मनातील छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ३०
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
आधीचे सर्व धागे इथे वाचता येतील - मनातले छोटेमोठे प्रश्न/विचार.
----------------------------------------------------------------------------------------------------------------
जन पळभर म्हणतील हाय हाय हे गाणे ऐकताना आज जरा तल्लीन झालेलो. आकाराने महाकाय, वयाने प्रविवृद्ध अशा ब्रह्मांडात आपण किती क्षुद्र आहोत, क्षणभंगुर आहोत, नगण्य आहोत, इ इ विचार करू लागले. पण एक तसल्ली वाटत होती कि आपण असतो तेव्हा नि अगदी आपल्या मृत्यूनंअतर अल्पकाळ का होईना जग आपल्याला लक्षात ठेवते. पण आज अचानक मनात विचार आला कि अलिकडे लोक पळभर तर हाय हाय करतात का? मी तर असे पाहत आहे कि माती करून आले कि लगेच रुटिइन चालू होते.
यावरून आठवले... (अशीच आणखी एक शंका)
'हरवले ते गवसले का' या (भा.रा. तांब्यांच्या अशी माझी प्रामाणिक समजूत होती, पण खात्री करण्यासाठी गूगलशोध घेतला असता एकदोन सायटींवर पी. सावळारामपंतांचे असल्याची नोंद आढळली, तर एके ठिकाणी "तांबे यांनी आपल्या एका गीतामध्ये आर्त प्रश्न विचारला आहे : 'हरवले ते गवसले का?'" असेही ठेवून दिलेले सापडले, त्यामुळे नक्की कळत नाही; पण तो आपला आजचा मुख्य प्रश्न नाही, त्यामुळे दिवंगत श्री. तांबे आणि दिवंगत श्री. सावळाराम यांस तो गोंधळ निस्तरण्यास सोडून देऊ. तर असो.) लताबाईंनी गाऊन अजरामर केलेल्या गीतातील एका पंक्तीतील शब्द असे आहेत: 'मीलनाचा परिमळ तोचि'. ('परिमल' की 'परिमळ' हा 'कुलकर्णी'-की-'कुळकर्णी'-छाप प्रश्न येथे गौण आहे. त्यावरून कुलकर्ण्यांना नि कुळकर्ण्यांनाच भांडू देत. तर तेही एक असो.)
तर आजचा आपला प्रश्न असा आहे: 'मीलनाचा परिमळ' म्हणजे नक्की काय? (नाही म्हणजे, ही कविमंडळी वाट्टेल तिथे, जिथे सूर्यसुद्धा प्रकाशत नाही असल्या ठिकाणी नित्य फेरफटका मारून असतात, याची ऐकून कल्पना आहे, पण म्हणून काहीही?)
(हा असलाच काहीसा प्रश्न मला त्या 'गुंतता हृदय हे' या नाट्यपदातील 'हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी' या पंक्तीबद्दल पडतो. जाऊद्या, या कविमंडळींना 'परिमळा'चीच आस फार!)
नाटक
पराशर सत्यवतीला आशीर्वाद देऊन योजनगंधा बनवतो. अविश्वासाने हा नविन कस्तुरीचा वास कोठून येतो आहे असे तिने विचारल्यानंतरचे हे पराशरांच्या तोंडी "गुंतता हृदय हे" हे गाणे आहे. या ओळीत बहुदा परिमळे हे संबोधन त्यांनी तिला उद्देशुन वापरले आहे.
"गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाशी
हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी"
कमळाचे आपल्याच देठावर प्रेम बसावे (तसेच) तुझ्याच गंधाने तू प्रणयातूर झाली आहेस, असा अर्थ असावा असे मला वाटते.
तिसरी संध्या?
दिवसात तीन संध्या (जोडणीचे काळ) असतात : (१) सूर्योदय (२) मध्यान्ह (३) सूर्यास्त
तिसरी संध्या म्हणजे तिन्हीसांज असावी, असा माझा कयास. (दिवसात तीन संध्या असतात, हे मोनिएर-विल्यम्स कोशातून. मग आंतरजाल शोधयंत्र + कयास)
दोन प्रहर = मध्यान्हीच्या बारा वाजता दिवसाचा दुसरा प्रहर संपतो. त्यानंतरची वेळ - दोपहर, दुपार वगैरे. मात्र तिसरा प्रहर दुपारी ३ वाजता संपतो, दुपारचे तीन-ते-सहा म्हणजे चौथा प्रहर. त्यामुळे "तिन्हीसांज" मधील "३" संख्येचा "दुपार"मधील "२" संख्येशी काही संबंध नसावा, असे वाटते.
नसावा.
<विनोद>'तिनी' हे बंगालीतील तृतीयपुरुषी इतरत्रस्थ आदरार्थी परंतु एकवचनीच उभयलिंगी सर्वनाम, आणि 'सायन' हे मुंबईचे एक उपनगर आहे. (मराठीत या उपनगरास 'शीव' असे संबोधण्याची प्रथा आहे, त्यावरून चिं.वि. जोश्यांचा एक पुरातन विनोद आठवला, परंतु तो पुन्हा कधीतरी.)
थोडक्यात, सायनमधील बंगाली मुलीचे नाव 'सायंतिनी', 'सायनची ती' (किंवा, पर्यायाने, अहोजाहोच्या भाषेत 'सायनच्या त्या') अशा अर्थाने, असा कयास आहे.</विनोद>
सायन आया, सायन आया.. दादर
सायन आया, सायन आया.. दादर माटुंगा सायन आया..
दिवा मुंब्रा कळवा ठाना भांडूप के बाद घाटकोपर विद्याविहार सायन आया!
सायन आऽऽयाऽऽऽ!!!!!!
बहुधा एकाच दिशेने प्रवास असावा असे धूसर आठवणीवरुन वाटते.
उदा.
सायन आया, सायन आया.. दादर माटुंगा सायन आया..
xxxx भांडुप मुलुंड ठाणे के बाद कळवा मुंब्रा दिवा कल्याण आया..
