रोचक अनवट इंग्रजी शब्द, शब्दसमूह, संदर्भ इत्यादि

इंग्रजीतले काही खास शब्द, जे मराठी माध्यमात शिकलेल्यांच्या परिचयात फार उशीरा येतात, असे एकमेकांना सांगणारा धागा / विभाग सुरु करता येईल का? मागे एका मराठी साप्ताहिकात असं एक सदर येत होतं. एका लेखात काही सिमिलर शब्द असायचे आणि त्याच्या अर्थच्छटांची तपशीलवार माहिती असायची.

हे सिंगल वर्ड्सच असतात असं नव्हे. शब्दसमूह, वाक्प्रचार, लॅटिनोद्भव शब्द, ग्रीकोद्भव शॉर्ट्फॉर्म्स.

क्लिशे, टूशे, अनकॅनी, इन अ जिफ्फी असे असंख्य शब्द लोक नेहमी वापरतात पण त्याचवेळी इतर अनेकांना त्याचा नेमका अर्थ माहीत नसतो. डिक्शनरीत सरळसोट शब्द असल्यास एखाददुसरा अर्थ सापडतो पण वेगवेगळ्या वेळी कोणत्या छटेने ते शब्द वापरता येतील हे ठरवता येत नाही. कधीकधी आपली मापं काढलीयेत की तारीफ केलीय हेही कळत नाही.

प्रीमियम, प्रीमियर वगैरे एकसमान ऐकू येणारे शब्द. कित्येकदा असे शब्द एकमेकांच्या जागी बेधडक वापरले जात असतात.

मुटाटिस मुटांडिस (कायद्याच्या भाषेत),sic (बहुधा मूळ उतारा जसाच्यातसा उद्धृत करताना),nee (स्त्रीचं माहेरचं नाव लिहीताना हा शब्द पाहिला आहे),aka,et al (etc आणि et al एकच का? et al व्यक्तींविषयी वापरतात का?)

आणखीही बरेच शब्द असतात. आय गेस यू गॉट द पॉईंट.

आता असा शब्द एकदा वाचण्यात आला की गूगलबाबाकडून वेगवेगळ्या ऑनलाईन डिक्शनर्‍या उघडून त्याचे सर्व अर्थ छटांसहित शोधता येतात. त्यात नवे काही नाही. पण मुदलात असे शब्द माहीत होणं हेही महत्वाचं आहे.

याशिवाय इंग्रजी साहित्यातले आपल्याला अचानक समजलेले आणि आवडून गेलेले अनवट किंवा ऑफबीट शब्द किंवा शब्दरचना अशा ध्याग्यात / विभागात दिल्यास फार उपयोगी पडतील. संदर्भ माहीत झाल्याने आणखी रोचक वाटेल.

व्यवस्थापकः तपशीलवार चर्चेसाठी हा धागा वेगळा काढत आहोत.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

et al = etc & elsewhere.

etc = et cetera.

et al साधारणपणे एखाद्या रिसर्च पेपरच्या संदर्भात वापरलेला पाहिला आहे, उदा. गवि et al यांच्या त्या पेपरमध्ये असं होतं इ.इ.इ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

इथेच चर्चा सुरू करूयात. जरा वेळाने वेगळा धागा काढतो. तोवर याविषयाशी संबंधित प्रतिसाद या गविंच्या प्रतिसादाला उपप्रतिसाद म्हणून द्यावेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

म आंजा वरील कैक सदस्य पुढील शब्द शिकूनच जन्माला येतो की काय असं वाटतं :-
सर्व्हायवर बायस
स्टॉकहोम सिंड्रोम
मिडलाइफ क्रायसिस
इडिपस कॉम्प्ले'क्ष'
अ‍ॅड होमोनिम
जीन पॉल सार्त्र ह्याचा एक्झिस्टंशालिझम
.
.
ही अशा शब्द्-संज्ञांची यादी अनंत होइल. पण राघा, चिंज, मुसु, नंदन , अदिती , गब्बर(आणि इतरही अनेक्...सगळ्यांची नावं आठवणं चटकन आठवणं शक्य नै )
.
.
आम्ही खूप कै तपशीलवार सांगायला जातो आणि ह्यांच्याकडे त्याबद्दल एखाद दोन शब्दांच्या नेमक्या, टू द पॉइण्ट संज्ञा तयार असतात.
त्या संज्ञांवर झालेले संशोधन ठौक असते. ह्यांचा एकूण आवाका आमच्या कैक प्रकाशवर्षे पुढे असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्व्हायवर बायस

कोणत्याही दोन गुंतवणुकींचे लाँग टर्म जवळजवळ समानच असते असे आम्ही म्हणालो तेव्हा झालेला हमला आठवला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

एक अनके अर्थछटा असलेलं Ain't.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या ain't ने बराच गोंधळ मनात केला आहे. ain't म्हणजे "am not" किंवा "are not" यापैकी काहीतरी असावं असं सिनेमांत तो शब्द पाहून वाटायचं.

पण "ain't no" असे दोन नकारवाचक भाव एकत्र करुन "I ain't no poet" वगैरे वाचून नेमका पोएट आहे की नाही हे समजेना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"I ain't no poet"

ही कृष्णांग्ल भाषेची लकब आहे. याचा अर्थ मी कवी नाही असाच होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

असेच काहीसे झाले माझे, मग अनेक वेस्टर्न चित्रपट पाहिल्यावरच समजले मला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

what ain't no country i ever heard of या प्रसिद्ध ड्वायलाकची आठवण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

'डबल निगेटिव्ह'वरून हा विनोद आठवला:

A linguistics professor was lecturing to his English class one day. “In English,” he said, “a double negative forms a positive. In some languages, though, such as Russian, a double negative is still a negative. However, there is no language wherein a double positive can form a negative.”

A voice from the back of the room piped up, “Yeah, right!”

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडलं. असल्या जातकुळीचं अजून काही असेल तर येऊ द्या. वाचायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमुक एक गोष्ट उदाहरणार्थ रोचक वाटणे/असणे हाही त्यातलाच मामला म्हणता यावा काय? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"उदाहरणार्थ रोचक" अशा स्वरुपाची रचना ही नेमाड्यांची स्टाईल म्हणून प्रसिद्ध आहे ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यातलं उदाहरणार्थ एवढीच स्टाईल आहे बहुधा. रोचक पिल्लू हे खास ऐसीवर जोडलेले, असा माझा समज आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ना-ना प्रकारांनी शेवटी गॉथमदासाची कथा मूळपदावरच! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वर्डस्मिथ या वेबसायटीचा "अ वर्ड अ डे" हा उपक्रम फारच मस्त आहे. प्रत्येक आठवड्यात एखादी थीम घेऊन तत्संबंधी शब्दांचं विवेचन करतात. या आठवड्याची थीम "पुस्तकांशी संबंधित शब्द" अशी आहे.

अवांतर/समांतरः केवळ शब्दलालित्य या गोष्टीसाठी वुडहाऊसच्या पुस्तकांची अनेकदा पारायणं करतो. खर्‍या अर्थाने शब्दप्रभू होता हा बाबा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

बुर्झ्वा (कोणी फ्रेंचाने सांगावे की सायलेंट काय आणि मोठ्याने काय ते), म्हणजे ब्लडी व्हर्न्याक म्हणजे घाटी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांडारकर रस्त्याला फार पूर्वी या नावाची चहाकॉफीची टपरी असल्याचं आठवतं.

