झक मारणे: झक, झक्कू आणि झकास
व्यवस्थापकः या धाग्यावरील मुळ विषयाशी समांतर चर्चा विस्तारत चालल्याने, तिला अधिक वाव मिळावा व संदर्भ म्हणून शोधणे भविष्यात सुलभ जावे म्हणून येथील पुढिल प्रतिसादाचे रुपांतर नव्या चर्चा प्रस्तावात करत आहोत.
======
झक मारणे म्हणजे मासे मारणे असा काहीसा अर्थ यापुस्तकात दिलेला आहे, एव्हढा सरळ अर्थ मनात ठेऊन कधीही ही शिवी दिलेली आठवत नाही - येथील प्रतिसादातून
अ.द. मराठेंच्या पुस्तकातील संदर्भा बद्दल धन्यवाद. झक मारणेचा (मूळ) अर्थ सरळ असेल असे मलाही वाटले नव्हते (मनुष्यप्राण्याच्या डोक्यात काय काय वेगळ वेगळ येतं, त्याला कोणकाय करणार ? :) ) तपशिलात केवळ अधिकची माहिती म्हणजे, हा वाक्प्रयोग महाराष्ट्रा प्रमाणे उत्तरभारतात तेही खूप जूना असावा; महाराष्ट्रात तेराव्या आणि उत्तर भारतातील सोळाव्या शतकातील संत साहित्यातही शब्दोल्लेख आढळतात असे वाटते ( संनिंदेचे नसते विवाद नको म्हणून नामोल्लेख टाळतो आहे, खाप्रे.ऑर्ग चाळता येईल) मोल्सवर्थात शब्दाच्या स्रोताचा उलगडा न होणारा उत्तर भारतीय शब्द असा उल्लेख येतो. ऑनलाईन इंडोआर्यन भाषा समूहाच्या शब्दकोशात मला हा शब्द मिळाला नाही, हिब्रू भाषेत झक या शब्दाचा अर्थ शुद्ध आणि खूपचांगला असा आहे आणि तोच अर्थ पुढे अरेबिक आणि बहुतांश युरोपीय भाषात दिसतो-पण भारतीय व्यवहारातील वाक्प्रयोगाशी जूळत नाही. (एका युरोपीय भाषेतील एका अर्थ छटेचा अपवाद पण ते लोक भारतात १७व्या शतकाच्या सुरवातीच्या आधी आले नसावेत आणि त्यांचा भारतातील प्रभावही फारसा नव्हता). अ.द. मराठे म्हणतात त्या प्रमाणे झक हे 'नाम' असण्याचा संभव वाटतो पण वचन स्त्री लिंगी आहे तेव्हा मास्यांच्या प्रजातिचे नाव असण्याची शक्यता नाकारता येत नसली तरी एखादा पक्षी वगैरे सुद्धा असु शकतो - बोली भाषांच्या अभ्यास मागे पडतो त्यामुळे न जाणो बोली भाषेतून व्युत्पत्ती असल्यास कळण्यास मार्ग नाही -का रण आपण पक्ष्यांच्या बाबतीत स्त्रीलिंगी उल्लेख अधिक करून करतो, मांजर आडवे जाणे पाल मारणे अशा प्रकारची अंधश्रद्धा म्हणजे हातून झक मारली गेली की काम नीटसे होत नाही असे काहीसे असू शकेल. प्राण्याची जात राहिली नाही पण म्हण शिल्लक राहिली असेही काहीसे होऊ शकते.
मोल्सवर्थात पाठी मागे झक्कू लावणे आणि झकास हे शब्दप्रयोग आढळले नाही. झक्कू लावतात म्हणजे काय लावतात ? झक मारणे एवढ्याही प्रेमाने वापरला जात नाही त्यामुळे झकास या शब्द व्युपत्तीचे कुतूहल वाटते. अद मराठेंनी झष या माश्याच्या प्रजातीच्या संस्कृत नामा कडेही निर्देश केला आहे. त्या सोबत झासा देणे हा वाक्प्रचार मला आठवला.
=========
येथून खालील भाग अद्ययावत केलेली शब्दमाहिती आणि संदर्भ
*काम चालू*
* च्यक् दंतोष्ठ उच्चारन ( चक ~ शक (शंका))
* चक करणे , चेक करणे (इंग्रजी) , (चक + सू = चक्षू ?) चॉक (चेक केल्याची खूण करणे), >> चेक करून झाल्या नंतरचा सर्व व्यवस्थीत असल्याचे उच्चारण = चक (jake अमेरीकन इंग्रजी= all right; satisfactory.) >> चेक्स > चेस (पाठलाग शिकार)> झष >> चकवा (हिंदी चकमा) = झकवा /चासा> झासा
** च्येस>> च्यस >> च्यश >> यश ?
** चकव्ह्यू >> चक्र व्यूह ? (Chock चोक करणे चा इथे संबंध असेल ?)
** चकास् shining >> झकास ?
** चक>जक>जग ?
** चेकेर >> चेक्र ?
** चकला (पंजाबी = चक्र), चक्की
=====
* चक आंतर्भूत असलेले विचारात घेण्या जोगे इतर मराठी शब्द
** चकची पूर्ण मोल्सवर्थ एंट्री: चक (p. 265) [ caka ] m (चक्र S Discus of विष्णु, an emblem of authority; or from शक Founder of an era.) Awe, reverential fear, impressed admission of authority. Ex. मामलतदार नवा होता परंतु एका अपराध्याचें शासन होतांच सर्वांवर त्याचा चक बसला. 2 A regulation, law, rule, prescribed method (Ex. नित्य नवें सांगूं नका एक चक बांधून द्या त्याप्रमाणें मी वर्त्तेन): also a regular course or an established practice (Ex. त्या मंडळीचा प्रातर्स्नान करण्याविषयीं बारा वर्षें एकसारखा चक चालला आहे): also a customary perquisite, fee, right, due (Ex. माझा दोन रुपये चक येणें आहे). 3 Combination, concert, union, general agreement. Ex. दाहाचा चक असल्यास त्याजवर कोण्हाचें ही चालत नाहीं. 4 The cover over an आखें or side of a beast-load of tobacco. 5 (Common amongst the officials of Government. Check.) A reprimand or an admonition. v ये, ठेव, घाल. 6 An estate or a farm, a quantity of assigned land. Hence applied to any long, far-stretching, and uniform extent of land (under culture or cultivable).
** वचक (या अर्थाने मोल्सवर्थ मध्ये चक या शब्दोपयोगाचे उदाहरण आहे Ex. मामलतदार नवा होता परंतु एका अपराध्याचें शासन होतांच सर्वांवर त्याचा चक बसला.)
** वेचक, जाचक, रोचक, उचकणे, विचका, भोचक, बोचकारणे, मोचक, लचक
** चकाट्या पिटणे मराठी
======
संदर्भ;
* मत्स्य का वैदिक स्वरूप - Sanskrit Documents
* चकमा पुं० २. सनसनी फैलानेवाला कोई ऐसा कार्य, जो किसी दुष्ट उद्देश्य से लोगों का ध्यान किसी अवास्तविक या झूठी बात की ओर आकृष्ट किया जाय (स्टन्ट)।
* चंक्रमण पुं०[सं०√क्रम् (गति)+यङ, द्वित्वादि+ल्युट-अन] [वि० चंक्रमित] १. धीरे-धीरे टहलना। घूमना। सैर करना। २. बहुत अधिक या बार-बार घूमना। ३. घूमने, चलने या सैर करने का स्थान। (बौद्ध)।
* चंगुल (?) -३. किसी व्यक्ति के प्रभाव अथवा वश में होने की वह स्थिति जिसमें से निकलना सहज न हो। मुहावरा–(किसी के) चंगुल में फँसना=पूरी तरह से किसी के अधिकार या वश में पड़ना या होना।
* चक्कल वि० [सं०√चक्क (पीड़ित होना)+अलन्] गोल। वर्तुल।
* चक्कवत पुं०=चक्रवर्ती (राजा)।(यह शब्द केवल पद्य में प्रयुक्त हुआ है)
* चक् [ cak ] [ cak ] Root cl. [1] P. Ā. [ °kati ] , [ °kate ] , to be satiated or contented or satisfied Lit. Dhātup. iv , 19 ; to repel , resist Lit. ib. ; to shine , Lit. xix , 21 ( cf. √ [ kan ] and [ kam ] .)
