Skip to main content

अभिव्यक्ती

2 minutes

आपल्या देशात प्राचीन काळापासूनच अभिव्यक्तीच्या स्वतंत्रतेला महत्व दिल्या गेले आहे.नास्तिक चार्वकला सुद्धा ऋषी म्हणून संबोधित केले आहे. भांड, तमाशा इत्यादी लोकनाट्यात देवी देवतांवर टिप्पण्या केल्याच जातात आणि लोक ही ते सहजतेने घेतात. कुणालाही वाईट वाटत नाही. संत कबीर सारख्यांनी तर निंदकाचे स्वागतच केले आहे. त्यांनी म्हंटले आहे,

निंदक नियरे राखिए, ऑंगन कुटी छवाय।
बिन पानी, साबुन बिना, निर्मल करे सुभाय।।

हिंदू -मुसलमान दोन्ही धर्मांत पसरलेल्या अंध विश्वासांवर कबीर ने चौफेर हल्ला चढविला होता, काही उदाहरणे:

पाहन पुजे तो हरि मिले, तो मैं पूजूँ पहाड़।
ताते या चाकी भली, पीस खाए संसार।।
कॉंकर पाथर जोरि कै, मस्जिद लई बनाय।
ता चढ़ मुल्‍ला बॉंग दे, बहिरा हुआ खुदाए।।

एवढे असूनही, त्या वेळी हिंदू आणि मुसलमान दोन्ही धर्मांच्या लोकांनी, कबीरला संत म्हणून स्वीकारले. आज तेवढी ही सहनशीलता आपल्यात नाही. आज दुष्ट प्रकृतीचे लोक स्वत:ला 'धर्मगुरू' म्हणवितात आहे. जर सैतानांनी, धर्मगुरुंचे रूप धारण केले तर त्यांना आपल्या विरुद्ध कोणी काही म्हंटलेले कसे आवडेल. दुष्ट प्रकृतीच्या लोकांना निंदा सहन होत नाही. त्यांच्या विरोधात उठणाऱ्या प्रत्येक आवाजाला ते दाबण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना कळले पाहिजे व्यक्तीची हत्या केल्याने त्याचे विचार नष्ट होत नाही. प्रभू येशू क्रिस्त यांना सूळीवर चढविले. पण त्यांचे विचार नष्ट झाले नाही. अपितु ते जगभर पोहचले. धर्म जात आणि पंथ नावाच्या खाली आज अभिव्यक्तीला दाबण्याचा प्रयत्न होतो, आपण त्याचा निषेध केला पाहिजे. काही महिन्यांपूर्वी अभिव्यक्ती या विषय वर कविता लिहिली होती. पुन्हा ती कविता, थोडी बदलून


अभिव्यक्ती
कानात बोलली
छाटून टाकली
जीभ तिची.


अभिव्यक्ती
शब्दात वाचली
जाळून टाकली
पुस्तके ती.


अभिव्यक्ती
रेषांत दिसली
छाटून टाकले
हात ते.


नराधम राक्षसाना
वाटते सदा भीती
सत्याची.
अभिव्यक्तीची

Node read time
2 minutes

ऋषिकेश Thu, 15/01/2015 - 09:45

In reply to by अनु राव

तुम्ही सहिष्णु नास्तिक असाल तसे सहिष्णु आस्तिकही असतात. माझे कित्येक (खरंतर बहुतांश) आस्तिक मित्र या असल्या चित्रांनी वा कलाकृतींनी अजिबात बिथरत नाहीत.
त्यांची ज्या देवांवर श्रद्धा आहे त्याची विटंबना करण्याची ताकद एखाद्या चित्रात वा चित्रकारात नाही. त्यांची श्रद्धा तेवढी मजबूत आहे!

पन असहिष्णु आस्तिक/नास्तिकांना का भाव द्यावा? असल्या असहिष्णू नास्तिकांसाठी जसे आस्तिकांनी बदलायची (इथे सत्यनारायणावर बंदीची) गरज नाही तसेच असहिष्णू आस्तिकांसाठी नास्तिकांच्या (किंवा कोणाच्याही) चित्रादींवर बंदीची गरज नाही!

नितिन थत्ते Thu, 15/01/2015 - 10:09

In reply to by ऋषिकेश

सत्यनारायणावर बंदी कोण घालायला सांगतंय?

सत्यनारायणाला नमस्कार करण्याची सक्ती (आणि अधिक एक्स्ट्रीम केसमध्ये माझ्या घरी मी सत्यनारायणाची पूजा घालावी म्हणून मला इमोशनली ब्लॅकमेल) करू नये एवढीच मागणी आहे.

ऋषिकेश Thu, 15/01/2015 - 10:43

In reply to by नितिन थत्ते

सत्यनारायणामुळे माझ्या भावन दुखावतात असे काहिसे (बहुमताला अगम्य वाटणारे का असेना) बोलून अशी बंदीची मागणी कोणा नास्तिकाने (किंवा कोणीही) केली तर ती अशा भावनादुखावणार्‍या वगैरे चित्रांवर/पुस्तकांवर वगैरे केलेल्या बंदीच्या मागणी इतकीच वायझेड असेल! असे म्हणणे आहे हो.

अस्वल Thu, 15/01/2015 - 10:55

In reply to by ऋषिकेश

@अनु राव - एक उदाहरण दिलं हो! त्रास वगैरे काही नाही. मुख्य त्रास हा रविवार फुकट गेल्याचा होता/आहे. त्यादिवशी "पूजेचं जेवण" जेवणं हा खरा त्रास. पण तिथेही पंचामृत वगैरे मंडळींना मित्र करून घेतलंय.
ऋषिकेश - एकदम बराबर बोले! :)

अजो१२३ Wed, 14/01/2015 - 00:44

In reply to by अस्वल

मला एक नास्तिक म्हणून मुळात अशा पद्धतीने एका मूर्तीची पूजा करण्यावरच आक्षेप आहे

तुम्हाला बंदुक कानावर ठेऊन पूजा करायला लावतात का? नक्की काय म्हणायचं आहे? तुम्ही नास्तिक आहात म्हणून जगात कोणीच पूजा करू नये? देशात कोणीच पूजा करू नये?

शिवाय तुमचे विचार केवळ हिंदू ह्या एका धर्मापुरते संकुचित आहेत.

असं कै नै. बाय डिफॉल्ट माणसाला सर्वधर्म समभावी समजावे. प्रत्येक वेळी प्रत्येक धर्माचा उल्लेख केलाच पाहिजे असे नाही. (आणि सगळ्यांचा उल्लेख केला पाहिजेच असे म्हणायचे असेल अरुणजोशींच्या अगोदर पिकेच्या प्रोड्यूसरला शिव्या द्या).

अस्वल Wed, 14/01/2015 - 00:48

In reply to by अजो१२३

अहो हिंदू बिंदू उदाहरणं देऊन परिच्छेद तुम्हीच लिहिलाय, मी नव्हे! तेव्हा तुमचा धर्माबद्दल लिमिटेड विचार आहे असं वाटतंय.
@बंदूक - नाही. जे करायचं ते आपापल्या वैयक्तिक आयुष्यात करा. मला डोस पाजू नका किंवा "धर्म" "देव" ह्या सदराखाली सामूहिक काही करून मला त्यात ओढू नका.

अजो१२३ Wed, 14/01/2015 - 00:53

In reply to by अस्वल

लिमिटेड विचार नै हो. कोणतंही एक उदाहरण पुरेसं आहे. दरवेळेस इस्लामलाही थोडं बदनाम केल्याशिवाय पुढे सरकूच नये असा नियम आहे का?
-----------------
ओढायला कोणी आला तर गोळी घाला ना. माझ्यावर अन्याय झाला, धार्मिकांनी केला म्हणून तक्रार नका करू. तुम्ही एकदा चाप ओढला तर तुमच्या भावना नंतर ते दुखावणार नाहीत.

अस्वल Wed, 14/01/2015 - 00:57

In reply to by अजो१२३

आम्ही तेंडुलकरांचे (सचीन नव्हे, विजय.) फ्यान असलो तरी गोळ्या वगैरे नाही घालू शकत. गांधीही आम्हाला प्रिय आहेत :ड

शिवाय अन्यायाचा प्रश्नच नाही. पण "धार्मिक भावना" दुखावल्या हे कारण ग्राह्य मानलं जातं. तशा अधार्मिक भावना दुखावल्या - हे कारणच समजलं जात नाही. अशा भावना असतात, त्या "दुखावल्या" जाऊ शकतात वगैरे पुढला प्रकार.
आणि आता तर धार्मिक भावना दुखावल्या हया सदरात काहीही येत चाललेलं आहे. धार्मिकांच्या संवेदनशीलतेबद्दल एवढे जागरूक असणारे सगळे जण जरा अधार्मिकांची कुचंबणाही बघतील तर बरं!

अजो१२३ Wed, 14/01/2015 - 01:04

In reply to by अस्वल

मी वर लिहिलेला दहशतवादी अधार्मिक असहिष्णुतेवरचा प्रतिसाद पुन्हा वाचा.
-------------------
भारतात तरी अधार्मिक दहशतवाद्यांनी धर्माला राजकारण, अर्थकारण, समाजकारण, थोडेफार कुंटूंबकारण, न्यायपालिका, माध्यमे, इ इ मधून, त्यांना आवडत नाही म्हणून, आणि स्वतः अतिशय मायनॉरिटीत असूनही , चक्क चक्क हाकलून दिले आहे.

