Skip to main content

मराठी कॉल गर्ल्स

कधीतरी २००३ साली आम्हां तीन मित्रांना एक योजना सुचली; (डॉ. चिं. मो.) पंडित, अतुल (देऊळगावकर) आणि मी. पन्नास वर्षांच्या आतल्या दहा लोकांना एखाद्या, जरा आडजागेच्या ठिकाणी एकत्र करायचं. प्रत्येकानं आपल्या आस्थाविषयाबद्दल अर्धापाऊण तास बोलायचं. मग दोनतीन तासांचं एक अन्स्ट्रक्चर्ड गप्पासत्र, आणि मग प्रत्येकाच्या मांडणीवर सगळ्यांची चर्चा.

तपशीलही ठरला. जागा, पंडितांचं तळेगाव (दाभाडे) इथलं घर. काळ, मध्य मार्च. खर्च वाटून घ्यायचा. व्यवस्थापन : पंडितांची डबेवाली जेवण देणार. पंडित, मी चहा-बिस्किटं सांभाळणार. माणसं सुचवणं अतुल करणार. संपर्क, पिच्छा पुरवणं मी करायचं. पंडित, मी हे पन्नाशीच्या पुढचे, तेव्हा आम्ही टिपणं काढणार आणि चर्चा अडखळली तर 'पिन' मारणार. हे शेवटचं जरा अवघड होतं, कारण पंडित, मी, दोघेही स्वतःचा आवाज आवडणारे लोक! वेळ, तीन दिवस.

आधी अतुलनं बारातेरा नावं सुचवली, आणि मी त्यांना पत्रं पाठवली. आठदहा दिवस थांबून फोनाफोनी सुरू केली. त्या वेळी मोबाईल आजइतके सार्वत्रिक नव्हते. सध्या फोनवरून सकाळी-संध्याकाळी बोलता येतं. तर काही अनुभव नोंदतो.

एक कवयित्री कधी फोनवर भेटलीच नाही. सतत 'नो रिप्लाय', दिवसारात्री केव्हाही. नंबरही अतुलनं दोनदा तपासला.

एक मोठे व्यवस्थापक, कथा आणि स्तंभ लिहिणारे म्हणाले, "तीन दिवस फार होतात, एका दिवसात आटपा." आम्हांला अमान्य.

एक याच वर्णनाचे, ते म्हणाले, "ठीक आहे, मी पहिल्या दिवशी येऊन माझं प्रेझेंटेशन करून जाईन." आम्हांला अमान्य.

काही जण येऊ इच्छित होते, पण खऱ्याच अडचणी होत्या; मुलीची दहावी, स्वतःची पीएचडी, इत्यादी.

एक विद्यापीठात शिकवणाऱ्या म्हणाल्या, "येते, पण तीनचार दिवस आधी आठवण करा." आठवणीचा फोन केला तर म्हणाल्या, "हा एक्स-वाय-झेडचा कार्यक्रम ना?" मी "नाही." म्हटल्यावर म्हणाल्या, "पण मी नाही म्हटलं होतं!".

पण सर्वांत कठोर कथा एका विख्यात लेखकाची, आणि सामाजिक कार्यकर्त्याची. मी फोन करून काम सांगताच, "हो, मिळालं पत्र. काय करताय हे? लोकांची मागणी आहे का, असं काही करा, अशी?" स्वर अत्यंत तुसडा. आता पत्रात पंडित, अतुल यांची नावं होती. दोघेही या गृहस्थांना ओळखत होते. आणि 'लोक' म्हणजे कोण? त्यांना अशी मागणी करायला व्यासपीठ कुठे आणि कोणतं आहे? मी दबलो, त्या विद्वान सुराला. म्हटलं, "मेल करतो". उत्तर तितकंच तुसडं आलं. अतुलला सांगितलं, तर तो म्हणाला, "समजतो कोण तो, स्वतःला?". सोडून दिलं, पण तोंडात कडवट चव मात्र आली आणि टिकली.

मी त्या वेळी एनजीओ संस्कृतीशी नुकतीच ओळख करून घेत होतो. 'लोकांची मागणी' कशी आपल्याला हवी तशी करून घेता येते, ती क्रिया किती तुच्छतावादी बेमालूमपणे करता येते, हे सगळं मला माहीत नव्हतं. आज माहीत होऊनही मी तसं करू धजत नाही.

मग ग्रीक शोकांतिका सुरू झाली. पंडित रस्त्यावरून जात असताना क्रिकेटच्या चेंडूनं त्यांच्या डोळ्याला इजा झाली, आणि त्यांचं येणं रद्द झालं. यजमानपद माझ्याकडे आलं. एक "येतो" म्हणणारं दाम्पत्य बुवाच्या छातीत दुखल्यानं गळलं. शेवटी जो संच जमला तो असा:

राजीव साने (विचारवंत), लोकेश शेवडे (उद्योजक), यमाजी मालकर (तेव्हा औरंगाबादला वार्ताहर-संपादक), संदेश भंडारे (छायाचित्रकार), अतुल आणि मी. कार्यक्रम दीडच दिवसात आटपला. चांगला झाला, कारण संदेशचं 'तमाशा, एक रांगडी गंमत' पुस्तक प्रकाशनाच्या जवळ होतं, लोकेश सरकारवरचा राग व्यक्त करायला नेहेमीच तत्पर असतो, यमाजी कौटुंबिक आणि गावांमधली भांडणं किती वेळ वाया घालवतात यावर बोलले, राजीव साने अर्थक्रांतीच्या सुरुवातीचं बोलले, अतुल ग्रामीण समाजाच्या त्रासांबद्दल बोलला, मी तीनशे रुपये प्रत्येकीचा तपशील सांगितला.

एकूण फ्लॉप शो.

आता 'कॉल गर्ल्स' का, तर आर्थर क्यस्लरची एक कादंबरी आहे, 'द कॉल गर्ल्स' नावाची. अनेक 'आंतरराष्ट्रीय ख्याती'चे तज्ज्ञ कसे कॉलची वाट पाहत सेमिनारहून वर्कशॉपला, आणि तिथून सभांना जात, एकच भाषण सगळीकडे देतात, यावर. तर इथे तसं नाही झालं, पण एकूण मराठी 'विचारवंत' या वर्गावरचा विश्वास उडावा, असं मात्र खूप काही झालं!

