ही बातमी समजली का? - ३९
व्यवस्थापकः अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.
अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००च्या वर प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढण्यात येईल.
------
एका संशोधनानुसार - एखादे राष्ट्र अथवा राज्य जितके अधित धार्मिक,तितके त्या त्या राष्ट्र्/राज्यात वैज्ञानिक शोध कमी आढळले आहे.
Both across countries and also across US states, higher levels of religiosity are related to lower levels of scientific innovation.
http://billmoyers.com/2014/09/09/study-science-and-religion-really-are-…
होय, पण एनलायटनमेंटच्या
होय, पण एनलायटनमेंटच्या अगोदरही कैक महत्त्वाचे शोध लागले होतेच की. मुद्दा इतकाच आहे, की धार्मिकता असली म्हणून दरवेळेस शास्त्रीय संशोधनाला मारक ठरते असे नाही. युरोपमध्ये जर विळ्याभोपळ्याचे नाते दिसत असेल, तर मध्ययुगीन अरब विश्वात, किंवा प्राचीन ग्रीस-रोममध्ये असे नाते दिसते असे वाटत नाही. प्राचीन भारतातही जे काही थोडे शोध लागले, त्यांना धर्माची आडकाठी असल्याचे तितके दिसत नाही, सबब हे पोस्ट-रेनेसाँ मॉडेल वापरून केलेले जनरलायझेशन पटत नाही इतकेच म्हणणे आहे. माझ्या कारणमीमांसेत काही गॅप्स वा दोष असतील तर आय अॅम ऑल ईअर्स.
+
इस १००० च्या आसपास युरोप अंधारयुगात चाचपडत असताना उमय्याद - अब्बासिद खिलाफतींच्या छत्राखाली त्याकाळाच्या मानानं बरचसं शास्त्रीय ज्ञान जमा होत होतं.
आता सगळच आठवत नाहिये पण बानु मुसा नावाच्या शास्त्रज्ञानं त्याकाळात पृथ्वीचा व्यास मोजून दाखवला होता!
म्हणजे --
१.पृथ्वी सपाट आहे असं तो मानीत नव्हता.
२.व्यास मोजण्याइतपत अक्कल त्यानं कमावली होती.
३. असे इतरही अनेक होते. त्यांची नावं आता चटकन् हाताशी नाहित.
ह्याच वेळी ह्या खिलाफतींचं वातावरण नेमकं धार्मिकही होतं.
आता कसं काय होतं, कसं जमलं वगैरे विश्लेषण नाही करु शकत. पण तसं होतं खरं.
-
इस्लामी सत्तांच्या शोधांच्या "सुवर्णकाळा"त धर्माचे कर्मठ बंधन काहीसे शिथिल होते. उमर खय्याम (हा कवी रोजनिर्वाहाकरिता खगोलशास्त्रज्ञ होता) नाहीतर असल्या अर्धपाखंडी उक्ती न करता.
पुन्हा त्याकाळातही देशा-देशांत तुलना करता शोध कर्मठ केंद्रीय अरबस्तानात (आजचा सौदी, येमन, संयुक्त अमिराती वगैरेमध्ये) कमी लागले, (त्या काळाच्या मानाने) शिथिल उत्तरी साम्राज्यांत लागले.
काही प्रमाणात व्याख्येतच
जर नवीन शोध किंवा कल्पना म्हणजे पूर्वीच्या कल्पनांना छेद देणारे तत्त्व असेल तर (पूर्वीच्या काळी तरी) पोथीप्रामाण्याचा विरोध होतो. पूर्वीच्या काळी पोथ्या आणि धर्मशास्त्र हे सर्व एकाच गठ्ठ्यात बांधलेले असले, तर शोध/नवता म्हणजे त्या पोथ्या/धर्मशास्त्राला अप्रमाण मानून शिथिल करणारेच हवे. कमीतकमी "बाकीचा धर्म मान्य आहे, परंतु या नव्या शोधाचा जो भाग आहे, त्या बाबतीत पूर्वीचे धर्मशास्त्र गैरलागू आहे", इतपत मर्यादित तरी बंड करणे जिवाला घातक नको, इतपत शिथीलता समाजात लागते.
भारतातल्या एखाद्या जुन्या शोधाचे उदाहरण तुम्हाला देता येईल का? म्हणजे त्याच्या आदली कल्पना आणि त्याच्या नंतरची "शोध"कल्पना दोन्ही ठाऊक आहेत? (नुसत्याच मौलिक कल्पनांचे उदाहरण देऊन तितकीशी मदत होणार नाही. कारण कालांतराने शोध हाच सनातन धर्माला मान्य होता, असे धर्मशास्त्र तयार होते. युरोपातील उदाहरण म्हणजे अॅरिस्टॉटलची अनुभवजन्य/प्रायोगिक तत्त्वे दैवी तत्त्वे म्हणून क्रिस्ती चर्चने निवडली. अथवा भारतीय भाषाभ्यासाचे बघावे, तर पाणिनीचे अनुभवसिद्ध भाषावर्णनशास्त्र ["...अर्थस्य अन्यप्रमाणत्वात्" पा.सू १.२.५६] पुढे धर्म-अधर्मवर्तन सांगणारे अज्ञापक नियमशास्त्र झाले : पतंजलीच्या वचनात हे परिवर्तन दिसते "लोकतोऽर्थप्रयुक्ते शब्दप्रयोगे शास्त्रेण धर्मनियमः ।"
आणि एकदा का ते पूर्वीचे निरीक्षणप्रमाण शास्त्र धर्मनियम करणारे शास्त्र ठरले, तर शोध बाद ठरला : संस्कृतानंतरची प्राकृते आणि अपभ्रंशभाषांच्या अभ्यासाकरिता पाणिनीचे मूलभूत शोध कुचकामी ठरले. (आधुनिक भाषाविज्ञानाकरिता पाणिनीचा शोध उपयुक्त ठरतो, तो का? तर तो धर्मनियम नाही म्हणून, नवीन निरीक्षणांना लागू होण्याकरिता तो मोकळा होतो.)
भारतीय अन्वीक्षकी आणि न्यायशास्त्र (लॉजिक) यांचे शोध धर्मविरुद्ध मानले गेले, आणि रामायणादि धर्मग्रंथांत यांच्याविरुद्ध नास्तिक वा दुष्ट म्हणून श्लोक प्रक्षिप्त झाले आहेत (जाबालिची कथा, यात जाबालि नावाचा दुष्ट अनुभवप्रामाण्यवादी दिसतो). कारण या सर्व शोधांमध्ये जिथे-जिथे अनुभवप्रामाण्य होते, तिथे-तिथे जर प्रस्थापित ग्रंथांमधे काही तत्त्वे अस्ली, तर त्यांच्याविरुद्ध बंडच ठरते.