असे काहीतरी.. (नावे उदाहरणापुरतीच फक्त.) मलाही स्पष्ट आठवत नाही.
नाहुर आणि कोपर ही स्टेशने त्यानंतर इन्क्लूड झाल्याने ती यात नसणार.
दुरुस्ती
अधिक विचार करता जास्त योग्य अर्थ लागला असे वाटते.
'गुंतता हृदय हे' पासून गाण्याची सुरवात आहे. त्या आधीचा प्रसंग म्हणजे पराशर सत्यवतीवर खूश होऊन तीला योजनगंधा बनवतो हे वर सांगितलेच. त्यानंतरचा प्रसंग पराशर आणि सत्यवती उघड्यावर (लोकांदेखत) समागम करतात असा आहे. (भीष्म अन त्याचा सहकारी त्यांना पाहतात असा नाटकात प्रसंग आहे.) नाट्यगीतांमध्ये संवाद असतो याचा विचार केल्यास;
"गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाशी
हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी"
जसे भुंग्याचे कमळाच्या सुंगधामुळे त्याच्यात हृदय गुंतते, त्याचप्रमाणे तुझ्या गंधाने मी प्रणयातूर झालो आहे.
संपूर्ण गाणे, सौजन्य आठवणीतली गाणी.
गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाशी
हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी
या इथे जाहला संगम दो सरितांचा
प्राक्तनी आपुल्या योग तिथे प्रीतीचा
अद्वैत आपुले घडता या तीर्थाशी
दुर्दैवे आपण दुरावलो या देही
सहवास संपता, डागळले ऋण तेही
स्मर एकच तेव्हा सखये निज हृदयाशी
पाशी?
पाशी म्हणजे अर्थात पाशामध्ये असेच असणार. पण पाश हा कमलदलाचा नसतो तर नलिनीचा, कमलाच्या देठाचा असतो. कमळाचा देठ म्हणजे एक लांबलचक आणि कोमल अशी नलिका असते. ती चिखलपाण्यामध्ये खूप दूरवर पसरलेली असते. हे देठ एकमेकांत गुंतलेले असतात. या गुंतागुंतीत कोणी अडकला तर सुटणे कठिण.
पाशी म्हणजे जवळ, ठिकाणी असा अर्थ बहुधा इथे नसावा कारण मग ही शब्दयोजना बटबटीत ठरेल.
'परिमळे'हे मत्स्यगंधेचे विशेषण नसावे. परिमळे म्हणजे दरवळेच असावे.
प्रणयातुर कामिनीचा एक विशिष्ट शरीरगंध असतो आणि तो गंध म्हणजे पुरुषाला आवाहन असते अशी कल्पना आहे. मानवेतर प्राणिमात्रांच्या बाबतीत हे खरे असावे.
बरोबर
राही यांचे म्हणणे बरोबर असावे. नुकताच व्हिडिओ पाहिला. त्यात स्वतः सत्यवती आपल्या "प्रेमाचा पाश" असा वाक्प्रचार वापरत्ये.
म्हणजे, अर्थ अगदीच सरळ आहे. 'कमलदलाप्रमाणे नाजूक असलेल्या प्रेमाच्या पाशात माझे हृदय गुंतले आहे आणि प्रणयगंध तुझ्या अंगाशी दरवळतो आहे.' अशा दोन्ही ओळी वर्णनात्मक दिसतात. धन्यवाद, राही.
मिशेल ओबामा
मीदेखिल उत्तराच्या प्रतीक्षेत!
ओबामांच्या गेल्या भारत भेटीत, त्यांनी मुंबईच्या एका शाळेच्या कार्यक्रमाला मिशेलसह भेट दिली होती. त्यावेळी शाळेतील मुलांनी ह्या गाण्यावर नाच तर केला होताच शिवाय मिशेलनाही नाचायचा आग्रह केला होता आणि त्यांनीही थोडे नाचून त्यांना साथ दिली होती!
जालावर हे गाणे मिळाले -
मी हाय कोली सोरिल्या डोली न मुंबईच्या किनारी
अगं मारतीन कोली, हानल्यान गोली ग चल जाऊ बाजारी
वेसवचे बाजारी लोकांच्या नजरा परतीन गो तुझ्यावरी
कला ग पारू करतेस ह्यो नखरा, चल जाऊ बाजारी
चल ग पारू आयलीय ही हिरू कर बाजाराची तैयारी
सरग्याची टोपली माथ्यावर घेऊन विकू जा बाजारी
सर्गा नि हलवा ताजं हय् म्हावरं पारुचे पल्ल्यावरी
झिंगा नि पाला काटेरी म्हावरं दिसतंय् सोनेरी
घेरे काका ताजं हाय म्हावरं पारुचे पल्ल्यावरी
अरे कोली यो नाखवा दर्यानशी हाणतंय म्हावरं सोनेरी
मी हाय कोली सोरिल्या डोली न मुंबईच्या किनारी
अगं मारतीन कोली, हानल्यान गोली ग चल जाऊ बाजारी
स्त्रीवादी हिशेब
स्त्रीवादी स्त्रीच्या असल्या सगळ्या झमेल्याशी फार काही देणे घेणे नसलेल्या सामान्य पुरुषाकडून बॉयफ्रेंड आणि नंतर नवरा म्हणून काय काय अपेक्षा याची लिस्ट करता येईल का?
म्हणजे उदाहरणे देतोय,
१. मी नोकरी करणार कि नाही यात तुझा व्हेटो नसेल.
२. तुझी ट्रान्सफर झाली तर मी नोकरी सोडून आपण सगळे सोबत राहू कि वेगळे यात तुझा व्हेटो नसेल.
३. पोरे होणार का नाही, किती पोरे होणार आणि केव्हा हे सगळं ठरवण्यात तुझा व्हेटो नसेल.
४. संपत्ती कोणी कमावली, किती कमावली, कोणाची किती घरात खर्च झाली, किती बँकेत बचत आहे हे कोणत्या पद्धतीने निगोशिएट करणार. तू घर चालवणार, माझे सगळे पैसे माझ्या एकटीच्या नावाने बचत असणार ते याच्या उलटे इ इ
५. माहेरची आणि सासरची संपत्ती कोणाच्या नावावर असावी.
