Skip to main content

एखाद्या रचनेला दुर्बोध कुणी ठरवायचं ?

ग्रेस गेले. खरं तर माणिक गोडघाटे गेले, ग्रेस आजही आहेत. माणिक गोडघाटे यांनी जे काही भोगलं त्यातून त्यांच्या भावविश्वात प्रचंड खळबळ उडाली. ही खळबळ एखाद्याला उद्ध्वस्त करण्याइतकी पाशवी होती. त्यावर एकच उपाय होता, तो म्हणजे व्यक्त होणे....

त्यासाठी ग्रेस जन्माला आले. माणिक गोडघाटे म्हणत मी एकटा नाही, माझ्याबरोबर नेहमी ग्रेस असतो. ग्रेस ही अभिव्यक्ती आहे. ही माणसं मोठी विलक्षण असतात. त्यांच्या साध्या बोलण्याचे अर्थही समजून घ्यावे लागतात. ज्या अनुभवातून दु:ख जन्माला आलं ते व्यक्त करणं म्हणजे रडणं हे ग्रेस यांना मान्य नव्ह्तं. भाषाशास्त्राचा आणि सौंदर्यशास्त्राचा प्राध्यापक अशी त्यांची जडणघडण झाली होती. त्याच वेळी मराठी साहीत्यिकांमधे दुर्मिळ असलेली प्रचंड विद्वत्ता हा त्यांच्या प्रकटीकरणाचा पाया होता.

ज्या वेळी मराठी कविता बंधनातून मुक्त होऊ पाहत होती त्याच वेळी जुनी वृत्त घेऊन ग्रेस आपले दु:खं कवितेच्या माध्यमातून व्यक्त करत होते. दु:ख व्यक्त करत होते हे मा़झ्यासारख्या सामान्य माणसासाठी सोपं आहे. खरं म्हणजे त्यांनी दु:खाचा सोहळा केला. त्यातलं सौंदर्य शोधलं.. ते प्रतिमांमधे शोधलं आणि त्यातून पोहोचवलं. या प्रतिमा प्राचीन आणि शाश्वत आहेत. अगदी संत ज्ञानेश्वरांनी देखील वापरलेल्या आहेत. संतांच्या साहीत्यात प्रतिमांची रेलचेल आढळते. त्याचे अर्थ चटकन कळत नाहीत म्हणून मग संतसाहीत्याला दुर्बोध म्हणतं का कुणी ?

ग्रेसच्या साहीत्यात प्राचीन जाणिवा दिसतात. सोप्या शब्दात सांगायचं तर भरती किंवा ओहोटी नसलेला समुद्र हा शांतता दर्शवतो. शांत मन असेल तेव्हां समुद्राचं हे रूप आठवतं. उत्साहासाठी भरतीचा समुद्र आठवतो. कुणी न ठरवता हे होतं. आपोआपच. पण ओहोटीचा समुद्र कुणालाच आवडत नाही. दु:खाने मन आतल्या आत कुढत असते ना तसाच हा समुद्र. म्हणूनच या प्रतिमा त्या त्या भावनांच्या व्य्क्तीकरणासाठी वापरल्या जातात. फुललेली बाग पाहून मनात येणा-या भावना, नदी पाहताना मनात येणारे विचार.. या प्रतिमा बदलत्या असू शकतात तर काहींना निश्चित असा अर्थ असतो. कवी जेव्हां चितनशील असतो तेव्हां तो प्रतिमा उभ्या करू शकतो. या प्रतिमा पाहून गांगरून जायला होतं. पण जेव्हां कोडं सुटत जातं तेव्हा होणारा आनंद अवर्णनीय असतो. या रचनेत एक कलाकुसर आहे. शब्द निवडून घेतलेले आहेत. ग्रेस यांचे शब्द कानाला खटकत नाहीत आणि नजरेलाही ! त्यासाठी शब्दसामर्थ्य अलौकिक असावं लागतं. त्यांच्या कवितांमधे अर्थ न शोधता हे सौंदर्य शोधणं हा देखील एक विलक्षण अनुभव आहे.

कवी जेव्हां लिहीत असतो तेव्हां त्याच्याकडून ती रचना कुणीतरी लिहून घेत असतं असा समज आहे. जे कुणी कविता लिहीत असतील त्यांना याचा नक्कीच अनुभव असेल. संदीप खरे यांनी एकदा सांगितलं होतं कि मी जेव्हां कविता लिहीतो तेव्हां पुढची ओळ काय लिहीणार आहे हे मलाही माहीत नसतं. या अवस्थेचं स्पष्टीकरण देता येत नाही. कवींनी हा अनुभव बोलून दा़खवू नये असं मला वाटतं. अनिल अवचट यांनी मित्र म्हणवून घेत ग्रेस यांच्या याच अवस्थेसंबंधीच्या अनुभवाबद्दल वक्तव्य केलं तेव्हां त्यामागची भावना समजावून सांगणं हे त्यांचं कर्तव्य होतं. एकतर त्यांना ग्रेस समजले नसावेत किंवा ते चक्क खोटं बोलत असावेत असं वाटतं. त्यांचा दाखला देऊन नेटवर ज्या विकृत प्रतिक्रिया आल्या त्या ग्रेस यांच्या जाण्याचं दु:खं ताजं असताना यायला नको होत्या. याचं उत्तरदायित्व अवचटांकडे जातं. ज्यांनी प्रतिक्रिया दिल्या ते सर्व डबक्यातले बेडूक होते. शून्य वॅटच्या बल्बची सवय असणा-याने सूर्याच्या तेजाची कल्पना कशी करायची ? आपलं खुजेपण झाकण्यासाठी सूर्यावर थुंकणं इतकीच ज्यांची बुद्धी चालते त्यांच्याकडून आणखी अपेक्षा तरी काय करावी ? पण ता-याचा भास होईल अशा एका हॅलोजन दिव्याच्या साक्षीने त्या दिवशी बेडकांनी सूर्याला झाकून टाकण्याचा प्रयत्न केला. अर्थात त्याने सूर्याचं काय वाकडं होणार ? सूर्यासारखा ता-याचं तेज म्रुत्यूनंतरही कोट्यवधी वर्षे झळाळत राहतं. डबक्यातील कोण कुठली बेडकं ल्क्षात तरी राहतील का ? आपल्या श्रद्धास्थानाबद्दल एकही शब्द ऐकून घेणा-यां अशा या किड्यांमुळे वातावरण दूषित होतं. म्हातारी मेल्याचं दु:खं नाही पण बेडकं सोकावतात..

ग्रेस वाट्टेल ते लिहीत होते का ?

उदाहरणं पाहूयात

ती गेली तेव्हां रिमझिम पाऊस निनादत होता
मेघांत मिसळली किरणे, तो हा सूर्य सोडवित होता

सूर्य हा तेजस्वी तारा. तेज म्हणजे पराक्रम. (घरातल्या कर्त्या पुरूषात सूर्य पाहीला जातो नाही का? ) . तर या पराक्रमी सूर्याची किरणं पावसाळी मेघात अडकली होती आणि ती सोडवण्यात तो गुंग होता. हतबल होता, त्याचा नाईलाज होता. हे नैराश्याचं, पराभवाचं आणि हतबलतेचं वर्णन आहे. यात कवीने ही हतबलता कुठल्या प्रसंगातून आली आहे याबद्दल भाष्य केलेलं नाही. तसं केलं असतं तर ती एका सामान्य कवीची कविता ठरली असती. त्यात अलौकिक अनुभव मिळाला नसता. ग्रेस यांच्या या शैलीने ते महाकवी ठरतात.

ती घटना कुठली हे त्यांनी शेवटी शेवटी जाहीर केलं.

अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे

मुलाबाळांचा संसार सोडून आई दुस-या पुरूषाबरोबर निघून गेली. त्या वेळी वडिलांची अवस्था ही हताश, खचलेली असल्याने बालपण संपल्याची कवीला जाणीव झाली

त्या वेळी वारा सावध, पाचोळा उडवीत होता

वारा हे लबाड माणसाचं प्रतीक आहे. सावधपणे तो एका स्वच्छ जागी पाचोळा उडवीत होता याचा अर्थच स्पष्ट आहे. पुढे या कवीचे चिंतन अज्ञाताच्या दिशेने सुरू झाले. मृत्यू हे जगातील महाज्ञान आहे. त्या ज्ञानाशिवाय पूर्णत्व येत नाही असं म्हटलं जातं. त्यासाठी अनुभव घ्यावा लागतो... अनंतात मिसळण्याचा. या अनंताचा रंग निळा म्हणूनच ज्ञानाचा रंग निळा. ही निळाई त्यांच्या कवितेत दिसते...

हे ज्ञान आपल्याकडे नसताना कुठल्या आधारावर ग्रेसजींना दुर्बोध म्हटलं जातं ? आपल्याला समजत नाही या नैराश्यातून ? किती कोती मनोवृत्ती आहे ही ? कि आपल्यापेक्षा कुणाला काही समजत नाही , आपल्याला जे समजतं तेच खरं या आत्मप्रौढीतून ही टीका होते ? प्रतिभा ही दैवी देणगी आहे हे खरंच. पण एखाद्याने भोगलेलं त्याच्या नकळत व्यक्त होत असतं. मनात विचारांची दाटी होते. प्रतिमा गर्दी करू लागतात आणि कविता आतून धडका देऊ लागते तेव्हां कागद पेन घेऊन बसावं लागतं. तेव्हां अर्थातच कुणीतरी लिहून घेतंय असं वाटतं. खरं तर लिहीण्याच्या प्रक्रियेवर लक्ष असल्याने आपल्याच मनात तयार झालेले अनुभव उतरवून घेतले जात आहेत हे त्या वेळी लक्षात येत नाही. पण कवीचा हा विश्वास असतो, श्रद्धा असते कि आपोआपच शब्द आले...

तसं असतं तर ते शब्द त्यांची कहाणी बयां करून गेले नसते. असा एक अलौकिक प्रतिभावंत आज आपल्यात नाही. त्या दैवी रचनाकाराला आपण मुकलो. त्यांच्या जाण्याच्या दिवशीच झालेल्या चिखलफेकीतून झालेल्या या वेदनांमधून हा लेखनप्रपंच आपल्यासमोर ठेवत आहे.

ग्रेसजींच्या त्या पुण्य स्मॄतींना पुन्हा एकदा अभिवादन !

पूर्ण विजार Tue, 03/04/2012 - 13:14

"काल अनिल अवचट सांगत होते" ग्रेस माझा मित्र.. तो सांगायचा की माझ्या मनात आलेले शब्द मी लिहित जातो आणि त्यंची कविता बनते.. अर्थ नंतर मी लावत बसतो.." आता खुद्द कवीलाच " नंतर" अर्थ समजून घ्यायला लागायचा, तिथे बाकीच्यांची काय कथा?

ग्रेस ग्रेस असा फुकाचा अंत करणार्‍यांनी कालची अवचटांची मुलाखत पहायला हवी होती."

ही प्रतिक्रिया व्यवस्थित सर्च स्ट्रिंग दिली तर सर्वात वर दिसते... फेसबुक वर देखील अशा प्रतिक्रिया आहेत.

आतिवास Mon, 02/04/2012 - 12:36

एखादी रचना दुर्बोध आहे का माझ्यासाठी हे खर तर मीच चांगलं समजू शकते. पण अर्थात अशा बहुतेक वेळा मी ती माझी मर्यादा मानते. मला दुर्बोध वाटणारे साहित्य इतरांना सोपे वाटत असेल (आणि मला सोपे वाटत असलेले इतर काहींना दुर्बोध) ही शक्यता मी नेहमीच गृहित धरते.

सुदैवाने मला कोणी माझ मत विचारायला येत नाही :-) - त्यामुळे माझ मत माझ्यापुरत राहत! त्यातून काही नुकसान होत नाही कुणाच (झाल तर माझच होत आनंद न मिळून). बाकी बिचारे इतके सुदैवी नसतील - त्यांना त्यांच मत प्रकट कराव लागत आणि मग घोटाळा होतो!!

प्रकाश घाटपांडे Mon, 02/04/2012 - 13:14

In reply to by आतिवास

अतिवास, आपला प्रतिसाद आवडला.

बाकी बिचारे इतके सुदैवी नसतील - त्यांना त्यांच मत प्रकट कराव लागत आणि मग घोटाळा होतो!!

कधी कधी निखिल वागळे सारखे लोक त्यांची मते माननीयांच्या माथी मारतात.

पूर्ण विजार Mon, 02/04/2012 - 12:52

अशिक्षितांमधे आपल्याला जे कळत नाही तिथं आपण बोलू नये अशी श्रद्धा आढळते. एखादा मनुष्य गेला तर त्याबद्दल बरं बोलावं असाही समज आढळतो...

पण तुम्ही म्हणता ते खरं आहे. बिच्चा-या घोटाळेश्वरांना आपण समजून घेतलं पाहीजे, उत्तेजन दिलं पाहीजे.. गावंढळ माणसाला काय कळतं ?

ऋषिकेश Mon, 02/04/2012 - 16:49

वाचलं मात्र लेखाच्या शीर्षकात विचारलेल्या मुळ प्रश्नाचं उत्तर काय द्यावं यापेक्षा कोणालाही दुर्बोध वाटणार नाही अश्या शब्दात कसं द्यावं याचा विचार करतोय :)

ऐसी अक्षरेवर स्वागत. लेखन रोचक अन वाचनीय आहे!
येत रहा लिहित रहा!