ग्रीक-रोमनांपैकीम्हणावे, तर सॉक्रेटीसवर मुख्य आरोप पाखंडाचा होता, आणि त्याच्याविरुद्धचा निकाल काहीसा जवळ होता.
कमीतकमी "बाकीचा धर्म मान्य
कमीतकमी "बाकीचा धर्म मान्य आहे, परंतु या नव्या शोधाचा जो भाग आहे, त्या बाबतीत पूर्वीचे धर्मशास्त्र गैरलागू आहे", इतपत मर्यादित तरी बंड करणे जिवाला घातक नको, इतपत शिथीलता समाजात लागते.
सहमत.
धार्मिकपणा नवीन कल्पनांच्या ग्रहणाआड येत नसल्याचे महत्त्वाचे उदा. म्हणजे ग्रीक ज्योतिषाशी संबंधित कैक कल्पना भारतात गुप्तकाळात शिरल्या. पंचसिद्धांतिका नामक ग्रंथातले २ सिद्धांत तर उघडच फारिनरांनी लिहिलेल्या ग्रंथांची भाषांतरे होत. शिवाय एक श्लोक आहे की ग्रीक लोक म्लेच्छ असले तरी ज्योतिषशास्त्रात डॉन आहेत इ.इ. बहुधा वराहमिहिराचा श्लोक आहे. प्रॉव्हेनन्स पाहून सांगतो, तूर्तास आठवत नाहीये.
लीलावतीकार भास्कराचार्यांच्या काळानंतर जे लोक गणितादि विषयांवर ग्रंथ लिहीत, त्यांमध्ये पौराणिक धर्मशास्त्राला विरोधी ठरणारी निरीक्षणे/सिद्धांत असले तर ते कसे धर्माधारितच आहेत हे सांगण्याची प्रवृत्ती आधीच्या लोकांपेक्षा जास्त दिसते (विथौट अल्टरिंग द सायन्स इन इट) असे 'मॅथेमॅटिक्स इन इंडिया' या ग्रंथाची लेखिका किम प्लोफ्कर यांचे म्हणणे आहे.
केरळ स्कूल ऑफ मॅथेमॅटिक्स या नावाने निर्देश केला जातो त्या गुरुपरंपरेत २ ग्रंथकार ब्राह्मणेतर होते हेही नमूद करणे अवश्य आहे. त्यावर अन्यत्र टीकाही झालेली आहे - उदा. ' ज्यांची ज्योतिष शिकायची पात्रता नाही तेही केरळात संस्कृत शिकतात, छी छी ' इ.इ. या परंपरेतला एक डॉन ग्रंथकार म्ह. नीळकंठ सोमयाजी. त्याने अन्य धर्म-तत्त्वज्ञानादि विषयांवरही ग्रंथरचना केल्याचे सांगतात. त्यामुळे त्याची धार्मिकता बियाँड डौट असली तरी त्याने याला विरोध केला नाही. इतकेच नव्हे, तर सेमी-जिओसेंट्रिक मॉडेल ऑफ सोलार शिष्टिमही त्याने मांडली होती त्यातही पौराणिक सिद्धांताला तसा धक्का बसतोच.
क्रांतिकारी वाटणारी काही मांडणी असली तर विरोध हा ठरलेलाच आहे. परंतु किमान काही लोक हे धार्मिक असूनही शास्त्रविरोधी नसतात याची उदा. असल्याने धर्म विरुद्ध शास्त्र ही लिंक दरवेळेस लाववत नाही इतकेच. शिवाय या विरोधाची व्याप्ती किती, त्या विरोधाचा परिणाम किती खोलवर जातो हे पाहणेही महत्त्वाचे आहे. याबद्दल अजून एके ठिकाणी एक रोचक पेपर वाचनात आला होता. गोष्ट आहे अव्वल इंग्रजीतली. ब्रिटिशप्रणीत अॅस्ट्रोनॉमी शिकवणे सुरू झाल्यावर पाखंड पाखंड इ. घोष सुरू तर झालाच - परंतु महाराष्ट्रात त्यातही दोन तट पडल्याचे स्पष्ट दिसते. एक पंडित म्हणणार की हे धर्मविरोधी आहे सबब झूठ, पाखंड इ.इ. आहे तर दुसरा पंडित तो सिद्धांत कसा धर्माधारित आहे हे प्रूव्ह करणार असा हा एक्स्चेंज पाचसात वर्षे तरी चालला. अन हा वादविवाद ग्रंथ लिहून चालला होता हे विशेष. अन सूर्यकेंद्रित सिद्धांत हा धर्मविरोधी नाही असे म्हणणार्या पंडितांवरही बहिष्कार इ. घातल्याचे नमूद नाही त्यामुळे अशी लिंक लावू नये असे अजूनच वाटते.
वरील उदा. द्वारे तुमच्या प्रश्नाचे अगदी व्यवस्थित उत्तर देता आले नसले तरी अंशतः देऊ शकलो असे वाटते.
जिथे धर्म आणि स्टेट हे एकमेकांशी जवळून निगडित असतात तिथे असा विरोध जास्ती स्पष्ट आणि धारदार असतो असे वाटते. याला सर्व बाजूने अपवादात्मक उदा. देता आली असली तरी किमान मध्ययुगीन युरोपचे एक ढळढळीत उदा. समोर आहे त्यामुळे ही थेरी मांडण्यात तितकीशी चूक नसावी असे वाटते.
प्रश्न अन उत्तर
भारतातल्या एखाद्या जुन्या शोधाचे उदाहरण तुम्हाला देता येईल का? म्हणजे त्याच्या आदली कल्पना आणि त्याच्या नंतरची "शोध"कल्पना दोन्ही ठाऊक आहेत?
वरील उदा. द्वारे तुमच्या प्रश्नाचे अगदी व्यवस्थित उत्तर देता आले नसले तरी अंशतः देऊ शकलो असे वाटते.
असहमती व्यक्त करतो. धनंजयने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर तुमच्या प्रतिसादात मला तरी दिसले नाही. कैक गुप्तपणे शिरलेल्या संकल्पना आदल्या संकल्पनेच्या तुलने कशा होत्या वगैरे अन त्यामुळे नविन संकल्पना कशा पालटल्या वगैरे बद्दल माहिती द्यावी.