आणि तुम्ही म्हणता अधार्मिक भावना दुखवल्याची दखल घेतली जात नाही.

अस्वल Wed, 14/01/2015 - 01:10

In reply to by अजो१२३

तुम्ही नेहेमी सुपरलेटीव मधे (अतिरेकी, दहशतवादी, हाकलून दिलं) वगैरे बोलता, जे मला पटत नाही.
तुमचे रेफरन्स बहुधा सेक्यूलरवादी आणि काँग्रेस सरकारने केलेल्या प्रकारांकडे असावेत. कम्यूनिस्ट्/समाजवादी हा अतिरेक असू शकतो- धर्म नसण्याचा. पण तेही तेवढंच चूक आहे.
कारण परिस्थिती अगदी उलट आहे. एक व्यक्ती म्हणून अधार्मिक माणसाला काहीही अस्तित्व नाही. अधार्मिक असणं, हेच मुंबई हायकोर्टाने ह्या वर्षी मान्य केलंय. त्या आधी विचार कसेही असले तरी माणसाला एक धर्म चिकटवला जायचाच.
तेव्हा मी धर्म मानत नाही. मला त्याची गरज नाही.Give me my space- असा विचार करणारी व्यक्ती अजूनतरी आपल्या समाजात स्वीकारली जात नाही.

अजो१२३ Wed, 14/01/2015 - 01:29

In reply to by अस्वल

अधार्मिक असणं, हेच मुंबई हायकोर्टाने ह्या वर्षी मान्य केलंय.

हास्यास्पद तक्रार आहे ही.
घटनेत जे लिहिलं आहे ते जोक आहे का? विचाराचे, वागण्याचे, धर्माचे* स्वातंत्र्य असेल म्हणून. सरकार धर्म ही संज्या अनंत जागी अनंत कारणांसाठी वापरते. नक्की केस काय ते पाहावे लागेल. पण तक्रार करायसारखे काही नसू शकते.

*घटनेत धर्म झिडकारायचे स्वातंत्र्य आहे १९५०/५१/५२ जे काय ते पासून

त्या आधी विचार कसेही असले तरी माणसाला एक धर्म चिकटवला जायचाच.

तुमचा पंथ नवा आहे. त्याचे नियम बनवा. ना. अस्वल असे व्हिजिटिंग कार्डांवर लिहित चला. लोक समजतील हे नास्तिक आहेत म्हणून. तुम्ही विचार सोप्या भाषेत नाही सांगीतले आणि आम्हाला नै कळले तर आम्ही तुम्हाला इतरांपैकीच एक मानणार - अस्तिक. बाय डिफॉल्ट नास्तिक का मानावं? ते ही ते इतके कमी असताना. अवास्तव आणि माजोरडी* मागणी आहे.

* नथिंग पर्सनल

तुम्ही नेहेमी सुपरलेटीव मधे (अतिरेकी, दहशतवादी, हाकलून दिलं) वगैरे बोलता, जे मला पटत नाही

इथे खूप ऑडियन्स असा आहे कि अतिशय स्निग्ध आणि सभ्य लिहावे, पण एकूणात माहौल तसा नाही. पाहू.

अस्वल Wed, 14/01/2015 - 01:36

In reply to by अजो१२३

तक्रार वगैरे काही नाही. बेसिकली एवढंच म्हणायचंय की तुम्ही अधार्मिकांना गणतीत ठेवत नाही ना? बरं. मग आम्ही तुमचा जो काय असेल त्या धर्माबद्दल बोललो तर गुमान ऐकून घ्या.
भावना वगैरे दुखावणार असतील तर मग धर्म सुद्धा घरीच ठेवा.
अधर्माचा पंथ बनवायचाच नाही हाच पॉइंट आहे हो. धर्म ह्या एका रँडम निकषावर लोकांचे ग्रूप पाडणं हे मान्य नाही. धर्म हा एक वैयक्तिक आवडीचा भाग आहे. असो! पुरे आता.
गुहेत अंधार झालाय.

अजो१२३ Wed, 14/01/2015 - 01:14

In reply to by अजो१२३

याचा अर्थ सांगणं गरजेचं आहे. मी मराठी ब्राह्मण आहे आणि मराठी ब्राह्मणांची एक पारंपारिक जीवनशैली आहे. पण परिस्थितीने (जी दीडशहाण्या अधार्मिक लीडरांनी लीड केली आहे) माझ्या सद्य जीवनशैलीचा आणि मी मराठी ब्राह्मन असल्याचा काही संबंध नाही. का? कारण I am forced to live an entirely different lifestyle. तीच तक्रार जी तुम्ही त्या बाजूने करत आहात ती मी या बाजूने करत आहे. हे कोणी केलं? नास्तिकांनी!!!

अस्वल Wed, 14/01/2015 - 01:18

In reply to by अजो१२३

नास्तिकांनी काय म्हणून? उलट "सर्व धर्मांचं लांगूलचलन करण्याच्या नादात, प्रबलित घटकांवर अन्याय झाला असेल म्हणा".धर्माला सामाजिक रूप दिलं तर हेच होईल- लोकांवर लेबल लागेल.

आणि -तुमची ब्राह्मण म्हणून जगण्याची जी शैली होती तिच्यावर अन्याय झाला असेल तर गो़ळ्या घाला. नास्तिकांनी अन्याय केलाय असं म्हणू नका!

वामा१००-वाचनमा… Wed, 14/01/2015 - 01:06

In reply to by अस्वल

धार्मिकांच्या संवेदनशीलतेबद्दल एवढे जागरूक असणारे सगळे जण जरा अधार्मिकांची कुचंबणाही बघतील तर बरं!

मान्य आहे. हा मुद्दा ध्यानात आला नव्हता.

बॅटमॅन Wed, 14/01/2015 - 02:40

In reply to by वामा१००-वाचनमा…

धार्मिकांच्या संवेदनशीलतेबद्दल एवढे जागरूक असणारे सगळे जण जरा अधार्मिकांची कुचंबणाही बघतील तर बरं!

का म्हणून??? अधार्मिकांना धार्मिकांवर टीका करायला मजा येते, पण स्वतःची कुचंबणा इतरांनी न करावी ही अपेक्षा का म्हणून? अधार्मिकांच्याच लेखी धार्मिक लोक वायझेड आहेत ना? मग या वायझेड लोकांकडून कसलीही अपेक्षा करणे हाच मुळात ट्रिपल वायझेडपणा आहे.

जो तो आपापले हित बघतो. धार्मिक लोक धार्मिकांचे हित बघतील आणि अधार्मिक लोक अधार्मिकांचे. एकाच बाजूवर दुहेरी ओझे टाकण्यात मतलब नाही. तसे असेल तर अधार्मिकांनीही धार्मिकांच्या भावना दुखवू नयेत. नपेक्षा त्यांच्या कुचंबणेचे धार्मिकांना इन्सेण्टिव्ह काय? उगा कायतरीच?

गवि Wed, 14/01/2015 - 11:00

पुन्हा एकदा राजीव साने.. पूर्वीचा (२०१३तला) गल्लत, गफलत, गहजब.. मालिकेतला हा लेखः

दुखऱ्या समूहभावनांना उद्रेकाधिकार?

यांना ऐसीचे सदस्य करुन कसे घेता येईल ?? :)

क्वोट्सः

एकटय़ा व्यक्तीला सातत्याने टोचून बोलून आत्महत्या करायला भाग पाडले जाऊ शकते व तो गुन्हा आहेही, पण यावरून 'समूहांना भावना दुखावून घेण्याचा अधिकार' द्यावा काय? कारण एखाद्या समूहातला कोणीही उपटसुंभ, जणू काही तो अख्ख्या समूहाचा प्रतिनिधी असल्याच्या थाटात, एखाद्या अभिव्यक्तीविरुद्ध रीतसर गुन्हाही दाखल करू शकतो. यातून 'दुखऱ्या समूहभावने'ला, चिथावणीला व झुंडशाहीला वैधता प्राप्त होत नाही काय?

'भावना दुखावणे' नामक गुन्हा
आपल्या देशात 'गोतगटीय' अस्मिताबाजी व जमातवादांमुळे वातावरण इतके दूषित आणि कलुषित झाले आहे, की शब्दाशब्दाला अडखळायला होते. एखाद्या व्यवसायाचा उल्लेख मराठीत केला तर तो भावना दुखावणारा ठरू शकतो. मग एक तर संस्कृतोद्भव शब्द वापरायचा किंवा इंग्लिश शब्द वापरायचा. मुस्लिमांना सरळ मुस्लीम न म्हणता 'मॉमेडियन' असे दबक्या सुरात का म्हणायचे? 'विशिष्ट समूह' का म्हणायचे?

