Skip to main content

समानता?

या विषयावरील चर्चा बहुवाचित असेलच असे गृहीत धरून नमनाला हे वाक्यभर तेल वाहून माझ्या भूमिकेच्या मांडणीस सुरुवात करते.

माझ्या दृष्टीने एकाच गटाला घेऊन एकत्रितपणे काही करायचे असल्यास, ते करण्यासाठी गटातील सर्व व्यक्ती सक्षम असतील याची खात्री करावी आणि ते तसे नसल्यास, सर्वांच्या क्षमतेत बसणार्‍या गोष्टीच फक्त कराव्यात हेच योग्य आहे.

एक वेगळे उदाहरण देऊन माझी तात्त्विक भूमिका अधिक स्पष्ट करते.

मी सध्या एका ठिकाणी शिकवते. माझा विषय असा आहे, की विद्यार्थ्यांनी जर व्याख्यानाव्यतिरिक्तच्या काळात आंतरजालावर फुकट उपलब्ध असलेल्या काही ध्वनिचित्रफिती पाहिल्या, तर व्याख्यानादरम्यान काही संकल्पना शिकवण्यात कमी वेळ घालवावा लागेल आणि उरलेला वेळ ज्यासाठी इतरत्र कुठेही मदत उपलब्ध होत नाही अशा काही गोष्टी व्याख्यानादरम्यान करायला नेहमीपेक्षा जास्त वेळ मिळेल आणि याचा फायदा सर्वच विद्यार्थ्यांना होईल. इथे एका गोष्टीची नोंद घेतली पाहिजे. ज्या गोष्टीसाठी अधिक वेळ उपलब्ध व्हावा असे म्हटले आहे, ती गोष्ट मी आधीही करून घेत होते, आणि नियमांनुसार आवश्यक तितक्या प्रमाणात करून घेत होते. नियमांनुसार आवश्यक असलेल्या गोष्टींहून अधिक करता यावे हा विचार इथे आहे.

त्यामुळे सध्या प्रगत देशांमध्ये मूळ धरत असलेली 'फ्लिप्ड क्लासरूम' ही कल्पना राबवण्याचा विचार माझ्या मनात होता. 'फ्लिप्ड क्लासरूम' म्हणजे व्याख्यानाच्या ध्वनिचित्रफिती करून त्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून घेणे, जेणेकरून विद्यार्थी ही व्याख्याने आपल्या घरी, आपल्या सोयीनुसार, आपल्याला हवे तितक्या वेळा ऐकतील. आणि गृहपाठ मात्र वर्गात सर्वांसोबत करायचा, जेणेकरून तो करताना येणार्‍या अडचणी, पडणारे प्रश्न या सर्वांचा निकाल तिथल्या तिथे लागेल.

परंतु, ही कल्पना राबवायची झाल्यास, प्रत्येक विद्यार्थ्याला पुढील गोष्टींची जुळवाजुळव करावी लागेल : संगणक, चांगल्या प्रतीचे आंतरजाल. हे आपल्यासारख्या विकसनशील देशात सर्वांनाच शक्य होईल असे वाटत नाही. आणि मुख्य म्हणजे, येथे प्रश्न ध्वनिचित्रफीत पाहून अभ्यास करायला आवडते की नाही असा आवडी-निवडीचा प्रश्न नाहीये. तर, संगणक, चांगल्या प्रतीचे आंतरजाल या गोष्टी उपलब्ध आहेत का आणि त्या उपलब्ध करून घेण्याइतकी क्रयशक्ती आहे का असा प्रश्न आहे.

त्यामुळे मी माझ्या विद्यार्थ्यांसमोर ही कल्पना मांडली आणि विचारले, किती जणांना या गोष्टींची जुळवाजुळव करणे जमणार आणि परवडणार आहे? बर्‍याच लोकांना जमते आहे आणि मला नाही म्हणून लाज वाटून तसे सांगायचे नाही असे करू नका. एखाद्या व्यक्तीकडे केवळ क्रयशक्ती नाही, म्हणून ती काही गोष्टींपासून वंचित रहावी असे मला वाटत नाही (विशेषतः तिने इतरांइतकेच शुल्क भरलेले असताना).

सुदैवाने सर्वांनाच हे जमण्यासारखे/परवडण्यासारखे असल्याने मला 'फ्लिप्ड क्लासरूम' ही कल्पना राबवता येणार आहे. पण मला हे महत्त्वाचे वाटते, की अशी एक जरी व्यक्ती असती, जिला हे जमण्यासारखे/परवडण्यासारखे नाही, तर मी ही कल्पना मुळीच राबवली नसती. तसे झाले असते, तर माझ्यापुढे दोन पर्याय होते- १. अधिकच्या गोष्टी करण्याचे ध्येय डोळ्यांसमोर न ठेवणे. २. अधिकच्या गोष्टी करून देण्यासाठी अधिक वेळ वर्ग चालवणे किंवा अधिकच्या गोष्टी प्रत्येकाला मिळतील (अधिक काळ वर्गात राहून किंवा ध्वनिचित्रफीत पाहून) अशी व्यवस्था करणे.

या उदाहरणाच्या संदर्भात माझ्या

एकाच गटाला घेऊन एकत्रितपणे काही करायचे असल्यास, ते करण्यासाठी गटातील सर्व व्यक्ती सक्षम असतील याची खात्री करावी आणि ते तसे नसल्यास, सर्वांच्या क्षमतेत बसणार्‍या गोष्टीच फक्त कराव्यात हेच योग्य आहे.

या विधानाचा विचार केल्यावर आपले याविषयीचे मत जाणून घ्यायला मला आवडेल.

मेघना भुस्कुटे Wed, 01/10/2014 - 10:55

अभ्यासवर्गात मुळात किती लोक नक्की उपलब्ध आहेत हे नक्की असतं. अभ्यासक्रम ठरलेला असतो. शुल्क आधी भरून झालेलं असतं. आयोजक काहीएक गोष्टींना जबाबदार असतात.

कट्ट्यासारख्या गोष्टींच्या बाबतीत हे सगळंच फार सैल असतं. तिथे वरचं विधान कितीही आदर्श वाटलं, तरी कामी येत नाही, असा माझा अनुभव. नुसतीच चर्चा घडते. प्रत्यक्षात कोणत्याही बाजूनं पिंक टाकणारे लोक उपस्थितही राहण्याची काहीच खातरी नसते. इथे एकच एक तत्त्व धरू गेल्यास लोकांना भेटणे हा मूळ उद्देशच बाजूला पडतो.

त्यामुळे मी अशा ठिकाणी होता होईतो माझं मत मांडते. ते उचललं गेल्यास उत्तम. न गेल्यास कडवटपणा न आणता त्यांचं 'माझं न ऐकण्याचं स्वातंत्र्य' मानून लांब होते किंवा शिंग मोडून कळपात शिरते.

राधिका Wed, 01/10/2014 - 11:00

In reply to by मेघना भुस्कुटे

हे तत्त्व राबवण्याचे कसोशीने प्रयत्न करायचे आणि अगदीच जमत नसेल तरच ते तत्त्व तेवढ्यापुरतं बाजूला ठेवायचं असा दृष्टीकोन या तत्त्वाच्या बाबतीत ठेवावासा तुला वाटतो का?

राधिका Wed, 01/10/2014 - 11:22

In reply to by मेघना भुस्कुटे

कट्ट्याच्या बाबतीत नाही याला

कट्ट्यासारख्या गोष्टींच्या बाबतीत हे सगळंच फार सैल असतं. तिथे वरचं विधान कितीही आदर्श वाटलं, तरी कामी येत नाही, असा माझा अनुभव. नुसतीच चर्चा घडते. प्रत्यक्षात कोणत्याही बाजूनं पिंक टाकणारे लोक उपस्थितही राहण्याची काहीच खातरी नसते. इथे एकच एक तत्त्व धरू गेल्यास लोकांना भेटणे हा मूळ उद्देशच बाजूला पडतो.

हे आणि याखेरीज इतर काही कारण आहे का?

मेघना भुस्कुटे Wed, 01/10/2014 - 11:26

In reply to by राधिका

आपल्याला जे हवं ते बोलून दाखवायचा धोका पत्करावा(च) लागतो. त्यासाठी आपल्या बाजूनं बहुमत वळवावं(च) लागतं. बहुमत वळलं नाही, तर आपल्याला तडजोड तरी करावी लागेल किंवा उपक्रमाला मुकावं तरी लागेल, हे स्पष्ट समजून घ्यावं लागतं.

कट्ट्याच्या बाबतीत तू सोडून इथे बाकी कुणीही इतके कष्ट घेतलेले नाहीत. कष्टाचं राहू द्या, उपस्थितीही खातरीलायक असेलच असं नाही, हे कट्ट्याबाबत गृहित आहे. त्यामुळे मी हे तत्त्व राबवण्याचे कष्ट अशा ठिकाणी घेणार नाही. 'असे आळशी आणि बोटचेप्ये लोक मुकले कट्ट्याला तर मुकले, काही जगण्याच्या मूलभूत अधिकारापासून वंचित होत नाहीयेत' असं म्हणून मी आलेल्या लोकांना निवांतपणे भेटीन!

मेघना भुस्कुटे Wed, 01/10/2014 - 11:32

In reply to by राधिका

१० विरुद्ध १ अशी मतं असताना काय घडतं? तेच.

यात तुला बेफिकिरी जाणवेल, पण विश्वास ठेव - बेफिकिरी नाही. नाईलाज आहे. उदाहरणार्थः पुण्याला ठाण्याहून जाणारी मी बहुधा एकटीच आहे. मी ठाण्यात कट्टा हवा असं म्हणून पाहिलं. पण बहुसंख्य पुणेकर ऐकेनात. मला लोक तर भेटायला हवे आहेत. मग मी माझ्या वेळाच्म गणित जमवणार, पैशांचे प्राधान्यक्रम बदलणार आणि पुण्याला जाणार. तसंच हेही आहे.

राधिका Wed, 01/10/2014 - 11:37

In reply to by मेघना भुस्कुटे

म्हणजे बहुसंख्यांची 'आवड' जपण्यासाठी अल्पसंख्यांनी क्षमतेबाहेरचे वागावे किंवा त्या भानगडीतच पडू नये. असा अर्थ होत नाही का?

राधिका Wed, 01/10/2014 - 11:40

In reply to by मेघना भुस्कुटे

शिक्षण जीवनावश्यक आहे का?

(मला माहीत आहे की तू शिक्षणाबद्दल बोलत नाहीयेस, पण मला 'जीवनावश्यक' या शब्दाच्या अर्थाबद्दल आपलं एकमत आहे का ते पहायचं आहे.)

मेघना भुस्कुटे Wed, 01/10/2014 - 11:49

In reply to by राधिका

जोवर तू कायदेमंडळात जाऊन बसत नाहीस, तोवर मला तुझ्या भूमिकेचं वावडं असण्याचं कारण नाही.

तोवर तुझ्याकडे येऊन शिकण्याची वेळ आली, तर तुला तुझं मतस्वातंत्र्य राबवण्याचा अधिकार आहे हे मान्य करून, मी पैशांची तजवीज करीन. (कदाचित मागल्या दारानं तुला सवलत किंवा कर्ज देण्याचीही विनंती करीन!)

राधिका Wed, 01/10/2014 - 12:09

In reply to by मेघना भुस्कुटे

या प्रतिसादातून तू 'कसं काय' या माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहेस की तुला त्याचं उत्तर द्यायचं नाहीये?

राधिका Wed, 01/10/2014 - 15:00

In reply to by मेघना भुस्कुटे

जोवर तू कायदेमंडळात जाऊन बसत

हा उपप्रतिसाद तू माझ्या ज्या प्रतिसादाला दिला आहेस, त्या प्रतिसादाचं शीर्षक पहा.

गवि Wed, 01/10/2014 - 11:50

In reply to by मेघना भुस्कुटे

मग मी माझ्या वेळाच्म गणित जमवणार, पैशांचे प्राधान्यक्रम बदलणार आणि पुण्याला जाणार. तसंच हेही आहे.

हे तर झालंच, आणि उदा माझ्याबाबतीत माझे काही प्राधान्यक्रम आहेत.