*खाप्रे. ऑर्ग वरील संदर्भ
* विचकाक्ष एक राजा, जिसने मांसभक्षण का त्याग किया था [म. अनु. १७७.७१]
* कीचक दुर्योधन पक्षीय राजा
* रुचक n. (सू. इ.) इक्ष्वाकुवंशीय भरुक राजा का नामान्तर ।
* अंगाचे चकदे काढणें = अतिशय हाल करणें, अंगावर जखना करणे, अंगाचे मांसाचे लचके काढणें, भयंकर छळ करणें, त्रास देणें. (मराठी शब्द जाचक इथे लक्षात घेता येईल.)
=====
वेगळा अर्थ सूचीत करणारे शब्द
* चख पुं० [सं० चक्षुस्] आँख। पुं० [अनु०] झगड़ा। तकरार। पद-चख-चख=कहा-सुनी या बक-बक। झगड़ा और तरकार। पुं०= नीलकंठ (पक्षी)। २.= गिलहरी।
======
*अद्याप संबंध न उलगडलेले शब्द
**खर्चक / खर्चीक ; वाचक; याचक; योजक
=====
* संबंध नसलेले दुसरी व्यत्पत्ती असलेले
**पंचक (पंच/पाच)
** चाकू
** दह्याचा चक्का
(अद्यापतरी) असहमत
केवळ मारणे या शब्दावरून अर्थ काढण्यातल्या त्रुटीकडे अ.द.मराठेंनी त्यांच्या पुस्तकात चांगला निर्देश केला आहे. मराठीत गप्पा मारणे, इस्त्री मारणे, थापा मारणे, गाडी वेगाने मारणे, झेरॉक्स मारणे अशी उदाहरणे अ.द.मराठेंनी दिली आहेत; यावरून मला हाक मारणे आठवले. (हिब्रू-अरेबीक मध्ये झक हा शब्द अगदी पावित्र्यपूर्णते सहीत येतो तेव्हा अर्थ उलटा असता तर संत कबिरजींच्या दोह्यामध्ये येण्याची शक्यता कमी वाटते. दोह्याचा संदर्भ खाप्रे.ऑर्ग चुभू देघे.). मारणे हे इतर अनेक क्रियापदांना पर्यायी क्रियापद म्हणून येताना दिसते जसे हाक देणे च्या एवजी हाक मारणे.
गां* मारणे पेक्षा झक मारणे अतीखूप जूना असावा असे दिसते. (हे दोन्ही एकाच अर्थाने संभाव्य असते तर मोल्सवर्थात तशी नोंद आढळली असती, मोल्सवर्थ त्यांच्या काळातले सर्व अर्थ जसेच्या तसे नोंदवण्या साठी माहित आहे) म्हणूनच झक मारणेचा जुना अर्थ सरळ असावा. गां* मारणे हे समानार्थी नसावे नंतरच्या काळात समांतर आले असावे आणि आपण म्हणता तसा मारणे शब्दातील साधर्म्यामुळे लोकांचा गैरसमज होत गेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. (केवळ) डच भाषेत आपण म्हणता त्या अर्थाची छटा झक शब्दाला आढळते - इतर युरोपीयन भाषात अर्थछटा शुद्ध चांगल्या अर्थानीच आहे - पण डच इस्ट इंडीया कंपनीची स्थापना १६०२ ची आहे झक मारणे वाकप्रयोग भारतात युरोपीय वसाहती येण्या बहुधा काही शतके पुर्वी पासूनचा आहे.
चक मारणे असे मूळ रूप असू शकेल का ?
(१ किंबहुना प्रियपणे । कोणातेंही झक{ऊं} नेणे । यथार्थ तरी खुपणें । नाहीं कवणा ॥ १२० ॥. २) चंचळ दामिनी । रम्य आठवे मनीं । झक पडे नयनीं । जाय निघोनी ॥१॥ या दोन वेगवेगळ्या साहित्यिकांच्या लेखनात झक शब्द दिसतो आहे, तो नेमक्या त्या कडव्यांअमध्ये कोणत्या अर्थांनी आला आहे ह्याची मला कल्पना नाही. चुक भूल देणे घेणे. आपणास अर्थ माहित असल्यास लागल्यास समजून घेणे आवडेल. नेमकी कडवी त्या ओळींवर गूगल सर्च दिलेत तर मिळून जातील)
अ.द. मराठे झक मारणे च्या अर्थ (इन्फरन्स) भरकटणे असा लावतात. ते तसा लावतात म्हणून नव्हे पण चक>>जक>>झक ह्या उच्चारांची कॉग्नेट्स पाहिली तर चक्कर मारणे चे चक मारणे असे मूळ रूप असू शकेल का किंवा चकोर/चक्रवाक या पक्ष्यांचे मूळ नाव चक असू शकेल का अशा शंका मोल्सवर्थ वर चक आणि काही प्रत्यय लागलेले शब्द वाचताना वाटत होते. मला वाटते इतर मुख्यत्वे बोली भाषातून चक मारणे असा उपयोग दिसतो का हे अभ्यासले जावयास हवे.
सवडीने बघावे
सवडीने बघावे (या ओळींमध्ये अर्थ 'एखाद्याला झुकवणे' या अर्थाने येण्याचीही शक्यता आहे किंवा चकवणे या अर्थाने हे तपासावयास हवे; [-की आपण ज्या विषयाची चर्चा करतोय त्या अर्थाने असल्यास त्याची मला कल्पना नाही]. अर्थ ज्ञात झाल्यास कळवणे. संदर्भ अगदीच संबंध नसलेले असतील तर संपाद्कांना प्र.का.टा. विनंती. १) एऱ्हवीं तरी कौतुकें । विचारुनि पाहें पां निकें । या विषयांचेनि सुखे । झकविती कवण ॥ १०९ ॥ २) अहो शेषाचेहि डोळे चोरिले । वेद जयालागीं झकविले । लक्ष्मीयेही राहविलें । जिव्हार जें ॥११८॥ ३) लोक झकविले सकळ । केलें धर्माचें निर्मूळ । प्रळयकाळ आरंभला ॥२॥ ४) तयांतेंही लेकुरपणें झकविलें । एकाचे गर्भवासही साहिले । परी विश्वरूप हें राहविलें । न दावीच कवणा ॥३५॥ ५) मग चमत्कारला म्हणे । इयें जळींचिं मा तारांगणें । कैसा झकविलों असलगपणें । अक्षरांचेनि ॥ १९४ ॥ ६) पूजिती दैवतें जोगावी| गुरूतें बोलें झकवी| मायबापां दावी| निदारपण ||७९६|| ७) पैं बोळविजे रिणाइतु । तैसा झकवी तयाचा हातु । तूं करणें याचा बहुतु । प्रयोगु तेथ ॥ ३०५ ॥ ८) ४२३९. कीविलवाणा जाला आतां । दोष करितां न विचारी ॥१॥ अभिळाषी नारी धन । झकवी जन लटिकें चि ॥ ९) अर्थबळ थोर असत्यासी । मिथ्या बोलवी बापसी । धनलोभें झकवी मातेसी । सत्यत्व धनापाशीं असेना ॥ २२ ॥ १०) नातरी झकवीतु आहासी माते । की तत्त्वचि कथसी ध्वनिते । ११) नटु जैसा न झकवे । तैसें गुणजात देखावें । न होनियां ॥ २९० ॥ १२) ऐसे तुझे हरी रूप आहे ॥२॥ रूप तुझे ऐसे डॊळा न देखवे । जेथे हे झकवे ब्रह्मादिक ॥३॥ १३) ह्मणौनु आहाचवाहाच न झकवे । एणें आकारचित्रें ॥९९॥ )
सहमत. पण मी जेवढा अधिक विचार
सहमत. पण मी जेवढा अधिक विचार करतोय तेवढ ते अधिक मला अधिक निश्चित वाटतय. चक करून येणे याचे चक्कर करून/ मारून येणे होऊ शकते, चेक करणे हा इंग्रजीतील शब्दही कदाचित येथे लक्षात घेता येईल पण अर्थ केवळ चेक करणे नव्हे तर चेक करण्याच्या उद्देशाने राऊंड मारणे असा असू शकतो. चेक करणे आणि चेक करताना नाही आढळलेतर चकवणे हा शब्द येत असा वा चुकणे हा शब्दही त्यातूनच येत असावा असे सध्यातरी वाटते.
चक>जक>झक या शब्द उच्चांतरण प्रवासामधील जकचा उपयोग स्पष्ट दिसत नाही पण जग ह्या शब्दाचीही व्युत्पत्तीही येथे दडली असू शकते च चे ज आणि क चे ग होऊ शकते चक>जक>जग आपण जग फिरून येणे हाही वाकप्रचार वापरतो. चाक हा शब्दही चक मधील गोल फिरणे ह्या अर्थावरून आला असू शकेल ?