लीलावतीकार भास्कराचार्यांच्या काळानंतर जे लोक गणितादि विषयांवर ग्रंथ लिहीत, त्यांमध्ये पौराणिक धर्मशास्त्राला विरोधी ठरणारी निरीक्षणे/सिद्धांत असले तर ते कसे धर्माधारितच आहेत हे सांगण्याची प्रवृत्ती आधीच्या लोकांपेक्षा जास्त दिसते
कृपया एखाद दुसरे उदाहरण असेल तर द्यावे.
शाबाश....
लयच भारी :-
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4740066411111428359&S…ताज्या बातम्या&NewsDate=20140911&Provider=- वृत्तसंस्था&NewsTitle=सौदी अरेबियाकडून 'मवाळ बंडखोरांना' प्रशिक्षण
=))
सौदी अरेबियाकडून 'मवाळ बंडखोरांना' प्रशिक्षण
वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या योजनेनुसार सीरियामधील इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांना रोखण्यासाठी येथील इतर ‘मवाळ बंडखोरांना‘ प्रशिक्षण देण्यास सौदी अरेबियाने मान्यता दर्शविली आहे.
आयसिसविरोधातील करावयाच्या कारवाईची योजना ओबामा यांनी अमेरिकन जनतेसमोर केलेल्या आपल्या भाषणामधून स्पष्ट केली. यामध्ये आयसिसच्या उदयामुळे सौदी अरेबियास वाटणारी चिंताही प्रतिबिंबित झाली. याबरोबरच, ओबामा यांनी आता इराकसह सीरियामध्येही हवाई हल्ले करण्यास अमेरिकन सैन्यास परवानगी दिली आहे. सीरियामध्ये राष्ट्राध्यक्ष बाशर अल असद यांची राजवट उलथवून लावण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या इतर मवाळ बंडखोरांना आता पाठिंबा देण्याचे सुतोवाच ओबामा यांनी या वेळी केले. अमेरिकेच्या यासंदर्भातील धोरणास अमेरिकन जनतेकडून पुरेसा पाठिंबा मिळत नसल्याचे चित्र आहे.
"सीरियामधील मवाळ बंडखोरांना प्रशिक्षण देण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांस सौदी अरेबियाचा पूर्ण पाठिंबा आहे,‘‘ असे ओबामा प्रशासनामधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. सौदी अरेबियाचे राजे अब्दुल्ला यांच्याशी ओबामा यांनी एक दिवसापूर्वी दुरध्वनीवरुन चर्चा केली होती. यानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
.
.
.
आयसिसला थांबवायचय? सोप्पय!
अजून एक आयसिस उभी करा.
शाबाश रे मेरे शेर. क्या दिमाग लडाया है
=))
.
.
.
एक किस्सा :-
एका नावेतून दोन विद्वान जात असतात. नावेला भोक पडाते. नावेत पाणी भरु लागते. एक विद्वान झटकन् उठून नावेला दुसरे भोक पाडू लागतो --
त्या दुसर्या भोकातून पाणी कसं झटकन् निघून जावं म्हणून!!!
आठ दहा वर्षाखाली अमेरिकचं धोरण पेप्रातून वगैरे वाचायला लैच मज्जा येइ.
आधी म्हणे Af-Pak धोरण.
मग म्हणे Pak-Af धोरण.
शेवटी Fak-Ap म्हणत काढता पाय घेतला ह्या दशकात.
=))
आठ दहा वर्षाखाली अमेरिकचं
आठ दहा वर्षाखाली अमेरिकचं धोरण पेप्रातून वगैरे वाचायला लैच मज्जा येइ.
आधी म्हणे Af-Pak धोरण.
मग म्हणे Pak-Af धोरण.
शेवटी Fak-Ap म्हणत काढता पाय घेतला ह्या दशकात.
-
लिबर्टेरियन पर्स्पेक्टिव्ह ऑन अमेरिकन फॉरिन पॉलिसी. >>> http://www.voicesofliberty.com/video/if-we-did-less-there-would-be-more…
September 4, 2014 – We are now aligning ourselves with the Iranians to push back this violent group known as the Islamic State, which has started to occupy Northern Iraq. At the same time, we are going in and bombing our own weapons, which are being used by Syrian rebels. It’s a policy of schizophrenia that feeds the military industrial complex. There is a media industrial complex, too. The propaganda is endless.
The U.S. military is asked to
The U.S. military is asked to chase and kill terrorists, train foreign militaries, protect sea lanes, secure the internet, contain China, keep oil cheap, protect other countries from aggression, stop genocide, protect innocent people, transform failed states into democracies-and the list goes on! Is it worth all the spending and the lives? Often it makes new enemies. Like most government plans, war tends not to work out as well as planners hoped. We libertarians wonder why people assume government will do better this time. _____ John Stossel on War
१)
१) http://news.yahoo.com/more-half-chinese-see-war-japan-poll-062556579.ht…
२) http://freebeacon.com/issues/chinese-expect-war-with-japan/
३) http://www.straitstimes.com/news/asia/east-asia/story/more-half-chinese…
चीन मधे अनेक लोक - चीन चे जपान शी युद्ध होऊ शकते असे म्हणतायत.
स्कॉटलंड वेगळं राष्ट्र -स्वतंत्र राष्ट्र बनण्याच्या तयारीत...
आताच नॅशनल जीओग्राफिक वर एक बातमी वाचली.
"Scotland’s Vote for Independence: By the Numbers"
स्कॉट्लंड, इंग्लड आणि वेल्स मिळुन १७०७ साली 'ग्रेट ब्रिट्न' ह्या नावाने देश संघटीत झाला. त्यानंतर १८०१ साली नॉर्थन आयर्लंड त्यामध्ये एकत्र आल्यावर 'युनाटेड किंगडम' हे ऑफिशियल नावं झालं.
आता ३०० वर्षांच्या एकत्र संसारानंतर स्कॉटीश नेते आणि जनतेने वेगळी चुल मांडण्याचा निर्णय घेतलेला आहे..किंवा असं घाटत आहे. सप्टेंबर १८ ला लोकशाही पध्दतीने मतदान घेण्यात येईल.
ह्या लेखामध्ये, घडणार्या घडामोडींचा एकंदरीत स्कॉट., इंग्लड,युरोपिअन युनियन्,आणि उर्र्वरीत जगावर कसा परिणाम होउ शकतो ह्यावर थोडक्यात प्रकाश टाकला आहे.
त्यामध्ये अंतर्भुत असलेल्या गोष्टी -स्कॉट. कडे असलेले किंवा नॉर्थन सी मधले तेलाच्या साठ्यांचे मालकीहक्क त्यांच्या कडे राहील्यास नवीन राष्ट्राला स्वःताचे 'पाउंड' हे चलन ठेवता येउ शकेल. शिवाय युरोपिअन युनियन मध्ये समाविष्ट होता येईल. आणि इंग्लडच्या राणीप्रती निष्ठा कायम ठेवता येईल.