पूर्ण विजार Mon, 02/04/2012 - 20:21

In reply to by ऋषिकेश

मुंगी उडाली आकाशी
तिने गिळले सूर्याशी
माती व्याली घार झाली
ऐकोनि मुक्ताई हासली

मुक्ते ...वाच गं बाई वाच. आणि मग या दुर्बोध रचना लिही. तू स्वतः वाच आणि इतर संतांनाही त्यांच्या साहीत्यात बदल करायला सांग. या शतकातल्या लोकांना नाही कळत. आणि कळलं नाही तर प्रयत्न फसला, असा इथला रिवाज ! तेव्हा मुक्ते चुका कबूल कर गे माय

( श्रेणी कोण देतं हे कळालं आणि हसून हसून पुरेवाट झाली. )

प्रसाद Thu, 05/04/2012 - 18:16

In reply to by पूर्ण विजार

माती व्याली घार झाली ?
मी तर आत्तापर्यंत “माशी” व्याली घार झाली असे ऐकले/वाचले होते.
माती असेल तर खरेच आम्ही माती खाल्ली हो आत्तापर्यंत.

पूर्ण विजार Fri, 06/04/2012 - 01:10

In reply to by प्रसाद

तुमि काय बी खा वं.
पर जे काय ऐकत आला त्येचा अर्थ सांगितल्याबिगर आता मागं हटु नगा. मि तर येक निरक्षर मानुस. तुमि शिकल्यालं सवरलेलं. सांगा बघु माशी व्याली घार झाली म्हंजी काय

प्रसाद Fri, 06/04/2012 - 12:09

In reply to by पूर्ण विजार

मालक तो जरा राघवशेला म्हणजे काय ते बघा!!!!! अर्थ नको, अर्थ आम्हाला कळतो, जरा ती गोष्ट शोधून काढा, आता कवी ग्रेस म्हणताहेत तर नक्कीच काही तरी असेल ना, नसेल सापडत तर नाही म्हणा.
म्हणजे ज्याचा कवितांचा, विचाराचा आपण इतका पुरस्कार करतो आणि इतरांवर लादतो त्याविषयी स्वत:ला तरी पूर्ण कल्पना असावी अशी माफक अपेक्षा.
महत्वाचा मुद्दा - दुर्बोध संत साहित्य सांगताना तुम्ही वानगीदाखल मुंगी उडाली चे उदाहरण दिले आहे. पण ह्या अभंगाचेपण हा असं का आहे ह्याचे उत्तर आहे, जालावर सहज शोध घेतला तरी सापडते. तसेच मुक्ताईचे इतर ४० अभंग (माहित असलेले) आपण विसरता आहात. ताटी उघडा ज्ञानेश्वरा चे काय? ते काय दुर्बोध संत साहित्य आहे का? हेच तुम्ही कवी ग्रेस बद्दल म्हणू शकता का? त्यांनी एकूण लिहिलेल्या कवितात तुमच्या मते नसलेल्या पण बहुसंख्य लोकांना वाटणाऱ्या दुर्बोधतेचे प्रमाण असे आहे का?
मी तुमच्यासारखा कोणाचा खंदा प्रचारक नाही, तसेच कवी ग्रेस विषयीही आकस नाही, पण तुमचा, तुमच्या मताचा दुराग्रह पाहून हा प्रतिसाद.
मुंगी उडाली आकाशीचा अर्थ सांगण्यासाठी सहावीच्या नुकत्याच अतिशयोक्ती भाषा अलंकार शिकलेल्या विद्यार्थ्याला ४ ओळीचा अर्थ लिहायला सांगितले आहे, तो मिळताच इथे डकवेन. ते कष्ट दहावी शिकलेल्या माणसाने घेणे जरा विचित्र. (दहावी झालोय ते सांगण्याचा क्षीण प्रयत्न, असे ही म्हणू शकता).
पुढील प्रतिसाद आपण राघव शेल्याची गोष्ट सांगितल्या नंतरच.

इरसाल म्हमईकर Thu, 19/04/2012 - 21:09

In reply to by प्रसाद

मालक तो जरा राघवशेला म्हणजे काय ते बघा!!!!! >>>>

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला

मानसिक आंदोलनांच्या त्या विद्ध अवस्थेत एखादा प्रेरणेचा, प्रेमाचा , विश्वासाचा हळवा बोलही एक वेगळीच जगण्याची, जगवण्याची ताकद देवून जातो. मग तो प्रियेचा असेल, गुरुंचा असेल, आईचा असेल किंवा एखाद्या जवळच्या मित्राचा असेल. पण तो आधाराचा एक शब्दही अशा वेळी खुप मोलाचा ठरतो. राघवशेलाबाबत मला वाटते इथे कविने थोडी लिबर्टी घेतलेली असावी. रामायणातील सीतेला शोधायला गेलेल्या हनुमंताने रामाची खुण म्हणुन सीतेला दिलेली अंगठी तिचा संदर्भ इथे कविने रुपकात्मक रित्या घेतला असावा. ती अंगठी सीतेला त्या अशोकवनात त्या राक्षसींच्या सोबतीत दिवस कंठताना 'माझा राघव येणार आहे' हा विश्वास देणारी एक छोटी गोष्ट आहे. पण या लहानश्या वाटणार्‍या प्रसंगाने सीतामाईच्या मनातली सगळी अनिश्चितता मिटवून टाकलेली आहे. मनातली सगळी आंदोलने, सगळे किंतु एका क्षणात मिटवून टाकले आहेत. इथे कविला असा एखादा बोल म्हणजे भवसागरातून मुक्ती देणारा विश्वास आहे असे वाटले तर त्यात नवल ते काय?

राजेश घासकडवी Mon, 02/04/2012 - 17:28

तेजाच्या ज्योतीच्या धुराची काजळी बनून तिची पुटं अंतर्यामी खिडकीवर साठतात आणि तेज काळवंडतात. धुरकट कंदिलाच्या एकटेपणातूनच ही काजळी जन्माला येते. या काजळीतून निर्माण होतात चित्रविचित्र सावल्या. तेजाला झाकोळून टाकणारे ढगच जसे वेगवेगळे आकार धारण करून सूर्याची किरणं अडकवतात - ते प्राक्तनच सूर्याच्या माथी येतं. ही काजळी रिकाम्या रांजणात एखाद्या कावळ्याने टाकली तर त्यातलं पाणी वर येत नाही. त्यासाठी भरीव दगडच कामी येतात. पण दगडांनी रांजण फुटण्याचाही धोका असतो. या काजळीत आपली चोच बुडवून, कंदील खरवडून आपल्या रांजणावर खजुराहोची वेलबुट्टीदार नक्षी काढायची की दगडांनी रेघोट्या आखायच्या हे प्रत्येक कावळ्याने ठरवायचं. पण काजळी असलेल्या दिव्याचा कोणालाच काय उपयोग हा प्रश्नही राधेने सांजवेळी देवघरात जळणाऱ्या मलूल शुभ्र कळ्यांच्या माळेत रुतलेल्या काट्याच्या जखमेसारखा खुपतोच. राधेच्या उत्तरीयावर या माळा रुळतात. घोड्याच्या टापांबरोबर हिंदोळतात. आईच्या आठवणीने जिवाची तगमग व्हावी तसे राधेचे वक्ष हलतात. हिंदकळण्यातून होणाऱ्या वेदनांनी फुलांना टाहो फुटतो. या वेदनांचे परागकण योग्य फुलावर पडून त्यातून उत्कट फलनिर्मिती व्हावी यासाठी भुंगे असतात. मात्र वाऱ्याच्या आवेगाने या भुंग्यांचे पंख कमकुवत होतात. आणि शिल्लक रहाते ती फक्त एक गुणगुण, थकलेली. विश्रांतीसाठी तो लपून बसतो, गुलाबी कमळात. आणि जन्म घेते एक मिथ्यकथा, कमळ व भुंग्याच्या प्रेमाची. रम्य वाटते म्हणून या भाकडकथेवर विश्वास ठेवावा की या सत्यामागे लपलेलं राधेच्या उत्तरीयाचं गुपित शोधावं? श्रेयस काय हेच कळत नाही. भुंगा कमळात शिरताना घोड्यांच्या टापा किती जणांना ऐकू येतात? मंदिरात जाग्या असलेल्या प्रार्थना आणि बाहेर चालू असलेले अघोरपंथीयांचे नरबळी यांचे मार्मिक संबंध नाण्याच्या दोन बाजूंमध्ये असलेल्या अव्याहत नात्याप्रमाणे, पुराणकालातल्या संदर्भासकट आहेत. या नात्यांच्या भिंतींचे कोन, त्यांची मापं मोजणं पुरेसं आहे का? माझ्या मते नाही, कारण घर म्हणजे केवळ भिंती नसतात. खिडक्याही असतात, त्यांना लावलेले झालरीचे पडदे असतात. त्यांतून झिरपणारा चंद्रप्रकाश असतो. त्या प्रकाशाला हलकेच आत आणणारे पूर्णिमवारे असतात. त्या वाऱ्यांवर तरळत येणारा मंदिराच्या कळसाचा भासही असतो. प्रार्थनांचे स्वर धुक्यात घुसमटून ऐकू येतात. आणि नरबळीच्या किंकाळ्याही येतात. हे सर्वच या घराचे भाग असतात. आत रहाणाऱ्या राधेच्या हृदयाची स्पंदनं असलेल्या घोड्याच्या टापा, तिच्या हातातलं बंद कमलपुष्प आणि आत क्लांत गुणगुण करणारा भुंगा या घरांमध्ये वास्तव्य करतात. त्यांना विसरून कसं चालेल? मात्र शुभ्र कळ्यांची माळ आपल्या वेदनेसकट कोमेजून जाऊन कोपऱ्यात पडते आणि देवघरात मात्र अंधार रहातो. या सगळ्याचा अर्थ कसा लावायचा? अंधाराला आपल्या स्वनिर्मित अवकाशाच्या पोकळीतच मग्न राहू द्याचं की कळ्यांची समई पेटवायची? हे सगळं गौडबंगालच आहे.

श्रावण मोडक Mon, 02/04/2012 - 19:05

In reply to by रमाबाई कुरसुंदीकर

काही नाही. त्यांनी दुर्बोधतेची एक सुबोध व्याख्या करण्याचा प्रयत्न केला. ज्याअर्थी तुम्हाला, हे काय, असा प्रश्न पडला, त्याअर्थी तो प्रयत्न फसला. ;)

पूर्ण विजार Mon, 02/04/2012 - 20:23

In reply to by आतिवास

दुर्बोध संतसाहीत्याबद्दलचा आमचा प्रतिसाद श्रेणीदात्यांना आवडलेला दिसत नाही. श्रद्धास्थानावर प्रहार.. ते ही स्वतःच्या ? हे हे हे हे
दुस-यावर लत्ताप्रहार करणे हाच खरा धर्म

तिरशिंगराव Mon, 02/04/2012 - 20:59

In reply to by राजेश घासकडवी

ब्रम्हांडाची पोकळी आणि अवकाशाचा आकाशातील पोल! गुरुजी, साष्टांग दंडवत.

बेफिकीर Tue, 03/04/2012 - 01:02

In reply to by राजेश घासकडवी

आपण या स्थळाचे सर्वेसर्वा असल्याचे खालील एका प्रतिसादात समजले. अभिनंदन, उत्तम चर्चा घडवून आणणारे, प्रतिसादांनाही दर्जात्मक पातळ्या देऊ करणारे व त्या अचूकपणे बघणारे व एक गंभीर स्थळ उपलब्ध केल्याबद्दल पुनःश्च अभिनंदन

वरील प्रतिसाद सदर चर्चेसाठी/ पुरता सुसंबद्ध आहे असे माझे मत आहे.

-'बेफिकीर'!

पूर्ण विजार Tue, 03/04/2012 - 01:04

In reply to by बेफिकीर

वरील प्रतिसाद सदर चर्चेसाठी/ पुरता सुसंबद्ध आहे असे माझे मत आहे.

हा हा हा
आत्ता खरे बेफिकीर शोभलात. स्वतःच ठरवणारे.. जगात इतरही माणसं असतात ना ?

जयदीप चिपलकट्टी Tue, 03/04/2012 - 07:16

In reply to by राजेश घासकडवी

> अंधाराला आपल्या स्वनिर्मित अवकाशाच्या पोकळीतच मग्न राहू द्याचं की कळ्यांची समई पेटवायची? हे सगळं गौडबंगालच आहे.

यात गौडबंगाल काय अाहे? जर धुरकट कंदिलाच्या एकटेपणातूनच ही काजळी जन्माला येत असेल, तर मग कळ्यांची समई पेटवणं हाच शहाणपणाचा मार्ग नव्हे का?

राजेश घासकडवी Tue, 03/04/2012 - 07:52

In reply to by जयदीप चिपलकट्टी

हे इतकं सोपं सरळ नाही. शहाणपणा नेहमी प्रकाशाचा विचार करतो, पण अंधाराचं काय? काजळी निर्माण करणं हाच दिव्याचा हेतू असेल असा विचार तुम्ही केलेला दिसत नाही. दुःखाची ज्योत तेवती ठेवणं हा एक मार्ग आहे, पण त्याने अंधारच उजळून निघतो, आपला आवाका दाखवून छाती दडपून टाकतो. या अंधाराच्याच जोरावर कमळ भुंग्याला बंदिस्त करतं, कारण सूर्यकिरणांनी त्यांच्या पाकळ्या विरक्त होतात, आणि भुंग्याभोवतीची मिठी सुटते. मग भुंग्याला वाऱ्यापासून विश्रांती कसली? हाच वारा घोड्याची आयाळ उडवू दे, आणि राधेचं उत्तरीयही उडवू दे. पण पराग वाहण्याचं हमाली काम करण्यापासून भुंग्याला स्वस्थता नको का?

जयदीप चिपलकट्टी Tue, 03/04/2012 - 08:21

In reply to by राजेश घासकडवी

> काजळी निर्माण करणं हाच दिव्याचा हेतू असेल असा विचार तुम्ही केलेला दिसत नाही. दुःखाची ज्योत तेवती ठेवणं हा एक
> मार्ग आहे, पण त्याने अंधारच उजळून निघतो, आपला आवाका दाखवून छाती दडपून टाकतो.

