Skip to main content

समानता?

या विषयावरील चर्चा बहुवाचित असेलच असे गृहीत धरून नमनाला हे वाक्यभर तेल वाहून माझ्या भूमिकेच्या मांडणीस सुरुवात करते.

माझ्या दृष्टीने एकाच गटाला घेऊन एकत्रितपणे काही करायचे असल्यास, ते करण्यासाठी गटातील सर्व व्यक्ती सक्षम असतील याची खात्री करावी आणि ते तसे नसल्यास, सर्वांच्या क्षमतेत बसणार्‍या गोष्टीच फक्त कराव्यात हेच योग्य आहे.

एक वेगळे उदाहरण देऊन माझी तात्त्विक भूमिका अधिक स्पष्ट करते.

मी सध्या एका ठिकाणी शिकवते. माझा विषय असा आहे, की विद्यार्थ्यांनी जर व्याख्यानाव्यतिरिक्तच्या काळात आंतरजालावर फुकट उपलब्ध असलेल्या काही ध्वनिचित्रफिती पाहिल्या, तर व्याख्यानादरम्यान काही संकल्पना शिकवण्यात कमी वेळ घालवावा लागेल आणि उरलेला वेळ ज्यासाठी इतरत्र कुठेही मदत उपलब्ध होत नाही अशा काही गोष्टी व्याख्यानादरम्यान करायला नेहमीपेक्षा जास्त वेळ मिळेल आणि याचा फायदा सर्वच विद्यार्थ्यांना होईल. इथे एका गोष्टीची नोंद घेतली पाहिजे. ज्या गोष्टीसाठी अधिक वेळ उपलब्ध व्हावा असे म्हटले आहे, ती गोष्ट मी आधीही करून घेत होते, आणि नियमांनुसार आवश्यक तितक्या प्रमाणात करून घेत होते. नियमांनुसार आवश्यक असलेल्या गोष्टींहून अधिक करता यावे हा विचार इथे आहे.

त्यामुळे सध्या प्रगत देशांमध्ये मूळ धरत असलेली 'फ्लिप्ड क्लासरूम' ही कल्पना राबवण्याचा विचार माझ्या मनात होता. 'फ्लिप्ड क्लासरूम' म्हणजे व्याख्यानाच्या ध्वनिचित्रफिती करून त्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून घेणे, जेणेकरून विद्यार्थी ही व्याख्याने आपल्या घरी, आपल्या सोयीनुसार, आपल्याला हवे तितक्या वेळा ऐकतील. आणि गृहपाठ मात्र वर्गात सर्वांसोबत करायचा, जेणेकरून तो करताना येणार्‍या अडचणी, पडणारे प्रश्न या सर्वांचा निकाल तिथल्या तिथे लागेल.

परंतु, ही कल्पना राबवायची झाल्यास, प्रत्येक विद्यार्थ्याला पुढील गोष्टींची जुळवाजुळव करावी लागेल : संगणक, चांगल्या प्रतीचे आंतरजाल. हे आपल्यासारख्या विकसनशील देशात सर्वांनाच शक्य होईल असे वाटत नाही. आणि मुख्य म्हणजे, येथे प्रश्न ध्वनिचित्रफीत पाहून अभ्यास करायला आवडते की नाही असा आवडी-निवडीचा प्रश्न नाहीये. तर, संगणक, चांगल्या प्रतीचे आंतरजाल या गोष्टी उपलब्ध आहेत का आणि त्या उपलब्ध करून घेण्याइतकी क्रयशक्ती आहे का असा प्रश्न आहे.

त्यामुळे मी माझ्या विद्यार्थ्यांसमोर ही कल्पना मांडली आणि विचारले, किती जणांना या गोष्टींची जुळवाजुळव करणे जमणार आणि परवडणार आहे? बर्‍याच लोकांना जमते आहे आणि मला नाही म्हणून लाज वाटून तसे सांगायचे नाही असे करू नका. एखाद्या व्यक्तीकडे केवळ क्रयशक्ती नाही, म्हणून ती काही गोष्टींपासून वंचित रहावी असे मला वाटत नाही (विशेषतः तिने इतरांइतकेच शुल्क भरलेले असताना).

सुदैवाने सर्वांनाच हे जमण्यासारखे/परवडण्यासारखे असल्याने मला 'फ्लिप्ड क्लासरूम' ही कल्पना राबवता येणार आहे. पण मला हे महत्त्वाचे वाटते, की अशी एक जरी व्यक्ती असती, जिला हे जमण्यासारखे/परवडण्यासारखे नाही, तर मी ही कल्पना मुळीच राबवली नसती. तसे झाले असते, तर माझ्यापुढे दोन पर्याय होते- १. अधिकच्या गोष्टी करण्याचे ध्येय डोळ्यांसमोर न ठेवणे. २. अधिकच्या गोष्टी करून देण्यासाठी अधिक वेळ वर्ग चालवणे किंवा अधिकच्या गोष्टी प्रत्येकाला मिळतील (अधिक काळ वर्गात राहून किंवा ध्वनिचित्रफीत पाहून) अशी व्यवस्था करणे.

या उदाहरणाच्या संदर्भात माझ्या

एकाच गटाला घेऊन एकत्रितपणे काही करायचे असल्यास, ते करण्यासाठी गटातील सर्व व्यक्ती सक्षम असतील याची खात्री करावी आणि ते तसे नसल्यास, सर्वांच्या क्षमतेत बसणार्‍या गोष्टीच फक्त कराव्यात हेच योग्य आहे.