बाकी bourgeois लिहून बूर्ज्वा असं वाचायचं म्हणजे पुलंच्या भाषेत, "कुलकर्णी" लिहून "अलबुकर्क" वाचण्यापैकी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिवाय ज्याची हिंदी द्वितीय भाषा आहे आणि 'मराठी प्रथम भाषा आहे'* त्याला हा शब्द वाचावा लागणे मंजे ... असोच.
------------------------------------------------------------
म्हणजे मला, मेघनाताईंची रितसर माफी मागून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

(जा जा जा घाश्या.... केला तुला कोतवाल!’ या चालीवर वाचणे (गुर्जींच्या नावे कानाच्या पाळीस स्पर्शून!)
जा जा जा अजो, दिली तुम्हांस माफी! (एवढ्या एका प्रतिसादापुरती, नाहीतर उताल-माताल लगेच!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ते खरं तर,
'घाश्या, अक्करमाश्या.. जा... केला... केला तुला कोतवाल!' (मला यातले सुरूवातीचे दोन शब्द अनेक वेळा ऐकावे लागलेले आहेत)
तेव्हा तुला 'जोश्या, अरुण खाशा, ...' पासून सुरूवात करायला लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'घाश्या, अक्करमाश्या.. जा... केला... केला तुला कोतवाल!'
ह्याच्या पुढेही एक ओळ आहे नाटकात :-
'जाउन हमामा घाल'
.
.
हमामा हा एखादा झिम्मा-फुगडी स्टाइल खेळ/अ‍ॅक्टिविटी आहे की अजून काही ?
हमामखाना म्हंजे स्नानगृह ना ? त्याचा आणि ह्या हमामाचा संब्म्ध असेल काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरोबर आहे. पण सहमेंब्रांचा असा अवमानकारक उल्लेख? चेष्टेत झाला तरी काय झालं? तोही पुरोगामित्वाकडे वळलेल्या ताज्या दमाच्या कोमल मनाच्या मेंब्रांचा? शक्य नाही, मला हे कदापि शक्य नाही. त्याकरता, केवळ त्याकरता, तेंडुलकरांचे शब्द गिळण्याचं पातक मी केलं.. कराल ना मला क्षमा गुर्जी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

भांडारकर रस्त्याला फार पूर्वी या नावाची चहाकॉफीची टपरी असल्याचं आठवतं.

अगदी हेच आठवलं गवि. ही टपरी म्हणजे आमच्यासारख्या रातकिड्यांसाठी स्वर्ग होतं. रात्री-अपरात्री कधीही जा, छुप्या दरवाजाने मॅगी, ऑम्लेट, चायनिज, चहा/कॉफी,सिग्रेट सगळं काही मिळत. पुरुषोत्तम करंडकाच्या मौसमात तर रात्रीच्या वेळी जवळपासच्या अनेक महाविद्यालयांचे (BMCC,MMCC,IMCC, Garware, Fergussion etc.) कलाकार लोक तिथे एकमेकांना भेटत आणि उजाडे पर्यंत चकाट्या पिटत बसत. वाह एकदम डोळ्यासमोर तरळलं सगळं लख्खकन...असो, गेले ते दिन गेले...!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'भांडारकर रोड' नाही, 'भांडारकर इन्स्टिट्यूट रोड'.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमचा एक मित्र टट्टे, टट्टी, टोट्टे, टिट्स असे शब्द वापरत असे. तेव्हापासून मला या शब्दांची जरा भितीच वाटायची. एकदा कंपनीच्या कॉलनीत एका कक्षावर "टॉट्स ..." अशी कायतरी पाटी होती. पाच सहा महिने मला त्याच्यात कायतरी उच्चभ्रू हलकट प्रकार होत असावा असे वाटायचे.
नंतर असे कळले कि पेपरांचे अग्रलेख, जीआरी, इ इ चीच तयारी केल्यामुळे आपण आपल्याला ३-४ अक्षरी इंग्रजी शब्दसंपदा नाहीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

Aka = उर्फ. नक्कि माहित नाही. पण बहुदा उर्फच.

कधीकधी आपली मापं काढलीयेत की तारीफ केलीय हेही कळत नाही.

Smile सुरुवातीला जेंव्हा "वास्स्प" अशी विचारणा व्हायची तेंव्हा वाटायचे "हाउ आर यु" मग मी म्हणायचो "कुल, हाउ आर यु ?" समोरचा संभाषण चालु ठेवत असे. नंतर लक्षात आले वास्सप म्हणजे वॉट्स अप म्हणजे वॉट्स इज हॅप म्हणजे व्हॉट इ़ज हॅप्पन्ड (विद यु) हा उर्मट अमेरिकन शब्दप्रयोग आहे जो आज काल आपली उर्मटता विसरुन पोलैटली "काय झालं रे" अशा अर्थाने विचारला/वापरला जातो. थोडक्यात आतां संभाषण असे असते

मी: हे...!
समोरुनः हे वास्प ?
मी: व्हॉट डु आय ओव यु द प्लेजर ऑफ सीइंग युव ओनलाइन राइट नाव ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

अका म्हणजे आल्सो नोन अ‍ॅज.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

"how do you do?" हे एकप्रकारचं पॅसिव्ह संबोधन असतं.
त्यावर आपण परत "how do you do?" म्हणू शकतो पण "I am good", "fine" वगैरे बरळायचं नसतं.
ते "How are you" वर बोलायचं असतं. अन शेवटी politely "Thanks" ही म्हणावं शक्यतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

अजुन एक. How is it going... ? मला हा प्रश्न एक युरोपीअन सिनीअर विचारायचा अन मी कोड्यात पडायचो याला नक्कि काय विचारायचे आहे ? मी आपलं गुड, गोइंग वेल असं थातुर मातुर उत्तर द्यायचो. ते त्याला पचणं स्वाभावीक होतं कारणं आमचं व त्याचं इंग्लीष फार चांगलं नाही असं आधीच एक्नोलेज करुन एकमेकां संभाळुन घेउन काम करा असे आधीच सांगीतलेले असे. तरीही मला हा प्रश्न कायम कोड्यात टाकत असे. बरं कामाबद्दल विचरतो आहे तरं बाबा स्पेसिफीक विचारना फलाना फलाना चे स्टेट्स काय म्हणून ? त्यावेळी मला कधीच कळले नाही हा नक्कि काय विचारतोय Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

Wassup चं रुप आहे ते. "मग काय म्हणता?" असे आपण म्हणतो तसे.
मी इथे अमेरीकेत तर नुसतं "sup" देखील ऐकले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

लू(loo) म्हणजे - Toilet/संडास.
हा शब्द कॉलेजपर्यंत माहीत नव्हता.
__________
आजकाल मुलगी उपरोधाने "nice" अन "Really?" शब्द वापरते.
म्हणजे एकदम स्फोटक काही घडलं आता कोणतं डिसेंट उदाहरण देऊ? Wink
२ भयाण उदाहरणे आहेत पण नकोच.....
_____
च्यायला इथे कोणाला भेटायचय देतेच उदाहरणं. अन तसाही आमचा लाजेचा थेशोल्ड लई लो आहेच -
(१) म्हणजे घरात सर्वजण गप्पा मारतायत अन हसताना/शिंकताना किंवा असाच कोणाला वारा सरला, की आम्ही सगळे खदाखदा हसतो, माझी टीनएजर मुलगी मात्र संकोचून काहीतरी स्फोटक (पन नॉट इन्टेन्डेड) घडल्यासारखा चेहरा करुन - "Really?"
(२) एके दिवशी मी तिला लाडानी म्हटलेलं - ए बिट्या अगं किती छोटं बाळ होतं तू, इवले इवले कुल्ले ग बाई!! त्यावर मुलगी संकोचून म्हणे "nice"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

loo.. अगदी अगदी.