पाकीटमाराला मारहाण करणारे, उगीच न्यायदात्याचा आव आणून, स्वत:मधील साठलेल्या कटुतेचे विरेचन करून घेतात. कशावरही राग काढणे हा हक्क त्यांना नसतो. झुंडशाही ज्या कोणाच्या विरोधात किंवा निषेधार्थ चालविली जाते, त्याची (किंवा त्याच्या 'कलाकृती'ची) काय लायकी होती? हा प्रश्नच झुंडशाहीपासून विषयांतर करणारा आहे. व्यक्तीची सभ्य प्रतिमा तिच्या नावाशी निगडित असते. जमावात व्यक्तीची ओळख पुसली जाऊन ती निनावी बनते. अनेक माणसांचा राक्षस बनतो आणि बळी-माणूस अगतिक बनतो. व्यक्तीच्या जमावापुढे असणाऱ्या दौर्बल्यामुळेच, नागरिकांच्या जीवित-वित्ताचे रक्षण करणे, हे शासनसंस्थेचे आद्यकर्तव्य ठरते.

ऋषिकेश Wed, 14/01/2015 - 11:34

काही धार्मिकांच्या भावना दुखावतात म्हणून एखाद्या कलाकृतीवर बंदी घालणे हे काही नास्तिकांच्या भावना दुखावतात म्हणून देवादिकांच्या मुर्तींच्या निर्मितीवर बंदी घालण्याइतकेच वायझेड आहे असे अस्वल यांना म्हणायचे असावे असा अंदाज - तसे असल्यास सहमती आहे!

गवि Wed, 14/01/2015 - 11:50

In reply to by ऋषिकेश

(बहुतांश वेळा)आस्तिक कट्टर असू शकतो पण (बहुतांश वेळा) नास्तिक कट्टर नसतो असं एक जनरल अ‍ॅझम्प्शन आहे. ते चूक असल्यास कृपया खंडन करावं.

शाकाहार्‍याला मांसाहाराचा त्रास होतो. तो त्यामुळे दुखावतो. मांसाहार आसपास आणि अस्तित्वात असणं आणि तो आपल्या जीवनात येणं हे शाकाहार्‍याला पॉझिटिव्हली नको असतं. चुकून मांसखंड पानात पडला की तो अत्यंत विचलित होतो आणि अन्नग्रहण सोडून देतो.

मांसाहार्‍याला शाकाहार्‍याचा असा त्रास नसतो. त्याला शाकाहाराविषयी विशेष शिवाशीव किंवा रॅडिकल तिरस्कार नसतो.

तत्सम आस्तिकाला देवाचं अस्तित्व नाकारणारे किंवा देवाची चेष्टा/अवमान करणारे लोक सहनच होत नाहीत. अश्या लोकांच्या असण्यानसण्याने त्यांना खूप फरक पडतो. पण नास्तिक (किंवा अज्ञेयवादी) मनुष्य हा आजुबाजूला आस्तिक लोक असल्याबद्दल तीव्र हिंसक प्रतिक्रिया होण्याइतका अस्वस्थ अथवा त्रस्त होत नाही असं वाटतं.

विज्ञानप्रेमी किंवा विज्ञानानुयायी (विज्ञानवादी म्हणत नाही) व्यक्ती ही "जे आहे ते पॉझिटिव्हली सिद्ध आणि एक्सप्लेन करता आल्याने" विश्वास ठेवणारी असते.
श्रद्धाळू आणि अंधश्रद्धाळू व्यक्ती ही "सिद्ध आणि एक्स्लप्लेन करता न येण्याने" विश्वास ठेवणारी असते.

तिसरा वर्गः विज्ञानभंजक व्यक्ती "जे नाही ते नाही हे सिद्ध करता येत नाही" असे सिद्ध करण्यात गुंतलेले असतात.

त्यामुळे देवादिकांच्या मूर्ती किंवा अमूर्थ ईश्वराचे पूजन यामुळे नास्तिकांच्या "भावना दुखावतील" हे काही पटत नाही.

ऋषिकेश Wed, 14/01/2015 - 12:14

In reply to by गवि

तत्सम आस्तिकाला देवाचं अस्तित्व नाकारणारे किंवा देवाची चेष्टा/अवमान करणारे लोक सहनच होत नाहीत.

यात चूक कोणाची? अभिव्यक्ती करणार्‍याची वा नाकारणार्‍यांची खचितच नाही. त्याला दंड का? आस्तिकांना सहिष्णु होण्याची गरज आहे, बंदीची नव्हे!

त्यामुळे देवादिकांच्या मूर्ती किंवा अमूर्थ ईश्वराचे पूजन यामुळे नास्तिकांच्या "भावना दुखावतील" हे काही पटत नाही.

पटणे न पटणे हे वैयक्तिक आहे. मला अशा भावना दुखावणे शक्य आहे हे पूर्ण पटते.
नास्तिकांची देव नसण्यावर अनेकदा "श्रद्धा" असते. श्रध्दा म्हटले की भावना दुखावणे आलेच!
माझ्या भावना दुखावतात असे म्हणणारे काही नास्तिक माझ्या परिचयाचे आहेत (नव्हे पुणे दिवाळी कट्ट्याला येऊनही गेले आहेत. पण ते ऐसीवर वाचनमात्र असतात)

ॲमी Wed, 14/01/2015 - 14:23

In reply to by ऋषिकेश

माझ्या भावना दुखावतात असे म्हणणारे काही नास्तिक माझ्या परिचयाचे आहेत (नव्हे पुणे दिवाळी कट्ट्याला येऊनही गेले आहेत. पण ते ऐसीवर वाचनमात्र असतात ) >> +१. अस्वलाचे प्रतिसाद वाचून मलापण स'लि'ल आठवला :-D

अनु राव Wed, 14/01/2015 - 19:07

In reply to by गवि

तत्सम आस्तिकाला देवाचं अस्तित्व नाकारणारे किंवा देवाची चेष्टा/अवमान करणारे लोक सहनच होत नाहीत. अश्या लोकांच्या असण्यानसण्याने त्यांना खूप फरक पडतो.

गवि - तुम्ही दो कॅटेगरी सहज एकत्र करुन एकदम वेगळाच रंग दिला आहे.
मला वाटते "देवाचं अस्तित्व नाकारणारे" आणि "देवाची चेष्टा/अवमान करणारे" ह्या दोन पूर्णपणे वेगळ्या कॅटेगरीची लोक आहेत. आणि जनरली हिंदू आस्तिक "देवाचं अस्तित्व नाकारणार्‍यांना" सहज सहन करतात. जो काही प्रॉब्लेम येतो तो दुसर्‍या कॅटेगरीमधल्या ( चेष्टा करणार्‍या ) लोकांमुळे.

अजो१२३ Wed, 14/01/2015 - 19:25

In reply to by अनु राव

एकदम बुल्झाय.
----------
धार्मिक लोकांना
१. दुसर्‍या धर्माच्या लोकांची सवय असते.
२. नास्तिक लोकांची सवय असते.
३. त्यांना स्वतःला निंदणारांची सवय असते.
४. थोडीफार त्यांच्या श्रेद्धेला चिडवलेले चालते.
५. श्रद्धास्थानाला नाकारलेले चालते. (नैतरी दुसर्‍या धर्माचे लोक तेच करत असतात)
मात्र श्रद्धास्थानाला चिडवलेले आवडत नाही. पण ही खाज नास्तीकांत प्रचंड असते. नास्तिक समाजात शोधता येत नाहीत म्हणून त्यांचा गनिमी कावा चालत असतो.

अस्वल Wed, 14/01/2015 - 22:42

In reply to by अजो१२३

ह्या सगळ्या निव्वळ बोलायच्या गोष्टी आहेत. आणि धार्मिक != फक्त हिंदू असं तुम्हीच म्हटल्याप्रमाणे धरून चाललोय मी.
-दुसर्या धर्माच्या लोकांची सवय असते? हो का? बरं.
-त्यांना स्वतःला निंदणार्यांची सवय असते- हो! ते कळतंय, की धार्मिक लोक किती शांतपणे निंदा सहन करू शकतात ते! शांतपणे समोरच्याला मारून टाकणं हाही त्यातलाच भाग.
-नास्तिक(अधार्मिक म्हणायचंय का? नीट लेबलं लावत जा हो.) लोकांची सवय असते- हे मात्र खरं. अधार्मिक काहीच करायला जात नाहीत. निरूपद्रवी आणि पुन्हा isolated जात! झुंडशाही वगैरे गोष्टी शिकतील तेव्हा बघूया.
-थोडीफार त्यांच्या श्रेद्धेला चिडवलेले चालते. - थोडंच. फार नाहीच. आणि थोडं म्हणजे infinitesimally small म्हणतात तसं.

बाकी १ ते ५ हे सगळं आपल्या तुमच्या जगात खर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्च होत असेल तर बहुधा तुमचं वास्तव वेगळं आहे.. एन्जॉय!

अजो१२३ Thu, 15/01/2015 - 00:42

In reply to by अस्वल

धार्मिक != फक्त हिंदू असं तुम्हीच म्हटल्याप्रमाणे

धार्मिक लोक म्हणजे फक्त हिंदू? हे कोणी म्हटलं ? मी जे पंचशील लिहिलं आहे ते सर्व धर्मांना सारखं लागू आहे.
--------------------
बाय द वे, ते धार्मिक लोकांनी अधार्मिकांवर काय काय अन्याय (अभिव्यक्तीच्या संदर्भात ) ते सांगा न राव/

अस्वल Thu, 15/01/2015 - 00:51

In reply to by अजो१२३

(आज पुन्हा थोडा वेळ आहे तेव्हा... आणि प्रतिसाद तुमच्यास "भाषेत" देतो, कळायला सोप्पा जाईल.)

