सध्या काय वाचताय? - भाग १०
बऱ्याचदा एखादे पुस्तक आवडते, वाचता वाचता त्याबद्दल थोडेफार सांगावेसे वाटते, पण सविस्तर समीक्षक लेख लिहायचा उत्साह किंवा वेळ नसतो. तरीही, अशा चर्चेने नवीन पुस्तकांची ओळख होते, दुसऱ्यांना ती शोधून काढावीशी वाटतात, आणि कोणी वाचून त्याबद्दल सविस्तर मत मांडल्यास नवीन चर्चेचा धागाही निघू शकतो. धागा जिवंत राहिला की प्रत्येक दोन-तीन दिवसांनी डोकावून नवीन प्रतिसाद वाचायला मजा येते. स्थळाच्या नियमांप्रमाणे चर्चेत भाग घेणाऱ्यांनी फक्त शीर्षक एवढेच न देता, पुस्तक-लेखाबद्दल एक-दोन का होईना ओळी लिहाव्यात अशी अपेक्षा आहे.
==========
साधनेच्या ताज्या अंकातला निखिल वागळेचा माध्यमांवरचा लेख / भाषण.
+१
राजकीय पक्ष वाईट असले तर मतदार त्यांना नाकारतात पण माध्यमं वाईट झाली तरी लोक तसं का करीत नाहीत?
हे महत्त्वाचं आहे. आणि अचूक मांडलंय!
आपण जे वाचतो, बघतो त्यात सत्यांश कुठेतरी विरघळलेला असेल अशी केवळ एक वेडी आशा असते, पण मनात माहिती असतं की हे काही खरं नाही. त्याला एक जबरदस्त bias आहे.
वागळेंनी त्याला उघड पुष्टी दिलीये.
बर्याच दिवसांपासून एक प्रश्न मनात आहे की "न्यूजचॅनल, वर्तमानपत्रं यावर विसंबून रहाणं अशक्य आहे, मग अशा वेळी पर्यायी माध्यमं काय असतील?"
हे महत्त्वाचं आहे. आणि अचूक
हे महत्त्वाचं आहे. आणि अचूक मांडलंय!
राजकीय पक्ष वाईट असले तर मतदार त्यांना नाकारतात पण माध्यमं वाईट झाली तरी लोक तसं का करीत नाहीत?
माध्यमं वाईट झाली तरी लोक नाकारत नाहीत --- हे सत्य आहे ?
खरंतर जनतेस काय हवे आहे ह्याचा फीडबॅक माध्यमांना राजकारण्यांपेक्षा अधिक सातत्याने व लगेचच मिळत असतो. व तो मेझरेबल असतो. व माध्यमे त्यास रिस्पाँड करतात.
बातम्यांच्या संदर्भात-
बातम्यांच्या संदर्भात प्रश्न हा नाहीचे की "माध्यमं लोकांना हवं ते दाखवतात का". माध्यमं अशी filtered reality लोकांना दाखवतात- तसं असेल तर ते अजूनच भयानक आहे.
प्रश्न आहे माध्यमं निपक्षपातीपणे बातम्या दाखवतात का? आणि ती तसं करत नसली तरीही लोक त्या माध्यमांवर विश्वास ठेवून अशा माध्यमांचा वापर चालूच ठेवतात, म्हणजेच माध्यमांना नाकारत नाहीत.
रोचक आहे भाषण वागळेचं.
रोचक आहे भाषण वागळेचं. माध्यमांच्या स्वातंत्र्यावर बोलताना शेवटी सनातन प्रभात सारख्या , टुकार का होइना, एका माध्यमावर कारवाई का होत नाही असा प्रश्न विचारला आहे? मला यात विरोधाभास जाणवला. सोशल मिडीयाचा उपयोग करून घ्या म्हणतायत. पण तेही लोकांना काय दिसेल अशा गोष्टी मॅनिप्युलेट करतातच. आणि अजून भयंकर म्हणजे त्याचा कंट्रोल भारताबाहेर आहे.
१. माध्यमाला जाणवलेलं सत्य
१. माध्यमाला जाणवलेलं सत्य वृत्तांकनातून मांडणं आणि माध्यमाचा वापर करून एका अहिंसक सामाजिक कार्यकर्त्याविरुद्ध गरळ ओकणं यांत तुम्ही काहीच फरक करत नाही का?
२. सोशल मिडियाचा उपयोग करून घेणं म्हणजे सोशल मिडिया जे जे म्हणेल ते त्यावर डोळे झाकून विश्वास टाकणं नसावं; तर जेव्हा प्रस्थापित माध्यमांची वा माध्यमांतर्फे मुस्कटदाबी होते, तेव्हा सोशल मिडियाचा वापर करून लोकांपर्यंत पोचणं असावं.
मला तो फरक कळतो. पण मला हेही
मला तो फरक कळतो. पण मला हेही कळतं की हा फरक दरवेळी सनातन प्रभात आणि (समजा ) द हिंदू इतका भडक नसेल. छोटासा फरकही असू शकतो. आता कोणी दुसर्यानी ठरवलं की मला छोटा वाटणारा फरक खूप मोठा आहे आणि माझ्यासाठी हानिकारक आहे आणि मला वाचायचं आहे असं वृत्तपत्र ब्यान केलं तर? कोण रिलायबल आहे आणि कोण नाही हे मला ठरवू द्या.
अगदी बरोबर. माझं मला ठरवू
अगदी बरोबर. माझं मला ठरवू द्या.
आपल्या दोघांच्याही मनातली गोष्ट कळल्याप्रमाणे सरकारनं सनातन प्रभातवर कसलीही कारवाई केलेली नाही. वागळेंनीही मागणी करण्यापलीकडे दुसरं काहीच (सनातन प्रभातची मालकी ताब्यात घेणे, वा त्यांना अमुक गोष्टीवर लिहायला वा न लिहायला भाग पाडणे इत्यादी) केलेलं नाही.
आता माध्यमांच्या मालकांकडून आणि मालकांमार्फत होणारी मुस्कटदाबीही थांबली पाहिजे, तरच आपलं आपण काय ते ठरवू शकू ना? तेच तर वागळे म्हणताहेत.
यात काय विसंगती आहे?
मालकांकडून होणारी मुस्कटदाबी
मालकांकडून होणारी मुस्कटदाबी नाही पटत मला. पण त्या मुस्कटदाबीबद्द्ल बोलताना वागळे दुसरी एक मुस्कटदाबी का होत नाही (सरकारकडून) असा प्रश्न विचारतात हे विरोधाभासी नाही काय?