मला तर पहिल्या नोकरीपर्यंत माहीत नव्हतं. पार भोटमपणा.

पहिल्या दिवशी एचआरच्या मुलीने ऑफिस दाखवताना एका ठराविक दिशेने बोट करुन "देअर इज द लू" असं दाखवलं होतं. ते समोर नव्हतं. पण त्या दिशेतच टॉयलेटच्या वळणाआगोदर एक मोठी टेरेस होती. तिथून रात्री सुंदर दृश्य दिसायचं. तिथे समोर ऑफिसचा ऑपरेशनल एरिया होता. तो पूर्ण दिसायचा. त्यामुळे मला लू याचा अर्थ "ऑब्झर्वेशन गॅलरी" असा वाटला. त्यानुसार समजत अनेक दिवस गेले.

नेहमीच नाईटशिफ्ट. बरेचजण आय हॅड गॉन टू लू.. शी इज इन द लू.. असं म्हणायचे. तेव्हा या सर्वांना अधूनमधून टेरेसच्या मोकळ्या जागेत जाऊन खाली काय चाललंय ते ऑब्झर्व करुन येण्याची सवय दिसतेय असं वाटत राहिलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL
हाय मैं 'लू'त गया!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नशीब loo चा अर्थ माहित झाल्यावर लग्गेचच Musée du Louvre हे शब्द कानावर पडले नाहित ते !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला तर पहिला विमानप्रवास करेपर्यंत लू हा प्रकार माहिती नव्हता. मुतारीसाठी ऐकलेला जास्तीतजास्त प्रतिष्ठित शब्द म्हणजे प्रसाधनगृह (किंवा इंग्रजीत बाथरुम/टॉयलेट). हॉपिसात अनुभवी प्रवाश्यांनी नवख्यांना सांगायच्या युक्तीच्या गोष्टींमध्ये हा शब्द पहिल्यांदा ऐकला. ''लू'ला जातानाही ब्यागा वगैरै अगदी आत ष्टॉलपर्यंत (याला ष्टॉल म्हणतात हेही तेव्हाच कळले) घेऊन जात जा. ' हा सल्ला ऐकल्यावर काहीतरी फ्रेंच न्याहारीबाबत तो मजामजा सांगत आहे असे वाटले.

बाकी लू आणि ष्टॉलवरुन आठवले. नोकरीला लागलो तेव्हा कंपनीने मेडिकल चेकप करायला लावला होता. त्या ल्याबमधल्या रिसेप्शनिष्टने दोन छोटी बाटल्या देऊन उद्या युरिन आणि स्टूल सँपल घेऊन या असे सांगितले. आता युरिन म्हणजे काय हे माहिती होते. पण स्टूल म्हणजे मांडणीच्या वरच्या कप्प्यावर ठेवलेले लाडवाचे डबे किंवा वडे-सांडगे काढण्यासाठी वापरण्याचे एक साधन इतकेच माहिती असल्याने 'स्टूल सँपल' म्हणजे काय हे पुन्हा तिलाच विचारुन आम्ही बहुदा तिचा विनयभंग केला असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'रेस्टरुम' हा शब्द पहिल्यांदा ऐकला तेव्हा बसायला मऊ गादी वगैरे असलेला हा अ‍ारामगृह-लाऊंजसदृश काहीतरी प्रकार असेल असे वाटले होते.

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही खट कर्मचारी काम टाळण्यासाठी टॉयलेटमध्ये जाऊन बसतात. त्यामुळे रेस्टरूम हा शब्द आला असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

फाडफाड बोलणाय्रांकडून भाषा शिकली की काय बरोबर अन काय चूक काहीच कळत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनेक लोक सायकिक (psychic) आणि सायको (psycho) या शब्दांची सरमिसळ करताना दिसले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

वेदर आणि क्लायमेट ही अशीच एक अमर जोडी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

भारतात असताना या दोहोंत नेमका फरक काय आहे हे कधी समजले नव्हते. viz. तसा सामान्य लेखनात फारसा येत नाही. शिवाय i.e. and eg. यांचा वापरही एकमेकांऐवजी केला जात असल्याने गोंधळ अजून वाढतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

..अतिशहाणा, आदूबाळ आणि नाईलशेठ.अहो काय फरक आहेत ते पण सांगा की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी लहानपणी विंग्रजीच्या क्लासाला फर्ग्युसन कालेजातून निवृत्त झालेल्या एका विंग्रजीच्या प्राध्यापकांकडे जायचो (पेश्शल क्लास, मी एकटाच असायचो) त्यांनी शिकवलेलं आठवतं -

viz. - namely
e.g. (exampli gratia) - for example
i.e. - that is

तसंच एक n.b. (nota bene) पण असायचं. पण त्याचा अर्थ विसरलो. बहुधा 'प्लीज नोट' असा असावा,

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमची नगरची मराठी शाळा चांगली होती म्हणायची. हे आम्हाला शाळेतच शिकवलं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शाळेतही शिकवलं असावं. पण शाळेत टवाळक्या करण्यापुढे वेळ कोणाला होता? क्लासलाही घरचे दामटून पाठवायचे म्हणून जायचो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्हांला हे अकरावीला शिकवलं होतं क्लासमध्ये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

et al=प्रभृति, वगैरे, वगैरे-वगैरे
etc= इ.इ. अर्थात इत्यादि,इत्यादि-इत्यादि.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोनदा पाठवला गेल्याने प्रकाटाआ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फ्रेंच शब्द मुद्दाम चुकीचे उच्चारावेसे वाटतात. जर ती अक्षरं बोलायचीच नसतील, तर मग उगाच खर्च कशाला?
अगदीच विचित्र प्रकार. जर उदया दुकानावर "बनियन मिळतात" असं लिहिलं असेल आणि त्याचा उच्चार "बॉ मिळ्" असला तर कसं होणार?
म्हणून बोलतो आम्ही संपूर्ण फ्रेंच शब्द.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमचेही असेच मत होते (अजूनही काहीसे आहे) पण फ्रेंच जाणकारांनी सांगितलं की फ्रेंचपुरते उच्चारनियम तसे कडक आहेत. आपण इंग्लिश चष्म्यातून फ्रेंचकडे पाहिल्याने फ्रेंच गंडलेली वाटते, खरी गंडकी भाषा इंग्लिश आहे, इ.इ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Fish = Ghoti असं शॉने म्हणायच्या आधीच आम्हाला माहिती होतं की इंग्रजी गंडली आहे Biggrin
पण देवनागरी वाचून/लिहून राहिल्याने फ्रेंच अगदीच भिशक्याव वाटते.
--------
फ्रेंच उच्चारनियम कडक आहेत हे ऐकून बरं वाटलं. तरीही उरलेली व्यंजनं रद्दीत विका म्हणावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"काही" फ्रेंच गोष्टी आवडण्यावाचून पर्याय नाही Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

तरीही उरलेली व्यंजनं रद्दीत विका म्हणावं.