हे अर्थातच सगळं जर्-तर च्या रेषेवर आहे.
बघु पुढे काय काय होतयं ते.
--मयुरा.
भारत या वर्षी सर्वाधिक कापूस
भारत या वर्षी सर्वाधिक कापूस पिकवणारा देश होईल.
यात बीटी कॉटनचा हातभार किती? मोन्सांटोच्या मते प्रचंड - सुमारे ९० टक्के शेतकरी बीटी कॉटनची लागवड करतात. बीटी कॉटन लागवडीपासून कीटकनाशकांचा फवारा वापरणं कमी झालेलं आहे.
भरघोस पीक = तोटा?
सामान्य ज्ञानानुसार भरघोस पीक आले की शेतकरी सुखी होईल असा (योग्यच) दृष्टीकोन असतो.
परंतु बाजारव्यवस्थेत तसे सांगता येत नाही. जास्त पीक आले की भाव पडून शेतकर्याचे नुकसानच होते असे दिसते. खूपदा ग्लट होऊन भाव कै च्या कै पडतात. वांग्याच्या शेतीचा अनुभव गंगाधर मुटे यांनी कोठेतरी कथन केला होता.
अन्न-धान्याच्या बाबतीतही
अन्न-धान्याच्या बाबतीतही जास्त यिल्ड म्हणजे कमी कुपोषण असे नाही हे आपण आधीच पाहिलेले आहे.
असो.
इन्स्टिट्यूट ऑफ फूड पॉलिसी रिसर्चने यावर आधीच अभ्यास केलेला दिसतोय.
http://www.ifpri.org/sites/default/files/publications/ifpridp01170.pdf
बीटी यायच्या आधीच भारतात कापसाचे उत्पादन वाढीला लागलेले होते. बीटीने त्यात नंतर हातभार लावला हे निश्चित पण सगळे श्रेय बीटीला देणे चूक ठरेल.
त्यांचे निष्कर्षः
Our results show that Bt cotton contributed significantly to cotton yield growth, ranging from a 0.29 percent to 0.39 percent annual increase in yield for each percentage adoption in each state, or a total increase contribution of 19 percent over time between 1975 and 2010. But the results show that other key factors were consistently significant, especially the use of fertilizers and of hybrid seeds. Human labor, pesticides, and especially the use of irrigation are also found to have had significant effects in several of the regressions. Second, our findings suggest that Bt did contribute to the second increase in cotton productivity (after 2005) but remain inconsistent regarding the possible impact of unofficial Bt cotton adoption in the early years.
Several studies have reported the prevalent use of unofficial Bt cotton long before its official approval in 2002, especially in Gujarat, a state that has led the whole country in cotton production increase during the past decade. But due to incomplete data and lack of information on adoption rates of these unofficial varieties, we still cannot be sure of the actual contribution during this particular period.
While it is clear that Bt cotton was an engine of productivity growth, more research is needed to further explore the apparent contradiction between the early jump in yields (2002-2005) that cannot be explained by other factors and the reported low adoption of Bt cotton in many states at that time.
कथा
आटपाट नगर होते. नगरात एक गरीब शेतकरी राहात होता.त्याच्या वाट्याला आलेली थोडी शेती होती. त्यात तो उसाचे पीक घेत असे. एकदा आपल्या शेताकडे बघत असताना अचानक त्याच्या प्रयोगशील मनाने उसळी घेतली. 'बा, कृषीवला' तो स्वतःलाच म्हणाला. या उसात आंतरपीक म्हणून आजवर त्वां मका घेतला, भुईमूग घेतला, सोयाबीन घेतले. पण त्यातले काही म्हणजे काही फायदेशीर झाले नाही. आता अधिक प्रयोगशील हो आणि काही वेगळा विचार कर.' मग त्याने डोके प्रयोगशीलपणे कराकरा खाजवले, प्रयोगशील मासिके, पुस्तके वाचली, इंटरनेटवर प्रयोगशील शोध घेतला आणि कसे यश येत नाही ते पाहू असा चंग बांधून बीट आंतरपीक म्हणून घ्यायचे ठरवले. तालुक्याच्या ठिकाणी जाऊन त्याने मुलखाच्या महागाईचे बिटाचे बियाणे विकत आणले. आपल्या शेतावरच्या मजुरांना त्याची लागवड कशी करायची याचे प्रशिक्षण दिले. खते, औषधे यांची तजवीज केली आणि बिटाची लागवड केली. उत्सुकतेने तो बीट काढणीयोग्य होण्याची वाट पाहू लागला. दिवसामागून दिवस चालले ऋतूमागुनी ऋतू. त्याची बिटाची रोपे वाढली, तरारली. गावातले लोक मोठ्या उत्सुकतेने या शेतकर्याचा हा नवीन प्रयोग बघत होते. काही चौकशी करत होते, काही कुत्सितपणाने शेरेबाजीही करत होते. अखेरीस बीट काढणीयोग्य झाले. बिटाचे लालभडक, रसरशीत कंद काढून, स्वच्छ करुन त्याने तालुक्याला विक्रीसाठी पाठवले. त्याचा तडाखेबंद खप झाला आणि त्या शेतकर्याला दहा किलोला साठ रुपये, म्हणजे किलोला सहा रुपये असा दर मिळाला.शेतकरी खूष झाला. 'हे मूढांनो, ' तो इतर शेतकर्यांना म्हणाला.' याला म्हणतात प्रयोग, याला म्हणतात वेगळा विचार, याला म्हणतात काळ्या आईतून सोने पिकवणे..' गावकर्यांनी टाळ्या वाजवल्या.