मालकांच्या मुस्कटदाबीबद्दल मी काही करू शकतो असंही नाही वाटत. वेगवेगळ्या गृप्सची वृत्तपत्रे वाचणे आणि एकाच वृत्त पत्रावर विसंबून न रहाणे हेच आपल्या हातात आहे.
बेताल लिखाणाबद्दल कारवाईची
बेताल लिखाणाबद्दल कारवाईची मागणी आणि प्रत्यक्ष मुस्कटदाबी यांत मी फरक करते. आपले मतभेद आहेत.
पण दुसर्या मुद्द्याबद्दलः वेगवेगळ्या ग्रुप्सचे बिल्डर आणि वेगवेगळ्या पक्षांचे राजकारणी यांची आपापसांत हातमिळवणी असते. परिणाम आपल्याला भोगावे लागतात. तिथे वेगवेगळ्या बाजूंचे लोक एकमेकांवर कुरघोडी करतील आणि आपला फायदा होईल, हे तत्त्व नाही कामी येत. तेच इथेही नाही का?
तिथे वेगवेगळ्या बाजूंचे लोक
तिथे वेगवेगळ्या बाजूंचे लोक एकमेकांवर कुरघोडी करतील आणि आपला फायदा होईल, हे तत्त्व नाही कामी येत. तेच इथेही नाही का?
मुद्दा मान्य आहे. पण म करायचं काय? श्रीमंत लोकांना वर्तमान पत्र काढण्यापासून/विकत घेण्यापासून रोखायचं? हो तर कसं? बरं म व्यापारी/बिझनेसमन लोकांनाच का रोखायचं? राजकारणी का नाही. राजकारणी लोकांची वृत्तपत्र नसतात का?
आणि पेड न्युज/ माध्यमांची मुस्कटदाबी हा प्रकार १६ मे २०१४ नंतर सुरु झाला याच्याशी असहमत आहे.
वागळे म्हणताहेत तसा लोकांचं
वागळे म्हणताहेत तसा लोकांचं पत्र (साइट, वाहिनी इ.) पर्याय असू शकतो. स्वप्नवत असला तरीही.
पेड न्यूज कधीपासून सुरू झाली या वादाला काही अर्थ नाही. तुम्ही म्हणत असाल ती १९६२ साली सुरू झाली, तर मी तुमच्या सुरात सूर मिळवीन. पण अमुक एक गोष्ट आधीही झाली, म्हणून आता ती समर्थनीय ठरत नाही. उलट आज उद्योगपती आणि राजकारणी यांच्या युतीला लपवाछपवी करण्याचीही गरज उरलेली नाही, 'लोकांना हवंय ते आम्ही देतोय. तुमच्याकडे पैसे नाहीत? मग आम्ही सांगू तेच सत्य ऐका' हे मार्केटचं लाडकं तत्त्व वापरून हवं ते करता येतं याची मला जास्तच भीती वाटते.
'लोकांना हवंय ते आम्ही देतोय.
'लोकांना हवंय ते आम्ही देतोय. तुमच्याकडे पैसे नाहीत? मग आम्ही सांगू तेच सत्य ऐका' हे मार्केटचं लाडकं तत्त्व वापरून हवं ते करता येतं याची मला जास्तच भीती वाटते.
वा वा वा. क्या बात है.
१) फक्त तेच तत्व मुखपत्रांना लावा की ? सामना, ऑर्गनायझर, राष्ट्रवादी संदेश .....
२) गूगल एक पै ही न घेता तुम्हास हवे ते देतं. बातम्या सुद्धा. (आता तुम्ही जनसामान्यांकडे/इंटरनेट संगणक नाही - असं म्हणून तो मुद्दा खोडायचा यत्न करणार. पण जो तोडगा काढला होता - सिंप्युटर - त्याचे काय झाले ? आज साधा मोबाईल सुद्धा सिंप्युटर सारखीच किंवा त्याहुनही जास्त फिचर्स/क्षमता बाळगून असेल.)
३) विकिपेडिया, अनेक वृत्तपत्रे संगणकावर मोफत उपलब्ध नाहियेत का ? फेसबुक हे प्रभावी माध्यम आहे. सर्वव्यापी नाही. पण जे वापरता त्यांना तरी प्रभावी वाटते. त्याच्यातून "तुम्हास हव्या त्या ऑब्जेक्टिव्ह न्युज" प्रसारित करू शकता तुम्ही. खरं ना ?
४) वॉल स्ट्रीट जर्नल हे मोफत नाही. पण तरीही त्याच्यावर "आम्ही म्हणतो तेच खरे" असा दावा केल्याचे आरोप आहेतच ना.
५) मार्केट फेल्युअर्स होतात/असतात म्हणून Government failures होतच नाहीत का ? वास्तविक Government failures ही जास्त भयाण नाहियेत का ?
६) जनतेस ऑब्जेक्टिव्ह न्युज हवी आहेत व अॅनॅलिसिस ही ऑब्जेक्टिव्ह हवा आहे - पण जनते ने गरीब असल्याने शुल्क दिले नाही तरी ही ते त्यांना मिळाले पाहिजे - अशी अपेक्षा का ? व ही अपेक्षा पूर्ण करणारे तरी अनबायस्ड होते का ?
७) राजकारणी व मिडिया मालक यांचे छुपे रिश्ते असतात. "कोल्युजन". पण जनता कोल्युजन करतच नाही असे आहे का ? खरंच ?
आपल्याला जे हवं त्याची किंमत
आपल्याला जे हवं त्याची किंमत दिली नाही, फुकटेपणा केला, तर जाहिरातींच्या मार्फत लोक माध्यमं बळकावतात. मुदलात वृत्तपत्राची किंमत कमी करायला नको होती. अजूनही लोकांनी रास्त पैसे मोजून मिडिया विकला जाण्यापासून वाचवावा, असंच त्या लेखात लेखकाचं प्रतिपादन आहे.
+१
+१
वागळेमामानं तसं स्पष्ट म्हटलय भाषणात.
अवांतर :-
त्यांच्या भाषणात समाजवाद्यांचा बराच उल्लेख आहे.
समाजवाद्यांची पोरे सुखचैनीत लोळत असताना पाहून संतोष वाटतो--
अगदि पर्यावरणवादी विदेशी ट्रिपा काढून चंगळ करत असताना पाहून वाटला नाही तितका वाटतो.