व्यंजनांऐवजी स्वरांना हे अधिक लागू व्हावे काय? जर फ्रेंच स्वर विकले तर पोलिश वगैरे स्वरहीन भाषांची सोय तरी होईल. zdzisław वगैरे नावे पाहता तिथली स्वरटंचाई किती भीषण आहे हे जाणवतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कसली फ्रेंच अक्षरांची चर्चा होऊन राहिलीय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मज्जाच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अधिक गूगलले असता, याचा संबंध फ्रेंच अक्षरांपेक्षा फ्रेंच टपालाशी असावा, असे दिसते.

(अतिअवांतर: मज्जेच्या धाग्याला 'मज्जातंतू' आणि मज्जेमज्जेच्या धाग्याला 'मज्जारज्जू' असे संबोधता यावे काय? किंवा, 'खूप मजा आली' -हिंदीत 'बडा मज़ा आया' - यातील 'खूप मजा' अशा अर्थी 'लंबमज्जा'? (तुलनेकरिता 'खुदा आप को लंबी उम्र बख़्शे' वगैरे आठवून पाहावे.))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मज्जारज्जूची सजेशन आम्ही मिरजेस असताना शाळेतच दिली होती, पण अंगभूत आळसामुळे पाठ्यपुस्तक समितीला याची शिफारस करता आली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

महाभयंकर बोअरिंग धाग्याला सजारज्जू असे नाव द्यावे काय?

१. अदितीस्केल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या दहावीत स्पायनल कॉर्डला मज्जारज्जू हाच शब्द होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

एका कलीग च आडनाव 'Boudreaux' आहे, उच्चार 'बुद्रु'. सहसा आडनावाने हाक मारण्याची प्रथा नसल्यामुळे उच्चार कधी कळलेच नव्हते.

तसचं हल्ली एक गाणं ऐकलं किंबहुना तेच गाजत असलेलं गाणं पन्नास वेळा रेडिओ वर लागतं 'Girls hit your hallelujah'- ह्या मध्ये hallelujah हा ही एक वेगळाच शब्द वाटतो. टेकनिक्ली तो रोजच्या संभाषणात किंवा लिखित स्वरुपात कुठे पाहिलेल आठवत नाही पण बोली भाषेतला असावा किंवा विशिष्ट धर्माशी रीलेटेड असावा.

--मयुरा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...बोले तो, Praise the Lord. (हिब्रूत.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे हॅलेलूया गाणं बघा. Girls hit your hallelujah पेक्षा खूपच चांगलं आहे.

बाय द वे, चर्चा इंग्रजी शब्दांचं स्टेशन सोडून भलतीकडेच चालली आहे की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बॉन जोव्ही चं हालेलुया अफाट गाणं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

"Mutatis mutandiस" = "the necessary changes having been made"

आणि

"Ceteris paribu" = "अदर थिंग्ज बीईंग इक्वल"

हे दोन्ही कोर्टकायद्याच्या /करार आणि निकालातील शब्दरचनेच्या निमित्ताने कुठेतरी समजून घ्यावे लागले तेव्हा जालावर शोधले होते.

quid pro quo असेही ऐकले आहे. नेमका अर्थ जालावर शोधणे आले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे लॅटिन फ्रेजेसचं कलेक्शन सापडलं:

http://en.wikipedia.org/wiki/List_of_Latin_phrases_Angel

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...ही न्यायालयीन संदर्भात वापरली जाणारी संज्ञा खास भारतीय उपखंडीय ल्याटिनातली आहे, असे वाचल्याचे स्मरते.

('ब्रिंजल', 'टिफिन' आदि हे जेणेकरून खास भारतीय उपखंडीय इंग्रजीतील आहेत, तद्वत.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुओ मोटू/मोटो ही संज्ञा ब्रिटिश आणि अमेरिकन करकायद्यांत अनेकदा वाचली आहे. त्यामुळे सर्वस्वी भारतीय नसावी.

हां, पण हा शब्द पॉपुलर करायचं श्रेय मात्र भारताकडे जात असावं.

असेच भारतीय करकायद्याने पॉप्युलर केलेले काही शब्द:
- बट्रेस (बट्रेसिंग अ पर्टिक्युअर आर्ग्युमेंट)
- स्टे (ऑफ टॅक्स डिमांड) - बाकी देशांत "कीपिंग डिमांड इन अबेयन्स" म्हणतात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

वाह, मुटाटिस मुटांडिस म्हणायला मस्त वाटतं. पहिल्यांदाच ऐकला शब्द हा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

पण तिचा अर्थ अतिशयच अघळपघळ आणि अस्पष्ट आहे. इनफॅक्ट सोयीस्कर संदिग्धता ठेवणारा कातडीबचाऊ शब्द आहे असं म्हणावंसं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही नावंदेखिल स्पेलिंग एक आणि उच्चार भलताच अशी असतात
sean शॉन
jean paul ज्याँ पॉल
cronje क्रॉनिए
boje बोए

असं J चा उच्चार 'ज' न करण्याच्या सवयीने एका अमेरीकन सहकार्‍याने देशी Rajani नावाचा उच्चार रइनी केला होता Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्रपट - द टर्मिनल
स्टॅन्ली टुची 'गुप्ता राजन' असे नाव असलेल्या माणसाच्या नावाचा उच्चार 'गूप्टा राहान' असा करतो. ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खुप दिवसांपुर्वी एक लेख वाचला होता लोकसत्तामध्ये. त्यामध्ये एक छान निरिक्षण होते. युरोपियन भाषा जर J चा उच्चार 'ज' न करता 'य' च्या जवळपास करत असतील तर बर्याच भारतीय भाषा 'य' चा 'ज' करतात. उदा: बंगाली

काही शब्द उदाहरणादाखल:
योग - जोग
युगुल - जुगल
यमुना - जमुना
सुर्य - सुरज

आपण 'ज' चे 'य' सुद्धा केले आहे Smile
उदा: जार - यार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही उच्चार बंगाली भाषेत नाहीतच. ते उच्चार बंगाली लोक वेगळेच करतात.

व ऐवजी ब म्हणत असले तरी वीकली शब्दाचा उच्चार बंगाली लोक बीकली असा करत नाहीत. काहीसा उइकली असा करतात.
युको बँक हे कलकत्त्यात इउको बँक असे लिहिलेले पाहिले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

...'य' हा उच्चार बंगालीत आहे. मात्र, तत्समांतल्या काही 'यं'चा 'ज' होतो, हेही तितकेच खरे. (किंबहुना, बंगाली लिपीत दोन 'ज' आहेत. एक च-छ-ज-झ-ञ-मधला, आणि एक हा तत्समातल्या 'यं'च्या बनणार्‍या 'जं'करिता. शिवाय 'य'ही आहे.)