मी स्वतःचे चारचाकी वाहन घेतल्याशिवाय कुठेही जात नाही. पुणे, नाशिक, कोंकण अशा अंतरावर तर पब्लिक ट्रान्सपोर्ट कधीच वापरत नाही. रिक्षा शोधणे, त्याला मुंहमांगे पैसे देऊन त्या खटार्‍यातून माझा भलाथोरला देह कोंबून फिरणे अथवा बसला लटकणे मला मान्य नाही. (इन ऑल गिव्हन कंडिशन्स ऑफ टेंपरेचर, प्रेशर, मनी, लक वगैरे)

त्यामुळे सदाशिवपेठेतल्या एखाद्या गल्लीतल्या हाटेलात कट्टा ठेवल्यास मी त्याला उपस्थित राहणार नाही.

रविवारी संध्याकाळी कट्टा ठेवल्यास रात्री उशिरा परत चार तास प्रवास करुन (कारण एक्सप्रेसवेवर मी ८० च्या वर स्पीड घेत नाही, आणि रात्री तर ७० च) मध्यरात्री घरी पोहोचणे आणि सकाळी ऑफिसचा लॉगिन टाईम गाठणे हे माझ्या प्रकृतीला अत्यंत दगदगीचं ठरतं. अशा वेळी खरंतर ठाण्यात कट्टा असला तरच मी येणे मला "संतोषजनक" ठरते. त्याउपर मी एखाद्या पुणे कट्ट्याला आलो तर सर्वांना भेटण्याचा आनंद आणि माझे झालेले हाल या दोहोंमधे सर्वांना भेटण्याचा आनंद हा निर्विवादपणे जास्त असेल तरच मी तिथे उपस्थित राहीन.

त्यामुळे इतरांनी मला समाविष्ट करण्यासाठी लोणावळ्यात किंवा निगडीच्या पुणे गेटला कट्टा ठेवावा अशी माझी "सोयीस्कर" इच्छा असली तरी इतरांनी कट्टा तसा न ठेवल्यास मी स्वतःला लेफ्ट आउट समजणार नाही किंवा मला इन्क्लूड करण्यासाठी बहुतांशांनी त्यांची सोय / प्लॅन बदलावा असेही म्हणणार नाही. मी जाणार नाही इतकंच.

नंतर कधीतरी ठाण्यात कट्टा अरेंज करीन. येतील त्यांना भेटीन. तेही माफक त्रास घेऊन तिथे येतील ते वट्टात बेरजेचा हिशोब होतो म्हणूनच. उगीच असंतुष्ट राहण्यासाठी कोण येईल?

राधिका Wed, 01/10/2014 - 11:56

In reply to by गवि

परंतु, यात मला आपली अक्षमता कुठेच दिसली नाही. दिसल्या त्या आपल्या आवडीनिवडी. सर्वांच्या आवडीनिवडी पाळल्या जातील अशी अपेक्षा ठेवणे मला योग्य वाटत नाही. त्यामुळे तुम्ही वर जे म्हणत आहात ते मला पटले. पण त्याचा या चर्चेशी नेमका कसा संबंध आहे ते मला कळले नाही.

गवि Wed, 01/10/2014 - 12:01

In reply to by राधिका

अक्षमताच आहे. पार्किंग नसेल तर अनेक किलोमीटर लांब पार्किंग करुन तंगड्या तोडत चालत येणे, रिक्षाने प्रवास करणे, जागरण करुन सकाळी ऑफिस गाठणे या गोष्टी करण्याची क्षमता, शारिरीक आणि मानसिक (जास्त) नसणे .. सरळसरळ अक्षमता आहे. माझ्यासारख्याच आर्थिक आणि सामाजिक स्थितीत असलेले अनेकजण हे सर्व करुन अशा ठिकाणी कट्ट्याला किंवा इव्हन लालबागच्या राजाच्या दर्शनालाही जातात. मी जात नाही, जाऊ शकत नाही.

पण मला इन्क्लूड न करता बहुसंख्यांनी कट्टा वळचणीच्या जागी ठेवला अशी तात्विक भूमिका घेणे पटणार नाही.

राधिका Wed, 01/10/2014 - 12:04

In reply to by गवि

बरोबर आहे.

मग मला जे म्हणायचे आहे, त्यासाठी 'क्षमता' हा शब्द योग्य नाही. पण कोणता शब्द वापरयचा ते लक्षात येत नाही.

एवढे मात्र नक्कीच म्हणता येईल की क्रयशक्ती आणि आपण वर दाखवलेला अक्षमता या दोन गोष्टी कंपेरेबल नाहीत.

मी Wed, 01/10/2014 - 11:02

एकाच गटाला घेऊन एकत्रितपणे काही करायचे असल्यास, ते करण्यासाठी गटातील सर्व व्यक्ती सक्षम असतील याची खात्री करावी आणि ते तसे नसल्यास, सर्वांच्या क्षमतेत बसणार्‍या गोष्टीच फक्त कराव्यात हेच योग्य आहे.

हा मुद्दा आरक्षणासारखा आहे, शिक्षणासारखे(ऐच्छिक नव्हे) महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याठिकाणी अल्पसंख्यांकांसाठी काहीकाळ बहुसंख्यांना झळ सोसावी लागल्यास गैर नसावे.

पण ऐच्छिक ठिकाणी अशा सोयी करुन देणे एकंदर समाजाला मागे ढकलण्यासारखे आहे.

एकाच गटाला घेऊन एकत्रितपणे काही करायचे असल्यास, ते करण्यासाठी गटातील सर्व व्यक्ती सक्षम(तात्त्विक दृष्ट्याही) असतील याची खात्री करावी आणि ते तसे नसल्यास, बहुसंख्यांसाठी जे योग्य असेल ते करावे पण त्याच वेळेस अल्पसंख्यांकांना सहभागी होण्याची संधी उपलब्ध करुन द्यावी, जेणेकरुन बहुसंख्य सक्षम असुनही त्यांची गती कमी होणार नाही व अल्पसंख्यांकानाही योग्य संधी मिळेल.

मी Wed, 01/10/2014 - 11:04

In reply to by मेघना भुस्कुटे

बुच बसल्याने इथेच एक सुधारणा करतो.

एकाच गटाला घेऊन एकत्रितपणे काही करायचे असल्यास, ते करण्यासाठी गटातील सर्व व्यक्ती सक्षम(तात्त्विक दृष्ट्याही) असतील याची खात्री करावी आणि ते तसे नसल्यास, बहुसंख्यांसाठी जे योग्य असेल ते करावे पण त्याच वेळेस अल्पसंख्यांकांना सहभागी होण्याची पुरेशी संधी उपलब्ध करुन द्यावी, जेणेकरुन बहुसंख्य सक्षम असुनही त्यांची गती कमी होणार नाही व अल्पसंख्यांकानाही योग्य संधी मिळेल.

राधिका Wed, 01/10/2014 - 11:07

In reply to by मी

हे मान्य आहे. परंतु या पुरेशा संधीचे उदाहरण द्याल का? जेणेकरून 'पुरेशी' या शब्दाच्या अर्थाबद्दल आपले एकमत आहे का ते तपासून पाहता येईल.

मी Wed, 01/10/2014 - 12:10

In reply to by राधिका

पुरेशी संधीचे उदा. आरक्षणाच्या चौकटीत "काहीकाळासाठी कमी गुणांवर पुढील प्रवेश मिळण्याची हमी", पण अल्पसंख्यांकांना गुण "मिळवुन" देण्यासाठी बहुसंख्यांची गैरसोय होणे गैर आहे.

तत्त्वदृष्ट्या- ध्येयाची व्याप्ती किंवा काठीण्यापातळी अल्पसंख्यांकांसाठी कमी करण्यापेक्षा त्यांना मदतीचा हात द्यावा पण बहुसंख्यांना जे जमते तेच व्हावे ह्यासाठी प्रयत्नशील असावे.

राधिका Wed, 01/10/2014 - 12:16

In reply to by मी

मग या ठिकाणी कमी काठिण्यपातळीचे कंपल्सरी कोर्सेस आणि बहुसंख्यांसाठी अधिक काठीण्यपातळीचे ऑप्शनल कोर्सेस असं काहीसं करता येईल की. किंवा अल्पसंख्यांसाठी खास व्यवस्था करता येईल. अल्पसंख्यांना वगळण्याची किंवा अल्पसंख्यांसाठी थोडीही तडजोड न करता, बहुसंख्यांना हवे ते घ्या नाहीतर फुटा हे मला पटणार नाही. आपले यावर काय मत हे वरच्या प्रतिसादातून मला स्पष्ट न झाल्याने विचारते आहे.

मी Wed, 01/10/2014 - 12:31

In reply to by राधिका

शिक्षणाच्या संदर्भात तुमचे म्हणणे मान्य आहेच.

कट्ट्याबाबत माझी भुमिका - सगळ्यांनाच परवडेल(काळ, काम आणि व्ययक्षमता)अशा प्रकारे कट्टा आयोजित करणे योग्य पण बहुसंख्यांनी अल्पसंख्यांच्या मताकडे दुर्लक्ष केल्यास(जे शक्य आहे) अल्पसंख्यांपुढचे पर्याय(इथे मी) म्हणजे कट्ट्याला न जाणे किंवा जायचे असल्यास मी आधी म्हंटल्याप्रमाणे स्वतःच्या टर्म्सवर जाणे म्हणजेच बहुसंख्यांच्या मताकडे सोईस्कर दुर्लक्ष करणे, ह्या दुर्लक्ष करण्यालाच मी सामंजस्य किंवा कॉम्प्रोमाईझ(इतरांच्या मते) असे म्हणेन, असे करण्यालाच स्वातंत्र्य जपणे आणि मिसळण्याची पुरेशी संधी देणे असेही मी म्हणेन.

राधिका Wed, 01/10/2014 - 12:33

In reply to by मी

मी आधी म्हंटल्याप्रमाणे स्वतःच्या टर्म्सवर जाणे म्हणजेच बहुसंख्यांच्या मताकडे सोईस्कर दुर्लक्ष करणे

हे कसं साधायचं

राधिका Wed, 01/10/2014 - 13:01

In reply to by मेघना भुस्कुटे

पण याचं कारण माझ्या प्रश्नाला कोणीच योग्य ते उत्तर देत नाही आहे हे आहे.
मी क्रयशक्तीचा मुद्दा काढला की लोक त्याला समांतर उदाहरण म्हणून आवडीनिवडीची उदाहरणं देत आहेत.

मी Wed, 01/10/2014 - 12:52

In reply to by राधिका

नाहीच द्यायचे!! हेच तर दुर्लक्ष आहे, कॉफिचे पैसे द्यायचे फक्त.

माझ्या वेगवेगळ्या मित्रांच्या वर्तुळात अभक्ष्य/भक्ष्य/अपेय/पेय अशा पार्ट्यांचे पैसे कोणी कसे द्यायचे ह्यावर एकमत होत नसल्यास, ज्यानेत्याने जमेल तसे किंवा स्वतःच्या युज(उपभोगाप्रमाणे)प्रमाणे पैसे द्यावेत असे सामंजस्याने ठरते, असेच इथे इतरेजनही करत असतील ह्यात शंका नाही.

मी Wed, 01/10/2014 - 12:57

In reply to by राधिका

खुलासा - तर एका ताटाचा(डोक्याचा) हिशोब चुकत होता आणि ते कुणाला तरी स्वत:च्या खिशातुन भरणे अनिवार्य होते, ते डोके माझे होते किंवा अजुन कोणाचे हे आधी क्लिअर न केल्याने(माती खाल्ली) हा तोटा इतरांनी सहन का करावा ह्या हेतुपोटी मी ५०० रुपयाची कॉफी पिली.

इतरांनी कृपया ह्या प्रतिसादाकडे दुर्लक्ष करावे अथवा ह्यावेळेसच्या कट्ट्यावर भरपाई करावी पण इथे शतक गाजवु नये ;)

मी Wed, 01/10/2014 - 13:08

In reply to by राधिका

तुमचे तडजोडीचे हे उदाहरण बाद होते. तुमच्या मुद्द्यासाठी दुसरे एखादे उदाहरण दिलेत तर बरे पडेल.