मला वाटतं विनाकारण अवमानास्पद भाषा वापरण्यात अौचित्य नाही. हा विचार खरंतर तुम्ही करायला हवा. वर तुम्हीच जो राधेच्या उत्तरीयाचा मुद्दा काढलात, त्यामुळे ही ज्योत तेवती ठेवण्याच्या मार्गाचा संपूर्ण प्रस्तावच रद्दबातल ठरतो ही गोष्ट तुमच्या कशी लक्षात येत नाही? अाता घोड्यांच्या टापांसंबंधाने मतांतराला जागा अाहे हे मी वादासाठी तूर्तास मान्य करतो, पण तरीही त्यामुळे कमळातल्या भुंग्याचा मुद्दा कसा काय सिद्ध होऊ शकेल? अाणि ते काहीही असलं तरीही वेदनांच्या परागकणांचा उल्लेख करून अापण उगीचच चर्चेची पातळी खाली अाणायला नको होती असं मला वाटतं.

पूर्ण विजार Tue, 03/04/2012 - 12:43

In reply to by राजेश घासकडवी

ग्रेसची कविता कळाली नाही तरी तिच्यातलं सौंदर्य भुरळ घालतं. अर्थ हाती येतोय असं वाटत असतानाच ओंजळीतून सुटतो. पण त्या जाणिवांशी त्या ओळी संवाद साधतात. ग्रेस यांची टवाळी करण्याच्या हेतूने का होईना घासकडवींना हे लक्षात आलं कि प्रयत्न करूनही दुर्बोध लिहीणं किती कठीण आहे. त्यांच्या या टवाळीतूनच ग्रेसजींचं मोठेपण सिद्ध झालं. साधी त्यांच्या शब्दांची हमाली देखील टिंगल म्हणून करता आली नाही. ग्रेसजींचं कुठलंही लिखाण काढून वाचलं तरी दुर्बोध म्हणणारेही त्या शब्दांच्या सौंदर्यात हरखून जातात.

घासकडवींच्या लिखाणात कालपासून सौंदर्य शोधतोय.. खरं तर वाचतानाच त्यात हरखून जायला हवं होतं. पण नको ते ओझे उचलण्याच्या नादात घासकडवींचा पार कपाळमोक्ष झालाय आणि कण्हून कुथून आलेले शब्द असावेत असा भास झाला. त्यांच्या फॅन्सना मात्र सलाम !!

( श्रेणी -२ ठेवा या लिखाणाची. काल लाजेकाजेस्तव +२ दिलं त्याची गरज नव्हती )

राजेश घासकडवी Tue, 03/04/2012 - 17:54

In reply to by पूर्ण विजार

दुर्बोधता किंवा सुबोधता यांचा सौंदर्याशी अर्थाअर्थी काय संबंध? मूळ चर्चाप्रस्तावात दुर्बोध लेखन कशाला म्हणावं, किंवा कोणी कुठच्या जोरावर म्हणावं असा प्रश्न होता. म्हणून मी दुर्बोध लिहिलं. या प्रतिसादाला तुम्ही पहिला प्रतिसाद दिलात तेव्हा 'याचा अर्थ उलगडून सांगा' असं म्हटलेलं होतंत (नंतर तो प्रतिसाद बदलला ही गोष्ट वेगळी). म्हणजे तुम्ही माझ्या लेखनाला दुर्बोध म्हटलंत. त्यातून तुमच्या चर्चाप्रस्तावाचा मूळ प्रश्न तुमच्या तोंडूनच उत्तरला गेला. एवढंच साध्य करायचं होतं. सौंदर्य आहे की नाही हा प्रश्न इथे लागूच होत नाही. तो वेगळाच मुद्दा आहे.

ग्रेस यांची टवाळी करण्याच्या हेतूने का होईना घासकडवींना हे लक्षात आलं कि प्रयत्न करूनही दुर्बोध लिहीणं किती कठीण आहे.

दुर्बोध लिहिणं तसं सोपं आहे. मला वाटतं तुम्हाला इथेही 'सुंदर लिहिणं किती कठीण आहे' असा अर्थ अभिप्रेत असावा. ग्रेसची टवाळी करण्याचा आरोप मान्य नाही. कारण 'मी जे काही लिहिलं आहे त्याला तुम्ही दुर्बोध म्हणाल का?' असा अध्याहृत प्रश्न होता. त्याला तुम्ही हो असं उत्तर दिलंत. आता तुम्हीच विचार करून सांगा की दुर्बोध कशाला म्हणावं.

तुमचा जर मुद्दा असा असेल की 'एखाद्याच्या लेखनाला ते केवळ दुर्बोध आहे म्हणून हिणवू नये' किंवा 'ग्रेस यांच्या निधनानंतर त्यांच्यावर टीका करू नये' तर तो मांडण्यात वरील चर्चाप्रस्ताव अयशस्वी झाला असंच म्हणावं लागेल.

पूर्ण विजार Wed, 04/04/2012 - 08:51

In reply to by राजेश घासकडवी

हा सूर आधीच्या प्रतिसादात लावला असता तर चर्चा झाली असती. ग्रेसजींची कुठलीही रचना दुर्बोध नाही हे सप्रमाण सिद्ध करता आलं असतं. जेव्हां तुम्हाला झोंबणा-या प्रतिक्रिया लागल्या तेव्हां तुमचा सूर खाली आला हे दुर्दैव ! लेखात तुमच्या कुठल्याही सदस्याला उद्देशून काहीही वावगं लिहीलेलं नसताना टिंगलीचा सूर लावलात. माफ करा... पण तुमची पोस्ट ही राखी सावंत ने कॅतरिना कैफ किंवा ऐश्वर्या रायचा आव आणावा तशी होती. पण राखी सावंत ही राखी सावंतच राहणार.. तुम्हाला लवकर कळत नाही म्हणून सोपं करून सांगतो. थेट ऐश्वर्या रायचा मेक अप करून राखीला उभं केलं तर लोक म्हणणारच ही सुंदर नाही म्हणून ऐश्वर्या राय सुंदर नाही हा आरोप सिद्ध होतो का ?

सकाळी आठ वा मी लेख टाकून गेलो ते रात्री आठला उगवलो. या दरम्यान कुठली संवेदनशील पोस्ट इथं होती ते दाखवून द्या.

( अवांतर : तुमचं लिखाण मला समजलं नाही म्हणून मी जाहीरपणे ते दुर्बोध म्हणणार नाही. किमान तुमचं निधन झाल्यावर त्याच दिवशी निरर्थक लिहीत होते घासकडवी अशी श्रद्धांजली वाहणार नाही. समजा दुस-या कुणी तुम्हाला अशी श्रद्धांजली वाहिली तरी काय घास घास लावलंय फालतू माणूस होता तो अशी प्रतिक्रिया पब्लिक फोरमवर देणार नाहि. ज्या अर्थी तुम्ही लिहीलय त्या अर्थी तुमचं त्यामागचं तर्कशास्त्र जाणून घेऊनच प्रतिक्रिया दिली असती. आता तुम्हीच बघा बुवा तुम्हाला काय कळलं ते )

पूर्ण विजार Wed, 04/04/2012 - 08:41

In reply to by जयदीप चिपलकट्टी

राजेश कमळ बघ
जयदीप श्रेणी बघ
श्रावण पुण्य बघ
जंतू अक्षर बघ

सुबोध लेखनमाला इथे सुरू करण्याचा विचार आहे. त्याची ही झलक

पूर्ण विजार Mon, 02/04/2012 - 19:41

थोडक्यात ग्रेसजी गेल्यानंतर काही क्षणातच आलेल्या प्रतिक्रियांबद्दल वाइट वाटण्याचं काहीच कारण नाही असं इथे देखील मत आहे तर...थोर माणसांचं खरंच काही कळत नाही. माणूस गेला कि द्वेष संपायला हवा खरं तर..

पूर्ण विजार Mon, 02/04/2012 - 19:57

मूळ प्रश्न असा आहे ज्याला बगल देण्यात विद्वत्ता वापरली जात आहे..

ज्याप्रमाणे ग्रेसजींवर अवचटांचा आरोप आहे कि ते काहीही असंबद्ध लिहीत होते. तर त्यांच्या आयुष्याशी संगत लागेल असा अर्थ वाचकांना कसा काय लागला ? प्रयत्न केला तर हे अशक्य नाही. जे राजेश घासकडवींनी लिहीलं ते अवचटांच्या आरोपाप्रमाणे शब्द सुचले आणि नंतर अर्थ लावला या कॅटेगरीतलं आहे का ? तसं त्यांनी सांगावं. म्हणजे त्यांना श्रद्धांजली अर्पण करायची वेळ येईल तेव्हां हे वैशिष्ट्य आम्ही ठळकपणे सांगू. नसेल तर त्यांच्या कुठल्या अनुभवाशी त्यांचं लिखाण तादात्म्य पावतंय ? मला राजेश कडवींकडून जाणून घेण्याची अत्यंत उत्सुकता आहे. तसं असेल तर ग्रेसनंतर तेच.. त्यांच्या तळपायाची धूळ मस्तकी लावायला काहीच अडचण नाही. ग्रेसजींच्या प्रतिमांच्या वापराचा सुसंगत वापर परिचयाचा आहे. त्यामागचे तर्कशास्त्र समजले कि त्या कविता दुर्बोध रहात नाहीत..

घासकडविंच्या उत्तराच्या प्रतिक्षेत..

राजेश घासकडवी Tue, 03/04/2012 - 08:26

In reply to by पूर्ण विजार

त्यांच्या कुठल्या अनुभवाशी त्यांचं लिखाण तादात्म्य पावतंय ? मला राजेश कडवींकडून जाणून घेण्याची अत्यंत उत्सुकता आहे.

क्षमस्व. माझे अनुभव हे माझ्या जीवनाच्या झोळीत पडलेल्या सूर्यांचे जपून ठेवलेले कवडसे आहेत. वेदनेच्या सुलभीकरणासाठी त्यांचा अपभ्रंश करण्याची ना ग्रेसची तयारी होती, ना माझी आहे. रमलखुणांची अक्षरं वाचण्याची ज्यांना इच्छा असेल त्यांनीच माझ्या लेखनाकडे यावं. त्यातून दिसणाऱ्या आकारांमध्ये माझे जीवनपट कोरून काढलेले आहेत. अनुभवांच्या समीधांपासून बनलेल्या यज्ञाची ज्यांना ओढ नसेल त्यांना बटण दाबल्यावर लख्ख प्रकाश पडणाऱ्या हॅलोजनी दिव्यांचं विश्व खुलं आहेच की. या यज्ञाबरोबर होणाऱ्या मंत्रघोषाच्या स्वरांचं धीरगंभीर स्वरूप ज्यांना पेलत नाहीत त्यांच्यासाठी मुन्नी नाचते आहेच.

हा सूर्य रोज अस्ताला जातो न कळे मज काही
झोळीत कधीही माझ्या
अंधार उगवला नाही...

असं म्हणणाऱ्या ग्रेसच्या या सूर्याचा अर्थ सुबोध करून मेघात मिसळलेली किरणं सोडवणाऱ्या सूर्याशी जोडणारेही आहेत. त्यांच्याकडे जा...

पूर्ण विजार Mon, 02/04/2012 - 20:36

ज्याने मला या संस्थळावर जा असा सल्ला दिला त्याला धरून बडवावं असे विचार मनात येत आहेत. मी काय त्याचं वाकडं केलं होतं ? घरात बोलवून जेवायला बसा असं म्हणायचं आणि तुम्ही भुरके मारता का ? पाटावर बसता कि टेबलावर या वर तुम्हाला श्रेणी मिळेल असं यजमान सांगतात. तिथंच धारपांच्या कथेतील काहीतरी आले होते. त्याला ना रंग ना रूप, ते आदिम होते. अवचट म्हणाले ते सहसंपादक. त्यांना खूप कळते. ते तुम्हाला श्रेणी देतील. पण जेवण हा प्रश्न मुखावाटे बाहेरच पडू शकला नाही कारण यजमान जेवायला बसलेत आणि त्यांना त्रास देऊ नये असं सहसंपादक म्हणाले म्हणून भुकेल्या पोटी आम्ही मित्राला मनात शिव्या देऊ लागलो....

क्रमशः

( श्रेणी काय मिळेय या विचारात )

Nile Mon, 02/04/2012 - 20:40

In reply to by पूर्ण विजार

ज्याने मला या संस्थळावर जा असा सल्ला दिला त्याला धरून बडवावं असे विचार मनात येत आहेत. मी काय त्याचं वाकडं केलं होतं ?

अरे रे, काय हे. दुर्बोधतेविषयी प्रेम आहे असा एखादा अजून एक प्राणी पाहून बरे वाटावे असे म्हणावे तोच तुमचे प्रतिसाद वाचून निराशा झाली. २०-२५ प्रतिसादात संस्थळास 'कॅटेगिरीत' टाकून आणि माहित नसलेल्या सिस्टीमची मजाही उडवून बसलात. इतकं का सगळं सुलभ असतं?

लेख सवडीने वाचून त्याबद्दल मत देतो.

पूर्ण विजार Mon, 02/04/2012 - 20:46

In reply to by Nile

अरेरे... झोंबला वाटतं प्रतिसाद. आणि हे काय.. अजून श्रेणी नाही ? श्रेणी देणारे एकेक बिळातून बाहेर येताहेत वाट्टं..

बघा गं गंमत (रोमातले) त्यांना ३ ( मार्मिक ) आम्हाला कै च्या कै. आता मजाच करतो. थांबा . या रे गंमत बघायला

Nile Mon, 02/04/2012 - 23:12

In reply to by पूर्ण विजार

बघा गं गंमत (रोमातले) त्यांना ३ ( मार्मिक ) आम्हाला कै च्या कै.