तूर्तास इतकेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शब्दारंभी मात्र य चा नेहमी ज होतो. बाकी य आहेच-विशेषतः शब्दांती, उदा. बॉन्दोपाद्धाय, इ.

बाकी ते उइकी, उईक, वगैरेबद्दलः बंगालीत अद्वैत आहे ते बी आणि व्ही चे. डब्ल्यू असेल तर तो उइ, उआ, इ. पद्धतीने उच्चारला जातो.

मुळात भारतीय भाषांत दंतोष्ठ्य आणि निव्वळ ओष्ठ्य असे दोन व चे उच्चार मानले जात नाहीत- अ‍ॅज़ इन त्यांत फरक केला जात नाही. व्ही वाला व म्हणजे खालचा ओठ वरच्या दातांना स्पर्श केल्यावरचा उच्चार, तर डब्ल्यू म्हणजे तोंडाचा चंबू करून ओठ दातांना न चिकटविता केलेला उच्चार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शब्दारंभी मात्र य चा नेहमी ज होतो.

हम्म्म्म... हे लक्षात आले नव्हते. रोचक निरीक्षण आहे. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सध्या कलकत्त्यात राहात असल्यामुळे या गोष्टी खुप वेळा वाचनात आल्या आहेत.

वीकली बद्दल थोडेसे:
मी आणी बॅटमॅन एकदा चर्चा करत असताना हे बोललो होतो.
एखादा इंग्रजी शब्द बंगाली लिपी मध्ये लिहायचा असेल आणि त्यामधे 'v' हे अक्षर असेल (उदा: व्हाइस) तर त्याचा उच्चार 'भाइस' असा होतो. (कारण 'व' चा 'ब' होउन ब्+ह = भ)
हाच न्याय 'w' ला लागु नाही. वीकली याचा उच्चार जरी 'वीकली' च्या जवळपास जाणारा असला तरी लेखन करताना 'ओइकली' असे केले जाते. वेलिंग्ट्न याचे लेखन ही 'ओएलिंग्टन' असे केले जाते, 'वर्ल्ड' चे 'ओआर्ल्ड', हार्डवेअर चे 'हार्डओएर' असे केले जाते.
जर तुम्ही हे शब्द थोडेसे जलद गतीने उच्चारले तर जो परिणाम अपेक्षित आहे तो मिळु शकतो. या सगळ्या गोष्टी लेखनात जास्ती महत्वाच्या आहेत.

U या अक्षराबद्दलही तसेच म्हणता येइल. या 'यु' जे 'जु' असे न करता त्याला वेगळ्या पद्धतीने लिहिले जाते.
युको - उइको
इन्स्टिट्युट - इन्स्टिटीउट
स्वीट्स - सुईट्स

बंगाली मध्ये 'व' हे उच्चार नसल्याने लिहिताना या सर्व गोष्टींची काळजी घ्यावी लागते.

क्ष बद्दल पण तसेच म्हणावे लागेल. बंगाली मध्ये 'क्ष' च्या उच्चार नियम म्हणुन 'क्ख' असा केला जातो पण त्यासाठीचे अक्षर बंगाली मध्ये आहे.
उदा:
दक्षिण - दक्खिन
शिक्षा - शिक्खा
परीक्षा - परीक्खा

असो. बरेच अवांतर झाले. कधीतरी हिंदी-मराठी-बंगाली यांच्यातील जेवढी मला सापडली तेवढी साम्यस्थळे आणि फरक (लिपी आणि उच्चार दोहोतील) लिहिण्याचा विचार आहे. बघु कसे काय जमते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या प्रतिसादाच्या वरचा आमचा प्रतिसाद पहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पॅरीस हिल्ट्नचा पेपरमधील उल्लेख हा पॅरिस शहरातल्या हिल्ट्न या हॉटेलविषयी असावा असं खूप दिवस वाटत होतं Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अनवट को इंग्रजी में क्या कहते है?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

peculiar?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

एक्झॉटीक?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अनवट को इंग्रजी में क्या कहते है?

शायद रिंग?

http://dsalsrv02.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%85%E0%A4%...

अनवट (p. 027) [ anavaṭa ] m A ring furnished with silver balls, worn on the great toe.

1. अनवट-ठ : (page 66)

अखंड; अकुंटित; व्यापक; अभंग. 'ऐसी अनवच्छिन्न समता । भूतमात्रीं सदयता ।'-ज्ञा २.२९८. [सं. अ + अव + छिद्]
अनवट-ठ—पु. पायाच्या अंगठयांत घालवायचा रुप्याचा दागिना; 'अणवट' पहा. 'अनवट निटल्या ही जोड त्या जोड- व्यांचा

2. अनवट-ठ : (page 66)

२.२९८. [सं. अ + अव + छिद्]
अनवट-ठ—पु. पायाच्या अंगठयांत घालवायचा रुप्याचा दागिना; 'अणवट' पहा. 'अनवट निटल्या ही जोड त्या जोड- व्यांचा ।'-सारुह ६.३१; 'जोडवी अनवठ मासोळ्या ।।'-स्त्रीगीत ६५.

3. जोडवें : (page 1330)

मधल्या (पायाच्या किंवा हाताच्या) बोटांचा घालावयाचें एक जाड व मोठें वळें (चांदीचें किंवा सोन्याचें). 'जोडावी अनवट मासोळ्या ।'-स्त्रीगीत ६५.
जोडा—पु. १ एकाच जातीच्या पदार्थांची जोडी, या पैकीं दोन

थोडक्यात - जोडवे

आता या शब्दाच्या चुकीच्या वापराचा जालावर सुळसुळाट झालाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत. हा अर्थ कधीपासून चिकटला काय की. अगोदर बहुतेकदा हा शब्द सांगीतिक संदर्भात ऐकल्याचे स्मरते, उदा. अनवट सूर, अनवट राग, इ.इ.इ. नॉनस्टँडर्ड, एग्झॉटिक, इ.इ. छटा तिथूनच चिकटल्या असाव्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अनवट सूर, अनवट राग, अनवट चव, अनवट चाल वगैरे वाचून हा शब्द रुढ झालाय. गूगल केले तर आणखी खालील वापर सापडले

अनवट चौकडी
अनवट कंगोरे
अनवट गझला
अनवट पदार्थ
अनवट भांडी
अनवट किल्ले
अनवट दुर्ग
अनवट धून
अनवट डोह
अनवट सम
अनवट वाट
अनवट वीण

अनवट नावाचा एक सिनेमाही आहे . त्याच्या परीक्षणात (http://www.ibnlokmat.tv/archives/130989) अनवटचा अर्थ

अनवट म्हणजे खूप वेगळा किंवा अनवट म्हणजे सहजी वापरात नसलेले राग किंवा गाण्याच्या चाली

असा दिलाय.

आयबीएन लोकमतला कितपत ग्राह्य सोर्स मानावे याची शंकाच आहे.

अाणखी एकः http://www.misalpav.com/node/5719

मिपा परिवारातर्फे या अनवट कलाकाराचे मन:पूर्वक अभिनंदन..