ओके, मी इतरत्र असे केले आहे, त्या कट्ट्यामधे माझी तडजोड नव्हती/नसते. काही 'फक्त ओले-कट्ट्यांना' मी चकणा खाऊन कॉफी पिऊन पैसे न देता घरी गेलो आहे, किंवा माझ्या अनेक मित्रांनी फक्त सुप पिऊन पैसे न देता कल्टी मारली आहे, पण मित्र आहेतच नव्हे तर नविनही जोडले गेले आहेत.

तुम्ही मुंबइच्या असुनही असा प्रश्न पडावा हे आश्चर्य वाटते, माझ्या मुंबईच्या मित्रांमधे जेवढे सामंजस्य(मला अपेक्षीत) आहे तेवढे मला इतरत्र आढळत नाही.

राधिका Wed, 01/10/2014 - 13:10

In reply to by मी

मान्य आहे, पैसे बुडवणे हा एक पर्याय आहे.
पण मला जर सचोटीचे पर्याय अभिप्रेत होते हो.

मी Wed, 01/10/2014 - 13:14

In reply to by राधिका

बुडवणे नाही, हिशोब अनेक पार्ट्यांमधे सामंजस्याने पुर्ण होत रहातो. तुम्ही या वेळच्या आणि पुढच्या पुणे कट्ट्याला याच, सामंजस्याची प्रचिती येईलच. :)

मेघना भुस्कुटे Wed, 01/10/2014 - 15:26

In reply to by राधिका

नाही, असं काही नाही. 'मला इतके पैसे देणं शक्य नाही. पण मला कट्ट्याला यायचंय.' असं म्हणून इतरांना उपाय विचारला, तर त्यावर काहीतरी उपाय निघतोच. मदतीत परतफेड न करायचे पैसेही असू शकतात.

राधिका Wed, 01/10/2014 - 15:33

In reply to by मेघना भुस्कुटे

पण या मुद्द्यावर मी हा इतका वादंग माजवण्यापूर्वी कुणाला हे सुचलं होतं का? हीच युक्ती मी सुचवल्यावर सगळे वर मलाच ती ऐकवतायत. आणि हा मुद्दा काही महिन्यांपूर्वी निघाला असूनही आज मी ही युक्ती बोलून दाखवेपर्यंत कुणालाच हा सुचला नव्हता यावर कोणीच बोलत नाहीये.

Nile Wed, 01/10/2014 - 13:15

In reply to by मी

मी इतरत्र असे केले आहे, त्या कट्ट्यामधे माझी तडजोड नव्हती/नसते.

गेली १४-१५ वर्षं तरी आम्ही हे करत आलो आहोत. मुंबई, पुणे, मद्रास, बेंगलोर आणि अमेरिका इत्यादी ठिकाणी वेगवेगळ्या भाषिक मित्रांबरोबर हे करत आलो आहोत. बुडवाबुडवी करण्याचे कारण नाही. त्यामुळे, न खाता पैसे द्यावेच लागतात असे म्हणणारे लोक नक्की याच ग्रहावर राहतात ना असा प्रश्न पडतो.

मन Wed, 01/10/2014 - 11:23

In reply to by मी

एकाच गटाला घेऊन एकत्रितपणे काही करायचे असल्यास, ते करण्यासाठी गटातील सर्व व्यक्ती सक्षम(तात्त्विक दृष्ट्याही) असतील याची खात्री करावी आणि ते तसे नसल्यास, बहुसंख्यांसाठी जे योग्य असेल ते करावे पण त्याच वेळेस अल्पसंख्यांकांना सहभागी होण्याची पुरेशी संधी उपलब्ध करुन द्यावी, जेणेकरुन बहुसंख्य सक्षम असुनही त्यांची गती कमी होणार नाही व अल्पसंख्यांकानाही योग्य संधी मिळेल.

कसं भारतातल्या नेतेमंडळींसारखं आदर्श वगैरे वाक्य आहे.
ह्याला हे मिळावं; शिवाय त्यालाही ते मिळावं. वा वा वा.
मजाय.
.
आदर्श आहे; पण सगळच अमूर्त, एबस्ट्रॅक्त आणि संदिग्ध.
अंमलात आणायला गेलात तर घोळ व्हनारच.

मी Wed, 01/10/2014 - 12:13

In reply to by मन

आदर्श आहे; पण सगळच अमूर्त, एबस्ट्रॅक्त आणि संदिग्ध.
अंमलात आणायला गेलात तर घोळ व्हनारच.

घोळ झाला तर अंमलबजावणीत असेल, भुमिका तरीही स्पष्ट असेल.

गवि Wed, 01/10/2014 - 11:30

समजा.. अशावेळी या पूर्ण गटाला असे आवाहन केले की अमुक इतका खर्च होणारी पद्धत आपण अवलंबण्याचे ठरते आहे आणि त्याचे स्वरुप हे हे आहे आणि त्यात हे हे फायदे आहेत.

आता एकूण डोईसंख्या जी काही होईल ती क्ष मानल्यास क्ष गुणिले य (प्रतिडोई खर्च) = झ अशी रक्कम खर्च होणार आहे.

आता काही लोकांना (संख्येने कमी) उपरोक्त य या प्रतिडोई खर्चाची जुळणी करणे शक्य नाही.

अशा वेळी क्ष पैकी हे काही लोक वगळून बाकीच्यांनी एकूण खर्च वाटून केला तर सर्वांना सहभागीही होता येईल आणि तडजोडही करावी लागणार नाही.

याठिकाणी फ्लिप्ड क्लासरुम ही बेटर पद्धती आहे हे तुम्ही मान्य केल्याचं दिसतंय म्हणून तसे न करु शकण्याला तडजोड असा शब्द वापरतोय.

पण मग अल्पसंख्यांची खुद्दारी, स्वाभिमान, इत्यादि अ‍ॅबस्ट्रॅक्ट गोष्टी मधे येऊन समस्या उत्पन्न करतील का? की तिथेही ही स्ट्रेटफॉरवर्ड थॉट प्रोसेसच लागू होईल.?

राधिका Wed, 01/10/2014 - 11:35

In reply to by गवि

पण मग अल्पसंख्यांची खुद्दारी, स्वाभिमान, इत्यादि अ‍ॅबस्ट्रॅक्ट गोष्टी मधे येऊन समस्या उत्पन्न करतील का?

या बाबतीत अंदाज करण्यापेक्षा प्रत्यक्ष विचारलेले मला आवडेल.
माझ्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत बाहेर जेवायला जाताना त्यांनी माझ्यापुढे ठेवलेला पर्याय मला पटला होता आणि मी तो मान्य केला होता. तो म्हणजे त्यांनी त्या दिवसापुरता माझा खर्च करणे आणि माझी कडकी गेल्यावर मी त्यांना ते पैसे परत करणे. परंतु, अमुक इतक्या दिवसांनी माझी कडकी जाणार आहे हे निश्चितपणे माहीत असल्याने आणि त्या मित्र-मैत्रिणींकडून उसने पैसे घेण्याइतकी माझी त्यांच्याशी जवळीक असल्याने ते शक्य झाले.

गवि Wed, 01/10/2014 - 11:40

In reply to by राधिका

प्रत्यक्षच विचारले आहे, अंदाज केलेला नाही हे नम्रपणे नमूद करु इच्छितो. कट्टा या विषयाला पॅरेलल क्लासरुमचे उदाहरण घेऊन प्रत्यक्षता तुम्हीच कमी केली आहे, तरीही मी आवर्जून "कट्टा" या बाबत न विचारता तुम्ही घेतलेल्या क्लासरूमच्या उदाहरणालाच गृहीत धरुन विचारले आहे. हे अधिक चांगल्या प्रकारे "प्रत्यक्ष" विचारणे नव्हे का?

राधिका Wed, 01/10/2014 - 11:44

In reply to by गवि

पण मग अल्पसंख्यांची खुद्दारी, स्वाभिमान, इत्यादि अ‍ॅबस्ट्रॅक्ट गोष्टी मधे येऊन समस्या उत्पन्न करतील का?
ही वाक्यरचना मला अंदाजात्मक वाटते. अल्पसंख्यांना थेट प्रश्न विचारला असता, तर त्याला मी प्रश्न मानले असते. असो. तुमचा एकूण मुद्दा कळला, त्याला सहमती आहे, त्यामुळे शब्दांचे अधिक कीस काढत बसत नाही.

कट्टा या विषयाला पॅरेलल क्लासरुमचे उदाहरण घेऊन प्रत्यक्षता तुम्हीच कमी केली आहे

मी तसे केलेले नाही. मला माझ्या तत्त्वाबद्दल चर्चा करायची आहे. माझ्या मते हे तत्त्व कट्टा आणि अभ्यासवर्ग या दोघांनाही लागू होते. पण म्हणून अभ्यासवर्ग हे उदाहरण मी कट्ट्यासाठी वापरलेले नसून माझ्या तत्त्वासाठी वापरलेले आहे.

मेघना भुस्कुटे Wed, 01/10/2014 - 15:27

In reply to by राधिका

अल्पसंख्यांना 'थेट' प्रश्न विचारला जावा, असा अट्टाहास आणि इगो कशासाठी? इथल्या अल्पसंख्यांची जमीन बळकावली जाते आहे की त्यांच्या उपजीविकेवर गदा येते आहे? त्यांनी स्वतःहून आपल्या अडचणी मांडल्या, तर काय बिघडले?

राधिका Wed, 01/10/2014 - 15:33

In reply to by मेघना भुस्कुटे

अर्थाचा अनर्थ करू नये. मी असे म्हटलेले नाही. आम्हा दोघांचे या बाबतीतले संभाषण पूर्ण वाचावे.

मन Wed, 01/10/2014 - 11:43

In reply to by गवि

स्वतःला त्या जागेत कल्पूओन पाहिलं.
माझ्या खाण्याचा खर्च "मला परवडत नाही" म्हणून कुणीतरी करणं अत्यंत अपमानास्पद वाटलं.
अशा ठिकाणी मी काही जाणार नाही.
(कुणी पार्टी देतोय, तर जायला काहिच संकोच नाही.
पण बाकीचे कॉण्ट्री करत असताना मला तिथे कॉण्ट्री करता येत नसेल; तर मी जाणार नै.
)
.
.
ह्या उलट मला एखाद्या भारी ठिकाणी शिकायला जायचं आहे; किंवा संशोधन वगैरेसाठी रक्कम/मदत हवी आहे;
आणि ती मला कुणी देउ केली तर मी ती बिनदिक्कत स्वीकारेन.(शिष्यवृत्ती वगैरे)
किंवा माझं ध्येय असलेल्या कार्यासाठीही कुणी मदत दिली तर सहज स्वीकारेन. (देणगी वगैरे)
तूर्तास तसलं उदात्त ध्येय किंवा स्टॅनफोर्ड्-हार्वर्ड्-केंब्रिज्-ऑक्सफर्‍द वगैरेमधली अ‍ॅडमिशन लेटर्सवगैरे काहिच हाती नाही.
त्यामुळे ती हायपोथेटिकल केस ठरते.

ऋषिकेश Wed, 01/10/2014 - 11:35

माझ्या दृष्टीने एकाच गटाला घेऊन एकत्रितपणे काही करायचे असल्यास, ते करण्यासाठी गटातील सर्व व्यक्ती सक्षम असतील याची खात्री करावी आणि ते तसे नसल्यास, सर्वांच्या क्षमतेत बसणार्‍या गोष्टीच फक्त कराव्यात हेच योग्य आहे.

सदर विधान प्रत्येक प्रकारच्या गटाला लागु होऊ शकत नाही.
१. गटातील सहभाग ऐच्छिक असल्यास अर्थातच सदर तत्त्व मला अजिबात मान्य नाही
२. गटातील सहभाग अनिवार्य असल्यास एका मर्यादेत सदर बाब एक "असे बहुमताच्या मान्यतेने करावे" म्हणून मान्य आहे, पण बहुतकरून याही बाबतीत एक ठोस तत्त्व म्हणून मला मान्य नाही.