धार्मिकांनी केलेले अन्याय (अधार्मिकांवर/सामान्य जनतेवर/ भिन्नधर्मियांवर) वगैरे.. तुम्हाला माहिती नाहीत? मूर्खपणाचा कळस आहे. तुमच्या वाचनाची जाहीर कीव केली पाहिजे.
Inquisition वगैरे जाऊ द्या तेल लावत.. मध्ययुगं/इतिहास वगैरे मी सोडून देतो. धर्माचं प्राबल्य होतं तेव्हा आणि धर्मगुरू आणि त्यांचे शिष्य येडझव्यासारखे सगळ्यांना त्रास देत होते.
आत्ता आत्तापर्यंत आयर्लंडमध्ये एखादी स्त्री मेली तरी चालेल पण गर्भपात होऊ देणारे नाही वगैरे खुळचट कल्पना आहेतच.
इस्लाम नामक एका धर्मात बायकांनी काय करावं काय करू नये किंवा पुरूषांनी कसं वागावं अशासारख्या आदेशांची कमतरता नाही, ते अजूनही पाळले जातात.
आणि बाबरी मशीद, होणारे दंगे वगैरे बहुतेक सगळी फँटसी आहे.
अभिव्यक्ती दूरची गोष्ट आहे राव. शांतपणे जगायला देत नाहियेत तुमचे वेडझवे धार्मिक लोक. धार्मिक लोक एकजात मूर्ख आणि बेअक्कल आहेत इ.इ.

अजो१२३ Thu, 15/01/2015 - 02:22

In reply to by अस्वल

Why don't you limit the topic to injustice on adharmik people? (
------------
आणि क्षणभर ऐकून घेतलं तरी इतिहासात धर्माच्या नावाखाली जितका अपप्रकार झाला आहे तो आज विज्ञानाच्या आणि वाणिज्याच्या आणि आधुनिकतेच्या नावाखाली होणार्‍या अपप्रकाराचा १/१०० अंशही नाही. आजच्या ज्ञानाच्या संदर्भात (ज्ञान आहे तेव्हा गोंधळ कमी असावा या अर्थाने) जुना अपप्रकार १/१००० पण नाही. मला तुमच्या डोळ्यावर आलेल्या झापडेची किव येते.

अस्वल Thu, 15/01/2015 - 10:58

In reply to by अजो१२३

तुमच्या एकंदर प्रतिक्रियांवरून तुम्हाला माझी कीव येणं हा माझा बहुमान समजतो मी.

अजो१२३ Thu, 15/01/2015 - 01:13

In reply to by अस्वल

शांतपणे समोरच्याला मारून टाकणं हाही त्यातलाच भाग.

लै मोठ्ठा जावईशोध. १९०० पर्यंत जगात १००% धार्मिक लोक होते. ते जर शांतपणे समोरच्यालाअ मारून टाकणारे असते तर लोकसंख्या ० नसती का झाली?
प्रत्येक हत्येची प्रेरणा धर्म कशावरून? अगदी दाभोळकरांच्या हत्येच्या केसमधे अतातायी पुरोगामी धार्मिक लोकांनी त्यांना मारले म्हणून निर्णय देऊन मोकळे झाले आहेत. भावड्यांनो, देशात पोलिस आहे, कोर्ट आहे, त्यांना बोलू द्या ना. शुद्ध गटफिलिंगचा आधार घेऊन धर्माला बदनाम करण्यात पुरोगामित्व कसलं? अक्कल कसली? म्हणे धार्मिक कट्टरता वाढलीय. सगळ्या धार्मिक लोकांनी मिळून असला कट रचला म्हणणे किती मूर्खपणाचे आहे!!! नोवेंबर २०१४ मधे एका संशयिताला पोलिसांनी अटक केली. पुढे बातमी नाही. पण पुरोगामी सगळ्या धार्मिकांना शिक्षा देऊन केव्हाच मोकळे झाले. हेच उद्या धार्मिक नेता मारला गेला तर अनिंसवाल्यांना सहजदोष देतील काय?

उगाच प्रचंड बेजबाबदार विधाने करणे इष्ट नसावे. तुम्हाला धार्मिक नसायला आवडते तर आरामात नसा. नैतरी धार्मिकता लादता येत नाही. पण धार्मिक लोक हे नीच कसे असतात, समोरच्याला शांतपणे मारतात, आणि त्या हत्येची प्रेरणा धर्म असतो, धार्मिकता असते हे कशावरून्? जगात अनेक प्रेरणांनी अनेक हत्या होतात. त्यापैकी बदनाम करायला धर्म सर्वात सुलभ आहे.
-------------------

नीट लेबलं लावत जा हो.

वैज्ञानिक दृष्टीकोनाचे, पुरोगामी, नास्तिक, अधार्मिक, आधुनिक इ इ शब्द मी एकाच अर्थाने वापरतो. विचारसरणीचा हा एक स्पेट्रम आहे. दर वेळेस मला नविन बँडला रेफर करायचं असतं. नेमका शब्द नसतो.

अनु राव Thu, 15/01/2015 - 09:49

In reply to by अजो१२३

धार्मिक लोकांना
१. दुसर्‍या धर्माच्या लोकांची सवय असते.
२. नास्तिक लोकांची सवय असते.
३. त्यांना स्वतःला निंदणारांची सवय असते.
४. थोडीफार त्यांच्या श्रेद्धेला चिडवलेले चालते.
५. श्रद्धास्थानाला नाकारलेले चालते. (नैतरी दुसर्‍या धर्माचे लोक तेच करत असतात)

"धार्मिक लोकांना" च्या ऐवजी इथे "धार्मिक हिंदू, क्रिश्चन, ज्यु, बुद्ध लोकांना" असे स्पेसिफिक्ली लिहायला पाहीजे होते असे मला वाटते.

अस्वल Wed, 14/01/2015 - 12:21

In reply to by ऋषिकेश

@ऋषिकेश - :) तसंच काहीसं. मुळात "धार्मिक भावना" दुखावणं म्हणजे नेमकं काय हे मला कधीच कळू शकलं नाही, म्हणून म्हटलं जरा अधार्मिकांच्या बाजूने बोलून बघूया. बरेचदा धार्मिक भावना वगैरे काही दुखावलेल्या नसतात, दुखावतो फक्त इगो- की "माझ्या" धर्माला आक्षेपार्ह असं कोणीतरी काहीतरी करतो आहे.. इ.इ.
उद्या जर बटाटेवड्याला शिव्या घातल्या तर माझ्या खाद्यभावना दुखावल्या म्हणतील लोक. काही सांगता येत नाही.
====================
ब्लॅक फ्रायडे मधला ड्वायलॉक आठवला.
"हर वो आदमी जिसे कुछ नही है करने को, धर्म के नाम पर चूतिया बनता रहेगा". पर्फेक्ट आहे.

अजो१२३ Thu, 15/01/2015 - 00:38

In reply to by अस्वल

"हर वो आदमी जिसे कुछ नही है करने को, धर्म के नाम पर चूतिया बनता रहेगा".

धार्मिक लोक हे स्लीपर सेल्स आहेत. वैज्ञानिक आणि वाणिज्यिक लोक हे त्यांचे मुखिया. स्लीपर सेल्स मुखीयाकडून चुत्या बनतो, पण अख्खा समाज मुखियाकडून चुत्या बनतो.

अजो१२३ Wed, 14/01/2015 - 19:13

In reply to by ऋषिकेश

कलाकृतींचे स्वामी नास्तिक? मूर्तींचे स्वामी धार्मिक?? कलाकृती, मूर्ती, आस्तिक, नास्तिक या शब्दांत इतके ओवरलॅप आहेत, संबंध आहेत आणि संबंध नाहीत कि हे लॉजिक टोटल गंडलेले आहे.
-------------
कोणाची कशाशी किती अस्मितिक गुंतवणूक आहे, भावनिक गुंतवणूक आहे, किती कांगावा आहे हे पाहावं लागेल.
------------------------------
बाकी धार्मिक लोक अधार्मिक लोकांना कसकसे त्रास देतात याचे विवेचन अस्वल यांनी करावे. आस्तिकांनी कोपर्‍यात ठेवलेली मूर्ती तुम्हाला कशी त्रास देते? स्वतंत्र नास्तीकलँडची मागणी करताना काय तक्रारी आहेत हे वाचायला आवडेल. आम्हाला मोजतच नाहीत ही काय तक्रार झाली? कदाचित तुमची (म्हणजे नास्तिकांची) औकात तितकी नाही असं सामान्यांना वाटत असेल.

अनु राव Wed, 14/01/2015 - 12:48

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणार्‍यांमधे पण लपलेले दमनखोर असतात.
कोणी मुसलमानांबद्दल वाईट लिहीले तर ह्या स्युडो लोकांना त्यानी ज्युंना / हिंदुना पण शिव्या घातल्या पाहीजेत अशी अट असते.

जो काही ब्लॉग शेयर झाला होता त्यात सुद्धा शार्ली ने कसे एका माणसाला ज्यु विरोधात लिहीले म्हणुन काढुन टाकले होते हे लिहीले आहे. मला त्या दोन गोष्टींचा संबंध कळला नाही. माझे एक मत आहे आणि मी ते मांडते आहे. ते संतुलीत ( हा शब्द पण वरच्या काही प्रतिक्रियांमधे आला आहे )असले पाहीजे हा कसला अट्टाहास.
धरुन चाला की शार्ली एब्दो फक्त आणि फक्त मुसलमानांवर च टीका करते, SO what? टीका करायची तर सर्वांवर करा नाहीतर कोणावरच करु नका असे का?