ऋषिकेश Thu, 12/02/2015 - 09:31

:(
आपल्याला ज्यांच्याकडून काहि चांगल्याची आशा असते त्यांचे पाय असे मातीचे निघाल्याचे बघून होणारी वेदना अधिकच असावी.

प्रांजळ लेखन आवडले.

यानिमित्ताने दिवाळी अंकाव्यतिरिक्तही, नंदा खरेंसारखे लेखक ऐसीवर लिहिते होत आहेत याचाही आनंद आहे.
मनःपूर्वक स्वागत आहे!

मेघना भुस्कुटे Thu, 12/02/2015 - 09:41

हम्म. भल्या भल्या प्रस्थापितांची गोष्ट. मराठी 'विचारवंत' कुठून अपवाद असायला? :(

पण या निमित्तानं राजन खान यांनी भरवलेल्या साहित्यिक संमेलनाची आठवण झाली. त्याबद्दल तुमचा काही अनुभव आहे का? असल्यास वाचायला आवडेल. कारण ती संकल्पना कागदावर भलतीच रोम्यांटिक वाटली होती. पण त्यातून काय निष्पन्न झालं, कुणाचे काय बरे-वाईट अनुभव, याबद्दल पुढे काही म्हणता काही वाचायला मिळालं नाही.

बाकी दिवाळी अंकाव्यतिरिक्तही तुम्ही इथे लिहिलंत हे सर्वात भारी. मनापासून स्वागत.

अवांतरः धाग्यांवरही चर्वितचर्वण चालू असतंच. पण भेटून नुसत्याच टवाळक्या न करता असल्या कायतरी सिर्‍यस टवाळक्या ऐसीकरांनी करायची वेळ आता आलीय.

अंतराआनंद Thu, 12/02/2015 - 09:57
दिवाळी अंकाव्यतिरिक्तही तुम्ही इथे लिहिलंत हे सर्वात भारी. मनापासून स्वागत.
भेटून नुसत्याच टवाळक्या न करता असल्या कायतरी सिर्‍यस टवाळक्या ऐसीकरांनी करायची वेळ आता आलीय.

+१

अंतराआनंद Thu, 12/02/2015 - 09:57
दिवाळी अंकाव्यतिरिक्तही तुम्ही इथे लिहिलंत हे सर्वात भारी. मनापासून स्वागत.
भेटून नुसत्याच टवाळक्या न करता असल्या कायतरी सिर्‍यस टवाळक्या ऐसीकरांनी करायची वेळ आता आलीय.

+१

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 12/02/2015 - 10:04

व्यावसायिकतेचा अभाव हा मराठी माणसांचा एक गुणधर्म म्हणावा का? किंवा भारतीयांचाच. पण त्यामुळे एकंदर अनौपचारिक संबंध जास्त घट्ट असतीलही.

गवि Thu, 12/02/2015 - 10:51

राजीव साने (विचारवंत), लोकेश शेवडे (उद्योजक), यमाजी मालकर (तेव्हा औरंगाबादला वार्ताहर-संपादक), संदेश भंडारे (छायाचित्रकार), अतुल आणि मी. कार्यक्रम दीडच दिवसात आटपला. चांगला झाला, कारण संदेशचं 'तमाशा, एक रांगडी गंमत' पुस्तक प्रकाशनाच्या जवळ होतं, लोकेश सरकारवरचा राग व्यक्त करायला नेहेमीच तत्पर असतो, यमाजी कौटुंबिक आणि गावांमधली भांडणं किती वेळ वाया घालवतात यावर बोलले, राजीव साने अर्थक्रांतीच्या सुरुवातीचं बोलले, अतुल ग्रामीण समाजाच्या त्रासांबद्दल बोलला, मी तीनशे रुपये प्रत्येकीचा तपशील सांगितला.

एकूण फ्लॉप शो.

आता 'कॉल गर्ल्स' का, तर आर्थर क्यस्लरची एक कादंबरी आहे, 'द कॉल गर्ल्स' नावाची. अनेक 'आंतरराष्ट्रीय ख्याती'चे तज्ज्ञ कसे कॉलची वाट पाहत सेमिनारहून वर्कशॉपला, आणि तिथून सभांना जात, एकच भाषण सगळीकडे देतात, यावर. तर इथे तसं नाही झालं, पण एकूण मराठी 'विचारवंत' या वर्गावरचा विश्वास उडावा, असं मात्र खूप काही झालं!

होपफुली क्रमश: हा शब्द लिहायचा राहून गेलाय असं समजतो. आणि उपस्थित विचारवंतांचा नावाने उल्लेख करुन "एकूण फ्लॉप शो" आणि त्यापुढे "कॉल गर्ल्स" असं शीर्षक देण्याची फक्त कारणमीमांसा.. आणि एकूण मराठी विचारवंत या वर्गावरचा विश्वास उडावा असं "खूप काही" झालं असं मोघम क्लोजिंग स्टेटमेंट.

नावं न घेता हे सर्व एक हलकाफुलका प्रसंग चुटकारुपात सांगितला म्हणून योग्य वाटलं असतं पण नावानिशी अन काय बोलले त्या विषयाचा उल्लेख आल्यावर मग एकदम एकाच वाक्यात सर्वांना जज करुन निकाली काढणं आणि तिथेच लेख संपवणं हे अयोग्य वाटलं. आगोदरच्या पूर्ण लेखात चहाबिस्किटांपासून कुठे जमायचं, कोणाला कुठे दुखापत झाल्याने अन इतरांचंही प्रत्येकाचं कसंकसं रद्द झालं, असा व्यवस्थित तपशील आला आहे. पण विश्वास उडवणारे "विचारवंत" काय म्हणाले याचा तपशील मात्र टाळला आहे.

अर्थात ज्याचं त्याचं मत हेही खरंच. मुळात हा उपक्रम कसा फेलच होणार होता आणि तसंच कसं झालं असा या लेखातला सूर समहाउ वाटला. तसा उद्देश नसेलही पण भासला तरी नक्की.

