Skip to main content

.

.

समीक्षेचा विषय निवडा

राजेश घासकडवी Sun, 22/01/2012 - 11:00

इनकार बऱ्याच वर्षांपूर्वी पाहिला होता. त्यातलं मुंगळा गाणं अर्थातच खूप वेळा पाहिलं आहे. सिनेमातले खूप बारीक बारीक प्रसंग आठवतात. श्रीराम लागू आपला जुना चांभारकाम करतानाचा फोटो दाखवून स्वतः ती बॅग शिवतो तो प्रसंग. जळण्याच्या ठिकाणाहून पिवळा धूर निघतो तो प्रसंग. आणखीन एक आठवतो तो म्हणजे अमजद खान पळून जाण्यासाठी उजव्या हातावरची खूण लपवण्यासाठी हात प्लॅस्टरमध्ये घालतो खरा, पण तिकीट काढताना पाकीट त्याला डाव्या हाताने काढावं लागतं. त्या अडचणीमुळे पाळत ठेवणारे सीआयडी त्याला ओळखतात.

पण या चार नकारांची गोष्ट लक्षात नव्हती. तीन नकार हरिदासच्या तत्वनिष्ठा अथवा गुर्मीतून येतात. एक काहीशा कातडीबचावू प्रवृत्तीतून येतो. दोन चुकीच्या नकारांचे होकार झाले, आणि दोन योग्य ते (तत्वनिष्ठेचे) नकार राहिले. हा अर्क चांगला समजावून सांगितला आहे.

मुंगळा नंतरचा मारामारीचा प्रसंग कथानकासाठी आवश्यक आहे. कारण सिनेमातला व्हीलन किती जबरदस्त आहे हे सिद्ध केल्याशिवाय संघर्षाला जोर येत नाही. त्या मारामारीसाठी अर्थातच मुंगळा हे गाणं आवश्यक आहे. तात्पर्य, हेलनचा नाच कलात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे. :)

चेतन सुभाष गुगळे Thu, 24/01/2013 - 17:31

दोन चुकीच्या नकारांचे होकार झाले, आणि दोन योग्य ते (तत्वनिष्ठेचे) नकार राहिले. हा अर्क चांगला समजावून सांगितला आहे. >>

धन्यवाद. तो अर्क माझ्या मेंदूत फार चांगल्या प्रकारे उतरलाय कारण चित्रपट पहिल्यांदा पाहण्यात आला तेव्हा नव्यानेच नोकरीत रुजू झालो होतो आणि त्याकाळी हे असले नमकहराम, काला पत्थर, बेमिसाल वगैरे...तात्विक चित्रपट मोठ्या भक्तिभावाने पाहून त्यावर तितक्याच तावातावाने चर्चा करीत असायचो.

असो. अब न वो दिन रहे न रही वो बाते...

http://www.loksatta.com/vruthanta-news/now-teach-lessions-from-movies-3…

तात्पर्य, हेलनचा नाच कलात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे. >>

सव्वा दोन तासांच्या चित्रपटात ५ मिनिटांचे नृत्यगाणे (च) लक्शात ठेवण्याकरिता हे कारण पुरेसे आहे?

... Sun, 22/01/2012 - 23:25

या चित्रपटात हे गाणं आहे माहीत नव्हतं
तुम्ही चित्रपट फार बारकाईने पाहलात अस वाटतं
एकदम डिट्टेलमधे लिहीलय

चित्रपट ओळख आवडली

चेतन सुभाष गुगळे Mon, 23/01/2012 - 10:47

In reply to by ...

चित्रपट पहिल्यांदा पाहिल्यावर एकदम आवडून गेला. त्यातल्या हरिदासच्या भूमिकेनं अक्षरशः झपाटून टाकलं. लेख लिहीण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा पाहिला. शेमरूनं आंतरजालावर ठेवलाय. पुन्हा पाहिल्यावर लगेचच लेख लिहील्यानं बारकावे टिपता आले.

टांगापल्टी Mon, 23/01/2012 - 15:39

मुंगळा हे गाणे ह्या चित्रपटातील आहे हे माहीत नवते. परिक्षण आवडले हे वेगळे सांगायला नको.
जियो.

स्मिता. Mon, 23/01/2012 - 16:23

'इन्कार' हा चित्रपट पाहिला नाहीये पण त्याची केवळ पटकथा येथे न देता त्यावर केलेली समीक्षा आवडली.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 24/01/2012 - 02:53

मंडळींनाही चित्रपटातला शीर्षक प्रसंग आठवत नाही हे चित्रपटाचे यश की अपयश?

चित्रपटाचं अपयशच.

तत्कालिन परिस्थितीवर भाष्य करणारा चित्रपट बनवणं वेगळं आणि तो चित्रपट लक्षात राहिल असा बनवणं वेगळं. 'सारांश' बघणार्‍यांना चित्रपट आठवत नाही असं होईल का?

हा चित्रपट मी पण पाहिला होता, अनेक वर्षांपूर्वी, एकीकडे दुसरं काही काम करत. खिळून रहात बघावं असं यात काहीही आढळलं नाही. 'मुंगडा' गाणं मला आवडतं आणि हेलन जितकी सुंदर नाचली आहे तेवढीच सुंदर ती दिसते आहे. तिच्या नेहेमीच्या 'वाईट बाई'च्या मेकपपेक्षा तिचा हा अवतार खूपच सुरेख वाटतो. गाण्यातही मराठी लोकसंगीताचा, कोळीगीतांच्या ठेक्याचा सुंदर उपयोग केलेला आहे. सुंदर गोष्टी सहज लक्षात रहातात, कुरूपता का लक्षात ठेवावी?