स्वतःचे भले त्यांनी चांगलेच साधलेले आहे.
मुदलात वृत्तपत्राची किंमत कमी
मुदलात वृत्तपत्राची किंमत कमी करायला नको होती. अजूनही लोकांनी रास्त पैसे मोजून मिडिया विकला जाण्यापासून वाचवावा, असंच त्या लेखात लेखकाचं प्रतिपादन आहे.
स्पर्धा प्रक्रियेचा परिणाम म्हणू शकता. जर माझ्या स्पर्धकाने किंमत कमी करून जाहीराती घेतल्या तर त्याचा खप ही वाढू शकतो व नफा सुद्धा. मग माझ्यावर प्रेशर येते. माझे शेअरहोडर्स माझ्या बोर्डावर दबाव घालतात. माझे बोर्ड माझ्यावर.
--------
आता दूरदर्शन किती लोक आवर्जून पाहतात ते ही मोजून पाहणे गरजेचे आहे ? १९७० - ९० मधे किती लोक पाहत होते ?? व आज ही दूरदर्शन वस्तुनिष्ठ बातम्या देतं असं म्हणता येईल ???
छान चर्चा
अनुप, मेघना: छान चर्चा चालु आहे.
श्रीमंत लोकांना वर्तमान पत्र काढण्यापासून/विकत घेण्यापासून रोखायचं? हो तर कसं?
नव्या बदलत्या काळात टीव्ही व/वा वृत्तपत्र हाच माहितीचा स्रोत राहिलेला नाही.
इंटरनेट लोकांच्या हातात पोचत आहे तसतसं या माध्यमांचं महत्त्व कमी होत जाईल. अशावेळी अशा श्रीमंतांच्या टाचेखाली राहू न इच्छिणार्या पत्रकारांनी या नव्या माध्यमाकडे अतिशय सिरीयसली बघायला हवं असं मला वाटतं.
म्हणूनच दुसर्या धाग्यावर दिलेली (राजदीप सरदेसाईंनी स्वतःची वेबसाईट काढणं) मला आशादायी वाटतं
लगेच पोट भरू लागेल असे नाही,
लगेच पोट भरू लागेल असे नाही, पण तिथे अधिकाधिक वाचक/प्रेक्षक जाऊ लागले, व वेबसाईट म्हणा किंवा जी काही जालीय रचना असेल ती पॉप्युलर होऊ लगली तर जाहिरातदारांना झक्कत तिथे जावे लागेल नी पोटापाण्याची व्यवस्था होईल हे एक.
दुसरे असे की असे काही चेहरे आहेत ज्यांनी पुरेसे कमवून ठेवलेले आहे, किमान त्यांनी या माध्यमाला जवळ करणे अधिक गरजेचे व (आर्थिक दृष्ट्या) कमी धाडसाचे आहे.
तिसरे असे की मुळात या माध्यमाला गुंतवणूकही कमी लागते, त्यामुळे मोबदला तुलनेने कमी पुरत असेल तर अधिक लहान व्यावसियिकांच्या जाहिराती अधिक संख्येने घेऊन गणित बसवता येऊ शकेल.
विल्यम शेक्सपिअरः जीवन आणि
विल्यम शेक्सपिअरः जीवन आणि साहित्य (के. रं. शिरवाडकर) हे पुस्तक वाचलं. शेक्सपिअरचं छोटेखानी चरित्र असं त्याचं वर्णन करता येईल.
शेक्सपिअरची कौटुंबिक-सामाजिक-आर्थिक परिस्थिती, त्याची भाषिक बलंस्थानं, थेटराबाहेर घोडे सांभाळण्यापासून प्रथितयश नाटककार होण्याचा त्याचा प्रवास, त्याची ती गूढ अर्थवलयी सुनीतं आणि अर्थातच त्याची ऐतिहासिक नाटकं, सुखात्मिका आणि शोकांतिका... या सगळ्याचा सुरेख आढावा लेखकानं घेतला आहे. पण विशेष लक्षात राहते ती लेखकाची शैली. शेक्सपिअरच्या दोन प्रेयस्यांचं गौडबंगाल असो, की त्याच्या सुनीतांमधून डोकावणारा त्याचा जिवलग सखा असो - प्रसन्न खेळकरपणे पुरावे नोंदत आणि अंदाज बांधत लेखक पुढे जातो. तत्कालीन नाटककारांनी शेक्सपिअरबद्दल व्यक्त केलेली असूया, नाटक कंपन्यांमधल्या स्पर्धा, तत्कालीन थेटर्सची आणि प्रेक्षकांची वैशिष्ट्यं असे अनेक इंट्रेष्टिंग तपशील रंजकपणात भर घालतात.
येताजाता हुच्चभ्रू समीक्षकांस आणि समांतर कलाकृतींस शालजोडीतले मारणार्यांस फारच आवडावी अशी आणिक एक लेखकीय टिप्पणी :- 'शेक्सपिअर आज असता आणि एखाद्या नाटककाराची ओळख त्याला 'हा आजचा गल्लाभरू नाटककार' अशी करून दिली असती, तर शेक्सपिअरनं त्याला अतिशय आदरानं आणि मानानं गळामिठी मारली असती. आपली काही गफलत झाली आहे, हे कळायलाही त्याला बराच वेळ लागला असता!'
खिक, होय! आता संधी आलीच आहे,
खिक, होय!
आता संधी आलीच आहे, तर काही प्रश्न विचारून घेते.
वागळेंचे हावभाव अतिशय ठोकळेबाज असत, माध्यमबदलाचं भान राखण्याऐवजी त्यांनी त्यांच्यातला वर्तमानपत्री सर्वेसर्वा संपादक वरचढ ठरू दिला, त्यांचा आरडाओरडा चर्चेच्या वातावरणाला मारक ठरत असे. अग्रलेखासारखं प्रभावी माध्यम नसल्यामुळे त्यांची ताकद दृश्यमाध्यमात एखाद्या विदूषकाइतकीच (मी विदूषक या पारंपरिक पात्राला अंडरेस्टिमेट करते आहे, माफी द्या) उरली... हे सगळे आक्षेप रास्त आहेत.
त्यांच्याबद्दल अजून काय आक्षेप आहेत? आणि तुमच्या मते या माध्यमाचा प्रभावी वापर करणारे चेहरे कोणते?