पुढे क्रमशः लेखांमधे तपशील येणार असेल तर हा पूर्ण प्रतिसाद रद्द समजावा. क्षमस्व..

गवि Thu, 12/02/2015 - 10:57

शिवाय "इथे तसं नाही झालं" तर मग मराठी कॉल गर्ल्स असं स्पेसिफिक आणि लक्षवेधक शीर्षक कशाला दिलं हेही समजलं नाही. लक्षवेधक शीर्षक असणं आवश्यकच पण जे संबंधितच नाही असं लेखात म्हटलंय ते शब्द अथवा संबोधन शीर्षक केवळ लक्षवेधक आहे म्हणून (उदा:"सनी लिओनेचा टॉपलेस फोटो") द्यायचं का?

यामधे उगीचच हे विचारवंत कॉल गर्ल्स असल्याचं ध्वनित होतंय.. किंवा ते नाहीत असं आवर्जून सांगण्याची अनावश्यक आवश्यकता दिसतेय.

ऋषिकेश Thu, 12/02/2015 - 11:05

In reply to by गवि

माझ्यामते

'आता 'कॉल गर्ल्स' का, तर आर्थर क्यस्लरची एक कादंबरी आहे, 'द कॉल गर्ल्स' नावाची. अनेक 'आंतरराष्ट्रीय ख्याती'चे तज्ज्ञ कसे कॉलची वाट पाहत सेमिनारहून वर्कशॉपला, आणि तिथून सभांना जात, एकच भाषण सगळीकडे देतात, यावर.

यात कॉलगर्ल्स हे शीर्षक का याचे उत्तर आले आहे.

गवि Thu, 12/02/2015 - 11:09

In reply to by ऋषिकेश

थांब ऋ... घाईत उत्तर देऊ नको. ते सर्वांनी वाचलेलं आहे. त्याच्या नंतर "इथे तसं झालं नाही" असा उल्लेख आहे ना?

उद्या समजा मी एक कट्टावर्णन केलं. त्यात कट्ट्याला माझ्या बोलावण्यावरुन ऋषिकेश, मेघना, घासकडवी अन अदिती आले होते असं लिहिलं आणि नंतर लिहिलं की लेखक गिरीष अणेकरांनी एका लेखात "फुकट मिळतंय म्हणून चर चर चरणार्‍यांना लतकोडगे म्हटलं आहे" ..अर्थात या कट्ट्यात तसं काही झालं नाही. पण एकूण जालीय मित्र याविषयी भ्रमनिरास व्हावा असं बरंच काही घडलं.

आणि कट्टावर्णनाच्या धाग्याचं शीर्षक ठेवलं "लतकोडगे"

तर?

कल्पना जोशी Thu, 12/02/2015 - 10:58

शीर्षक आणि त्याचे कारण आवडले.चर्चेचा तपशिल लिहावा अशि विनन्ति आहे.

अनु राव Thu, 12/02/2015 - 10:59

हा भंपक प्रकार ( कुठेतरी १० लोकांनी जमुन सो कॉल्ड विचार मंथन वगैरे करण्याचा ) करण्यामागचे कारण खूप विचार करुनही कळले नाही. आणि नंतर नावे घेवुन नावे ठेवण्याचा प्रकार तर अजिबातच पटला नाहीये.

गवि Thu, 12/02/2015 - 11:04

In reply to by अनु राव

यापैकी एकत्र जमून (रादर इतरांना जमवून) विचारमंथन करवणे हा प्रकार समजण्यासारखा आहे कारण तो मनोरंजक असणार. चार मित्र पुलावर उभे राहूनही विचारमंथन करतातच. पण इथे जरा निवांत बसून गप्पा मारणे असा उद्देश असेल. तो अयोग्य नसावा. त्यातला जजमेंटल पार्ट जरा खटकतो. "भेजा फ्राय"ची आठवण होते.

पण स्वतःच लोकांना बोलावणे करुन जमा करणे आणि मग तुलनेसाठी का होईना पण फोनची वाट बघणार्‍या कॉलगर्ल्सचा उल्लेखही आपणच करणे इथे विसंगती जाणवली. आणि तपशील न देता सर्वांचंच बोलणं एकजात "फ्लॉप शो" होतं अशी एका वाक्यात बोळवणही अपूर्ण वाटली.

अनु राव Thu, 12/02/2015 - 11:24

In reply to by गवि

जजमेंटल पार्ट जरा खटकतो.

हेच तर भंपक म्हणण्याचे कारण आहे.

भंपक अश्यासाठी की, ह्यात सर्व प्रकारात मला जाणवला आहे तो दर्प आणि दंभ.
कोणालाही जमवुन तुम्ही काहीही विचार मंथन करा नाहीतर कॉल गर्ल बोलवून अजुन काहीतरी करा.
पण त्या गोष्टीवर पब्लिक फोरम मधे लिहुन, ज्यांनी त्यांना ( लेखिकेला ) किंम्मत दिली नाही त्यांच्यावर टीका कशाला?
वर जे लोक आले, त्यांच्यावर पण टीका. ती कशा साठी.

पुर्वी ग्रुप मधे कोणी असला हुच्च पणा दाखवायला लागला की त्याला जमिनीवर आणण्यासाठी " तुझा पगार कीती? आणि तू बोलतो काय?" अश्या टाइपची वाक्य असावी तसेच इथे विचारावेसे वाटले.

काळा मठ्ठ बैल … Thu, 12/02/2015 - 12:09

In reply to by अनु राव

जजमेंटल पार्ट जरा खटकतो.

हेच तर भंपक म्हणण्याचे कारण आहे.

भंपक अश्यासाठी की, ह्यात सर्व प्रकारात मला जाणवला आहे तो दर्प आणि दंभ.

