Skip to main content

मुंज-संस्कार की वैचारिक दिवाळखोरी?

मुलाच्या मुंजीचे निमंत्रण करायला एक जोडपे आले होते. ते पिकनिक ला निघालेयत कि काय असे वाटले. मुलाचा बाप ३/४ विजार - टी शर्ट तर आई फोर्मल शर्ट -ट्राउझर
मुंजीचे निमंत्रण मिळाले
निघता निघता बापाने अजून एक निमंत्रण दिले. मुंजीच्या दिवशीच संध्याकाळी कुठल्याश्या पब ला अमुक रंगाचे कपडे घालून ये, इ
थोडक्यात मुलाच्या आयुष्यातील पहिली संध्या, आचमने तो करणार आणि आम्ही इकडे पब मध्ये आचमने करणार!!
मान्य आहे. खरोखर देशी-विदेशी मित्र येणार आहेत … पण म्हणून हे असे??

..परवाच एका NRI जोडप्याने पुण्यात येऊन मुलांच्या मुंजीचा असाच घाट घातला होता .......मुंज ईतर सोहळे उत्तम पारंपारिक वेशात ......अन भिक्षावळीच्या वेळी मुंज मुलांच्या आईची आणि ईतर महिला नातेवाईकांची "खिट्टी" सटकली ब्यांड वाल्यांना खास फर्माईश ......मला जाऊ द्या ना घरी वाजले कि बारा ......मुंगळा .......या वर कहर.......चिकनी चमेली .......सगळा ब्रह्मवर्ग नऊवारी साड्या ....पारंपारिक वेशात रस्त्यावर धिंगाणा घालत होता .......पैसे ओवाळून टाकत होता .....दुसऱ्या दिवशी चक्क कॉकटेल पार्टी .......इथे त्या कुटुंबाची उपजात सांगायचा मोह टाळत आहे याची नम्र नोंद असावी

आई-बाबा, वडलांचे भाऊ, मित्र त्यांच्या बायाकांसाहित ३१ डिसे ला संध्याकाळी घरी येतात, सारेच यथेच्छ दारू पिउन तंगड्या तोडत पहाटे ३ -४ पर्यंत दंगा चालू असतो …. मग १० - ११ पर्यंत उठून पुन्हा बिअर प्यायला चालू करतात आणि बाहेरून पुन्हा खाणे मागवून १ च्या रात्रीपर्यंत हे चालू असते --- हे जो मुलगा बघत असेल त्याला कशाचे काय वाटणार आहे?
वरील दोनही अनुभव हे वेगवेगळ्या , मराठी ब्राह्मण घरातील आहेत

आई-बापावरच असले संस्कार तर काय पुढे काय होणार? असली लोकं "मुंज" नावाचा विधी करायच्या भानगडीत पडतातच कशाला ? साधे get - together आहे म्हणायचे , त्यात येणाऱ्या नी अमुक रंगाचे कशाला कपडे न घालता आले तरी चालेल म्हणून सांगायचे ! ज्यांच्या घरी देशी - विदेशी मद्याने भरलेले बार आहेत, ग्रिल करण्यासाठी अगदी लाखभर खर्चून संयंत्र आणले आहे. त्यावर चिकन तंदुरी किती छान होते, कुठूनसा कुठला मासा आम्ही कोल्ड स्टोरेज करून कसा आणला आणि भरून खाल्ला ह्याची वर्णने ऐकायला मिळतात तिथे "गायत्री मंत्र" हे शब्द तरी माहित असतील का??