गटातील प्रत्येक व्यक्ती सक्षम होईपर्यंत थांबावे हे जे आधीच सक्षम झाले आहेत त्यांच्यावर अन्यायकारक ठरते. त्यात जर बहुमत सक्षम असेल तर अल्पांसाठी बहुमताच्या संधी हिरावून घेणे गैर वाटते. अशावेळी, अक्षम अशा अल्पसंख्य गटाला बहुसंख्यांइतकी सक्षमता आणण्यासाठी बहुसंख्यांनी विशेष प्रयत्न करावेत व त्यांच्या क्षमतेत वृद्धी कशी होईल ते पहावे असे वाटते. (उदा. वरील प्रसंगात ज्यांच्याकडे इंटरनेट आहे त्यांनी नसलेल्या मुलांना मदत करणे, किंवा ज्यांच्याकडे अतिरिक्त मशीन आहे त्यांनी ते शेअर करणे. किंवा अशा मुलांना वर्गातील इतरांनी आळीपाळीने आपले मशीन वापरायला देणे वगैरे)

थोडक्यात सदर विधान काही वेळी मान्य असण्याची शक्यता आहे, मात्र बहुतांश वेळी हे वेगवेगळ्या प्रमाणात अमान्यच असेल

राधिका Wed, 01/10/2014 - 13:12

In reply to by ऋषिकेश

गटातील प्रत्येक व्यक्ती सक्षम होईपर्यंत थांबावे हे जे आधीच सक्षम झाले आहेत त्यांच्यावर अन्यायकारक ठरते. त्यात जर बहुमत सक्षम असेल तर अल्पांसाठी बहुमताच्या संधी हिरावून घेणे गैर वाटते. अशावेळी, अक्षम अशा अल्पसंख्य गटाला बहुसंख्यांइतकी सक्षमता आणण्यासाठी बहुसंख्यांनी विशेष प्रयत्न करावेत व त्यांच्या क्षमतेत वृद्धी कशी होईल ते पहावे असे वाटते. (उदा. वरील प्रसंगात ज्यांच्याकडे इंटरनेट आहे त्यांनी नसलेल्या मुलांना मदत करणे, किंवा ज्यांच्याकडे अतिरिक्त मशीन आहे त्यांनी ते शेअर करणे. किंवा अशा मुलांना वर्गातील इतरांनी आळीपाळीने आपले मशीन वापरायला देणे वगैरे)

हे मला मान्य आहेच. म्हणूनच कट्ट्याच्या बाबतीत याहून वेगळे मत असण्याचे आश्चर्य वाटते आहे.

सदर विधान प्रत्येक प्रकारच्या गटाला लागु होऊ शकत नाही.
१. गटातील सहभाग ऐच्छिक असल्यास अर्थातच सदर तत्त्व मला अजिबात मान्य नाही
२. गटातील सहभाग अनिवार्य असल्यास एका मर्यादेत सदर बाब एक "असे बहुमताच्या मान्यतेने करावे" म्हणून मान्य आहे, पण बहुतकरून याही बाबतीत एक ठोस तत्त्व म्हणून मला मान्य नाही.थोडक्यात सदर विधान काही वेळी मान्य असण्याची शक्यता आहे, मात्र बहुतांश वेळी हे वेगवेगळ्या प्रमाणात अमान्यच असेल

याची उदाहरणे देता येतील का? म्हणजे नेमके कधी अमान्य होईल याची.

ऋषिकेश Wed, 01/10/2014 - 13:21

In reply to by राधिका

तिथेही अक्षम सदस्यांनी विनंती केल्यास बहुसंख्य त्यांची अक्षमता सामावून घेतील/मदत करतील याची खात्री आहे. (उदा. जर एखाद्या सदस्य कमावता नसेल मात्र त्याची कट्ट्याला यायची इच्छाच असेल तर त्यास काही प्रमाणात आर्थिक सवलत देता येईल (व उर्वरीत पैसे इतरांनी वाटून घेणे) किंवा त्यास मंजूर असल्यास इतर कोणी त्याचे पैसे भरायचे मान्य करू शकतो किंवा सदर सदस्याला जितके हवे तितके त्याने खावे व केवळ त्याचेच पैसे द्यावे असेही सर्वानुमते ठरू शकते.

मात्र, बहुसंख्य सक्षमांची इच्छा असुनही, मी अक्षम आहे म्हणून माझ्या अक्षमतेसाठी (किंवा मला ती क्षमता येईपर्यंत) या या ठिकाणी कट्टाच नको हे गैर वाटते.

राधिका Wed, 01/10/2014 - 13:25

In reply to by ऋषिकेश

हे मला पटले.

तिथेही अक्षम सदस्यांनी विनंती केल्यास बहुसंख्य त्यांची अक्षमता सामावून घेतील/मदत करतील याची खात्री आहे. (उदा. जर एखाद्या सदस्य कमावता नसेल मात्र त्याची कट्ट्याला यायची इच्छाच असेल तर त्यास काही प्रमाणात आर्थिक सवलत देता येईल (व उर्वरीत पैसे इतरांनी वाटून घेणे) किंवा त्यास मंजूर असल्यास इतर कोणी त्याचे पैसे भरायचे मान्य करू शकतो किंवा सदर सदस्याला जितके हवे तितके त्याने खावे व केवळ त्याचेच पैसे द्यावे असेही सर्वानुमते ठरू शकते.

यापैकी काहीही आज सकाळच्या आधीपर्यंत झाले नव्हते हे नमूद करू इच्छिते.

राधिका Wed, 01/10/2014 - 13:35

In reply to by ऋषिकेश

अजूनही झालेले नाही.

माझे म्हणणे असे होते की, सर्वांना परवडणार नसलेला पर्याय बहुसंख्यांचा म्हणून मान्य करायचं झालं तर अल्पसंख्यांची कशी सोय लावता येईल याचा विचार आज सकाळच्या आधीपर्यंत झाला नव्हता.

मेघना भुस्कुटे Wed, 01/10/2014 - 14:19

In reply to by राधिका

'अल्पसंख्यांचे काय' या प्रश्नाचा तलास लावण्यासाठी म्हणून कुणी कट्टे आखत नाही. 'चला, जमून धिंगाणा करू' अशा उद्देशानं आखतात. मग अक्षम लोकांनी तशी विशेष विनंती केली, तर आपोआपच प्रश्नांवर उत्तरे निघतात. पण आधी लग्न अक्षमांचे आणि मग क्षमता असलेल्यांचे, असे घडत नाही.

राधिका Wed, 01/10/2014 - 15:05

In reply to by मेघना भुस्कुटे

आणि इतरत्र मला लावून धरायचाय तो मुद्दा हाच, की अल्पसंख्यांकांनी विनंती केली की दुर्लक्ष होतंय. आणि खूप लावून धरलं तर त्यांची विनंती मान्य होईल आणि इतरांचीही गैरसोय होणार नाही असा पर्याय आहे का हे न शोधताच त्याला कानपिचक्या दिल्या जातायत.

मेघना भुस्कुटे Wed, 01/10/2014 - 15:30

In reply to by राधिका

अल्पसंख्य असण्याचे तोटे असतातच.

(हे लिहून मला आता कंटाळा आलाय, पण बॅट्याच्या पाया पडून पुन्हा एकदा लिहितेय) जोवर जीवनावश्यक हक्कांवर गदा येत नाही, तोवर अल्पसंख्यांवरचे सगळे अन्याय दूर करणं व्यवहार्य तर असत नाहीच, शिवाय समर्थनीयही असत नाही.

कट्टा कुठल्याच अर्थानं जीवनावश्यक नाही.

यात तुला अन्याय वाटत असेल, तर त्याला लोकांचा नाईलाज आहे.

राधिका Wed, 01/10/2014 - 15:37

In reply to by मेघना भुस्कुटे

मग नको सांगूस परत.
मी काढून दिलेल्या व्यवहार्य उपायाला नाकारायला पटण्याजोगं कारण द्दे.

Nile Wed, 01/10/2014 - 11:54

एक समांतर उदाहरण देतो.

'पॉट लक' हा पाश्चात्य लोकांचा 'कट्टा'. (यात पाश्चात्य भारतीयही आले.) प्रत्येकाने एक-दोन खायच्या गोष्टी बनवून आणणे आणि एकत्र बसून खाणे हा एकंदर कार्यक्रम. (घरी, किंवा बाहेर) या गोष्टी बरेच वेळा आधीच (कमी-अधिक ढोबळपणे) ठरवल्या जातात, डुप्लिकेशन्स वगैरे होऊ नये म्हणून किंवा साधारण जेवणात सगळे प्रकार यावेत म्हणून. माझी इथे समांतर क्षमता म्हणजे स्वयंपाक करणे. पॉट लक साठी काहीतरी बनवून घेऊ जाणे मला एकंदरीत वेळखाऊ आणी कंटाळवाणे वाटते. (अर्थात, क्वचित वेगळे काही बनवण्याचा मूड असेल तर मी भाग घेतो), शिवाय कोण काय कोण काय बनवणार हे ठरवणे (जसे कट्टा कुठे ठरवणे) एक वैतागवाणे काम असते. अशा वेळी मी या पॉटलक्स ना न जाणेच पसंत करतो. ज्यांना माझ्याबद्दल माहीत आहे ते, अरे तु फक्त ड्रिंक्स घेऊन ये, बनवत बसू नकोस असे सांगतात तेव्हा मी जातो.

सांगायचा मुद्दा, कट्टा, पॉटलक या गोष्टींत समानता कधीच नसते, ती असावी अशी अपेक्षा अवाजवी वाटते. प्रत्येक जण काहीतरी कॉम्प्रोमाईझ करत असतोच. तुम्ही काय कॉम्प्रोमाईझ करायला तयार आहात हे ठरवावं आणि त्यानुसार जायचं का नाही हा निर्णय घ्यावा.

(बाकी, याला समानता म्हणणं जरा जास्तच स्ट्रेच आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या चर्चांमध्ये 'समानता' या विषयावर झालेली चर्चा या करता बघावी.)

राधिका Wed, 01/10/2014 - 11:58

In reply to by Nile

या प्रतिसादाचा या चर्चेशी कसा संबंध आहे ते लक्षात आले नाही. मी 'क्रयशक्ती'बद्दल बोलते आहे, आवडीनिवडी किंवा स्वंयपाक जमणे अशा गोष्टींबद्दल नाही.

Nile Wed, 01/10/2014 - 12:00

In reply to by राधिका

न जमण्याबद्दल किंवा आवडीनिवडीबद्दल मीही लिहलेले नाही. स्वयंपाक करण्याकरता (+इतर सोपस्कार) वेळ खर्चण्याची म्हणून 'समांतर क्षमता' असे प्रतिसादात लिहलेले आहे.

राधिका Wed, 01/10/2014 - 12:02

In reply to by Nile

आपले नेमके वाक्य

माझी इथे समांतर क्षमता म्हणजे स्वयंपाक करणे.

याचा अर्थ स्वयंपाक करता येणे असा मी घेतला.

राधिका Wed, 01/10/2014 - 12:12

In reply to by Nile

तुमच्या मित्रमंडळींनी तुम्हाला सहभागी होण्यासाठी पुरेशी संधी उपलब्ध करून दिल्याचे दिसते. तेव्हा सहभागी होताच येणार नाही अशी परिस्थिती आपल्या बाबतीत उद्भवलेली नसल्याने या उदाहरणाचे या चर्चेतले प्रयोजन काय?

Nile Wed, 01/10/2014 - 12:20

In reply to by राधिका

जेव्हा असते तेव्हा जातो, जेव्हा नसते तेव्हा जात नाही. जेव्हा असते तेव्हाही जाईनच असे नाही. जेव्हा नसते तेव्हा त्यांनी तशी संधी मला उलपब्ध करून द्यावीच असे मला वाटत नाही.

तुम्हाला जर चर्चा कट्ट्यांसंबंधीच करायची असेल तर तसे स्पष्टपणे लिहा. कारण तुम्ही लेखात दिलेले उदाहरण तुमच्याच चर्चेत उपयोगाचे नाही असे वरच्या प्रतिसादांतून स्पष्ट झालेच आहे. मी दिलेले समांतर उदाहरणही तुम्हाला पटलेले नाही. (जे माझ्यामते तुमच्या चर्चेशी सुसंगत आहे.) त्यामुळे 'व्हेगली' चर्चा करण्यात मला काही हशील वाटत नाही.

राधिका Wed, 01/10/2014 - 12:26

In reply to by Nile

तुम्हाला जर चर्चा कट्ट्यांसंबंधीच करायची असेल तर तसे स्पष्टपणे लिहा.