चेतन सुभाष गुगळे Sun, 18/03/2012 - 20:46

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

इथे तुम्ही म्हणताय

'मुंगडा' गाणं मला आवडतं आणि हेलन जितकी सुंदर नाचली आहे तेवढीच सुंदर ती दिसते आहे. तिच्या नेहेमीच्या 'वाईट बाई'च्या मेकपपेक्षा तिचा हा अवतार खूपच सुरेख वाटतो. गाण्यातही मराठी लोकसंगीताचा, कोळीगीतांच्या ठेक्याचा सुंदर उपयोग केलेला आहे. सुंदर गोष्टी सहज लक्षात रहातात, कुरूपता का लक्षात ठेवावी? >>

तुमचं हे मत माझ्या मतापेक्षा भिन्न असलं तरी त्याविषयी काही आक्षेप नाही.

पण त्यानंतर

http://www.aisiakshare.com/node/540#comment-7272 इथे तुम्ही म्हणताय -

पुरोगामी महाराष्ट्रात जन्माला येऊन पुढे प्रतिगामी अमेरिकेत प्रयाण करणार्‍या, उच्चविद्याविभूषित आणि काव्य-शास्त्र-विनोदनिपुण राजेश घासकडवी यांनी अशा प्रकारच्या 'चीप' विषयांवर चवीने लिहावे याचा खेद झाला. स्त्री-देहाचं असं जाहीर प्रदर्शन मुळात संस्कृती आणि रूढीप्रिय भारतात व्हावं याचाच मुळात मला खेद झाला. ते तिथेच सोडून न देता राजेश घासकडवी यांनी अशा प्रकारांचं समर्थन करावं याचा अतिशय त्रास झाला. त्यातूनही मेघना भुस्कुटे आणि जाई असे स्त्री आयडी धारण करणार्‍यांनीही श्री. घासकडवी यांना साथ द्यावी हे सर्व उद्वेगजनक आहे.

त्यातून श्री. घासकडवी यांचा सर्व प्रकारचा तुच्छतावाद माफ केला तरीही स्वतःला प्रगत समजणार्‍या देशात रहाणार्‍यांकडून अल्पसंख्यांकांची पुरुषांनी हे नृत्य बघताना एखादं कापड लाळेरं म्हणून वापरावं अशा प्रकारे उपेक्षा करणे हे अजिबातच अपेक्षित नव्हतं. >>

तुमच्या ह्या मताविषयी आक्षेप असण्याचा तर प्रश्नच नाही उलट मी तर या मताचं समर्थनच करील कारण मी स्वतःही याच मताचा आहे.

आता माझा आक्षेप एवढाच आहे की एकाच विषयावर दोन वेगवेगळी मतं एकाच व्यक्तीने का मांडावीत? तुम्ही कुठल्याही एकाच मतावर ठाम राहिलात तर माझा काहीच आक्षेप नाहीये, पण कृपया मला असं गोंधळात पाडू नये.

अज्ञात Tue, 24/01/2012 - 07:54

घासकडवी यांच्याशी सहमत.
परिचय आवडला.
चित्रपट पाहिला नव्हता, पण " मुंगळा" हे गाणे आहे असे जर कळले असते तर नक्कीच टाळला असता ( हेलन उत्कृष्ट नर्तिका आहे यात शंका नाही परंतु स्त्री देहाचे प्रदर्शन आणि exploitation ( शोषण ) कुठल्याही कारणासाठी मला मान्य नाही).
आता मुद्दाम पाहीन असे जरी नाही तरी मुद्दाम टाळीन असेही नाही.

तो अर्क माझ्या मेंदूत फार चांगल्या प्रकारे उतरलाय कारण चित्रपट पहिल्यांदा पाहण्यात आला तेव्हा नव्यानेच नोकरीत रुजू झालो होतो आणि त्याकाळी हे असले नमकहराम, काला पत्थर, बेमिसाल वगैरे...तात्विक चित्रपट मोठ्या भक्तिभावाने पाहून त्यावर तितक्याच तावातावाने चर्चा करीत असायचो.

असो. अब न वो दिन रहे न रही वो बाते... >>

अरेरे ! वाचून खरेच वाईट वाटले.

चेतन सुभाष गुगळे Sun, 18/03/2012 - 20:38

In reply to by अज्ञात

( हेलन उत्कृष्ट नर्तिका आहे यात शंका नाही परंतु स्त्री देहाचे प्रदर्शन आणि exploitation ( शोषण ) कुठल्याही कारणासाठी मला मान्य नाही).>>

तुमचं हे मत मला पूर्णतः मान्य आहे. मी स्वतःही त्याच मताचा आहे. पण तुम्ही http://www.aisiakshare.com/node/540 हे वाचलंत का?

आता तुमचं
चित्रपट पाहिला नव्हता, पण " मुंगळा" हे गाणे आहे असे जर कळले असते तर नक्कीच टाळला असता >> हे मत बदलणार तर नाही ना?

सम्पत Wed, 22/02/2012 - 14:04

ईन्कार हा चित्रपट कुरोसावाच्या high and low चा रिमेक आहे. मुळ चित्रपट खुप सन्थ आहे. पण तरीही एकदा पहायला हरकत नाही.