हा हा हा
अनु राव जजमेंटल बद्दल चिडतात
भारीच विनोदी की हो
सांड्लो गोठ्यातच कडबा चघळता चघळता

मेघना भुस्कुटे Thu, 12/02/2015 - 11:27

In reply to by गवि

विचारमंथन (पुलावर वा पुलाखाली) करण्यासाठी लेखकानं दिलेलं आमंत्रण विनामोबदला होतं, ज्याला अपेक्षेइतका / पुरेसा / फार प्रतिसाद मिळाला नाही. ही वृत्ती नि:संशय एखाद्या विक्रेत्याची आहे, 'विचारवंत' या बिरुदाला शोभेशी नाही. त्या वृत्तीवर टीका आहे. त्यासाठी इतकी स्पष्टीकरणं का बरं द्यावी लागावीत?

गविंची टीका मला उगाचच टोकदार वाटते आहे.

बाकी मंथनाला आलेल्या लोकांच्या चर्चेचा तपशील मात्र ऐकायला खूप आवडेल.

गवि Thu, 12/02/2015 - 11:37

In reply to by मेघना भुस्कुटे

विचारमंथन (पुलावर वा पुलाखाली) करण्यासाठी लेखकानं दिलेलं आमंत्रण विनामोबदला होतं, ज्याला अपेक्षेइतका / पुरेसा / फार प्रतिसाद मिळाला नाही. ही वृत्ती नि:संशय एखाद्या विक्रेत्याची आहे, 'विचारवंत' या बिरुदाला शोभेशी नाही. त्या वृत्तीवर टीका आहे. त्यासाठी इतकी स्पष्टीकरणं का बरं द्यावी लागावीत?

सेंट्रल लोकेशनपासून दूरची जागा.. इथे साध्या बिनविचारी कट्ट्यालाही स्टेशनपासची हाटेले सोडून शहराबाहेर तीन किलोमीटर जागा ठेवली तर भवती न भवती होते.

तीन दिवस सलग जमणार नाही- यांना अमान्य

मी पहिल्या दिवशी येऊन प्रेझेंटेशन करुन जातो- यांना अमान्य

तीन दिवस दूरचा जागी राहणं ही विचारवंत किंवा अविचारवंत पण रुटीनमधे बिझी असलेल्याला शक्य असेलच असं नाही. त्यात विक्रेतावृत्ती किंवा उदासीनताच असेल असं नव्हे, तरीही ते तसं असू शकेल असं मान्य करु. तरीही या धाग्यात मला लेखकाची ही तक्रार आहे असं मुळीच वाटत नाही. मुख्य रोख विचारवंत म्हणवणारे जे आले त्यांची मांडणी फ्लॉप शो होती असं म्हणायचं आहे. ते अगदी सत्य आणि योग्य असेलच, पण तपशिलाशिवाय असं म्हणणं हे नावानिशी उल्लेख केल्यावर योग्य नव्हे.

.........................................

गविंची टीका मला उगाचच टोकदार वाटते आहे.

नावं घेऊन अर्धवट ऋण विधानं केल्याने तसं म्हणावंसं वाटलं.. व्यक्तिगत रोख किंवा लागेल असं बोलण्याचा उद्देश अथवा योग्यता माझ्याकडे नाही.

बाकी मंथनाला आलेल्या लोकांच्या चर्चेचा तपशील मात्र ऐकायला खूप आवडेल.

हेच अल्टिमेट मत आहे. बाकी सर्व अनुषंगिक.

चिंतातुर जंतू Thu, 12/02/2015 - 11:43

In reply to by गवि

>> तीन दिवस सलग जमणार नाही- यांना अमान्य
मी पहिल्या दिवशी येऊन प्रेझेंटेशन करुन जातो- यांना अमान्य
तीन दिवस दूरचा जागी राहणं ही विचारवंत किंवा अविचारवंत पण रुटीनमधे बिझी असलेल्याला शक्य असेलच असं नाही.

माझ्या मते, सघन विचारमंथन होण्यासाठी आपले विचार सांगून इतरांचे ऐकून मग त्यावर मंथन करणं अभिप्रेत असतं. ते पुरेसं आणि दर्जेदार व्हावं असं वाटत असेल, तर त्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि एकमेकांसोबत पुरेसा वेळ घालवावा लागतो. 'रुटिनमध्ये बिझी' - मला वाटतं मुद्दा असा आहे, की एरवी हे लोक अनेक ठिकाणी मिरवत असतात; म्हणजे त्यासाठी वेळ असतो, पण गांभीर्यानं चालवलेल्या गोष्टींसाठी त्यांना वेळ नसतो.

अनु राव Thu, 12/02/2015 - 11:57

In reply to by चिंतातुर जंतू

सघन विचारमंथन होण्यासाठी आपले विचार सांगून इतरांचे ऐकून मग त्यावर मंथन करणं अभिप्रेत असतं. ते पुरेसं आणि दर्जेदार व्हावं असं वाटत असेल, तर त्यासाठी वेळ द्यावा लागतो. 'रुटिनमध्ये बिझी' - मला वाटतं मुद्दा असा आहे, की एरवी हे लोक अनेक ठिकाणी मिरवत असतात; म्हणजे त्यासाठी वेळ असतो, पण गांभीर्यानं चालवलेल्या गोष्टींसाठी त्यांना वेळ नसतो.

ही गोष्ट गांभीर्याने चालवली होती ह्या भुमिकेला काही आधार?

मी भिमसेन, कीशोरीताईंना ( उदा दाखल, भिमसेन हयात नाहीत हे मला माहीती आहे ) माझ्या घरी माझ्या बिनकामाच्या मित्रमंडळीबरोबर संगीतावर विचारमंथन करण्यासाठी बोलवायचे. मग त्यांनी माझा फोन उचलला नाही की ऐसी वर येउन एक लेख टाकला तर

ऋषिकेश Thu, 12/02/2015 - 11:14

In reply to by अनु राव

काही वेगवेगळ्या क्ष्रेत्रातील व्यक्तींनी जमून आपापल्या आस्थेच्या विषयावर माहिती शेअर करणे व त्यायोगे कलाकार बहुश्रुत होणे हे कारण तुम्हाला पुरेसे वाटत नाही काय? यात भंपक ते काय?