मला चर्चा माझ्या तत्त्वासंबंधी करायची आहे. आणि मी तसे स्पष्टपणे लिहिले आहे.

तुम्ही लेखात दिलेले उदाहरण तुमच्याच चर्चेत उपयोगाचे नाही असे वरच्या प्रतिसादांतून स्पष्ट झालेच आहे.

हो का? कसं काय बुवा?

मी दिलेले समांतर उदाहरणही तुम्हाला पटलेले नाही.

नाहीच पटले.

समांतर उदाहरणाचे माझे निकष :
क्रयशक्ती नसल्याने एखाद्या कार्यक्रमात त्यातील मुख्य गोष्टींना वंचित न राहता भाग घेता न येणे हा उदाहरणाचा मुख्य मुद्दा असावा.

Nile Wed, 01/10/2014 - 12:41

In reply to by राधिका

मला चर्चा माझ्या तत्त्वासंबंधी करायची आहे. आणि मी तसे स्पष्टपणे लिहिले आहे.

तुमचे (लिहलेले) तत्त्व एकाच वेळी कट्टा आणि तुमचे शैक्षणिक उदाहरण याला लागू होत नाही असे माझे म्हणणे आहे. (म्हणूनच पहिल्या प्रतिसादात समानता याबद्दल तुमचा गोंधळ होतो आहे असे लिहले आहे.)

हो का? कसं काय बुवा?

मेघना आणि तुमच्या संवादात मला तरी ते दिसले (वाचा: "परत एकदा - हे अभ्यासवर्गाच्या बाबतीत असेल, तर हो. कट्ट्याच्या बाबतीत? नाही." या प्रतिसादा संबंधी चर्चा.) अर्थातच, तुम्हाला हे मान्य दिसत नाही.

क्रयशक्ती नसल्याने एखाद्या कार्यक्रमात त्यातील मुख्य गोष्टींना वंचित न राहता भाग घेता न येणे हा उदाहरणाचा मुख्य मुद्दा असावा.

१. नाचता न येणार्‍याला बॅले डान्स ग्रुपमध्ये (क्लास नव्हे) भाग घेता न येणे ही असमानता आहे का?
२. कोणतेच वाद्य वाजवता न येणार्‍याला 'म्युझिकल बँड' मध्ये भाग घेता न येणे ही असमानता आहे का? (असे 'इन्फॉर्मल बँड्स आणि ग्रुप्स चिक्कार असतात, काल्पनिक उदाहरण नाही.)
३. गिर्यारोहण करणार्‍यांच्या गटात शारीरिक क्षमता नसल्याने जाता न येणे ही असमानता आहे का?

असो. मला जेव्हढा तुमचा मुद्दा कळला त्यानूसार प्रतिसाद दिला. याउपर काही नविन चर्चेस नसल्याने माझ्यातर्फे विराम.

राधिका Wed, 01/10/2014 - 13:00

In reply to by Nile

मी एवढे काय अनाकलनीय बोलत आहे हेच मला कळत नाहीये.

तुम्ही या प्रतिसादा डान्स ग्रुपची वगैरे उदाहरणे दिली आहेत, त्यात मुळात तयार असलेला एक गट आणि त्यात नवागताला प्रवेश हे समानसूत्र आहे. दुसरे म्हणजे गटाच्या बांधणीसाठीचा मुख्य निकष नवागताने पूर्ण न करणे हेही एक समानसूत्र आहे.

माझ्या अभ्यासवर्गाच्या उदाहरणात तसे नाहीये आणि कट्ट्याच्या बाबतीत तर तसे मुळीच नाहीये. ऐसीकरांची बांधणी करणारे समानसूत्र विचारांची देवघेव करणे यात असलेला रस हे आहे. कट्ट्याचा मुख्य उद्देश प्रत्यक्षात भेटून विचारांची देवघेव करणे हे आहे. केवळ विचारांची देवघेव करावी हा एवढाच उद्देश असताना बहुसंख्यांनी महागड्या हाटलांचा आग्रह धरणे आणि तेवढी क्रयशक्ती नसलेल्यांनी विरोध करणे यात मला काहीच चूक दिसत नाही. यात इतर कुणालाही चूक दिसत नाहीये.

मतभेदाचा मुद्दा हा आहे, की गप्पा मारणे हे ज्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे, त्या कार्यक्रमात भाग घ्यायला क्रयशक्ती हा निकष असू शकतो का?

राधिका Wed, 01/10/2014 - 13:04

In reply to by Nile

दरडोई किमान ५०० रु. खर्च होतील अशा हाटलात जाऊन कट्टा करणे आणि त्या निमित्ताने गेलोच आहोत, तर थोड्या गप्पा मारणे असे जर कट्ट्याचे उद्दिष्ट असेल, तर बरोबर आहे बुवा. तिथे माझा विरोध पूर्णपणे चुकीचा.

Nile Wed, 01/10/2014 - 13:11

In reply to by राधिका

मुळ मुद्यावर आल्याबद्दल धन्यवाद.

दरडोई किमान ५०० रु. खर्च होतील अशा हाटलात जाऊन कट्टा करणे

१. अशी कंडिशन कोणत्या कट्ट्यात लावली होती?
२. अशी कंडिशन कोणी लावली होती?
२अ. ज्यांना कट्ट्यात जायची इच्छा आहे, त्यांना ही कंडिशन नाकारण्याची शक्यता नव्हतीच का?
३. ज्यांना किमान ५०० रुपये खर्च होतील अशाच हाटेलांत जाऊन खायचे आहे त्यांच्या कट्ट्यांना सर्वांनीच गेले पाहिजे असा हट्ट का?

राधिका Wed, 01/10/2014 - 13:23

In reply to by Nile

अच्छा, म्हणजे इतका वेळ तुम्हाला हवा असलेला मुद्दा मी काढत नाहीये म्हणून विरोध होता का?

असो.

अशी कंडिशन कोणी लावली होती असे मी म्हटलेलेच नाही तेव्हा

१. अशी कंडिशन कोणत्या कट्ट्यात लावली होती?
२. अशी कंडिशन कोणी लावली होती?
२अ. ज्यांना कट्ट्यात जायची इच्छा आहे, त्यांना ही कंडिशन नाकारण्याची शक्यता नव्हतीच का?
३. ज्यांना किमान ५०० रुपये खर्च होतील अशाच हाटेलांत जाऊन खायचे आहे त्यांच्या कट्ट्यांना सर्वांनीच गेले पाहिजे असा हट्ट का?

हे सर्व प्रश्न बाद.

बाकी, तुम्हाला केवळ कट्ट्याचाच मुद्दा 'मूळ' वाटत असल्याने तुमच्यापुरता मी केवळ त्यावरच प्रतिवाद करायचे ठरवते.
ठाण्याच्या कट्ट्यात पुढील गोष्टी घडल्या.
१. साधारण ३५० रु. दरडोई खर्च होईल असा गविंनी आधीच अंदाज दिला होता ते ठिकाण कट्ट्याचे ठिकाण म्हणून ठरले.
२. मला एवढा खर्च होणे परवडणार नाही त्यामुळे मी जेवणार नाही असे मी जाहीर केले.
३. प्रत्यक्षात कट्टा सुरू झाला तोच पॉप टेट्समध्ये आणि तिथेच ९ पर्यंत चालू राहिला. शिवाय माझ्या राहण्याच्या जागेहून ते ठिकान २ तास लांब असल्याने दुपारी १२ ते रात्री ९ रिकाम्या पोटी राहणे मला शक्य नव्हते.
४. मला कमी खर्चात खाणे तिथेच उपलब्ध होईल अशी सोय आयोजकांनी केली नव्हती.
५. कमी खर्चातले खाणे शोधण्यासाठी मला कट्ट्यातल्या लोकांच्या सोबतीचा काही वेळ वाया घालवावा लागला असता. कट्टा त्याच ठिकाणी ठेवणे आणि त्या संपूर्ण कालावधीत तिथेच थांबणे या कारणांनी एकटीने (हो कारण कडकी फक्त माझी एकटीचीच होती) कट्टा सोडून काही काळासाठी जाणे, भुकेले राहणे आणि परवडत नसताना तेवढे पैसे खर्च करून खाणे यांपैकीच कोणतातरी एक पर्याय माझ्यावर लादला गेला.
६. त्यांपैकी जो पर्याय मी निवडला तो निवडण्याची जबाबदारी माझी, पण यातला कोणताही पर्याय निवडला असता, तरी असंतोष चुकला नसता. शिवाय, कट्टेकर्‍यांची सोबत काही काळासाठी सोडायला लागणे यामुळे मी कट्ट्याच्या मुख्य उद्देशापासून वंचित राहिले असते किंवा भुकेली राहिल्याने जीवनावश्यक गोष्टीपासून वंचित राहिले असते किंवा पैसे भरल्यास ते माझ्यावर अन्यायकारक होते. कारण मुळात मला तिथे खायचेच नव्हते आणि मी या गटाची एक भाग असल्याने मुख्य उद्देशापासून किंवा जीवनावश्यक गोष्टीपासून ज्यामुळे मला वंचित रहावे लागेल केवळ असेच पर्याय गटातील इतरांनी माझ्यासमोर ठेवणे मला अन्यायकारक वाटते.

ऋषिकेश Wed, 01/10/2014 - 13:30

In reply to by राधिका

मला कमी खर्चात खाणे तिथेच उपलब्ध होईल अशी सोय आयोजकांनी केली नव्हती.

एक्सक्युज मी, तिथे कोणीही आयोजक वगैरे नव्हते. सगळे जण जमले होते.
सदर वाक्य जबाबदारी झटकणारे वाटले. :(

इतका वेळ मी धागा जनरीक समजत होतो. असो. माझ्याकडून या धाग्यावर इत्यलम्
कंटाळलो!

राधिका Wed, 01/10/2014 - 13:33

In reply to by ऋषिकेश

हा कट्टा ठाण्यात करायचा असे स्वतःच ठरवले आणि वेळ, जागा इ. ठरवली, त्यांना मी आयोजक मानते. जर बहुमताने कुठे कट्टा करायचा हे ठरले असते, तर 'सगळे जमले होते' असे मी म्हणाले असते.

अजो१२३ Wed, 01/10/2014 - 13:36

In reply to by राधिका

पुढच्या वेळी जनरली आपल्या संभाव्य अडचणींची कल्पना द्या. तुम्हाला त्रास होऊ नये याची शक्य तितकी दखल लोक घेतील.

अजो१२३ Wed, 01/10/2014 - 13:56

In reply to by राधिका

तुम्हाला गैरसोय झाली असेल. त्यात कोणाचा काही अंशी दोष असू शकेल. पण हे सगळं मुद्दाम,त्रास द्यायला वैगेरे केलेलं नसतं. सगळं खेळीमेळीचं वातावरण असतं. कृपया आपली काही तक्रार असेल तर योग्य त्या व्यक्तिकडे व्यनितून मांडा. आपला सगळा गैरसमज दूर होण्याची संभावना आहे.
--------------
कट्टा बिट्टा खूप भारी प्रकार आहे. त्याबद्दल अशा चर्चा व्हायला लागल्या तर लोकांचे मोराल अफेक्ट होईल. आपली कोणतीही अडचण (आर्थिकही) असल्यास पूर्वकल्पना द्या. मला तरी ऐसीवर एका व्यक्तिने वा गटाने कट्ट्याच्या वेळी "सोय बघण्याची गरज न वाटल्याने" "दखल घेतली नाही" इ इ वाचायला अवघड वाटत आहे.

राधिका Wed, 01/10/2014 - 14:03

In reply to by अजो१२३

जसा तुमचा हा गैरसमज झाला तसा इतरांचा होऊ नये म्हणून.

मी एक तात्त्विक मुद्दा म्हणून यावर चर्चा करते आहे. त्या कट्ट्यानंतर माझ्या इतर कट्टेकर्‍यांशी खूपच चांगल्या गप्पा झाल्या, मी त्यात कुणालाही काहीही दोष दिला नाही. आणि आता ही चर्चा चालू असतानाही एकीकडे आमचे व्य.नि. मधूनमधून चालू आहेत.

प्रश्न हा आहे, की असे करण्यामध्ये कोणाला वावगे कसे वाटत नाही?

