Skip to main content

जगाचे धार्मिक कंपोझिशन, त्याच्या बदलाचे स्वरुप

World Religions by Adherents, 1910–2010
Religion 1910 2010 Rate*
Adherents  % Adherents  % 1910–2010 2000–2010
Christianity 611,810,000 34.8 2,260,440,000 32.8 1.32 1.31
Islam 221,749,000 12.6 1,553,773,000 22.5 1.97 1.86
Hinduism 223,383,000 12.7 948,575,000 13.8 1.46 1.41
Agnosticism 3,369,000 0.2 676,944,000 9.8 5.45 0.32
Chinese folk religion 390,504,000 22.2 436,258,000 6.3 0.11 0.16
Buddhism 138,064,000 7.9 494,881,000 7.2 1.28 0.99
Ethnoreligion 135,074,000 7.7 242,516,000 3.5 0.59 1.06
Atheism 243,000 0.0 136,652,000 2.0 6.54 0.05
New religion 6,865,000 0.4 63,004,000 0.9 2.24 0.29
Sikhism 3,232,000 0.2 23,927,000 0.3 2.02 1.54
Judaism 13,193,000 0.8 14,761,000 0.2 0.11 0.72
Spiritualism 324,000 0.0 13,700,000 0.2 3.82 0.94
Daoism 437,000 0.0 8,429,000 0.1 3.00 1.73
Bahá'í Faith 225,000 0.0 7,306,000 0.1 3.54 1.72
Confucianism 760,000 0.0 6,449,000 0.1 2.16 0.36
Jainism 1,446,000 0.1 5,316,000 0.1 1.31 1.53
Shinto 7,613,000 0.4 2,761,000 0.0 −1.01 0.09
Zoroastrianism 119,000 0.0 197,000 0.0 0.51 0.74
Total Population:
1,758,412,000
100.0
6,895,889,000
100.0
1.38
1.20
*Rate = average annual growth rate, percent per year indicated

Source: Todd M. Johnson and Brian J. Grim[111]

सौजन्य विकिपेडिया -
१. अजून १०० वर्षांनी जगाचे चित्र कसे असेल असे आपणांस वाटते?
२. जगातल्या अशा बदलांनी व भारतातल्या अशा बदलांनी सामान्य रेसिडेंट भारतीय माणसला याने काही फरक पडेल काय?

अस्वल Wed, 09/07/2014 - 22:23

एका मर्यादित वर्तुळात "धर्म कितपत आवश्यक वाटतो" असा प्रश्न विचारला होता, त्यातील ४० उत्तरांमध्ये बहुसंख्यांनी
- जन्मताच मिळणारा धर्म त्यांना मंजूर नाही
- पुढील जन्म मिळाला तर त्यात धर्माची गरज नाही
- धर्म ही राष्ट्रनिर्मितीची गरज नाही

अशी मतं व्यक्त केली होती. तेव्हा या अतिशय मर्यादित सँपलवरून तरी असं वाटतंय की धर्म ही एक curiosity बनून राहील.

नितिन थत्ते Thu, 10/07/2014 - 09:24

धाग्याचे मूळ स्वरूप जगाच्या बदलत्या धार्मिक काँपोझिशनसंबंधी चिंता(?) असे आहे. त्यावर पुढे जगातील लोकांना धर्माची गरजच पडणार नाही अशी शक्यता आहे अशा स्वरूपाचे उत्तर योग्य आहे की नाही हे ठाऊक नाही.

विशेषतः एकाच संस्कृतीतील जे गरीब नाहीत त्यांच्यातील धार्मिकता त्याच संस्कृतीतील गरीबांच्या धार्मिकतेपेक्षा कमी झाली आहे का हे सुद्धा तपासायला हवे.

धाग्यातील मूळ चिंता एक धर्म वाढतो आहे ..... पुढे त्यांची बहुसंख्या होईल ..... मग इतरांचे पर्सिक्युशन ... अशा दिशेने आहे त्याचे उत्तर विकास/समृद्धी - धार्मिकता यांच्या कोरिलेशनने मिळेल का ते ठाऊक नाही.

समृद्धी वाढली तर इतरांची थ्रेट वाटण्याचे प्रमाण घटते का ते पहायला लागेल.

अजो१२३ Thu, 10/07/2014 - 14:01

In reply to by नितिन थत्ते

इथे या प्रकारच्या प्रतिसादाने मात्र वाचकांची दिशाभूल होण्याची शक्यता आहे.