जाऊद्या, रडू नका. तुम्हाला माहितीपूर्ण श्रेणी दिली, खुष? :-)

बेफिकीर Mon, 02/04/2012 - 23:17

In reply to by Nile

रँकिंग, ३, २, १, ४ , मार्मिक, रोचक इत्यादीसाठी प्रतिसाद देताना लोक विचारपूर्वक द्यायला लागतील आणि एखाद्या (ज्वलंत) विषयावर त्यांची जी उत्स्फुर्त मते आहेत (जी प्रामाणिक असण्याची शक्यता बरीच असावी) ती मिळणार नाहीत.

उत्स्फुर्तता व सहभागाची तीव्रता यासाठीही गुणांकन हवे असे म्हणता येईल का?

ती क्वांटिफाय आणि अप्लाय कशी करायची ही अडचण आहे. तीन वेगळ्या श्रेणी पद्धती असणं श्रेयस्कर आहे का हा ही प्रश्न होईल. वैयक्तिक रित्या, सद्ध्या तरी, गुणांकनापेक्षा विशेषणांवर आधारीत श्रेणीपद्धत मला बरी वाटते.

बेफिकीर Tue, 03/04/2012 - 00:09

In reply to by Nile

आणि ज्या गोष्टी असतात त्यांना महत्व देण्यात काय मुद्दा?

:-)

उदाहरणार्थ ग्रेस कुठे क्वान्टिटीवर जगले आणि ग्रेसवर चर्चा होणे हे मराठी संकेतस्थळांमध्ये अभिमानास्पद समजले जाईल.

किंवा कदाचित अपमानास्पदही , जर एखाद्याने एखादे संकेतस्थळ ग्रेसविरोधासाठी वगैरेच काढले तर

काही क्वान्टिफाय आनि अ‍ॅप्लाय करायचेच कशाला आणि ते केल्याविना स्थळावर उत्तमोत्तम चर्चा / परिसंवाद / लेख कसे आणायचे व इतरांहून वेगळे कसे व्हायचे हेही कदाचित एक आव्हानच असावे बहुधा, आपल्याला काय माहीत!

:-)

-'बेफिकीर'!

पूर्ण विजार Tue, 03/04/2012 - 00:54

In reply to by Nile

ओहो.. हे पाहीलंच नव्हतं.
खूष खूष. माहीतीपुर्ण साठी नाही हो.. स्वतःलाच विनोदी म्हणून तीन श्रेणि दिल्याबद्दल..
हहपुवा झाली !!

इथं लाईव्ह ईनोद आहेत राव !
मी आजच फेसबुक वर लिंक दिलीय. या संस्थळाच्या इतिहासात नसतील इतकी वाचने झालीत ती त्यामुळेच..

श्रावण मोडक Tue, 03/04/2012 - 00:46

In reply to by पूर्ण विजार

एका गावात एक कवी संमेलन सुरू असतं. कवी आपल्या कविता सादर करत जातात. अनेकांच्या कविता समोर बसलेल्या श्रोतृसमुदायाला कळतच नसतात. थोड्या वेळाने एक कवी आपली कविता सादर करत असतानाच एक पैलवात मंचावर येतो. त्याचा अवतार पाहून तो कवी हादरतो. त्याची बोबडी वळते. पैलवान त्याच्याकडं जातो आणि म्हणतो, "नाही... तुमचं चालू द्या. तुमाला हितं कुनी आनलंय त्याला शोध्तोय..." ;)

पूर्ण विजार Mon, 02/04/2012 - 20:49

लेख सवडीने वाचून त्याबद्दल मत देतो.

अगंगगग
ठार मेलो हसून हसून... कित्ती ते प्रेम संस्थळावरचं. लेख न वाचताच उडी घेतली !! झोंबताहेत का या अशा कमेंटस ?

मी Mon, 02/04/2012 - 20:58

शांतपणे घ्या, तुमच्या अपेक्षेप्रमाणे संपादक नसल्याने त्रागा करू नका, तुमची भूमिका लक्षात घेऊन इथल्या सदस्यांनी प्रतिसाद दिलाच असता, पण अवचटांची पुर्ण प्रतिक्रिया न जाणून घेता एका बातमीवरुन त्यांच्यावर आरोप करणे निदान मला गैर वाटले, पण तुमचे ग्रेसप्रेम पहाता मला तो प्रतिसाद नोंदवणे गरजेचे वाटले नाही.

राजन बापट Mon, 02/04/2012 - 21:00

In reply to by मी

"मी" यांनी मला जे म्हणायचे आहे ते नेमकं - आणि संयत शब्दांत सांगितलेलं आहे. धन्यवाद.

पूर्ण विजार Mon, 02/04/2012 - 21:01

लेख वाचा. अवचटांवर काय आरोप आहे असं तुम्हाला वाटलं या लेखात ?
त्यांच्या प्रतिक्रियेचे परिणाम दिसलेच आपल्याला.. दुर्दैवाने अवचट त्यांच्यावरच्या आरोपांना उत्तर द्यायला हयात आहेत.. ग्रेस नाहीत ! ही तळमळ पोहोचत नसेल तर समजेल अशी भाषा वापरण्यात आम्हाला काहीच अडचण नाही..

मी Mon, 02/04/2012 - 21:05

In reply to by पूर्ण विजार

अवचटांचे विधान हा चर्चेचा विषय असू शकतो पण त्या विधानावर फेसबूक नामक चावडीवरून मारलेल्या "पिंका" हा चर्चेचा विषय असू शकत नाही असे निदान मला वाटते. तुम्ही ग्रेस ह्यांच्या कवितेचे केलेले रसग्रहण मला थोडे आवडले हे सांगू शकतो पण ते रसग्रहण तुमच्या लेखाचे प्रयोजन नव्हते असे वाटते, तुम्ही शांतपणे तुमची भूमिका मांडलीत तर नक्कीच तुम्हाला अपेक्षित प्रतिसाद मिळेल असं मला वाटतं.

पूर्ण विजार Mon, 02/04/2012 - 21:10

अनिल अवचट यांनी मित्र म्हणवून घेत ग्रेस यांच्या याच अवस्थेसंबंधीच्या अनुभवाबद्दल वक्तव्य केलं तेव्हां त्यामागची भावना समजावून सांगणं हे त्यांचं कर्तव्य होतं.

हा ही चर्चेचा विषय आहेच. आणि त्याचे परिणाम फेसबुक आणि मराठी संस्थळांवर दिसत आहेत. ज्या गोष्टीतलं आपल्याला कळत नाही त्यावर मत देऊ नये हे गावंढळ माणसाला कळतं ते शिकलेल्यांना कळू नये ? मला वाटतं लेखाचा प्रतिवाद करता आला असता तर या भिक्कार प्रतिक्रिया इथं दिसल्याच नसत्या. या भिक्कार प्रतिक्रिया आहेत म्हणून हे लोक किती चिखलात आहे हे तपासून पहायचा हा प्रयत्न होता. एकालाही असं वाटलं नाही कि कमीत कमी लेखकाच्या भावनांशी सहमत पण... अशी सुरूवात करावी.

मळमळ पोहोचलेली आहे. नोंद घ्यावी.

पूर्ण विजार Tue, 03/04/2012 - 00:20

In reply to by मी

या ओळीचा अर्थही मी देऊ शकतो. प्रश्न असा आहे त्याचा काही उपयोग आहे का ? स्वामीजी इथे आले तर भय इथले संपत नाही या कवितेचा अर्थ स्वतःच ते देतील. गंमत म्हणजे ग्रेसचा अर्थ आणि स्वामीजींचा अर्थ एकच कसा ? त्यांना स्वामीजींचं रसग्रहण दाखवण्यात आलं होतं. हे व्हेरिफाय करता येईल. अनिल अवचटांचं विधान व्हेरिफाय करता येत नाही.

इथे इथून पुढे काही लिहीणे म्हणजे गुंगों कि बस्ती मे शायरी सुनाना...

लेखात ब-यापैकी मुद्दे स्पष्ट झालेत. कुणी साधा मुंगी उडालीचा अर्थ सांगू शकत नाहि आणि चालले दुर्बोधतेच शिक्के मारायला.

बेफिकीर Mon, 02/04/2012 - 21:39

१. कविता दुर्बोध आहे हे कोण ठरवणार या प्रश्नात 'असे ठरवता येणार नाही' असा सूर आहे. मात्र मराठी भाषेतले तेच तेच शब्द, त्याच प्रतिमा (किंवा वेगळ्या) व तेच तेच सांकेतिक संवाद - काव्य विश्व जर एखाद्याने असे उभारले की समोरच्याला ते सहजी समजू नये तर ते प्रामाणिक आहे की नाही हे ठरवायचा अधिकार एकट्या कवीला असू नये. ग्रेस महान होते असे सगळे म्हणतात म्हणून मीही म्हणतो. पण 'रिमझिम पाऊस निनादत होता' या ओळींमध्ये मला काहीही विशेष वाटले नाही. अनेक ओळींमध्ये काहीच वाटले नाही. काही न वाटणे हा साहित्यीक गुन्हा ठरू नये.

२. ग्रेस (एकदा माझ्याशी फोनवर बोलताना) म्हणाले की 'मी ग्रेस आहे आणि ग्रेस म्हणून जगलो, ग्रेस म्हणूनच मरणार, मी जेव्हा कविता रचतो तेव्हा माझ्या डोक्यावर कविता चढलेली असते आणि ती माझ्याकडून तिला व्यक्त करून घेते. नंतर मलाही समजत नाही मी काय लिहिले'. ही विधाने मला स्वप्नील पातळीवर पटू शकतात. एरवी नाही. कविता म्हणजे एखादी खोकल्याची उबळ, ओकारी किंवा वातासारखा प्रकार नाही जो अचानक येतो, बाहेर पडतो आणि नंतर आपल्याला समजते. कवी जाणीवपूर्वकच कविता करतो. पु लं च्या भाषेत 'हॅटखालून ससा निघावा' तशी माझ्यामते कविता जादूने निर्माण होत नाही. तिला एक निर्मीतीमागची कारणमीमांसा असते, आकृतीबंध (अगदी आकृतीबंधच नाही हाही आकृतीबंध) असतो आणि अस्तित्व टिकवण्यासाठी एक किमान कारणमीमांसा असते. (अनेकांच्या कवितांचे अस्तित्व टिकण्यामागे त्यांच्या अनुयायांनी त्यांचा आयुष्यभर केलेला गौरव हेही कारण असू शकते)

३. कवितांमधील प्रतिमा किचकट आहेत म्हणून त्या कशाबशा सोडवल्याचा आनंद मिळवून तुतारी वाजवणे आपल्याला पटत नाही. कविता हे काही एखादे कोडे नाही जे घेऊन तासनतास बसावे. सहज कानावर आली, आवडली, भावली, भिडली, डचमळवून गेली, विषय संपला. पुन्हा ऐकली तेव्हा वेगळे किंवा तेच वाटले इतपतच. पण गुप्त खजिन्याप्रमाणे कवितेच्या प्रतिमांचे गणीत सोडवून समीक्षक ठरण्यात साहित्यीक नपुंसकता आहे. ज्या कवींना आपल्या कवितेबाबतही असेच व्हावे असे वाटते तेही त्यातलेच.

४. एवढे सगळे करूनही समजा मुद्दाम किंवा नकळतपणे दुर्बोध (सापेक्ष शब्द असला तरी ग्रेस दुर्बोध हे ज्या सामान्यपणे म्हंटले जाते त्या सामान्य पातळीवरच हा शब्द येथे वापरत आहे) कविता झाली तरी कवीने ती श्रेष्ठ आहे हे सांगू नये अथवा ती समजावूनही सांगू नये. त्यासाठी पुरस्कार घेऊ नयेत आणि मानधने स्वीकारू नयेत. इतके जर तुम्ही अंतर्मुख तंद्रीत कविता रचत असाल तर त्या तंद्रीमय अवस्थेला कीर्ती आणि पैशाची गरज काय? मग आज ज्ञानेश्वरांना मरणोत्तर साहित्य अकादमीचा द्या की पुरस्कार? त्यांनी जिवंतपणी तर तो खचितच घेतला नसता.

धन्यवाद

-'बेफिकीर'!

पूर्ण विजार Mon, 02/04/2012 - 21:51

गेस यांनी कधी साहीत्य संमेलनाचे उंबरठे झिजवले ? कुठल्या कार्यक्रमाचे मानधन घेतले ? जे कार्यक्रम केले ते मंगेशकरांच्या आग्रहावरून. माहीती घ्या आणि बोला. जी प्रतिक्रिया संतांवर टीका केल्याने द्याविशी वाटत आहे तीच ग्रेसांवर टीका झाल्याने मला द्याविशी वाटली. संतांचं साहीत्य तुम्हाला समजलंय असा दावा असेल तर या चर्चेत सामील व्हा.

किमान

मुंगी उडाली या कवितेचा अर्थ सांगा. पुढंच पुढे..

तुम्हाला दुर्बोधतेवर टीका करायची तर कुठल्याही परिस्थितीत वेगवेगळे मापदंड लावू नयेत.

मुंगी उडाली ...

पूर्ण विजार Mon, 02/04/2012 - 21:53

मा़झे प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत जे बेफिकीर यांच्या पोस्टमुळे बाजूला पडतील..

१. एखादा मनुष्य गेल्यावर काय प्रतिक्रिया असायला हव्यात ?
२. ज्या विषयातलं समजत नाहि त्यात बोलायला हवं का ?