माझ्यातरी (नॉनपॉलीटीकल मते) मराठीत खरेच अत्यंत जुन्या शब्दांच्या व्युत्पत्तीची रहस्ये दडली आहेत या अर्थाने मराठी एक क्लासिकल लँग्वेजच आहे.
मी संस्कृतला (आणि लॅटीनला)
मी संस्कृतला (आणि लॅटीनला) प्रमाण मराठी प्रमाणे प्रमाणिकरण होऊन तयार झालेली भाषा समजतो. म्हणजे बर्याच भारतीय भाषांचे धातू रूपे स्विकारून संस्कृत भाषा तयार झाली असावी असे माझे मत आहे त्यामुळे संस्कृत शब्दांच्या मराठी आणि इतर भाषात व्युत्पत्ती सापडतात हा विचार मला अधिक भावतो त्यामुळे येथे माझे मतांतर आहे.
मराठी भाषाशास्त्रीय दृष्ट्या क्लासिकल असल्याच माझ मत आजकालच्या मागण्या येण्याच्या बरच आधी पासूनच आहे आणि या संबंधीच्या आजकालच्या राजकीय मागण्या मी वाचण्याच्या फंदातही पडत नाही.
आपण दोघही आपापल काम करत होतो.
आपण दोघही आपापल काम करत होतो. मी त्याच वेळी सेव्ह करेन हे तुमच्याही स्वप्नात येणे शक्य नाही. अचानक तांत्रीक कारणाने प्रतिसाद उडाला ते तुमच्याही हातात नव्हते. ऐसा भी होता है म्हणून सोडून द्यायचे. टेक इट इझी.
मी पुन्हा लिहितोय काही मुद्दे मागे पुढे झाले असावेत पण तेवढेच बाकी ठिक. त्या वेळी झषकेतन शब्दा बद्दल पुरेसा अंदाज नव्हता मध्ये गेलेल्या वेळात तो आला. सो टेक इट इझी. उलट तुम्ही प्रतिसाद वेगळा धाग्यात काढल्याने मीही अधीक गांभीर्याने घेतले आणि मध्यंतरात अधीक मोठी व्यूत्पत्तीची खाण हाती लागली. तेव्हा धन्यवाद.
काही उपाय
लांबलचक प्रतिसाद लिहिताना थोडी काळजी घेणं आवश्यक असतं असं सुचवेन. एखादवेळी नेटवर्क हळू होतं, टाइमआउट येतात, वीज जाते, साइट आडवी होते असं काहीही होतं.
Lazarus किंवा फायरफॉक्ससह उपलब्ध असणारी इतर काही एक्स्टेंशन्स फॉर्म आणि टेक्स्ट एरिआमधला डेटा रिकव्हर करण्यासाठी उपयोगी पडतात. अधिक माहिती.
तरीही गोंधळ झाला तर एक उपाय चालू शकतो - ब्राउझरमध्ये फॉर्म सबमिट केल्यावर एरर आली, तर एक पान मागे जाऊन पाहा. त्यात डेटासह भरलेला फॉर्म अनेकदा दिसतो.
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. विकि आणि मिपावर बर्या पैकी सराव झाला आहे. इथे नीटसा अजून सरावलो नाही. इथे ऐसी वर प्रतिसादावर प्रतिसाद देताना एडीट कॉन्फ्लीक्टने समस्या अधीक वेळा येते, विकित एडीट कॉन्फ्लीक्ट झाल्यास रिकव्हर्ड एडीट आपोआपच दाखवले जाण्याची सवय असल्याने इथे काम करताना ते सरावातून गेलेले असते असे काहीसे होत असावे.
पहिल्या मूड मध्ये लिहिताना जस जमत तस काही केल तरी दुसर्यांदा जसच्या तस जमत नाही ओढून ताणून केल्यासारख होत त्यामुळे मी अधीक काळजी घ्यायला हवी कारण लाबं उत्तरे लिहिण्याची बर्या पैकी सवय मला आहे हे खरे.
आपण सुविधांचे दुव्यावरील सुविधांबद्दल मला कल्पना नव्हती उपयोग करून पाहीन . प्रतिसाद आणि दुव्यांकरीता धन्यवाद.
असेलही. पण च-झ यांचे
असेलही. पण च-झ यांचे पौर्वापर्य ठरवण्यास काही भरीव निकष हवेतसे वाटते; "संस्कृत शब्दांच्या मराठी आणि इतर भाषात व्युत्पत्ती सापडतात" यात पौर्वापर्याबद्दल अंमळ गल्लत होतेय असं वाटतं. इथे नक्की काय अपेक्षित आहे ते ऐकायला आवडेल.
आपला प्रश्न सहाजीक आहे, या विषयावर माझा पहिला प्रतिसाद ते नंतरचा च>ज>झ प्रतिसादात अंतर आहे कारण ह्या धाग्याकरता जसा अधीक शोध घेतो आहे तशी माझी मते बदलत आहेत, आणि माझ्या विचार करतानाच्या उदाहरणांच्या/निकषांच्या अधिक नोंदी आणि संदर्भ मी द्यावयास हवे हे मान्य तसे मी ते येत्या काळात सावकाशीने जोडेनच. कदाचित या करता माझी अजून काही वेळा आंतरजालीय शोध यात्रा होईल कदाचीत माझी मते पुन्हाही बदलतील कोण सांगावे पण सध्या तरी 'चक मारणे' ह्याची शक्यता कमी वाटण्या पेक्षा अधीक वाटत चाललेली आहे त्या बद्दल पुढे लिहितोच आहे.
त्या आधी आपण संस्कृत एवजी बोली भाषेतून व्युत्पत्ती शोधण्याच्या आग्रहाचे कारण विषद करतो. भाषा प्रमाणीकरणाच्या प्रक्रीयेत बोलीभाषेतील शब्दाचे मूळ रूप जसेच्या तसे न राहता त्यावर (सांस्कृतीकरणाचे) सोपस्कार होऊन बदलले जाण्याची शक्यता असते. प्रमाणभाषेनी बोलीतील सर्वच आजूबाजूचे शब्द आणि अर्थछटा ही घेतल्या असतील असेही नाही. हे स्वरूप बदलले जाण्या बद्दल हरकत नाही पण शब्दांच्या मूळ रुपाचे संकल्पनाचे बोली भाषेतील संदर्भ या प्रक्रीयेत हरवले गेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. शब्दांचे प्रमाणभाषेत प्रमाणीकरण झाल्या नंतर माहिती ज्ञान व्यवहारात प्रमाण भाषेला मिळणार्या प्राधान्यामुळे काही शब्द व्यवहार प्रमाण भाषेतून बोली भाषेतही पोहोचत असतो. लिखीत व्यवहार बोली भाषेत नसून प्रमाण भाषेत होतो बोली भाषेवर प्रमाणभाषेचा प्रभाव पडतो आणि तो अधिक दृश्य असतो म्हणून स्वाभाविक पणे प्रमाणभाषा आधी तयार झाली आणि मग बोली भाषा तयार झाली असा समज तयार होऊ शकतो. पण वास्तव बोली भाषा आधी तयार होत असतात नंतर प्रमाण भाषा तयार होते. प्रमाण भाषेचा व्युत्पत्ती शोधनातला दुसरा अडसर प्रमाणभाषा खूप अधीक बोली भाषातून शब्द घेते कोणता अर्थ कोणत्या बोलीतून येतो आहे हे केवळ प्रमाणभाषेच्या आधारावर ठरवणे कठीण जाते. या सर्वा पेक्षाही महत्वाची गोष्ट प्रमाणभाषेत घेतलेला व्युत्पत्ती शोध हा शेवटचा टप्पा म्हणून सोडून दिला जातो. शब्द प्रमाण भाषेत कुठून आला आणि त्याची व्यूत्पत्ती कशी झाली याची उत्तरे न शोधता शोध आधांतरीत सोडले जाताना दिसतात की ज्यामुळे शोध घेण्याचा मूख्य उद्देशच साध्य होत नाही. आणि प्रत्यक्षात भाषीक उत्क्रांतीच्या अभ्यासकाला आदी मानवाने वापरलेली भाषा ते प्रमाण भाषा या प्रत्येक टप्प्यातील शब्द आणि भाषा बदल माहिती करून घेण्यात रस असू शकतो. इंडोआर्यन भाषा समूहाचेच उदाहरण द्यावयाचे झाल्यास बहूसंख्य व्यूत्पत्ती संस्कृत अथवा लॅटीन पर्यंत नेऊन सोडून देण्याचा प्रयास अधीक होताना दिसतो. काही शब्दांची मूळ रूपे इतर बोली भाषातून आलेली असू शकतात किंवा संस्कृत आणि लॅटीनचा (प्रमाणभाषांचा) मध्ये कोणताही संबंध न येता इंग्रजी मराठी सारख्या दोन बोलींनी एकाच मूळ भाषेतून काही शब्द समूह स्विकारले असू शकतात त्यांचा आपापसात परस्पर संबंधही असू शकतो त्या शोधास गौण स्थान प्राप्त होते आणि शोधाची मूख्य धाराच बाजूला ठेवल्या नंतर केवळ प्रमाणभाषांच्या आधारावर केलेला शोध पुढे (म्हणजे प्रत्यक्षात मागे) कुठेच जात नाही. या मुद्यांकरता अधीक साधार उदाहरणे द्यावी लागतील ती आगामी काळात देईन.