पुढच्या वर्षी सदर प्रगतीशील शेतकरी बिटाचे बियाणे आणायला तालुक्यास गेला. दुकानात जाऊन त्याने बिटाचे बी मागताच दुकानदार म्हणाला' हां, सज्जन, आपण आटपाट नगरचे नागरीक ना?' शेतकर्याला आश्चर्य वाटले. तो म्हणाला,'महोदय, आपण हे कसे ताडले?' महोदय म्हणाले,'श्रीमान, या वर्षी आटपाट नगरच्या किमान दोनशे शेतकर्यांनी मजकडून बिटाचे बियाणे नेले आहे..' श्रीमान खचलेच. तरीही आशा ही अमर असते या वचनाचे स्मरण करुन त्यांनी बिटाचे बियाणे खरेदी केले. सालाबादाप्रमाणे आपल्या शेतावरच्या मजुरांना त्याची लागवड कशी करायची याचे प्रशिक्षण दिले. खते, औषधे यांची तजवीज केली आणि बिटाची लागवड केली. त्याच्याबरोबर गावातल्या पुढच्या मेंढरामागे जाणार्या इतर मेंढरासारख्या असंख्य शेतकर्यांनीही बिटाची लागवड केली. उत्सुकतेने हे सर्व लोक बीट काढणीयोग्य होण्याची वाट पाहू लागले. आता लौकरच या आंतरपिकाचे लक्षावधी रुपये आपल्या हातात खणाणा खणखणू लागतील, मग आपण आपल्या लेकीचे लग्न धूमधडाक्यात करु, आपल्या म्हातार्याला मोठ्या दवाखान्यात नेऊन त्याचे दवापाणी करु, आपले पडके घर बांधून काढू, जमल्यास एखादी पैलारु म्हैस विकत घेऊ अशा स्वप्नांत ते रंगून गेले. दिवसामागून दिवस सरले. त्यांची बिटाची रोपे वाढली, तरारली.अखेरीस बीट काढणीयोग्य झाले. बिटाचे लालभडक, रसरशीत कंद काढून, स्वच्छ करुन त्या सर्व शेतकर्यांनी तालुक्याला विक्रीसाठी पाठवले. तालुक्याची बाजारपेठ आटपाट नगरच्या लालभडक बिटाने लालेलाल होऊन गेली. इतक्या बिटाला उठाव कुठून असायला? बिटाचे दर पडले तसे शेतकर्यांचे चेहरेही पडले. 'आता बीट पाठवू नका' असे दलालांचे निरोप येऊ लागले. ज्यांनी पाठवले होते त्यांच्यासाठीचा दर जाहीर झाला, दहा किलोला सहा रुपये! साठ पैसे किलो! बीट काढणीचा खर्चही याहून अधिक होता. चाणाक्ष शेतकर्यांनी बीट काढण्याचीही तसदी घेतली नाही. बिटाचे कित्येक एकर पीक जमिनीत कुजून, सडून गेले. शेतकर्यांनी डोक्याला हात लावला. प्रयोगशील शेतकरी तर कपाळावर हात मारुन मटकन खालीच बसला.
चाणाक्ष वाचकांनी या गोष्टीतले मर्म ओळखले असेलच. प्रिय वाचका, या गोष्टीतला प्रयोगशील शेतकरी म्हणजे मीच बरे!
हा प्रतिसाद, किंवा याचं सार
हा प्रतिसाद, किंवा याचं सार असंच्या असं कापसाला लागू पडतं का? कापूस हे नाशिवंत पीक नाही. कापूस हे अन्नसुद्धा नाही. तरीही कापसाच्या बाबतीत असं होतं ते साठवणीची गोदामं पुरेशी नसल्यामुळे का? का शेतकरी, अडते, व्यापारी या कोणाचीच मोठ्या गुंतवणूकीची पत नाही म्हणून?
लाल चिखल
प्रतिसाद वाचून शालेय पाठ्यपुस्तकातील 'लाल चिखल' नावाचा धडा आठवला (बहुदा ९वी अथवा १०वी). यातील शेतकरी रसरशीत टमॅटो घेऊन शहरात विकायला जातो. प्रतिसादातील आशावाद त्या शेतकर्यातही असतो. (लेखक हा त्या शेतकर्याचा मुलगा). दिवसाच्या शेवटी त्याचा लाल चिखल होतो. कोणाला लेखकाचे नाव ठावूक असल्यास कृपया कळवावे. फार आवडलेला धडा मात्र तेव्हा संदर्भासहित स्पष्टीकरण द्यायची विशेष आवड नसल्याने लेखकाचे नाव वगैरे लक्षात ठेवण्याचे कष्ट घेतले नाहीत याचा आता पश्चाताप होतो.
संपादनः लागलीच शोध घेता माहिती मिळाली. लेखक भास्कर चंदनशिव. http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5412240675809826135
कापसाबद्दल काही - विकीवरुन-
कापसाबद्दल काही - विकीवरुन-
The largest producers of cotton, currently (2009), are China and India, with annual production of about 34 million bales and 27 million bales, respectively; most of this production is consumed by their respective textile industries. The largest exporters of raw cotton are the United States, with sales of $4.9 billion, and Africa, with sales of $2.1 billion. The total international trade is estimated to be $12 billion. Africa's share of the cotton trade has doubled since 1980.
सध्यातरी प्रयोगशील शेतकरी रहाण्यात तोटा नसावा, मालासाठी बाजारपेठ 'तयार' करणारे 'दलाल' आहेत त्यामुळे चिंता नसावी, उरलेसुरले ब्राह्मण दरिद्री असतो त्याप्रमाणे शेतकरी बावळट असतो हा समज जायला शेतकर्याचा बळी गेला तरी चालेल.
कांदा
ह्याबद्दल कांद्याचं जिवंत उदाहरण के वर्षापूर्वीच दिसलं होतं. मी "मनातले छोटे मोठे प्रश्न" मध्ये कुठेतरी लिहिलं होतं.
कांद्याचे भाव किलोला साठ रुपयांच्या घरात पोचलेले असतानाही शेतकर्यास चार ते सहा रुपयेच सतत काही महिने मिळत होते.
त्याला चार ते सहा मिळत असताना भाव वीस ते साठ रुपये असा प्रवास करुन आला.
हे शेतीचे अर्थकारण नेमके काय असते, कसे होते ते ठाउक नाही. पण दर इतके भन्नाट वरखाली जात असतानाच्या काळात प्रत्यक्ष शेतकर्याशी बोलताना हा उलगडा झाला.
( रिटेल मार्केटात चाळीस रुपये भाव असताना ; हा शेतकरी थेट ग्राहकास बर्यापैकी चांगला कांदा बारा-पंधरा रुपयांना कसा काय विकतोय, असा प्रश्न पडला.
त्यावेळी माहिती मिळाली.)
कोल इंडिया
http://articles.economictimes.indiatimes.com/2014-09-12/news/53851237_1…
सरकार कोल इंडियामधले, स्वतःचे, १०% टक्के समभाग विकायला काढणार आहे. या विरोधात कामगार संघटना संप करण्याची धमकी देत आहेत. कोळश्याची टंचाई असताना हा संप सुरु झाला तर वीजेचा प्रश्न गंभीर होईल.
डिसिंवेस्टमेंट हे संप करण्यासाठी पुरेसे कारण आहे का?
सोड
सोड रे.
तसंही भारतातला कोळसा दहाएक वर्सहत संपणारच आहे.
डिसिंवेस्टमेंट हे संप करण्यासाठी पुरेसे कारण आहे का?