या विधानाचा विचार केल्यावर आपले याविषयीचे मत जाणून घ्यायला मला आवडेल.

अजो१२३ Wed, 01/10/2014 - 14:20

In reply to by गवि

एकदम नेमके.
--------------------
अवांतरः
जालावर सोशल क्लास मॅटर करत नाही. तेच लोक प्रत्यक्ष आयुष्यात जुडले तर काँट्रास्ट भारी दिसेल. कोणत्या सोशल क्लासचं अधिक्य आहे त्यांच्याप्रमाने निर्णय होणार. सीमेवरची एखाद दुसरी गृहितकं सांगीतली जाणार. बाकीचं गृहित धरलं जातं.
-------------------

गवि Wed, 01/10/2014 - 13:54

कोणत्याही प्रतिसादाला उपप्रतिसाद न देता काही मुद्दे, जे एरवी मांडले नसते, पण बात यहांतक आ चुकी है तो, म्हणून मांडतो. यात स्पेसिफिक आणि व्यक्तीसंबंधित उल्लेख अपरिहार्य आहेत, पण चर्चा काँक्रीट कन्क्लुजिव्ह होण्यासाठी ते टाळता येत नाहीत.

धागाकर्तीच्या मूळ भूमिकेत एक ढोबळ संदिग्धता आहे. क्रयशक्ती नाही किंवा अमुक इतकी रक्कम परवडत नाही असे म्हणतानाच एका ठिकाणी तितकीच रक्कम अत्यंत वेगळे किंवा उत्कृष्ट अन्न मिळाल्यास खर्च करण्यास हरकत नसल्याचे (आणि पॉप टेट्सचे पदार्थ तसे जगावेगळे नसल्याचे [ न निघाल्याचे टु बी प्रिसाईज ]) देखील त्यांनी म्हटले आहे. म्हणजे कोणते ठिकाण ऊर्फ पदार्थ हे वर्थ ५०० रुपये असावेत अथवा नसावेत याबाबत चर्चाप्रस्ताविकेचे एक विशिष्ट मत आहे आणि ते पदार्थसापेक्ष आहे. किंमतसापेक्ष नाही.

आता वरील मुद्दा पुढे चालवल्यास मग ५०० रुपयांच्या किंमतीत जगावेगळा किंवा हटके उत्तम किंवा दुर्मिळ पदार्थ मिळाल्यास तो ५०० रुपये टाकूनही खरेदी करण्याची तयारी (रीड क्षमता) आहे.

परंतु सर्वांची सोबत, सर्वांच्या गप्पा, इतर बहुसंख्यांना मान्य असलेला आणि आवडणारा अ‍ॅम्बियन्स, त्या सर्वांशी होणारी दुर्मिळ भेट आणि इंटरअ‍ॅक्शन या सर्व गोष्टींना मात्र धागाकर्ती जगावेगळे / हटके / दुर्मिळ लाभ मानायला तयार नाही आणि ५०० रुपये किंमतीत इन्क्लूड करायला तयार नाही.

याचा अर्थ रेनडियरचे आफ्रिकेतल्या गरम पाण्याच्या कुंडात उकडलेले मांस वापरुन केलेला कबाब असा हटके पदार्थ (निव्वळ उदाहरण) ५०० रुपये किंमतीला वर्थ आहे, पण एक सामान्य चवीचे चिकन मांचुरियन आणि एक तुकडा हरा भरा कबाब (अतिसामान्य चवीचा) प्लस दोस्तांची कंपनी अन गप्पांचा माहोल, अन धुंद वातावरण, मंद संगीत, डासविरहीत थंडावायुक्त जागा या सर्व व्हॅल्यू अ‍ॅडिशन्सचे मात्र क्रयशक्तीला कोणतेच आकर्षण नाही.

यापूर्वी चर्चाप्रस्ताविकेने रेकमेंड केलेल्या अनेक हटके ठिकाणांपैकी (चीजकेक्स, बेकर्‍या, नॉनव्हेज खाण्याची ठिकाणे) निम्म्या जागा खरोखर इकॉनॉमिक असल्या तरी एकत्रित मिळून किंवा त्यातल्या किमान निम्म्या जागा तरी पर हेड भरपूर बजेटवाल्या होत्या. याचाच अर्थ हटके पदार्थ देणार्‍या उत्तम चवीच्या ठिकाणांना जास्त रुपये देणे हे लेखिकेला वर्थ (रास्त, सार्थ, फीजिबल) वाटते (मलाही) ,... पण मित्रांची सोबत आणि त्या सोबतीसहित त्या सर्वांना उत्तम वाटेल असा माहोल या गोष्टींची रास्तता मात्र चर्चाप्रस्ताविकेला विचारातही न घेण्याइतकी शून्यवत वाटते हे खेदजनक आहे.

राधिका Wed, 01/10/2014 - 14:00

In reply to by गवि

धागाकर्तीच्या मूळ भूमिकेत एक ढोबळ संदिग्धता आहे. क्रयशक्ती नाही किंवा अमुक इतकी रक्कम परवडत नाही असे म्हणतानाच एका ठिकाणी तितकीच रक्कम अत्यंत वेगळे किंवा उत्कृष्ट अन्न मिळाल्यास खर्च करण्यास हरकत नसल्याचे (आणि पॉप टेट्सचे पदार्थ तसे जगावेगळे नसल्याचे [ न निघाल्याचे टु बी प्रिसाईज ]) देखील त्यांनी म्हटले आहे. म्हणजे कोणते ठिकाण ऊर्फ पदार्थ हे वर्थ ५०० रुपये असावेत अथवा नसावेत याबाबत चर्चाप्रस्ताविकेचे एक विशिष्ट मत आहे आणि ते पदार्थसापेक्ष आहे. किंमतसापेक्ष नाही.