पूर्ण विजार Mon, 02/04/2012 - 21:56

एवढे सगळे करूनही समजा मुद्दाम किंवा नकळतपणे दुर्बोध (सापेक्ष शब्द असला तरी ग्रेस दुर्बोध हे ज्या सामान्यपणे म्हंटले जाते त्या सामान्य पातळीवरच हा शब्द येथे वापरत आहे) कविता झाली तरी कवीने ती श्रेष्ठ आहे हे सांगू नये अथवा ती समजावूनही सांगू नये. त्यासाठी पुरस्कार घेऊ नयेत आणि मानधने स्वीकारू नयेत. इतके जर तुम्ही अंतर्मुख तंद्रीत कविता रचत असाल तर त्या तंद्रीमय अवस्थेला कीर्ती आणि पैशाची गरज काय? मग आज ज्ञानेश्वरांना मरणोत्तर साहित्य अकादमीचा द्या की पुरस्कार? त्यांनी जिवंतपणी तर तो खचितच घेतला नसता.

अंतर्मुख तंद्रीत तुम्ही गेलेला दिसताय सध्या. या अवस्थेचं लेखात केललं विश्लेषण वाचा आणि मग सकाळी बोला.

चिंतातुर जंतू Mon, 02/04/2012 - 22:08

ज्यांना ग्रेस यांची कविता प्रिय होती अशांना त्यांच्या मृत्यूचं दु:ख होणं साहजिक आहे. स्वतः ग्रेस 'दुर्बोधते'बद्दल विचारताच उसळून उठत. त्यांच्या कवितांच्या रसिकांनाही या दुर्बोधतेच्या आरोपांची चीड येणं साहजिक आहे. त्यामुळे धागा काढण्यामागची प्रस्तुत धागाकर्त्याची भावना समजू शकते आणि तिच्याबद्दल सह-अनुभूती आहे. पण त्यामुळे एक आठवलं: 'साजणवेळा' या ग्रेसच्या कवितांवरच्या कार्यक्रमाची संकल्पना ज्यांची होती त्या चंद्रकांत काळे यांची ग्रेस यांच्या निधनानंतर एका दूरचित्रवाणी वाहिनीनं घेतलेली एक छोटीशी मुलाखत पाहायला मिळाली. त्यात त्यांनी मात्र अजिबात न चिडता या तथाकथित दुर्बोधतेवर एक टिप्पणी केली. ती मला मार्मिक वाटली. त्यात ते असं म्हणाले की मला दुर्बोधतेपेक्षा 'धूसरता' हा शब्द अधिक योग्य वाटतो. दुर्बोध-सुबोध अशा गुणात्मक मांडणीपेक्षा धूसरतेमध्ये ग्रेस यांच्या कवितेचं मर्म सांगता येतं. कारण त्यांची कविता अर्थबोधन करण्यापेक्षा जाणवावी लागते. ती जाणवली तर मग समजली न समजली हा प्रश्न फारसा महत्त्वाचा ठरत नाही.

आता या पार्श्वभूमीवर प्रस्तुत धाग्याकडे पाहिलं तर मला काय वाटतं? भरती-ओहोटी वगैरेपर्यंत धाग्याचा सूर मला ठीक आणि पटेलसा वाटला. पण पुढच्या परिच्छेदातल्या 'डबक्यातले बेडूक', सूर्यावर थुंकणे', 'किडे' वगैरे प्रतिमा मला रसभंग करणाऱ्या आणि ग्रेस यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर काहीश्या औचित्यभंग करणाऱ्या वाटल्या. ज्यांना ग्रेसविषयी फारशी आत्मीयता नाही त्यांनी औचित्यभंग केला असा आरोप करतानादेखील असा औचित्यभंग होऊ नये असं मला वाटतं.

त्यापुढच्या अर्थबोधनातली 'सूर्य म्हणजे कर्ता पुरुष', 'वारा म्हणजे लबाड माणूस' अशी विधानं वाचून मला वाटलं की मुळात जी धूसरता चंद्रकांत काळे यांना अभिप्रेत होती ती या अर्थबोधनात नाहीशी झाली. त्याऐवजी काहीशा ढोबळ अर्थानं तिची जागा घेतली. माझ्यापुरतं सांगायचं तर रिमझिम निनादणारा पाऊस, दारी येऊन थबकलेली सांज, पाचोळा सावध (हळूच) उडवणारा वारा, खिडकीवरचा धुरकट कंदील अशा प्रतिमांतून एक विलक्षण प्रत्ययकारी भावनिष्पत्ती मला होते. ती काहीशी धूसर आणि अमूर्त असेलही, पण मला ती परिणामकारक वाटते म्हणून तेवढी मला पुरेशी आहे. आई कुठे आणि कुणाबरोबर गेली, मग वडिलांचं काय झालं वगैरे इहलोकीच्या प्रश्नांची उत्तरं मला नको आहेत. कवितेचा अर्थ लावावा न लावावा किंवा कसा लावावा याविषयीचं धागाकर्त्याचं स्वातंत्र्य मला मान्य आहे, पण त्याच्या या अर्थबोधनाची मला ही अशी काहीशी अडचण झाली (त्यामागची प्रामाणिक भावना जाणवत असूनही आणि पटूनही) एवढंच मला सांगावंसं वाटलं. असो.

बेफिकीर Mon, 02/04/2012 - 22:31

जन्तू (चिंतातूर नव्हे, निर्जन्तुक)

ग्रेस यांनी गेल्या वर्षभरातच एक पुरस्कार स्वीकारून एक लाख रुपये मानधन घेतले आणि वर रसिकांनाच नावे ठेवणारे भाषण दिले. (अधिक माहितीचा दुवा लगेच देऊ शकेन, पण त्याचा उपयोग काय?)

ग्रेस यांना असे अनेक पुरस्कार मिळाले. पुण्यातच दोन मिळाले सलग. ते कशाला घ्यायचे? म्हणजे साहित्य संमेलनात जायचे नाही आणि इकडे पुरस्कार घ्यायचे हे गणित काय आहे?

ग्रेस गेल्याचे कळल्यावर मी चक्क ऑफीसमध्ये तीस सेकंद एकटाच उभा राहून आदरांजली मनातल्या मनात व्यक्त केली. दुसर्‍यांनी त्यांना शिव्या दिल्या याचा मला राग आला नाही आणि स्तुती केली याचे वैषम्य नाही. मला ग्रेस हा कवी कसा वाटला? तर एक महाकवी, पण त्याच्या रसिकांनी, निष्ठावन्त अनुयायांनी त्याला तो आहे त्यापेक्षा मोठे करायचा अट्टाहास धरलेला, असा कवी. करायचंय काय ते दुर्बोध होते का सुबोध? जो माणूस म्हणतो मी जे लिहिलं ते नंतर मला समजत नाही आणि तसे का लिहिले हे मी सांगू शकत नाही त्याची कविता वाचून आपल्याला काय मिळणार आहे?

उगाच ग्रेस ग्रेस! ते तर बिचारे गेले.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स येथे जाऊन आपण ग्रेस यांनी काय काय मिळवले याची पुरेशी माहिती घ्या अणि दुसर्‍यांच्या तंद्रीवस्थेबाबत टिपण्णी करा.

ज्या विषयातलं समजत नाहि त्यात बोलायला हवं का ?
>>>

अर्थातच बोलायला हवं! ग्रेस कळले नाहीत तरी लक्षावधी माणसे ग्रेसवर बोलली. हा काही गुन्हा नाही. ज्याला असे वाटते की ग्रेस आपल्याला समजला त्याला तसे वाटते इतकेच, त्याला ग्रेस जसा समजला त्या समजण्याला इतर शेकडो माणसे मूर्खपणाही समजत असू शकतील.

पूर्ण विजार Tue, 03/04/2012 - 07:27

In reply to by बेफिकीर

मराठा चेंबर्स मधे ग्रेस यांनी काय मिळवले हा आपल्या पोटदुखीचा विषय आहे का ? साहीत्य अकादमीने पुरस्कार दिला हा पोटदुखीचा विषय आहे का ? तसं असेल तर मराठा चेंबर्सला जाऊन विचारा ग्रेसना का बोलवले ते. साहीत्य अकादमीला जाऊन विचारा ग्रेसना पुरस्कार का दिला ते ?
तुम्हाला हा पुरस्कार मिळायला नको होता असे वाटत असेल तर साहीत्य अकादमीला काहीच कळत नाहि असाच त्याचा अर्थ होतो. कि तुम्हाला त्यांनी पुरस्कार दिला नाही हे दु:खं आहे ? तसं असेल तर त्यांना जाऊन भांडा कि.. इथं असंबद्ध मुद्दे का काढताय ?

बेफिकीर Mon, 02/04/2012 - 22:35

हा आपल्यामते आपला बाजूला पडू शकणारा प्रश्न आपल्या लेखाच्या शीर्षकात आहे का? कोणी मेल्यावर कोणी काहीही प्रतिक्रिया द्यावी, ते कसे काय रोखता येईल?

वर्ल्ड ट्रेड सेंटर पडल्यावर पॅलेस्टाईनची तीन चार वर्षाची मुले (वय लिहिण्याचे कारण त्या वयात ग्रेस आणि आंतरराष्ट्रीय राजकारण समजत नसावे) व्हिक्टरी, व्हिक्टरी म्हणून नाचत होती.

जगात कोणावरही काही बंधन घालता येत नाही आणि घातले जावे असे व्यक्त करून मते मागवणे हा (स्वतःच्या, चर्चेत इतर जे उतरतात त्यांना वेळ असतो म्हणून उतरतात) वेळेचा अपव्यय आहे.

पूर्ण विजार Tue, 03/04/2012 - 07:44

In reply to by बेफिकीर

शिकली सवरलेली माणसे आणि पॅलेस्टिनी मुले एकाच पातळीवर का ? अमेरिका त्या मुलांची शत्रू होती तसे ग्रेस या लोकांचे शत्रू होते का ?

दुर्बोध संतांनीही लिहीलंय. अनेक साहीत्यिकांनीही लिहीलंय. मग कुणाच्या श्रद्धांजली सभेत मुक्ताफळं उधळली गेलीत आजवर ? माणूस गेल्यावर सुतक संपेपर्यंत तर शत्रूही संयम पाळतो ही संस्कृती मला माहीत आहे. पण काय ग्रेस ग्रेस लावलंय अशा प्रतिक्रिया आणि २६ चे पाढे लिहीणं ही संस्क्रुती कुणाची ? फेसबुकने आता त्यातल्या ब-याच प्रतिक्रिया काढून टाकल्या आहेत ते कशासाठी ?

ग्रेस मोठे झाले ही पोटदुखी असेल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं.

बेफिकीर Mon, 02/04/2012 - 22:40

चिंतातूर साहेब,

आपल्याला भौतिक उत्तरे नको आहेत. पण दशकानुदशके कवीची कवित का उमटली गेली याची कारणमीमांसा समीक्षक त्याच्या भौतिक वैयक्तीक आयुष्यातून देऊ पाहात आहेत. हे नाकारता येणार नाही. तुम्हाला इहलोकींची उत्तरे नकोत हे उत्तम! मला तर ती ओळच नको आहे. करायची काय ती ओळ जी ग्रेस यांना स्वतःलाच 'वरून आलेली' वाटते.

'वरून म्हणजे कुठून' हा एक प्रश्न मात्र अनुत्तरीत राहिला.

माणसाचा कवी कसा होतो, महाकवी कसा होतो, महाकवीचा पुन्हा माणूस कसा होतो हे सगळे रंगीन असते बुवा

-'बेफिकीर'!

पूर्ण विजार Tue, 03/04/2012 - 00:02

चिंतातूर जंतू

तुमचा हा प्रतिसाद मला पटला आणि आवडला. हा प्रतिसाद लवकर यायला हवा होता. बेडूक वगैरे शब्द ज्यांचे त्यांना कळण्यासाठी वापरले आहेत. एखादा मनुष्य गेल्यावर आणि ते ही ग्रेस जे लोक अशी भाषा वापरतात आणि त्या संस्थळांवर त्यांचं कौतुक होतं.. त्यांना सभ्य भाषा समजेल असं मला वाटलं नाही. औचित्यभंग होऊनही कुठेही त्याबद्दल संवेदनशीलता दाखवली गेली नाहि. आज फक्त मुक्ताबाईंची कविता दिली तर बेफिकीर यांना अर्थ जाणून न घेताही उद्दाम प्रतिक्रिया द्याविशी वाटली आणि तिला या संस्थळाच्या संपादकांकडून ३ गुण द्यावेसे वाटले यात सगळंच आलं. नाही का ? त्यांचा मुद्दा दुर्बोधतेवर टीका असेल आणि त्याच वेळी संतसाहीत्याची ते कड घेत असतील तर संत साहीत्याची जाण त्यांना आहे किंवा नाही हे तपासून पहायला हवं. त्यांनी मुंगी उडाली या कवितेचा अर्थ सांगावा.

सूर्याचं उदाहरण मला द्यावं लागलं. तुम्ही हा लेख प्रेमाने वाचलात तर असं लक्षात येईल कि अनिल अव्चट म्हणतात त्याप्रमाणे ग्रेसनी आधी शब्द लिहीले आणि मग अर्थ लावला तर या ओळी ग्रेसजींना वैयक्तिक रित्या ओळखत नसणा-यांना कशा कळाल्या ?

ग्रेस नास्तिक होते. पण अध्यात्मावर त्यांची पूर्ण पकड होती. ज्याला तुम्ही जाणिवपूर्वक दुर्बोध म्हणताय त्या प्रतिमा संतांनी आधीपासून एस्टॅब्लिश केलेल्या आहेत. ते ही वाटलं म्हणून नाही हे या लेखात दाखवून दिलेलं आहे. म्हणजेच ग्रेसची कविता कळत नाही हा त्या कवीचा अपराध नसून लो़कांचं अज्ञान आहे. ज्याची जितकी फूटपट्टी तितकीच त्याची मोजमापाची क्षमता. मुक्ताईच्या कवितेचं उदाहरण हे त्यासाठीच दिलेलं आहे. आपल्याला ना त्या कवितेचा अर्थ माहीत ना ग्रेसजींच्या कवितेचा अर्थ. आणि तरीही अहमहिकेनं एखाद्याला दुर्बोध ठरवतोय. ते ठरवण्यासाठी आवश्यक पात्रता आपल्याकडे आहे का ?

