डेटींग गेम (The female brain)
"The Female Brain" पुस्तक वाचते आहे. यात स्त्री-पुरुष प्रेमात कसे पडतात त्याचे एक उदाहरण घेतले आहे. मेलिसा नोकरीत स्थिरस्थावर झाल्यानंतर तिला एक दीर्घकालीन रिलेशनशिप हवीशी वाटू लागली. तिने "डेटींग" साइटवर नावही नोंदवले. पुढे काही महीने फसलेल्या डेटींगमध्ये गेले. आज तिला लेस्ली तिच्या मैत्रिणीने पबमध्ये बोलावले आहे. अन तयार होऊन ती गेली आहे. तिथे थोड्याच वेळात तिच्या दृष्टीस रॉब पडतो... केस सॉल्ट-पेपर, आत्मविश्वास अन एक सुखवस्तू व्यक्तीमत्व आहे त्याचे. पहाताक्षणी तिच्या पाठीतून एक शिरशिरी जाते अन ती लेस्लीकडे वळून म्हणते "ऐक ना तो पुरुष पाहीलास का?"
.
लेस्ली पहाणार तोच, प्रत्यक्ष रॉब त्यांच्याकडे येताना दिसतो. पुढे रॉबच पुढाकार घेऊन दोघींशी गप्पा मारु लागतो. तो किंचीत नर्व्हस आहे. मेलीसामध्ये testosterone, fire up होते, हे कामोत्तेजनेस पूरक संप्रेरक आहे. परंतु तिचा amygdala जास्त कार्यरत झाला आहे जो anxiety अन सावधानतेचे नियंत्रण करतो. हा विशेषतः परक्या व्यक्तींच्या सहवासात अधिक कार्यरत होतो.
.
पुढे दोघेजण डान्स फ्लोअर वर डान्स करतात. लेखिकेने म्हटले आहे की - कोणती व्यक्ती, शरीरयष्टी, रुप, त्या व्यक्तीच्या लकबी आपल्याला आवडतील हे मेंदूत चक्क hard wired झालेले असते. व त्यामुळे आपण विशिष्ठ व्यक्तींकडेच आकर्षित होतो.नंतर स्त्री-पुरषांचा दोघांचा chase-lure खेळ विस्तृत लिहीला आहे. नेहमी पुरुष हाच chaser असतो व स्त्री lure करणारी असे सरसकट विधान केले आहे. स्त्री ही नेहमी अधिक सावध असते कारण एक तर तिच्यापाशी थोडीच बीजांडे आहेत त्यातून तिला एका सशक्त, निरोगी व पुढे वंश चालवू शकेल अशा अपत्याला जन्म द्यायचा आहे. याउलट पुरषाकडे अमर्याद शुक्राणू, अन ते ही संपूर्ण जीवनभर असतात.अर्थात दोघेही दीर्घकालीन सहवास इच्छितात पण स्त्री नेहमीच इच्छिते, जास्त इच्छिते, पुरषाला जास्त gauge करते, अधिक वेळ घेते. She takes her sweet time before giving in.
.
स्त्रिया त्यांच्यापेक्षा वयाने अधिक पुरुष पसंत करतात. तसेच स्त्रियांचा भर पुरषांच्या दिसण्यापेक्षा, पुरषाच्या मान-हुद्दा-संपत्ती आदिंवर जास्त असते. कारण "उत्क्रांती" मध्ये आहे. तिच्या अपत्यास अधिक संरक्षण, चांगले resources, स्थिरता देणारा पुरुष तिला आकर्षक वाटतो. जरी आजकाल स्त्रिया स्वतंत्र कमावणार्या असल्या तरी त्यांना पुरुष "Provider" देखील असावा असे वाटते. अजुनही आपल्या मेंदूची अनेक कार्ये "Stone age" मधील तत्वांवर चालतात.
.
याउलट पुरषांचा भर दिसण्यावर असतो - स्त्रीचा शेप, भरीव ओठ, चमकदार डोळे व केस, activity level, चापल्य हे गुण म्हणजे अक्षरक्षः स्त्री fertile व निरोगी असण्याच्या निकषांवर असतो. त्यामुळेच प्रथमदर्शी प्रेमात पुरुष, स्त्रियांहून जास्त पडतात.
.
अन यातच (उत्क्रांती) पुरषांच्या रसिकतेचे व स्त्रीच्या व्यवहारीपणाचे रहस्य दडलेले आहे.
.