हृदयनाथ मंगेशकर हे अनवट कलाकार? च्यायला सकाळसंध्याकाळ सारेगमपमध्ये टीवीवर दिसत असूनही अनवट?

असाच एक डोक्यात जाणारा शब्द म्हणजे 'संयत'. त्याविषयी पुन्हा कधीतरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भोफोकमतला सोर्स मानण्याची कै गरज नाहीये. मोल्सवर्थवरून मूळ अर्थ काय आहे ते तरी कळालं. २० व्या शतकात कधीतरी हा अर्थ रूढ झाला असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गेल्या दहाबारा वर्षातच हा नवा अर्थ रुढ झाला असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी दहाबारा वर्षांइतका नवाही शब्द वाटत नैये. पण मोस्ट लाईकलि नॉट ओल्डर दॅन से ३०-४० ईयर्स.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शक्य आहे. एक अंदाज. -

शास्त्रीय वगैरे उच्च अभिरुचीच्या संगीताचे चाहते मुख्य प्रवाहातील माध्यमात समीक्षा लिहायला लागल्यापासून हा शब्द जरा रुढ व्हायला लागला असेल. हळूहळू आमच्यासारखे इतर सामान्यजनही लिहायला लागल्यावर एखाद्या शब्दासाठी नेमके विशेषण सुचले नाही की तिथे 'अनवट' हा शब्द टाकून पाहण्याचे प्रयोगही झाले असतील. आता अनवटचा जो अर्थ लावू तो घेता येत असल्याने हे प्रयोग यशस्वी झालेले दिसताहेत. Wink

उदा खालील वाक्यात काहीही वावगे दिसत नाही. Wink

अनवट संकेतस्थळावरील या अनवट चर्चेत अनवट प्रतिसाद देणारा एक अनवट प्रतिसादक

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशय अनवट प्रतिसाद. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मूळ नवा शब्द 'अनवाट' (कुणीही न चोखाळलेली वाट) असा असावा. त्याचाच पुढे स्वरलोप होऊन अनवट बनला असावा! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक शक्यता. (हा रोचक शब्दही आता डोक्यात जायला लागलाय!)

'न चोखाळलेली वाट'साठी लगेच आठवणारा शब्द म्हणजे 'आडवाट'. पण हा शब्द लईच गावठी वाटतो. निदान 'अभिव्यक्तीच्या भावसंपृक्त अविष्काराचे' वर्णन करताना मध्ये आडवाट अाडवी येणे म्हणजे कैच्या कैच. त्यापेक्षा वाचणाऱ्याला अजिबात न कळणारा 'अनवट' शब्द सोडून दिलेला बरा. Wink .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हिंदीमध्ये "अनूठा" हा द्विव्युत्पत्तिक शब्द आहे.

१. एका नीट न-ठरलेल्या व्युत्पत्तीतून तद्भव झाला (अङ्कवन्त? अङ्गुष्ठ शी संबंधित?), तेव्हा "जोडवे, पायाच्या बोटांना घालायचा अलंकार" या अर्थाने हिंदीत वापरात राहिला
याच व्युत्पत्तीतून मराठीत "अनवट"

२. संस्कृत "अन्-उद्-स्थित" पासून व्युत्पन्न होऊन जो "अनूठ" असा तद्भव झाला, तो "विलक्षण, असामान्य" या अर्थाने हिंदीत वापरात राहिला.
या व्युत्पत्तीमधून बहुधा मराठीत प्रचलित शब्द नाही. (काही दशकांपूर्वी तरी नव्हता.)

------
(आता कयास)
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत हिंदीमधून शिकलेले मराठीभाषक लोक बहुधा पहिल्या अर्थाने अनूठा<->अनवट ही जोडी चांगल्या प्रकारे ओळखत असावेत, आणि दुसर्‍या अर्थाने हिंदीत वापरही करत असावेत. त्यामुळे दुसर्‍या अर्थाने मराठीतही तो शब्द (त्यांच्या दृष्टीने योग्य प्रकारे मराठमोळा उच्चार करून) वापरत असावेत.
------
टिप्पणी : वापरू देत की! वेगवेगळ्या भाषेतून आयात केलेले शब्द मराठमोळे झाले की चांगले रुळतात. कानाला बरे वाटतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कयास पटणीय आहे खास. सहीच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पटण्यासारखे स्पष्टीकरण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनूठ ढेरे याचं काय मत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

जबरदस्त! या मूळ अर्थाविषयी कल्पनाच नव्हती!

संयत अभिनय म्हणजे नेमका कसा अभिनय हे मला कळलेलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

संयत अभिनय म्हणजे नेमका कसा अभिनय हे मला कळलेलं नाही.

अगदी अगदी. म्हणजे अभिनयाची शैली वगैरे का? आता हिटलरचा अभिनय संयतपणे कसा काय करणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

संयत अभिनय म्हणजे नेमका कसा अभिनय हे मला कळलेलं नाही.

बोले तो, हातचे राखून (अ‍ॅज़ इन भूमिकेशी तन्मय न होता) केलेला अभिनय असावा काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यासंदर्भात अंडरप्ले असा एक इंग्रजी शब्द वाचला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जुन्या जमान्यात फक्त दिलीपकुमार, अंडर प्ले म्हणजे संयत अभिनयासाठी ओळखला जायचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असाच एक डोक्यात जाणारा शब्द म्हणजे 'संयत'. त्याविषयी पुन्हा कधीतरी.

किंवा 'विहंगम'.

('संयत' बोले तो 'संयम राखून केलेला' ना? का कोण जाणे, पण 'बॅलन्स्ड' अशा अर्थाने वापरला जाताना सर्रास दिसतो.)

('विहंगम' बोले तो 'पक्षी'. आणि म्हणूनच 'विहंगम दृश्य' बोले तो 'बर्ड्ज़ आय व्ह्यू', साधारणतः दहा हजार फुटांवरून उडताना खाली पाहिल्यास जसे दिसेल तसे दृश्य, फारसे तपशिलात न जाता परंतु 'बिगर पिक्चर'. (बरोबर ना?) पण हा शब्द 'नयनमनोहर' अशा किंवा अशासारख्या अर्थी वापरला जाताना सर्रास आढळतो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'बर्ड्ज़ आय व्ह्यू' मधे काही घाण दिसत नसावे म्हणजे सगळं कसं छान-छान दिसत असावं, म्हणजे धारावी विमानातून पाहिली तर ती तितकीशी गलिच्छ वाटणार नाही असं काहीसं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक शक्यता आहे.

'बर्ड्ज़ आय व्ह्यू' मधे काही घाण दिसत नसावे म्हणजे सगळं कसं छान-छान दिसत असावं

बोले तो, त्या पक्ष्याने उडता उडता त्या घाणीस हातभार जरी लावला, तरी तो हातभार प्रस्तुत पक्ष्यास दिसू नये.

म्हणजे धारावी विमानातून पाहिली तर ती तितकीशी गलिच्छ वाटणार नाही असं काहीसं.

द्या टाळी! किंबहुना, मुंबई विमानतळावरून सर्वप्रथम जेव्हा उडालो होतो, तेव्हा खाली पाहून मुंबईबद्दलही नेमके हेच वाटल्याचे स्मरते.