कलाकारांनी केवळ विचारमैथुनासाठी (मोबदल्याशिवाय - हे अध्याहृत) जमायला इतकी का-कू करावी हेच बरेच बोलके आहे :(

गवि Thu, 12/02/2015 - 11:25

In reply to by ऋषिकेश

कलाकारांनी केवळ विचारमैथुनासाठी (मोबदल्याशिवाय - हे अध्याहृत) जमायला इतकी का-कू करावी हेच बरेच बोलके आहे

त्या लोकांचं व्यक्तिस्वातंत्र्य सध्या सुटीवर पाठवू.. त्यांच्या नाही म्हणण्याच्या पद्धतीही गंमतीशीर होत्या हेही मान्य करु. इनफॅक्ट अनेकांनी येण्याविषयी कां-कू केली हेही मानू. पण तरीही जे तीनचार आले होते त्यांच्याविषयी काय? त्यांनी काय दर्जाचं बोलावं हे आधीच गृहीत होतं का? राजीव साने सर्वत्र लिहितात, ते अर्थक्रांतीविषयी बोलले ते आणि इतर सर्व एकूण फ्लॉपच? ज्यासाठी या जमवाजमवीचा अट्टाहास केला त्या मुख्य चर्चेचा जरा तपशील आला असता आणि ते फ्लॉप आहे किंवा कसे हे नीट दाखवले असते तर आवडले असते.

कलाकारांनी केवळ विचारमैथुनासाठी (

इथे तर खुद्द तुझ्याच शब्दांतून या स्कीमविषयी ती कॅज्युअल किंवा काहीतरी केवळ विचारमैथुन वगैरे असल्याचं ध्वनित होतंय. जनरली "केवळ विचारमैथुन" हा शब्दप्रयोग वांझोट्या निष्फळ चर्चेसाठी वापरतात ना?

मेघना भुस्कुटे Thu, 12/02/2015 - 11:29

In reply to by गवि

लेखकाला काय सांगायचे आहे ते न ऐकता 'त्याऐवजी यावर लिहिले असते तर बरे झाले असते' हा सूर मला मराठीतल्या वर्तमानपत्री-समीक्षकी परंपरेतला वाटतो आहे. पण असो. या मतभेदांवर उपाय दिसत नाही.

गवि Thu, 12/02/2015 - 11:44

In reply to by मेघना भुस्कुटे

लेखकाला काय सांगायचे आहे ते न ऐकता 'त्याऐवजी यावर लिहिले असते तर बरे झाले असते'

"न ऐकता" ? असो. कन्क्लुजनबद्दल धन्यवाद..

आता असं पाहू:

हा (अधिक) तपशील वाचायला आवडेल हे तूच याच धाग्यावर अन्यत्र लिहिले आहेस.

शिक्षण या अदितीच्या धाग्यावर या संक्षिप्त धाग्यापेक्षा अश्या अनेक फोटोंचे कलेक्शन सीरीज इत्यादि आल्यास जास्त आवडेल अशा अर्थाचं तू लिहिलं आहेस.

इंट्रेष्टिंग फोटो नि विषय आहे. पण एक तक्रार - याचा जीव अगदी लहानसा आहे. अशा प्रकारच्या फोटोंची मालिका करून प्रकाशित केली किंवा अशा एका फोटोच्या धाग्याने सुरू झालेल्या विषयाचा विस्तार केला, तर ते वाचणं अधिक आनंददायी ठरेल.

अधिक विस्ताराने लिहावं हा उल्लेख प्रत्येकाने कधीनाकधी केलेला असतो.

कम्मॉन मेघना.. इज इट सो डिफिकल्ट टू अ‍ॅग्री आफ्टर डिसअ‍ॅग्रीमेंट??

मेघना भुस्कुटे Thu, 12/02/2015 - 11:49

In reply to by गवि

सहमती नाही. पण इथे अवांतर वाढवणार नाही. खरडवहीत लिहिते. खरडवही दिसली नाही, म्हणून व्यनि केला आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 12/02/2015 - 13:11

In reply to by गवि

शिक्षण या अदितीच्या धाग्यावर या संक्षिप्त धाग्यापेक्षा अश्या अनेक फोटोंचे कलेक्शन सीरीज इत्यादि आल्यास जास्त आवडेल अशा अर्थाचं तू लिहिलं आहेस.

मेघना आणि अदिती या दोन व्यक्ती एकत्र काही प्रकल्प राबवतात याचा विचार करता, मेघनाने अदितीला "अजून सांग" म्हणत चावी मारणं मला थोडं वेगळं वाटतं.

---

मूळ लेखात आलेली नावं मला खटकली नाहीत. खरंतर मुद्दा मांडण्यासाठी नावं येणं आवश्यकच वाटलं. त्यातून मुद्दा काय याबद्दल संभ्रम असावा असं काही प्रतिसादांतून वाटलं; दोन ओळींमधलं वाचणं फार कठीण नाही असा माझा समज झाला. शिवाय, विचारवंत का असेना, सगळ्यांचेच पाय मातीचे, अगदी नंदा खरे स्वतःबद्दलही असाच विचार करत असतील असा एक टोन त्यातून जाणवत राहिला.

गवि Thu, 12/02/2015 - 13:18

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

लेखकाला काय सांगायचे आहे ते न ऐकता 'त्याऐवजी यावर लिहिले असते तर बरे झाले असते'

असा उल्लेख मेघनेने केला होता त्याविषयी आहे ते प्रत्युत्तर. जे आहे ते नको अन त्याऐवजी अमुक लिहावे अशी सूचना माझ्या प्रतिसादात अजिबात नव्हती. जे आहे ते वाचले, त्यात अन्य गोष्टींचा पुरेसा तपशील आला, पण उपस्थित झालेल्या चारजणांच्या वक्तव्यांचा मात्र अजिबातच आला नाही तोही (अ‍ॅडिशनल) असता तर अधिक चांगले अशा आशयाचं मी लिहिलं आहे. किंबहुना, क्रमशः राहिलं का? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

तुझ्या लेखावर आलेली तिची "अधिक तपशिलाची" जी मागणी/विनंती होती तशीच अन तश्याच शब्दात मी इथे केली इतकाच मुद्दा मांडण्यासाठी ते उदाहरण दिलं. अशी मागणी योग्य आहेच आणि तिच्यात नेहमी समीक्षकी काही नसतं हाच तर मुद्दा आहे.