बॅटमॅन Wed, 14/01/2015 - 12:51

In reply to by अनु राव

धरुन चाला की शार्ली एब्दो फक्त आणि फक्त मुसलमानांवर च टीका करते, SO what? टीका करायची तर सर्वांवर करा नाहीतर कोणावरच करु नका असे का?

समजा कोणी फक्त हिंदूंवरच टीका करतोय. मग त्याच्यावर टीका करणार्‍यांना मात्र "आपलं बघा दुसर्‍याअगोदर, हिंदूही काही कमी नाहीत" इ. मुक्ताफळे ऐकवली जातात. तेच मुसलमानांवर टीका केली रे केली की यांचा असेल नसेल तेवढा सगळा रॅशनलपणा उफाळून येतो. असले सगळे एकजात ढोंगी व यूसलेस आहेत.

नितिन थत्ते Wed, 14/01/2015 - 13:41

अ‍ॅब्सोल्यूट अभिव्यक्तीस्वातंत्र्याला माझा पाठिंबा नाही.

धनंजय Wed, 14/01/2015 - 18:08

In reply to by नितिन थत्ते

अॅब्सोल्यूट शून्य तापमानाचे फ्रीझर मला मान्य नाहीत.

(पण शक्य आणि उपलब्ध फ्रीझरांच्या चर्चेत वरील मताचा काय उपयोग?)

अजो१२३ Wed, 14/01/2015 - 19:30

In reply to by नितिन थत्ते

माझा केवल अभिव्यक्तिस्वातंत्र्याला पाठिंबा नाही.
माझा अभिव्यक्तिस्वातंत्र्याला पाठिंबा नाही.
माझा व्यक्तिस्वातंत्र्याला पाठिंबा नाही.
माझा स्वातंत्र्याला पाठिंबा नाही.
--------------------------------
स्वातंत्र्य पेलायला प्रचंड बुद्धी, ताकत आणि साज्जन्य लागतं. It is better that there are social norms than things left to duffers.

बॅटमॅन Wed, 14/01/2015 - 21:27

भारतातले सो कॉल्ड लिबरल लोक हे एक नंबर दुतोंडी आणि ढोंगी आहेत.

हे मी म्हणत नाहीये, खालील लेख वाचून ते सरळच ध्यानात येते.

http://scroll.in/article/700341/Even-Indian-liberals-don't-really-suppo…

पालथ्या घड्यावर पाणीच आहे हा लेख म्हणजे. पण तरी प्रयत्न करत राहणे हे महत्त्वाचे.

अनु राव Thu, 15/01/2015 - 09:40

In reply to by बॅटमॅन

भारतातले सो कॉल्ड लिबरल लोक हे एक नंबर दुतोंडी आणि ढोंगी आहेत.

अहो फक्त लिबरल नाही, दुतोंडीपणा आणि ढोंग हे भारतीयाचे व्यवच्छेदक लक्षण आहे.

सुनील Thu, 15/01/2015 - 10:12

In reply to by अनु राव

अहो फक्त लिबरल नाही, दुतोंडीपणा आणि ढोंग हे भारतीयाचे व्यवच्छेदक लक्षण आहे.

सहमत.

शार्ली हेब्दोने केली ती चूक पण हुसेनला मात्र अभिव्यक्तीस्वातंत्र्य जपण्याचा हक्क, हा दुतोंडीपणा आहेच.

तसेच, शार्ली हेब्दो चालतो पण हुसेन मात्र नाही, हादेखिल दुतोंडीपणाच!

एकतर दोघांना पाठिंबा द्या (आपल्या पाठिंब्याला कोण विचारतोय म्हणा!) किंवा दोघेही चूक म्हणा (मला हे पटत नाही पण निदान वैचारीक सुसंगती तरी दिसते)

बॅटमॅन Thu, 15/01/2015 - 10:46

In reply to by अनु राव

अर्थातच. पण स्वतः मारे बॅलन्स्ड असल्याचा दावा करणारे आणि वेळप्रसंगी उघडे पडणारे लोक अजून ढोंगी असतात.

मेघना भुस्कुटे Thu, 15/01/2015 - 14:09

In reply to by सुनील

छे! हे अती झालं. अशानं घासूगुर्जींचा शुद्धिचिकित्सक वापरात आला तरी मला आश्चर्य वाटायचं नाही.

बॅटमॅन Thu, 15/01/2015 - 16:01

In reply to by अजो१२३

ठ्ठो =)) अबे पण ऐसीकर्स अजोंचं म्हणणं चूक थोडीच आहे.

आता अजून अस्त्रे एकमेकांवर कोसळणार =)) मज्जा येणार निछ्छीत =))

अजो१२३ Thu, 15/01/2015 - 18:38

In reply to by बॅटमॅन

मेघनाच्या पुरोगामी भावनांची तीव्रता जाण बॅटमॅन. जे झालं ते तिला इतकं अति झालं कि तिने अति चा ति अति केला.

अजो१२३ Thu, 15/01/2015 - 19:21

In reply to by सुनील

अतिशय उचित भूमिका आहे ऑक्सफर्डची. संवेदनांमधे लॉजिक शोधू नये. कोणाच्याही संवेदना दुखतील असे काही करू नये.

अजो१२३ Fri, 16/01/2015 - 01:36

In reply to by बॅटमॅन

नास्तिकांच्या नास्तिक असण्याचा मला तरी आदर आहे. मला स्वतःचं क्लासिफिकेशन कसं करावं याबद्दल अपार संभ्रम आहे पण फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पोजेस inlcluding lifestyle, behaviour, logic, thinking and philosophy मी कट्टर नास्तिक असावा. वर एके जागी गवि म्हणाले "नास्तिकही एक प्रकारच्या स्वप्नातच असतात" तेव्हा ते मला फारसं रुचलं नव्हतं. पण मुद्दा तो नाही. नास्तिकांच्या नास्तिक असण्याबद्दल मला फार काही आक्षेप नाही आणि असला तरी शुद्ध टेक्निकल असेल. मात्र नास्तिकांच्या अस्तिकांना हिन वा निर्बुद्ध वा चूक वा गुंड वा खोटे वा क्रूर लेखण्याबद्दल मात्र प्रचंड आक्षेप आहे.
समाज नास्तिक अस्तिकांना काय लेखतात आणि अस्तिक नास्तिकांना काय लेखतात याबद्दल सध्याच्या जमान्यात एक मूलभूत फरक आहे. नास्तिक प्रत्येकच मानवी दुर्वर्तनाचे खापर अस्तिकत्वार फोडू पाहतात. हा सरळसरळ दैनंदिन जीवनातील अस्तिकांच्या मूल्यांवरच घाला घातल्यासारखे आहे. अस्तिक मात्र नास्तिकांची मूल्ये वाईट आहेत असे म्हणत नाहीत*. म्हणजे तुमच्या नास्तिक असल्यामुळे तुम्ही नीच, हिन, निर्बुद्ध, चूक इ इ आहात असे म्हणत नाहीत. "देवा याला तो काय म्हणतोय ते कळत नाहीय. तू त्याला माफ कर" असले काहीतरी ते देवाला म्हणतात. ईश्वर असो नैतर नसो, त्या संकल्पनेशी निगडीत मूल्ये अतिशय श्रेष्ठ आहे अशी माझी धारणा आहे. त्यामुळे नास्तिकांनी घेतलेला पावित्रा - अस्तिकतेमुळे अन्याय आहे - मला टेनेबल वाटत नाही.

आज आपल्या सगळ्यांची अभिव्यक्ति या संकल्पनेवर चर्चा धर्माशी निगडीत अशी झाली. तिथे कोणती अभिव्यक्ति योग्य नि कोणती अयोग्य हे ठरवताना धार्मिक विरुद्ध अधार्मिक असे दोन गट पडले. मग अधार्मिकांतही आणि धार्मिकांतही दोन दोन गट पडले. शेवटी असं वाटायला लागलं कि मुख्य विचारधारा धार्मिक असो कि अधार्मिक, अभिव्यक्तिची सीमा काय असावी याबद्दल विवेकी, बुद्धिप्रामाण्यवादी लोकांत जितके सदस्य तितकी क्लिष्ट मतांतरे आहेत. मतांतरे कितीही असली तरी धार्मिक लोकांना काय कृती करू नये याची निश्चित सीमारेषा काय असावी याची एक दृढ कल्पना आहे. अधार्मिक लोक मात्र गंटागळ्या खात आहेत. प्रत्येकाची सीमा प्रचंड भिन्न आहे. आधार प्रचंड भिन्न आहेत. ते निश्चित एक कृतीसीमा आखतील हे असंभव आहे. केवल (अ‍ॅब्सॉल्यूट) अभिव्यक्तिस्वातंत्र्य ते केवल मुस्कटदाबी हे हे नक्की कशाला म्हणावं, समाजासाठी त्यातलं नक्की काय योग्य (प्रिस्क्राईब करावं असं) आहे आणि व्यवहारात आणताना कुठे त्याचा काय अर्थ काढावा याचं फ्रेमवर्क (समाजात अस्तिक नाहीतच असे मानूनही) हे लोक बनवू शकत नाहीत.