किंबहुना, मुंबई ही किमान दहा हजार फुटांवरूनच सुंदर दिसू शकते, हे मत आजही दृढ आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------

तत्त्वतः त्यास 'हात'भार म्हणणे चूक असावे, परंतु तरीही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हृदयनाथ मंगेशकर हे अनवट कलाकार?

बरोबर आहे; त्यांना अ'नवट' असे अभिप्रेत असेल. बाकी वापरुन वापरुन अनवट शब्दही अ'नवट' झाला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही एक अनवट फोड म्हणता यावी. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माहितीचा स्रोतः लक्ष्मीकांत बोंगाळे नामक 'ऐसी'बाह्य मित्रवर्यांशी केलेल्या गप्पा.

शास्त्रीय संगीतात म्हणे 'राग वटवणे' अशी कायशीशी गंमत असते. (शास्त्रीय संगीताचं माझं अज्ञान अगाध असल्यामुळे या भागावर काही प्रश्न असल्यास ते मला विचारू नयेत अशी नम्र विनंती.) असे 'वटलेले राग' सोडून कुणी 'न वटलेला' एखादा प्रयोग केला, की त्याला 'अनवट' असं म्हणण्याची पद्धत आहे. तो 'अनवट' शब्द तिथूनच येऊन आजूबाजूच्या भागातही फोफावला असावा.

तर हे 'वटवणे' म्हणजे संगीताच्या संदर्भात नेमकं काय असतं (किंवा असं काही असतं का) याचा जाणकारांनी खुलासा करावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ऐला! नवीण माहिती!

@घाटावरचे भट - राग वटवणे म्हणजे काय? कोणा प्रस्थापित गुरूकडून मान्यता मिळवणे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

...अनवट राग, शब्दप्रयोग वगैरे बोले तो, बाउन्स झालेले काय? यानी कि खपवून देण्याचा प्रयत्न करूनही न खपलेले?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असेच वाटते. "हट के", उदा. कार्ल्याचे शिकरण वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अनवट म्हणजे चाकोरीबाहेरचा, वेगळा. साधारणतः शास्त्रीय संगीतात सुराने मेळ कसा घालायचा याच्या मूलभूत संकल्पना असतात त्याला छेद देणारे राग म्हणजे अनवट राग.

जवळपास सगळ्या रागांचे त्यांच्या मुख्य स्वरसंगतीनुसार वेगवेगळ्या दहा-बारा थाटात वर्गीकरण केले जाते. एखादा राग अशी स्वरसंगतीचा असतो की तो स्पष्ट्पणे कोणत्या थाटातला आहे ते ठरवता येत नाही मग तो अनवट ठरतो.

हे थाट पद्ध्तीचं वर्गीकरण पूर्वापारचं नाही तर गायन शिक्षणाला शिस्तशीरपणा आणण्याच्या हेतूने (बहुधा भातखंडेनी) आणलं आणि ते रुजलंही.

अवांतर : याच चालीवर अनवट वा॑ट म्हणजे वेगळीवाट वैगेरे. पण अनवट हा शब्द फिरणे, कला-साहित्यादी (निरुपयोगी?;)) गोष्टींसाठी वापरला जातो असं वाटतं. समजा माझ्या शहरात पाण्याची टंचाई आहे आणि माझ्या परसात विहीर आहे अश्यावेळी मी दोनचार कापड धुलाई यंत्रे घेउन "पैसे द्या कपडे धुवून घ्या" प्रकारचा व्यवसाय काढला तर त्याला अनवट व्यवसाय म्हणता येईल असे वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साधारणतः शास्त्रीय संगीतात सुराने मेळ कसा घालायचा याच्या मूलभूत संकल्पना असतात त्याला छेद देणारे राग म्हणजे अनवट राग.

असहमत. बरेच (किंबहुना सर्वच) अनवट राग हे शास्त्रीय संगीतांच्या नियमांना पाळूनच चालतात.

जवळपास सगळ्या रागांचे त्यांच्या मुख्य स्वरसंगतीनुसार वेगवेगळ्या दहा-बारा थाटात वर्गीकरण केले जाते. एखादा राग अशी स्वरसंगतीचा असतो की तो स्पष्ट्पणे कोणत्या थाटातला आहे ते ठरवता येत नाही मग तो अनवट ठरतो.

पुन्हा एकदा असहमत. अनवटचा आजकालचा साधारण अर्थ 'अप्रचलित' असा आहे. असे अनेक प्रचलित राग आहेत जे कुठल्याच थाटाशी जुळत नाहीत किंवा एकापेक्षा अधिक थाटांशी जुळतात. सबब केवळ वर्गीकरण होत नाही म्हणून एखादा राग अनवट होत नाही. शिवाय पूर्वी नियमित प्रचारात असलेले काही रागही आता अनवट क्याटेगरीत मोडतात. कारण ते कोणी गात/वाजवतच नाहीत. उदा. हंसकिंकिणी, खंबावती वगैरे. तसेच आज नियमित प्रचारात असलेले काही राग ७०-८० वर्षांपूर्वी अनवट होते, उदा. जोग, कलावती, इतकेच काय तर मारुबिहाग सुद्धा. आणि याच अर्थाने जयपूर घराण्याचे लोक तर बहुतांशी अनवट रागच गातात कारण त्यांचे राग बरेचसे त्यांच्या घराण्याला स्पेसिफिक असे आहेत.

हे थाट पद्ध्तीचं वर्गीकरण पूर्वापारचं नाही तर गायन शिक्षणाला शिस्तशीरपणा आणण्याच्या हेतूने (बहुधा भातखंडेनी) आणलं आणि ते रुजलंही.

भातखंड्यांनी थाट पद्धत आणली (किंवा कर्नाटकी संगीतातून उचलली असे म्हणणं जास्त योग्य होईल) हे मान्य. पण ती पद्धत प्राथमिक शिक्षणातच उपयोगी आहे. जसे जसे जास्त राग शिकत जातो तसा त्या पद्धतीचा फारसा उपयोग होत नाही कारण त्या पद्धतीत बरेच दोष आहेत. असो सविस्तर नंतर केव्हा तरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनवट राग ही संकल्पना थोडी चकवणारी आहे पण केवळ अप्रचलीत राग म्हणजे अनवट नव्हेत. त्यामुळे भरपूर गायला गेला तरी अनवट राग हा अनवटच म्हटला जातो. जर जुन्या आणि आता प्रचलीत नसलेल्या रागाला केवळ तेवढ्या एका कारणासाठी अनवट म्हटलं गेलं तर तो त्या श्ब्दाचा चुकीचा प्रयोग आहे.
बरेचदा अनवट रागांची रचना थोडी वेगळी किंवा ठरावीक पठडीतली नसते त्यामुळे ते फारसे गायले जात नाहीत. बरेचदा अनवट राग म्हणजे दोन तीन रागांचे मिश्रणही असू शकते पण केवळ असे मिश्रण म्हणजे अनवट राग नाही. रंगांमध्ये काही रंग हे प्रायमरी आणि काही दुय्यम असतात त्यासारखं काहीसं हे आहे.