६. घटस्फोट झाला तर मुले कोणाकडे असावीत.
७. चहा मी केला तर तू कप धुणार.
८. बेला वाजली कि अर्धा वेळ मी दरवाजा उघडणार. अर्धा वेळ तू.
९. एकमत होतच नसलं तर एकवेळ मला व्हेटो एकवेळ तुला.
Inflection and Agglutination
http://en.wikipedia.org/wiki/Inflection
http://en.wikipedia.org/wiki/Agglutination
वरती दिलेल्या २ लिंकनुसार मराठी ही inflectional आहे आणि बंगाली, गुजराती आणि द्राविडी भाषा agglutination दाखवतात.
पण ते का आहे हे काही विशेष कळले नाही.कधी कधी inflection आणि agglutination दोन्ही सारखेच वाटत आहेत.
हा फरक कुणी सोदाहरण स्पष्ट करू शकेल का?
मी हाय कोली
सोरिल्या डोली म्हणजे १)छोट्या होड्या समुद्रात सोडल्या २) पागेर फेकले. पागेर म्हणजे मासे पागण्याचें छोटें जाळें. मोठ्ठ्या पागेरालासुद्धा डोलच म्हणतात. ही जाळी गुंडाळून बोचकी बांधलेली असतात.ती सोडून पाण्यात पसरली.
हानल्यान गोली म्हणजे घोळी-खूपसे घोळमासे आणलेन्. आता मारतीन म्हणजे बहुधा मार्टिन असावे. मार्टीन कोळ्याने खूपसे घोळमासे पागून आणलेत तर लवकर लवकर जाऊन (आपण सगळ्यांनी) ते विकूया. कोळ्यांचे काम हे खूपसे सहकाराने चालते. जोखमीचे काम असते त्यामुळे इतरांची मदत आणि सद्भाव लागतोच. एका डोलीमध्ये बरीच भागीदारी असते. डोलीत मिळालेली मासळी त्या सगळ्या भागीदारांच्या मालकीची असते. ती सगळ्यांनी मिळून विकायची. मग हिशोब-ठिशोब देणीघेणी गावच्या फेस्तात फेडायचे. प्रत्येक गावाचे वेगवेगळ्या दिवशी 'फेस्त' असते. त्या दिवशी जत्रा असते. नवीन भागीदारी, करारमदार, नवीन होडीखरेदी सगळ्यासाठी 'फेस्त' हा मुहूर्त असतो.
पल्ल्यावरी म्हणजे फळ्यावर. मासे विकण्याचा फळा असतो, त्यावर.
अगं मारतीन कोली या ऐवजी अगं
अगं मारतीन कोली
या ऐवजी
अगं मारतीन कोलीन् हानल्यान गोली
किंवा
अगं मारतीन कोलीनं हानल्यान गोली
किंवा
अगं मारतीन कोलीनी हानल्यान गोली
असं असतं तर हा मार्टिन कोळ्याचा कयास आणखीन पक्का झाला असता. तिथे कोली नंतर "नं" आहे का? गाणं ऐकताना कधीकधी तसं वाटल्याचं आठवतं.
इंडिया द्याट इज भारत
असाच प्रश्न एका ब्रिटिश सहकार्याला विचारला* असता त्याने त्याच्या पासपोर्टाचा हवाला देत सांगितले - युनायटेड किंग्डम ऑफ ग्रेट ब्रिटन अॅन्ड नॉर्थन आयर्लंड.
माझ्या पासपोर्टावर रिपब्लिक ऑफ इंडिया असे लिहिलेले आहे, तेव्हा तेच 'अधिकृत' नाव असावे.
* यूके, इंग्लंड, ब्रिटन, ग्रेट ब्रिटन इत्यादींपैकी
पारपत्रावर "भारत गणराज्य"
पारपत्रावर "भारत गणराज्य" असेही लिहिलेले असते.
मला वाटते, भारत/इंडिया ही सुद्धा अधिकृत नावे आहेत (गणराज्य/रिपब्लिक असे न म्हणतासुद्धा).
उदाहरणार्थ
भारताच्या गॅझेटचा मथळा म्हणून "भारत का राजपत्र The Gazette of India" असे लिहिलेले असते. आणि गॅझेट ही तर अधिकृत दस्तऐवजांचा शिरोमणी आहे.
शास्त्रात रूढिः बलीयसी
यामागे काय कारण आहे?
स्थानिक विद्यापीठात अरेबिक शिकवणार्या प्राध्यापकांना मागे याबद्दल विचारलं होतं. त्यांच्या मते, यामागची कारणं स्वयंस्पष्ट नाहीत - पण बराचसा 'शास्त्रात रूढिः बलीयसी'सारखा प्रकार आहे.
विविध कारणांमुळे (स्थैर्याचा अभाव, लेखनाची साधनं सोपी नसणे) मध्यपूर्वेच्या या भागातील लेखनपद्धतीत बदल होत गेले. सुमेरियन क्युनिफॉर्म लेखनपद्धत प्रथम वरून खाली आणि नंतर डावीकडून उजवीकडे अशी लिहिली जात असे, (चिनी लिपीचाही साधारण असाच प्रवास आहे) तर अरेबिकच्या प्रभावाखाली येण्यापूर्वी जुनी फारसीही तशीच (डावीकडून उजवीकडे) लिहिली जात असे.
उजवीकडून डावीकडे लिहिण्याची पहिली प्रमुख पद्धत 'फिनिशियन अल्फाबेट्स' मध्ये आढळून येते. ख्रिस्तपूर्व १०००च्या आसपास प्रचलित असणारी ही लेखनपद्धत ही आजच्या उजवीकडून डावीकडे लिहिल्या जाणार्या सेमिटिक लिपींची (गंमत म्हणजे त्याच भाषासमूहातील इथिओपियन अॅम्हारिक डावीकडून उजवीकडे लिहिली जाते) आजी म्हणता येईल. तिचा उगम जरी डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाणार्या इजिप्शियन चित्रलिपीत असला, तरी तिच्यात हा 'अबाऊट टर्न' कसा झाला यामागची कारणं पुरेशी स्पष्ट नाहीत.