(समाजाला धर्म, ईश्वर अशी पार्श्वभूमीच नाही तर) कल्पना करा माणसाच्या अशा लाखो अफेक्टेशन्स बद्दल अशी लाखो ओरियन्टेशन्स असलेली करोडो माणसे भूतलावर एकत्र कशी राहतील? त्यांच्यातील वाद विकोपाला नाहीत का जाणार? मग तूर्तास आहे ती सिस्टिम स्वीकारणे योग्य. तिचा रेफरन्स सगळीकडे द्यावा. त्यातला एकेक खिळा काढून दुरुस्ती करावी. पण आहे ती सगळीच सिस्टिम नाकारणे आणि तीच नीच नीच म्हणून हिणवणे हे कोसळत्या घरात खाली पडताना चार विटा रचल्यासारखे आहे.

* म्हणू शकतात का या थीमवर मी नास्तिक आणि विकृती नावाचा लेख लिहिला होता.
-------------------------
स्वतःला नास्तिक (किंवा अस्तिकही) घोषित करायला मला प्रचंड आवडेल. पण तत्पूर्वी एखाद्या अस्तिकाच्या आणि खासकरून अज्ञेयवाद्याच्या (किंवा इतर सर्वच वाद्यांच्या) किमान टिपिकल प्रश्नांना सामोरे जाण्याची माझी पात्रता आहे का हा विचार मला अस्वस्थ करून जातो. अशी पात्रता नसल्याचा अनुभव आहे म्हणून मी वैचारिक त्रांगडे घेऊन जगणे पसंद करतो.

गवि Fri, 16/01/2015 - 07:09

In reply to by अजो१२३

. अस्तिक मात्र नास्तिकांची मूल्ये वाईट आहेत असे म्हणत नाहीत*. म्हणजे तुमच्या नास्तिक असल्यामुळे तुम्ही नीच, हिन, निर्बुद्ध, चूक इ इ आहात असे म्हणत नाहीत. "देवा याला तो काय म्हणतोय ते कळत नाहीय. तू त्याला माफ कर" असले काहीतरी ते देवाला म्हणतात.

.. निरागस विचार आहे.. पण जगात लागू न पडणारा. ईश्वरनिन्दा हा वेगळा भाग झाला.. केवळ ईश्वर नाकारणे महाग पडते खूप मोठ्या लोकसंख्येला..

. The following 23 nations treat apostasy under their criminal laws as of 2013:[53]

Afghanistan – illegal (death penalty, although the U.S. and other coalition members have put pressure that has prevented recent executions)[71][72]
Algeria – While Algeria has no direct laws against apostasy, its laws indirectly cover it. Article 144(2) of Algerian code specifies a prison term to anyone who criticizes or insults the creed or prophets of Islam through writing, drawing, declaration, or any other means; further, Algerian law makes conversion from Islam and proselytizing by non-Muslims an offense punishable with fine and prison term.[53]
Brunei – per recently enacted Sharia law, Section 112(1) of the Brunei Penal Code states that a Muslim who declares himself non-Muslim commits a crime that is punishable with death, or with up to 30 year imprisonment, depending on the type of evidence. However, if the accused has repented his conversion, he may be acquitted of the crime of apostasy.[53]
Comoros[65]
Egypt – illegal (3 years' imprisonment)[73]
Iran – illegal (death penalty)[73][74][75]
Iraq[65]
Jordan – possibly illegal (fine, jail, child custody loss, marriage annulment) although officials claim otherwise, convictions are recorded for apostasy[76][77][78]
Kuwait[65]
Malaysia – illegal in five of 13 states (fine, imprisonment, and flogging)[79][80]
Maldives[65]
Mauritania – illegal (death penalty if still apostate after 3 days)[81]
Morocco – illegal to proselytise conversion (15 years' imprisonment)[82] Only country not listed by Pew.[65]
Nigeria[65]
Oman – illegal (prison) according to Article 209 of Oman penal code, and denies child custody rights under Article 32 of Personal Status Law[53]
Qatar – illegal (death penalty)[83]
Saudi Arabia – illegal (death penalty, although there have been no recently reported executions)[73][84]
Somalia – illegal (death penalty)[85]
Sudan – illegal (death penalty)[86]
Syria[65]
United Arab Emirates – illegal (3 years' imprisonment, flogging)[87]
Yemen – illegal (death penalty)[83]
A few Islamic majority nations, not in the above list, prosecute apostasy even though they do not have apostasy laws, and only have blasphemy laws.

मेघना भुस्कुटे Fri, 16/01/2015 - 09:48

In reply to by अजो१२३

नियमाचा अपवाद करून या प्रतिसादाला उपप्रतिसाद देते आहे, कारण अजो इथे महत्त्वाचं काहीतरी म्हणताहेत असं मला भासतंय.

धार्मिक-अधार्मिक / नास्तिक - आस्तिक यापलीकडे जाऊन सर्वमान्य स्वीकारार्ह कृतींची सीमा (फ्रेमवर्क) कशी आखता येईल, असा पेच आहे.

त्यांच्या मते पेच सुटणं अशक्य आहे, म्हणून आहे ती (धर्माची / परंपरेची) चौकट सर्वांनी मान्य करावी. माझ्या मते आपापल्या उठल्यासुटल्या दुखर्‍या होणार्‍या भावनांना लोकांनी आवर घातला तर अशा सीमा आखण्याचं काम सोपं होईल आणि पारंपारिक चौकटींचा जाचही (माझ्या मते) सहन करायला लागणार नाही.

बाकीची हमरातुमरी तिच्या जागी ठीकच.

ऋषिकेश Thu, 15/01/2015 - 16:08

२००+!!!

दिल्लीच्या यमुनेच्या पाण्यातच बहुदा दीर्घ पल्ला गाठायचा गुण असावा :) ;)

असो. इतकी चर्चा लांबली की थांग लागणे कठीण. मी या धाग्यावर थांबतोय!

अजो१२३ Thu, 15/01/2015 - 18:36

दिल्लीच्या यमुनेच्या पाण्यातच बहुदा दीर्घ पल्ला गाठायचा गुण असावा

दिल्लीचेच काय सगळेच पाणी लांब पल्ला गाठायचा गुण ठेऊन आहे. पृथ्वीतलावर ते नुसते गरागरा फिरत असते. आणि त्या पूर्वी म्हणे त्याने फक्त धूमकेतू ते पृथ्वी इतकाच प्रवास केला होता. धूमकेतूवरची नि पृथ्वीवरची पाण्यातली ड्यूटेरिअमची मात्रा मोजली गेली नव्हती तोपावतो ती टूम वाजवली गेली. आता हे खोटं ठरलंय आणि पाणी म्हणे फार फार प्रदीर्घ पल्ला काटून इथे आलंय. कुठल्या कुठून.
http://www.cnet.com/news/earths-water-older-than-the-sun-came-from-inte…

या लिंकवर पाण्याच्या पल्ल्याचे सुंदर चित्र आहे.

Nile Thu, 15/01/2015 - 20:16

कुठली गोष्ट कला म्हणून चालेल अन चालणार नाही या चर्चेला कितीसा अर्थ आहे? जेव्हा ब्रिगेडी लोकांच्या अस्मितेला धक्का लागतो तेव्हा कलाकार असो नाहीतर इतिहास अभ्यासक, "परका" असो (जेम्स लेन) नाहीतर आपला (भांडारकर संस्था) याने काही फरक पडत नाही. त्यांचा अस्मितेला धक्का लावणारा कसा "परका"च आहे हे दाखवणे त्यांना दरवेळी जमतेच. त्यामुळे परक्यांनी हे करू नये, ते करू नये म्हणणार्‍यांच्या पुढे अजिबात तुकडे टाकले जाऊ नयेत असे माझे मत आहे.

अस्वल Thu, 15/01/2015 - 22:55

In reply to by Nile

वरच्या चर्चेतून असं दिसतंय की "कुणी" केलं हे काय केलं ह्यापेक्षा महत्त्वाचं आहे (हुसेनी उदाहरण).एकदा ऐकून घ्यायचं नाहीच असं ठरवलं की कारणं शोधता येतातच. तेव्हा निळे ह्यांना अनुमोदन.

तिरशिंगराव Fri, 16/01/2015 - 10:02

पोप महाशयांनी आज दिलेल्या उदाहरणावरुन विचारतो की,

अभिव्यक्ति स्वातंत्र्य पाहिजेच, म्हणणार्‍या व्यक्तिंना त्यांच्या आई वरुन घाणेरडी शिवी दिली तर ते काय करतील?

एक थोबाडीत देतील?
मूग गिळून चालते होतील ?
की, बोलणार्‍या व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, असे मान्य करुन त्याच्याशी हस्तांदोलन करतील ?

मेघना भुस्कुटे Fri, 16/01/2015 - 10:06

In reply to by तिरशिंगराव

आपण प्रत्युत्तरादाखल उलटी शिवी देण्याचं स्वातंत्र्य नाही का आवडत तुम्हांला? थेट थोबाडीतच?

गवि Fri, 16/01/2015 - 11:59

In reply to by मेघना भुस्कुटे

कमाल आहे आणि रोचकही..

