अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि ऐसिअक्षरे
.
हलकट, व खरा प्रतिसाद.
तुमच्यासारख्या मठ्ठ लोकांना खरंतर उत्तर द्यायलाच नको.
डूआयडी काढून काढलेला धागाही चालू ठेवला गेला आहे यातच संस्थळाचे धोरण समजते.
ऐपत अन औकात असेल, तर आपल्या खिशाला खार लावून, अन वेळही खर्चून नवे संस्थळ काढावे, व त्या संस्थळाचा मालक अशी आयडि स्वतः तयार करावी. त्यानंतर असले दीडशहाणे धागे व प्रतिसाद द्यावेत.
"मी इथला घरमालक" अशी तोतयागिरि करणारी आयडि ब्यान करण्यात काहीच वावगे नाही. कुणा दुसर्याच्या घरात घुसून, मी या घराचा मालक अशी बोंब मारणार्या तुमच्या सारख्यांना चपलांची माळ घालून अर्धचंद्र द्यावा या मताचा मी आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य गेलं तेल लावत.
The emperor has no clothes
मराठि संकेतस्थळांवर मालक लोकांनि कितिहि आव आणला तरि मालकिचा हक्क वापरुन विरोधि आवाजांचि मुस्कटदाबि केलि जाते हे स्पष्ट झाले आहे. विचारांनि श्रेष्ठ सदस्यांनि तर वर चांगलेच सभ्यतेचे प्रदर्शन घडवले आहे. जर आयडिचे नाव आवडले नव्हते तर लगेच बदलले असते पण मालकमंडळि, त्यांचे हितसंबंध असलेले लोक यांच्या संबंधांवर, त्यांच्या कंपुवर टिप्पणि केला म्हणुनच आयडि बॅन करण्यात आला.
स्वतःचा आयडी सतत बदलत राहून,
स्वतःचा आयडी सतत बदलत राहून, 'ऐसि मालक' सारखा लोकांना फसवणारा आयडी घेऊनही हा आयडी बॅन केलेला नाही. मला त्याची सदस्याची माहिती दिसते त्यावर वर्तमानस्थिती - सक्रिय असं दिसतं. ते इतरांना अर्थातच दिसणार नाही, पण http://www.aisiakshare.com/user/1207 इथे जाऊन तो आयडी जिवंत असल्याची शहानिशा करता येईल. http://www.aisiakshare.com/user/1207/guestbook इथे त्यांची खरडवही दिसेल. मी सदस्यांना विनंती करतो की तिथे त्यांना गेट वेल सून च्या शुभेच्छा द्याव्यात.
>माझा आधिचा आयडि 'ऐसि मालक' असा होता. तो बॅन करण्यात आला. या संकेतस्थळावर प्रतिसाद उडवले जात नाहित, विरोधि आवाजांचि गळचेपि होत नाहि हे धादांत असत्य आहे.
ऐसीवर विरोधी आवाजांची गळचेपी होत नाही. यडपटपण, मूर्खपण, बालिशपणा करणाऱ्या ट्रोलांनी स्वतःचे आवाज आपसूक बंद करावे अशी मनापासून इच्छा मात्र केली जाते.
वोक्के
ओ दादा, 'ऐसि मालक' या आयडिवर आधि लॉग-इन होता येत नव्हते. आता तुम्हि हा धागा आल्यानंतर सगळं आलबेल आहे हे दाखवण्याकरता केलं असेल खातं पुन्हा सक्रिय. पण भाउसाहेब आम्हि मांडलेल्या एकाहि मुद्द्यावर - ऐसिचे फसलेले प्रयोग, श्रेणिसुविधेचा गैरवापर, कंपुबाजि, छुपा जातियवाद - तुम्हि भाष्य केलेले नाहि. अपेक्षाहि नाहि. वर काहि सदस्यांनि ज्या भाषेत प्रतिसाद दिलेले आहेत त्यांना मार्मिकतेचे मिळालेले बक्षिस यावरुन या संकेतस्थळावर मला तरि रहावेसे वाटत नाहि. ते असो.
ऐसीवर विरोधी आवाजांची गळचेपी होत नाही. यडपटपण, मूर्खपण, बालिशपणा करणाऱ्या ट्रोलांनी स्वतःचे आवाज आपसूक बंद करावे अशी मनापासून इच्छा मात्र केली जाते.
तुम्हि पैसे-श्रम घालुन हे संस्थळ काढले आहे. तुम्हाला वरचि विधाने खरि वाटतात. तुम्हि आनंदात रहा. रामराम.
ऐसीवर विरोधी आवाजांची गळचेपी
ऐसीवर विरोधी आवाजांची गळचेपी होत नाही. यडपटपण, मूर्खपण, बालिशपणा करणाऱ्या ट्रोलांनी स्वतःचे आवाज आपसूक बंद करावे अशी मनापासून इच्छा मात्र केली जाते.
या संकेतस्थळावर मला तरि रहावेसे वाटत नाहि.
रामराम.
काय राव, असे निघून चाललात... माझ्या हृदयाला घरं पडली की तुमच्या या वागण्यामुळे. 'निंदकाचे घर असावे शेजारी' म्हणतात त्याप्रमाणे काही निंदक ऐसीवरच घर करून असलेले आवडले असते. पण शेवटी कुठे काय लिहायचं, कुठे कसं वागायचं ही तुमची मर्जी. एकाच वेळी आमची मनापासूनची इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद आणि त्याचबरोबर एक खंदा आणि वाचाळ (व्होकल या अर्थाने) विरोधक गमावल्याचं दुःख - अशा द्विधा, भावनेने भारलेल्या मनाने मी हे लिहितो आहे. हे लिहिताना माझं हृदय एकाच वेळी दगडासारखं जड होऊन खाली पोटात सरकण्याच्या बेतात आहे, तर दुसऱ्या बाजूने बाटली हलवलेल्या कोकप्रमाणे झाकण उघडल्यावर ओसंडून वाहण्याच्या बेतात आहे.
पण या मनाच्या द्विधा अवस्थेत अजूनही एक हुरहूर आहे. एक आशा आहे. की कधीतरी आपली भेट होईल पुन्हा कदाचित. आशेच्या शृंखलेने बांधलं गेल्यावर खात्रीच पटते कधीकधी. मी ऐल तिरावर, तुम्ही पैल तिरावर... निदान नजरगाठ तरी होईल. कदाचित तुमचा आयडी तेव्हा वेगळाच असेल. पण हरकत नाही. 'नाम भूल जायेगा, चेहरा ये बदल जायेगा, तेरी आवाज तो पेहचान है....' या न्यायाने सर्व ऱ्हस्व किंवा सर्व दीर्घ कुठेतरी दिसतील... स्वरातला तो त्रागा आणि ती तक्रार कुठेतरी जाणवेल... आणि हे जुने ऋणानुबंध पुन्हा उसळून येतील.
जुन्या ऐसि मालकाला खऱ्या ऐसी मालकाकडून एक कडक लाल सलाम!
'जा गड्या जा तुझ्या घरी तू सुखी रहा....'
'अलविदा... अलविदा.... अलविदा....' (हे लता मंगेशकरच्या स्वरात...)

हम्म. आयला 1 तासभर बी झाला
हम्म.
आयला 1 तासभर बी झाला नाय तुमाला आयडी घेऊन .लगेच अभिस्व चे प्रश्न पडले.
तुमी डुआयडी हायत का? खर सांगा आपुन डुआयडी लगेच हुडकतो बरका.