प्रिय प्र,
प्रिय प्र,
आज रंगांचा दिवस ! आज रंगानाही लाली चढावी … आज उषेने लाल शालू नेसावा आणि सूर्याने पिवळ्या धम्मक रंगात तिला बुडवून टाकावे . आज गर्द रानाने हिरवाकंच रंग उधळावा! आज फुलांनाही रंगांचे कोवळे स्वप्न पडावे !!!!! …… तुला माहितेय , आज माझ्याही गालावर अशीच सिंदुरी लाली चढावी . आज माझ्या श्याम सुंदर नील कृष्णाने मला त्याच्या निळाईत रंगवावे . …. आसुसलिये ये मी …. आह !!!!!!
ये तू ये. रंगव मला …. ही दुधशुभ्र त्वचा रंगवून टाक. या प्रेमवेड्या राधेची चोळी तुझ्या रंगात भिजवून टाक !!!!!
तुझे सारे सारे रंग आज आसुसले असतील माझ्यावर बरसण्यासाठी …… ये तू ये.
आज मीच रंग
खुलून आलेल अंग अंग
आज मी सुरज केसर
आज तू माझां बहर
आज मी हिरवं रान
आज नाही कसलही भान
आज मी लाजरा गुलाब
आज तुझा रंगीत रूबाब
आज माझी रंगीत काया
आज तू काजळ माया
बघ न शब्द ही रंगून गेलेत तुझ्या मयुरपंखी प्रेमात. खूप काहीतरी होतंय …शब्द बरसतायत …. तुला खुणावतायत.
आज न मी फुलाफुलाचा ड्रेस घालणारे …. मी फुल झालेय. आज मनाची कळी पुन्हा एकदा तिच्या नाजूक कोषातून डोकावतेय . आज मला वाटतंय सारखं की की मीच रंग होऊन तुझ्या मंत्रमुग्ध कायेवर बरसावं . मीच तुझी काया होऊन जावं . मग कुणि दूर नाही करणार आपल्याला !!!!!!!! आज तू ढग आणि मी तुझी निळाई … आज मी चाफा आणि तू माझा सोनसळी पिवळा रंग . आज मी इवलीशी मुग्ध कलिका …… आणि तू माझा गुलाबी गुलाबी रंग …. आज तू मऊशार ओठ …. आज मी भरून आलेय काठोकांठ . (इश्श्य …….)
संध्याकाळी वाट बघेन तुझी …… आपल्या नेहमीच्या कदंबाखाली ……. ये ये ये …… "प्र" माझ्या "प्र" …. रंग उधळत ये. … रंग बरसत ये. … स्वत:च रंग होऊन ये ………. !!!!!
तुझ्या रंगात रंगलेली,
वीणा
प्रतिक्रिया
(No subject)
मी "अगं नाच नाच नाच राधे
मी "अगं नाच नाच नाच राधे उडवूया रंग"चा विडिओ एम्बेडवणार तोच तुम्ही रंग बरसे टाकलीत.
अमिताभऐवजी अशोकजी..!!!
(No subject)
(No subject)
रंग बरसे
अमिताभचा आवाज इतका मस्त लागला आहे या गाण्यात. एकदम Rowdy n bawdy. काय योग्य अयोग्य , नैतिक, अनैतिक या कल्पना बाजूला ठेवल्या तर मस्त गाणं आहे.
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
हो... माझा प्र आहेच अमिताभ
हो... माझा प्र आहेच अमिताभ सारखा
तुझे सारे सारे रंग आज आसुसले
सारे सारे रस, रंग नको. तो अमृतघड्यावाला मोप झाला.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
होळी इतका रोमँटीक सण का मानला
होळी इतका रोमँटीक सण का मानला जातो. कधी नव्हे ते अंगलगट करण्याचा चानस मिळतो म्हणून?
___
नंद चतुर्वेदी यांची ही कविता सुंदर आहे.
फागुन के आते ही
हमारा नींबू सहस्त्रों छोटे पत्तों
फूलों से दमदमाने लगता है
सुगन्ध से प्रमत्त हवाओं के दिन
मुँडेर पर बैठ जाते हैं
छोटी चिड़िया-से गरदन उठाये
.
पौष में किसे मालूम था यह होगा
ठण्ड से काँपते, निर्जीव पेड़
हिलने लगेंगे
हरे, नये और ताजा दम
.
हजारों बार यही हुआ है
पृथ्वी !
तुम ने दी है ठण्डे, पपड़ाये
धूल-धूसरित
पेड़ों पठारों को
खिलखिलाती हँसी
रोशनी का समुद्र और वसन्त
ठिठुरता हुआ भूखण्ड
बदल गया है
रंगों की आतिशबाजी में
पृथ्वी !