प्रत्युत्तरादाखल उलटी शिवी देण्याचं स्वातंत्र्य आणि कायद्याच्या चौकटीत राहून विरोध इ इ

हे दोन्ही पर्याय मान्य आहेत तुम्हाला.. पण कोणीही दुसर्‍याच्या आईला किंवा आईवरुन शिव्या देऊ नयेत हे म्हणणं मात्र स्वातंत्र्याचा संकोच करणारं आणि बोटचेपेपणाचं अथवा कातडीबचाऊ?

म्हणजे कोणीही आपल्या आईवरुन घालूदे शिव्या.. त्याला स्वातंत्र्य असावं हे मान्य आहे तुम्हाला.. त्याच्या प्रत्युत्तरादाखल उलट त्याच्या आईवरुन शिव्या घालणंही मंजूर.. किंवा कायदेशीर चौकटीत राहून विरोध.. (म्हणजे आपल्या आईवरुन शिवी दिलेल्या माणसावर नजीकच्या पोलीस स्टेशनात दखलपात्र अथवा अदखलपात्र अ‍ॅज अ‍ॅप्लिकेबल गुन्हा दाखल करणे [की अमुक अमुकने मला आईवरुन शिवी दिली] आणि त्याला कायदेशीर शिक्षा व्हावी म्हणून पुरावे आणि सिद्धतेचे बर्डन घेणे.. आणि शिक्षा होईल अशी आशा करणे.. याचा अर्थ काय? अरे म्हणजे यात शिक्षापात्र अर्थात गैर काहीतरी आहे हे तुम्हाला मान्य आहे म्हणूनच असा पर्याय समोर येतोय ना?

वरील दोन्ही पर्याय ओरडून हे सांगताहेत की "आईवरुन शिव्या दिल्यास समोरचा दुखावला जातो" याचं पूर्ण ज्ञान आपल्याला आगोदरच आहे.

मग मुळात कोणी आईवरुन कोणाला शिव्या देऊ नयेत (aka एखाद्या धर्माच्या श्रद्धास्थानांची नग्न चित्रे पब्लिकली काढू नयेत इ इ) याला कातडीबचाऊ किंवा नकोसं का म्हणावं?

सुनील Fri, 16/01/2015 - 12:15

In reply to by गवि

एखाद्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य असणे वेगळे आणि त्याची अभिव्यक्ती मान्य असणे वेगळे. मला हुसेनचा चित्र काढण्याचा अधिकार मान्य आहे याचा अर्थ त्याचे चित्र मला मान्य असेलच असे नाही.

कोणालाही आईवरून शिव्या घालू नयेत हे एक तत्व म्हणून मान्यच. पण जर कुणाला त्या घालायच्याच असतील तर तो घालूदेखिल शकतो. समोरच्याने त्याला झेपेल असा प्रतिवाद करावाच की! कुणी अडवलय?

मला वाटतं, फक्त जातीवाचक शिविगाळ हा गुन्हा आहे. आई-बहिणीवरून शिव्या नाही (चुभुद्याघ्या). तेव्हा प्रत्युत्तरादाखल तशाच शिव्या देणे (तसा पिंड आणि सवय असेल तर) चालून जावे. बहुदा तसेच होते.

तीच गोष्ट थोबाडण्याची. माझ्या मते, जोवर शरीरातून रक्त येत नाही वा एखादा अवयव तुटत नाही तोवर तो गुन्हा मनला जात नाही. मग ठेवा कानफटात. काही हरकत नाही.

मन Fri, 16/01/2015 - 12:23

In reply to by सुनील

शिविगाळ गुन्हा आहे हो कायद्याच्या भाषेत.
थोबाडित मारणे हा सुद्धा आहे.
जातीवरून शिव्या हा अजामीनपात्र गुन्हा आहे.
ब्नाकीच्या दोन केसेस जामीनपात्र असाव्यात.
बाकी चालु द्या.

सुनील Fri, 16/01/2015 - 12:31

In reply to by मन

(शिव्या न देता) आवाज चढवून बोलणे हा गुन्हा नसावा!

तसे असेल, तर निदान मी काय करीन हा प्रश्न मिटला!

अजो१२३ Fri, 16/01/2015 - 14:36

In reply to by सुनील

ऐसीवरचा सर्वात निरर्थक प्रतिसाद असावा.
-------
काय गुन्हा आहे नि काय नाही हे गौण मानू, पण तुम्हाला काय मान्य आणि काय नाही याचा काहीच हिशेब बसत नैययं.

मेघना भुस्कुटे Fri, 16/01/2015 - 12:31

In reply to by गवि

- त्यात भाषणस्वातंत्र्याचा संकोच होतो म्हणून.
- 'आईवरून शिव्या देऊ नयेत' हा संकेत आहे. त्याचा नियम होता नये, म्हणून.
- भाषण - मग ते शिवराळ का असेना - आणि थोबाडीत मारणे (ही कृती इथे प्रतीकात्मक. पण शारीरिक हल्ला अभिप्रेत) यांत एक मूलभूत फरक आहे, तो फरक करण्याची आपली क्षमता शाबूत राहावी, म्हणून.
- शारीरिक शिक्षा करण्याचा अधिकार न्यायव्यवस्थेकडून एका व्यक्तीच्या हाती येण्याचा घातक पायंडा पडू नये, म्हणून.
- जर व्यक्तीचं भौतिक नुकसान झालं असेल (इथे आईवरून शिवी देण्यामुळे), तर त्याबद्दल दाद मागण्याची एक व्यवस्था आपल्या समाजात अस्तित्वात आहे, म्हणून.

गवि Fri, 16/01/2015 - 12:40

In reply to by मेघना भुस्कुटे

- 'आईवरून शिव्या देऊ नयेत' हा संकेत आहे. त्याचा नियम होता नये, म्हणून.

उत्कृष्ट मांडणी. तातडीने अ‍ॅग्रीड.. जियो मेघनाताई..!!

कोणते संकेत नियम बनावेत हा वेगळा विषय आहे. पण इथे सहमती होणेबल आहे. आईवरुन शिवी हा एकंदरीत प्रकार लिखाणात वगैरे वापरणे म्हणजे स्वातंत्र्य आणि तो एका कोण्याही व्यक्ती अथवा समूहाला फोकस्ड टारगेट करुन डागणे हे दुरित.

हे मान्य..

त्याला स्वातंत्र्य, नियम, कायदा, संकेत या कशात बसवावे हा वेगळा मुद्दा.

अजो१२३ Fri, 16/01/2015 - 14:46

In reply to by मेघना भुस्कुटे

- 'आईवरून शिव्या देऊ नयेत' हा संकेत आहे. त्याचा नियम होता नये, म्हणून.

उगाच कैतरी. हा संकेत नाही, हा नियम आहे. तुम्ही नियम नीट पाळत नाही म्हणून त्याचा संकेत होतो का? रस्त्यावर पान पिचकू नये हा नियम आहे. आपले सगळेच रस्ते रंगीन असतात म्हणून तो संकेत होतो का?

नियमाला संदर्भ आणि गृहितके असतात. जिथे संदर्भ आणि गृहितके बसत नाहीत तिथे नियम लावता येत नाही. पण म्हणून नियम नाही असे कसे म्हणता येईल? म्हणून संकेत हा नियमाचा उपप्रकार आहे. संकेत नाही पाळले तर काय करावे, काय शिक्षा द्यावी याचे नियम वा संकेत असतात. तसा संकेत शब्दाचा अर्थ नियम पाळायची सौम्याज्ञा असाही होऊ शकतो.

सुनील Fri, 16/01/2015 - 15:23

In reply to by बॅटमॅन

हेच म्हणतो.

आईवरून शिव्या घालू नयेत हा नियम नाही. म्हणजेच त्यावर बंदी नाही. म्हणजेच कोणीही तशा शिव्या घालू शकतो. म्हणजेच तेवढे स्वातंत्र्य त्याला/तिला आहे.

हेच तर मी पहिल्यापासून सांगतोय.

शिव्यांना प्रतिक्रिया कशी द्यायची ते ती व्यक्ती, तिचा पिंड्/स्वभाव, त्यावळची मनस्थिती, सभोवतालची परिस्थिती, तापमान, आर्द्रता, वार्‍याचा वेग आणि दिशा इत्यादि इत्यादि वर अवलंबून आहे!

बॅटमॅन Fri, 16/01/2015 - 15:27

In reply to by सुनील

होय.

सध्या तरी असा कायदा नाही. जातीवाचक शिव्यांबद्दल मात्र कायदा असल्याने तो नियम आहे.

खरेतर आईवरची शिवी ही जातीवाचक शिव्यांपेक्षा जास्ती पर्सनल आहे, परंतु त्याकरिता नियम नाही.

