(टिंगल-औक्षण करून...)
कोळी माशी पकडायला जाळं विणतो. आणि वाट बघत बसतो. बराच काळ त्या जाळ्यावर काही हालचाल झाली नाही की कंटाळतो, पेंगतो आणि जांभया देतो. अचानक कधीतरी त्याला खडबडून जाग येते, कारण त्या जाळ्यावर थरथर जाणवते. सावज जाळ्याला चिकटलं आहे हे लक्षात येतं. कवितांचं विडंबन करणाऱ्यांची स्थितीही काहीशी अशीच कोळ्यासारखी असते.... या विडंबनासाठीची माशी. (प्राजुताईंनी हलकेच घ्यावे ही विनंती)
रंगित पहिले कडवे घेउन
कविता अवतरली..
अलगद नाजुक, जालावरती
चाहुल थरथरली..
जागे झाले आय्डी, पाहुन
माशी जणु कोळी
चोळत डोळे देत जांभई
आले अन् जाली
डोळ्यांवरती स्क्रीन टाकतो
तिरीप तेजस्वी
कळफलकावर बोटांनाही
गवसेना ए बी
मिचमिच झाली नेत्रांमधुनी
तया पहाताना
कविता वाचू नंतर, आधी
हवा चहा ताजा
कवितेमध्ये शिंपण झाले
वृत्त गोंधळांचे
अधिक-कमी अन् डोस जाहले
कितीक मात्रांचे
कंटाळ्याची संपुन जाई
मुजोर बळजोरी
हाफ व्हॉलि फुलटॉस मिळाले
विडंबना भारी
नवीन कविता, विडंबनांनी
भरु दे ही 'जाळी'
टिंगल-औक्षण करून खुद्कन्
हसुदे दिपवाळी..
- राजु
हाहाहा
हाहाहा ..... प्राजु आणि राजु यमकाने तर बहारच आणली.