Skip to main content

रेषेवरची अक्षरे दिवाळी २०११: अंक चौथा

मंडळी,

सलग चौथ्या वर्षी ’रेषेवरची अक्षरे’च्या अंकासह तुमच्या भेटीला येताना आनंद तर वाटतो आहेच, खेरीज थोडा अभिमान आणि जबाबदारीही.

इथे ’रेषेवरची अक्षरे २०११’चा अंक ब्लॉगवर आणि पीडीएफमध्येही उपलब्ध आहे.

दर वर्षीपेक्षा तिपटीनं ब्लॉग वाचूनही संकलित साहित्याचा भाग मात्र संख्येनं आणि दर्जानंही आहे तिथेच आहे, याची खंत आहेच. पण ब्लॉगरांकडून नवं काही लिहून घेण्याचा प्रयोग यंदा यशस्वी झाला आणि ’लैंगिकता आणि मी’ यासारख्या अनवट विषयावरचं साहित्य अंकात सामील करता आलं, त्याचा आनंदही आहे.

अंक वाचा, आपल्या सुहृदांना पाठवा, तुमच्या प्रतिक्रिया, तक्रारी, सूचना, सुधारणा कळवा. तुमच्या प्रतिसादाची वाट पाहतो आहोत.

तुम्हा सगळ्यांना, तुमच्या कुटुंबीयांना आणि मित्रपरिवारालाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! ही दिवाळी सुखासमाधानाची, आनंदाची आणि भरपूर सकस साहित्याची जावो...

ए सेन मॅन, ट्युलिप, मेघना, संवेद
संपादक
रेषेवरची अक्षरे
२०११

राजन बापट Wed, 26/10/2011 - 08:35

अंक वाचतो. नेहमीप्रमाणे मेजवानी असणार. मनःपूर्वक अभिनंदन.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 26/10/2011 - 08:43

अंक चाळला आहे; शांतपणे वाचण्यासाठी बुकमार्क टाकला आहे. तुम्हां सर्वांच्या मेहेनतीचे कौतुक आहे.

प्रकाश घाटपांडे Wed, 26/10/2011 - 14:52

लैंगिकता आणि मी या विशेष विभागा बद्दल अभिनंदन. उत्तम अंक झाला आहे.

अनामिक Wed, 26/10/2011 - 20:34

अंक उत्तम वाटतोय. सवड मिळेल तसा वाचेन. वर घाटपांडे म्हणतात तसेच लैंगिकता आणि मी या विशेष विभागा बद्दल अभिनंदन! काहीतरी वेगळं आणि म्हणूनच विशेष देण्याचा उपक्रम स्तुत्य आहे.

क्रेमर Wed, 26/10/2011 - 21:06

चार-पाच लेखही वाचले. काही आवडले. ब्लॉगवरील लेखन असल्याने असावे कदाचित काही लेख खूपच त्रोटक वाटले.

जालिय दिवाळी अंक काढून नेमके काय साध्य होते, हे मला अजूनही उमगलेले नाही.

मेघना भुस्कुटे Wed, 02/11/2011 - 14:29

धन्यवाद मंडळी.
ट्युलिपचा लेख नसल्याबद्दलच्या अनेक विचारणा तिच्यापर्यंत पोचवल्या आहेत.
जालीय अंक काढून काय साध्य होतं? - वेळ उत्तम जातो.

ऋषिकेश Wed, 02/11/2011 - 15:05

अंक वाचतो आहे. काहि लेख वाचले आहेत. बहुतांश लेखन आवडले आहे.
बाकी सगळा अंक वाचला की विस्ताराने प्रतिसाद देतो