पण किमानपक्षी नाते, नातू असे शब्द आहे ज्याच्या व्युत्पत्ती शोधण्यासाठी प्रमाणभाषेकडे जावे लागत नाही याच्याशी आपण पण बहुधा सहमत असाल. चक्कर हा चक्रचा अपभ्रंश असू शकतो तेवढीच शक्यता चक्र हे चक्कर (कि चेकेर पासून? या बद्दल नंतर केव्हातरी विस्ताराने लिहिन) पासूनचे प्रमाणी करण असू शकते. मग कोणत्या शक्यतेस अधीक प्राधान्य द्यावयाचे जर चक हा शब्द बोलीत त्याही पेक्षा एका पेक्षा अधीक बोलीत असण्याची शक्यता असेल तर बोलीतून प्रमाणीकरण होऊन गेला असे म्हणता येईल.
(लेखन चालू)
प्रमाणभाषेचा बोलीभाषेवर
प्रमाणभाषेचा बोलीभाषेवर प्रभाव नाकारण्यात प्वाइंट काहीच नाही, पण प्रमाणभाषा नक्की किती जुनी आहे हे तरी किमान लक्षात घेणे अवश्यमेव आहे. प्रत्येक गोष्ट तिकडेच न्यायची गरज नाही हे खरे आहे, उदा. काही शब्द सर्वांत अगोदर प्राकृतात अटेस्ट झालेत आणि त्यानंतर संस्कृतात. पण बोलीभाषा इ. म्हणतो तेव्हा सध्याच्या बोलीभाषेवरही संस्कृतचा किंवा अन्य कशाचा प्रभाव आहे हे पाहिले तर बोलीभाषेलाही अनाठायी महत्त्व देण्यात प्वाइंट नाही. पाणिनीय संस्कृत २४०० वर्षे तरी जुनी आहे, तेव्हा इतका जुना सोर्स नाकारायचा तर...असो. तस्मात सहमती असली तरी अंशतःच आहे.
काही शब्दांची मूळ रूपे इतर बोली भाषातून आलेली असू शकतात किंवा संस्कृत आणि लॅटीनचा (प्रमाणभाषांचा) मध्ये कोणताही संबंध न येता इंग्रजी मराठी सारख्या दोन बोलींनी एकाच मूळ भाषेतून काही शब्द समूह स्विकारले असू शकतात त्यांचा आपापसात परस्पर संबंधही असू शकतो त्या शोधास गौण स्थान प्राप्त होते आणि शोधाची मूख्य धाराच बाजूला ठेवल्या नंतर केवळ प्रमाणभाषांच्या आधारावर केलेला शोध पुढे (म्हणजे प्रत्यक्षात मागे) कुठेच जात नाही.
अवश्य. पण कैकदा डॉक्युमेंटेशन ज्या भाषेचे जास्त उपलब्ध आहे त्याच भाषेकडे कल जाणे स्वाभाविक आहे. डॉक्युमेंटेशन लै कमी नसताना प्रमाणेतर बोलींचा (तोही ऐतिहासिक शोधात) आग्रह रोचक आहे. अशोकपूर्वकालीन भाषा म्हटले तर फक्त संस्कृत हीच तूर्त उपलब्ध आहे.
वरील दावा विदिन इंडोआर्यन फ्यामिली ठीके, पण मुळात 'मराठी' ची व्याख्या काय आहे ते कळाले तर स्पष्ट होईल. नैतर वैदिक संस्कृतलाही मराठीच म्हटल्या जाईल, जसे महाराष्ट्री प्राकृतलाही मराठी म्हटल्या जाते तसे.
हम्म..
अशोकपूर्वकालीन भाषा म्हटले तर फक्त संस्कृत हीच तूर्त उपलब्ध आहे.
माझ इथे तुर्तास तरी मतांतर आहे. इंडोयुरोपीयन भाषा समुहातील संस्कृत अथवा तीचे रूप आधी आले आणि मग बाकी भाषा अपभ्रंश आणि मग भाषा रूपात आल्या हे मला तर्कसुसंगत वाटत नाही.
इथे इंडोयुरोपीयन मायग्रेशन बद्दल मला वाद करावायाचा नाही. पण काही झालेच असेल तर ते सर्व एकाच वेळी झाले, स्थानांतर करणारे एकच आणि संस्कृत अथवा संस्कृत समकक्षच भाषा बोलत होते आणि म्हणून संस्कृत हीच या भाषांची जननी ही थेअरी स्थानांतर छोट्या छोट्या समुहात झाले असू शकते त्यांच्या स्वतःच्या बोली असू शकतात हे नाकारते. आज तागायत कोकण किंवा अरूणाचलात असंख्य बोली दिसतात त्यांच्यात साम्य असले तरी संवादाच प्रमाण कमीच असत म्हणून वेगळेपण जपल जात, तसच प्राचीन काळीही हे संवाद कमीत कमी असण्याची शक्यता अधीक त्यामुळे हे स्थानांतरीत होत असताना लगेच विखुरलेही गेले असणार यांच्या भाषा भारतातील आर्थीक सांस्कृतीक उत्थानापुर्वी स्वतंत्र बोली म्हणून विकसीत झाल्या असणार.
आणि म्हणून ज्या इंडो आर्यन (बोली)भाषा भारतात आल्या त्या सर्व संस्कृतोद्भव होत्याच असे म्हणता येत नाही ( मे बी मी म्हणत नाही) संस्कृतेतर भारतीय भाषात देस्य शब्द आहेत ते संस्कृत प्रेमीही मान्य करतात. मी काही आसमीज शब्दांवर काम करताना ते हिंदी आणि संस्कृतात आढळले नाही पण मराठीत आढळले त्यामुळे सर्व भाषा संस्कृतोद्भव आहेत असा विचार करून भाषिक शोध कितपत पुढे जातील या बद्दल मला साशंकता वाटते. रादर भाषिक अंगाने इतिहास संशोधनातला केवळ संस्कृतच्या मार्गाने मार्गक्रमण करणे हाच मोठा अडथळा ठरत आला असावा. अर्थात जिथे संस्कृतला क्रेडीट आहे तिथे संस्कृतचे क्रेडीट नाकारायचे असेही नाही. वरच झषकेतन शब्दाच्या व्युत्पत्तीत राहींनी सरळ बोलीभाषेचा संबंध लावण्याचा प्रयास केला आणि मी संस्कृतातील दाखले देऊनच वेगळा तर्क मांडला.
संस्कृत ही सांस्कृतीक उत्थानाच्या प्रक्रीयेतन जन्मास आलेली भाषा आहे. भारतासारख्या मोठ्या देशातील असंख्य बोलीतील (शब्द) धातू मिळवून त्यांचे प्रमाणीकरणाचे असे काम जगात इतर कोणत्या देशात झाले असेल असे मला वाटत नाही या संस्कृतच्या सांकृतीक कार्याचे कौतुक आणि अभिमान आहे; तरीही इतर भारतीय (बोली)भाषा संस्कृतपूर्व संस्कृत समकक्ष भाषेच्या विकसनाच्या काळात स्वतंत्र पणे विकसित होत होत्या सांस्कृतीक उत्थानात संस्कृतने अग्रणी भूमीका घेतल्या नंतर शब्द संग्रहांचे आदान प्रदान स्वाभाविक पणे झाले पण इतर भाषांनी स्वतंत्रपणे योगदान दिले असणार आहे.
मी वर चक्षू (चक+सू = काय ते पहा) शब्दाचे दिलेली गुजराथ स्टाईल व्युत्पत्ती कदाचित आपणास पटणार नाही. कदाचित हसू ही फुटेल, संस्कृताच्या मार्गाने नवे व्युत्पत्ती संशोधन तसेही फारसे शिल्लक नसावे. संस्कृतचा संदर्भ न घेता काही नवा विचार सुचण्याची शक्यता संस्कृतला केंद्रीय भूमीका देण्यातून नाकारली जाते. वेगळा विचार कदाचित चुकीचा ठरला संस्कृतच्या पुराव्यांवर नाही टिकला असे ही होऊ शकते. शंभर नव्या विचारातले ९९ चुकले एक बरोबर आलातरी इतिहास संशोधनाकरीता ती मोठी पायरी असू शकते. म्हणून माझे मतांतर जपण्याचा माझा विचार सध्यातरी तसाच आहे. म्हणून हे मतांतर.