पुढे प्रेमात पडलेला मेंदू कसा असतो त्याचे वर्णन येते. प्रेमात मेंदू हा चक्क illogical बनतो. मेंदूत अनेक इतर अनेक संप्रेरके कमी होतात अन फक्त सुखद भावना होते. चक्क प्रेमपात्राचे shortcomings (दोष) यांचेकडे कानाडोळा केले जाते. : )
आल्या भट जन्माला आली त्या
आल्या भट जन्माला आली त्या काळात मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू झालेला Evolutionary psychology हा विषय तिलाही आत्तापर्यंत माहीत झालेला असेल.
जरी आजकाल स्त्रिया स्वतंत्र
जरी आजकाल स्त्रिया स्वतंत्र कमावणार्या असल्या तरी त्यांना पुरुष "Provider" देखील असावा असे वाटते. अजुनही आपल्या मेंदूची अनेक कार्ये "Stone age" मधील तत्वांवर चालतात.
थोडक्यात सासरकडच्यांच्या पैशावर आरामात आयुष्य काढायचे मुलींचे धोरण बदललेले दिसत नाही ?
थोडक्यात सासरकडच्यांच्या
थोडक्यात सासरकडच्यांच्या पैशावर आरामात आयुष्य काढायचे मुलींचे धोरण बदललेले दिसत नाही ?
"मुली जरी स्वतंत्र व कमावत्या असल्या तरी" हे प्लीज वाचा. पुरुषाचं अन स्त्रीचं मूल असतं मग दोघांनी भार नको उचलायला? अन त्यात सासर कुठुन आलं. वरच्या लेखात फक्त स्त्री-पुरुष संबंध या विषयावर चर्चा चालली आहेत.
आसंकसं ? चर्चा दीर्घकालीन
आसंकसं ? चर्चा दीर्घकालीन नाते निर्माण होणेबाबतची मानसीकता याबाबत चालु आहे हे आल्याभट्टला देखील कळेल.
"मुली जरी स्वतंत्र व कमावत्या असल्या तरी" हे प्लीज वाचा. पुरुषाचं अन स्त्रीचं मूल असतं मग दोघांनी भार नको उचलायला?
खरंतरं मुली कमावत्या नसल्या तरी विवाहोछ्चीत पुरूष त्यांचा भार जन्मोजन्मी घेत आले आहेत असे असताना हा प्रश्न आल्याभट देखील विचारणार नाही. तुम्हाला खरचं उत्तर हवयं ?
कोणी सांगीतलं होतं... ?
कोणी सांगीतलं होतं... ? स्त्रियांनी.
त्यांच्या फयद्याकरताच त्यांनी भार उचलला ना.. ? दीर्घकालीन नाते निर्माण होणे हा आपण फायदा समजत असाल तर होय.
थोडक्यात स्त्रियांनी दिर्घकलीन नाते निर्माण व्हावे म्हणुन हा भार उचलावयास लावला.. पुरुषांनी तो जन्मो जन्मी उचलला आणी अजुनही स्त्रियांची ती मागणी आहेच हे सर्व आधीच याच धाग्यावर विवीध ठीकाणी स्पष्ट असताना आपण मज कडुन आण्खी कोणत्या विषेश माहितीची अपेक्षा करत असाल तर संकोच न करता व्यक्त व्हा.
सासरचा पैसा आपोआप मुलाचा
सासरचा पैसा आपोआप मुलाचा होतो. वरील लेखात स्त्री ही पुरषाकडे "प्रोव्हायडर" म्हणून पहाते हे सांगीतले आहेच. पैसा पुरषाचा झाल्यामुळे स्त्री सासरच्या पैशावर हक्क गाजवते. हे पूर्ण सत्य आहे.
ती आरामात आयुष्य काढते हे नकारात्मक छटा असलेले विधान आहे . घरी असणारी स्त्री धुणं - भांडी-स्वयंपाक-केरवारे-स्वच्छ्ता (मोरी-संडास आपोआप स्वच्छ होतात काय?)- मुलांचे संगोपन/गृहपाठ अशी तारेवरची कसरत करतच आयुष्य जगते.
स्त्री ही नेहमी अधिक सावध
हे कारण पटत नाही. मर्यादित बीजांडं म्हटली तरीही सर्वसामान्य आरोग्य असणाऱ्या स्त्रीकडेही लाखो बीजांडं असतात. सावधपणे निर्णय घेण्याचं कारण असतं ते म्हणजे वंशसातत्यासाठी स्त्रीला निदान नऊ महिने द्यावे लागतात, पुरुषाला पाच मिनीटंही पुरतात. (याचा अर्थ स्त्रिया नऊ महिन्यात आणि पुरुष पाच मिनीटांत अपत्यांची जबाबदारी झटकतात असं नव्हे.)