Skip to main content

ताप नको देवू माझ्या डोक्याला

ताप नको देवू माझ्या डोक्याला

ताप नको देवू माझ्या डोक्याला
काय करायचं ते जा कर तूला

आधीच मी रात्रपाळी करतो
घाम गाळून मी थकून जातो
दिवसातरी लागूदे डोळा डोळ्याला
ताप नको देवू माझ्या डोक्याला

कधी तू सांगते आणा तुम्ही भाजी
निट बघून आणा ताजी ताजी
गोड हसून फसवी भाजीवाली मला
ताप नको देवू माझ्या डोक्याला

घरात करतात फार गलका पोरं
खायला उठतं मग घर सारं
जरा पाठव त्यांना आता शाळेला
ताप नको देवू माझ्या डोक्याला

ह्या हप्त्यामधे झाला नाही पगार
किराणा आण सारा तू उधार
पैसे नंतर देईन जा सांग वाण्याला
ताप नको देवू माझ्या डोक्याला

महागाईने फार कमाल केली
गरीबाची भाकरी पळवीली
काय म्हणावे पाषाणाच्या नशिबाला
ताप नको देवू माझ्या डोक्याला

काम करून कावला जीव
तुला जरा तरी येवू दे कीव
संधी साधून जवळ ये दिवसाला
ताप नको देवू माझ्या डोक्याला

- आळशी पाभे

राजेश घासकडवी Mon, 05/03/2012 - 09:36

शीर्षक वाचून 'हात नका लावू माझ्या साडीला' चं विडंबन आहे की काय अशी शंका आली. मध्यमवर्गीयाच्या समस्या मांडणारी कविता आहे हे वाचल्यावर लक्षात आलं. शेवटच्या कडव्यावरून आणि सहीवरूनदेखील या कवितेकडे थोडं विनोदी अंगाने बघावं असं वाटलं. एकाच वेळी करुण आणि विनोदी करण्याचा प्रयत्न जाणवला. कवितेत वृत्तावर अधिक लक्ष द्यावे ही विनंती.