संपादित /आधारित -स्रोत- अन्यत्र

राही Sun, 27/04/2014 - 12:50

ज्यांच्या घरी देशी - विदेशी मद्याने भरलेले बार आहेत, ग्रिल करण्यासाठी अगदी लाखभर खर्चून संयंत्र आणले आहे. त्यावर चिकन तंदुरी किती छान होते, कुठूनसा कुठला मासा आम्ही कोल्ड स्टोरेज करून कसा आणला आणि भरून खाल्ला ह्याची वर्णने ऐकायला मिळतात तिथे "गायत्री मंत्र" हे शब्द तरी माहित असतील का??
'गायत्री मंत्र' आणि उपरोल्लेखित गोष्टी एकत्र राहू शकत नाहीत काय? त्यांनी तसे राहू नये काय? गायत्री मंत्राची माहिती असण्यासाठी उपरोल्लेखित गोष्टी न करणे ही प्री-कंडिशन आहे काय? का? केव्हापासून?
समजा, बीअरचे घोट घेता घेता एखाद्याला गायत्री मंत्र आठवला, (शुक्राचार्यांच्या पोटात कचाची राख गेल्यावर त्यांना संजीवनी मंत्र आपोआप आठवू लागला आणि तो मंत्र आपले कामही करू लागला, तसेच ) तर त्याने काय करावे?
नऊवारी साड्या नेसून नाचणे हे बरे दिसत नाही आणि आमंत्रणाला ट्राव़्ज़र-थ्री-फोर्थमधे येणे बरे दिसत नाही. तर मग या दोन्ही प्रसंगांतल्या वेषांची अदलाबदल व्हावी का? म्हणजे आमंत्रणाला नऊवारी साड्या आणि नाचताना थ्री-फोर्थ वगैरे?

गब्बर सिंग Sun, 27/04/2014 - 13:54

वैचारिक दिवाळखोरी म्हंजे नेमके काय त्याची तुमची व्याख्या सांगा म्हंजे -

१) तुमची व्याख्या बरोबर की चूक ते सांगतो.
२) ह्या कार्यक्रमास वैचारिक दिवाळखोरी असे संबोधित करणे ही वैचारिक दिवाळखोरी आहे की नाही ते सांगतो.

नगरीनिरंजन Sun, 27/04/2014 - 14:33

पूर्वी मुंज झाली की गुरुकुलात जायचे ना म्हणे?
आता जात नाहीत तरी मुंज करतात हा अगदी वैचारिक दिवाळखोरपणा नाही तरी अनावश्यक सोपस्कार म्हणता येईल असे वाटते.

तिरशिंगराव Sun, 27/04/2014 - 15:03

समजा, अगदी पारंपारिक वेषात येऊन आमंत्रण दिले मुंजीचे, तरी त्यांच्या घरातील जे वातावरण आहे त्याप्रमाणेच मुलावर संस्कार होणार आहेत. बौद्धिक दिवाळखोरीपेक्षा मुंज हा कालबाह्य अनावश्यक समारंभ आहे. पण हे झाले माझे मत. त्यानिमित्ताने जर कुणाला धमाल करुन घ्यायची असेल तर करु देत ना!
ज्यांच्या घरांत दारुचे पाट वहात आहेत आणि सामिष भोजनाशिवाय ज्यांचे पान हलत नाही त्यांच्या घरांतली सगळीच पुढची पिढी वाया जाणार असे सरसकटीकरण करता येणार नाही. दारुड्या बापाच्या वागणुकीचा वीट येऊन आयुष्यभर दारुला स्पर्शही न करणारे कित्येक असतात.
गायत्री मंत्राचीही उपयुक्तता काय हा सुद्धा एक स्वतंत्र वादाचा मुद्दा होऊ शकतो. आपल्याभोवतीचे जग जर प्रचंड वेगाने बदलत असेल तर आपणही त्यानुसार बदलले पाहिजे, कमीतकमी ते चालवून घेतले पाहिजे, या निष्कर्षाप्रती या आयुष्याच्या संध्याकाळी मी आलो आहे.

मी Tue, 29/04/2014 - 12:23

In reply to by उडन खटोला

संस्थळाच्या ट्यार्पीला मग कसल्या धाग्यांची गरज आहे?

इथल्या तिरप्या प्रतिसादांचा अभ्यास कमी पडतो आहे.

इथे नक्की अ‍ॅडमिन कोण आहे ते कळेल का?

जवळपास सर्वच धाग्यांवर वैयक्तिक टिप्पणी चालु करा, मोदींची भलावण करा, लवकरच तुम्हाला अ‍ॅडमिन कोण ते कळून येईल.

मन Wed, 30/04/2014 - 15:57

In reply to by मी

थुत त्या उडन खटोल्याच्या.
थुत त्या "मी" नावाच्या आय डी च्या.

