Candy Crush Saga...
Candy Crush Saga --- १
निक्षून नाही बजावूनही
शिवशिवणार्या हातांनी
स्क्रीन टच करून
कॅण्डीज् सरकवायला, जेलीज् उडवायला
सुरुवात केलीच!
न राहिले वेळाकाळाचे भान...
एकेक लेव्हल अनेकदा हरत
जात राहिले पुढे पुढे,
मन मात्र अडकले-थिजलेले
जिथल्या तिथेच !
Candy Crush Saga --- २
दिले भिंतीवर डकवून माझे आत्ताचे स्टेटस म्हणून!
फुटल्या उकळ्या
आनंदाच्या, निर्मितीच्या, उत्सर्जनाच्या...
तेवढीतरी भरपाई झालीच, हरलेल्या खेळींची!
प्रतिक्रिया
छान आहे कविता. आतलं रितेपण
छान आहे कविता. आतलं रितेपण बाह्य गोष्टींनी भरुन काढण्याची कल्पना आवडली.
फक्त उत्सर्जनाच्या जागी सर्जन शब्द हवा आहे असे वाटते.
वेगळी कल्पना.
वेगळी कल्पना.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
शेती, रागीट पक्षी आणि आता हे
शेती, रागीट पक्षी आणि आता हे कँडी. यातले एकही केले नसेल तर 'ये जीना भी कोई जीना है लल्लू' म्हणावे का
मस्त. क्रिएटिव्ह.
मस्त. क्रिएटिव्ह.