एनी वे मी स्वतंत्र (धाग्यास) प्रतिसादाने मुख्य धागाविषया बद्दल आणखी काही विश्लेषण जोडतो आहे
माझ इथे तुर्तास तरी मतांतर
माझ इथे तुर्तास तरी मतांतर आहे. इंडोयुरोपीयन भाषा समुहातील संस्कृत अथवा तीचे रूप आधी आले आणि मग बाकी भाषा अपभ्रंश आणि मग भाषा रूपात आल्या हे मला तर्कसुसंगत वाटत नाही.
होय, ते बरोबरच आहे- उदा. दार्डिक भाषा या संस्कृतोद्भव नसता एक वेगळी ब्रँच आहे म्हणतात. माझा मुद्दा इतकाच होता, की संस्कृत बरीच प्राचीन आहे आणि तिचे डॉक्युमेंटेशनही अन्य कुठल्याही भाषेच्या तुलनेत जास्त उपलब्ध आहे.
आणि म्हणून ज्या इंडो आर्यन (बोली)भाषा भारतात आल्या त्या सर्व संस्कृतोद्भव होत्याच असे म्हणता येत नाही ( मे बी मी म्हणत नाही) संस्कृतेतर भारतीय भाषात देस्य शब्द आहेत ते संस्कृत प्रेमीही मान्य करतात.
संस्कृतोद्भव नसल्या तरी या ना त्या प्रकारे त्यांमध्ये आढळणारे फॉर्म्स तिथे जाऊन पोहोचतातच. हां आता काहीवेळेस नाही पोचत हा भाग वेगळा, पण बाय & लार्ज पोचतात यात संशय नाही.
मी काही आसमीज शब्दांवर काम करताना ते हिंदी आणि संस्कृतात आढळले नाही पण मराठीत आढळले त्यामुळे सर्व भाषा संस्कृतोद्भव आहेत असा विचार करून भाषिक शोध कितपत पुढे जातील या बद्दल मला साशंकता वाटते. रादर भाषिक अंगाने इतिहास संशोधनातला केवळ संस्कृतच्या मार्गाने मार्गक्रमण करणे हाच मोठा अडथळा ठरत आला असावा. अर्थात जिथे संस्कृतला क्रेडीट आहे तिथे संस्कृतचे क्रेडीट नाकारायचे असेही नाही. वरच झषकेतन शब्दाच्या व्युत्पत्तीत राहींनी सरळ बोलीभाषेचा संबंध लावण्याचा प्रयास केला आणि मी संस्कृतातील दाखले देऊनच वेगळा तर्क मांडला.
आसामी भाषेतील शब्दांची उदा. पहायला आवडतील. बाकी सहमत आहेच, फक्त ही सिमिलॅरिटी 'इंडोयुरोपियन आणि नॉन संस्कृतोद्भव शब्द (युरोपियन इंपोर्ट-गेल्या ५०० वर्षांतले-वगळता)' अशी अपेक्षित आहे, इतकेच. नपेक्षा बंगाली आणि मराठीत 'दोरी' हा शब्द त्याच अर्थाने आहे, पण बहुधा तो नॉन-इंडोयुरोपियन (नॉन इंडो आर्यन) आहे.
बाकी संस्कृतचा बायस म्हणून नव्हे पण पौर्वापर्य ठरवण्यात तुमची मीमांसा अपुरी ठरते आहे असे वाटते. असो.
चकवणे
'चकवणे'शी अर्थसान्निध्य दाखवणारा एक शब्द म्हणजे 'चकवा'. चकवा म्हणजे दिशाभूल. दिशाभूल हा शब्दसुद्धा आपण आज अर्थविस्ताराने 'फसवणूक' या अर्थी वापरतो. दिशेची भुरळ पडणे, तिथल्यातिथेच गोल-गोल चक्राकार फिरत रहाणे म्हणजे चकवा. हिंदीमध्ये भूल जाना म्हणजे विसर पडणे. शिवाय भूल म्हणचे चुकी, मिस्टेक, गलती. पुन्हा हिंदीत फँसना, फँसाना म्हणजे धोक्यात येणे/आणणे, अडचणीत येणे/आणणे, अडकणे/अडकवणे. मराठीत सावज फसते म्हणजे शिकार्याच्या पाशात
उद्धृत ओव्यांमध्ये झकवणे हा शब्द मराठी 'फसवणे' या अर्थानेच वापरलेला दिसतो.
झकास हा शब्द संस्कृत 'चकास्' शी नाते सांगत असावा का?
मासा
हा अर्थ शब्दरत्नाकरात आहे.
अर्थात अद्ययावतीकरण आणि साफसुफीकरण न झाल्याने 'शब्दरत्नाकर' तितकासा विश्वासार्ह नाही.
यात 'झक्कू'चा अर्थ 'विटीदांडूच्या खेळातली एक संज्ञा' असा दिला आहे. विटीदांडूचा खेळच कालबाह्य होऊ लागल्यामुळे हा अर्थही कालबाह्य होणे क्रमप्राप्त आहे.
दुसर्या एका संस्कृत- मराठी-गुजराती-इंग्रजी शब्दकोशात झषकेतन म्हणजे कामदेव असा अर्थ दिलेला आहे.
पुन्हा, झगडणे म्हणजे (एकमेकांशी)झोंबणे, भांडणे. (एकमेकांना) भिडणे. जुगल, जुगुल, युगुल म्हणजे जोडी, कपल.(यावरून कॉप्युलेट हा शब्द आला असेल का?
जुगणे, जूग, (जुगाडसुद्धा) हे शब्दही समानधर्मी वाटतात.
झषकेतनची व्युत्पत्ती
राहींना वाटते तसे विषय आसपासचा असलातरीही, झषकेतन शब्दाची व्युत्प्त्ती शोधताना निष्कर्ष घाई झाली नाहीना अशी साशंकता वाटते. झषकेतन/मीनकेतन शब्द कामदेवाचे नाव म्हणून येतो पण त्याची व्युत्पत्ती झषकेतन झष/मीन म्हणजे मासा माश्याचे शरीर प्राप्त झालेला. झषकेतन शब्द अभ्यासताना 'मगर' हा मत्स्यवर्गीय प्राणी कामदेवाच्या ध्वजावर असतो असे वाचनात आले. मगर हे प्रतिक चिन्ह कामदेवाच्या बाबतीत का निवडले गेले असेल हे नीटसे उलगडत नाही; भारतीय संस्कृती सहसा धर्म, अर्थ, काम, मोक्ष या तत्वांच्या सुयोग्य समन्वयावर भर देते. मगर मिठी पडणे असा मराठीत एक वाक्प्रयोग आहे मगर मिठी म्हणजे जणू मरणच त्यातून सूटण हे महा कठीण आणि काम हे मगर मिठी प्रमाणे आहे असे काही यातून प्रतिक कारास व्यक्त करावयाचे असेल का ? तसे असेलतर एकुण मोक्षा पेक्षा काम कसा दुय्यम आहे दाखवण्यासाठी हे प्रतीक वापरले गेले असावे असे आपण म्हणू शकतो.
कदाचित सोबतच खाली दिलेली एक पौराणिक कथा या प्रतिका नंतर आली का आधी पासून हे सांगणे कठीण आहे. त्या कथा रचनेचा उद्देश शैव-वैष्णव या सुप्त कोल्डवॉरचा प्रभाव आहे का हे कल्पना नाही.
झषकेतन या नावाला बहुधा पौराणिक कथेशी संदर्भ असावा. कोपलेल्या भगवान शंकरांनी कामदेवाला भस्म केलं. रतीच्या तपस्ये नंतर देवी पार्वतींनी कामदेवाला कृष्ण आणि रुक्मिणीचा पुत्र (प्रद्युम्न) म्हणून जन्मण्याचा उश्शाप दिला. प्रद्युम्नाला बाल्यावस्थेतच एका राक्षसाने उचलून पाण्यात टाकला ह्या कामदेवाचा पुर्नजन्म असलेल्या प्रद्युम्नाला एका मास्याने गिळला (कामदेवाला येथे लिटरली मास्याच्या शरीराच घर मिळाल मीनकेतन/झषकेतन शब्दाची व्युत्पत्ती येथे असण्याची शक्यता नाही ना; मीनकेतन शब्दाची नोंद मोल्सवर्थात आहे.) पुढे मास्याच्या पोटातन हा प्रद्युम्न एका कोळ्याला मिळतो वगैरे कथा पुढे जाते. (वीष्णू पुराण आणि शिव पुराणात कथा जरा वेगवेगळी असावी, पुराण विषयातील जाणकार यावर अधीक प्रकाश टाकू शकतील असे वाटते. चु.भू.दे.घे.)