होय, कारण माझे बाहेरचे अन्नपदार्थ खाण्याचे एक बजेट असते. आणि ते कुठे खर्च करायचे यात मी अन्नपदार्थ किती वेगळा, चांगला आहे यावरून ठरवते. तसे पदार्थ असते, तर त्या कट्ट्याचा खर्च त्या बजेटमधून मी केला असता. तसे नव्हते.

परंतु सर्वांची सोबत, सर्वांच्या गप्पा, इतर बहुसंख्यांना मान्य असलेला आणि आवडणारा अ‍ॅम्बियन्स, त्या सर्वांशी होणारी दुर्मिळ भेट आणि इंटरअ‍ॅक्शन या सर्व गोष्टींना मात्र धागाकर्ती जगावेगळे / हटके / दुर्मिळ लाभ मानायला तयार नाही आणि ५०० रुपये किंमतीत इन्क्लूड करायला तयार नाही.

कारन ती दुर्मिळ नाहीचे मुळी. हेच सर्व तुम्हाला शिवाजी पार्कात मिळाले असते. आणि हा पर्याय मी सुचवलेला होता.

अजो१२३ Wed, 01/10/2014 - 14:12

In reply to by अजो१२३

आपल्या प्राधान्यांचा मला (तरी) आदर आहे मंजे मला आदर नाहीच असे नाही. आपले व्यक्तिगत मत म्हणून. पण गवि काय म्हणताहेत ते अधिक संवेदनशीन, सुयोग्य, इ इ आहे. त्याबद्दल जास्त आदर आहे.

मी Wed, 01/10/2014 - 14:04

In reply to by राधिका

होय, कारण माझे बाहेरचे अन्नपदार्थ खाण्याचे एक बजेट असते. आणि ते कुठे खर्च करायचे यात मी अन्नपदार्थ किती वेगळा, चांगला आहे यावरून ठरवते. तसे पदार्थ असते, तर त्या कट्ट्याचा खर्च त्या बजेटमधून मी केला असता. तसे नव्हते.

म्हणजे एकप्रकारे मुद्दा क्षमतेचा नसुन तत्त्वाचाच/खर्चाच्या स्वातंत्र्याचा आहे. :)

राधिका Wed, 01/10/2014 - 14:19

In reply to by मी

खरे म्हणजे मे हा मुद्दा लिहिणे चूकच होते. प्रत्यक्षात त्या काळात माझे बाहेरच्या खाण्याचे बजेटही बाजूला ठेवणे मला परवडले नव्हते.

गवि Wed, 01/10/2014 - 14:22

In reply to by मी

हेच म्हणतो. एकीकडे अपरिहार्य मर्यादा (क्रयशक्तीची अर्थात एक खर्चाच्या आकड्याची) मांडली आहे आणि त्याचवेळी पदार्थाच्या वेगळेपणानुसार / चवीनुसार / दुर्मिळतेनुसार (सर्व सापेक्ष, सब्जेक्टिव्ह) जास्त रुपये मोजण्याची तयारी. अर्थातच फ्लेक्झिबिलिटी मान्य आहे असं दिसतंय. पण ३५० किंवा ५०० रुपये लागण्याचे एस्टिमेट असलेल्या ठिकाणी असे पदार्थ नसतीलच किंवा ती जागा वर्थ ५०० नाहीच असे मत आधीच व्यक्त करणे किंवा पॉप टेट्सच्या बाबतीत उदाहरण घ्यायचे तर तिथले पदार्थ वर्थ ३५० नव्हते हे खाऊन मग समजले असताना ते आधीच कसे ठरवायचे?

वुई हॅव टू टेक अ चान्स. कदाचित रणजित किंवा मुळशीच्या हॉटेलात अ‍ॅम्बियन्स + चव मिळून तुम्हाला २५० रुपयांत वर्थ १००० चा परतावाही मिळू शकेल. तुम्ही थेट शून्य अथवा फुकट पर्यायाशीच तुलना का करता आहात?

ज्यांना शक्य नाही त्यांचा विचारच केला गेला नाही किंवा ऑप्शन्स ठेवले गेले नाहीत म्हणण्यापूर्वी अनेकदा विचार करावा की जवळजवळ प्रत्येक कट्ट्याला शॉर्टफॉल येतो आणि फायनली बिल भरणारे एकदोन लोक आपल्या खिशातून तो वाच्यताही न करता भरतात.

यापूर्वी मी स्वतः पूर्ण कट्ट्याचे बिलही दिले आहे (शक्य होते म्हणूनच अर्थात).. पण अशी ऑफर आधीच करणे प्रशस्त नव्हते, ऐनवेळी तसे केले.

यावेळी तसे करण्याचा किंवा कट्ट्याला येण्याचा बेत नाहीये असे आधी सांगतो. पण त्याचसोबत मी आलो आणि वेळ पडली तर पूर्ण कट्ट्याचे बिलही भरायला तयार आहे हेही सांगतो.

अरे यार.. कट्टा आहे .. मजा करा लेको.

