पल्प फिक्शन
सगळेच दिवे,पेटतात विझतात
सगळेच खांब, हलतात पडतात.
डोक्यावर चंद्र,बेताल गातो
पारावर कावळा, टोचून खातो.
आगीची गुढी,आगीची काठी
नैवेद्याला,राखेची वाटी.
तहान तहान,शरीर बेभान
अलगद ऑरगॅझम,गादी परेशान.
इथली मुक्ती,तिथली मुक्ती
प्रवचन पेग,संध्याकाळी सक्ती
काँक्रीटचं जंगल,जंगलातलं तळं
काठापाशी रांगतंय, बेवारशी जुळं.
आपलेच दात,आपलेच ओठ
चराचराला मधाचं बोट.
कोण म्हणतं वाया,कोण म्हणतं शिल्लक
सापाचा मूड,गारुडी कफल्लक.
आडवा डोंगर,तिरके पाय
शिखराचं लक्षण,समजत नाय.
सुसाटते गाडी,रस्त्याला ताप
माडीवरलं सत्य,उगीचच पाप.
नवरा बायको,खासमखास
उरलेली भांडी,घासून टाक.
केकाटतं पोर,जिवाला घोर
उगीच म्हणायचं,नाचतो मोर.
मसणात जगा,कविता करा
ढेकूण मारा,'वध' म्हणा.
आयच्यान सांगतो,शेणाचं लक
एरवी विष्ठा विचार? व्हॉट द फक!
प्रतिक्रिया
वा!
!!!
काँक्रीटचं जंगल,जंगलातलं
या विशेष भिडल्या.
वा!
वा! बर्याचशा द्विपदी जमून आल्यात
ऐसीवर स्वागत
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
सगळेच दिवे,पेटतात
सगळेच दिवे,पेटतात विझतात
सगळेच खांब, हलतात पडतात.
पटलं
शीर्षकही आवडलं.
शीर्षकही आवडलं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
डोक्याला शॉट! विचार करायला
डोक्याला शॉट!
विचार करायला लावणारे काव्य!
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
छान
छान.
पण हे कडवे वेगळे का?
> नवरा बायको,खासमखास
> उरलेली भांडी,घासून टाक.
धन्यवाद...
प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार...
धनंजय, ते कडवं तसं इतर कडव्यांपेक्षा थेट असलं तरी त्यातला 'भाव' इतर कडव्यांसारखाच आहे...
शिवाय यमक नाही
शिवाय यमक नाही, हेसुद्धा वेगळे आहे.
हो
हो...यमक नाही हे वेगळे आहे....
आवडली
मस्त द्विपदी आहेत सगळ्या!
हे विशेष!
केकाटतं पोर,जिवाला घोर
उगीच म्हणायचं,नाचतो मोर.
मसणात जगा,कविता करा
ढेकूण मारा,'वध' म्हणा.
आभार
धन्यवाद क्षिप्रा...
उत्तम कविता
कविता खूप आवडली. भावनांशी पूर्ण् तः संंमत! खूप दिवसांनी एक छान कविता वाचण्यात आली.
आडवा डोंगर,तिरके पाय
शिखराचं लक्षण,समजत नाय. हे फक्त नीटसं समजलं नाही.
आभार
धन्यवाद रुची....
शिखर नक्की कुठे आहे, किती दूर आहे या अर्थी 'शिखराचं लक्षण'...
आडवा डोंगर,तिरके पाय
कविता आवडली...
कविता भारी
दुसर्यांदा वाचताना आणखी अर्थ उलगडले. पु.ले.शु.
ओह फक्! अफाट, अफलातून...
ओह फक्! अफाट, अफलातून...