माहित नाही. पण डिसिंवेस्टमेंट विरुद्ध भारतातच नाही तर जागतिक स्तरावर विरोध होतो कामगार संघटनांकडून वगैरे.
थॅचरबईंनी १९८०च्या दशकाच्या आसपास तिकडेते केलं तर तिला बराच विरोध सोसावा लागला असं ऐकलय.
शिवाय लक्ष्मी मित्तल कधी कोणती सरकारी कंपनी घेणार असले तर कामगारांचा विरोध वगैरेही बातम्या सवयीच्या आहेत.
आता बाहेरच्या देशातही विरोध = संप हेच समीकरण आहे की अजून काही आहे ते माहित नाही.
पण तिकडेही विरोध होतोच.
नीट पहायचं झालं तर कोणत्याही आस्थापनात मूलभूत फरक करु गेल्यास आहे त्या व्यवस्थेतील कुणी ना कुणी loser बनणार असतं.
परिस्थिती एकदम बदलल्यानं ,स्थित्यंतर आल्यानं काही नव्यानेच बनलेले winners, तर काही नव्यानेच बनलेले losers तयार होणार असतात.
म्हणून स्थित्यंतराला आहे त्या व्यवस्थेत सुस्थितीत असलेली मंडळी विरोध करतात.
.
.
.
अगदि सात आठ सबसिडरी ब्यांका स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये merge करायचं ठरलं तर इतका प्रखर विरोध झाला की वीसेक वर्षे उलटली आता
पण merger अजून पूर्ण झालेलं नाही. ह्या सबसिडरी ब्यांका म्हणजे स्टेट बँक ऑफ पतियाळा, स्टेट बँक ऑफ इंदौर, स्टेट बँक ऑफ हैद्राबाद,
स्टेट बँक ऑफ त्रावणकोर वगैरे.
सध्या कोल इंडियातलं सर्कारी
सध्या कोल इंडियातलं सर्कारी शेअरहोल्डिंग ८९.६५% आहे. १०% काढले तर ७९.६५% होईल.
सर्कारी शेअरहोल्डिंग ७६%च्या खाली गेलं की सरकारचा कंट्रोल गेल्यात जमा आहे. ते अर्थातच युनियनला नको असणार. या दहा टक्क्यांनी सध्या फरक पडत नसला तरी ७६%पासूनची माया कमी उरेल. पुढे ५% काढायचे ठरवले तरी बोंब होईल. किंवा कन्व्हर्टिबल डिबेंचर्स/प्रेफ शेअर्स असले तरी प्रॉब्लेम.
त्यामुळे ही संपाची धमकी.
"७५%च्या खाली" असं
"७५%च्या खाली" असं वाचावं.
कंपनी कायद्याप्रमाणे कंपनीचे निर्णय "ऑर्डिनरी रिझोल्यूशन" आणि "स्पेशल रिझोल्यूशन" या मार्गांनी होतात. महत्त्वाचे निर्णय हे स्पेशल रिझोल्यूशनने घेतले जातात. स्पेशल रिझोल्यूशन पास व्हायला तीनचतुर्थांश मेजॉरिटी लागते.
याचाच दुसरा अर्थ असा, की ७५% पेक्षा कमी शेअरहोल्डींग असेल तर त्या शेअरहोल्डरचा कंट्रोल निर्भेळ नाही.
“Exodus of the super-rich:
“Exodus of the super-rich: half of China’s millionaires plan to leave country within five years.”
http://shanghaiscrap.com/2014/09/chinese-want-to-leave-china-like-ecuad…
http://blogs.wsj.com/chinarealtime/2014/09/15/almost-half-of-wealthy-ch…
अदानींच्या संपत्तीत १५२% वाढ
अदानी उद्योगसमूहाचे कार्याध्यक्ष गौतम अदानी यांनी देशातील 'टॉप टेन' लक्ष्मीवंतांच्या यादीत स्थान मिळवण्याची किमया करून सगळ्यांनाच चकित करून टाकलंय.
ह्म्म्म
हे थोडसं फसवं आहे. यातून मोदी-अडाणी काहीतरी झोलपूर्ण नेक्सस आहे असा समज होऊ शकतो.
लेखातून
केंद्रात मोदी सरकार आल्यापासूनच अदानींचे शेअर तेजीत आहेत.
हे कारण आहे त्यामागचं. (फक्त अडाणी नाही, खूप कंपन्यांचे शेअर्स कायच्या काय वर गेले आहेत गेल्या वर्षात.) या वाढलेल्या संपत्तीमध्ये समभागांची वाढलेली किंमत हा खूप मोठा भाग असणार आहे.
चालू द्या...
मुकेश अंबानीच्या कंपनीमागे अनेक शुक्लकाष्ठ आहेत. कृष्णा-गोदावरी प्रकल्प वगैरे. त्यामुळे RIL चा भाव एवढा वाढलेला नाहिये. पण शेअर बाजारावर थोडंही लक्ष असलेला माणूसही हे सांगू शकेल की गेल्या वर्षभरात, त्यातही गेल्या ३-४ महिन्यात भारतीय शेअर बाजारांत काय धुमाकूळ चालू आहे. १५२% टक्के काय घेऊन बसलात, अनेकांच्या संपत्त्या ५-६ पटही झालेल्या असतील. समभागाचा भाव खाली आल्यावर हे आकडेही बदाबद खाली येतील. पण बातमी देण्यामागे तुमचा हेतू वेगळाच होता त्यामुळे हे सांगूनही काही उपयोग नाही.
बाकी चालू द्या...
पेसमेकरचा जनक
पेसमेकरचा जनक गेला तेव्हा आलेली ही बातमी, आत्ता वाचली. रिपोर्टींग आवडलं.
Wilson Greatbatch, Inventor of Implantable Pacemaker, Dies at 92
---
आजच्या ताज्या बातम्यांमध्ये या बातमीमुळे काहीसं मनोरंजनही झालं -
Cocaine and cannabis haul hidden in Vatican car seized by French police
उत्तरं
>> प्राजक्ता धुळप (आणि इतर) ह्यांच्या कामाबद्दल इथे काही सांगता येईल काय? त्याचबरोबर पुरस्कार कशासाठी मिळाला वगैरे
इथे माहिती मिळेल (मला गूगल करून हा दुवा मिळाला).
>> अवांतर - रमानाथ गोएंका उजवे होते न?, हा पुरस्कार म्हणजे पत्रकारिता जगतातला फिल्मफेअर आहे का नॅशनल अवॉर्ड आहे?
उत्तर देण्याचं उत्तरदायित्व नाकारतो आहे.