हा वैयक्तिक वळणाचा प्रतिसाद देउनही अ‍ॅडमिन कोण हे अजूनही समजले नाही.

अस्वल Sun, 27/04/2014 - 21:22

मुंज-संस्कार हीच वैचारिक दिवाळखोरी, असं म्हणायचंय का ?

असं बघा , अगदी असेच विचार कोणी इसवीसनपूर्व २०० मध्ये मांडत असता तर तो काय म्हणाला असता ?
"काय हे लोक? वल्कलं नेसायचं सोडून चक्क धोतर आणि नउवारी नेसताहेत! आणि सोमरस पितापिता गायत्री मंत्र म्हणत आहेत.काय चाललंय काय? काय खायचं ते खा प्या पण त्याबरोबर यज्ञयाग तरी करू नका…. इ.इ."

टीपः उच्च दर्जाचे संस्कार आणि पोशाख, श्लोक म्हणणे यांचा काय संबंध आहे याची साग्रसंगीत माहिती हवी असल्यास सनातन प्रभातचे अंक उपलब्ध आहेतच.

घनु Mon, 28/04/2014 - 14:21

मुळात आपल्या मुलाची मुंज का करायची, त्याची खरंच गरज आहे का? (म्हणजे प्रॅक्टिकली) हे आई-वडिलांनी जाणून घेतलं पाहिजे आणि ते पटलं (मुलाच्या आई-बाबांना) तरच त्यांनी त्या विधीचे सोपस्कार करावेत. मग तो विधी कसा पार पाडतात ही ज्याची त्याची मर्जी आणि हौस, असं माझं वैयक्तिक मत.

पण उगीच अमक्याच्या मुलाची मुंज भारी हॉल मधे झाली आणि त्या आमक्याच्या बायकोने ही साडी नेसली नी ते दागिने घातले, आणि असंच जेवण होतं मग म्हणून आता आपल्या मुलाची मुंज ही अशीच थाटात करायची (किंवा अगदी अमकिच्या नकावर 'टीचून' अजून भारी करायची) हे असले विचार त्यामागे असतील तर ते चूक की बरोबर हे सांगणं कठीण पण जेव्हा मुलाचा वापर अश्याप्रकारची इर्षा शमवण्यासाठी किंवा स्वतःला मिरवण्यासाठी करतात तेव्हा ती परिस्थिती दयनीय वाटते.

मी फार मुजीं अटेंड केल्या नाहियेत पण ज्या मोजक्या केल्या (कराव्या लागल्या) त्यामधे मुंजा पेंगाळलेला, वैतागलेला आणि हे सगळं काय चाललय ह्या पासून अतिशय अनभिज्ञ आणि 'बिचारा' वाटला - आणि मुलाचे बाबा पुजा चालू असतांना (म्हणजे ते स्वतः पु़जेला बसलेले असतांना) येणार्‍या लोकांकडे नजर ठेवून हात वगैरे करताहेत - जेवून जा अश्या खुणा करताहेत, इथे बसा-तिथे बसा असे इशारे करताहेत मधेच कुणालातरी पाकिटातून पैसे काढून देताहेत आणि दुसरी कडे आईचंही असंच काहीसं, घातलेले दागिने जपण्यात - नथ सारखी बाजूला सारण्यात, वाक्या चार-चार वेळा सेट करण्यात- दंडावरच्या टॅटूला तर घासले जात नाहीत ना, पदाराचे काठ असे उठून दिसताहेत की नाही ह्याची खात्री करण्यात (ओ मा अता एवढी पैठणी घेतली तर काठ नको का दिसायला, पिव्वर पैठणी आहे म्हटलं) मधेच पायाकडे लक्ष गेलं की अपर्‍या नव-वारीतून पाय लपवण्यात (शीट, ह्या धावपळीत मेलं ते पेडीक्यूअर राहिलंच) मग मधेच ताई-माई अक्केला बोलावून जरा चेहर्‍यावरचा घाम टिपायला सांगण्यात (आता, 'स्वाहा' करायला ह्यांच्या हताला हात लावलेत की, घाम कसा टीपणार मग... ? एक ईंच मेक-अप चे ओघळ येतील ना घाम नाही टिपला तर). ह्या सगळ्यात ते मुल बिचारं रडकुंडी येऊन विचारतं 'व्हेअर इज मुंज ममा?' ... आणि आई म्हणते 'ओह, दॅट्स व्हाट गोईंग ऑन ना बेटा... यू जस्ट कीप स्माईलींग फेस बरं...' :(