तुम कितनी नयी होती हो
उर्वरा और उत्फुल्ल
.
कितनी तरह देती हो
रूप, आकार
बदलती हो ताल, लय, छन्द
त्रिकाल।
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
सॉरी बार्का.. पण,
एवढ्या 'रंगा'त आलं होतं, आणि अचानक
हे वाचालं आणि खरं सांगतोय, लै हसलो.
होळीचं एपिक गाणं आहे हे
कोणाला आठवलं कसं नाही?
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
आठवलं होतं.
आठवलं होतं. पण दुसरं कुणीतरी नक्कीच चिकटवणार असं समजून आळस केला.
पण दोन मराठी होर्या अतिशय आवडतात.
१) आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. २) गोपगड्यांसह कृष्णकन्हैया आज खेळतो होरी ग, आज नको यमुनेचे पाणी चल जाऊ माघारी ग.
वा, क्या बात है!
"अनंगरंगी, पी. डी. खेळते,
मी ही जर्द पिवळा!"
पिडांकाकांचा,
आहो पिडांकाकांचा,
थोबडा कुणी, आवळा...
होळी आलीय की काविळ झालीय...!!
होळी आलीय की काविळ झालीय...!!
शंका समाधान
तुम्हाला कुतुहल असेल तर तुम्ही चेक करून बघायला आमची हरकत नाही.
आज होली है!!!!
निषेधार्थ भडकाऊ ही श्रेणी
निषेधार्थ भडकाऊ ही श्रेणी देण्यात आली आहे.... ;;)
अतिअवांतर
भडकाऊ ही श्रेणी कुठल्यातरी शिवीचा अपभ्रंश आहे असा नवीन ओकसाक्षात्कार झाला.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
++१ अगदी खरयं
मी ही बरेचदा भडाखाउ चा अपभ्रंश वर्शनच वाचुन जातो.
actions not reactions..!...!
फारच पिडे
फारच पिडे बुवा ही वीणा.
-एक वीणापीडित.
बाकीचे सगळेच बोलून राहीलेत.
पांकोवि : बाकीचे सगळेच बोलून राहीलेत. वीणेचे स्वर अबोल झाले ?
तिच्या लाडक्या प्र ने ओलीचिंब
तिच्या लाडक्या प्र ने ओलीचिंब भीजवल्याने आजारी पडली असेल.
नाही नाही "औषध नल गे मजला" वाला मस्त मस्त फिव्हर नाही.
खरा खुरा ताप.
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
तू हकीम होऊन यावे .... एकांती
तू हकीम होऊन यावे .... एकांती औषध द्यावे - असे म्हणावे.
हाय!!! काय आठवण काढलीत सिंग
हाय!!! काय आठवण काढलीत सिंग जी.
http://www.aathavanitli-gani.com/Song/Kashi_Kelis_Majhi_Daina
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
हाय!!! काय लिंक दिलीस,
हाय!!! काय लिंक दिलीस, हर्मिट..!!!
अगं वेडी होते मी हे गाणं
अगं वेडी होते मी हे गाणं ऐकून, वे-डी!
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
पहिलीच ओळ वाचून सर्द झालो तो
पहिलीच ओळ वाचून सर्द झालो तो अजून सावरलो नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अरे होळीत पिचकारी मारुन नाही
अरे होळीत पिचकारी मारुन नाही का भिजवणार तो? तुम बी यडाच है
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
पिचकारी मारून भिजवल्या
पिचकारी मारून भिजवल्या गेल्यामुळे सर्द होणार असे म्हणालो हो. तुम भी कायपण सोचता है!
तदुपरि- काय क्रियापद आहे. विग्रहानुकारी कोंडके-एस्क
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
वोह कुच भी हो, तुम यडाच हय पर
वोह कुच भी हो, तुम यडाच हय पर मई ठाम हय
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
चालतंय. मी तर
चालतंय. मी तर क्रियापदविग्रहजनित हास्यकल्लोळात मग्न आहे
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अरे सांग ना ते कोणतं क्रियापद
अरे सांग ना ते कोणतं क्रियापद अन काय विग्रह होतो? जरा फोड करके बतलाव.
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
भिजवणे हे ते क्रियापद वाटतं.
भिजवणे हे ते क्रियापद वाटतं.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अरे बाप रे आत्ता लक्षात आलं
अरे बाप रे आत्ता लक्षात आलं
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
अपेक्षापुर्ती #२
अपेक्षापुर्ती #२