चिंतातुर जंतू Thu, 12/02/2015 - 11:36

In reply to by गवि

>>नावं न घेता हे सर्व एक हलकाफुलका प्रसंग चुटकारुपात सांगितला म्हणून योग्य वाटलं असतं पण नावानिशी अन काय बोलले त्या विषयाचा उल्लेख आल्यावर मग एकदम एकाच वाक्यात सर्वांना जज करुन निकाली काढणं आणि तिथेच लेख संपवणं हे अयोग्य वाटलं.

>> पण तरीही जे तीनचार आले होते त्यांच्याविषयी काय? त्यांनी काय दर्जाचं बोलावं हे आधीच गृहीत होतं का? राजीव साने सर्वत्र लिहितात, ते अर्थक्रांतीविषयी बोलले ते आणि इतर सर्व एकूण फ्लॉपच?

इथे अंमळ समजुतीचा घोटाळा झाला आहे असा संशय आहे. लोक चांगलं बोलले, कार्यक्रम चांगला झाला असंच लेखक म्हणतो आहे -

>> चांगला झाला, कारण संदेशचं 'तमाशा, एक रांगडी गंमत' पुस्तक प्रकाशनाच्या जवळ होतं, लोकेश सरकारवरचा राग व्यक्त करायला नेहेमीच तत्पर असतो, यमाजी कौटुंबिक आणि गावांमधली भांडणं किती वेळ वाया घालवतात यावर बोलले, राजीव साने अर्थक्रांतीच्या सुरुवातीचं बोलले, अतुल ग्रामीण समाजाच्या त्रासांबद्दल बोलला

म्हणजे फ्लॉपपणा हा ज्यांचं नाव घेतलं त्यांच्यामुळे नसून ज्यांचं नाव न घेता त्यांच्याविषयी सांगितलं आहे त्यांच्यामुळे आहे; आणि कार्यक्रमाला थोडेच (पण चांगले) लोक आल्यामुळे पुरेसं विचारमंथन न झाल्यामुळे आहे.

गवि Thu, 12/02/2015 - 14:05

In reply to by चिंतातुर जंतू

म्हणजे फ्लॉपपणा हा ज्यांचं नाव घेतलं त्यांच्यामुळे नसून ज्यांचं नाव न घेता त्यांच्याविषयी सांगितलं आहे त्यांच्यामुळे आहे; आणि कार्यक्रमाला थोडेच (पण चांगले) लोक आल्यामुळे पुरेसं विचारमंथन न झाल्यामुळे आहे.

हम्म.. तसं असेल तर मग सर्वच मत मागे घेतो. पण मग लेखात जरा कन्फ्युजनला वाव राहिला आहे आणि इंटरप्रीटेशन चुकीचं होऊ शकतंय हे खरं.

मेघना भुस्कुटे Thu, 12/02/2015 - 14:15

In reply to by गवि

लेखात जरा कन्फ्युजनला वाव राहिला आहे आणि इंटरप्रीटेशन चुकीचं होऊ शकतंय...

हे मान्य.

चिंतातुर जंतू Thu, 12/02/2015 - 17:16

In reply to by गवि

>> लेखात जरा कन्फ्युजनला वाव राहिला आहे आणि इंटरप्रीटेशन चुकीचं होऊ शकतंय हे खरं.

माझ्यासाठी ही एक गंमतीची गोष्ट आहे. लेखकानं गांभीर्यानं लिहिलं असेल असं वाटलं, तर लिखाण नीट लक्ष देऊन वाचावं, थोडं मनन करावं आणि मग प्रतिक्रिया द्यावी असा शिरस्ता पाळायला मला आवडतो. घाई केली तर चुकीचं अर्थनिर्णयन होण्याचा धोका वाढतो. मला वाटतं इथे प्रत्यक्ष शिबिरातूनही लेखकाला जे विचारमंथन अभिप्रेत होतं त्यासाठी वेळ देणं आवश्यक होतं. तो वेळ द्यायला तथाकथित विचारवंत तयार नव्हते. थोडक्यात, कॉल गर्लकडे जाऊन झटपट 'रितं' होणं आणि प्रेमाच्या व्यक्तीच्या सोबतीची लज्जत चाखत चाखत संभोगक्रियेतून परस्परांना आनंदी करणं ह्यांतला फरक इथे लेखकाला अभिप्रेत असावा. त्यामुळे आलेल्या अनेक प्रतिक्रिया वाचून मला असं वाटलं की लेखकाचा मुद्दाच त्यातून सिद्ध होतो आहे.

(ज्यांनी 'अंताजीची बखर' वाचली असेल, त्यांना लेखकाच्या रसिकपणाविषयी शंका नसावी. त्यामुळे 'कॉल गर्ल' हे निव्वळ धाग्याकडे वाचकांना खेचण्यासाठी निवडलेलं शीर्षक असावं, हा अंदाजसुद्धा मला गंमतीशीर वाटला.)

गवि Thu, 12/02/2015 - 17:44

In reply to by चिंतातुर जंतू

गंमतीशीर? बरं. तसं असेल.

कोणत्याही लेखकाचा सध्याचा लेख आणि अभिव्यक्ती वाचताना त्याचं आधीचे काही अथवा सर्व लेखन वाचून त्या सर्व बॅकग्राउंडच्या सध्याच्या उत्स्फूर्त मतामधे अंतर्भाव करायचा हे उत्स्फूर्ततेला मारक आहे. लेखकाच्या रसिकपणाविषयी शंका येण्याचं दूरान्वयानेही कारण नाही.

कॉल गर्ल या धाग्याच्या शीर्षकाविषयीचं मत पुरेसं स्पष्ट मांडलं आहे. लक्षवेधक शीर्षक असणं यालाच तुम्ही एक आरोप मानता आहात, तोच मुळात माझ्या मते चुकीचा आहे. लक्षवेधक शीर्षक असणं अत्यावश्यक आहे अश्या मताचा मी आहे. फक्त ते लेखात जे लिहिलंय त्यापेक्षा विपर्यस्त असू नये इतकंच. यात तिथे आलेल्या अथवा न आलेल्या कोणाचंही "कॉल गर्ल"शी साम्य वाटत नाही.