या माध्यमाचा प्रभावी वापर करणारे
या माध्यमाचा प्रभावी वापर करणारे हे टीव्ही/न्यूज च्यानल ह्याबद्दल आहे असं समजून बोल्तो आहे.
बातमीपत्र ह्या प्रकारात भारतात लोकसभा टीव्ही व राज्यसभा टीव्ही अत्यंत दर्जेदार, विश्वासू, संयत व आशयगर्भ वाटतात. त्यातील चर्चांतही मंडळी अंगावर धावून जाउन ओरडत नाहित.
आक्रमकता म्हणजे आवेश नव्हे, हे तिकडे पाहिल्यावर जाणवते.
मी काय वाचलं ..
नुकतंच अमेरिकन लेखक हेन्ऱी डेव्हिड थॉरोचं 'वाल्डेन' ('Walden') हे आत्मचरित्रपर पुस्तक वाचून झालं आहे. तो साधारण 1845 ते 1847 या काळात कॉंकोर्ड, मॅसॅच्युसेट्स मधील आपलं घर सोडून जवळच्या जंगलात 'वाल्डेन' तळ्याकाठी जाऊन एकांतवासात राहिला होता.
त्या काळाचं वर्णन ही या पुस्तकाची प्रमुख पार्श्वभूमी आहे. त्याचबरोबर थॉरोचं निसर्ग, सौंदर्य, औद्योगीकरण, विकास, श्रमव्यवस्था, सामाजिक संबंध, रूढी-परंपरा इ. नानाविध विषयांवरचं मुक्त चिंतन या पुस्तकात आहे.
पुस्तकातील कंटाळवाणे झालेले, लांबलेले सृष्टीवर्णनाचे अगदी मोजके काही भाग सोडता मला ते आवडलं.
'वाल्डेन'मधील हा उतारा प्रसिद्ध आहे:
“I went to the woods because I wished to live deliberately, to front only the essential facts of life, and see if I could not learn what it had to teach, and not, when I came to die, discover that I had not lived. I did not wish to live what was not life, living is so dear; nor did I wish to practise resignation, unless it was quite necessary. I wanted to live deep and suck out all the marrow of life, to live so sturdily and Spartan-like as to put to rout all that was not life, to cut a broad swath and shave close, to drive life into a corner, and reduce it to its lowest terms, and, if it proved to be mean, why then to get the whole and genuine meanness of it..”
..... आता बर्नार्ड श्लिंकचं 'द रीडर' वाचायला घेणार आहे.
इस्राएल - ए हिस्टरी, इन टू द वाईल्ड
इस्राएल - ए हिस्टरी हे मार्टिन गिल्बर्ट य ब्रिटिश इतिहासकाराचे पुस्तक वाचते आहे.
ज्यू लोकांमध्ये हजारांहूनही अधिक वर्षे टिकून राहिलेली "परत घरी" जाण्याची ओढ कशामुळे असावी, आणि धर्म (आणि नव्याने वापरात आणलेली हिब्रू भाषा) वगळता, विविध देशांमधे स्थायिक झाल्यामुळे बहुधा विकसित झालेल्या तुलनेने वेगवेगळ्या संस्कृती, परंपरा आणि स्वीकारलेल्या मातृभाषा हे सर्व सोडून/ त्यात तडजोड/ बदल करून पुन्हा एक राष्ट्र म्हणून एकत्र येण्याच्या तीव्र इच्छेमागे काय कारण असावे याबद्दल कुतुहल आहे. त्यासाठी हे पुस्तक निवडलं आहे.
सध्याच्या परिस्थितीच्या आकलनात काही भर पडली तर तो बोनस!
सात-आठशे पानांचा ठोकळा आहे. त्यामुळे वाचून संपेपर्यंत सध्याचं युद्ध संपलेलं असावं!
इन टू द वाईल्ड नावाचं छोटंसं पुस्तक हल्लीच वाचलं. त्यावरचा सिनेमाही प्रसिद्ध असावा.(मी पाहिलेला नाही). फार आवडलं नाही. ख्रिस मॅककॅण्डलेस नावाच्या २४ वर्षांच्या मुलाची समाजापासून दूर जाण्याच्या प्रयत्नातली अमेरिकाभर केलेली भटकंती, आणि शेवटी अलास्कातील एका जंगलात चुकून विषारी बिया पोटात गेल्यामुळे आलेला मृत्यू यावर जॉन क्रौकर या पत्रकाराने लिहिलेलं नॉन फिक्शन मध्ये मोडणारं हे पुस्तक. ख्रिसच्या प्रवासाची वर्णनं आणि त्याला वाटेत भेटलेल्या असंख्य लोकांच्या मुलाखती हे विचार करायला लावणारं असलं, तरी मुळात ख्रिसच्या प्रवासामागची कारणं आणि फारश्या साधनं, अनुभव किंवा प्रशिक्षणाशिवाय अलास्कामध्ये जंगलात एकट्याने जाऊन राहण्याचा त्याचा हट्ट हे पटलं/ रुचलं/ कळलं नाही. स्वयंपूर्णता आणि निसर्गाजवळ जाऊन, शक्य तितक्या नैसर्गिक तर्हेने जगण्याची त्याची इच्छा आपलीशी वाटून गेली, पण त्याला ते खरोखरच जमले का याबाबत साशंकताच राहिली आहे.
सविता
जॉन ग्रिशअॅम यांचे "रनवे
जॉन ग्रिशअॅम यांचे "रनवे ज्युरी" पुस्तक वाचते आहे. सिनेमा पाहीला होता अन आवडला होता पण आता कथा आठवत नाही ते एक बरच आहे.
सिगरेट उत्पादन व्यवसायातील रथी-महारथी अन त्यांची संपत्ती हडप करण्याकरता टपून बसलेले, त्यांना कोर्टात खेचू इच्छिणारे सामान्य लोक अन मातब्बर वकील असा सेटप आहे.
ओह रिअली? पण पुस्तकात आत्ता
ओह रिअली? पण पुस्तकात आत्ता पात्रांची मांडाणी टोबॅको टायकून बद्दल आहे.
________________
सापडलं - The film had been in pre-production since 1997. Directors slated to helm the picture included Joel Schumacher and Mike Newell, with the lead being offered to Edward Norton and Will Smith. The novel's focus on big tobacco was retained until the 1999 film The Insider was released, necessitating a plot change from tobacco to gun companies.