ॲमी Mon, 28/04/2014 - 14:38

In reply to by घनु

=)) काय निरीक्षण आहे! काय निरीक्षण आहे! मान गये _/\_
बादवे ओघवता प्रतिसाद दिलाय. आवडला. लिहीता येतं बरं का तुला.

सलील Mon, 28/04/2014 - 16:10

In reply to by घनु

बाकी बऱ्याच ठिकाणी बाकीच्यांनी भारी मुंज केली तशी आपली झाली पाहिजेल हाच नूर जास्त दिसला. ते चित्रावती आणि संध्या वगैरे फार महत्वाचे नाही. बहुदा राजरोसपणे वरात काढून नाचायला मिळते हाच काय तो आकर्षणबिंदू आहे असे वाटते मला. भरपूर प्रेशर येवून अजूनही मी मुलांची मुंज करणार नाही असे सांगितले तेंव्हा वरील करणे आईकायला मिळाली. त्यामुळे संस्कृतीशी किती संबंध आहे हा प्रश्नच येत नाही. मुंज हल्ली अजून एक पार्टी टाईम असे माझे मत झाले.

घनु Mon, 28/04/2014 - 17:47

In reply to by सलील

मुंज हल्ली अजून एक पार्टी टाईम असे माझे मत झाले.

सहमत. आणि असेनाका एखादा सोहळा पार्टी स्वरूपाचा, पार्टी करण्याचे बहाणे लागतातच लोकांना आणि चांगलच आहे जर त्या निमित्ताने लोक एकत्र येत असतील, मजा करत असतील पण ब़हाणा म्हणून मुलांचा असा वापर किंवा कारण पुढे करत असतील तर फार वाईटच नाही तर विक्षिप्त वाटतं ते एकंदरीत.

अजुन एक मुद्दा थोडा वेगळा आहे पण माझे मत लहान मुलांच्या पहिल्या "थाटामाटात" होणार्‍या वाढदिवसाबद्दल ही असेच काही आहे. फार कमी ठिकाणी असं पहायला मिळतं की मुलं रडत नसतात. नाहीतर अश्या वाढदिवसांमधे मुलाचं कर्कश्श रडणं, त्यांचे सतरा कपडे बदलणे, केक कटींग चा गोंधळ, पाहुण्यांचा कलकलाट, शो-ऑफ म्हणून लावलेले डि.जे. त्यात त्या एवढ्या मोठ्या केक् वरच्या जळत्या असंख्य मेणबत्त्या, लोकांचं अघोरी नि फाटक्या आवाजातलं 'हाप्पी बड्डे टू यू' चं (रड)गाणं, आई-बाबांचा मुलाला सुरी पकडून ठेवण्याचा हट्ट(फोटोग्राफर प्रसन्न होत नाही तो पर्यंत), मुलाच्या नरड्यात केक कोंबण्याची चढा-ओढ, बाहेर लगेच फटाके, अगदी फटाके नसले तरी आज काल मिळतात ते हॉर्न्स, फुगे फोडून त्यातून काय ते चमकी पाडणं, ते पांढरं फेस होणारं काय तो प्रकार... हे सगळं एक वर्षाच्या मुला/मुली साठी???? अरे, त्याचा वाढदिवस आहे की त्याला हॅलोविन म्हणजे काय हे सांगताय???
थोडक्यात तेच, मुलाचा वाढदिवस हे केवळ निमित्त बाकी "पार्टी तो बंती है" :) :(