रागांचे थाट पद्ध्तीत वर्गीकरण करताना त्यावेळच्या अनवट रागांसाठी वेगळे थाट बनवले नाहीत कारण ते राग कोणत्यातरी मूळ रागांचे ( एक वा एकापेक्षा जास्त रागांचे) वेगळे स्वरुप आहे असंच मानलं जातं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मीसुद्धा हा शब्दप्रयोग पहिल्यांदाच ऐकतो आहे. प्रचलित होणे/करणे असे असावे बहुधा. विचारून पाहातो इकडे तिकडे.

बोलताना (मराठीतला बोलताना नव्हे, ख्याल/चीजेचे शब्द तानेसारख्या रूपाने लांबवून म्हणणे)/बोलआलापांना 'बोलबनाव' किंवा 'बोलबाँट' असे म्हणतात. त्यातल्या 'बाँट'शी काही संबंध (मराठीकरणाद्वारे) आहे का ते तपासून पाहिले पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'यावेळी भूमिका चांगली वठवली/वठली नाही' किंवा 'सोंग वठवणे' मधला वठवणे हाच 'राग वठवणे'मध्ये अपेक्षित असावा.
थोडक्यात, राग हुबेहूब गाणे = राग वठवणे, असे असावे. त्यामुळे मग 'न वठलेला प्रयोग = अनवठ' असे आले असावे.
--
राग वठो/टो वा न वठो/टो, एखादा धनादेश वटला नाही की 'तुमचा चेक अनवट आहे बर्का' अशी तंबी ब्यांकांकडून यायला हरकत नाही ;).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मग चेक वटल्यावर बँका वटवट करतील काय? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

म्हणजे वठवणे = हुबेहूब नक्कल करणे / जितक्यास तितकी रक्कम मिळवणे! हे क्रियापद आपण धनादेश आणि अभिनयपटुत्व यांखेरीज वापरतच नाही की. अजून कुठे वापरता येईल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

भारतीय नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आल्यास ते थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतात. नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कोर्ट पाच प्रकारची writs काढू शकते. या writs ची नावं लॅटिन आहेत. कॉलेजात असताना ती वाचून, उच्चारून आणि त्याचं स्पेलिंग लक्षात ठेवता ठेवता आमचा जीव मेटाकुटीला आला होता:
Habeas corpus (आणि याचा अर्थ काय तर म्हणे 'you have the body' - कप्पाळ! 'हाजिर हो' असं साधं म्हणायला लॅटिन शब्द वापरावेत असं का आणि कोणाला वाटलं असेल?)
mandamus
quo warranto
certiorari
फक्त पाचवं prohibition हे बरं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे वरचे सगळे शब्द म्हणजे काय पण?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिव्या आहेत - सिवियस खंग्रियस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

किमान पहिली दोन तरी 'अ‍ॅस्टेरिक्स' मधल्या रोमन शिपुर्ड्यां/सेंच्युरियनां/गवर्नरांची नावे वाटताहेत. उर्वरितांबद्दल कल्पना नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मजाकस थोडियस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Habeas Corpus - एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीरपणे अटक झाली असेल, तर त्या व्यक्तीला कोर्टात 'हजर करा' असे सांगणारा कोर्टाचा आदेश.
Mandamus - आम्ही आज्ञा देतो. जनतेच्या सेवकांना (शासकीय कर्मचारी वगैरे) कोर्टाने दिलेली आज्ञा: अमुक काम करा, ते तुमचे कर्तव्य आहे.
Certiorari - माहिती द्या. अमुक केस (किंवा त्याबद्दलची माहिती) आमच्याकडे द्या अशी मोठ्या कोर्टाने खालच्या कोर्टाला दिलेली आज्ञा.
Quo warranto - कोणाच्या वॉरंटाने? - शासकीय कर्मचा-याने आपल्या अधिकारात न बसणारं काम केलं असेल, तर 'तुम्ही हे कुठल्या अधिकारात केलंत' असा कोर्टानी विचारलेला जाब.
prohibition - निषेध - मोठ्या कोर्टाने खालच्या कोर्टाला अमुक गोष्ट करू नका असे म्हणणे. कोर्टाचा 'स्टे' आला, म्हणतात ते हेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चार्वीसाएब,
कायद्याच्या क्षेत्रातली माहिती देणारे आपले सगळे प्रतिसाद अत्यंत माहितीपूर्ण असतात. ज्यांनी अभ्यासक्रमात कायदा शिकलाच नाही त्यांची कंसेप्ट फ्रेम क्लिअर करणार्‍या गोष्टी, आंतरराष्ट्रीय कायद्यांचे अस्पेक्ट्स ,इ इ माहिती आपणांस रुचि तसे वेळ असल्यास द्यात चला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मला साएब करून टाकल्याबद्दल धन्यवाद!
मी राज्यशास्त्र शिकल्ये. त्यामुळे राज्यघटनेशी संबंधित गोष्टी माहिती आहेत, पण कायदा, त्यातून आंतरराष्ट्रीय कायदा... नाही बुवा माहिती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतीय भाषांमधला शब्द 'ठग' इंग्लिशमध्ये गेला. सध्या बाल्टीमोरमधल्या परिस्थितीच्या निमित्ताने हा शब्द वापरला गेला, तो योग्य पद्धतीने वापरला गेला का?
The History of 'Thug'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

दिल्लीचा तो ठग आणि पुण्याचा तो भामटा, हे वर्गीकरण कधीपासूनचे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भामटा बारीक सारीक गुन्हे करतो.
ठग दरोडे आणि खूनसुद्धा करतात बहुधा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

दिल्लीचे ठग, मुंबईचे मवाली, पुण्याचे भामटे असे इतर शहरांना कोणीच का नसावे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मराठी न्यूनगंड अ‍ॅक्टिव्ह झाल्यापासूनचे? Smile

अगदी ठगीतही आम्ही लंबर एक असूच शकत नाही, इ.इ.?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

न्यूनगंड वगैरे काही नाही. भामटा हा शब्द ठगपेक्षा कितीतरी लेवल्सनी उच्च आहे.'भामटा'मध्ये अलौकिक बुद्धिमत्ता गृहीत, अनुस्यूत वगैरे असते. तर ठग हा शब्द मराठीत इंग्रजी मगशी जवळीक साधणारा आहे.भामटा म्हणजे चतुराई तर ठग म्हणजे मट्ठ गुंडगिरी.
आखिर शब्द आहे कुठला?!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहा, तेही बाकी खरेच म्हणा.

पण भामट्यांपेक्षा ठगाची व्याप्ती जास्त आहे असे वाटते. चूभूद्याघ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आज एक नवीनच शब्द कळला: dies non
बंगालमधे आज विरोधी पक्षांनी संप पुकारला होता. म्हणून राज्य सरकारने 'संपाच्या दिवशी कामावर हजर न राहणार्‍या कर्मचार्‍यांचा पगार कापला जाईल' अशी नोटिस काढली होती, त्यात हा शब्द वापरलेला दिसला. गूगलवर या शब्दाचे वेगवेगळे अर्थ सापडले: non-judicial day, ना काम - ना पगार तत्त्व. न कर्त्याचा दिवस असा काहीतरी अर्थ असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0