+१
याचा प्लॉटदेखील पहील्याइतकाच आवडला, पण मधे कुठेतरी कथा किंचीत संथ झाल्यासारखी वाटली.
तंतोतंत.
लिओनाराची व्यक्तिरेखा छान उभी केली आहे -....and an air of still wearing bedroom slippers even though her feet were clad in scuffed black shoes किंवा
"...Next to Kathryn, Strike appeared huge and almost unnecessarily male" यासारखी नेमकी, ईषत्-विनोदी निरीक्षणंही खासच.
http://timesofindia.indiatime
http://timesofindia.indiatimes.com/life-style/Mind-set-Dilemma-of-a-lib…?
डिलेमा ऑफ लिबरल हिंदू. काय अप्रतिम लेख आहे. स्वतःचं र्याशनलपण छाती बडवू बडवू प्रूव्ह करायची हौस इतरांच्या धार्मिकपणाला शिव्या घालून भागवणार्यांचं ढोंग मस्त उघडकीस आणलं आहे.
निरीक्षण आणि निष्कर्ष
लेख गंमतीशीर आहे. 'मी महाभारत वाचायचं ठरवताच मला आलेला व्यक्तिगत अनुभव आणि त्यावरून मी काढलेले सरसकट निष्कर्ष' असं लेखाचं स्वरूप आहे. व्यक्तिगत अनुभवांवरून वाचकाच्या हृदयाला हमखास हात घालणारं असं काही तरी म्हणून लेखक मोकळा होतो -
If Italian children can read Dante's Divine Comedy in school, English children can read Milton and Greek children can read the Illiad, why should "secularist" Indians be ambivalent about the Mahabharata?
जर व्यक्तिगत अनुभवांबद्दलच बोलायचं झालं, तर माझ्या आसपास अनेक 'सेक्युलर' लोक आहेत, पण त्यांतल्या कुणाकडून महाभारताबद्दल अशी प्रतिक्रिया आलेली नाही. किंबहुना इब्राहिम अल्काझी, रतन थिय्यम, सत्यदेव दुबे ते पीटर ब्रुक अशा अनेकांनी मंचावर किंवा सिनेमात सादर केलेलं महाभारत त्यांनी आपल्या मुलाबाळांसकट हौसेनं पाहिलेलं आहे. तसंच 'मृत्युंजय', 'राधेय'सारख्या लोकप्रिय साहित्यापासून ते भैरप्पांनी चमत्काररहित वास्तवदर्शी चित्रण केलेलं 'पर्व' किंवा इरावती कर्व्यांचं 'युगांत' आणि दुर्गा भागवतांचं 'व्यासपर्व' अशी अनेक पुस्तकं त्यांनी वाचलेली आहेत आणि ती त्यांच्या घरांतल्या पुस्तकांच्या कपाटात विराजमान आहेत हे मी पाहिलेलं आहे. मग आता ह्यावरून मी काय निष्कर्ष काढावा? फार तर श्री. गुरुचरण दास ह्यांच्या आसपासचे सेक्युलर लोक माझ्या आसपासच्या सेक्युलर लोकांहून वेगळे आहेत एवढाच निष्कर्ष मी काढतो.
दुरुपयोगाच्या भीतीने सत्य
दुरुपयोगाच्या भीतीने सत्य मांडूच नये हे चूक आहे.
अजुन एक रोचक सत्य असे की श्री दास हे स्वतः महाभारतावरील आगामी पुस्तकाचे लेखक (व सेल्फ प्रोक्लेम्ड तज्ज्ञ ;) ) आहेत (हे त्या लेखाच्या खालीही लिहिले आहे). महाभारताला अॅकॅडमिक अभ्यासक्रमात स्थान देण्यामागे त्यांचा व्हेस्टेड इंटरेस्ट नाही असे मी ठामपणे म्हणू शकत नाही.
बाकी मुळ लेखाबद्दलः
तथाकथित पुरोगाम्यांच्या ज्या वर्तनावर (सरसकटीकरणावर - जो महाभारत वाचेल तो उजवा) ते टिका करत आहेत तेच वर्तन (अर्थात सरसकटीकरण - सगळे पुरोगामी असेच असतात) या लेखातच ते दर्शवत आहेत असे वाटले
दुसरा दोष बॅट्याचा. त्याच्या मुळ प्रतिसादामुळे लेखाकडून अपेक्षा बर्याच उंचावल्या होत्या. :)
तरून-वाचक-हृदय-सम्राट श्री
तरून-वाचक-हृदय-सम्राट श्री चे-तण भगत यांचे नवीन पुस्तक येत आहे. हाफ गर्लफ्रेंड.
मलपृष्ठावरील मलनिस्सारण मजकूर येणेप्रमाणे
Once upon a time, there was a Bihari boy called Madhav. He fell in love with girl called Riya.
Madhav didn?t speak English well. Riya did.
Madhav wanted a relationship. Riya didn?t.
Riya just wanted friendship. Madhav didn?t.
Riya suggested a compromise. She agreed to be his half-girlfriend.
फ्लिपकार्ट्यांकडे आगाऊ ऑर्डरचा लाभ इच्छुकांनी घ्यावा.
(अवांतर)
चेत्या भगतच्या पुस्तकांतला
"चेत्या" भगत???
श्री. चेतन भगत यांच्याशी आपली व्यक्तिगत जानपछान, काही वैयक्तिक सलगी वगैरे१ आहे काय?
(असल्यास, ही लपविण्याची बाब आहे, चारचौघांत जाहीरपणे सांगण्याची नव्हे, एवढेच सुचवू इच्छितो.)
===================================================================================================
१ म्हणजे, मित्रांमित्रांत२ असते, तितपतच. याहून अधिक खोल अर्थ नाही.
२ 'लंगोटीयारांत' म्हणणार होतो, पण उगाच नको, म्हटले.
नवारुण भट्टाचार्य या विख्यात
नवारुण भट्टाचार्य या विख्यात बंगाली साहित्यिकाचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. "हार्बार्ट" ही त्यांची गाजलेली कादंबरी (इंग्रजी अनुवाद उपलब्ध); अनेक मॅजिक-रियल-शैलीच्या कथांतून "फॅताडू" नामक अद्भुत पात्राला ही त्यांनी अत्यंत लोकप्रिय केले. डाव्या विचारांचे, चळवळीत असलेले नवारुण महाश्वेता देवी यांचे पुत्र होते.