मशारनिल्हे प्राध्यापकांच्या मते, लिहिणार्या व्यक्तीची सोय ही वाचकापेक्षा अधिक महत्त्वाची मानली जाई. अरेबिकच्या काही पुरातन बोली तर पहिली ओळ उजवीकडून डावीकडे आणि त्यापुढची ओळ डावीकडून उजवीकडे (किंवा त्याउलट) अशा Boustrophedon (एखादं आयताकृती शेत बैलाकडून नांगरून घ्यावं तशा) पद्धतीने लिहिल्या जात; हा त्याचा एक पुरावा. त्यातलीच एक पद्धत त्या काळात, त्या भागात रूढ झाली इतकंच.
किंचित अवांतर - भारतीय अंकलेखनाची पद्धत स्वीकारल्यामुळे अरेबिकमध्ये आकडे मात्र लिहिताना डावीकडून उजवीकडे लिहिले जातात, पण ते वाचताना मात्र बव्हंशी उजवीकडून डावीकडे वाचले जातात. उदा. ३५ = पाच अधिक तीस (खम्सा वे थलाथीन), मात्र १३५ = शंभर + (पाच अधिक तीस).
>>वाचताना मात्र बव्हंशी
>>वाचताना मात्र बव्हंशी उजवीकडून डावीकडे वाचले जातात. उदा. ३५ = पाच अधिक तीस (खम्सा वे थलाथीन)
हे खूपच रोचक आहे.
आकडे आपल्याप्रमाणे डावीकडून उजवीकडे लिहितात. पण उजवीकडून डावीकडे वाचतात. तसे आपणही आकडे उजवीकडून डावीकडे वाचतो. आपणही पस्तीस असे वाचतो (तीस पाच किंवा तत्सम नाही).
फक्त ९९ पर्यंतच
तसे आपणही आकडे उजवीकडून डावीकडे वाचतो
हेदेखिल फक्त दोन आकडी संख्यांपुरते मर्यादित असावे.
३५ हा आकडा ५ आणि नंतर ३ असा उच्चारला गेला तरी, १३५, १०३५, १००३५ हे आकडे उच्चारताना अनुक्रमे एकशे, एक हजार, दहा हजार असा डावीकडून उजवीकडे असाच क्रम असतो.
त्यामानाने इंग्लिश जास्त कन्सिस्ट्न्ट वाटते!
अतिपरिचयादवज्ञा
हो. आणि ते अरबी भाषेबाबतही खरे आहे.
+१
फक्त अरेबिकमध्ये 'पस्तीस' असा एकच एक शब्द नसून 'पाच आणि तीस' अशी उघड विभागणी असल्याने ते अधिक प्रकर्षाने जाणवतं. अर्थात, आपल्या भाषेत असा काही प्रकार आहे बर्याचदा अतिपरिचयामुळे ध्यानी येत नाही म्हणा. [मूळ प्रोटो-इंडो-युरोपियन शब्दांतील 'स'चा फारसीमध्ये बर्याचदा 'ह' होतो. उदाहरणार्थ ७ = हाफ्त. पण तोच प्रकार मराठीतही सत्तरनंतर एकाहत्तर येताना वा 'दस'चे 'दहा' होताना आढळून येत असला, तरी फारसीचं उदाहरण घेतल्याशिवाय पटकन लक्षात येत नाही.]
फारसीपुरते बोलतो.
बहुधा ते स्थानावर अवलंबून नसावे. कारण सर्व स्थानांमधील उदा. आहेत.
सिंधू- हिंदू.
असुर- अहुर.
मास- माह.
पण हे फक्त नाम क्याटेगरीपुरतेच लिमिटेड असावे असेही वाटते, कारण संस्कृतातल्या अस्ति चे फारसीमध्ये अस्त होते, अह्त/अ:त होत नाही. सबब क्रियापदांना हे लागू होत नसावे. आणि जिथे स हा वर्ण विथौट जोडाक्षर आहे तिथेच होते असे दिसते. कारण अस्ति चे उदा. आहेच, शिवाय संस्कृतातल्या हस्त चा फारसीत दस्त होतो तिथेही तसा बदल दिसत नाही.
बाकी मराठी वा अन्य संस्कृतोद्भव भाषांमधील नक्की नियम माहिती नाही. हा प्रकार प्राकृतापासून सुरू झालाय इतकेच माहिती आहे. प्राकृत व्याकरण पाहिले पाहिजे.
...
हिब्रू, यिडिश या भाषा परंपरेने ज्या लिपीत सामान्यतः लिहिल्या जातात, तशा त्या लिहिताना उजवीकडून डावीकडे लिहिल्या जातात, असे म्हणू या. (त्या लिपीचे नाव मला ठाऊक नाही, म्हणून हा द्राविडी शॉर्टकट.)
पंजाबी (लिप्या: देवनागरी, उर्दूकरिता-जी-कुठली-असेल-ती, गुरुमुखी), सिंधी (लिप्या: देवनागरी, अरबीकरिता-जी-कुठली-असेल-ती) या भाषा लेखनकर्त्यानुसार (आणि ज्याच्यात्याच्या पर्स्पेक्टिवप्रमाणे) कधी उलट्या, तर कधी सुलट्या लिहिल्या जातात.
यिडिश क्वचित्प्रसंगी रोमनमधून लिहिली गेल्यास डावीकडून उजवीकडे लिहिली जावी. मात्र, परंपरेने ती सामान्यतः हिब्रूकरिता-जी-कुठली-असेल-त्या-लिपीत जात असे, असे वाचलेले आहे. (चूभूद्याघ्या.)
अवांतर: कोंकणी ही जेव्हा रोमन लिपीत लिहिली जाते, तेव्हा त्या लिखाणात शिरोरेषा देण्याचा प्रघात बहुधा नसावा. (पुन्हा चूभूद्याघ्या.)