आजची बातमी+मनोरंजन मोदी उवाच
आजची बातमी+मनोरंजन
मोदी उवाच - आपणच बदलतोय, हवामान बदलत नाहीये.
(दुवा फेसबुकाचा आहे, त्याबाहेरचा व्हीडीओ मिळाला नाही.)
(व्हीडीओचा सारांश - असमची एक मुलगी म्हणाली, आम्हाला असममध्ये पर्यावरण बदलाचा सामना करावा लागतो आहे. आम्हाला त्याबद्दल काळजी वाटते.
मोदी म्हणे, आजकाल पोरंसोरंसुद्धा पर्यावरणाबद्दल बोलतात. आपण गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी थंडी जास्त आहे असं म्हणतो. वयोमानानुसार आपली थंडी सहन करण्याची शक्ती कमी होते. तसंच हवामान बदललेलं नाही, आपण बदललो आहोत.)
तत्त्वतः सहमत
हवामानापेक्षा वगैरे नक्की सांगू शकत नाही पण आपण जास्त बदलतोय या मुद्द्याशी मी तत्त्वतः सहमत आहे. मला असे वाटते की हळूहळू एका विशिष्ट दर्जाच्या आयुष्याची सवय झाली की त्याचे योग्य मूल्य आपण करु शकत नाही. उदा. १५० से. ते ३५० से. इतक्या तापमानाची रेंज मला कंफर्टेबल वाटत असेल तर ए.सी. / हीटर वगैरेंच्या सवयीने ती २५० से. ते ३०० से. इतपतच ती मर्यादित होऊ शकते. हळूहळू अगदी ३१० से तापमानासही 'किती उकडतंय' अशी प्रतिक्रिया निघू शकते.
हे मान्यच.
हे मान्यच. मला सध्या ३१-३२ अं.से. ची सवय झाली आहे. गेल्याच शनिवारी थंडीची लाट येऊन तापमान अचानक, काही तासांमध्ये तापमान १८-१९ से पर्यंत उतरलं तर लगेच उन्हाळ्याचा कंटाळा गेला, आणि ३६-३७ से तापमानवाला (मरणाचा) उन्हाळा पुन्हा हवाहवासा वाटायला लागला. सहा महिन्यांनी थंडीची सवय होईल तेव्हा २५ अं.से. म्हणजे फार उकडतं अशीही घरगुती तक्रार मी सुरू करेन.
आपल्या बदलण्याचा काही नेम नसतो. मोदींना प्रश्न विचारणाऱ्या शाळेतल्या (बहुदा ९-१० वीतली असावी) मुलीला 'वयोमानानुसार थंडी वाजण्याची' शक्यता निदान पुढची ३०-४० वर्षं नाही. वातावरणाचं तसं काही नाही ना! त्याची नियमित मोजमापं होत आहेत. माणसाने इंधन जाळल्यामुळे हरितगृह परिणाम होत नाहीये, असं मानणारे शास्त्रज्ञही, वातावरण बदलतंय हे मान्य करतात.
७५ हे मरण्याचे ऑप्टिमल वय आहे
७५ हे मरण्याचे ऑप्टिमल वय आहे का ? (ही बातमी नसून लेखकाने स्वतःचे मत मांडलेले आहे.)
http://www.theatlantic.com/features/archive/2014/09/why-i-hope-to-die-a…
लांबलचक लेख आहे. डिप्रेसिंग असू शकतो ... किमान काही लोकांसाठी.
वय
वय असे काही नक्की नसावे.
हाती पायी धड आहात तोवर जगत रहा.
रशियाच्या कोणत्याशा दुर्गम भागात लोक १०० वर्षाहून अधिक जगतात.
महत्वाचं म्हणजे अगदि शेवटच्या कालापर्य्म्त ते शेतावर जाउन काम वगैरे करत असतात.
तशी क्षमता असल्यास मलाही १०० पर्यंत जगायला काहिच प्रॉब्लेम असणार नै.
उलट वयाच्या विशीतच अंथरुणाला खिळलो, नि कायम असेच राहणार असेल तर ह्यापेक्षा मरण आलेले बरे असे वाटेल.
वय इज इम्मटेरिअल.
व्हॉट म्याटर्स इज मिनिमम बेसिक शारीरिक क्षमता.
http://timesofindia.indiatime
http://timesofindia.indiatimes.com/india/Maulvi-in-Army-censured-for-sa…
a Muslim priest of the Indian Army has approached the President of India, the National Commission of Minorities and Uttar Pradesh chief minister Akhilesh Yadav alleging that his superior officers have censured him for using the slogan because it "sends a message of religious hatred and extremism".
Subedar Ishrat Ali alleges his commanding officer has served him a notice warning him to "rise above narrowmindedness", and instead salute by using "Ram, Ram" and "Jai Mata Di" — the official battalion slogans — or face "disciplinary action". Ali told ET from Bikaner that he has protested and written to his superior officers.
काय चाल्लंय काय !!!
भारतीय मुस्लिम देशासाठी जगतील व मरतील
भारतीय मुस्लिम देशासाठी जगतील व मरतील - मोदी.
http://www.esakal.com/Tiny.aspx?K=D9LPu
सत्यपरिस्थितीची केंद्रीय सत्तेवर आल्यावर जाणीव झाली. ;) . काँग्रेजी नेत्यांनी हे असे म्हटले असते तर भक्तांना फारच झोंबले असते.
...
त्या लेखाखाली आलेल्या प्रतिक्रियांपैकी 'अंजुम' या नावाने आलेली प्रतिक्रिया मार्मिक आहे. (खाली उद्धृत.)
अंजुम - शुक्रवार, 19 सप्टेंबर 2014 - 03:41 PM IST
मोदी हे योग्य बोलत नाहीत. जणू काय यांच्या मालकीचा हा देश आहे. मुस्लिम या देशाचे कायदेशीर नागरिक आहेत. उद्या कुणी असे म्हणाले कि या देशातील हिंदू किंवा शीख गद्दारी करणार नाहीत. तर काय उत्तर असेल. संखेने कुणी कितीही असो या देशावर हिंदू मुस्लिम ख्रिश्चन, जैन, शीख, बोद्ध, पारसी अशा सर्व लोकां चा समान हक्क आहे. देशाच्या पंतप्रधानांना असे बोलण्या चे धाडस होतेच कसे? तुम्ही देशाचे नेते आहात कुणा समाजाचे नवे. माझ्या देशातील सर्व जनता देशप्रेमी आहे आणि या देशप्रेमाच्या बळावर आम्ही दहशतवादी, नक्षलवादी, जहालवादी, फुटीरवादी प्रवूत्ती मोडून काढू , असे वाक्य असायला हवे असे मला वाटते.