अपरिमेय Wed, 01/10/2014 - 14:13

In reply to by राधिका

>>होय, कारण माझे बाहेरचे अन्नपदार्थ खाण्याचे एक बजेट असते. आणि ते कुठे खर्च करायचे यात मी अन्नपदार्थ किती वेगळा, चांगला आहे यावरून ठरवते. तसे पदार्थ असते, तर त्या कट्ट्याचा खर्च त्या बजेटमधून मी केला असता. तसे नव्हते.
हा आडमुठेपणा आहे. जर तुम्ही एकट्या कुठे बाहेर जेवायला गेलात आणि हा निकष वापरलात तर ते योग्य आहे पण जर बहुसंख्यांना जर पॉप टेट्स चा अ‍ॅम्बियन्स हा शिवाजी पार्कच्या अ‍ॅम्बियन्सपेक्षा कैकपटीने आवडणारा असेल तर तुम्ही तुमचे निकष एका दिवसापुरते सैल केले तर काय बिघडणार होते? तसेही वर्षात १-२ वेळाच तर असा मोठा कट्टा होतो.

बॅटमॅन Wed, 01/10/2014 - 14:26

ऐसीवर कुठल्याही मुद्याचा कसा पायजे तसा कीस पाडता येऊ शकतो याचे हे एक रोचक उदा. म्हणून सांगावयास हरकत नाही.

"आमचे येथे तत्त्वकृपेकरून कुठल्याही मुद्याचा पायजे तस्सा आडवा तिडवा कीस पाडून मिळेल." असा बोर्ड तेवढा लावायचा बाकी आहे.

सविता Wed, 01/10/2014 - 14:54

In reply to by बॅटमॅन

मालक, "ऐसी" काढून आंतरजार म्हणा!

माबोवर यापेक्षा कीसपाडू चर्चा वाचल्या आहेत.शेवटी पर्यवसान वैयक्ताक शेरे, धागा,प्रतिसाद उडवणे, बॅन करणे अशी होते.

आणि सर्वात जास्त प्रतिसाद पाडणार्या चिंभारा बॅटूने असे म्हणावे हे अजूनच रोचक, उद्बोधक वैगैरे आहे

राधिका Wed, 01/10/2014 - 14:29

ठीक आहे.

थोडक्यात, हे कट्टे पैसेवाल्यांचे असून, त्यांच्या सोयी गैरसोयी महत्त्वाच्या ही नवी भर माझ्या ज्ञानात पडली.

आणि याचा मला खेद वाटला.

मेघना भुस्कुटे Wed, 01/10/2014 - 14:33

In reply to by राधिका

नाही. तुझा समज साफ चुकीचा आहे.

हे कट्टे अनेक लोकांनी मिळून ठरवलेले असून त्यातल्या बहुसंख्यांच्या सोयी महत्त्वाच्या ठरतात. त्यातही अल्पसंख्यांवर अन्याय होऊ नये, म्हणून त्यांना मदत करायला अनेक लोक तयार असतात.

अजो१२३ Wed, 01/10/2014 - 14:40

In reply to by राधिका

असं अजिबात नाही.
----------------------
कट्ट्यापेक्षा सोयी पाहणारे कधीही सोयी न पाहणारांपेक्षा वाईटच.
------------------

चिंतातुर जंतू Wed, 01/10/2014 - 14:30

जेव्हा माणसांचा एक पुरेसा मोठा गट काही कारणानं एकत्र येतो तेव्हा अनेकदा त्यात वैविध्य असतं. हे वैविध्य अनेक प्रकारचं असतं. उदा. मूळ धाग्यात आणि काही प्रतिसादांत आलेले हे मुद्दे माणसांमधल्या वैविध्याचे प्रातिनिधिक आहेत.

  • शारीरिक, बौद्धिक वगैरे क्षमता
  • क्रयशक्ती
  • आवडनिवड, वगैरे

आता मी ह्याला वैविध्य म्हणतो आहे, विषमता (किंवा समानतेचा अभाव) नाही ह्याकडे मी लक्ष वेधू इच्छितो. पण जरी त्याला समानतेचा अभाव किंवा विषमता म्हणायचं असलं तरी ते स्वातंत्र्य मी इतरांना देतो. इथे माझ्या मते पुढचा मुद्दा येतो - तो म्हणजे ह्या वैविध्यासह एकत्र काही करायचं असेल, तर ते कसं साध्य व्हावं? ते पाहण्यापूर्वी आणखी एका गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं. ती म्हणजे एकमताचा आग्रह धरण्यात काही हशील नसतं, कारण पुरेसं वैविध्य असेल, तर त्यात एकमताच्या आग्रहानं काही विधायक होण्यापेक्षा फाटाफूट व्हायची किंवा कडवटपणा यायची शक्यता फार असते. काही प्रमाणात तसा कडवटपणा दोन्ही धाग्यांवर झालेला दिसतोय. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या वैविध्यामुळे अनेक परस्परविरोधी प्रवाह निर्माण होतात. त्यातला अंतर्विरोध प्रत्येक वेळी लक्षात आला नाही, तरी तो असतो. उदाहरणार्थ, 'स्त्रियांना स्वच्छ प्रसाधनगृह हवं' असं म्हटलं की स्वस्तात खाणं पुरवणाऱ्या जागा पुष्कळदा बाद होतात हे (कोणाला आवडो न आवडो, पण) भारतातलं वास्तव आहे. किंवा तुमच्या उदाहरणात 'संगणक आणि जलद इंटरनेट कनेक्शन हवं' असं म्हटलं, की निम्नमध्यमवर्गीय आर्थिक गटाला ते परवडत नाही, हेदेखील भारतातलं वास्तव आहे. असे अंतर्विरोध असल्यामुळे इथे सर्वप्रथम आपले प्राधान्यक्रम ठरवावे लागतात. एकमत होणं शक्य नसतं; पण, प्राधान्यक्रम स्पष्ट केले म्हणजे कोणत्या गोष्टीविषयी तडजोड करता येईल ते ठरवता येतं. इथे पुढचा मुद्दा येतो - जर वैविध्य अटळ असेल, किंवा हवं असेल, तर काही प्रमाणात तडजोड अपरिहार्य आहे.

