्दल!!

बॅटमॅन Thu, 30/04/2015 - 00:24

In reply to by पिवळा डांबिस

अ‍ॅडम आणि ईव्ह हे स्वर्गातून हाकलून दिले गेल्यामुळेच प्रजोत्पादन करते जाहले, अशी ष्टुरी आहे ना पण? स्वर्गातच राहते तो ना होता प्रजोत्पादन, ना होती किरकिरी!
हाय की नाय? :)

शुचि. Thu, 30/04/2015 - 00:29

In reply to by बॅटमॅन

स्वर्ग म्हणजे - (खाणे-पीणे-लोळणे-भटकणे-पुस्तके विशेषतः कवितांची) + (चिरतारुण्य्-सुदृढता-निरामयता).
____
पैकी सध्या फक्त सुदृढता बेफाम वाढत चाललीये व इतर गोष्टींचा संकोच होतोय ;)

तिरशिंगराव Thu, 30/04/2015 - 20:06

संपादकांना विनंती आहे की आपल्या प्रिय ऐसी वर, बरेच ताज्या दमाचे लेखक्/कवी आलेले आहेत. त्यांच्या साहित्याला उठाव मिळावा म्हणून छोट्यांसाठी असे जे सदर आहे, त्याच धर्तीवर 'बाळबोध' असेही नवीन दालन उघडावे. अशी सदरे वाचल्याने ऐसीवरील हुच्चभ्रू टीकाकारांना आत्मचिंतन करावेसे वाटेल.

अजो१२३ Thu, 30/04/2015 - 22:49

अत्यंत चांगला लेख आहे. किमान सदुद्देशानं प्रेरित होऊन लिहिला आहे. ऐसीवरच्या सिनिकल मंडळीच्या टवाळीमुळे खचून जाऊ नकात. शुभेच्छा. एखादं मतांतर असेल, पण सध्याला महत्त्वाचं नाही.