मी स्वामी निश्चलानंद यांना ही चर्चा पहा असं विनवलं आहे कारण या माणसाचा अध्यात्माचा अभ्यास आहे. या माणसाचा असं बरोबर वाटणार नाही. पण ते नक्कीच अधिकारी व्यक्ती आहेत या चर्चेत.

मुद्दा राहिला बेफिकीर यांचा..
बेफिकीर यांच्याकडे तसंही कुणी लक्ष देत नाही. त्यामुळे ग्रेस यांनी पुरस्कार स्विकारावे का, मानधन स्विकारावे का हे मुद्दे उकरून काढण्याला काहीही महत्व नाही. साहीत्य अकादमी चा पुरस्कार का स्विकारला हा प्रश्न उद्दामपणाचा कळस आहे. जर त्यांनी पुरस्कार नसला दिला तर ग्रेस यांचं काय बिघडणार होतं. उलट साहीत्य अकादमीला ग्रेस लाभली या पुरस्काराने हे शंभर टक्के सत्य आहे. ग्रेस यांनि तो पुरस्कार स्विकारून साहीत्य अकादमीवर अनंत काळासाठी उपकार केलेले आहेत.

बेफिकीर Tue, 03/04/2012 - 01:26

In reply to by पूर्ण विजार

अध्यात्माचा स्वामी निश्चलानंद असा कोणाच्याही ग्रेसाळल्ल्या आमंत्रणावर आंतरजालावर का उपटतो? मला भेटेल का हा माणूस? ज्याला वृत्त म्हणजे स्वतःची इस्टेट नाही हेही समजत नाही तो?

कैच्याकै - कसले स्वामी निश्चलानंद?

हे वैयक्तीक नाही. हा स्वामी निश्चलानंद नावाचा माणूस स्वतःच्या खर्‍या नावाने आंतरजालावर वावरत नाही, खोट्या नावाने येऊन बिनडोक वाद घालतो.

पूर्ण विजार Tue, 03/04/2012 - 00:09

आपल्या लेखाच्या शीर्षकात आहे का?

बेफिकीर लेख न वाचताच तुम्ही प्रतिक्रिया देत आहात हे स्पष्ट आहे. वाचला असता तर काहीतरी लॉजिकल लिहीलं असतंत..तुमची ही मळमळ कुठली हे कळतंय.

बेफिकीर Tue, 03/04/2012 - 00:13

टिपीकल इन्टरनेटीय विधानांचा उबग आला आहे. माझी कसली घंट्याची मळमळ? ज्या माणसाला स्वतःची कविता दुसर्‍या दिवशी समजत नाही त्याच्या कवितेचा तुम्ही कसला प्रचार करताय राव?

-'बेफिकीर'!

पूर्ण विजार Tue, 03/04/2012 - 00:46

In reply to by पूर्ण विजार

अहो सहसंपादक
तुम्ही माझ्या आरोपाला पुष्टी देत आहात. वर बेफिकीर यांनी एका महाकवीवर खोडसाळ आरोप केला त्याला तुम्हाला ही श्रेणी का देता आली नाही या लोकांच्या शंकेला काय उत्तर द्याल बरं तुम्ही ? गेट वेल सून..

राजेश घासकडवींनी जो प्रतिसाद इथं दिलाय त्याला लिहा बघू खोडसाळ.. त्यांनी मालक या नात्याने असा प्रतिसाद दिला नसता तर या संस्थळाची लायकी काढायची वेळ आली नसती आमच्यावर.

पूर्ण विजार Tue, 03/04/2012 - 00:24

ग्रेसजीं बद्दल या संकेतस्थळावर लिहील्याने उद्देश सफल झाला नसला तरी या श्रेणी पद्धतीचं गौडबंगाल समजलं हा ही एक फायदाच कि. आता त्यातलं लॉजिक कळाल्याने आणि त्यांनाही भावना असल्याने एरव्ही म्रूतप्राय असणा-या संस्थळात आज अचानक ताबडतोबीने श्रेण्या कशा देण्यात आल्या, आपल्या शत्रूपक्षाला कशा देण्यात आल्या याचाही लोकांना अर्थबोध होईल.

बेफिकीर Tue, 03/04/2012 - 00:29

म्हणायचे होते, मर्जी तुमची

पण मुंगी समजा उडाली, तुमचंआमचं काही गेलंका?

उगाच मुंगी उडाली, मुंगी उडाली म्हणून का पिसाटलायत?

-'बेफिकीर'

('स'वांतर - 'ट्रेस' व्हा, 'ग्रेस' नको)

खवचट खान Mon, 16/04/2012 - 22:21

In reply to by बेफिकीर

तुम्ही मुंगी उडाली, मुंगी उडाली करताय, पण मी वाचलेल्या तमिळ प्रतीत 'लुंगी उडाली आकाशी' असं होतं. इथे मूळ शब्दांबाबतच संदिग्धता आहे, तर अर्थ-दुर्बोधतेचं काय घेऊन बसलात?

पूर्ण विजार Tue, 03/04/2012 - 00:36

म्हणजे संत साहीत्याचा अभ्यास नसतानाही तुम्ही प्रतिक्रिया देताय, मानधन काढताय, पुरस्कार काढताय. खरं तर तुम्ही जेव्हां लिहीता त्याच वेळी ते इग्नोर करणेबल असतं म्हणून कुणी प्रतिक्रिया देत नाही. मी आज देतोय कारण तुमचा आधीचा अभिनिवेश. तुम्हाला काय वाटलं संतसाहीत्यावर टीका आहे. हीच तर तुमची समज. आणि वर तोंड करून सांगताय आपण जे लिहीलं त्याचा अर्थ ग्रेसना कळत नव्हता. तुम्हाला विचारून लिहीत होते का ते ?

सचिन हळू खेळला म्हणून भारत हरला असं कुणीतरी म्हटल्याबरोबर तुटून पडणारे तुम्ही.. तुम्ही कसं काय ठरवता हो ग्रेसची उंची किती ते ? बेडूक या शब्दाबद्दल मघाशी थोडासा पश्चात्ताप झाला होता खरा.. आता जे केलं ते योग्यच याचि खात्री झाली.

शुभ रात्री !

बेफिकीर Tue, 03/04/2012 - 00:53

म्हणजे संत साहीत्याचा अभ्यास नसतानाही तुम्ही प्रतिक्रिया देताय, मानधन काढताय, पुरस्कार काढताय.>>>>>>

कोण संत? ज्ञानेश्वर, तुकाराम , एकनाथ वगैरे? ते कोणाशीही वाद घालायचे नाहीत जसे तुम्ही घालू पाहताय. तुम्ही कसली त्यांची स्तुती करता? चार पिढ्यांनी सांगितलं 'हा ग्रेट' की हा ग्रेट असला मी नाही. आपण आज समाधी घेऊ शकत नाही. रेड्याकडे नुसते बघू शकत नाही, सावकारी खतं ईंद्रायणीत बुडवू शकत नाही (कारण त्या नदीला आता पाणीच नाही आणि मी सावकारही नाही) आणि भारुडं रचू शकत नाही. आपण संतांचं नावच घेत नाही. कसले संत? आज येऊन जगून दाखवा त्या काळी जगलात तसे. है की नै?

खरं तर तुम्ही जेव्हां लिहीता त्याच वेळी ते इग्नोर करणेबल असतं म्हणून कुणी प्रतिक्रिया देत नाही.>>>>>>

हे मान्य

मी आज देतोय कारण तुमचा आधीचा अभिनिवेश. तुम्हाला काय वाटलं संतसाहीत्यावर टीका आहे. हीच तर तुमची समज. आणि वर तोंड करून सांगताय आपण जे लिहीलं त्याचा अर्थ ग्रेसना कळत नव्हता. तुम्हाला विचारून लिहीत होते का ते ?>>>>>>

कोण ग्रेस? ग्रेसांना स्वतःलाच माहीत नव्ह्तं ते काय लिहीत होते. बाकी 'ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता' यावर चर्चाकारांनी स्वतःच्या पिढ्या जगवायचा बकवास प्रयत्न केला खरा. पण ते स्वतःच जगू शकले नाहीत. पिढ्या दूरच. तुम्हाला ग्रेस समजलेच नाहीत. तुमच्यासारख्यांनी निष्कारण मोठा केलेला एक 'जाणीवपूर्वक अबोध होऊ पाहणारा' कवी. हे ग्रेस.

सचिन हळू खेळला म्हणून भारत हरला असं कुणीतरी म्हटल्याबरोबर तुटून पडणारे तुम्ही..>>>>>>

हे तुमचे विधान आकसातून आलेले आहे हे बालवाडीत जाऊ पाहणारे बालकही सांगेल.

तुम्ही कसं काय ठरवता हो ग्रेसची उंची किती ते ?>>

ग्रेस पाच फूट साडे सात इंच उंच होते.

बेडूक या शब्दाबद्दल मघाशी थोडासा पश्चात्ताप झाला होता खरा..>>>>>>

सुधारणेची जाणीव हीच सुधारणा

आता जे केलं ते योग्यच याचि खात्री झाली.>>>>>>

तुम्ही स्वतःच सगळं ठरवताय, हे काही खरं नाही, जगात काही इतरही माणसं असतात

-'बेफिकीर'!

पूर्ण विजार Tue, 03/04/2012 - 01:01

In reply to by बेफिकीर

कोण बेफिकीर ?
ज्याला कवितेतलं काहीही कळत नाहि तरीही रोज घाऊक कविता पाडत असतो. वाद घालायचा आरोप माझ्यावर करताय.. इथं लिंगनिरपेक्षता धाग्याची लिंक देऊ कि आणखी कुठली ? कुठलाही वाद असो तुम्ही हजर. आत्ताही तुम्ही त्यासाठीच तर आलेला आहात.

रेडा वगैरे सोडून द्या हो.. त्या साहीत्यातली जाण कित्पत आहे या प्रश्णाचं उत्तर माहीत असेल तर सांगा नाहीतर तुमच्या आधीच्या प्रतिक्रियां कशासाठी दिल्यात हे स्वतःच तपासून पहा. झोपा आता.

बेफिकीर Tue, 03/04/2012 - 01:08

आपण (निर्जंतुक जंतू इत्यादी) नकळत वा सकळत येथे इतर संकेतस्थळांवरील विषय काढून त्या स्थळांच्या जाहिराती करत आहात.

काळजी घ्या.

अर्थात इतर संकेतस्थळांची जाहिरात झाली तरी प्रस्तुत धागा इथे "वाचनमात्र" करण्यात येणार नाही किंवा प्रस्तुत संस्थळावरची टीका सोयीस्करपणे उडवण्यात येणार नाही असं वाटतं :) [कृपया हलके घ्या]
- (असुरक्षिततेने ग्रस्त नसलेला )

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 03/04/2012 - 01:50

In reply to by राजन बापट

=)) (बेफिकीर, लोळून हसण्यासाठी = ) ) हे स्पेसशिवाय वापरा.)

बाकी बेफिकीर यांचा पहिला आणि चिंतातुर जंतू यांचा प्रतिसाद वाचून ग्रेसांच्या कवितेबद्दल काही समजलं. इतर काही व्यक्तीगत आणि धाग्याशी अवांतर प्रतिक्रिया सदर लोकांना व्यक्तीगत संपर्कातून कळवलेल्या आहेत.

तुमच्यावर आकस असा आरोप पाहील्याने करमणूक झाली. बाकि तुमचे २४ विवाहबाह्य संबंध या सदराखाली लिहीलेल्या कथा हा तुमच्या दर्जेदार साहीत्याचा मापदंड असेल तर ग्रेस एक टुकार साहीत्य ठरतील यात नवल ते काय ?

जाऊ द्या. काजवे एकत्र होऊन ओरडले म्हणून सूर्य कंदील होत नाहि हे ध्यानात असू द्या.

साहीत्य अकादमीचा पुरस्कार न मिळालेला

निर्जंतूक जंतू

रामपुरी Tue, 03/04/2012 - 01:41

काहीतरी बरं असेल म्हणून वाचायला घेतला तर फक्त लाथाळीच दिसली. लेखकाचा रोख अवचटांवर दिसतो आहे (कदचित.. झाडलेल्या दुगाण्यांमधून नक्की "मटेरियल" हुडकून काढणे अवघड आहे). म्हणजे बेडूक, किडे वगैरे उपमा या त्यांच्यासाठीच दिसत आहेत. लेखकाला नक्की कुठल्या विषयातील किती ज्ञान आहे हे कळलं असतं म्हणजे बरं झालं असतं. नाही म्हणजे काय आहे की अवचटांना अशी लाखोली वाहण्याआधी लेखकाची ती लायकी आहे का हेही तपासून पहावं लागेल (लेखातल्याच नियमानुसार "ज्या विषयातील... इत्यादी" )

अवांतरः लेखातील दुगाण्या पुरेश्या न वाटून लेखकाने प्रतिसादात पण तेच चालू केलं आहे. वर लोकांनी आपल्याशी सहमत व्हावे आणि श्रेणी सुद्धा चांगली मिळावी हा अट्टाहास पाहून डोळे पाणावले (हसून हसून). याउप्पर लेखकाचा हाही दावा आहे की श्रेणी देणारे हास्यास्पद आहेत. असले उलट्सुलट दावे बघून आज "गटारी" असावी असा एक संशय बळावतो आहे.

बेफिकीर Tue, 03/04/2012 - 01:58

In reply to by रामपुरी

तुमचा प्रतिसाद फार आवडला.

माझ्यापुरते बोलायचे तर गटारी रोजच असते.

पण तरीही तुमच्या प्रतिसादाशी पूर्ण सहमत

-'बेफिकीर'!