जे लिहिलंय त्यात कोणत्याही सामान्य माणसाने वाचल्यावर कन्फ्युजन होणे, मूळ उद्देश न पोचणे, प्रथमदर्शनी झालेलं इंटरप्रिटेशन चुकीचं असल्याचं अन्य कोणा व्यक्तीच्या निरुपणाने किंवा दृष्टांन्तांच्या साहाय्याने समजून घ्यावे लागणे याचा अर्थ ते लिखाण अधिक उजवं असं मी मानत नाही.

त्यामुळे कन्फ्युजनला वाव आहे इथपर्यंत सहमती दर्शवण्याचा अर्थ "मुळात मनन न करता नी जर्क प्रतिक्रिया दिली होती" असा होत नाही.

असो.

चिंतातुर जंतू Thu, 12/02/2015 - 17:51

In reply to by गवि

>> कोणत्याही लेखकाचा सध्याचा लेख आणि अभिव्यक्ती वाचताना त्याचं आधीचे काही अथवा सर्व लेखन वाचून त्या सर्व बॅकग्राउंडच्या सध्याच्या उत्स्फूर्त मतामधे अंतर्भाव करायचा हे उत्स्फूर्ततेला मारक आहे

शक्य आहे. माझे मुद्दे असे आहेत -

  1. प्रस्तुत लिखाण वाचून ते पुरेसं गुंतागुंतीचं आहे का नाही, आणि त्यामुळे मननीय आहे की नाही ह्याचा निर्णय घेता यावा. त्यासाठी लेखकाचं आधीचं लिखाण परिचित असायला हवं असं नाही;
  2. उत्स्फूर्तता ही गुंतागुंतीच्या लिखाणाच्या चुकीच्या अर्थनिर्णयनाला कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे प्रत्येक वेळी ती चांगलीच असते असं मला वाटत नाही.

>> तिथे आलेल्या अथवा न आलेल्या कोणाचंही "कॉल गर्ल"शी साम्य वाटत नाही.

आणि साम्य काय आहे हे माझ्या दृष्टीनं पुरेसं स्पष्ट आहे. म्हणूनच थोडं शांतपणे वाचावं असं म्हणतो आहे.

गवि Thu, 12/02/2015 - 17:55

In reply to by चिंतातुर जंतू

आता 'कॉल गर्ल्स' का, तर आर्थर क्यस्लरची एक कादंबरी आहे, 'द कॉल गर्ल्स' नावाची. अनेक 'आंतरराष्ट्रीय ख्याती'चे तज्ज्ञ कसे कॉलची वाट पाहत सेमिनारहून वर्कशॉपला, आणि तिथून सभांना जात, एकच भाषण सगळीकडे देतात, यावर. तर इथे तसं नाही झालं, पण एकूण मराठी 'विचारवंत' या वर्गावरचा विश्वास उडावा, असं मात्र खूप काही झालं!

खुद्द लेखकाने हे उपरोक्त वाक्य लिहिलं नसतं तर तुम्ही केलंत तसं किंवा अन्य चार प्रकारे इंटरप्रिटेशन करुन कॉल गर्ल हे शीर्षक योग्य असल्याचं पटवून घेण्याचे मार्ग उपलब्ध राहिले असते.

पण तुम्ही शांतपणे हे समजावलेत त्याबद्दल आभारी आहे.

चिंतातुर जंतू Thu, 12/02/2015 - 18:02

In reply to by गवि

>> खुद्द लेखकाने हे उपरोक्त वाक्य लिहिलं नसतं तर तुम्ही केलंत तसं किंवा अन्य चार प्रकारे इंटरप्रिटेशन करुन कॉल गर्ल हे शीर्षक योग्य असल्याचं पटवून घेण्याचे मार्ग उपलब्ध राहिले असते.

तिथेच तर त्या लिखाणातली गुंतागुंत आणि गंमतही आहे. जे आले ते कॉल गर्लसारखे वागले असं लेखक म्हणत नाही. त्यामुळे तिथे तसं झालं नाहीच. त्याउलट, ते आयोजित करताना आलेले अनाम इतरांचे अनुभव पाहा -

"तीन दिवस फार होतात, एका दिवसात आटपा."
"ठीक आहे, मी पहिल्या दिवशी येऊन माझं प्रेझेंटेशन करून जाईन."
आठवणीचा फोन केला तर म्हणाल्या, "हा एक्स-वाय-झेडचा कार्यक्रम ना?" मी "नाही." म्हटल्यावर म्हणाल्या, "पण मी नाही म्हटलं होतं!".
"हो, मिळालं पत्र. काय करताय हे? लोकांची मागणी आहे का, असं काही करा, अशी?"

ह्या 'कॉल गर्ल्स' आहेत.

ऋषिकेश Thu, 12/02/2015 - 11:41

In reply to by गवि

मला जे आकलन झालं त्यानुसार १० जण जमायची होती त्यातली चारच आली आणि कार्यक्रमही ३ दिवसांऐवजी दिडच दिवसांत आटोपला. कमी लोकांमुळे चर्चाही व मुक्तचर्चेच्या फेर्‍याही कमी झाल्या व एकुणात मिळणारं नवनीत कमी झाल्याने त्याला ते फ्लॉप शो संबोधत आहेत - जे बोलले त्यांच्या क्वालिटीवरून नव्हे. अर्थात हे माझं आकलन!

अनुप ढेरे Thu, 12/02/2015 - 11:27

In reply to by ऋषिकेश

कलाकारांनी केवळ विचारमैथुनासाठी (मोबदल्याशिवाय - हे अध्याहृत) जमायला इतकी का-कू करावी हेच बरेच बोलके आहे

हे बोलकं कसं आहे हे सांगाल का? नक्की काय समजतं यातून?