हा प्रश्न खास गवि यांना
हा प्रश्न खास गवि यांना उद्देशून आहे. काल काही कारणपरत्वे चण्डीगढ ते मुंबै असा विमानप्रवास घडला. त्यात वैमानिकाने प्रवासादरम्यान काही 'क्लियर एअर टर्ब्युलन्स' अपेक्षित असल्याचे सांगितले.
प्र. १ - 'क्लियर एअर टर्ब्युलन्स' म्हणजे काय?
विमानात चांगलेच दणके बसत होते. पण वैमानिकाने असा टर्ब्युलन्स या भागात रीसीडिंग विंटर मधे नेहेमीचाच असल्याचे सांगितले (त्यावेळी आमचे विमान साधारणपणे मध्य भारतावरून उडत असावे. पण हा आपला अंदाज).
कॅट ऊर्फ क्लिअर एअर
कॅट ऊर्फ क्लिअर एअर टर्ब्युलन्स म्हंजे ढग किंवा अन्य दृश्य कारणाशिवाय स्वच्छ हवेत येणारे वेडेवाकडे प्रवाह.
जमिनीच्या जवळ डोंगरांच्या आसपास वर जाणार्या हवेच्या झोतांमुळे ते जाणवतात, पण त्याहूनही जास्त तीसचाळीसहजार फुटांवर ट्रॉपोपॉजात (ट्रॉपो आणि स्टॅटोस्फिअरमधल्या एरियात) तोपर्यंत उंचीनुसार कमी होत जाणारं तापमान त्यानंतर उंचीनुसार जास्त होत जातं, याकारणाने तापमानाचा जो ग्रेडिएंट तयार होतो त्यामुळे काही भागात वायू तरल (कुळीथ पिठले) आणि काही भागात जास्त घनतेचा (झुणका) होत असल्याने तिथे हवेचे प्रवाह तयार होतात. जेट स्ट्रीमही याच एरियात असतात. या सर्वांपैकी कशाचातरी किंवा एकत्रित इफेक्ट होऊन विमानाला इकडूनतिकडून हिसके बसून ते डचमळते.
कॅट आधीच दिसत नाही, तिथे पोचल्यावरच कळतो. काही प्रकारच्या उपकरणांनी तो आधीच प्रेडिक्ट करता येतो, पण तो चंचल आणि अतिस्थानिक प्रकार असल्याने नेमके आजरोजी तिथे विमान पोचण्याच्या क्षणी किती ताकदीचा कितपत टर्ब्युलन्स लाभेल हे आधी सांगता येत नाही.
डॉपलर इफेक्ट वापरुन ते मोजता
डॉपलर इफेक्ट वापरुन ते मोजता येतं. Turbulence Intensity (TI) असं स्वतःचं त्या गोष्टीचं युनिट आहे.
TI = u/U
u = the Root-Mean-Square or Standard Deviation of the turbulent velocity fluctuations at a particular location over a specified period of time
U = Average velocity at the same location over same time period.
किचकट आहे मोजणी. कॉम्प्युटराईज्ड उपकरणांनीच शक्य.
बाय (Bi) आणि डाय (Di) असे दोन
बाय (Bi) आणि डाय (Di) असे दोन प्रीफिक्स "दोन" अशा अर्थाने केमिस्ट्री आणि इतर क्षेत्रात वापरले जातात.
मला असं वाटायचं की दोन गोष्टी एकत्रित येऊन काम करण्याच्या केसमधे "बाय" वापरतात आणि विभिन्नता दाखवण्यासाठी "डाय" वापरतात.
म्हणजे दोन लेन्सेस मिळून एक दृश्य जवळ आणून दाखवणारे उपकरण "बायनॉक्युलर्स", एकाच भिंगात दोन वक्रता म्हणजे "बायफोकल"
आणि दोन अणू एका अणूला वेगवेगळे चिकटले (सेपरेटली) की उदा. कार्बन डायऑक्साईड, सल्फर डाय ऑक्साईड.
पण ही समजूत चुकीची असावी असं वाटतं आहे. सोडियम बायकार्बोनेट यात काहीही "दोन" नसूनही (सोडियम हायड्रोजन कार्बोनेट) त्याला बाय का म्हणतात?
बायनरीला डायनरी का म्हणत नाहीत?
डायनॉक्युलर असा शब्द का बनला नसेल ?
शिवाय डायस्टॉलिक (Diastolic) यामधे Di हे दोन या अर्थानेच आहे का?
मोदींना अमेरिकेने व्हिसा
मोदींना अमेरिकेने व्हिसा नाकारला होता हे खरे आहे की नाही ते नक्की माहीती नाही. पण खरे आहे असे गृहित धरल्यास - पण त्यांनी त्याचा पर्सनल इश्यु तर केला नाहीच. (उदा. अमेरिकेबद्दल व्यक्तिगत आकस बाळगणे वगैरे.) पण अमेरिकेबरोबर असलेले संबंध एका वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवले. हा त्यांना आत्मघमेंडीपणा आहे किंवा कसे ?
खवचट - मोदीविरोधक विचारवंत
मोदींमधे टिकाकाराचा फॅन बनवण्याचे फार मोठे कौशल्य आहे.
------------
स्मृती इराणी, किरण बेदी, सुरजेवाला, एम जे अकबर ही मंडळी डोळ्यासमोर येतात. २००२ नंतर टीवीवर जी डिबेट होई त्यात भाजपच्या समर्थकांनाच मोदीचे समर्थन करणे म्हणजे कटकट वाटे. जीवावर येई. केवळ आपल्या पक्षाचा आहे म्हणून काहीतरी बोलायचे म्हणून बोलायचे. १९८४ चे दिल्लीचे उदाहरण द्यायचे असा प्रकार. नंतर हळूहळू वातावरण बदलले.
