जानेवाले से मुलाकात ना होने पायी....
मुमताज दहेलवी (14 February 1933 – 23 February 1969)
.
.
चांदनी खिल ना सकी चांद ने मूंह मोड लिया ... जिसका अरमान था वोह बात ना होने पायी. बदलियां छा गयी ... पर बरसात ना होने पायी. एक ऐसी आग लगी मन मे ... जो ... जिने भी न दे ... और मरने भी न दे. क्या खबर थी के मुहोब्बत मे ये दिन आते है. जिसे हम अपना बनाते है ... वोह तडपाते है.
तिचं नाव काढलं की एकदम काळजात एक जोरदार खलिश सी चुभती है. एक जोरदार झटका बसतो जो ... दर्दनाक पण असतो व हवाहवासा सुद्धा वाटतो. लाजव्वाब असतो. तिच्यावर चित्रित झालेलं "तेरे सदके बलम ना करे कोई गम" आठवून पहा म्हंजे कळेल की हमारे दिल पे क्या बीतती है. त्यातलं ते तिचं मोहक हास्य. मोहक हा शब्द फक्त तिच्यासाठीच निर्माण झालेला असावा. हाय मै कुर्बान. वो समा वो जहां ... फिर कहां. Mr. & Mrs. '55 मधे उधर तुम हसीं हो ... मधे मुहोब्बत कुछ ऐसी सजाए देती है ... की पूछो मत.
तिच्या खट्याळपणा म्हंजे काय बोलायचं काम नाय. शौख से लिजिये जी इष्क के इम्तिहान. अच्छा जी मै हारी चलो मान जाओ ना मधे ... दिल को जलाने वाली अदाए. तुम चैन से रह नही सकोगे. मेरे सपनें मे आना रे सजना मधलं "मुझे छेड के जगाना" आठवून पहा ... म्हंजे तिच्या खट्याळपणाची साक्ष पटेल. आए बहार बनके लुभा कर चले गए च्या सुरुवातीस तिच्या चेहर्यावरच्या खट्याळपणा मिश्रित मुद्रा पहा ... म्हंजे ती खट्याळ पणा किती करू शकते ते समजेल. आराम मधे तिच्या चेहर्यावरची प्रेमासक्तता खट्याळपणा मधे मिसळून जाते ती "मन मे किसी की प्रीत बसा ले" मधे.
बहुतेकांनी मधुबालेला "चलती का नाम गाडी" किंवा "मोगल-ए-आझम" मधे बघितलेली असेल. पण "एक साल" मधे तिला बघाल तर समजेल की "दिन में अगर चराग जलाए तो क्या किया" ते. किंवा झुमरू मधे किशोर कुमार बरोबर "ठंडी हवा ये चांदनी" च्या काँटेक्स्ट मधे बघा. "सर रख के आसमॉं पे पर्बत भी सो गये" चा गुगली समजेल. इतका सॉल्लिड समजेल की "जैसे कोई सितारा बादल के गांव में".
मधुबालेने जो दर्द पेश केलाय त्याच्यासाठी एक वेगळाच धागा काढावा लागेल.
.
सिंगजी तुमचा मधुवरचा लेख अन
सिंगजी तुमचा मधुवरचा लेख अन शेर नाही, ये बहुत नाइन्साफी है रे सांबा :)
असो, मधुबाला प्रेटी होती की सुंदर या चर्चेत, तुम्हीच मधुबालेच्या संदर्भात पेश केलेला हा शेर लिहीते -
अपने अपने हौसले ... अपने तलब की बात है
चुन लिया हमने उन्हे ... सारा जहां रहने दिया
________________
लेख आवडला, पहील्या वाचनात फक्त गाण्यांची जंत्री वाटला, दुसर्या वाचनात गाणे-तिचे विभ्रम (हाय!!!) यांची सांगड नीट वाचू शकले.
_________________
तुम्ही निवडलेला फोटो सुंदर आहे पण आमचा जास्त सुंदर :) टुक टुक!!!
तुमच्या मधुबालेकरता मला सापडलेल्या या खालच्या ओळी , विशेषतः पहील्या २ -
उसकी कत्थई आंखों में हैं जंतर मंतर सब
चाक़ू वाक़ू, छुरियां वुरियां, ख़ंजर वंजर सब
.