जादवपूर विद्यापीठाच्या इंग्रजी प्रोफेसर सुप्रिया चौधरी यांनी त्यांची एक कविता अनुवादित केली, ती काल फेसबुकवर वाचली:
Homage to Nabarun Bhattacharya
(Homage to Nabarun Bhattacharya)
Tram
I too am dying out from Calcutta, tram.
Written off because I’m too slow, obstinate, unprofitable:
Dark when untouched by electricity,
I too become night-blind, stupid:
Like a beached dolphin, nose down, motionless.
No one will put up with these old crocks any more;
Now it’s all fast food, debentures, shares, smart money.
Better for both of us to get out of it all,
Isn’t that so, tram?
No one will take you on the second Hooghly Bridge, tram.
No one will take you to Salt Lake, to the Taj Bengal,
To the marshes of Greater Calcutta, the reckless curves of the Bypass.
Does Madonna’s wild tempo ever
Make its way into a sonorous alap or jod?
Many years from now, indeed:
Your lights slipping away at night on the Maidan
While here and there, strung around temple or church,
Bells ring out a message;
Each ticket like a page of poetry,
The conductor-librarian,
The ancient driver –
all this will become antique Egypt,
The vanquished will be lost in the depths.
Yet, tram, with you
the protest march held step;
And sitting in your second class carriage
the poet of rallies
Sang untunefully,
songs of revolt and freedom.
With your three eyes and rain-soaked lights you were
the unearthly transport of lovers.
I too am being written off in Calcutta, tram.
I too from networks overhead
visible or invisible, draw no dreams.
Tram, I too am being taken off
because I’m too slow, awkward, unprofitable.
In the end, tram, the people of Calcutta
Will lack the word ‘outline’;
Nothing but set hymns; no one
will so much as sing a song of rejection.
Like a patient refused entry at hospital after hospital,
Like an injured boxer or football player,
In hurt pride, insult, neglect,
scrapped by the profit principle,
We too are dying out from Calcutta, tram.
Nabarun Bhattacharya
Translated by Supriya Chaudhuri
गेट अ लाइफ-यु डोन्ट नीड अ
गेट अ लाइफ-यु डोन्ट नीड अ मिलिअन टू रिटायर वेल.- राल्फ वॉर्नर यांचं पुस्तक घेतलं आहे. मध्यमवयात फक्त पैसे जमवण्यावर लक्ष केंद्रित करुन कुटुंबाची व आरोग्याची (शारीरीक्/मानसिक अन सामाजिक) अक्षम्य हेळसांड करु नका. कुटुंबाशी नाळ जोडा, नवे मित्र मिळवा, व्यायाम करुन नैराश-वैफल्यादि आधिव्याधी दूर ठेवा, विविध विषयात रुची घ्या असे सांगणारे उपदेशपर सेल्फ-हेल्प पुस्तक आहे.
वरवर चाळलं अन आवडलं. आज ग्रंथालयातून घेतलय. वाचायचा मानस आहे. जमेल तसं इथे टंकत राहीन.
पुस्तक फडतूस आहे. परत
पुस्तक फडतूस आहे. परत घाईघाईने प्रतिसाद टंकणार नाही. नीट पुस्तक वाचायला हवं होतं :(
मुख्य भर पैसे न मिळवता/जमवता, ब्लाह ब्लाह ब्लाह वर आहे. जे की मला अव्यवहारी वाटलं. पैसे मिळविणे अन मित्र-मैत्रिणी मिळवणे/कुटूबाशी मैत्र सांधणे/आरोग्य या गोष्टी म्युच्युअली एक्स्क्लुझिव्ह आहेत - हे गृहीतकच मुळात गंडलं आहे. आयव्हरी टॉवर टाइप पुस्तक वाटले. रॅग्स टू बेटर रॅग्स अशी व्यक्ती मॉडेल दाखवली आहे आणि तिथेच पुस्तक भिरकावलं गेलेलें आहे. असो.
एका नर्सेसच्या सर्व्हेमध्ये
एका नर्सेसच्या सर्व्हेमध्ये मरणार्या माणसांची दु:खं जाणून घ्यायचा प्रयत्न केला गेला होता म्हणे.
सगळ्यात वरच्या क्रमांकाला असलेली पाच दु:खे अशी निघाली:
http://www.theguardian.com/lifeandstyle/2012/feb/01/top-five-regrets-of-the-dying
I wish I’d had the courage to live a life true to myself, not the life others expected of me.
I wish I hadn’t worked so hard.
I wish I’d had the courage to express my feelings.
I wish I had stayed in touch with my friends.
I wish that I had let myself be happier.
तुंबाडचे खोत
सध्या वाचतो आहे. आधी वाचलेलं तेव्हा कालिजात होतो (ग्रंथालयातील एका काकांचा माझ्याकडे टाकलेला भेदक कटाक्ष अजून आठवतो).
वेडेवाकडे चावट शब्द आणि घटना असलेली एक मोठी कादंबरी एवढंच तेव्हा उमगलं, (काकांचा कटाक्ष बहुतेक ह्यासाठीच असावा)
आता परत वाचताना वाटलं की काय लिहिलंय पुस्तक!
अनेक बाजूंनी चर्चा करता येईल. पात्रं आणि त्यांची व्यक्तीचित्रं, कोकणाचा भूगोल, इतिहासातील खर्या घटनांची जोड, इ.इ. बर्याच अंगांनी ही कादंबरी वाचता येईल.
बरेचदा वाचता वाचता डोळे मिटून हरणटेंभा, टेंभुर्णी देवी आणि ती जगबुडी नदी कशी दिसत असेल हे बघायचा प्रयत्न करतो.. काही धूसर चित्रं मनात उभी रहातात.
कोकणातील वेंगुर्ला, कुंभवडे, राजापूर, मालवण, परु़ळे वगैरे ठिकाणांमधली निवडक चित्र एकत्र केल्यावर तुंबाड दिसतं :)
तुंबाडच्या खोतांचं रसग्रहण कुणी वाचलं आहे का? ह्या कादंबरीची कशी दखल घेतली गेलीये, ते आता वाचायचं आहे!
ग्रंथालयातील एका काकांचा
ग्रंथालयातील एका काकांचा माझ्याकडे टाकलेला भेदक कटाक्ष अजून आठवतो
:) म्हणजे काकांनी नीट पारायण केलेले असणार. अशा मनोवृत्तीचा मला फार राग येतो :) स्वतः नीट वाचायचं/ सिनेमे पहायचे अन मग उपदेश देत अन कमी लेखत अन मुख्य म्हणजे टांग अडवत फिरायचं.
