एक अविस्मरणीय क्षण

ही गोष्ट आहे साधारणपणे ४ - ५ वर्षांपूर्वीची. त्यावेळी मी १२ वी मध्ये होते. नवीन वर्षाच्या स्वागताची सर्वत्र धामधूम चालली होती. माझ्या घरापासून काही अंतरावर एक नावाजलेली शैक्षणिक संस्था आहे. तिथेही दरवर्षी नवीन वर्षाच स्वागत खूप धुमधडाक्यात होत असत. त्या शैक्षणिक संस्थेची नववर्षाच्या स्वागताची एक आगळीवेगळी पद्धत आहे आणि ती म्हणजे २९,३०,३१ डिसेंबर या तीन रात्री तिथे गाजलेल्या व नावाजलेल्या कलाकारांना, मान्यवरांना निमंत्रित केले जाते. आणि एरवी फक्त टी.व्ही. वर दिसणारी त्यांची कला प्रत्यक्षात पहावयास मिळते. त्या वर्षीही असच संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकाराना बोलावण्यात आलेले होत. परंतु नेमकी माझी बारावीची पूर्व परीक्षा चालू होती दुसरया दिवशी म्हणजे १ जानेवारी रोजी माझा अर्थशास्त्राचा पेपर होता. अभ्यास पूर्ण झाला असल्यामुळे तास मला काही टेन्शन नव्हत. परंतु स्कोरिंग साठी अभ्यासाची माझी धडपड चालू होती. पण ज्यावेळी मला समजले कि आज प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध संतूर वादक आदरणीय पंडित शिवकुमार शर्माजी येणार आहेत तेंव्हा परीक्षेचा कसलाही विचार न करता मी त्या कार्यक्रमाला जाण्याचे ठरविले कारण संतूर हे माझ खूप आवडते वाद्य आहे आणि पंडित शिवकुमार शर्माजी हि माझी संगीत क्षेत्रातील आवडती व्यक्ती आहे. आणि त्यांचा कार्यक्रम एवडा जवळ आणि मी जाणार नाही अस तर होऊ शकत नाही. त्यामुळे मी आवर्जून त्या कार्यक्रमासाठी गेले.
कार्यक्रम साधारणता ६ वाजेपर्यंत चालू झाला सुरुवातीला काही मान्यवरांचे कार्यक्रम झाले. परंतु त्यावेळी पंडित शिवकुमार शर्माजी आलेले नव्हते. अचानक एकदम गोधळ झाला कि मकरंद अनासपुरे आले म्हणून सौरभभैय्या, मोनिकाताई, व मी पळत गर्दीच्या ठिकाणी गेलो व खूप आटापिटा करून मकरंद अनासपुरे सरांचा ऑटोग्राफ घेतला आणि आनंदाने जागेवर येऊन बसले. काही वेळ कार्यक्रम पहिला आणि थोड्याच वेळात पंडित शिवकुमार शर्माजी आले म्हणून एकाच गोंधळ उडाला. आणि ते एकता क्षणी मी सर्व काही विसरून त्यांना भेटण्यासाठी धावत त्यांच्या गाडीजवळ पोहचले. गर्दीतून वाट काढत मी त्यांच्याजवळ पोहचले आणि त्यांच्या पाया पडले तसे ते माझ्याकडे बघून प्रसन्न हसले. त्यांच्या चेहऱ्यावर एक निराळेच तेज होते अगदी सिरीयल मध्ये देवी देवतांच्या चेहऱ्यावर असते तसेच. क्षणभर मी त्यांच्याकडे पाहताच राहिले. मी माझ्याजवळचा कागद आणि पेन ऑटोग्राफ साठी त्यांच्यासमोर धरला आणि ज्याची मी कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती अशी गोष्ट घडली.
त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि ते मला म्हणाले कि “ बेटा आप कभी भी किसीसे ऑटोग्राफ मत मांगना बल्की आप इतनी बडी हो जावो कि सारी दुनिया आपसे ऑटोग्राफ मांगे ”. तो क्षण माझ्या आयुष्यातल्या काही अविस्मरणीय क्षणांपैकी एक होता. जो कि मी कधीही विसरणार नाही. त्यानंतर खूप कलाकारांशी जवळून बोलन झाल परंतु मी कधीही कोणाला ऑटोग्राफ मागितला नाही. आज हि गोष्ट सर्वांशी शेअर करताना मला खूप आनंद होत आहे.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सुंदर Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

खूप सुंदर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संतूर ऐकायला मला देखिल आवडतं. खासकरून शर्माजींचा राग केदार.
=============

खूप आटापिटा करून मकरंद अनासपुरे सरांचा ऑटोग्राफ घेतला आणि आनंदाने जागेवर येऊन बसलो.