अजो१२३ Fri, 16/01/2015 - 15:55

In reply to by बॅटमॅन

भौतिकशास्त्राचे नियम, कायद्याचे नियम, आणि समाजाचे नियम या भिन्न भिन्न संकल्पना आहेत.
-------------------
भौतिकशास्त्राचे नियम (ते मूळ विज्ञान, fundamental science आहे तेव्हा) हे पाळले जातातच. ते पाळण्या - न पाळण्याचा प्रश्नच येत नाही. ते असतात आणि स्वतःहून स्वतःला पाळून घेतात.
--------------
नियम म्हणजे फक्त कायद्याचे नियम नव्हे. वर कायद्याचे नियम हे लिखितच असतात असे नव्हे. लिखित नियमाची शेड जितकी पडते ते, त्याचे एक विशिष्ट अप्प्लिकेशन हे देखिल पुन्हा नियमच असतात.
-------------
आईने बाळाला दूध पाजवले पाहिजे हा समाजाचा नियम आहे. समजा कोणी पाजवले नाही आणि मूल मेले तर कायदा शिक्षा करत नाही, करू शकत नाही, तितकी मॉनिटरींग आणि कंट्रोल करू शकत नाही. दूध पाजायचं एक लीगल फ्रेमवर्क कंपल्सरी करू शकत नाही. पण कायद्याबाहेरही या कृतीला संबंधित समाज (नेहमी बदनामी करून, अवमान करून , इ इ) शिक्षा करू शकतो. हा नियम नाही कसा?
हा जसा नियम आहे तसेच वेळेवर कामाला जावे, स्वच्छ राहावे, इ इ बहुसंख्य समाजाचे नियम आहेत. हे न पाळल्याच्या शिक्षा समाज देत असतो. हे संकेत नाहीत.
---------------------
कोणता सामाजिक नियम हा कायदेशीर नियमाचे स्वरुप कधी घेईल याचा काही भरोसा नाही. रस्त्याच्या कडेने नीट चालावे हा नियम आहे. यात रस्ता, कडा आणि नीट चा अर्थ सांगता येत नाही म्हणून यासाठी कायदेशीर नियमाचं लीगल प्यूनिटिव फ्रेम्वर्क नाही. पण उद्या तुम्ही चार यार आम्हाला संचारस्वातंत्र्य (कायदेशीरपणे) आहे शिवाय चौकात चटई घालून दारू पिऊ नये किंवा हातात हात घालून आरामात चालत १०-२० लोकांनी हायवे ब्लॉक करू नये असा नियम नाही म्हणून तसे केलेत तर ट्रॅफिक पोलिस सामाजिक नियमांना कायदेशीर नियम मानून तुम्हाला हटवतील.
-----------------
नियम हा एक स्पेक्ट्रम आहे. काही नियम फारच सैल आहेत. पण भारतात आईवरून शिव्या न घालण्याचा* अधिकृत नियम आहे, सामाजिक नियम आहे.

*इथे आईवरून शिव्या घालणे यात जिव्हाळा व्यक्त करण्यासाठी इ इ केलेले उद्गार येतात कि नाही हे व्यक्तिगत आहे. त्यांचे नियम वेगळे.

अजो१२३ Fri, 16/01/2015 - 16:08

In reply to by मेघना भुस्कुटे

ही कोणती नवी शिवी?
---------------------
जनरली माझे प्रतिसाद हे तुम्हाला अधिभौतिक आणि अध्यात्मिक असे दोन्ही ताप देतात असं मत तुम्ही मांडत आला आहात. तुम्हाला माझे व्याकरण आणि शब्दांची माताभगिनी पाहून अधिभौतिक ताप होतो आणि प्रतिसादातले मत वाचून अध्यात्मिक ताप होतो हे आतापावेतो सर्व ऐसीकरांना माहित झालेले आहे.

बॅटमॅन Fri, 16/01/2015 - 16:18

In reply to by अजो१२३

अध्यात्मिक ताप होतो

आ चा अ करू नका हो, आरुणजोशी!

तदुपरि मेघनातै या आस्तिक इ. आहेत की नै याची खातरजमा करा अगोदर. नायतर नास्तिक असूनही आध्यात्मिक ताप कसा इ.इ. फैर झडायची.

बॅटमॅन Fri, 16/01/2015 - 16:16

In reply to by अजो१२३

नियम हा एक स्पेक्ट्रम आहे. काही नियम फारच सैल आहेत. पण भारतात आईवरून शिव्या न घालण्याचा* अधिकृत नियम आहे, सामाजिक नियम आहे.

स्पेक्ट्रम आहे या मताशी सहमत. तदुपरि 'अधिकृत' म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे? नोटेवर 'मैं भारत का राष्ट्रपती अमुक अमुक रुपये देने का वचन देता हूँ' असे लिहिलेले असते ते अधिकृत त्यातलं की अजून कसं?

सुनील Fri, 16/01/2015 - 10:06

In reply to by तिरशिंगराव

'अ' ला अभिव्य्क्ती स्वांतंत्र्य आहे याचा अर्थ, 'ब' ला (कायद्याच्या चौकटीत राहून) प्रतिक्रिया द्यायला बंदी आहे, असा होत नसतो!

अजो१२३ Fri, 16/01/2015 - 14:31

In reply to by तिरशिंगराव

तिरशिंगरावजी*
प्रतिकिया एकदम आवडली आहे.

कोणत्याही कृती मधे ऑफेन्स आहे कि नाही, आहे तर किती आहे आणि त्यावर रिअ‍ॅक्शन काय असावी आणि ती किती तीव्रतेची असावी हे ठरवायला अनेक फॅक्टर कारणीभूत ठरतात. दोहोंचा मूड, वातावरण, इतिहास, मानापमान, आजूबाजूला कोण आहे, इगो किती आहे, तत्त्वज्ञान किती गाढं आहे, कृती काय आहे, कोणी केली आहे, कूठे, केव्हा केली आहे, इ इ.

अतिशय नीट झूम इन करून पाहिलं तर स्वातंत्र्य आणि नातं (freedom and relationship) हे टेक्निकली विरोधार्थी शब्द आहेत. One is either free or related. पण आपण कसे ना कसे रिलेटेड आहोत. म्हणजे आपण अ‍ॅबसॉल्यूट लेवलवर तरी फ्री नाहीत. आपण स्वतंत्रच नाही आहोत पण एका मर्यादेपर्यंतच्या नात्याला शून्य मानतो. प्रत्येकाची ही थ्रेशॉल्ड वेगळी आहे. भांडण टाळणे हा हेतू असेल तर समोरच्याची जी सर्वात कडक, छोटी, पाळायला अवघड थ्रेशॉल्ड आहे तिचा सन्मान केला पाहिजे.

अभिव्यक्तिस्वातंत्र्यवादी लोक हे आपल्या कृतींचं सर्कल विश्वव्यापी बनवू पाहतात. आपला स्वानंद लोकांसाठी ताप आहे का हे ठरवण्यासाठी ते आपलं लॉजिक पुढे करतात. इतराच्या भावनांचं रिजनिंग करतात. भावनांबद्दलचं रिजनिंग फार काळ टिकू शकत नाही. कोणाच्याही भावनांचे बरेच दोर इरॅ‍एशनल असतात. सामान्य माणूस कोणत्याही गोष्टी देवकणापर्यंत किस पाडत नाही. खूप सुपरफिशियल ठोकताळ्यांनी ते आपल्या भावना ठरवतात. मग हे भावनिक आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्यवादी यांची जुंपते. एकाची अभिव्यक्ति ही दुसर्‍यासाठी गुन्हा वा ऑफेंस असू शकतो. ज्या भावनिक माणसाला आपल्या भावना आहत झाल्या आहेत तो अभिव्यक्ति करणारास त्याची भावना आहत होईल असे काय काय आहे ते करू लागतो.

हिंदू धर्म महान आहे, त्यात नग्नतेत पावित्र्य पाहिले जाते, अनेक ऋषिंनी इ ते केलेही आहे, हुसेन हिंदू धर्माचे प्रचंड फॅन आहेत, आपल्याच धर्माचे लोक असहिष्णू आहेत म्हणून जीव वाचवायला आपली कला इस्लामपासून दूर ठेवलेली बरी असे ते मानतात, शिवाय चित्रकला ही एक अगम्य कला आहे पासून हुसेन एक हरामखोर मुसलमान आहेत नि हिंदू धर्माच्या देवींची नागडी चित्रे काढून ते आजच्या समस्त हिंदूचा मुद्दाम, वारंवार अवमान करत आहेत यांपैकी कोणतीही विचारसरणी कोणाचीही असणे साहजिक आहे.

आता व्यवहारिक पातळीवर आपण नक्की किती मंगल विचार करत आहोत याचा आत्मविश्वास हुसेन वा त्यांचे समर्थक दुखावल्या गेलेल्या समाजाला देऊ शकत नसले, मग वास्तव किती का चांगले असेना, तर त्यांनी तसला उद्यम बंद केला पाहिजे. शेवटी प्रत्येकाला उच्च प्रतलावर नेण्याचा असंभव प्रयत्न करण्याऐवजी व्यवहार्य प्रतलावर येणे नि ते प्रतल हळूहळू (जर्क्सनी नव्हे) वर नेणे हे इष्ट.

-----------------------
फ्रान्सच्या लोकांनी एक मोठी चूक केली आहे. मी चार्ली आहे, मी चार्लि आहे म्हणत त्यांनी मी पैगंबराची अजून टवाळी करणार, तो माझा हक्क आहे, असा एक अप्रत्यक्ष संदेश दिला आहे. हे मिसकम्यूनिकेशन आहे. चार्लि हो अकबर इ इ पोस्टर्स योग्य नसावेत. हत्यांचा निषेध "इतकाच" आमचा अजेंडा आहे, पैगंबरांची चेष्टा आम्हाला मान्य नाही असं स्पष्ट रॅलितल्या लोकांना जाणवून देता आलं नाही. पोपनी मात्र एक्झॅक्ट संदेश दिला आहे. ते कौतुकास पात्र आहेत.

------------------------------
*(या नावाचा अर्थ काय असावा बरे)