'पुष्कळ वेळ एकत्र काढता यावा' आणि 'स्त्रियांना सहभागी होता यावं' हे जर तडजोड न होण्याजोगे मुद्दे असतील, तर मग 'कुणाच्या घरी कट्टा करता येईल का?' ही शक्यता चाचपून पाहता येईल. म्हणजे कुणा तरी एका माणसानं काही गैरसोय पत्करली, थोडी तोशीस घेतली आणि थोडा दिलदारपणा दाखवला, तर प्रश्न सुटेल. पण मग महाग ठिकाणी जाऊन एकाहून अधिक माणसांनी दिलदारपणा दाखवायला तरी काय हरकत आहे? तुमच्या उदाहरणात - जे विद्यार्थी ही व्याख्यानं आपल्या घरी, आपल्या सोयीनुसार, आपल्याला हव्या तितक्या वेळा ऐकू शकत नसतील, त्यांच्यासाठी काही तोशीस पत्करून वर्गातल्या इतरांनी ही सोय त्यांना उपलब्ध करून देणं, किंवा वर्गातलं इन्फ्रास्ट्रक्चर वापरून ती सोय उपलब्ध करून देणं असे पर्याय आहेत.

ह्या सर्वाचा मी काढलेला सारांश असा, की निव्वळ समानतेच्या अभावामुळे जे प्रश्न उभे राहतात त्यांची उत्तरं कदाचित (दिलदार राजेशाही, किंवा समंजस समाजवाद? ह.घ्या!) सौहार्द उर्फ बंधुभावात असू शकतात.

>> पण मला हे महत्त्वाचे वाटते, की अशी एक जरी व्यक्ती असती, जिला हे जमण्यासारखे/परवडण्यासारखे नाही, तर मी ही कल्पना मुळीच राबवली नसती.

थोडक्यात, अशा वेळी मदतीचा हात पुढे करायला आणि तो हात हातात घ्यायला किती लोक तयार आहेत असा विचार करता येऊ शकतो. किंबहुना, भारतीय वास्तवात तो अनेकदा अपरिहार्य ठरतो असा माझा अनुभव आहे.

व्यक्तिगत टिप्पणी टाळा आणि सौहार्द दाखवा अशी सर्वांना जाहीर विनंती.

अजो१२३ Wed, 01/10/2014 - 14:33

राधिकातै, तुम्ही आपुलकीने सगळ्यांना एक पर्याय कसा उचित आहे हे सांगत आहात. नक्कीच तो बर्‍याच सर्कल्समधे असू शकतो. पण एखादे ठिकाणी एका सर्कल मधे तो लोकांना (फायनली मंजे एकदम फायनली) आवडलाच नाही तर तोच कसा तुम्हालापण योग्य होता असं म्हणणं अवाजवी आहे.
-----------
तथाकथित आयोजकांनी दिलेली माहिती चूकिची निघाली तरच त्यांच्यावर आरोप करा. बाकी मुद्दाम माहिती दिली नाही, सोय नाही पहिली, इ इ हा खेचलेला अर्थ आहे.
-----------------
आपण म्हणता तशा पिकनिका अनेकांना प्रचंड आनंददायक वाटू शकतात. तुम्ही त्या अवश्य काढा. वाटल्यास बजेट पिकनिकचे कौतुक करणारे धागे काढा. त्याने ऐसीवरचे मत बदलू शकते. मात्र याच क्षणी अशी अपेक्षा चूक वाटतेय.

अजो१२३ Wed, 01/10/2014 - 14:56

In reply to by सविता

काय हो, तुम्ही लोक तत्त्व म्हणून माझ्याशी सहमती दाखवत नाही का?
-----------------
धमकी देऊन ठेवतोय, मला ऐसीवरचा (२००२ नंतरचा, २०१४ पूर्वीचा) नरेंद्र मोदी बनवू नकात, या निगेटीव पब्लिसिटीचा मला प्रचंड फायदा होऊ शकतो, मीच हिरो होऊ शकतो.

सविता Wed, 01/10/2014 - 14:58

In reply to by अजो१२३

मी मनातल्या मनात अजो म्हणतायेत ते बरोबर आहे असे न म्हणता इथे प्रतिसाद देतेय यावरून तत्वतळ सह्मती आहे हे दिसतेय की!

"बाकी अबकी बार मोदी सरकार" च्या लायनीवर तुमची टॅगलाइन काय असेल ती ठरवायला लागा पाहॅ!