मुद्दा
अंजुम यांच्या भावनेशी सहमत. मात्र बातमीत असं दिलंय की आयसिस वगैरे दहशतवाद्यांच्या संदर्भात भारतातील मुसलमानांच्या भूमिकेबाबत काहीतरी प्रश्न विचारल्यावर मोदींनी हे उत्तर दिले. त्या मर्यादित परिप्रेक्ष्यात मोदींचे उत्तर योग्य वाटले. स्वतंत्र भाषणात वगैरे मुसलमानांना वेगळे काढून देशभक्तीचे सर्टिफिकेट देणे चुकीचे आहे.
मूळ
मूळ बातमी:
http://ibnlive.in.com/news/modi-world-exclusive-indian-muslims-will-liv…
विचारलेला प्रश्न आणि उत्तर:
Question: The head of Al Qaeda has issued a video and an appeal trying to create an Al Qaeda in India/South Asia - he says he wants to free Muslims from the oppression they face in Kashmir, Gujarat. Do you worry that something like this could succeed?
PM: My understanding is that they are doing injustice towards the Muslims of our country. If anyone thinks Indian Muslims will dance to their tune, they are delusional. Indian Muslims will live for India, they will die for India - they will not want anything bad for India.
हे उत्तर् म्हणजे बातमी नाही किंवा भाषण देताना हे प्रमाणपत्र दिलाय असे नसून एका प्रश्नाला हे उत्तर आहे.. त्यामुळे संदर्भ काय हे लक्षात घेणे गरजेचे आहे. बाकी बऱ्याच लोकांनी मूळ बातमी कुठून आली याकडेच दुर्लक्ष केले आहे.
सकाळ :- बकरी ईद म्हणजेच गाईचा उत्सव असा अर्थ होतो
ईदला कुर्बानीचा मोह टाळा- 'गोरक्षा मुस्लिम'
*******************************महम्मद फैज खान यांचा संदेश******************************************
पणजी- बकरी ईद या दिवशी पशुची कुर्बानी देण्याचा उल्लेख इस्लाम धर्मातील ‘कुराण‘मध्ये नाही व तशी परवानगीही नाही. त्यामुळे कुर्बानीचा जो मोह आहे त्याचा त्याग करा व बकरी ईदचा सण ईश्वराच्या प्रति उत्साहाने साजरा करण्याचा संदेश राष्ट्रीय गोरक्षा मुस्लिम संघटनेचे अध्यक्ष महम्मद फैज खान यांनी गोवंश रक्षा अभियानच्या पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
येत्या बकरी ईद पासून दहा दिवस (6 ते 15 ऑक्टोबर) देशातील सुमारे 100 ठिकाणच्या गोशाळेतील गाईंना खाद्य घालून तो साजरा करण्याचा संकल्प संघटनेतर्फे केला जाणार आहे. इस्लाम धर्मात गाईची हत्या करण्याचा कोठेच उल्लेख नाही. बकरी ईद म्हणजेच गाईचा उत्सव असा अर्थ होतो. देशातील इतर समाजबांधव गाईला माता मानतात तर एखाद्याला दुःख देऊन सण साजरा करणे हे योग्य नाही. सणही साजरा होईल व दुसऱ्यांनाही त्याचे दुःख होणार नाही असा पर्याय काढून तो साजरा करण्याचे मत खान यांनी यावेळी व्यक्त केले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर मुस्लिम जमात संघटनेच्या याचिकेवरील सुनावणीवेळी सरकारने घेतलेली भूमिका धक्कादायक व निराशाजनक होती. ज्या प्रकारे सरकारने याचिकादाराला अप्रत्यक्षपणे सहकार्य केले आहे ते पाहता सरकारने गोवंश रक्षा अभियानचा अपेक्षाभंग केला आहे व त्याचे दुःखही झाले. हा विषय धार्मिक होऊ नये म्हणून प्रयत्न अभियान करीत आहे व सरकारने त्या दृष्टीने हालचाली कराव्यात असे मत अभियानचे उपाध्यक्ष कमलेश बांदेकर यांनी व्यक्त केले.
गोवा मांस प्रकल्पात नियमांचे पालन करून गुरांना ठार करून त्याचे मांस काढले जाते. बकरी ईदवेळी तडफडत बैलांची कत्तल केली जाणार आहे. हे सर्व सीसी टीव्ही कॅमेरामध्ये होणार असल्याने ते नियमांचे उल्लंघन होणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पुन्हा तणावाची शक्यता नाकारता येत नाही. सरकारने मुस्लिमांना दिलासा देण्यासाठी खंडपीठात सशर्त अटी घालण्याची मागणी करून याचिकादाराच्या बाजू मांडली असावी असे बांदेकर म्हणाले.
इब्राहीम हे काश्मिरी कौल ब्राह्मण होते
त्याच बातमीवरील के प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे आहे :-
...
नबी इब्राहीम हे गो भक्त होते, इस्माईल ऐवजी दुम्ब्याचा बळी दिला गेला होता , आज सौदी मध्ये जगडील सर्वात मोठी गोशाला असून मोठ्या प्रमाणात गाईचे दुध वापरतात , प्राचीन इतिहास असेही सांगतो कि (आद्य ऐतिहासिक प्रेषित)इब्राहीम हे काश्मिरी कौल ब्राह्मण होते , हमुद्द जरी चर्चेचा होवू शकतो तरी भारतीय जनतेच्या भावनांचा आदर करून परस्परांच्या श्रद्धांचा आदर करावा ....
भारतातल्या तीन वेगवेगळ्या
भारतातल्या तीन वेगवेगळ्या घटनांमधलं साम्य शोधणारा, बैलाच्या (का डुकरांच्या?) डोळ्याचा वेध घेणारा एक लेख:
A game of target naming: On Deepika, Shweta & Suzette
तिबेटी लोकांची गळचेपी
चिनी राष्ट्राध्यक्ष भारतभेटीवर असताना दिल्लीत तिबेटी लोकांनी शांततापूर्ण विरोध दर्शवण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्यांना मारहाण केली असा आरोप करणारा लेख (आणि फोटो).
आँ???
१५००-१८०० मधला युरोप नास्तिक होता की काय? नै म्हणजे तेव्हा तिकडं असे भसाभस शोध लागले म्हणून म्हटलं.
झालंच तर खिलाफत, ग्रीस, रोम, चीन आणि (वाटल्यास) प्राचीन भारत...हे सर्व काय नास्तिक होते म्हणून इकडे सायंटिफिक शोध लागले हाही उदा. प्रचंड इणोदी निष्कर्ष.