सलील Mon, 28/04/2014 - 17:54

In reply to by घनु

ह्यात बहुदा पालकांनाच जास्त हौस असते. मला अजूनही हे वाढदिवसाच्या इतके का अवडंबर माजवले जाते ते काही कळत नाही. बहुदा पूर्वीच्या काही प्रथा जावून हल्ली एकत्र येण्याची एक नवी प्रथा असेही असू शकेल. पण एकंदर ज्या पद्दतीने त्याचे सगळे अवडंबर माजवले जाते ते पाहून अंमळ गम्मत वाटते. ह्यात पुन्हा खास भारतीय प्रकार म्हणजे लहान मुलांच्या पार्टीला मोठेच जास्त ऐटीत असतात. पाश्चत्य देशात गोरी लोक आपल्या मुलांना पार्टीच्या ठिकाणी सोडतात आणि संपताना घ्यायला येतात. ह्याउलट भारतीय पालक कितीही मोठ मुल झाले तरी हक्कानी येतात. त्यामुळे मुलांची गम्मत कमी होते असे नाही पण हां जाणवणार फरक मला दिसला.

स्नेहल Mon, 28/04/2014 - 16:39

मला वाट्तं, मुंज हा सोळा संस्कारांपैकी एक आहे आणि तो त्याच पद्धतीने व्हायला हवा. प्रत्येक गोश्टी मधे अवचित्य साधता आलं पाहिजे. डोक्यात विचारांनची सरमिसळ नसेल तर हे साधता येतं. ज्याचि मुंज आहे त्याला मुंजिचा नेमका अर्थ त्याला समजेल अश्या भाशेत त्याच्या आइवडिलांनि सांगायला हवा म्हण्जे मुलगा स्वत:चि मुंज पण छान एन्जोय करेल, आणि मोठा झाल्यावर कोकटेल पार्टी एन्जोय करताना मुंज झाल्याची त्याला लाज वाटणार नाही. कोकटेल पर्टी पण वाइट नाही पण ती मुंजिच्या दिवशी संध्याकाळी च केली पाहिजे हे चुकीचं आहे. मी स्वतः मराठी ब्राह्मण घरातली आहे, नविन गोश्टि अवडणारी आहे पण जे लोक आर्वजुन अगदी सणावाराला च नोन-व्हेज खाण्यात धन्यता मानतात किंवा मुंजी सारख्या गोश्टि अश्या उरकुन टाकतात त्यांची मला किव येते.

सोकाजीरावत्रिलोकेकर Mon, 28/04/2014 - 17:41

In reply to by स्नेहल

कोकटेल पर्टी पण वाइट नाही पण ती मुंजिच्या दिवशी संध्याकाळी च केली पाहिजे हे चुकीचं आहे

'चुक असणे' हे वैयक्तिक मत आहे असे मानण्यास प्रत्यवाय नसावा.

- (वैयक्तिक मते असलेला) सोकाजी

बॅटमॅन Mon, 28/04/2014 - 17:42

In reply to by स्नेहल

हा प्रतिसाद कुणाला पटेल न पटेल पण यात विनोदी काय आहे ते कुणी सांगेल काय?

(आमच्या प्रतिसादालाही आवडती 'विनोदी', 'निरर्थक', इ. द्या. प्लीज़ हां.)

नितिन थत्ते Mon, 28/04/2014 - 17:51

In reply to by स्नेहल

>>मी स्वतः मराठी ब्राह्मण घरातली आहे, नविन गोश्टि अवडणारी आहे पण जे लोक आर्वजुन अगदी सणावाराला च नोन-व्हेज खाण्यात धन्यता मानतात

आवर्जून नक्कीच नाही पण आमच्याकडे नेमके गुरुवारी नाश्त्याला ऑम्लेट बनवले जाण्याचा योगायोग अनेकवेळा येतो. (आमच्याकडे काम करणार्‍या अब्राह्मण बै आम्हाला त्याबद्दल आवर्जून टोकतात).