मन Wed, 01/10/2014 - 15:58

In reply to by सविता

ही घ्या घोषणा :-
अंतिम विजय अंतिम सरशी |
अरुण जोशी अरुण जोशी ||
.
.
विजय ज्यांच्या हाताशी
त्यांचे नाव अरुण जोशी
.
.
झाशी असो वा वाशी
एकच नाव -- अरुण जोशी अरुण जोशी

राधिका Wed, 01/10/2014 - 15:13

In reply to by अजो१२३

पण एखादे ठिकाणी एका सर्कल मधे तो लोकांना (फायनली मंजे एकदम फायनली) आवडलाच नाही तर तोच कसा तुम्हालापण योग्य होता असं म्हणणं अवाजवी आहे.

दाखवा ना तसं झाल्याचं.
लोकांना पसंत पडणार नाही, पडणार नाही असं म्हणून लोक मुळातच पर्याय काढायला जात नाहीयेत.

अनुप ढेरे Wed, 01/10/2014 - 14:38

राधिकाताईंशी सहमत आहे. मित्रांच्या अशा समरंभाच आयोजन करताना प्रत्येकाची सोय पाहिली गेली पाहिजे असं मला वाटतं. बहुसंख्यांचीच अस होऊ नये असं मला वाटतं. कॉलेजातही हे प्रसंग यायचे. एक फक्त शाकाहारी हाटिलात खाणार असा प्राणी होता. तो असताना केवळ त्याची गैर्सोय होऊ नये म्हणून बर्‍याचदा प्युअर वेज हाटीलात गेल्याचं आठवतं. तिथे खाणं हा मुद्दा नसायचा. प्रत्येकाला मित्रांची संगतीचा आनंद मिळावा असा हेतू होता. एखादा अशा क्षुल्लका कारणास्तव नाही आला तर इतरांना वाईट वाटे.

अजो१२३ Wed, 01/10/2014 - 14:47

In reply to by अनुप ढेरे

नातं महत्त्वाचं आहेच. पण नातं बनण्यापूर्वी जुळतं घ्यायला पायजेल. कट्ट्यावरचे लोक तसं तर "संस्थळीय मित्र" असतात आणि "वैचारिक शत्रू" देखिल असू शकतात. पण त्याने काय फरक पडतो? ही सगळी प्रारंभिक आणि फॉर्मल नाती आहेत. यात ज्यांचा स्नेह पुढे वाढला आहे ते करतील अ‍ॅडजस्ट आपल्या ओळखींच्या आयडींसाठी.
-----------------------
Katta may be fun, but unless it is repeated many number times, it is formal. म्हणून लोकांना गैरसोय असं वागू नये.

अनुप ढेरे Wed, 01/10/2014 - 14:59

In reply to by अपरिमेय

अशी परिस्थिती येते असं मी तरी अजून पाहिलं नाहिये.
नसेलच तर बहुसंख्यवाला निर्णय घेतला जातोच.

अजो१२३ Wed, 01/10/2014 - 15:04

In reply to by अनुप ढेरे

मसावि अवश्य काढावा. त्यासाठी मसावि मान्य होण्यासारखा ओलावा प्रत्येकाकडे पाहिजे. "राधिकामुळे फालतू वडे खावे लागले" असे लोकांनी नंतर मनातल्या मनात वर्णन करत राहिले तर त्या मसाविला अर्थ काय? "फक्त वडे का खाल्ले असेनात, राधिका आली नसती तर अवकळा आली असती कट्ट्याला" असंही रिडींग असू शकतं. नक्की काय प्रकरण आहे हे जिथे पोस्ट फॅक्टो ठरायचे असते तिथे समजून उमजून वागावे.
--------------
माझ्यावरच्या प्रेमापोटी तुम्ही त्याग करू लागलात तर तुम्हाला नि मला त्याचे वैषम्य वाटणे बंद व्हायला एक वेळ लागतो. तोपर्यंत मी तुझ्या मनासारखं करणार असा माझा आणि तुमचा दोघांचा विरोधी पण संघर्षहिन पावित्रा असला पाहिजे.

अनुप ढेरे Wed, 01/10/2014 - 17:32

In reply to by अनुप ढेरे

या प्रतिसादाला खवचट श्रेणी देणार्‍याचं आवडत्या व्यक्तिबरोबर डेटवर गेल्यावर पोट बिघडेल !

मेघना भुस्कुटे Wed, 01/10/2014 - 15:37

In reply to by ऋषिकेश

होय, मलाही वाटत नाहीय.

राधिका, माझ्याकडून मी चर्चा थांबवते आहे. तुला काढायचे ते निष्कर्ष काढायला तू मोकळी आहेस.

राधिका Wed, 01/10/2014 - 17:44

In reply to by राधिका

'ही नेहमी कामात असते तेच बरं असतं' असं वाटलं असेल सर्वांना.

तसं वाटल्यास एक काम करा, आपापल्या हापिसात विचारा इंग्रजीतून मराठीत किंवा मराठीतून इंग्रजीत भाषांतर करून हवंय का, हवं असेल, तर ते काम मला पाठवून द्या. तुम्ही सगळे एवढे पैसे कमावता म्हणजे तुमच्या कंपन्याही गब्बर असणारच. म्हणजे चांगला भाव देतील भाषांतराचा आणि मग पुढच्या कट्ट्याला माझ्याकडेही तुमच्याइतकीच क्रयशक्ती असेल. म्हणजे मग ही सगळी भानगडच मिटेल. :प

अजो१२३ Wed, 01/10/2014 - 16:21

राधिकातै,
समूहाने एकत्र येऊन कोणत्या निकषा अंती काही कार्य करावे हे जरा बाजूला ठेऊ. फक्त कट्ट्याचं पाहू. तुम्हाला कट्ट्याला येण्यासाठी जितक्या अटी आहेत त्या सार्‍या लिहा. कोणी ना कोणी त्या सार्‍या पूर्ण होत आहेत का तुम्ही यायला हवं का नि आलात तर नंतर आयोजकांना नंतर तुम्ही काय म्हणणे योग्य आहे / नाही हे सांगेल.
---------------------
लोक बरंच अ‍ॅडजस्ट करतात. तुमच्यासाठी देखिल ते रास्त तितकं करतीलच.
------------
पण असा कशाचा काहीही अर्थ कट्टास्पिरिट स्पॉइल नका करूत.