जिस दिन से तुम रूठीं मुझ से रूठे रूठे हैं
चादर वादर, तकिया वकिया, बिस्तर विस्तर सब
.
मुझसे बिछड़ कर वह भी कहां अब पहले जैसी है
फीके पड़ गए कपड़े वपड़े, ज़ेवर वेवर सब
...
लहानपणी - बोले तो, अगदी लहानपणी नव्हे, पण नुकतेच अर्धवट कळू लागण्याच्या वयात (आणि योगायोगाने, हिंदीही शाळेत नुकतीच शिकवू घातलेली असल्याकारणाने, हिंदीदेखील नुकतीच नि अर्धवटच कळू लागण्याच्या वयात) - 'उठाए जा उन के सितम, और जिए जा' या गाण्याचा आम्हांस प्रचंड अचंबा वाटत असे, त्याची आठवण झाली.
(तेव्हा सितमबितम काही म्हणजे काही समजत नसे. तसले हिंदी दुर्दैवाने शाळेत शिकवत नसत. मग गाळलेल्या जागा आपल्याच मनाने भरण्यापलीकडे आम्ही तरी बिचारे काय करणार? असो.)
"तुझ्या गळा माझ्या गळा" मधील,
"तुझ्या गळा माझ्या गळा" मधील, चल रे दादा चहाटळा मला वाटायचं - चहा करायला टळ. :)
______
अन "शोडष वर्ष प्राप्त झालेल्या" आपल्या प्रेयसीचे वर्णन करणारा तो शेर लहानपणी ऐकलेला-
तेरे रुख पे तब भी तील था,
मगर आज के जैसा कातील न था|
त्यातील कातील म्हणजे "कातळ" वाटायचे. म्हणजे कातळासारखा काळाभोर :)
...
त्यापेक्षा, घासकडवींच्या 'मिपा'वरील जुन्या खरडवहीत, त्यांनी बहुधा कॉलेजच्या दिवसांत हॉष्टेलच्या खोलीच्या भिंतीवर चितारलेला, बद्धकोष्ठ आणि मूळव्याध एकसमयावच्छेदेकरून उपटलेल्या मधुबालेचा एक स्केच डकविलेला होता, तो आम्हांस फार म्हणजे फार आवडत असे. त्या स्केचच्या आठवणीने आज अंमळ हळवा झालो, गदगदलो, रडू लागलो, अश्रूंचा महापूर पातला, जगबुडी जाहली, इ.इ.
(इतर टीकाकारांनी 'त्या' मधुबालेचे वर्णन 'शिंक देणारी तिरळी मधुबाला' असे केल्याचे वाचनात आलेले आहे; मात्र, आमच्या मते ते वर्णन चूक आहे, अन्याय्य आहे, आमचेच बरोबर, इ.इ.)
(घासकडवी काका, घासकडवी काका, 'खास लोकाग्रहास्तव' तो स्केच प्लीज़ इथेही डकवा ना! प्रेटी प्लीज़! तुम्हाला मधुबालेच्या मूळव्याधीची शपथ!)
(अतिअवांतर: बद्धकोष्ठ आणि मूळव्याध एकसमयावच्छेदेकरून उपटलेल्या मधुबालेच्या स्केचकरिता 'जानेवाले से मुलाक़ात न होने पायी' हे क्याप्शन अत्यंत चपखल आणि समर्पक ठरेल, नाही?)
शिंक येनारी घासुबाला
(इतर टीकाकारांनी 'त्या' मधुबालेचे वर्णन 'शिंक देणारी तिरळी मधुबाला' असे केल्याचे वाचनात आलेले आहे; मात्र, आमच्या मते ते वर्णन चूक आहे, अन्याय्य आहे, आमचेच बरोबर, इ.इ.)
त्यो मीच त्यो, फुटक्या नशिबाचा! मीच त्या मडुबालेला 'शिंक येनारी' म्हनालो व्हतो. 'तिरळी' कोन म्हनालं त्ये काय ठावं न्हाय.