मोदी दिल्लीत सत्तेवर येण्यापूर्वी "विचारवंत" अतिशय तुच्छतेने त्यांचा उल्लेख करीत. टिवीवर कोण काय बोलणार आहे याची पूर्वकल्पना असे असे म्हणता यावे. "सत्तेचा परिणाम" म्हणून अचानक त्यांच्या बाजूने बोलणारांची संख्या १६ मे नंतर वाढली. त्यांच्या व्यक्तित्वावर टिका करणारांची संख्या हळूहळू घटत आहे- त्यांच्या अप्रोचमुळे. या डिबेट्स मध्ये सध्या सीन एकदम उलटा झाला आहे. स्वतःला रास्त, निष्पक्ष समजणारी प्रत्येक व्यक्ति मोदींच्या सर्व चांगल्या बाजू मान्य करत जात आहे. एक आक्रस्ताळा विचारवंत विरुद्ध सगळे मोदीसमर्थक असा सीन होतो. अर्थात अँकरने जेडीयू, काँग, सपा, मिम, टीएमसी, विचारवंत, बीजेपी असा काँबो ठेवला तरी व्यक्तिशः मोदीविरोधात कोणी जास्त बोलत नाही अलिकडे.
-----------------
The thinkers never expected that Modi would turn out a person as they are seeing in the media. आपण चुकलो असे कबूल करणे फार अवघड असते, त्यातली त्यात विचारवंतांना फारच जास्त. शिवाय १३ वर्षे जपलेली फ्रेम ऑफ माइंड दुरुस्त करणे देखिल अवघड. आपण विचारवंतांना थोडा अवकाश दिला पाहिजे.
--------------------
तुमच्या प्रश्नाच्या उत्तरार्थ - मोदी व्यक्तिगत उण्या दुण्या गोष्टी राजकारणात आणत नाहीत. किमान या केसमधे तसे वाटत नाही.
-------------------
म्हणजे नक्की काय?
>> पण त्यांनी त्याचा पर्सनल इश्यु तर केला नाहीच.
घटकाभर समजा, की त्यांना त्याचा पर्सनल इश्यू करायचा असता; आणि आता मला हे सांगा, की पंतप्रधानपदावर राहून त्यांना नक्की काय काय करणं शक्य झालं असतं, ज्यायोगे तुम्हाला असं म्हणता आलं असतं की त्यांच्या जाहीर वागण्यावरून हे स्पष्ट दिसतंय की मोदींनी त्याचा पर्सनल इश्यू केला आहे?
माझ्या ऐकीव माहीती नुसार
माझ्या ऐकीव माहीती नुसार इंदिरा गांधींनी अमेरिकेत त्यांची कै तरी गोची झाली (कै तरी धान्य/गहू मागायला गेल्या होत्या वगैरे त्यावेळी .....) होती व म्हणून नंतर भारतात घडणार्या प्रत्येक दुर्घटनेमागे सिआयए चा हात आहे असे आरोप करण्याचा सपाटा लावला होता. अर्थात ही माझी ऐकीव ऐकीव माहीती आहे. अत्यंत तोकडा मुद्दा म्हंजे - http://tavleensingh.com/index.php/article_detail.php?aid=243 यात असे म्हंटलेले आहे की इंदिराबाईंनी सिआयए ला "फॉरिन हँड" असे संबोधून ......
माझा मुद्दा अगदी फुटकळ व भुसभुशीत आहे. किंवा फुसका बार आहे असे म्हणा हवंतर.
पण अमेरिकेला शिव्या देणे, कटकारस्थानाचा आरोप करणे वगैरे केले जाऊ शकतेच ना ???
अमेरिकेला शिव्या, कटकारस्थानाचा आरोप वगैरे
>> पण अमेरिकेला शिव्या देणे, कटकारस्थानाचा आरोप करणे वगैरे केले जाऊ शकतेच ना ???
स्रोत : गार्डियन
तुम्ही म्हणता त्या काळात रशिया अमेरिकेला तुल्यबळ होता. त्यामुळे आर्थिक, सामरिक आणि इतर अनेक बाबींमध्ये सहकार्य, मदत वगैरेंसाठी आपल्याला अमेरिका आणि रशिया असे दोन मुख्य पर्याय उपलब्ध होते. शिवाय, स्वतःला अलिप्त राष्ट्र म्हणवून घेणं आणि इतर काही राष्ट्रांना अलिप्त राष्ट्रांच्या गटात सामील करणं भारताला (खरं तर इंदिराबाईंना) शक्य झालं होतं. आताच्या वातावरणात, म्हणजे १९८९नंतरच्या एकध्रुवीय वातावरणात अमेरिकेपासून असा दुरावा कितपत शक्य आहे असं तुम्हाला वाटतं? विशेषतः जे 'बिझनेस-फ्रेंडली' आहेत किंवा तसं असण्याच्या शक्यतेमुळे ज्यांना लोकप्रियता आणि बहुमत मिळालं आहे अशा लोकांना?
(वरच्या तक्त्यात निव्वळ अमेरिकेशी व्यापार किती आहे हे बघून चालणार नाही. तर अमेरिकेशी संबंध बिघडले तर त्याचा परिणाम इतर देशांशी होत असलेल्या किंवा होऊ घातलेल्या व्यापाराशीसुद्धा होईल. असा वेडेपणा एखादा माथेफिरू पुतिनच करू जाणे.)
जाता जाता : शेवटी पैसाच महत्त्वाचा; स्वाभिमान वगैरे नव्हे, हे मी गब्बरला सांगायचं? काय दिवस आलेत हे? ;-)
वरच्या तक्त्यात निव्वळ
वरच्या तक्त्यात निव्वळ अमेरिकेशी व्यापार किती आहे हे बघून चालणार नाही. तर अमेरिकेशी संबंध बिघडले तर त्याचा परिणाम इतर देशांशी होत असलेल्या किंवा होऊ घातलेल्या व्यापाराशीसुद्धा होईल. असा वेडेपणा एखादा माथेफिरू पुतिनच करू जाणे.
नॉट सो फास्ट.
- व्हेनेझुएला चे ह्युगो चावेझ यांनी अमेरिकेच्या भूमिवर येऊन बुश यांना "राक्षस" असे संबोधित केले होते. २००६ च्या आसपास ची गोष्ट आहे.