आम्हालाही चूका करु द्यात की ;)
_________
तुंबाडचे खोत वाचणे म्हणजे चूक करणे आहे असा गर्भितार्थ नाही :)
तुंबाडचे खोतचे दोन्ही भाग
तुंबाडचे खोतचे दोन्ही भाग प्रचंड आवडतात.
श्रीनांच्या आत्म(?)चरित्रात "'तुंबाडचे खोत' महाकादंबरी झाली, पण महान कादंबरी नाही झाली" असा काहीसा उल्लेख आहे. बाकी गारंबीचा बापू आणि रथचक्रच्या वाट्याला जितकं समीक्षा-भाग्य आलं तितकं तुंबाडच्या वाट्याला आलं नाही. कोणाला तुंबाडची समीक्षा आठवत असल्यास संदर्भ द्यावा, मलाही वाचायची आहे.
तुंबाडमध्ये श्रीनांच्या स्टॉक कॅरेक्टर्सचा अभाव आहे, हे आवडतं. ("गारंबीचा बापू" हे तसं श्रीनांचं स्टॉक कॅरेक्टर म्हणता येईल. बर्याच कादंबर्यात ते आलं आहे.)
तक्रारच उकरायची झाली तर कादंबरीला overarching plot नाही, ही असू शकेल.
overarching plot म्हणजे या
overarching plot म्हणजे या दोन्ही खंडांना बांधून ठेवणारं एक कथासूत्र. सुरुवात दादा खोतापासूनच का झाली? शेवट स्वातंत्र्याच्या वेळेसच का झाला? खोत / तुंबाडकर घराण्याचा इतिहास वाचकाने का वाचावा?
याची उत्तरं देणारं कथासूत्र.
(उदा. हॅरी पॉटरमध्ये "हॅरीचा व्होल्डेमोर्टवर विजय" हा overarching plot आहे.)
श्रीनांनाही हे जाणवलं होतं बहुतेक. म्हणूनच "कुळाचार शोधत मुंबैचे भाऊसाहेब तुंबाडला येतात" हा overarching plot टाकायचा प्रयत्न केला आहे. कादंबरीचं शेवटचं वाक्य (आठवणीतून - चुभू..) "ब्रह्महत्येचं पातक डोक्यावर घेऊन परागंदा झालेला बंडू खोत हाच आपला पूर्वज हे त्यांना कळून चुकलं होतं. म्हणूनच खोतांच्या पुढच्या पिढ्यांच्या इतिहासाची उठाठेव ते करत होते." हे म्हणजे overarching plot चिकटवण्याचा क्षीण प्रयत्न आहे.
तुंबाडच्या खोताची पहिली दहापंधरा आणि शेवटची पाच पानं फाडून टाकली तरी कथावस्तूत काहीच फरक पडत नाही.
रसग्रहण
'तुंबाडचे खोत' प्रवाही आणि खिळवून ठेवणारी कादंबरी आहे, फार शब्दांचे खेळ न करता, खानोलकरांच्या एवढे सटल लैंगिक वर्णन न करता थेट करुनही टिटॅलिएशनचा आरोप टाळता येण्यासारखे लिहिले आहे असे वाटते. अदुबाळ म्हणतात त्याप्रमाणे एक ओव्हराआर्किंग कथेचा अभाव असल्याने रुढ अर्थी कादंबरीचा मान मिळाला नसावा.
पण कोकणातून उचलून कुठल्याही पार्श्वभुमीवर सांगितली तरी कथेत फारसा फरक पडणार नाही हे एकप्रकारे कोकणातल्या लेखकाचे अपयश आहे काय असा प्रश्न अनेक कथा-कादंबर्यांच्या समिक्षा वाचल्यानंतर मला पडला, म्हणजे कोकणातले जे जग श्रीना दाखवतात तेच जग आत्तापर्यंत दळवी, रवींद्र पिंगे, खानोलकर ह्या लेखकांनीही दाखवले आहे, त्याशिवाय को़कणात इतर काहीच नाही काय? असे प्रश्न पडतात.
त्याशिवाय को़कणात इतर काहीच
त्याशिवाय को़कणात इतर काहीच नाही काय?
पेंडसे, दळवी प्रभृतींनी दाखवलेलं कोकणही वीसेक वर्षं जुनं असावं. कोकणातल्या जीवनातल्या नव्या प्रवाहांचं चित्रण१ करणारी नवीन कादंबरी आहे काय?
१ उदा. राजकीय गुंडगिरी, ट्रॉलरमाफिया, शस्त्र आणि मानवी तस्करी, वाढत्या पर्यटकीकरणाचे परिणाम, वगैरे. (कोकणात रहाणार्या मित्र/परिचितांकडून समजते त्याप्रमाणे)
अजून काही निरिक्षणं : तुंबाड
spoiler Alert!
/*************************
@कोकण :
कोंडुरा वाचल्यावर कोकणाच्या विक्षिप्तपणाचं सहीसही दर्शन झाल्यासारखं वाटलं. बालकांड वगैरे वाचूनही तीच प्रतिमा पुढे आली. (कदाचित म्हणूनच कोकणावर ज्यादाचं प्रेम असेल!)
दळवींनी तर कोकणातल्या वि़क्षिप्तपणाचे नमुनेच निवडून मांडले आहेत.
हे सगळं आधी वाचल्याने बहुतेक मी कोकणी स़णक गृहीत धरली असावी!
माझ्यासाठी 'तुंबाड'मधे हा कोकणी सणकीपणा डोकावतो, पण तो कथेला overpower करत नाही. वाटेवाटेने कथेसोबत चालत रहातो.
तेव्हा कोकणाच्या टिपिकल गोष्टीच तुंबाडमध्ये आल्यात, असं वाटलं नाही. आलंय ते तोंडी लावण्यापुरतं.
@व्यक्तीचित्रं
दादा आणि बंडू ह्या जुळ्या खोतांचा माजोरी, खुनशी स्वभाव - एका पिढीनंतर तो भिकापा-चिमापात उतरलेला.
गोदाची सात्विकता नंतर गणेशशास्त्री -ताईमध्ये.
बजापा हे एकदम वेगळं मिश्र रसायन- त्याचा दिलदारपणा आणि शौर्य हे बहुधा स्वयंभूच.