शरीर मगरी सारख आहे म्हणून झषकेतन अथवा उपरोक्त कथेच्या प्रभावातून झषकेतन पण एकुण व्युत्पत्ती राहींना प्रथमदर्शनी वाटली त्या पेक्षा वेगळी असण्याचा संभव मला वाटतो.
झक मारणे lम्हणजे मासे मारणे
झक मारणे lम्हणजे मासे मारणे असे नसावे. मासे मारणे ही पूर्वी उपयुक्त क्रिया होती. अजूनही आहे.
त्या क्रियेचा उल्लेख उग्गाच काहीतरी फालतू निरुपयोगी करत होतो असा डेरोगेटरी करण्याची शक्यता कमी.
यापेक्षा झक मारणे म्हणजे माश्या (flies) मारणे असा अर्थ असणार.
हे गमतीने म्हणत नाही. फ्लाय फिशिंग म्हणजे माशी / किडा गळाला अमिष म्हणून लावून मासे पकडणे या प्रकारात गळाच्या टोकाला माशीचा ओळंबा बांधणे (प्रत्यक्ष माशी अथवा क्रुत्रिम ) या गोष्टीला झक बांधणे (tying zak) असे वर्णन कुठेकुठे दिसते. हे पहा :
झक्कू, झक, झकास
'झक्कू' म्हणजे मागे लागणे, पिरपिर करणे अशा अर्थी सार्वत्रिक वापरामध्ये आहे. (आम्ही शाळेत असतांना 'झक्कू, ताडया, घोटया, अभ्यासाचे प्रकार हे तीन' अशी मजेदार ओळ म्हणत असू. तिचा अर्थ असा सांगितला जाई - प्रथम पोरामागे आईवडील, शिक्षक अभ्यास कर, अभ्यास कर असे मागे लागतात (झक्कू), पोराने ऐकले नाही की त्याला बडवतात (ताडया), त्यानंतर पोरगे घोकंपट्टी करायला बसते (घोटया).
'झक मारणे'(आवश्यकता नसता फसणे) हा वाक्प्रचार जुन्या मराठीतील 'झकणे = फसणे' ह्या क्रियापदापासूना आलेला दिसतो. तुळपुळे-फेल्डहाउस ह्यांच्या जुन्या मराठीच्या कोशामध्ये हे क्रियापद, त्यावरूनच 'झगविणे = फसवणे' हे क्रियापद दाखविली असून 'कालौनि आंधारे|लिहों येतीं अक्षरें|तरि मसीचेनि वोबरें|झके कोण|| (अमृतानुभव ३२३) असे उदाहरणहि दाखविले आहे.
'झष' म्हणजे एक मोठा मासा. शतपथ ब्राह्मणामध्ये १.८.१ येथे बायबलमधील Noah's Ark ची आठवण करून देणारी प्रलयाची आणि तदनंतरच्या उत्पत्तीची कथा आहे. तिच्यामध्ये मनूच्या हाती आलेला छोटा मासा नंतर वाढून मोठया माशामध्ये त्याचे परिवर्तन झाले ह्या संदर्भात 'शश्वद्ध झष आस' 'नंतर तो 'झष'मासा झाला' असा उल्लेख आहे.
झकास, झगझगीत हे प्रकाशाशी संबंधित अर्थांचे शब्द 'चकास् (चकास्ति चकास्ते)- चमकणे' ह्या धातूपासून निर्माण झाल्याचे दिसते. पर्यायी ते 'झगझगायमान'(मोनिअर-विल्यम्स), 'झगझगायते' (आपटे) ह्यांशीहि संबंधित असू शकतील. ह्या दोन्हींचा अर्थ to flash, sparkle अशा स्वरूपाचा दिला आहे.
ह्या तीन एकमेकांशी असंबद्ध अर्थांमुळे झक्कू, झक मारणे, झकास ह्यांच्यामध्ये अर्थसाधर्म्याचे काही संधान आहे असे वाटत नाही. 'झक्क' (फार छान) हा शब्द मात्र 'झकास'बरोबर अर्थसाधर्म्य दाखवीत आहे.
च्यक्
मराठी शब्दांच्या प्राचीन व्युत्पत्तींबाबत आंतरजालावरच (मराठी धरून) ह्या धाग्याच्या निमीत्ताने गुढी या शब्दानंतर, हे माझ दुसर्या शब्दाच विश्लेषण करण्याचा योग ज्यांच्या प्रतिसादाच्या निमीत्ताने मिळाला त्या सिफ़र आणि माझ्या विचारांना मला पुन्हा पुन्हा तपासण्याची संधी देण्यासाठी चर्चेतील सर्वांचेच धन्यवाद व्यक्त करावयास हवेत. अर्थात आंतरजालावरील हे सुरवातीच लेखन असलतरी खरी सुरवात मराठी विकिपीडियातील इंग्रजी शब्दांना चपखल मराठी पारिभाषिक शब्द तयार करण्याच्या निमीत्ताने इंग्रजी शब्दांच्या लॅटीन ग्रीक इत्यादी शब्द शोधून त्यांचे समकक्ष संस्कृत शब्द शोधायचे त्यावरून (संस्कृत प्रचूर न वाटणारा) मराठी शब्द शोधण्याचा प्रयत्न करणे; हि प्रस्तावना सांगण्याचा मुख्य उद्देश अनेक इंग्रजी (आणि युरोपीयन) शब्दांच्या from unknown source लिहून सोडून दिलेल्या आढळतात संस्कृतात अथवा भारतीय भाषासमुहाच्या बाबतीत संस्कृतालाच मध्यवर्ती भूमीका देऊन लिहिलेल्या इंडोयुरोपीयन (/इंडोआर्यन) व्युत्पत्ती कोशातून सुद्धा आढळत नाहीत पण व्युत्पत्तीचा अंदाज देणारे मराठी शब्द आढळतात. आज आंतरजालावर अनेक शब्दकोश शोधणे सहज शक्य झाल्याने विवीध शब्द साधर्म्ये सहज उलगडत जातात.
लोकमान्य टिळकांनी लोकसमुहांच स्थानांतर आठ एक हजार वर्षापुर्वी झाल्याचा अंदाज शंभर वर्षांपुर्वी वर्तवला. सगळ्यात मागचे आईस एज संपल्याचा आणि मानवी स्थानांतरांना कारणी भूत ठरल्याचा कालावधी बद्दलचा कालावधी बद्दल मी मागच्या वर्षाभरात जे लेटेस्ट म्हणून संशोधन आंतरजालावर वाचले त्यातही आठ एक हजार वर्षापुर्वी मागचे आईस एज संपल्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. (हा संदर्भ आंतरजालावर असणार एखाद्या शोध यात्रेत शोधून दुवा जोडावा लागेल). जे मराठी शब्द व्युत्पत्ती वर म्हटल्या प्रमाणे शोधण्याचा योग आला त्यातील काही शब्द (मराठी/भारतीय/इंडोयुरोपीयन) मनुष्य आदिम शिकारी अवस्थेत असतानाचे सुरक्षा आनि अन्नासाठी वनस्पतींच्या छत्रछायेनेच , कदाचित पुर्णवाक्ये न बनाताना केवळ अर्थजन्य तुटक शब्दातून संवाद साधण्याच्या तरीही अंशतः समुह ऑर्गनाईज पणे काम (शिकार सुरक्षा इत्यादी) करू लागतानाच्या काळात अस्तीत्वात आले असावेत हे प्रकर्षाने जाणवते. मला माहित पडलेले काही शब्द मी माझ्या व्यक्तीगत अभ्यासापुरते आणि पुढे मागे जमल्यास कॉपीराईटेड लेखनासाठी राखून ठेवले असले तरीही काही वैशीष्ट्ये निश्चितपणे शेअर करता येतील. तुरळक शब्द अगदी प्रोटो हिस्टॉरीक स्वरूपाचेही असू शकतात कारण अगदी जगातल्या अनेक आदिवासी भाषा समुहातही समकक्ष अर्थाने आढळतात. काही प्रोटो अरेबीक + इंडोयुरोपीयन कुळात तर बरेचसे प्रोटो इंडोयुरोपीयन कुळातून आहेत. हे शब्द तत्कालीन माणसाच्या किमान स्वरूपाच्या संवादासाठी आणि जगण्या मरण्याच्या रोजच्या संघर्षातील असल्यामूळे तसेच त्यांच्या सार्वत्रिक वापराच्या प्रभावा मुळे केवळ व्यापारा/युद्धादीक कारणांनी देवघेव झाले असतील असे कमी संभवते. सांगण्याचा उद्देश एवढाच कि पुर्ण भाषिक विकासाच्या आधिची स्टेजपर्यंत विचार करत असल्यामुळे संस्कृत लॅटीनादी प्रमाण भाषा त्यांच्या विकसीत स्तरावर येण्याच्या खूप आधीच्या काळ लक्षात घेऊन विश्लेषणाकडे माझा कल आहे. ज्या गोष्टींचे काहीच आधार नाहीत केवळ तार्कीक कल्पनांवर इमले आहेत त्याचा कोणताही उलगडा अंतीम सत्य असल्याची कुणीही गॅरंटी देऊ शकत नाही आणि या विषया बाबतील अधिकृत शिक्षण नसणे हि माझी मर्यादाही (आणि माझ्या विश्लेषणात चुका असू शकतील हे) मला मान्य आहे, म्हणजे एकुण आपले विश्लेषण भविष्यातील इतर अभ्यासूंच्या वाचनात आले टिकेचे भाग्य लाभले तरी भरून पावले एवढेच.