- अमेरिकेशी मस्ती करण्याचे धैर्य किम जाँग उन पण दाखवतोय की. द इंटरव्ह्यु चित्रपटाचे काय झाले ते गुगलून पहा.
- आणि अमेरिकेने (ओबामाने) - "क्युबा शी संबंध नॉर्मलाईझ करू" असे जाहीर केलेले असले तरी फिडेल / राऊल हे काही फारसे उत्साही नाहीतच. कोल्ड शोल्डरच देताहेत त्याला.
- ऑईल च्या किंमती गडगडलेल्या असूनही व त्यामुळे इराण ची अवस्था बिकट असली तरीही (ओबामाच्या मॉडेल फॉरीन पॉलिसी चे क्राऊन ज्वेल असलेल्या) येमेन मधे उठाव करणार्यांना ते मदत करीतच आहेत ना.
अरेरे!
अरेरे. आता भारतानं काय व्हेनेझुएला, क्युबा, उत्तर कोरिया आणि इराणचा कित्ता गिरवायचा? माझ्या भयस्वप्नातसुद्धा कुणी शहाणा असले सल्ले देणार नाही. असलं काही केलं तर मोदींची गच्छंती तात्काळ झालीच म्हणून समजा. शिवाय, एवढं करूनही त्यांना माझा पाठिंबा मिळणार नाही तो नाहीच :-)
आशा
>> मी आशावादी आहे. तुमच्या आणि मोदींच्या काही प्रामाणिक आस्था अलाइन होऊ शकतात.
आशावादी तर मीही आहे. त्यांनी जनतेचा कौल मानून भारताचं खरं आणि दीर्घकालीन भलं करावं (जे सध्याच्या काँग्रेसला, समाजवाद्यांना, 'आप'ला किंवा डाव्यांनाही जमणार नाही) अशीच माझीही आशा आहे.
माझ्या वाटण्याला इथे फारसा
माझ्या वाटण्याला इथे फारसा अर्थ नाही. त्या 'फडतुसां'ना तसं वाटलं पाहिजे.
अगदी.
फडतूसांना व फडतूसेतरांना - दोघांना ही विकास हवा आहे.
फक्त फडतूसांची इच्छा ही आहे की ते लोक फक्त मते देणार .... झुंडीने. व त्या मतांबरहुकुम मोदींनी फडतूसेतरांवर टॅक्स लावायचा. व त्यातून येणार्या पैशातून विकास घडवून आणायचा. म्हंजे विकासासाठी फडतूसेतरांनी मते दिली काय न न दिली काय - टॅक्स हा त्यांना द्यावा लागणारच.
उपाय काय - बेष्ट म्हंजे फडतूसांची मते मिळालेली आहेतच. आता फडतूसांची कत्तल करणे जास्त उचित. म्हंजे विकास चालू ठेवायचा. पण जोडीला सिरियसली फडतूसांची कत्तल पण कराय्ची. म्हंजे विकासाची फले फक्त फडतूसेतरांनाच मिळतील. डायल्युशन होणार नाही.
आशा आणि खात्री!
>> उपाय काय - बेष्ट म्हंजे फडतूसांची मते मिळालेली आहेतच. आता फडतूसांची कत्तल करणे जास्त उचित. म्हंजे विकास चालू ठेवायचा. पण जोडीला सिरियसली फडतूसांची कत्तल पण कराय्ची. म्हंजे विकासाची फले फक्त फडतूसेतरांनाच मिळतील. डायल्युशन होणार नाही.
मोदींविषयीच्या आशा वगैरे सोडून देऊ; पण मोदी गब्बरचं ऐकणार नाहीत ह्याविषयी मला खात्री आहे. :-)
गरीब श्रीमंत आणि दिशाभूल करणारे पुरोगामी
गब्बर कधीकधी फडतूसांच्या द्वेषामधे वाहवत जातो (अलिकडे ऐसीवर ही फॅशन झालीय).
-----------------
समजा गब्बरचे हेतू मान्य केले तरी त्याच्या उपायांनी फडतूसेतरांना हानीच होणार आहे. सेवेसाठी गरीब असणे हेच श्रीमंतीचे लक्षण आहे. उद्या सगळी पृथ्वी गब्बरच्या मालकीची झाली, दुसर्या प्रत्येक व्यक्तिची कत्तल केली तर तो मूर्खपणा ठरेल. गब्बरला स्वतःची सगळी कामे स्वतः करावी लागतील. त्याचे जीवन बकवास होईल. तेच जर आजूबाजूला १०००-२००० गरीब असतील तर त्यांना कामाला जूंपून ऐश्वर्य भोगता येईल.
-----------------
कॅपिटलीझम हेच आहे ना. १०० रु. श्रीमंताच्या नावाने कमवायचे. ३० रुपयात १०००-२००० गरीबांनी जगायचे (म्हणजे अंततः स्वतःवर खर्चायचे). ७० रुपये श्रीमंताच्या साठी. तितक्या प्रमाणातले गरीबांचे कष्ट एका श्रीमंतासाठी! ही मस्त पद्धत आहे. शिवाय ही काम देखिल करते.
फडतूरेतरांसाठी हा स्वर्णकाल आहे. शंभरो कोटी लोकांना सेवेला जुंपायचे. अनंत सुखे भोगायची. मूर्ख पुरोगाम्यांना धर्म, परंपरांना बडवायला पाठवून स्वतः सुरक्षित राहायचे. सगळं कसं व्यवस्थित चाललंय. आता कत्तली केल्यानं ही सिस्टिम मोडेल पुरोगाम्यांसहित गरीब लोक श्रीमंतांवर भडकतील. देवानं दिलंय म्हणून गुमानं राहा ना.
http://www.forbes.com/sites/laurashin/2014/01/23/the-85-richest-people-…
The 85 Richest People In The World Have As Much Wealth As The 3.5 Billion Poorest
As the World Economic Forum begins in Davos, Switzerland, Oxfam International has released a new report called, “Working for the Few,” that contains some startling statistics on what it calls the “growing tide of inequality.”