तर...
१. धाग्यात कोणतीही चिंता नाही. कोण एक धर्म, त्याची बहुसंख्या, छल, इ इ चा तर दुरान्वयेही संबंध नाही. २११० मधील रेसिडेंट भारतीयांतील मेजॉरिटी व मायनॉरीटी धर्म यावर कोणास सांगायचे झाले तर तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. धागा काहीही सुचित करत नाही.
२. समृद्धी नि स्वतःस कोण्या धर्माचे मानणे, वा समृद्धी नि आपलाच धर्म कमी रिगरसली पाळणे यांचा आंतरसंबंध हादेखिल धाग्याचा 'मुख्य' विषय नाही.
३. माणसाला कधी एका विशिष्ट धर्माचा रिकगनाइज करायचे हा देखिल धाग्याचा 'मुख्य' विषय नाही. अर्थातच त्याची स्पष्ट संकल्पना विदाकर्त्यांना असणे गरजेचे आहे.
४.

राजकीय रचना, भारताची सीमा सुरक्षा, आंतरिक सुरक्षा, अर्थकारण, समाजकारण, वै़ज्ञानिक प्रगती, मायग्रेशन्स, राजकारण, इ इ यांवर

बाहेरच्या जगाच्या बदललेल्या धर्मिकतेचे परिणाम काय होतील एक प्रश्न झाला, शिवाय देशातल्याच बदललेल्या धार्मिकतेचा परिणाम काय असेल हा दुसरा.

धार्मिकता म्हणजे काय याचा एक बेस बनवावा लागेल. त्यासाठी-
१. इथे एका हिंदूला असे विचारले - तुमचा धर्म काय आहे नि तो म्हणाला "माहित नाही" - तर तो हिंदू नाही असा अर्थ काढायचा नाही.
त्याला हिंदू न मानण्यासाठी, प्रश्न -आपण हिंदू आहात काय? - असा हवा नि उत्तर -नाही, मी हिंदू नाही- असे हवे.
२. बायनरी धार्मिकता वापरायची. इतके टक्केच विधी करतो बाकी करत नाही म्हणजे अहिंदू नव्हे.

नितिन थत्ते Thu, 10/07/2014 - 14:27

In reply to by अजो१२३

खुलाशाबद्दल धन्यवाद....

प्रस्तावातल्या विद्यामध्ये इस्लामची या शतकातली ग्रोथ हायलाईट केलेली आहे (जी सर्व धर्मांमध्ये सर्वाधिक दिसते) आणि नास्तिकांची ग्रोथ मागील दशकाच्या मानाने या दशकात सिग्निफिकंटली कमी आहे असे हायलाइट केले असल्याने माझा तसा समज झाला.

अजो१२३ Thu, 10/07/2014 - 14:31

In reply to by नितिन थत्ते

माझा हा ऐसीवरचा पहिलाच टेबल आहे. अंदाजेपंचे सोर्सकोड चेपला आहे. मूळ टेबलात या हायलाइट आहेत, त्याचा लेखाशी संबंध नाही. नेमकं तेवढंच काढायचं कौशल्य अजूनतरी नाही.

मी Thu, 10/07/2014 - 14:39

In reply to by अजो१२३

पण धर्मांच्या लिंका ऐसीचा दुवा दाखवत आहेत, इथे इतक्या सार्‍या धर्माबद्दल इतके अधिकाराने बोलणारे कोणी नाही.

मन Thu, 10/07/2014 - 09:39

पण खालील काही शंकांबद्दल कुणी बोल्लं तर बरं होइल :-
(माझे प्रश्न भारतासंदर्भात आहेत)

१.दिवसेंदिवस तिरुपती संस्थान व शिर्डी संस्थान ह्यांच्याकडे येणारा लोकांचा ओघ कमी होतोय की वाढतोय?
२. त्यांच्याकडे येणारा पैशाचा ओघ कमी होतोय की वाढतोय?
३. भारतात एकूण संस्थानांची संख्या वाढते आहे की कमी होते आहे ?
४. भारतात "सध्या वाढ होते आहे" असे उत्तर असेल तर -- यापुढे त्यांच्या वाढीचा वेग मंदावेल का ?
(म्हणजे वाढ होतच राहिल, पण ती तितक्या वेगाने होणार नाही, किंवा जवळपास वाढ गोठेल.)
५. वाढ होण्याऐवजी ह्यांच्या संपत्तीत वा येणार्‍या भाविकांच्या लोंढ्यात घट होइल का ?

इथे अवांतर ठरत असेल तर योग्य त्या धाग्यावर प्रतिसाद हलवला तरी चालेल; वा नवा धागा बनवला तरी चालेल.

नितिन थत्ते Thu, 10/07/2014 - 09:43

In reply to by मन

वेल ...

धाग्यातली (मला जाणवणारी) चिंता पाहता हे तिरुपती, साईबाबांकडे जाणारे लोक पर्सिक्युशनच्या विरोधात लढायला उभे राहणारे किंवा इतरांचे पर्सिक्यूशन करण्याची शक्यता असलेले नाहीत. म्हणून या धाग्यासाठी ते अवांतर असू शकेल.