या धागा विषयातील मुख्य शब्द झक हा शब्द कसा आला याचा आपण विचार करतो आहोत. स्वसुरक्षेसाठी वृक्षांवर अवलंबून असलेल्या ठायी ठायी जंगली श्वापदांशी सामना करणाच्या मानवी संवादाची सुरवात लक्षवेधक व्हिस्परींग, कमीत कमी शब्दात संवाद साधून हेतु साध्यकरणे एकाच शब्दाचे अनेकार्थी उपयोग आणि कमीतकमी शब्द संग्रह असा राहिला असणे सहाजीक आहे. "च्यक" दंतोष्ठ उच्चारण (खरेतर यात कचा असा उच्चार नीटसा/पूर्ण होतही नाही) 'हे कशाला ?' अशा चिंताग्रस्त विचारांनी आजही क्वचीत केला जातोच. त्याच 'च्यक'ची पुढे शक शंका अशी रुपे झाली असावीत का अशी शक्यता तपासण्याची गरज वाटते. चिंता आणि शंका वाटली अथवा समुह सुरक्षे साठी तुम्ही ती चेक करणार तपासणार, चक अथवा चेक करणे ही संकल्पना वापरणारा समुहातील कुणीतरी एकजण/किंवा अधिक जण परिसराला राऊंड मारून सर्व सुरक्षीत असल्याची खात्री करत असणार. (एका शब्दकोशात चक शब्दाचा अर्थ सीमा असाही आढळाला हे इथे उल्लेखनीय ठरते.) अर्थात हे एकदा करून झाले की झाले असे नाही रात्रंदिवस सातत्याने लक्ष ठेवणे , तपासणे, संकट सामूहीक पणे पिटाळणे अथवा सामुहीक शिकार करणे हे करताना सामुहीक व्यवस्थापनातून टेहळणी, गस्त, परिघ सुरक्षीत असल्याची खात्री करणे, संकट निवारण आणि शिकार हे ऑर्गनाईज पणे साध्य करणार्या मानवी समुहांचे यश आणि स्थानांतर क्षमता अधीक असणे स्वाभाविक वाटते. आणि त्या साठी साध्या सोप्या परंतु इफेक्टीव्ह संवाद शब्दांची निर्मीती सहाजीक वाटते. हे शब्द समुह शोधणे भाषिक इतिहासाच्या शोधास/ आणि अनुवंशशास्त्राच्या इतिहासास बळ देणारे ठरू शकते असा माझा विश्वास आहे.
चक करणे याची अप्रत्यक्ष पुष्टी करणारा शब्द म्हणजे इंग्रजी चॉक (म.खडू) या शब्दास नंतरचे अर्थ लाईमस्टोन आणि खडू असे लागले असलेतरी शब्दकोशांमधील मूळ व्युत्पत्ती खूण करणे मूळ व्यूत्पत्तीत खडू आणि लाईमस्टोनचा संबंध नसून पेबल्सचा उल्लेख आहे हे इथे उल्लेखनीय वाटते. त्या सोबतच चक्षू ची चक+सू (कोणे चेक कर) हि गुजराथी व्युत्पत्ती कुणाला किती पटते माहीत नाही पण लक्ष्य ठेवण्याच्या तत्कालीन सामुहीक सवयीकडे निर्देश करते पण सू हा गुजराथी शब्द अगदी युरोपातही वापरला गेला म्हणणे तर्क सुसंगत ठरत नाही. पण चकवव्ह्यू हा शब्द वापरला गेला असण्याची शक्यता असू शकते त्याच्या चक्र व्यूह या संस्कृत शब्दात युद्धाची व्यूहाचे माहित नसलेले मोठे गुपित असल्याची धारणा महाभारत युद्ध कथेमुळे अजूनही भारतीय जनमानसात टिकून आहे. तिचा उगम सामुहीक सुरक्षा, टेहळणी गस्त आणि शिकारीच्या गरजेतून निर्माण झाल्याची शक्यता अभ्यासून पाहण्याची गरज वाटते. च्यक हि चिंतात्मक चेक करून घेण्याची इच्छावजा सूचना, चक करणे म्हणजे चेककरणे आणि चेक करून झाल्या नंतर चेक्ड चेक करून झाले सर्व आलेबेल आणि उत्तम आहे हा संदेश वापस देण्यासाठीही (मानवी भाषिक विकासापूर्व अल्प शब्द संख्या स्थितीत) पुन्हा 'चक' हा शब्द वापरला जाणे संभवते. त्यामुळेच एकीकडे चक (झक) करणे आणि दुसर्या बाजूस चक(झक) म्हणजे शुद्ध उत्तम चांगले या दोन्हीही अर्थछटांचा उगम एकाच क्रियेतील संवाद प्रक्रीयेच्या संवाद प्रतिसंवादासाठी (चेकींग-चेक्ड किंचीतश्या परस्पर वेगवेगळ्या तरीही संबंधीतअर्थछटांनी ) वापरल्या गेलेल्या एका शब्दातूनच होत असावा.
chock choke shock या युरोपीयन
chock choke shock या युरोपीयन शब्दांच्या व्युत्पत्तिचेही विश्वासार्ह अती प्राचीन स्रोत आंतरजालावर आढळले नाही. पण chock choke हे ब्लॉक करणे या अर्थानेही येताना दिसतात. एका व्युत्पत्ती कोशात choke आणि चीक (गाल) यांचा संबंध असण्याची शंका व्यक्त केली गेली आहे ती फारशी विश्वासार्ह वाटत नाही उलटपक्षी चेककरताना अथवा शिकारीच्या दरम्यान अचानक सावज गावले तर चेक्स मधील क चा विलोप झाला तर टू चेस (पाठलाग) होते आणि chock choke सावज/शिकार ब्लॉक करण्यासाठी वापरले गेले असू शकतात. (अर्थात उपरोक्त सारेच विश्लेषण शक्यतांवर आधारीत आहे)
झष या शब्दाची तो झक या अर्थीतर नाहीना याची आपण सर्वच जण चर्चा करतो आहोत या झष शब्दाचे मासा या अर्था शिवाय इतर दोन-तीन अर्थ ऑनलाईन शब्दकोशातून दिसले त्यात उंच गवत असलेले जंगल, दुखापत पोहोचवणे (टू हर्ट) , पाणि असे मिळाले त्यावरून मी जरासा अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला टू चेस चे जेस>> झेष >> झष असे रुपांतरण झाले असल्यास झष या शब्दाचा मूळ अर्थ शिकार करणे आणि मासे पकडतानाही चेस करावेच लागते म्हणून पाणि आणि मासा या शब्दांनाही झष शब्द वापरला जाणे संभाव्य वाटते. म्हणजे तो चक>> झक या शब्दांना पर्यायी असण्यापेक्षा टू चेस या शब्दाला पर्यायी असण्याची शक्यता अधीक वाटते. त्या शिवाय झष शब्द शिकार खेळतानाच्या झासा देणे शब्दाच्या जवळचा वाटतो.
