Skip to main content

तवंग

माझाच चंद्र
सतत हरवतो
तुझ्या आभाळी
.
.
कोसळणारे
गढूळ धबधबे
कडेकपारी
.
.
झडणारा मी
वसंत टपटप
अश्रूंमधला
.
.
ओळी कातर
उल्लेख पानभर
व्याकुळ शाई
.
.
बंद पापण्या
तवंग मणभर
साचवलेले
.
.
हिरव्याकंच
जखमांचे वैभव
मन शेवाळी

धनंजय Wed, 15/10/2014 - 04:59

मिताक्षरी आवडली.

नितिन थत्ते Wed, 15/10/2014 - 07:21

आवडली.

खरं म्हणजे काहीही कळलं नाही. :(