केतकी आकडे Mon, 28/04/2014 - 18:12

In reply to by स्नेहल

सोळा संस्कार वगैरे ओके, पण पूर्वी या प्रथेचा जो संदर्भ होता, तो आता राहिलाय का? गुरुकडे शिक्षणासाठी पाठवताना मुंज करत असत, आत्ताच्या मुलांचं शिक्षण वयाच्या दोन-अडीचाव्या वर्षी सुरु होतं. पूर्वी मुलींना शिकवत नसत, आता बहुतेककरुन असा भेदभाव होत नाही. मग मुलांचीच का करावी फक्त मुंज? किती लोक मुलींच्या सुद्धा करतात मुंजी? (इथे स्त्रीवाद वगैरे मुद्द्यांवर अज्जिबात रोख नाहीये)

बॅटमॅन Mon, 28/04/2014 - 18:19

In reply to by केतकी आकडे

संदर्भ न राहिला तरी धर्मकर्म थोडे तरी करावे असे मानणारे लोक आहेत ते करतात एवढंच. मुंज करणार्‍या अ‍ॅव्हरेज कुटुंबात असा आवर्जून विचार होत असेल असं वाटत नाही. अन तसेही, आचारस्वातंत्र्य इ. आहेच.

अवांतरः हाच मुद्दा राखीबद्दलही इथेच चर्चिला गेला होता. त्यामागचा जो कै संकेत असेल तो राहिला नै म्हणून तो सण कशाला साजरा करावा या आणि त्यासोबत अनेक मुद्यांचा परामर्श घेतला गेला पण शेवटी त्याची परिणती रक्षाबंधन साजरे करणारांवर शेरेबाजी करूनच झाली.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 28/04/2014 - 21:21

In reply to by बॅटमॅन

शेवटी त्याची परिणती रक्षाबंधन साजरे करणारांवर शेरेबाजी करूनच झाली.

अशा एखाद्या(तरी) प्रतिसादाचा दुवा?

बॅटमॅन Mon, 28/04/2014 - 22:10

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

धागा पहा, कळून येईल-कळून घ्यायचे असेल तर.

आणि हो, सेकंड सेक्स वाचल्यास सर्व प्रश्नांचे उत्तर मिळेल हेवेसांनल.

अतिशहाणा Mon, 28/04/2014 - 18:24

मी अद्याप एकही मुंज 'अटेंड' केलेली नाही. त्यामुळे या प्रकाराबाबत केवळ ऐकून आहे.

१. माझ्या नातेवाईकांमध्ये-मित्रांमध्ये मुंज हा प्रकार अस्तित्वात नाही.
२. काही ओळखीच्या लोकांमध्ये असे करतात असे ऐकून माहीत आहे मात्र त्यांनी कधी (मुंजेस व मुंजीनिमित्त भोजनास या असे) निमंत्रण दिले नाही.

चिंतातुर जंतू Tue, 29/04/2014 - 11:25

कोणे एके काळी यज्ञात पशुबळी देऊन नंतर त्याचा सोमरसासहित साग्रसंगीत चट्टामट्टा करत असत म्हणे. म्हणजे हा 'बॅक टू द रूट्स'चा प्रकार झाला की.
स्वगत : जेव्हा हिंदुस्तानचा गुजरात होईल तेव्हा हे लोक काय करतील? ;-)

बॅटमॅन Tue, 29/04/2014 - 12:21

In reply to by चिंतातुर जंतू

जेव्हा हिंदुस्तानचा गुजरात होईल तेव्हा हे लोक काय करतील?

पिष्टपशु करून त्यांचे भक्षण करतील, हाकानाका. कैक यज्ञांत तसे केले जायचे असे शेजवलकर लेखसंग्रहात नमूद आहे.

सोकाजीरावत्रिलोकेकर Tue, 29/04/2014 - 12:24

In reply to by बॅटमॅन

पिष्टपशु करून त्यांचे भक्षण करतील

पण तो धष्टपुष्ट असेल काय?

- (पशुभक्षी) सोकाजी

बॅटमॅन Tue, 29/04/2014 - 12:26

In reply to by सोकाजीरावत्रिलोकेकर

का नाही? पशु पाहिजे तेवढ्या साईझचा करा अन वडा, हाकानाका.

'ओढा' चे अस्सल दक्षिणमहाराष्ट्रीय रूप.

बॅटमॅन Tue, 29/04/2014 - 16:22

In reply to by 'न'वी बाजू

पियूष म्ह. तेच ना ते श्रीखंडाची भांडी दुधाने साफ केल्यावर तयार होते ते पेय?