सविता Wed, 01/10/2014 - 13:43

In reply to by राधिका

I would call them facilitator, this was a general gathering.

असो, तो कट्टा जर तुम्हाला परवडत नव्हता तर तेथे जाणे टाळून दुसर्या कट्टयाचे आवाहन ज्यात तुमच्या क्रायटेरिया मध्ये बसणारे स्थळ असेल, तुम्ही करू शकत होता. आधीच्या कट्टयाचे चार दोन सदस्य गैरहजर राहिले असते, अजून कोणी नवीन चार सदस्य आले असते!

हे तुम्ही का केले नाही? ही काही फॅार्मल सभा नव्हती की एकदा झाली की परत दुसर्या वर्षीच संधी!

राधिका Wed, 01/10/2014 - 13:47

In reply to by सविता

मी कट्टा आयोजित केला नाही अशी खात्रीलायक माहिती तुमच्याकडे आहे का?

प्रत्यक्षात केला होता, आयोजित केला होता म्हणजे कार्यक्रम आखून दिला होता. त्यात सर्वांना दरडोई खर्चाची नीट कल्पना दिली होती. प्रत्यक्षात मीच त्या कट्ट्याला जाऊ शकले नाही हा भाग अलाहिदा.

सविता Wed, 01/10/2014 - 14:04

In reply to by राधिका

मग गविंनी पण खर्चाची कल्पना दिलीच होती!

असो, हे फार पर्सनल होत चालले आहे त्यामुळे मी थांबते.

बाकीदर वेळी खर्चिकच जागा असु नयेत व लंबुळक्या टेबलावर १५-२० जणांचा ग्रुप बसला तर एका मोठ्या ग्रुपच्या गप्पा न होता छोटे ३-४ ग्रुप होऊन गप्पा होतात ह्याच्याशी सहमत!

बाकी माझे विचाराल तर लोकांना भेटण्याबरोबर नवीन जागा ट्राय करणे, जुन्याच आवडत्या जागी नवीन लोकांबरोबर वेळ घालवणे हे पण हेतु असतात.

पुणे कट्टयाला शाकाहारी साउथ इंडियन जेवणाला ५००+ मला वर्थ वाटत नल्हते, त्यापेक्षा वीकडेजना तिथेच स्वस्त डील असते त्या किमतीत ट्राय करावे असा माझा मानस होता, पण वर्ष झालं तरी योग जुळून येत नव्हता मग अनायासे कट्टा तिथे ठरतोय तर जास्त पैसे देऊन का होइना ट्रायल होतेय व नवीन लोक भेटतात हे कॅम्बोमला व्रथवाटले.

मेघना भुस्कुटे Wed, 01/10/2014 - 14:11

In reply to by राधिका

पण नाही पटल्या लोकांना. लोकांना काय पटावं आणि काय नाही, हे आपण कसं ठरवणार? तू इथे कितीही वेळा 'हे वावगं नाही का?' असं आळवून आळवून म्हणालीस, तरी आपले बहुमत असताना, एका माणसासाठी लोक स्वतःची गैरसोय करायला तयार होत नाहीत, हे उरतंच. ते का स्वीकारत नाही?

अनुप ढेरे Wed, 01/10/2014 - 14:15

In reply to by मेघना भुस्कुटे

आपले बहुमत असताना, एका माणसासाठी लोक स्वतःची गैरसोय करायला तयार होत नाहीत, हे उरतंच. ते का स्वीकारत नाही?

रोचक वाक्य आहे.

अपरिमेय Wed, 01/10/2014 - 14:25

In reply to by राधिका

गैरसोयी या व्यक्तीसापे़क्ष असतात. तुम्ही सुचवलेले पर्याय न निवडता लोक दुसरीकडे गेले कारण त्यांच्यामते तो दुसरा पर्याय जास्त योग्य आणि कमी गैरसोयीचा होता.

मेघना भुस्कुटे Wed, 01/10/2014 - 14:26

In reply to by राधिका

माझ्या वैयक्तिक भूतकाळामुळे मला एखाद्या ठिकाणी जाणे नकोसे वाटते, इतकेही कारण गैरसोय व्हायला पुरेसे रास्त आहे. फक्त त्यामुळे बाकी सगळ्यांनी तिथे न जमता मला हवे तिथे जमावे, ही इच्छा अवाजवी आहे.

घनु Wed, 01/10/2014 - 15:19

In reply to by राधिका

पण मुळात "पार्क" किंवा गार्ड्न वा उघड्यावरची जागा ह्यावरच तेव्हा बहुजनांचा नकार असेल तर मुंबईत कितीही पार्क असतील तर तो मुद्दा बादच आहे.

राधिका Wed, 01/10/2014 - 15:28

In reply to by घनु

उघड्यावरचे पॉप टेट्स चालले. उघड्यावरच्या पार्क गार्डनांनी काय घोडं मारलंय?

डासांचा त्रास होणार नाही म्हणून सकाळी भेटता येईल. जवळ चांगल्या टॉयलेट्सची सोय असलेली किमान दोन पार्कं मला माहीत आहेत. अजून काय हवंय?

घनु Wed, 01/10/2014 - 15:41

In reply to by राधिका

पण पॉप टेट्स हे हॉटेल होतं... लोकांना उघडी जागा प्लस हॉटेल असा पर्याय असेल तर तो त्यांनी निवडला दॅन जस्ट उघडी जागा किंवा फक्त हॉटेल. कदाचित त्यांनी तो सुवर्ण मध्य तुमच्या साठी काढला असावा असंही असू शकतं कारण तुम्ही पार्क सुचवत होत्या आणि काहींना हॉटेल हवं होतं...

घनु Wed, 01/10/2014 - 16:03

In reply to by राधिका

सामावून घेणे हे दरवेळी सहज शक्य असतेच असे नाही, ह्याच्याशी सहमत. पण म्हणून "समानतेवरच" प्रश्न उठावा हे अयोग्य.
कोणी अल्पसंख्यकांसाठी सुवर्णमध्य गाठत असेल पण त्या सुवर्णमध्यातही अल्पसंख्यकांना सामावून घेणं शक्य नसेल तर अजून काय करावं अशी अपेक्षा आहे? ह्या साठी बहुसंख्याकांनी अल्पसंख्यांकांसाठी मुरड घालावी अशी अपेक्षा तर खेदाने म्हणावे लागेल की ती अवाजवी अपेक्षा आहे.

राधिका Wed, 01/10/2014 - 17:26

In reply to by घनु

लिहायला मल तर कंटाळा येत नाहीये ब्वॉ आज. त्यामुळे पुन्हा एकदा.

त्या सुवर्णमध्यातही अल्पसंख्यकांना सामावून घेणं शक्य नसेल तर अजून काय करावं अशी अपेक्षा आहे?

आधी इथपर्यंत या मग त्याच्यापुढची अपेक्षा पाहू. इथपर्यंत न येताच असं झालं तर काय होईल तसं झालं तर काय होईल याला काही अर्थ नाही.

गवि Wed, 01/10/2014 - 17:44

In reply to by राधिका

अशी समजूत का झालीय की कोणी सुवर्णमध्यापर्यंत आलेलेच नाहीत ? आणि हे मोजायचं कसं ?

इतरांपैकी कोणाला वाटत असेल की त्यांच्या सुवर्णमध्याच्या बरेच पलीकडचे ऑप्शन्सच चर्चिले आणि लादले जाताहेत तर नक्की तसे लिहा इथे. उत्सुकता आहे की हे कन्क्लुजन कसे काढले जातेय?

मी स्पष्ट म्हणू शकतो की मी बारबेक्यूनेशन किंवा थाउजंड ओक्स या माझ्या आवडत्या ठिकाणी कट्टा झाल्यास सर्वाधिक खूष झालो असतो. रणजित, पुणे गेट हे ऑप्शन्स पर हेड ५०० रुपयांचेही नाहीत. ते तीनशेच्या आसपासचे आहेत. तरीही मेघनाने एका प्रतिसादात अमुकअमुक अटी पूर्ण करणार्‍या ठिकाणासाठी ५००+ खर्च येईल असा अंदाज केल्याने आपण ५०० ला चिकटलो आहोत.

थाउजंड ओक्सवरुन "खाली उतरुन" रणजित किंवा सध्या इथे चर्चेत असलेल्या अनेक हॉटेल्सना स्वीकारण्यात मी तरी माझ्या बेस्ट चॉईसेसपासून बराच दूर आलो आहे. माझ्यापुरता जो केवळ मध्य असेल त्याच्या बराच पलीकडे गेलो आहे.

सुवर्णमध्य म्हणजे काय ?

न खातापिता थिऑरीटिकली कट्टा होऊ शकतो. पण माझ्या वैयक्तिक कल्पनेत मित्रांनी बसून गप्पा मारताना चवीने काही खाण्यापिण्यालाही महत्व आहे. पाहुणे आले तर आपण चहा बिस्किटे, कांदेपोहे कशाला करतो ? काय गरज आहे? गप्पा आणि मनोमीलन झाले की संपले. खर्चही नाही.

असे सर्वांना नाही ना वाटत.. कशाला चटावरचे श्राद्ध उरकल्यासारखे कुठेतरी बागेत जाऊन आणि घरुन खाऊन येऊन किंवा नुसता चहा पिऊन कट्टे करायचे ? तीनचार तास काढायचे एकत्र तर अन्नाने त्याला एक चांगले डायमेन्शन आणि निमित्त मिळते. असो.

राधिका Wed, 01/10/2014 - 17:53

In reply to by गवि

ह्म्म चटावर श्राद्ध उरकल्याप्रमाणे नको, कारने जाण्याच्या अंतरात हवे, रिक्षेची भानगड नको इ. इ. आवडी एकाबाजूला आणि फुकटात किंवा फार फार तर १००रु.त (येण्याजाण्याचा खर्च सोडून) कट्टा करूया हे माझे म्हणणे यांचा सुवर्णमध्य गाठायचा असेल तर तुम्हाला आणखी बरेच खाली यावे लागेल.

कृपया याचीही नोंद घ्यावी, की तुम्ही ज्या प्रकारच्या आवडीनिवडी नोंदवलेल्या आहेत तसे तुम्ही आतापर्यंत एकमेव आहात इथे आणि मीही अशी मागणी करणारी एकमेव आहे. इतर सगळे याच्या मध्ये कुठेतरी असतील.

गवि Wed, 01/10/2014 - 18:02

In reply to by राधिका

देअर यू आर.

तुमचे म्हणणे कसे एका टोकाचे होतेय हे सांगण्यासाठीच मी माझ्या "आयडियल" अपेक्षांचे दुसरे टोक मांडत होतो इतके लक्षात आले यातच आनंद आहे.

आत्ताचे इतरांनी सुचवलेले बहुतांश पर्याय हे सुवर्णमध्याच्या आसपासही नाहीत (किमान तिथपर्यंततरी या हे तुमचे वरील प्रतिपादन) हे तुम्ही कसे ठरवत आहात त्याची उत्सुकता म्हणून तो प्रतिसाद लिहिला होता.

Nile Wed, 01/10/2014 - 13:36

In reply to by राधिका

म्हणजे इतका वेळ तुम्हाला हवा असलेला मुद्दा मी काढत नाहीये म्हणून विरोध होता का?

नाही, बाकीची सगळी उदाहरणं बादरायण होती म्हणून.

अशी कंडिशन कोणी लावली होती असे मी म्हटलेलेच नाही
तेव्हाहे सर्व प्रश्न बाद.

असहमत. २अ मुद्दा कट्ट्यात भाग घेण्यांस इच्छूक लोकांनी कट्टा कुठे/कसा असावा याविषयीच्या सहभागाविषयी आहे. आणि ३. मुद्दा नापसंतीच्या ठिकाणी जायलाच हवे का या विषयी आहे. तेव्हा ते मुद्दे बाद होत नाहीत.

बाकी तुम्ही लिहलेला अनुभव हा वैयक्तिक असल्याने त्यावर टिप्पणी करत नाही(नाहीतर ब्यान व्हायचो). पण वरील दोन मुद्यांचा विचार करता तावर मी भाष्य केलेलं आहे.

एक पर्याय माझ्यावर लादला गेला.