पन जरा काय म्हनालो तर घासुगुर्जींनी रागारागानं तिला गायबच क्येली!!
मीच अपराधी हाये.....
आता काढा तुमची व्हान आनि मारा आमच्या टाळक्यात!!!
:)
वा वा वा गब्बरशेठ!!!
मस्तच आठवण काढलीत हो मधुबालेची...त्यात वो तो चले गए ऐ दिल म्हणजे उफ्फ्फ....त्याच सैंयामधल हवा में दिल डोले काय किंवा वो रात दिन वो शाम की काय जिनीयस ऑफ सज्जाद!!! निरालामधली अण्णांनी दिलेली गाणी, अमरमधली नौशादने दिलेली गाणी एकाहून एक,पण तीने त्यांना चोख न्याय दिला. तिचा खट्याळपणा तर मनमोहक आहेच पण तितकंच काळजात रूतणारा तिचा गंभीर अभिनयही आहे....मलापण तलतची एक गजल आठवली,"कौन केहेता है तुझे मैने भुला रख्खा है?" त्यातली एक ओळ तुमच्या (आणि अशोककाकांच्या)साठी
"देख जा आके महकते हुए जख्मोंकी बहार, मैने अबतक तेरे गुलशन को सजा रख्खा है"
"कौन केहेता है तुझे मैने भुला रख्खा है"
चंचल
ही मधुबालेची बहीण. दिसायला अगदी हुबेहुब नाही पण खूप तिच्यासारखी. असं म्हणतात की मधुबालेच्या अखेरच्या आजारपणात आणि तिच्या मरणोत्तर मधुबालेचे जवळ जवळ संपत आलेले चित्रपट चंचलने पूर्ण केले. अर्थात, अगदी मोजकीच दॄष्य होती म्हणा, अन्यथा फरक जाणवला असता. मला वाटतं जिस देशमें गंगा बहती है मधली प्राणवर प्रेम करणारी पद्मिनीची मैत्रीण चंचलच होती. तसंच झूमरूत किकुची मैत्रीण चंचलच होती.
असो...मधुबालेच्या आठवणीनिमीत्त....तिच्यावर चित्रीत झालेली मि.अँड मिसेस ५५ मधली गाणी फार आवडतात. विशेषतः नय्यरची कमालीची "ठंडी हवा काली घटा आ ही गई झूम के", "उधर तुम हँसी हो, इधर दिल जवां है" आणि "चल दिये बंद नवाज छेडकर मेरे दिल क तार" ह्याच नय्यरचं हावडा ब्रिज मधलं "मुहोब्बत का हाथ, जवानी का पल्ला, सुभानल्ला बाबू सुभानल्ला" ह्यात मधुने नुसते चेहर्यावर भाव आणून कमाल केल्येय. आणि दु:खी, हळवे, उदास भाव म्हणाल तर गेटवे ऑफ इंडियातले "ना हसों हम पे जमाने के है ठुकराए हुए" हे गाणं तिच्याच अभिनयाला
शोभणारं आहे. त्यातच "दो घडी वो जो पास आ बैठे" मधे खेळकर, अल्लड, प्रणयी भाव क्षणात बदलून "गैर भी तो कोई हँसी होगा" हे अत्यंत हळवेपणाने म्हणणारी ही बाला.....खरच अविस्मरणीय.
सुभानल्ला बाबू सुभानल्ला"
सुभानल्ला बाबू सुभानल्ला" ह्यात मधुने नुसते चेहर्यावर भाव आणून कमाल केल्येय.
+१ प्रचंड गोड दिसली आहे ती त्या गाण्यात.
जिस देशमें गंगा बहती है मधली प्राणवर प्रेम करणारी पद्मिनीची मैत्रीण चंचलच होती
हा सिनेमा कमीत कमी ५०० वेळा तरी पाहीलाय :) ती प्राणवर जान निछावर करणारी तरुणी गोड आहे. माहीत नव्हते की ती मधुबालाची बहीण आहे.
तिच्या सौंदर्यात नाही, पण
तिच्या सौंदर्यात नाही, पण त्याची तारीफ करणार्यांच्या लिखाणात शिळोपा नक्किच आलाय... हे तिचेच यश :)