नको ते नको. मठ्ठाच चांगला आहे.

मट्ठा हा उच्चार असला तरी मठ्ठा असे लिहिण्याची पद्धत आहे.

'न'वी बाजू Tue, 29/04/2014 - 16:57

In reply to by बॅटमॅन

पियूष म्ह. तेच ना ते श्रीखंडाची भांडी दुधाने साफ केल्यावर तयार होते ते पेय?

पिसाळलेले पु.ल. चावले काय हो तुम्हाला? ;)

अजो१२३ Tue, 29/04/2014 - 13:46

परवा पुण्याला गेलो होतो तेव्हा भावांच्या मुलांच्या मुंजीचा विषय निघाला होता.
मी आईला विचारलं- "आई माझी मुंज झालीय का गं?"
आई चिडून म्हणाली - "मेल्या, जिभेला काही हाड तुझ्या? लग्न झालंय, एक मुल झालंय नि मुंज झालीय का म्हणून विचारतोस"

शेवटी तिने मला तो न आवडलेल्या हेअर कटींगचा दिवस आठवणीत आणून दिला.

मन Tue, 29/04/2014 - 13:53

In reply to by अजो१२३

अस्साच एक अमेरिकन ज्योक ऐकला होता.
भारत आणि अमेरिकेन संस्कृतीत काय फरक आहे ?
भारतात मूल विचारते :-
"डॅडी, तुम्ही माझी मुंज कधी करणार आहात?"

अमेरिकेत मूल विचारते :-
"डॅडी , तुम्ही लग्न कधी करणार आहात ?"

;)

बॅटमॅन Tue, 29/04/2014 - 16:23

In reply to by चिंतातुर जंतू

याच लायनीत, दोज हू रिमेंबर पास्ट आर कण्डेम्न्ड टु सी अदर्स रिपीटिंग इट असाही एक कोट वाचल्याचे स्मरते. कर्ता विसरलो.

पण या केसमध्ये रिलेव्हन्स समजला नाही. असो.

बॅटमॅन Tue, 29/04/2014 - 21:50

In reply to by अजो१२३

म्हंजे मुंजीचा इतिहास एट ऑल तुम्हांला माहिती नै म्हणून तुम्ही ते करणार, आणि माहिती असता तर केली नसती असे???

तुम्ही तुमच्या मुलाची मुंज करणार की नाही, यासाठी मुंजेतिहास तुम्हांस ठाऊक असणे हा प्रीरेक्विसिट कितपत आहे??? ऑळमोष्ट नै असे मत आहे.

प्रीरेक्विसिट आहे असे वाटत असेल तर मात्र लैच मोठा "ळॉळ" आहे. असो.

राजन बापट Tue, 29/04/2014 - 22:25

इथे मुंजीबद्दलची मजेशीर आणि उद्बोधक चर्चा वाचली.

मुलग्यांची मुंज या Rite of Passage च्या परिस्थितीला पालक म्हणून आम्ही सामोरे गेलो. अनेक मतामतांच्या गलबल्यातली आमची निवड अशी होती
मुंज का केली ? :

मी नास्तिक आहे. बायकोचं माहिती नाही पण धार्मिक संस्कार ती करीत नाही. देवळात वर्षांतून एखाद दोन वेळा आम्ही मुलांना घेऊन जातो. या सर्व परिस्थितीमधे मुंज या गोष्टीचं मला नि बहुतांश प्रमाणात बायकोलाही महत्व नव्हतं. माझे नि बायकोचे आईवडील, नातेवाईक यांची, आमच्या मुलांच्या मुंजी व्हाव्यात अशी इच्छा होती. मात्र केवळ "त्यांच्या इच्छेला मान देऊन आम्ही तत्वांना मुरड घातली" असं म्हणता येत नाही. त्यांच्या भावनांना मान दिला हे खरं आहे. पण मुंजीला अगदी हमरीतुमरीवर येऊन विरोध करायचा होता असं काही नाही. थोडक्यात, माझी मुंज झाली नसती तर आमच्या आईवडलांच्या पीढीमधे त्यांच्या वाडवडील नातेवाईकांनी त्यांचं जिणं नकोसं केलं असतं तसं आमच्या बाबत होणार नव्हतं. मात्र या प्रसंगामुळे आमचे आईवडील आनंदी बनले. आणि हे करताना आपण काहीतरी भयानक कृत्य करत आहोत असं वाटलं नाही.