मन Wed, 01/10/2014 - 17:31

In reply to by राधिका

अशी व्यवस्था असू शकते ?
कुठे कुठे आहे बरं अशी "व्यवस्था" ?
तुम्ही गंभीरपणे बोलताय का हे ?

राधिका Wed, 01/10/2014 - 17:34

In reply to by मन

मी गंभीरपणे बोलते आहे.
मी या धाग्यावर ठिकठिकाणी अशा व्यवस्थांचं वर्णन केलं आहे.

अतिशहाणा Wed, 01/10/2014 - 16:29

स्वतः घरी खाऊन येऊन नंतर बागेत कट्ट्यावर गप्पा मारणे हा कट्ट्याचा सर्वोत्तम प्रकार आहे असे वाटते.

घाटावरचे भट Wed, 01/10/2014 - 17:04

एक निरीक्षणः 'आता पुरे', ' माझ्याकडून हा शेवटचा प्रतिसाद', 'इत्यलम्', 'माझ्याकडून पूर्णविराम' वगैरे लिहिल्यानंतरही असे लिहिणारे लोक आणखी बरंच काही लिहित असतात. मग आधीचं पूर्णविराम, इत्यलम् वगैरे ल्याहायचंच कशाला?

मन Wed, 01/10/2014 - 17:11

In reply to by घाटावरचे भट

एका वाक्याला पूर्णविराम असतो. मग आपण दुसरं वाक्य सुरु करतो.
धाग्यावर मंडळी पूर्णविराम म्हणतात तेव्हा त्या धाग्यावरील त्या मुद्द्यावर तो पूर्णविराम असतो.
नव्या मुद्द्यावर नव्यानं मांडणी करता अयवी.
तुमचा स्वतःचा प्रतिसाद पहा.
त्यात तुम्ही दोन वाक्य लिहिलीत.
पहिल्या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिलेला.
मग दुसरं वाक्य सुरु केलत.
म्हणजेच पूर्णविरामानंतर नवीन वाक्य लिहिता यावे.

घाटावरचे भट Wed, 01/10/2014 - 17:14

In reply to by मन

'माझ्याकडून या धाग्यावर हा शेवटचा प्रतिसाद' असं म्हटल्यावरही? हे म्हणजे काही काही सिनेमांमधे शेवटी श्रेयनामावली झाल्यावरही एखादा सीन असतो तसं झालं.

मन Wed, 01/10/2014 - 17:25

In reply to by घाटावरचे भट

मग ही घ्या अजून एक तुलना.
क्वचित काय होतं; की सकाळ चांगली झालेली असते.
शिवाय सकाळी सकाळी चांगली झालेली असते.
आपल्याला वाटतं झालं.
पण क्वचित एखादे वेळेस होतं असं, वाटतं की बुवा नै.
अजून जरा एकदा झालं तर चांगलं होइल.
मग होतं अजून एक दोनदा... तेव्हा कुठे चांगलं वाटतं.
पण एकदोनदाच ठीक.
चांगलं वाटण्यासाठी फार वेळेस, अगदि सारखीच व्हावी लागत असेल तर डॉक्टर गाठलेला बरा.
.
.
आदर्श परिस्थितीत शेवट म्हणजे शेवटच असायला हवा.
पण प्रत्यक्षात तसं नेहमीच असतं असं नाही.
प्रेशर कधीकधी कमी जास्त होउ शकतं.

मी Wed, 01/10/2014 - 18:25

In reply to by मन

पुण्यात वहुमान क्याफे मस्तय म्हणे.
मी उद्या जाउन पाहणार होतो त्या ठिकाणी.
आताय क्या ?

नुसतं पहायला? क्याफे मधे चहा मिळेल काय?

मी Wed, 01/10/2014 - 17:35

म्हणजे नंतर का होईना पैसे जाणारच.

पैसे असच नाही, मी तर कित्येक वेळेला माझ्या मित्रांना आंतरजालीय भांडणात मदत केली आहे, त्यामुळे पैसेके बदले पैसा असा नियम नसतो आमच्यात, उदा. उद्या तुमच्या चहाचे पैसे मी दिले तर तुम्ही मला चित्रलिपी शिकवाल वगैरे.

राधिका Wed, 01/10/2014 - 17:40

In reply to by मी

हे असं तर आपल्याला फारच आवडतं.

आता कसं, सोय शोधून काढायची म्हटल्यावर सोयी सुचू लागतात.

