How to make Weighted Blanket - जड पांघरूण बनवा
मी कायम लिहिते त्याप्रमाणे माझा मुलगा नुसता पळत असतो. सतत. खरं सांगायचे तर मला काही त्यामागचे सायन्स समजू शकत नाही. (कारण माझे सेन्सरी प्रोएसिंग मुलापेक्षा वेगळे आहे) पण त्याला सतत पळायचे असते हे मात्र खरे. मी तर गमतीत म्हणते, माझा मुलगा चालायला कधी शिकलाच नाही, तो रांगता-रांगता पळायलाच शिकला एकदम. :)
हळूहळू ऑटीझमबद्दल वाचताना, सेन्सरी disorder कळली. व हाय एनर्जी सेन्सरी मुलांना शांत करण्यासाठी जराशी जड पांघरूण किंवा जड जाकेट इत्यादींचा वापर होतो हे हि वाचनात आले. proprioceptive तसेच tactile सेन्सेस ना उपयुक्त इनपुट देण्यासाठी तसेच डीप प्रेशरसाठी याचा चांगला फायदा होतो. अधिक माहिती या लिंकवर मिळेल : http://www.sensory-processing-disorder.com/weighted-blankets.html
परंतु हे सगळं स्पेशल असल्यामुळे महागही. चांगली वर्षभर डोळा ठेऊन होते मी, पण काहीच मनासारखे व खिशाला परवडेल असं पसंत पडेना. खरं सांगायचे तर मुलाची गोष्ट येते तेव्हा मी अमाप खर्च करते. पण छोट्याश्या जड पांघरूणासाठी ८०-100$ घालवणे काही बरोबर वाटत नव्हते. कारण मुलगा अगदी खात्रीने ते वापरेल याची शक्यता कमीच वाटत होती.
शेवटी गेल्या आठवड्यात http://www.pinterest.com/ वर एक पिन निदर्शनास आली. व अगदी युरेका मोमेंट वाटली मला ती. घराच्या घरी स्वस्तात जड पांघरूण बनवायचे! (हि pinterest साईट फारच उपयुक्त आहे. ऑटीझमबद्दल पुस्तकातून मिळणार नाही इतकी माहिती मला पिंटरेस्टवर मिळाली.)
साध्या Duct tape, तांदूळ व ९ sandwich size zip lock bags वापरून बनवले आहे. साधारण वजन असेल ५-६ पाउंड. आणि आकार आहे साधारण २ फुट x १.५ फुट. तुम्हाला आवड असेल व जमत असेल तर तुम्ही या ब्लांकेटला छान कापडी कव्हरही शिवू शकता. मला शिवणकाम येत नसल्याने मी केले नाही.
हि ती पिन: http://www.pinterest.com/pin/293508100690440961/
आणि हे मी बनवलेल्या वेटेड ब्लांकेटचे फोटो. आधल्या मधल्या स्टेपचे फोटो घ्यायला विसरले. परत बनवले तर अपडेट करीन. क्रमवार कृती तुम्हाला वरील ओरिजिनल पिनमध्ये मिळेल.
माझा मुलगा काल चक्क ५ मिनिटाच्या आत झोपला हे सांगायचे राहिले. :) मला अजिबात खात्री नव्हती, परंतु मुलाला खूप आवडले! :)
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
तसेही असू शकेल. वरून
तसेही असू शकेल. वरून घातलेलेही कधी कधी कडा येतात तिथे लागून बोचू शकते.
स्व.ए., सोप्या सुती पांघरुंणाची एक कल्पना सुचली आहे. उपयोगी वाटते का बघा:
भरपूर मोठ्या उशीच्या अभ्र्यापासूनही असे पांघरूण बनवता येईल. उभ्या -आडव्या टीपा मारून लहान कप्पे तयार करायचे. त्यासाठी आधी लांबीत टीपा मारून घ्यायच्या. ( उघडे तोंड ते समोरची बंद बाजू). लांबट कप्पे तयार होतील. उघड्या बाजूने प्रत्येक कप्प्यात तांदूळ भरायचे. घट्ट ठासून भरायचे नाही कारण आडव्या टीपाही मारायच्या आहेत. खोळीची उघडी बाजू शिवून बंद करायची. नंतर हे पांघरुण टेबलावर सपाट पसरून आतले तांदूळ सगळीकडे सारखे पसरून घ्यायचे. आडव्या टीपांसाठी रेघा आखायच्या. (अरुंद बाजू ते अरुंद बाजू). अभ्रा शक्य तितका टेबलावरून न उचलता एकेक आडवी टीप घालावी. पांघरुण तयार. आणखी मोठासा दुसरा अभ्रा वरून घातला की मळणारही नाही.
मध्यम आकाराची गादीच पांघरुण
मध्यम आकाराची गादीच पांघरुण म्हणून घेऊनही तसा इफेक्ट येतो. मला ताप चढला की कधीकधी थंडीचा आणि शिव्हरिंगचा अॅटॅक येतो. चुळबूळ अजिबात थांबवता येत नाही. तेव्हा अशी गादी अंगावर घालून त्यावर आणखी जड वस्तू (दोनतीन गाद्यांच्या गुंडाळ्या अथवा फोल्डेड खुर्च्या अथवा उलटे रायटिंग टेबल इ.) ठेवायला लावल्यास थंडी कमी होते, शांत वाटतं आणि चुळबूळ थांबते, शिवाय अंगाची कचकच कमी होते असा अनुभव आहे.
नाव जरी ब्लँकेट/ पांघरूण असले
नाव जरी ब्लँकेट/ पांघरूण असले तरी रूढार्थाने पांघरूण नाही. हे झोपण्यासाठीच मर्यादीत नाही. तसे च पूर्णवेळ झोपेत हे वापरणे अपेक्षित नाही.. टेबल खुर्चीवर बसून काही अभ्यास काम करायचे असल्यास असे ब्लँकेट मांडीवर ठेवल्यास जीवाला स्वस्थता ( थोडीतरी)लाभू शकते व त्याचे कॉन्सन्ट्रेशन सुधारण्यात मदत होते. खांद्यावरून देखील टाकता येईल. इकडे अशा जड शॉर्ट्स/ व्हेस्ट्स देखील मिळतात.
युक्ती छान आहे. पोराला एक
युक्ती छान आहे. पोराला एक घट्ट वजनदार जादू की झप्पी देण्याची इच्छा होते आहे.