तुम्हाला जायची सक्ती नसल्याने लादला गेलावर असहमती नोंदवतो. याहून अधिक काही लिहण्यासारखे नाही. तेव्हा विराम.

राधिका Wed, 01/10/2014 - 13:37

In reply to by Nile

परंतु तिथे गेल्यावर कळले की आयोजनच अशा प्रकारे आहे की कुठला पर्याय उरत नाही. आधी दुसर्‍या कोणत्यातरी तळ्याकाठी भेटायचे ठरत होते.

व्यक्तिगत अनुभव म्हणून भाष्य करणार अनाही, पण अमुक गोष्ट कोण म्हणाले अमुक गोष्ट कोण म्हणाले नाही असे व्यक्तीवर उतरणारे प्रश्न विचारणार?

मेघना भुस्कुटे Wed, 01/10/2014 - 14:20

In reply to by राधिका

कट्ट्यात कुणीही आयोजक नसते.

लोक जमणार्‍या लोकांना भेटण्याच्या हौसेपायी आनंदाने करावं वाटतं ते करतात. यावर पुन्हा वाद संभवू नये, म्हणून एकदाच स्पष्ट करते आहे.

राधिका Wed, 01/10/2014 - 14:10

In reply to by मी

आपापसात मतभेद असू शकतात. ५०% लोकांना लाल रंगाचा युनिफॉर्म हवा असेल आणि इतर ५०% लोकांना हिरव्या रंगाचा. तर काय करणार?
किंवा ५०% लोकांचा एका पर्यायाचा आग्रह हा आवडीनिवडीवर आधारित असू शकतो तर उरलेल्या ५०% लोकांचा सोयीवर. उदा. ५०% लोकांना क्ष ठिकाणचं चायनीज आवडतं म्हणून तिथेच जायचं की उरलेल्यांना ते ठिकाण दूर पडतंय म्हणून त्यांनी सर्वांना मध्यवर्ती असलेलं चांगल्या चायनीज जेवणाचं ठिकाण सुचवलं तर काय करणार? आवडीला प्राधान्य देणार की सोयीला?

मेघना भुस्कुटे Wed, 01/10/2014 - 14:21

In reply to by राधिका

आवड की सोय, हा प्रश्न नसून बहुसंख्यांचं मत काय हा प्रश्न आहे. अल्पसंख्यांवर अन्याय होऊ नये, असा प्रयत्न असतो. पण पुन्हा अन्यायाची व्याख्या बहुमतानंच ठरते.

अनुप ढेरे Wed, 01/10/2014 - 14:33

In reply to by मेघना भुस्कुटे

पण पुन्हा अन्यायाची व्याख्या बहुमतानंच ठरते.

=))
हे वाक्य तर अजून रोचक आहे. हे मेघनाविरुद्ध एखाद्या वादात नक्की वापरण्यात येईल.

मेघना भुस्कुटे Wed, 01/10/2014 - 14:40

In reply to by बॅटमॅन

ती ठरू नये, हे आदर्श झालं. पण आदर्श व्यवहारात येण्यासाठी आपल्याला पुढाकार घेऊन मुदलात काहीतरी करावं लागतं.

अजो१२३ Wed, 01/10/2014 - 14:51

In reply to by मेघना भुस्कुटे

इकडे राधिकाला असं म्हणणार, दुसरीकडे नरेंद्र मोदींना हेच तत्त्व पायदळी तूडवून चोप चोपणार.

मेघना भुस्कुटे Wed, 01/10/2014 - 15:07

In reply to by अजो१२३

मी मोदींना खरोखरच पायदळी तुडवलं तर 'बहुसंख्यांच्या भावनिक आणि ताबडतोबीच्या प्रतिक्रिये'मुळे मला तुरुंगात जावं लागण्याची / माझा खून होण्याची / माझ्यावर बलात्कार होण्याची / माझ्यावर हल्ला होण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे अजून तरी माझा विरोध शिष्टसंमत माध्यमांतूनच चालणार! असो!

राहिला मोदींना शब्दांनी विरोध करण्याचा प्रश्न. अल्पसंख्यांवर होणारे अन्याय, त्यांना मिळावयाची पुरेशी संधी, एकाधिकारशाहीला विरोध, आरक्षणे - या गोष्टी एका राज्याच्या बाबतीत वेगळ्या महत्त्वाच्या असतात. कट्ट्याच्या बाबतीत वेगळ्या. कट्ट्याच्या बाबतीत लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न दूरान्वयानेही असत नाही. इतर ठिकाणी प्रत्यक्ष वा दूरान्वयाने तो असू शकतो, असतो.

तत्त्व हे स्थलकालातीत सत्य नसते, या वाक्यातून मला हाच फरक नोंदवायचा होता. पण कट्टा आणि राज्यशकट यांतला हा फरक तुम्हांला (आणि अरुण ढेरेंना आणि इतरही कुणाला) समजून घ्यायचा नसेल, तर तुम्ही तो घेणार नाहीच. त्यामुळे तुमच्याशी मी या मुद्द्यावर अजून वाद घालणार नाही, हे इथेच स्पष्ट करते. बाकी चालू द्या.

नंदन Wed, 01/10/2014 - 15:13

In reply to by मेघना भुस्कुटे

अरुण ढेरेंना आणि इतरही कुणाला

=))

या निमित्ताने का होईना, पण अंमळ विनोदाचा शिडकावा ह्या चर्चेत झाला.

अनुप ढेरे Wed, 01/10/2014 - 15:19

In reply to by नंदन

सहमत आहे. म्हणूनच मी दुर्लक्ष केलं त्या टोमण्याकडे. मला नाही म्हटल ब्वॉ.

अजो१२३ Wed, 01/10/2014 - 15:16

In reply to by मेघना भुस्कुटे

गंमत केली हो. काय लांबलचक उत्तर देता?
------------------
स्मायल्या टाकल्या तर लोक माणसाचा चेहरा आठवायचा प्रयत्न करत नाहीत. म्हणून मी स्मायल्या टाकत नाही. पण जे टिकात्मक लिहितो ते बरंच छद्मी असतं.

मेघना भुस्कुटे Wed, 01/10/2014 - 15:18

In reply to by अजो१२३

हां, मग ठीक आहे!

बाकी स्मायल्या लिहिल्यात तर बरेच गैरसमज टळतात, हे 'मी' आणि मी यांनी अनेक वादांतून अनुभवलं आहे. त्यांना विचारा हवं तर!

अजो१२३ Wed, 01/10/2014 - 13:25

एकाच गटाला घेऊन एकत्रितपणे काही करायचे असल्यास, ते करण्यासाठी गटातील सर्व व्यक्ती सक्षम असतील याची खात्री करावी आणि ते तसे नसल्यास, सर्वांच्या क्षमतेत बसणार्‍या गोष्टीच फक्त कराव्यात हेच योग्य आहे.

वरील वाक्यात सक्षमच्या ऐवजी क्रयमान / क्रयक्षम असा शब्द घालू.
--------------
माणूस सक्षम आहे कि नाही हे पोस्ट फॅक्टो ठरते. सध्याला ते प्रि-फॅक्टो माहित आहे असे मानू.
---------------------
काही करायचे मंजे काय काय? तर जे काय ते आवश्यक, आवडलेले, हिताचे , इ इ मानू. फक्त पैशानी (थेट किंवा अप्रत्यक्ष)परवडते का हाच प्रश्न उरला आहे असे मानू.
-----------------
आता गटातील प्रत्येकाची क्रयक्षमता भिन्न असेल, "काही करवून घ्यायचे" त्या करवून घेणाराची ( क्ष ची म्हणू) कॅपॅसिटी (पद, अधिकार) काय ते पाहायला पाहिजे, असा अधिकार आहेच का त्याला हे ही पाहणे महत्त्वाचे.
----------
आता असा अधिकार नि स्किल्स आहेत असे मानू. मग क्ष चा मँडेट काय आहे? १. "सर्वांकडून एक मिनिमम कॉमन काही करून घ्यायचे, जास्तीचं जे आहे त्यात काही कमी जास्त झालं तर त्याने मँडेट मधे फरक पडणार नाही. पण "मिनिमम कॉमन" मधे फरक होईल असं जास्तीचं काही करायचं नाही.", २. "एक -दोन ब्राईट स्टार निघालेच पाहिजेत. त्यासाठी कोणाचे व्यक्तिगत मार्क्स कमी झाले तर चालेल. मिनिमम कॉमन नावाचा कंसेप्ट नाही" ३. मँडेट असा काही नाही.
जिथे संस्थेचा स्पष्ट (किंवा इंप्लाइड) मँडेट आहे तिथे संभ्रम नसावा.
----------
जिथे मँडेट नाही तिथे हा नैतिकतेचा प्रश्न बनतो. विद्यार्थ्यांचा सरासरी पर्फॉर्मन्स वाढवायचा कि चमकणारे तारे बनवायचे यात काय आणि कसं निवडायचं?
---------------
नेहमी यातलं एकच योग्य असतं? नसावं. किती विद्यार्थ्यांची किती क्रयमानता आहे आणि कोणत्या पॉलिसीमुळे सर्वांचं जास्तीत जास्त भलं होईल ही समीकरणं दरवेळी मांडावी लागतील. लाघवी, हुशार, श्रीमंत मुलासाठी मुद्दाम कमी वेळ काढणे नि विषयात रस नसलेल्या, हुल्लड, बुद्धु, गरीब आणि त्यावर पैसे दुसरीकडे खर्चून शिक्षणासाठी आपली क्रयमानता कमी आहे असे खोटेपणाने भासवणार्‍या मुलास अकारण जास्त वेळ, सोर्सेस देणे चूक असावे.
आपण ज्या कारणासाठी एकत्र आलो आहोत ते साध्य होईल का, कसे, किती प्रभावीपणे, किती जास्त प्रमाणात हे दरवेळी पाहणे गरजेचे आहे आणि स्रोतांचा तसा हिशेब मांडणे गरजेचे आहे.
----------------
समानता वा असमानता हे शब्द त्यांच्या सार्‍या डाटाशिवाय, संदर्भाशिवाय, वेळकाळाशिवाय अर्थहिन असावेत. एक रँडम शब्द घेऊन त्याचा आग्रह करणे रिव्ह्यू करणे गरजेचे आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------------------------------
कट्टा वेगळी गोष्ट आहे. सारा संदर्भच वेगळा आहे. कट्ट्यात स्नेह वा मनोरंजन सर्वात महत्त्वाचं आहे. बाकी प्रत्येक आयडीच्या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजेत. हट के असणं (मंजे अनुपस्थित सुद्धा बरं का) स्नेह नसण्याचं पुरेसं कारण नसावं.

अपरिमेय Wed, 01/10/2014 - 13:48

ही चर्चा वाचून माझेतरी असे मत बनले आहे की तुमच्या मते क्रयशक्ती हा एकच निकष महत्वाचा आहे, इतर दुय्यम आहेत.
माझा हा प्रतिसाद हा कट्ट्याच्या संदर्भातच आहे, 'फ्लिप्ड क्लासरूम' चे उदाहरण कट्ट्याशी समांतर नाही.
माझ्यामते ह्या ठिकाणी समानता/असमानता याऐवजी 'constraints' बघितले पाहिजेत. प्रत्येक व्यक्तीचे वेगवेगळे constraints असू शकतात. उदाहरणार्थ.
१) खर्च 'क्ष' किमतीपेक्षा कमी.
२) फक्त ठाणे जमेल.
३) पुण्यात असेल तर गल्लीबोळात नको.
४) प्रसाधनगृहाची उत्तम सोय असली पाहिजे.
५) उत्तम जेवणाची (आणि पिण्याची) सोय असली पाहिजे.
६) कट्टा दुपारी असला पाहिजे, रात्री जमणार नाही.

constraints हे binary असू शकतात किंवा त्याला एक cost असू शकते. उदा. एका व्यक्तीला जर कट्टा ठाण्यात हवा असेल तर ठाण्यात तो झाला तर त्या व्यक्तीसाठी त्याची cost शून्य, जर पुण्यात झाला तर १०० असे. पण ह्याच कट्ट्यासाठी पुण्यातील व्यक्तीच्या cost ची अदलाबदल होईल.
आता आपल्याकडे दोन शक्यता आहेत. एक म्हणजे कोणत्याच व्यक्तींचे constraints हे conflicting नाहियेत. ही आदर्श परिस्थिती आहे. या परिस्थितीत कट्ट्याची जागा सर्वसहमतीने ठरू शकेल. पण जर असे नसेल तर optimization करावे लागेल. optimization म्हणजे असा पर्याय ज्यात total cost कमीतकमी असेल.
एक उदाहरण देतो. एकंदरीत १० व्यक्ती आहेत, ५ पुण्यात, ५ ठाण्यात.
ठाण्यातले तिघे पुण्याला जाउ शकतात पण त्यांच्यासाठी ते अडचणीचे आहे म्हणून cost = १०. दोघे जाउ शकत नाहीत म्हणून त्यांच्यासाठी cost = १००.
पुण्यातले चौघे ठाण्याला जाऊ शकतात पण त्यांच्यासाठी ते अडचणीचे आहे म्हणून cost = १०. एक जण जाउ शकत नाहीत म्हणून त्याच्यासाठी cost = १००.