मी Wed, 01/10/2014 - 17:42

In reply to by राधिका

बरं तुमच्या पुण्यात रहाण्याची, इतरत्र हिंडण्याची, नातेवाईक कुठे रहातात, जुने मित्र, शत्रु, लायब्ररी, इतर संस्था ज्या म्हणून भविष्यकालीन सोयी हव्यात त्यांची चर्चा आजच झडू दे, उद्या अस नको की तुम्ही विचारल्यावर मग अम्हाला सुचलं की तुमची गैरसोय होते आहे म्हणून ;)

राधिका Wed, 01/10/2014 - 17:46

In reply to by मी

तशी मी किनई तडजोड करणारी आणि खूप खूप सोशिक आहे. त्यामुळे बाकी काही म्हणजे काही त्रास देणार नाही कट्टेकर्‍यांना.

अतिशहाणा Wed, 01/10/2014 - 18:06

जास्त खर्च करु नये या तत्त्वाशी मी सहमत आहे. पॉप टेट्स कट्ट्याचा ~३५० खर्च मूळ प्रस्तावात मांडलेल्या खर्चाच्या अगदी जवळ जाणारा होता. त्यामुळे आता तो विषय काढण्यात हरकत नाही.

मात्र पॉप टेट्स येथे थोडा वेळ जमून नंतर बाहेर कलटी मारू असे आश्वासन दिले असताना - आणि केवळ त्या आश्वासनावरच एखाद्याने हजेरी लावली असल्यास - नंतर पॉप टेट्स मध्येच रेंगाळणे मूळ आश्वासनाशी विसंगत वाटते. समजा ३५० ऐवजी ५५० खर्च झाला असता तर चर्चेचा रोख निश्चितच बदलला असता.

विवेक पटाईत Wed, 01/10/2014 - 18:15

राधिका ताई, च्यायला मला वाटले समानता यावर गंभीर पणे चर्चा असेल. पण विषय 'ठाण्यात होणाऱ्या कट्ट्याचा आहे, हे समजले. मी या कट्ट्यावर अवश्य येईल. पण खर्या दिल्ल्लीकरा प्रमाणे अट एकच

१. जाण्या येण्याचे तिकीट (स्लीपर क्लास चे ही चालेल)
२. थांबण्याची व्यवस्था.
३. सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचा चहा (विथ स्नेक (?))
४. रात्रीचे जेवण

असे जमल्यास आपल्या सर्व मुद्द्यांचा खंदा समर्थक आपल्याला मिळेल. आवाजाची प्रत मोठी असल्याने आपल्या सर्व विरोधकांवर भारी पडेल हे निश्चित

उत्तराची अपेक्षा

राधिका Wed, 01/10/2014 - 18:16

In reply to by विवेक पटाईत

बाकी काही देण्याएवढे पैसे नाहीत माझ्याकडे पण तो स्नेक म्हणजे आमच्या भाषेत साप तेवढा मिळवून देऊ शकेन मी. याबदल्यात केवढं समर्थन मिळेल?

मस्त कलंदर Wed, 01/10/2014 - 19:44

त्या कोरम मॉलमध्ये पॉपटेट्सकडे जायचा रस्ता फूडकोर्टातून जातो. हे तिथे गेलेल्या कुणाच्या लक्षात आहे की नाही? आणि कट्टा आयोजक व त्यांच्या जबाबदार्‍या हा विषय पहिल्यांदाच कळाला, त्याबद्दल या धाग्याचे आभार मानावे तितके थोडे आहेत..

अस्वल Wed, 01/10/2014 - 22:55

एका दिवसात २३४? ब्रॅडमन धागा!
@समानता- प्रश्न वैध वाटला. गावठी आणि अस्वलबुद्धीला तडक सुचलेला उपाय म्हणजे कुठेतरी जब्राट मिसळ (इथे आपला आवडता पदार्थ टाका) हाणून मग कट्ट्याला जाणे. पोट तुडूंब भरलेले असल्याने खाद्यपदार्थ बघूनही नॉशिया येईल, आणि गप्पांसाठी तोंड मोकळं राहील. एक पेय घेऊन ते सिपत सिपत चर्चा ऐकल्यास स्टाईलही ++.
बाकी कट्ट्याची आयडिया सुदृढ आहे. दिवाळीच्या जवळपास असेल तर थोडा फराळही का नाही करत एकत्र? पॉटलक टाईप.

अस्वल Wed, 01/10/2014 - 23:04

In reply to by वामा१००-वाचनमा…

कालिजात असताना असा अनुभव आलेला आहे!
म्हणजे कोणीतरी आयडिया काढून खास -ट्रिपल शेझवान राईस (कालिजातील ऐशारामाची परमावधी)- वगैरे मागवायचा प्लॅन असे. बरेचदा मला झेपायचं नाही.
मग त्या मित्रांचं बोलावणं यायच्या आधी एक बजेटमधला -समोसा पाव विथ एक्स्ट्रा चटणी- खाऊन घ्यायचा. आणि मग ट्रिपल शेझवानच्या आसपास न खाता बसू शकायचो.
आणि राधिकातै, मराठी आंजावर म्हणतात तसं हलके घ्या. आम्ही काय, ना कट्ट्याला येऊ शकणार ना खाण्याला. तेव्हा एक फुकटातला सल्ला.

मी Wed, 01/10/2014 - 23:22

In reply to by अस्वल

म्हणजे कोणीतरी आयडिया काढून खास -ट्रिपल शेझवान राईस (कालिजातील ऐशारामाची परमावधी)

पुण्यातली का? म्हणजे युनिव्हर्सिटी सर्कलच्या(पुर्वीच्या) इथल्या चायनीज चौपाटीवरची का?