The report states:
•Almost half of the world’s wealth is now owned by just one percent of the population.
•The wealth of the one percent richest people in the world amounts to $110 trillion. That’s 65 times the total wealth of the bottom half of the world’s population.
•The bottom half of the world’s population owns the same as the richest 85 people in the world.
•Seven out of ten people live in countries where economic inequality has increased in the last 30 years.
•The richest one percent increased their share of income in 24 out of 26 countries for which we have data between 1980 and 2012.
•In the US, the wealthiest one percent captured 95 percent of post-financial crisis growth since 2009, while the bottom 90 percent became poorer.
उद्या सगळी पृथ्वी गब्बरच्या
उद्या सगळी पृथ्वी गब्बरच्या मालकीची झाली, दुसर्या प्रत्येक व्यक्तिची कत्तल केली तर तो मूर्खपणा ठरेल.
सर्वांची कत्तल नाही करणार तो असं मला वाटतं. तो सिलेक्टिव्हली कत्तल करेल. द. महाराष्ट्रात काँग्रेस गवत किंवा तत्सम तण सिलेक्टिव्हली तोडावं तसं.
म्हणजे फडतुसांचा अमुक एक थर कत्तल करुन संपवणे. दुसरा उपयुक्त थर शिल्लक ठेवणे इ.
कसें ?! ;)
श्रीमंत व प्रामाणिक पुरोगामी
सगळ्यात रोचक बाब म्हणजे स्वतःला बुद्धिप्रामाण्यवादी, बुद्धीवान, विवेकी, सुशिक्षित, विचारी, दूरदृष्टे, ज्ञानसंपन्न, विज्ञानवादी, नैतिक, सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या प्रभावशील, इ इ समजणार्या प्रामाणिक पुरोगाम्यांना सुमार बुद्धीच्या श्रीमंतांनी निव्वळ मूर्खात काढले आहे.
आज जगाच्या आर्थिक असमानतेला, पर्यावरणाच्या घाण अवस्थेला, अतिरेकी चळवळींच्या फोफावण्याला, नैसर्गिक स्रोत ८-१० पिढ्यांनंतर संपण्याला*, पांढर्या अर्थव्यवस्थेपेक्षा आकाराने मोठ्या असणार्या काळ्या अर्थव्यवस्थांना,सामान्य नोकरी करणार्या बांधलेल्या माणसाला आपलेच आयुष्य जगायला वेळ न मिळायला, भ्रष्टाचार माजायला**, युद्धांसाठी आयुधे खपवायला, न्यूक्लिअर आणि तत्सम मानवता नष्ट करण्याचे पोटेंशिअल असणारे इव्हंट व्हायला, इंटेग्रेटेड अर्थव्यवस्थांच्या व्हिम्समुळे निष्कारण कुठेही आर्थिक झटके बसायला, स्थानिक उच्च दर्जाच्या गोष्टी निर्यात होऊन जगात सर्वत्र उपलब्ध असायला, इ इ १% श्रीमंत (फक्त श्रीमंत, बाकी काही नाही) लोक कारणीभूत आहेत.
* जस्ट अ व्ह्यू.
** अंशतः
---------
पैकी पुरोगामी पर्यावरण नावाचा एक मुद्दा "त्यांच्या परीने" योग्य तो भर देऊन हाताळताहेत हे मान्य करावे लागेल. पण त्या लढाईत त्यांची औकात काय आहे हे आपण पाहतच आहोत. बाकी मुद्दे आहेत हे देखिल त्यांच्या गावी नाही. त्यांचे स्वरुप काय आहे आणि त्यांची उत्तरे काय आहेत हा भाग अलहिदा. धर्म आणि परंपरा झोडणे यात जगाची प्रचंड उर्जा अनावश्यक रित्या ते खर्च करत आहेत.
पैकी पुरोगामी पर्यावरण नावाचा
पैकी पुरोगामी पर्यावरण नावाचा एक मुद्दा "त्यांच्या परीने" योग्य तो भर देऊन हाताळताहेत हे मान्य करावे लागेल. पण त्या लढाईत त्यांची औकात काय आहे हे आपण पाहतच आहोत. बाकी मुद्दे आहेत हे देखिल त्यांच्या गावी नाही. त्यांचे स्वरुप काय आहे आणि त्यांची उत्तरे काय आहेत हा भाग अलहिदा. धर्म आणि परंपरा झोडणे यात जगाची प्रचंड उर्जा अनावश्यक रित्या ते खर्च करत आहेत.
अतिमार्मिक मोडवर आहेत अजो आज.
जश्या मॅडम बर्याच वेळेला ममो
जश्या मॅडम बर्याच वेळेला ममो समोरुन आले की दुसरीकडेच बघत असत तसे काहीतरी मोदी ओबामांच्या बाबतीत करु शकले असते. ( हे उदाहरणार्थ ).
( ममो मॅडमच्या असल्या वागण्याबद्दम इम्युन होते ही गोष्ट वेगळी.)
बाकी पण बरेच काही करता आले असते जसे गमती गमती धक्का देवुन पाडणे, चहा ओतताना चुकुन ओबामांच्या पायावर ओतणे. 8)
आणि त्याही पेक्षा जास्त अपमान करायचा असेल तर ओबामा बोलत असताना ममों सारखे सुतकी चेहरा करुन बसणे.
परवा वेसावकर मंडळींची
परवा वेसावकर मंडळींची कोळीगीतं ऐकत होतो. त्यात "बारंडोली"चा भीतियुक्त उल्लेख वारंवार सापडला. उदा- "धनी माझा गेलाय बारंडोलीला, अवचित सुटलाय वादली वारा".
हे बारंडोली काय आहे? गाव असल्यास कुठे आहे? की डीप सी फिशिंग वगैरेला जाणे यास "बारंडोलीला जाणे" म्हणतात?
(पोर्तुगीज पद्धतिप्रमाणे barandolim असं गुगलून पाहता साओ पावलो महानगरपालिकेच्या संस्थळावर पोचलो.)