पूर्ण विजार Tue, 03/04/2012 - 07:20

In reply to by रामपुरी

कुठल्या प्रतिसादावरून लेख लिहीला हे दिलेलं आहेच कि प्रतिसादात. तुम्ही -१ सेटींग ठेवलं तर दिसलं असतं. पण लेख इतका झोंबलेला असावा कि तितके कष्ट घ्यावेत असं वाटलं नसावं. मुद्दामच त्या संस्थळाची लिंक दिली नाही. पण तुम्हाला ते संस्थळ बरोबर कळालेलं आहे हे दिसलं.

आणि श्रेणी चांगली मिळावी हा अट्टाहास नाहीच हो. बॉलर स्वतःच अंपायर असावा तसं इथे लिहीणारे स्वतःच श्रेणी देताहेत हे पाहून करमणूक झाली. बाकि तुमच्या डोळ्यातून पाणी हे हसून आलेलं नसून झणझणीत अंजन डोळ्यांत गेल्याने आलेलं आहे. राजेश घासकडविंच्या प्रतिसादापासूनच इथे गटारी सुरू झाल्याने इथे चर्चा कशी हवी हे ध्यानात आले. इथून पुढे ते लक्षात राहील.

कळावे आपला नम्र

निर्जंतुक जंतू

रामपुरी Tue, 03/04/2012 - 21:59

In reply to by पूर्ण विजार

लेख वाचा तुम्हीच लिहिलेला. गटारी तिथूनच सुरू झाली आहे.
बाकी तुम्हाला मानायला पाहीजे. ग्रेस ग्रेट आहेत हे तुम्ही एकतर्फी ठरवून टाकलं आणि बाकिच्यांनी ते काही न बोलता मान्य करावं हा दुराग्रह. या (आणि इतर)संस्थळाची लायकी स्वतः ठरवून मोकळे. अगदी माझ्या डोळ्यात पाणी कशामुळे आले हे ही स्वतःच जाहीर करून टाकलं. काय समजता स्वतःला?
मी म्हणतो की ग्रेस हा अतिसामान्य कवी होता (काय ज्या दोन पाच कविता समजण्याजोग्या लिहिल्या असतील त्या जमेस धरून कवी म्हणतोय नाहीतर ते ही म्हटलं नसतं). "मी कविता (किंवा जे काही असेल ते) लिहितो तुम्ही अर्थ लावा आणि मला ग्रेट म्हणा. अर्थ लागला नाही तर तुम्ही मूर्ख" हे पटत नाही.
माझं हे वरील मत तुम्ही बदलू शकता का? तुम्ही मला काहीही म्हणा हे माझं मत बदलू शकणार नाही. तुमच्या असल्या थयथयाटाने तर अजिबात नाही. आणि मी कविता करू शकत नसलो तरी माझं हे मत कायम असेल. ग्रेस गेले हे वाचल्यावर "एक माणूस गेला वाईट झालं" ही माझीही प्रतिक्रिया होती पण त्यामुळे कवी म्हणून त्यांच्याबद्दल जे मत आहे ते बदलू शकेल का? हे म्हणजे त्या राजाच्या गोष्टीसारखं झालंय. राजाने घातलेले कपडे फक्त पुण्यवान माणसानाच दिसतील. राजा नागडा आहे हे सांगण्याचं धैर्य कुणातच नाही.
असो...
संस्थळाशी देणंघेणं नसल्याने त्याचा प्रश्न नाही पण तुमच्याशी वाद घालण्याएवढी तुमची लायकी नाही एवढं नक्की. चिखलात दगड मारल्याने घाण आपणच होतो चिखल नव्हे त्यामुळे यापुढे तुमचं दोन्ही हातांनी चालू दे. आम्ही पॉपकॉर्न घेऊन बसतो.

पूर्ण विजार Sat, 07/04/2012 - 09:47

In reply to by रामपुरी

अहो रामपुरी
ग्रेस यांच्याबद्दल चांगलं लिहीलं याला तुम्ही गटारी म्हणताय आणि त्यांच्या जाण्याच्या दिवशी जी गटारी झाली त्याला तुम्ही दिवाळी म्हणता यात तुमची पातळी दिसून आली कि. उद्या पुलं वर इंग्रजी विनोदी साहीत्याचा प्रभाव होता किंवा वि वा शिरवाडकर यांनी मूळ इंगजी साहीत्यकृतीवरून नटसम्राट लिहीलं म्हणून हे दोघे सुमार साहीत्यिक होते अशी टीका कुणी केली तर तुम्ही ती मान्य कराल का ? किमान हे दोघे जेव्हां गेले त्याच दिवशी अशी टीका झाली असती तर ?

तुम्हाल उद्देशून मूर्ख हा शब्द कुणी वापरलेला नाहि इथे. वापरायचि गरजही नाही आणि नव्हती. जे आहे ते सांगायचं कशाला ? तसं असतं तर खा़जगी मतं आणि जाहीरपणे शोकसभेत व्यक्त केलेई मतं यात केलेला फरक तुमच्या बिनडोक टकु-यात घुसला असता. जर मतं जाहीरपणे व्यक्त केली तर त्याचा प्रतिवाद केला जाईलच इतकं पण समजत नाही का तुम्हाला ?

सन्जोप राव Tue, 03/04/2012 - 05:56

अत्यंत रटाळ आणि वैयक्तिक चिखलफेकीसाठी उघडलेला धागा. लेखकाचा हेतू साध्य झाला असे वाटते.

पूर्ण विजार Tue, 03/04/2012 - 07:32

In reply to by सन्जोप राव

ग्रेस सारख्या माणसावर चिखलफेक होऊनही व्यथित न झालेल्यांना काय समजावून सांगायचे ? मी काल दिवसभर नव्हतो. पण एकही प्रतिक्रिया अशी आली नाही कि अशा प्रतिक्रियांचा निषेध व्हायला हवा. आपल्या संस्थळावर टीका झाल्यावर मात्र लगेच सगळे धावत सुटले. तीच भावना माझी ग्रेस यांच्या बाबतीत होती.

टीका झोंबली हा हेतू मात्र साध्य झाला. ते ही कधी ? तर सकाळी लेख टाकल्यानंतर संध्याकाळी आठ वाजता. दिवस भर इथं काय दिवे लावले गेले ते पाहील्यानंतरच. घासकडवींचा प्रतिसाद पाहता टिंगल टवाळीला सुरूवात कुणी केली हे दिसतंच आहे. ग्रेसजींची टवाळि होऊ शकते तर हे संस्थळ किस झाड कि पत्ती !

नगरीनिरंजन Tue, 03/04/2012 - 08:25

बरीच धुळवड होऊन गेलेली दिसतेय. :-)
आजकाल मी माझ्या देवाच्या पाया पडतो हे पुरत नाही. दुसर्‍याचे डोके माझ्या देवाच्या पायावर आपटल्याशिवाय भक्तीची किक बसत नाही.

- स्वामी चिखलानंद

प्रसाद Wed, 04/04/2012 - 22:49

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला

त्यातल्या त्यात दुर्बोध नसलेल्या ओळी, तरीही सीतेच्या राघव शेल्याची गोष्ट काही माहित नाही हे माझे अज्ञान म्हणावे कि दुर्बोध ओळी?

पूर्ण विजार Wed, 04/04/2012 - 23:35

In reply to by प्रसाद

अज्ञानच समजावे

तो बोल मंद हळवा आयुष्य असं काही स्पर्शून गेला कि ( आता तुलनेशिवाय गत्यंतर नाही. इथं किलोमीटरचं परिमाण नाहि मोजायला ) जसा वनवासातल्या सीतेला जर राघवाचा शेला जरी मिळाला असता तर त्याचं महत्व तिच्या लेखी जितकं .. तितकाच तो बोल महत्वाचा.

इच्छा असेल तर सोपं आहे हो. आपल्याला समजलं नाही म्हणून आलेल्या नैराश्यातून टीका नको, नाही का ? तुम्हाला नाही म्हणत.

प्रसाद Thu, 05/04/2012 - 11:55

In reply to by पूर्ण विजार

त्यांनी दिलेलं उदाहरण कळलं हो मला, मला फक्त राघव शेला म्हणजे काही रामायणातील फारशी प्रसिद्ध नसलेली कथा आहे की काय (जी कवी ग्रेस ना माहित आहे) आणि मला माहित नाही म्हणून विचारलं.
एवढ्या सोप्प्या ओळी कोणालाही कळतात!!!!!

परिकथेतील राजकुमार Thu, 05/04/2012 - 17:12

कोणी काही म्हणो पण आम्ही सदर लेखकांचे आभारी आहोत.त्यांनी आमच्या ज्ञानात प्रचंड भर घातली आहे.

१)त्यांच्या ह्या धाग्यामुळे आम्हाला एक माणिक गोटघाडे नावाचे सदगृहस्थ होते, ते स्वतःला ग्रेस म्हणवायचे आणि त्यांचा मृत्यु नुकताच झाला हे ज्ञान मिळाले.

२)सदर गृहस्थ हे कवी होते आणि त्यांच्या मृत्युनंतरदेखील त्यांच्या नावाने ट्यार्पी खेचता येते हे अतिज्ञान मिळाले.

३)ग्रेस ह्यांचे नाव पुढे करून आंतरजालीय राजकारण देखील खेळता येते हे ब्रह्मज्ञान मिळाले.

ब्रह्मज्ञानीजंतू

पूर्ण विजार Sat, 07/04/2012 - 04:04

In reply to by परिकथेतील राजकुमार

ग्रेस ह्यांचे नाव पुढे करून आंतरजालीय राजकारण देखील खेळता येते हे ब्रह्मज्ञान मिळाले

बास्स का ! म्हणजे तुमच्या विनंतीला मान देऊन आम्ही इथं थ्रेड टाकायचा, एकट्याने किल्ला लढवायचा, तेव्हां तुही मस्त रद्दीच्या दुकानात तराजू तोलत बसणार आणि सगळं साग्रसंगीत झाल्यावर आम्ही नाही त्या गावचे असा आव आणणार. शोभतं का आं ? ( उत्तर - शोभतंच !)

साळसूद राजकुमार

कुणीएक Sat, 07/04/2012 - 07:19

In reply to by पूर्ण विजार

ग्रेस काय ते एक तुलाच कळले हे कळले आता आम्हाला. खरेच, "किल्ला लढवायला" तू आहेस हे भाग्यच त्यांचे!! ननि लिहिले आहे त्यावर काहि आम्हा पामराना सांगणार नाहिस?

वाहीदा Tue, 10/04/2012 - 23:07

In reply to by कुणीएक

मुलाबाळांचा संसार सोडून आई दुस-या पुरूषाबरोबर निघून गेली. त्या वेळी वडिलांची अवस्था ही हताश, खचलेली असल्याने बालपण संपल्याची कवीला जाणीव झाली

ग्रेस कळो अथवा न कळो, वरिल वाक्य हे त्यांच्या व त्यांच्या आईच्या वैयक्तीक आयुष्यावर शिंतोडे उडविणारे आहे तेव्हा ते नक्कीच आवडले नाही.
'निर्जंतुक जंतू' या लेखकाचा तिव्र निषेध ! 'पोरके होणे काय असते' हे असे लेखक काय समजणार ज्यांना फक्त टिआरपी खेचणे माहीत आहे. खरंच किळस वाटली या विचारांची ..
~ वाहीदा

पूर्ण विजार Wed, 11/04/2012 - 07:49

In reply to by वाहीदा

ओ दीडशहाणे
यु ट्युबवर व्हिडीओ आहे ग्रेस यांचा. शुभदा गोखले यांनी तो बनवला आहे. त्यांनी ग्रेसना बोलते केले आहे. हा व्हिडिओ पाहीला तरी ग्रेसची कविता कळते. ग्रेस यांच्या देहाला अग्नी मिळायच्या आत झालेल्या टीकेबद्दल निषेध व्यक्त करायचा सोडून ही टीका कशी अनाठायी होती हे दाखवून देणा-यावर आगपाखड करण्यातली मेख लोकांच्या लक्षात येणार नाही असे समजू नका. तुम्ही कुणी का असेना, या निमित्ताने ग्रेसची बाजू घेताय असे दाखवून संदर्भ सोडून वाद कसा वाढेल याचा प्रयत्न करणारे गटारातले किडे आहात असे वाटते आहे. निषेध करायचाच असेल तर शुभदा गोखले यांचा करा. तुमचा हेतू उघड झाला आहे त्याशिवाय इतक्या दिवसांनी येऊन इथे घाण केली नसती तुम्ही.

धनंजय Fri, 06/04/2012 - 09:09

बापरे! उडत-उडत वाचता मूलभूत असे मुद्दे काय ते कळले नाहीत.

अनिल अवचटांनी "ती गेली तेव्हा"चे काय विश्लेषण केले होते, ते मला समजले नाही.

"ती गेली तेव्हा" ही कविता कुशल कारागिरीची वाटली. त्यामुळे विचार करून वाक्यांचे अर्थ शोधण्यात काही हशील आहे असे वाटले.

पहिल्या दोन ओळीतला "निनादत" हा अनपेक्षित शब्द कच्चकन दातात अडकला. परंतु कवितेचा विषय बघता, आणि कवीची कारागिरी बघता, कवीने शब्द हेतुपुरस्सरच निवडला आहे. त्या शब्दाचा अनुभव चरचरीत असावा हा कवीचा मानस होता, असे म्हणता येते. (शब्द अडकण्याचे कारण : रिमझिम पावसाचा ध्वनी माझ्याकरिता भरीव, पण नाजुक आहे. "निनाद" मात्र पोकळीत आणि घुमघुमणारा आहे. तरी एकूण कवितेचा कस बघता "कवीला योग्य नाद-शब्द सुचला नाही" असा विचार न येता, कवीने मुद्दामून त्रास देण्याकरिता हा शब्द निवडला आहे, असे म्हणणे मला सयुक्तिक वाटले.)