अनु राव Thu, 12/02/2015 - 18:36

In reply to by ऋषिकेश

ऋषिकेश - मी भंपक का म्हणले त्याचे उत्तर तूच दिले आहेस लगेच. मी वैचारीक मैथुन वगैरे असे मोठे शब्द वापरू शकत नाही, मला "भंपक" शब्द जास्त अ‍ॅप्ट वाटला.

अनु राव Thu, 12/02/2015 - 11:31

In reply to by ऋषिकेश

ऋषिकेश - मी ही खुप पूर्वी संगीता साठी असे कोणा आमच्या पेक्षा जास्त कळणार्‍या माणसाला छॉट्या ग्रुप मधे बोलावून त्याच्या कडुन माहीती घेण्याचे प्रकार केले आहेत. पण हा प्रकार वेगळाच आहे.

ऋषिकेश Fri, 13/02/2015 - 12:57

In reply to by अजो१२३

अहो अजो! वाक्याच्या सुरूवातीला ऋषिकेश लिहिलंय ना? मग अशा प्रमाणलेखनाच्या चुका होणारच हो! नावाचा महिमा आहे तो :P ;)

अनु राव Thu, 12/02/2015 - 17:19

In reply to by वृन्दा

ह्.कॅ. - तुम्ही उसगावात आहात असे वाटते. तुम्ही जर परतीची तिकीटे पाठवलीत तर झाडुन सर्व समाजवादी विचारवंत तुमच्याकडे विचारमंथनाला येतील.

अगाऊ सल्ला - चुकुन पण तिकीटे पाठवू वगैरे नका, जर तुमच्या कडे आलेच तर तुम्हाला बँक्र्प्ट होयची वेळ येइल. वर भारतात येउन हे विचारवंत शो फ्लॉप झाला असे ऐसी वर लिहीतील ते वेगळेच.

काळा मठ्ठ बैल … Thu, 12/02/2015 - 17:55

In reply to by अनु राव

ह्.कॅ. - तुम्ही उसगावात आहात असे वाटते. तुम्ही जर परतीची तिकीटे पाठवलीत तर झाडुन सर्व समाजवादी विचारवंत तुमच्याकडे विचारमंथनाला येतील.

अगाऊ सल्ला - चुकुन पण तिकीटे पाठवू वगैरे नका, जर तुमच्या कडे आलेच तर तुम्हाला बँक्र्प्ट होयची वेळ येइल. वर भारतात येउन हे विचारवंत शो फ्लॉप झाला असे ऐसी वर लिहीतील ते वेगळेच.

जजमेंटल पार्ट जरा खटकतो.

हेच तर भंपक म्हणण्याचे कारण आहे.

भंपक अश्यासाठी की, ह्यात सर्व प्रकारात मला जाणवला आहे तो दर्प आणि दंभ.

- अनुतैंच्या लेखणीतून सहर्श सादर.

राजन बापट Thu, 12/02/2015 - 20:09

लिखाण गंभीर नि गंमतीदार दोन्ही आहे.

अशा प्रकारच्या अनुभवांमधून कटुता येऊ न देता हसतखेळत लिहिलेलं आहे. असे काही प्रयोग फसतात काही चालतात. लिखाण/वर्तमानपत्रे/नियतकालिके/शिक्षणसंस्था/संशोधन/कलाजगत् इत्यादि जगतांमधली मंडळी वेळोवेळी एकत्र जमतात हे (ऐकून) माहिती आहे. अशा भेटीगाठींतूनच छोटेमोठे प्रकल्प घडत असावेत, विचारांना दिशा मिळत असावी असा अंदाज आहे.

अवांतर : "कॉल गर्ल्स"चा संदर्भ मला माहिती नव्हता. त्या संदर्भाचा अर्थ आणि प्रस्तुत किश्शामधला वापर मजेशीर होता.

Nile Thu, 12/02/2015 - 20:57

In reply to by राजन बापट

लिखाण गंभीर नि गंमतीदार दोन्ही आहे.

असेच म्हणतो. मराठी वर्तमानपत्रं वाचली की सतत चालणार्‍या परिसंवादांचीबद्दलच्या बातम्या पाहून गंमत वाटते. रोज कोणीतरी वक्ता काहीतरी बडबडतोय अशी बातमी असते. म्हणून मी काळजीपूर्वक त्यांचे वक्तव्य वाचणे सुरू केले तर कित्येकांना वक्ता म्हणून का बोलावले असावे असा प्रामाणीक प्रश्न पडला. त्याचे बहुतेक उत्तर व्यावसायिकपणा हेच असावे. आजकाल फेसबुकावर फॅन फॉलोइंग असलेले मराठी लोक पाहिले की त्यातले निम्म्यापेक्षा अधिक वक्तेच दिसतात. थोडक्यात, ह्या धंद्याला तेजी असावी.

मी Fri, 13/02/2015 - 13:48

पण एकूण मराठी 'विचारवंत' या वर्गावरचा विश्वास उडावा, असं मात्र खूप काही झालं!

विचारवंत ह्या बिरुदामधे एका जबाबदारीची अपेक्षा नकळत लादली जात असावी काय? सर्वसाधारणपणे समाजात असे विचारवंत म्हणून मान्यताप्राप्त लोक खाजगीत (अपेक्षे)वेगळे वागतात असा अनुभव बातमीदार किंवा पत्रकारांना बर्‍याचदा येतो असे कळते, पण एखाद्या अनुभवावर विचारवंत हे बिरुद पुर्णपणे लावावे किंवा पुर्णपणे गळून पडावे असे मला वैयक्तिकरित्या वाटत नाही.

तिरशिंगराव Fri, 13/02/2015 - 17:12

नमनाला घडाभर तेल वापरुन प्रत्यक्ष चर्चा काय झाली ते तीन चार वाक्यांत आटोपणे व एकंदरीत प्लॉप शो अशी संभावना करणे हे एकांगी झाले. चर्चा दीड दिवस झाली की एक आठवडा, यापेक्षा त्याच्या दर्जाला महत्व आहे. वाचकांना पण ठरवू द्या ना, तो फ्लॉप शो होता की नाही ते!

शीर्षक वाचून तर आम्ही आशेने धागा उघडला होता मराठी कॉलगर्ल्सचे नंबर मिळवण्यासाठी.