शिकार चेस (पाठलाग) करताना जेव्हा हातची निसटते तेव्हा चकवा (हिंदी चकमा) देणे आणि दुसरा कुणी तुमचा पाठलाग करत असेल अथवा काही वेळा सावजालाही चकवून (चेस>>चासा>>जासा>>झासा?) जाळ्यात आणले जात असेल म्हणून चक पासूनच पुढे चकवा आणि चकविणे हे शब्द तयार झाले असावेत आणि झकविणे या मराठीतील शब्दाचा अर्थ फसविणे होत असला तरीही तो चकविणे शब्दावरून आला असण्याची शक्यता अधीक संभाव्य वाटते किंवा कसे. हिंदी चंक्रमण, चंगूल (>चंकूल) मध्ये फसणे हे शिकारीशी संबंधीतच शब्द येथे उल्लेखनीय वाटतात
पुढे चालून चक म्हणजे शुद्ध स्वच्छ चकाकते वरूनच चकास हा शब्द आणि त्या चकासचे झकास झाले असावे ही शक्यता नाकारता येत नाही म्हणून झकास हा शब्द चक करणे या प्रक्रीयेतूनच चक म्हणजे शुद्ध चकाकते या नंतरच्या अर्थां सोबतच पुढे आला असण्याच्या शक्यतेमुळे अप्रत्यक्षपणे संबंधीत वाटतो.
चाकाचाही शोध मानवाच्या अगदीच शिकारीच्या अवस्थेनंतरचा असणार म्हणून चाकाचेही नामाभिधान (नामःकरण) नंतरच्या कालावधीत झाले असावे. (चाक या शब्दाला युरोपीयन लिक व्हील इत्यादी वेगळे शब्द वापरतात यावरूनही झालेले विस्थापन स्थानांतरण हे शिकारी अवस्थेत ऑर्गनायझेशन ची क्षमता आल्या नंतर पण चाकादी नागरीकरणा/संस्कृतीकरणा पुर्वी झाले असणे अधीक संभाव्य वाटते. आणि याच कारणाने चक्र पासून चाक एवजी चक्कल/चकला/चकरा>>चक्र ही व्युत्पत्ती दिशा अधीक तर्कसुसंगत वाटते) दिलेल्या पूर्ण परिघा भोवती (गोल) चक्कर मारणे हे संबंधीत असल्यामुळे चाक,चक्क्,चक्की, चक्कल/चकला/चकरा>>चक्र हे सर्व शब्द चक करणेच्या एका अर्थछटेवरून आले असावेत असे वाटते.
राजा आणि क्षत्रीय शब्दांच्या व्युत्पत्तीचाही शोध चक सोबतच्या सामासिक शब्दांवरून घेतला जाऊ शकतो. आणि इतर अजूनही अनेक मराठी शब्दांचा सुद्धा (जमल्यास कल्पना करा, माझ्या पुरते सांगावयाचे झाल्यास, सध्यातरी माझी या विषयातील उर्वरीत माहिती/तर्क, माझ्या भविष्यातील कॉपीराईटेड लेखनासाठी राखून ठेवतो :) )
लष्कराच्या भाकरी भाजणे एका काळात अत्यंत अभिमानास्पद अर्थ असण्याची शक्यता असलेला पण काळाच्या ओघात त्याचा विपर्यस्त अर्थ वापरात आला तसेच काहीसे; चक करणे या मूळ प्रक्रीयेच आदीम-शिकारी जीवन जगताना महत्व खूप असणार; मानवी नागरीकरणाच्या प्रक्रीयेत ते महत्व मागे पडून आपण झक मारणे सध्या विपर्यस्त अर्थ वापरात आल्याची शक्यता वाटते.
थोडेसे संदर्भ देणे बाकी आहे ते येत्या काळात सावकाशीने नमुद करेन. आपणा संगळ्यांच्या प्रतिसादासाठी आणि ऋषिकेश यांना धागा वेगळा काढण्यासाठी मनःपुर्वक धन्यवाद.
जोशी साहेब आपण हेच म्हणू
:) जोशी साहेब आपण हेच म्हणू इच्छिता आहात का अजून काही वेगळे म्हणू इच्छित आहात, धागा विषयास अनुसरून आपणास नेमका कुणाच्या कोणत्या प्रतिसादातील कोणती गोष्ट खटकली आहे हे मोकळेपणाने सांगीतल्यास संबंधीतांना विषयास अनुसरून प्रतिसाद देणे सोपे जाईल.
बाकी माझी विश्लेषण पद्धती आपण पाहिलेली आहेत, ".....म्हणजे इतरत्र लोक भाषातज्ञ, इ असल्यासशिवाय साध्या समास संधीपलिकडे बोलत नाहीत. कि ऐसीवर खूप भाषातज्ञ आहेत?" खरे तर या वर खीस पाडण्याचा मोह होतोय पण .... तुर्तास व्यक्तीगत रोख बाजूला ठेवून आपले नेमके म्हणणे समजून विषयास अनुसरून प्रतिसाद दिला म्हणजे विषयांतर आणि शक्यतो व्यक्तीगत रोख टळतील आणि आपणास आणि इतरांनाही काही प्रगल्भ चर्चेत सहभागी झाल्याचा, काही भरीव प्राप्त झाल्याचा आनंद मिळेल.
आणि आपली हि कदाचीत धावती पिंक भेट असल्यास त्यासाठीही धन्यवाद.
जनरली मी जे लिहितो लिटरली तेच
जनरली मी जे लिहितो लिटरली तेच मला म्हणायचे असते. खवचटपणा असला तरी तो फारच सुस्पष्ट असतो. तो आहे का नाही अशी वाचकांना कधीच शंका येत नसावी असे मला तरी वाटते.
लोकांचं त्यांच्या प्रोफेशनमधलं किंवा रुचिमधलं कौशल्य, व्यासंग पाहून कधीकधी दडपायला होतं. सबब प्रतिसाद त्याला दिलेली पॉझिटिव दाद आहे. तुम्ही सगळे झक बद्दल विचार करताना मी वेगळाच विचार करत आहे. तो माझ्या प्रतिक्रियेत व्यक्त झाला आहे.
धन्यवाद आणि शुभेच्छा.
अशी वाचकांना कधीच शंका येत नसावी असे मला तरी वाटते.
विषयातील अधिकृत तज्ञ नसताना सुद्धा विकिपीडियात लिहित असतात, विकिपिडियातील प्रत्येकाकडे देण्या सारखे काही ज्ञान असते या मुल्याच्या तालमीत तयार झाल्यामुळे प्रंशसे सोबत या विषयावरील टिका झाली कि उत्तर देऊ या तयारीत असण्याने आमचा घोळ झाला पहा !
आपल्या मनमोकळ्या प्रशंसे बद्दल धन्यवाद आणि शब्द व्युत्पत्ती वर चर्चा करणार्यामध्ये येत्या काळात आपणही सामील झालेले दिसावे यासाठी शुभेच्छा.
ha ha ha
विषयातील अधिकृत तज्ञ नसताना सुद्धा विकिपीडियात लिहित असतात, विकिपिडियातील प्रत्येकाकडे देण्या सारखे काही ज्ञान असते या मुल्याच्या तालमीत तयार झाल्यामुळे प्रंशसे सोबत या विषयावरील टिका झाली कि उत्तर देऊ या तयारीत असण्याने आमचा घोळ झाला पहा !
हा हा हा.
We react to whole persona and history of the communicator than commenting on the statement in the consideration. It happens.
भाषातज्ज्ञ असण्याची आवश्यकता नाही.
आपण प्रत्यही वापरतो असे शब्द कोठून निर्माण झाले अशी चौकस उत्सुकता असण्यास भाषतज्ज्ञ असण्याची काही आवश्यकता नाही. Healthy curiosity इतकेच स्पष्टीकरण पुरेसे असते.
अशी माहिती धुंडाळण्यास बाहेर पडल्यास serendipitously अन्य फुटकळ माहिती सापडते, जी कोठे अन्य ठिकाणी कामी येते. हाहि अशा शोधाचा लाभ असतो. उदा.'serendipitously' हाच शब्द कसा तयार झाला हे शोधले तर जुन्या भूगोलाची बरीच 'अडगळ' आपोआप डोक्यात येऊन पडेल.
.'serendipitously' हाच शब्द
.'serendipitously' हाच शब्द कसा तयार झाला हे शोधले तर जुन्या भूगोलाची बरीच 'अडगळ' आपोआप डोक्यात येऊन पडेल.
ते सालही बहुधा १७५४ असावे, चूभूद्याघ्या. अन लेखक Horace Wallpole.
अतिअवांतरः १७५४ साल लक्षात रहायचे कारण म्ह. पुण्यातले त्रिशुंड गणपती मंदिर (इंग्रजांचे शिल्प कोरलेले आणि गाभार्याजवळ फारसी शिलालेख असलेले) तेव्हाच बांधल्या गेले.
झक = गां* असू शकेल का? म्हणजे
झक = गां* असू शकेल का? म्हणजे पुढे मारणे असा शब्द येतो म्हणून... पण तुझी झक मारीन असा शब्दप्रयोग येत नाही हेही खरेच.