पर्याय १: ठाण्याला कट्टा, total cost = 4*10+100 = 140
पर्याय २: पुण्याला कट्टा, total cost = 3*10 + 2*100 = 230

त्यामुळे या परिस्थितीत ठाण्याला कट्टा हा योग्य पर्याय ठरू शकतो. जरी ४ जणांना प्रवास करायला लागला तरी जास्तीतजास्त माणसे एकमेकांना भेटू शकतात.

वरील उदाहरणात आपण एकच घटक (जागा) विचारात घेतला होता. प्रत्यक्षात सगळ्या घटकांचा अंतर्भाव करता येऊ शकतो. जर 'N' घटक असतील आणि प्रत्येक घटकाला 'M' पर्याय असतील तर त्यांची एकूण N*M combinations होतील. जसे 'जागा' हा घटक असेल तर त्याला 'ठाणे' किंवा 'पुणे' हे दोन पर्याय आणि 'खर्च' हा घटक असेल तर 'फुकट', '३५० पेक्षा कमी', 'कितीही चालेल' असे तीन पर्याय. या परिस्थितीत जागा+खर्च याची सहा combinations बनतात. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या constraints नुसार या सहाही combinations ला काही cost असेल. ज्या combination साठी total cost सर्वात कमी ते निवडावे.

राधिका Wed, 01/10/2014 - 13:54

In reply to by अपरिमेय

मी क्रयशक्ती आणि आवडीनिवडी यांमध्ये फरक करते आहे. क्रयशक्ती बदलणे अत्यंत कठीण असते, शिवाय ती एक दीर्घकालीन प्रोसेस आहे. आवडीनिवडी बदलणे किंवा त्यांना मुरड घालणे हे त्यामानाने सोपे. शिवाय, अनेक जण जेथे जमतात, तेथे प्रत्येकाच्या आवडीनिवडी पाळणे कठीण असू शकते, परंतु सर्वांची मिळून एक किमान क्रयशक्ती काढून त्यानुसार आयोजन करणे फारच सोपे आहे.

इथे अधिकाधिक चर्चा कट्ट्याविषयी झाल्याने कट्ट्याचेच उदा. घेते. फुकटात प्रवेश असलेली ठिकाणे उपलब्ध आहेत, ज्याने त्याने आपापले डबे आणणे किंवा आपल्याला हव्या त्या हाटलातला हवा तो पदार्थ पार्सल करून आणणे हे पर्याय आहेत. यावर ज्या अनेक अडचणी लोकांनी काढून दाखवल्या, त्या प्रत्येक अडचणीला मी एक मार्ग सुचवला. आणि त्याने कुणाच्याही कोणत्याही आवडीला मुरड बसत नव्हती. इतरांनी सुचवलेले पर्याय आणि मी सुचवलेले पर्याय यांत केवळ खर्चातलाच फरक होता.

असे असताना, बहुसंख्यांच्या आवडीनिवडीला मुरड घालण्याची गरज नसतानाही एका अल्पसंख्य व्यक्तीकडे केवळ क्रयशक्ती नाही, म्हणून तिच्या सोयीचा विचारच करायचा नाही हे कुणाला आणि कसे बरे पटते आहे?

अपरिमेय Wed, 01/10/2014 - 14:03

In reply to by राधिका

>>बहुसंख्यांच्या आवडीनिवडीला मुरड घालण्याची गरज नसतानाही एका अल्पसंख्य व्यक्तीकडे केवळ क्रयशक्ती नाही, म्हणून तिच्या सोयीचा विचारच करायचा नाही हे कुणाला आणि कसे बरे पटते आहे?
"बहुसंख्यांच्या आवडीनिवडीला मुरड घालण्याची गरज नसतानाही" हा निष्कर्ष कसा काढलात? कदाचित एखाद्या बागेत जाऊन बसणे बहुसंख्यांसाठी त्रासदायक असू शकेल की. त्या प्रसंगात १० जणांच्या सोयीसाठी १ जण न येणे हाच योग्य मध्यममार्ग आहे.

गवि Wed, 01/10/2014 - 14:11

In reply to by राधिका

अहो आत्ताच्या गर्दीच्या दिवसांत बागा, तलाव वगैरेकाठी डबे घेऊन जाऊन शहरात मध्यवर्ती कट्टे अत्यंत गैरसोयीचे होतात हो.

दूर निसर्गाच्या सान्निध्यात ट्रेकला वगैरे जाणे वेगळे आणि शहरातल्या तळ्याकाठी किंवा बागेत बसून चटया आणून त्या अंथरुन डबे खाणे वेगळे. यात तुम्हाला वाटतो तसा आणि तितका निवांतपणा सर्वांनाच नाही वाटत अथवा लाभत.

अंधार, डास, कीटक यांमुळे संध्याकाळच्या वेळेची मर्यादा पडते. सार्वजनिक ठिकाणी अन्यही बरेच अडथळे हल्ली असतात. पोलीस असतात. दंग करता येत नाही. फार काळ बसता येत नाही. गर्दी असते. गोंगाट असतो. माहोल जमणे कठीण असते. टॉयलेट्स नसतात. अन्न थंडगार गारगोट्यांच्या स्वरुपात खावं लागतं. चटया, पेपर प्लेट्स नेणे, लचपचत्या प्लेट्समधून खाणे, पाण्याच्या बाटल्या त्या सर्वांच्या कचर्‍याची विल्हेवाट, अनेकजणांना खाली जमिनीवर तळ ठोकून फारवेळ बसणं कंफर्टेबल नसतं. उकाडा किंवा थंडी यापैकी एक सीझननुसार असतं.

या वरील सर्व गोष्टी सर्वांना जमतात, आवडतात आणि झेपतात आणि त्यात सर्वांना तितकीच मजा येते जितकी वातानुकूलित हॉटेलात आरामदायक आसनांवर बसून गरमागरम अन्न सर्व्ह होत असताना आस्वाद घेत गप्पा मारण्यात येते... असे गृहीतक धरणे हेही अगदी तसंच नाही का की जसं ५०० रुपये खर्च सर्वजण करु शकत असतील असं गृहीत धरणं.. दोन्ही गोष्टी आयदर इक्वली चूक ऑर इक्वली बरोबर. ओन्ली वन कांट बी राँग.

राधिका Wed, 01/10/2014 - 14:17

In reply to by गवि

हो आत्ताच्या गर्दीच्या दिवसांत बागा, तलाव वगैरेकाठी डबे घेऊन जाऊन शहरात मध्यवर्ती कट्टे अत्यंत गैरसोयीचे होतात हो.

आपण ज्या वेळात भेटणार असतो दुपारी/संध्याकाळी लवकर त्या वेळी ही गैरसोय होत नाही.

अंधार, डास, कीटक यांमुळे संध्याकाळच्या वेळेची मर्यादा पडते.

उकाडा किंवा थंडी यापैकी एक सीझननुसार असतं.

पॉप टेट्स आणि नंतरचे कॉफी शॉप या दोन्ही जागा उघड्यावरच्या होत्या. त्यामुळे तिथेही डास कीटक हा प्रश्न होताच. अंधारावर दिव्यांचा इलाज असतो.

गर्दी असते. गोंगाट असतो. माहोल जमणे कठीण असते.

गर्दीच्या हाटलांबाबतही हेच्च म्हणता येते.

पोलीस असतात. दंग करता येत नाही.

याप्रकारचा कोणताही दंगा आपल्याकडच्या कोणत्याही कट्ट्यावर होत नाही. झाला असल्यास फोटो पाठवा :ड

टॉयलेट्स नसतात.

शिवाजी पार्काजवळ सोय आहे. ती सध्या बंद झाली असेल तर थोड्या दूर अंतरावर का होईना, पण दोन सोयी आहेत.

अनेकजणांना खाली जमिनीवर तळ ठोकून फारवेळ बसणं कंफर्टेबल नसतं.

त्यांनी खर्‍याखुर्‍या कट्ट्यावर बसावे. शिवाजी पार्काला आहे.

अन्न थंडगार गारगोट्यांच्या स्वरुपात खावं लागतं.

ही एक गैरसोय आहे खरी. पण महागडी हॉटेल परवडणार्‍यांना कॅसरोलही परवडत असावेत ना.

वरील गोष्टींमुळे

या वरील सर्व गोष्टी सर्वांना जमतात, आवडतात आणि झेपतात आणि त्यात सर्वांना तितकीच मजा येते जितकी वातानुकूलित हॉटेलात आरामदायक आसनांवर बसून गरमागरम अन्न सर्व्ह होत असताना आस्वाद घेत गप्पा मारण्यात येते... असे गृहीतक धरणे हेही अगदी तसंच नाही का की जसं ५०० रुपये खर्च सर्वजण करु शकत असतील असं गृहीत धरणं.. दोन्ही गोष्टी आयदर इक्वली चूक ऑर इक्वली बरोबर. ओन्ली वन कांट बी राँग.

हे बाद.

मेघना भुस्कुटे Wed, 01/10/2014 - 14:28

In reply to by राधिका

वर इतक्या ठिकाणी प्रश्न विचारले आहेत आणि उत्तरंही दिली आहेत. त्यावर तू मौन बाळगून आहेस. आणि परत परत तेच तेच लिहिते आहेस, याला काय म्हणावे?

राधिका Wed, 01/10/2014 - 14:30

In reply to by मेघना भुस्कुटे

कशावर बाळगले आहे?

माझ्यावर चहुबाजूंनी भडिमार होत असल्याने काही गोष्टी नजरेतून सुटल्या असतील. कृपया कशाची उत्तरे मी दिलेली नाहीत ते सांगणे. मी मुद्दाम मौन बाळगले असेल, तर तसे प्रामाणिकपणे सांगेनही.

राधिका Wed, 01/10/2014 - 15:20

In reply to by मेघना भुस्कुटे

प्रतिसाद नाहीत, पण अर्धेअधिक वाचले आणि नजरेतून सुटलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. आता जरा गरीबावर दया करा, आणि अजूनही काही प्रश्न उरले असतील तर ते दाखवा. उरलेलं सगळं परत नका वाचायला लावू बुवा.

अपरिमेय Wed, 01/10/2014 - 14:34

In reply to by राधिका

माझ्याकडे आहे.
शिवाजी पार्क सारखी जागा जे रोज सकाळी किंवा संध्याकाळी थोडा वेळ फिरायला जातात त्यांच्यासाठी चांगली आहे. जर खूप दिवसांनी मित्रमंडळींचा मोठा ग्रूप भेटणार असेल तर ती जागा अत्यंत गैरसोयीची आहे. तिकडे मोठा गोल करून बसता येत नाही, कडक कट्ट्यावर बसून पार्श्वभाग दुखतो, पाठीला आधार नसल्यामुळे पाठ दुखते. शिवाजी पार्क मधे डबे घेऊन जेवणे हे एखाद्या रेस्टॉरंट मध्ये जेवण्यापेक्षा कितीतरी जास्त गैरसोयीचे आहे. पॉप टेट्स मध्ये डासांची काळजी घेतलेली असते. "गर्दीच्या हाटलांबाबतही हेच्च म्हणता येते." हे तुम्ही "गर्दी असते. गोंगाट असतो. माहोल जमणे कठीण असते" याबद्दल म्हणता. पॉप टेट्स ला माहोल जमला होता की नव्हता ते तुम्हीच सांगा.