विश्राम हेही परिस्थिती आणि ताईच्या संगतीतून घडलेलं व्यक्तिमत्व. त्यात आजोबांचे गुण अधिक. पण तो एक वेगळाच, तुंबाडच्या सीमेबाहेरच.
अनंता ही शोकांतिका (ह्यावर देवदासचा काही प्रभाव असावा का?)
मग पुढच्या पिढीत ओड्डलमधे बजापाचा दिलदारपणा, भावुकता पण त्याचबरोबर आलेला संशय आणि राग. ओड्डल ही बहुतेक तुंबाडमधलं सर्वात जबरदस्त लिहिलेलं व्यक्तिचित्र असावं.
तुंबाड शाखेत ज्याच्या लहानपणापासून ते वृद्धत्वापर्यंतचा प्रवास वाचकांसमोर उलगडत जातो- तसा अजून कुणाचाही होत नाही.
दुसरी शाखा लिंबाड - त्यात नाना खोताचा शामळू आणि अँटीखोत स्वभाव. मग मधू ते नरसू आणि पुन्हा मधू असा प्रवास.
त्यात नरसू खोत हे श्रीनांनी खुलवलेलं चित्र. पण ते कर्तबगारी वगैरेमधे गारंबीच्या बापूटाईप झालंय असं वाटलं. लिंबाडच्या काकांची तुंबाडवरची माया हेही विशेष- पुन्हा प्रत्येक मुलगा बापाला हेच बजावतो की असलं काही करू नका, आणि कालांतराने आपल्या पुतण्यांसाठी तेच करतो! हेसुद्धा मस्त.
इतिहास-
आधी पेशवाई->इंग्रज->स्वातंत्र्य इ. भाग तोंडी लावण्यापुरते आले आहेत. त्यात काही खास दिसलं नाही.
पण गांधीपर्व- हे खूप नवं सापडलं. गांधी पर्व आणि सामान्य लोकांची त्यामुळे झालेली दमछाक आधी माहितीच नव्हती. शाळा कॉलेजं सोडून आंदोलनात उड्या मारणार्यांचं वैफल्य, गांधीच्या अनुयायांचा वेडावाकडा आणि शेवटी केविलवाणा वाटणारा अनुनय वगैरे पैलू नवेच दिसले.गांधी खूप मोठे असले तरीही त्यांना समजावून घेताना उभे रहाणारे प्रश्न आणि त्यांची आपल्या परीने मिळवलेली/ न मिळालेली उत्तरं, ह्यांची जोडकथा तुंबाडच्या उत्तरार्धात दिसतेय. गांधीचा आधी डोक्यात, मग आचरणात आणि मग आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात शिरकाव झालेला बघून गोंधळलेला नरसू हा मला खूप नैसर्गिक वाटतो.
असो, जरा जास्तच लांबलेला प्रतिसाद. पण तुंबाड्च्या १००० पानांसाठी एवढा तरी हवाच!
*************************/
गांधी पर्व आणि सामान्य
गांधी पर्व आणि सामान्य लोकांची त्यामुळे झालेली दमछाक
ही उदाहरणं मी घरातच पाहिली होती, त्यामुळे त्या लेखनाची दाहकता आणखीच जाणवली.
सामान्य व्यक्ती विरुद्ध चळवळ/विचारधारा या मानसिक संघर्षाची टोकं श्रीना दाखवतात.
- मोडाची धान्यं खाऊन रहाणारे बापू वकील वखवख असह्य होऊन नरसूकडे भजी मागतात. (व्यक्ती १ : चळवळ ०)
- गावातल्या प्रतिष्ठेसाठी, स्वार्थी हेतूने हिंदुत्त्ववादाचं ढोंग करणार्या चिमापाला नौखालीच्या बातम्यांनी अस्वस्थता येते आणि अपमान गिळून तो संताजीच्या दारी उभा रहातो. (व्यक्ती ० : चळवळ १)
- सावरकर विचार मंचाचं सभासदत्व तारा जबरदस्तीने ओड्डलला देते. ओड्डल ताबडतोब फॉर्मवर सही करतो. तारा त्याला विचारते "वाचलास का तरी फॉर्म?" तो म्हणतो, "प्रॉमिसरी नोट नाहीये ना तेवढं पाहिलं". ओड्डलला तारी महत्त्वाची. सावरकरफिवरकर त्याच्यादृष्टीने महत्त्वाचे नाहीत. (व्यक्ती ० : चळवळ ०)
----------------
व्यक्ती वि. चळवळ हा विषय हाताळणारी "A bend in the ganges" ही कादंबरीही नक्की वाचणे.
लेखकाची बोंब उद्यासाठीची - अवधूत डोंगरे
वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत तरुण पिढीतल्या लोकांना उद्याचा वेध घेण्यासाठी लिहितं करणारं एक सदर 'म.टा.'मध्ये येतं. 'ऐसी'च्या गेल्या वर्षीच्या दिवाळी अंकात लिहिणारे आणि पारितोषिकप्राप्त कादंबरीलेखक अवधूत डोंगरे ह्यांनी त्या सदरात घेतलेला मराठी साहित्यक्षेत्राचा वेध - लेखकाची बोंब उद्यासाठीची.
अवधूत डोंगरे
फोटोग्राफी सोडलेल्या लेखकाबद्दल
आणि २०१४च्या दिवाळी अंकातून - विषय (कादंबरीचा)
आजचा सुधारक - GM food विशेषांक
'आजचा सुधारक'चा ताजा अंक GM foodविषयक आहे. 'ऐसी'वरच्या 'लढवय्या शेतकरी' ह्या नगरीनिरंजन ह्यांच्या लेखाला त्यातल्या निवडक प्रतिसादांसह त्यांनी पुनर्प्रकाशित केलं आहे. आभासी संवादमाध्यमात झालेल्या लिखाणाची दखल 'आसु'सारख्या वैचारिक आशयाला वाहिलेल्या छापील माध्यमानं घेणं हे उल्लेखनीय म्हणता येईल.
अतिशय आभार. हापापल्यासारखा
अतिशय आभार. हापापल्यासारखा लेख वाचून काढला.
अशी भिती वाटणारे आपण एकटे नाहियोत आणि चुकीचेही नाहियोत हे माहिती होते मात्र त्याला इतकी स्पष्ट नी जाहिर वाचा कोणीतरी फोडताना बघुन कमालीचा आनंद झाला.