सरांचा?
बसलो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अनासपुरे सर ज्यांस प्रिय आहेत त्यांची क्षमा मागून म्हणेन की शर्माजींच्या लेखात त्यांचा इतका भाव देऊन उल्लेख करणं हे सुंदर समुद्रकिनार्‍याचे वर्णन करताना शेजारी पडलेल्या प्लास्टीक वेस्टचे देखिल तितकेच कोडकौतुक केल्यासारखे वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सौरभभैय्या, मोनिकाताई, व मी पळत गर्दीच्या ठिकाणी गेलो व खूप आटापिटा करून मकरंद अनासपुरे सरांचा ऑटोग्राफ घेतला आणि आनंदाने जागेवर येऊन बसले.

अहो अजो.. अनेक लोक पळत गेलेत. एक नव्हे. तेव्हा आम्ही सर्वजण गेलो आणि ऑटोग्राफ घेऊन जागेवर येऊन बसलो हेच बरोबर. पण त्यांनी हरकतीनंतर ते दुरुस्त केल्याचे पाहून मात्र.. हम्म...!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१ सहमत... उलट अता "बसले" हा शब्द त्या वाक्याशी विसंगत वाटतोय. पण असो, परी-बाईंनी पडत्या फळाची आज्ञा समजून ते सुधारलं (चुकवलं) ही. काय अजो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"साही विवाद करता पडलो प्रवाही" वाला इफेक्ट आहे बहुधा तो..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा Smile अगदी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऑटोग्राफ एक्टीला मिळाला आणि परत आल्यावर स्त्रीदाक्षिण्याने एकटीलाच जागा मिळाली असे कल्पा. नवी वाक्यरचना फिट्ट वाटेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अनासपुरे सरांचे इतके फॅन असतील असं वाटलं नव्हतं. बाय द वे, गेलो नंतर मी वाक्य तोडलं. आटापिटा फक्त परीने केला, एकटीने ऑटोग्राफ घेतला आणि जागेवर बसली असं वाचलं. अनासपुरे सरांची (अरेरे) फार जास्त लोकप्रियता मनातल्या मनात अमान्य असल्याने मी तसा अर्थ काढला. शिवाय का कोण जाणे 'जागेवर येऊन बसलो' हे देखिल पटले नाही. भारतात इतके लोक परत त्याच ठिकाणी एकत्र येऊन बसू शकतात का? रियालिस्टिक बोला ना. जागा गेलेली असते तोपर्यंत. आणि रिजर्व जागा असेल तर "आनंद झाला" म्हणावे, परत येऊन बसायचे डिटेल द्यायचे अज्जिबात गरज नाही. शर्माजींच्या कार्यक्रमाला आलेली परी अनासपुरे सरांचा (अरेरे) ऑटोग्राफ घेऊन घरी जाईल असे आम्हाला वाटले नसते. J) J) J) Blum 3 Blum 3 Blum 3 ROFL ROFL ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सर हे संबोधन अनासपुरे यांना वापरणे काही चूक आहे अशातला भाग नाही, पण आमच्यासाठी सर म्हणजे एकच..... "धन्यवाद सर, खूप मोलाची माहिती दिलीत" वाले सर. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अवकाशताण वाले? न जाणो किती गॅलिलिओ मारल्याचं पातक लागेल तुला. अरे, मांडू देत लोकांना थेर्‍या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हो तेच ते. अवकाशताण मांडून सर्वांच्या वरताण करणारे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छान अनुभव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या सर्वांचे प्रतिक्रियेसाठी मनपूर्वक आभार.
अरुणजीनी सांगितल्याप्रमाणे माझ्या लेखनातली एक चूक सुधारली आहे. परंतु (सरांचा?) या शब्दाबद्दल त्यांना नेमके काय सुचवायचे आहे हे न कळल्यामुळे तिथे कोणतीही दुरुस्ती केली नाही. परंतु अरुणजीना जे सुचवायचे आहे ते समजल्यावर ती चूक मी नक्कीच सुधारून घेईन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0