- - -

"निर्जंतुक जंतू" यांनी आपल्या वतीने अधिक विस्ताराने अर्थग्रहण-रसग्रहण केले असते, आणि अवचटांच्या (किंवा दुर्बोध मानणार्‍या दुसर्‍या कोणाच्या) रसग्रहणातील त्रुटी थेट दाखवल्या असत्या, तर बरे झाले असते. परंतु रसग्रहणही त्रोटक झालेले आहे, आणि अन्य लोकांच्या रसग्रहणातील त्रुटींपेक्षा त्यांच्या स्वभावातील त्रुटींचे वर्णन अधिक आलेले आहे.

त्यामुळे लेखामधून मला जितका आनंद मिळू शकला असता, तितका मिळाला नाही. प्रतिसाद मी तितकेसे वाचले नाहीत, त्यामुळे ती लाथाळी काय ते नीट समजून घ्यायचा प्रयत्न मी केलेला नाही.

पूर्ण विजार Wed, 11/04/2012 - 07:53

In reply to by धनंजय

धनंजय

चर्चा जर त्या पातळीवर राहिली असती तर नक्कीच दिशा मिळाली असती या चर्चेला. पण त्या ऐवजी राखी सावंत ही सुंदर आहे हे मान्य करा नाहीतर ऐश्वर्या राय विश्वसुंदरी नाही हे म्हणणे सिद्ध होते हे मान्य करा असे बिनडोक वकिली डावपेच इथं सादर झाले, त्याला माना डोलावल्या गेल्या आणि एखादी व्यक्ती गेल्यानंतर तिच्या देहाला अग्नी मिळायच्या आत अश्लाघ्य टीका होण्यासंदर्भात कुणालाही काहीही व्यक्त व्हावेसे वाटले नाही इथंच ती कविता समजून घेण्यात किती रस आहे हे स्पष्ट झालं

दगडावर डोकं आपटण्यात काय फायदा ?

अरविंद कोल्हटकर Fri, 06/04/2012 - 22:27

(थोडे अवान्तर...)

माझा स्वत:चा आवडता कवि कालिदास आहे.

पूछो क्यों?

कारण की सगळं छान समजतं. एखादा शब्द अवघड वाटला तर शब्दकोश उघडता येतो. व्याकरण-बिकरणासाठी मल्लिनाथ आहेच!

बेफिकीर Sat, 07/04/2012 - 00:20

निर्जन्तुक जन्तू यांना जे म्हणायचे आहे ते मला समजलेच नाही. खरे तर मला जे म्हणायचे आहे तेही मला समजले नाही.

इतके म्हणायचे आहे की समजलीच नाही तर त्या कवितेला ग्रेट म्हणू नये.

केवळ समजत नाही म्हणजे ग्रेट (किंवा ग्रेस) हे बरोबर नाही.

किंवा एकाला एक अर्थ समजला अन दुसर्‍याला दुसरा असे असल्यास त्याला कोडे म्हणावे.

आईनस्टाईनची सापेक्षता कलाकृतीला लागू करायला गेलो तर मजेसाठी येणारे प्रतिसादक मोठे कवी ठरतील.

योहान केपलरला ग्रेट मानले तर प्रत्येक शब्दरचना कविता होईल.

'कविता म्हणजे काय'असा लेख लिहावा काय?

-'बेफिकीर!

ऋषिकेश Wed, 11/04/2012 - 09:01

छ्या! बास आता.. तेच ते वाचून बोअर झाले आहे!

तिथे वर ग्रेस अप्सरांना कविता ऐकवत बसले असतील ताठ, आन तुम्ही लेको कांदेवाडीपासून धसवाडीपर्यंत कसले रे लेंगे स्वराज्य लेंगे, लेंगे स्वराज्य लेंगे करताय?

परिकथेतील राजकुमार Wed, 11/04/2012 - 13:19

In reply to by ऋषिकेश

लेंगे स्वराज्य लेंगे, लेंगे स्वराज्य लेंगे करताय?

हटायेंगे दुर्बोधता हटायेंगे.. हे पण मिटर मध्ये बसेल बहूदा.

'न'वी बाजू Fri, 13/04/2012 - 19:37

In reply to by ऋषिकेश

त्या बिचार्‍या अप्सरांनी कोणता अश्वमेध केला आहे?

जयदीप चिपलकट्टी Mon, 16/04/2012 - 21:15

माझ्या या प्रतिक्रियेचा ग्रेसशी काही संबंध नाही, पण 'दुर्बोधता' या मुद्द्याशी अाहे. होमी भाभा हे नाव मराठी वाचकांना कितपत माहिती अाहे याची मला कल्पना नाही. ते मूळचे मुंबईचे, पण सध्या हार्वर्डमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक अाहेत. ते Postcolonial Literary Theory मधले गुरू मानले जातात. या संपूर्ण क्षेत्रातच अतोनात दुर्बोध लिहिण्याचा रिवाज अाहे, अाणि त्यांतही भाभांचा विशेष बोलबाला अाहे. उदाहरणार्थ, त्यांच्या 'Of Mimicry and Man' या लेखातलं हे एक वाक्य:

If, for a while, the ruse of desire is calculable for the uses of discipline soon the repetition of guilt, justification, pseudoscientific theories, superstition, spurious authorities, and classifications can be seen as the desperate effort to "normalize" formally the disturbance of a discourse of splitting that violates the rational, enlightened claims of its enunciatory modality.

हे वाक्य मी संदर्भ सोडून दिलेलं अाहे हे मान्य. पण मी मूळ लेख संपूर्ण वाचायचा प्रयत्न केलेला अाहे, अाणि संदर्भ कळूनही काही फरक पडत नाही. अाणि हा त्या क्षेत्रातले 'पारिभाषिक शब्द' माहित नसण्याचा प्रश्न नव्हे, कारण या क्षेत्रातले इतर अनेक प्राध्यापकही 'हे काही कळत नाही' अशीच तक्रार करतात.

यात भारतीय माणूस मागे नाही ही एक चांगली गोष्ट अाहे. गायत्री चक्रवर्ती-स्पिव्हाक या कोलंबिया विद्यापीठातल्या प्राध्यापिका अशाच पद्धतीने लिहितात. त्यांचं हे एक वाक्य:

The in- choate in-fans ab-original para-subject cannot be theorised as functionally completely frozen in a world where teleology is schematised into geo-graphy.

जयदीप चिपलकट्टी Tue, 17/04/2012 - 03:48

In reply to by राजेश घासकडवी

मूळ लेखाचा संदर्भ असा अाहे:
Of Mimicry and Man: The Ambivalence of Colonial Discourse
Author(s): Homi Bhabha
Source: October, Vol. 28, Discipleship: A Special Issue on Psychoanalysis (Spring, 1984), pp. 125 -133
Published by: The MIT Press
Stable URL: http://www.jstor.org/stable/778467

सर्वसाधारण कुठल्याही उत्तर अमेरिकेतल्या युनिव्हर्सिटीमधून JStor फुकट access करता येतं, पण नाहीतर त्याला पैसे द्यावे लागतात असा माझा अंदाज अाहे. पण हाच लेख भाभांच्या 'The Location of Culture' या पुस्तकात छापला अाहे.

रुची Tue, 17/04/2012 - 17:54

In reply to by जयदीप चिपलकट्टी

ही नोंद इथे लिहावी की सध्या काय वाचताय? या धाग्यात लिहावी याबद्द्ल थोडा संभ्रम होता पण वरील प्रतिक्रिया वाचून चर्चा आता दुर्बोधता नक्की कशाला म्हणायचं या मूळ मुद्द्याकडे वळली असल्याचे जाणवले. माझ्यापुरते मला या प्रश्नाचे उत्तर सापडले आहे ते 'फिनिगन्स वेक' या पुस्तकाच्या रुपाने. ही साडेसहाशे पानं म्हणजे दुर्बोधतेचा कळस आहेत. पण दस्तुरखुद्द जेम्स जॉइस महाशयांनी तब्बल सोळा वर्षे घेऊन विचारपूर्वक लिहिलेले असल्यामुळे सरळ नाद सोडून हसण्यावारी नेले तर स्वतःचा मोठा बौद्धिक पराभव झाल्याची भावना तयार होते. मग काय, घ्या लेको 'रीडींग क्लास' आणि करा संशोधन 'लेखकाला नेमके काय म्हणायचे आहे?' या विषयावर! अजून दहा वर्षांनी समजणार की रीडींग क्लास घेतलेल्या सगळ्यांना जे समजलं ते सगळं वेगवेगळंच आहे! थडग्यामागून छद्मीपणे हसणारा जेम्स जॉइसचा चेहरा मला वाक्यावाक्याला दिसतोच आहे. पहिल्याच पानावरचा हा परिच्छेद पहा,
"The fall (bababadalgharaghtakamminarronnkonnbronntonner-ronntuonnthunntrovarrhounawnskawntoohoohoordenenthur — nuk!) of a once wallstrait oldparr is retaled early in bed and later on life down through all christian minstrelsy. The great fall of the offwall entailed at such short notice the pftjschute of Finnegan, erse solid man, that the humptyhillhead of humself prumptly sends an unquiring one well to the west in quest of his tumptytumtoes: and their upturnpikepointandplace is at the knock out in the park where oranges have been laid to rust upon the green since dev-linsfirst loved livvy."

ही नुसती दुर्बोधता नव्हे तर साडेसहाशे पानांची विनोदी कोडी आहेत आणि जॉइसने वाचकांवर उगवलेला सूड आहे असं माझं मत झालं आहे. पुस्तकातला विनोद, लय, खेळकरपणा आणि जॉइसची तीक्ष बुद्धीमत्त्ता तर दिसते आहे पण तरी हाताला काही लागत नाही असा मामला आहे.

रोचना Thu, 19/04/2012 - 14:15

In reply to by जयदीप चिपलकट्टी

भाभांचे लेखन दुर्बोध आहे हे अन्य समीक्षकांना ही वाटतं खरं, पण त्याचा अर्थ सर्व "वसाहतोत्तर" समीक्षक लेखनाचा हा रिवाजच आहे हे म्हणण्याचे काहीच कारण नाही. या दुर्बोधतेला अमेरिकन विद्यापीठांच्या वातावरणाशी निगडित अनेक वैचारिक आणि सामाजिक कारणं आहेत, ज्यावर फार मोठी चर्चा आणि वाद गेल्या वीस वर्षांत चालू आहेत. ती कारणं सगळ्यांना पटतीलच, आणि ती जाणून घेतल्यावर असे लेखन अचानक सुबोध वाटायला लागेल, असे मला अजिबात म्हणायचे नाही.

पण या विषयाची एक विशिष्ट तांत्रिक भाषा निर्माण करणे हा या भाषावापरामागचा एक हेतू होता. गणितज्ञ ग्रीक अक्षरं वापरतात तसं इथे नसलं तरी "discipline", "normalize" "disturbance of a discourse" of "splitting" "enunciatory modality" "para-subject" "teleology" is "schematised" सारख्या शब्दांचे विशिष्ट अर्थ, वैचारिक पार्श्वभूमी, आहेत. "geo-graphy" सारखे परिचित शब्दांचा छेद करणे, या मागे विशिष्ट भाषाशास्त्रीय, साहित्यिक समीक्षेच्या, वाचनशास्त्राच्या कल्पना अभिप्रेत आहेत - हे सगळे माहित नसल्यास दुर्बोधता (अधिकच) जाणवते. याच क्षेत्रातले लोकही भाभांना दुर्बोध म्हणतात, पण याचा अर्थ क्षेत्रीय पारिभाषिक शब्दच नाहीत, आणि हे सर्व निरर्थकच आहे, असे मुळीच होत नाही. "ई = एमसी स्क्वेर" असे प्रथमदर्शनी वाचल्यावर "ई अक्षरात कुठे आहे चौकोन, दाखवा बघू मला, आणि नसला तर हा आइन्स्टाइन भलताच दुर्बोध की हो" असं म्हटल्या सारखं आहे.

मलाही भाभा दुर्बोधच वाटतात, कारण (दुसर्‍या दुर्बोधतेच्या धाग्यावर धनंजयने म्हटल्याप्रमाणे) खूप कष्ट घेतल्यावर ही त्यांच्या लेखनामागचे अर्थ किंवा कल्पना, तर्क, मला तेवढे भावत नाहीत. स्पिवाक यांचे लेखन माझ्या मते "रीपेज केअरफुल, रिपीटेड रीडिंग" या सदरात मोडते, भाभांचे तेवढे नाही. दोघेही या क्षेत्रातले एकेकाळी गुरू होते, पण त्याला ही आता प वर्षं झाली, त्यांच्या कल्पनांची - फक्त लेखनशैलीचीच नव्हे - चिक्कार चिरफाड झालीय. पण ग्रेस, किंवा विलियम फॉकनर सारखेच ते दुर्बोधतेचे लोकप्रिय प्रतीक झाले आहेत, हे मात्र खरे.

चेतन सुभाष गुगळे Thu, 19/04/2012 - 12:29

ती रचना (अर्थातच इथे शब्दरचना असा उल्लेख अभिप्रेत आहे असे गृहीत धरत आहे) ज्यांनी वाचावी असे अपेक्षित असते त्यांच्यापैकी अनेकांना ती समजत नाही व त्यातून कुठलाही ठोस अर्थ ते काढू शकत नाहीत अशा रचनेस दूर्बोध म्हणावे. आता हे कोणी ठरवायचं अर्थातच ज्यांना या रचनेतून बोध होत नाही अशा बहुसंख्य वाचकांनी हे ठरवावं.

बाय द वे, भारतातल्या कुठल्याही शासकीय कार्यालयातील फॉर्म्स कधी भरले असतील तर ते भरण्याकरिता माहितीपत्रकात ज्या सूचना लिहीलेल्या असतात त्या वाचल्यावर दुर्बोध रचनेचा अनुभव आला असेलच; नाही का?