मुंज कशी केली :
"हसत खेळत" असं थोडक्यात उत्तर देता येईल. मुलं किंवा आम्ही आईवडील यांनी सोवळं वगैरे प्रकार केले नाहीत. छानछोकीचे कपडे घातले. मुंजसंस्कार दोनेक तासात आटपावा असा "टेलरमेड" होता. (हे नेमकं कसं ते माहिती नाही. ते जाणून घ्यायची इच्छा नव्हती.) मुलांचे केस कापले नाहीत. आजी आजोबा आमच्या अवतीभवती बसले होते. त्यांच्या चेहर्‍यावर स्मितहास्ये होती. इतकंच आठवतं. नातेवाईकांना बोलावणं केलं होतं. त्यांच्याबरोबर पंक्तीतलं खाणंपिणं आणि मौजमज्जा यात वेळ उत्तम गेला. मित्रमंडळ खरं तर मोठं आहे परंतु जवळजवळ कुठल्याच मित्रमैत्रिणीला धार्मिक संस्कारांचं महत्त्व नाही त्यामुळे त्यांना या प्रसंगी बोलावलं नाही. वरात, म्युझिक डान्स वगैरे गोष्टींना विरोध नव्हता परंतु ते व्हायला पाहिजे असं आम्हा पालकांना , मुंजीच्या बटुंना किंवा नातेवाईकांपैकी कुणाला वाटलं नाही. म्हणून ते केलं नाही. तोच प्रकार मांसाहार नि दारूचा. नातेवाईकांपैकी कुणाची तशी इच्छा नव्हती त्यामुळे आम्ही तो घोळ घातला नाही.

एकंदर हसतखेळत म्हण्टलं तर संस्कृत मंत्रांसहित हा सोहळा पार पाडला. त्यातून आनंद मिळाला. जो खर्च झाला तो प्रचंड होता असं वाटलं नाही (पण हे अर्थातच सब्जेक्टिव्ह आहे. लाख रुपये कुणाला भारी होतील. कुणाकरता अर्ध्या दिवसाचा रोजचा खर्च असेल. ) ध्वनिप्रदूषण, अन्नाची नासाडी, कुणाच्या स्पेसवर अधिक्रमण झालं असं वाटलं नाही. इत्यलम् :)

राजन बापट Tue, 29/04/2014 - 22:43

In reply to by नितिन थत्ते

>>>बर्‍याचदा कुणातरी मोठ्यांना बरं वाटावं म्हणून कै च्या कै कॉम्प्रोमाइज करायला लागतात. Sad

>>> त्यांच्या भावनांना मान दिला हे खरं आहे. पण मुंजीला अगदी हमरीतुमरीवर येऊन विरोध करायचा होता असं काही नाही. थोडक्यात, माझी मुंज झाली नसती तर आमच्या आईवडलांच्या पीढीमधे त्यांच्या वाडवडील नातेवाईकांनी त्यांचं जिणं नकोसं केलं असतं तसं आमच्या बाबत होणार नव्हतं. मात्र या प्रसंगामुळे आमचे आईवडील आनंदी बनले. आणि हे करताना आपण काहीतरी भयानक कृत्य करत आहोत असं वाटलं नाही.

नितिन थत्ते Wed, 30/04/2014 - 10:25

In reply to by राजन बापट

तुम्हाला हमरीतुमरीवर येऊन विरोध करायचा नव्हता हे खरे पण याचाच अर्थ केवळ त्यांची इच्छा म्हणून तुम्हाला तुमच्या मुलाची मुंज करावीच लागली.

तुमच्या मुलाची मुंज व्हायलाच पाहिजे अशी त्यांची* इच्छा तरी का असावी ? ती इच्छा त्यांनी बोलून का दाखवावी ? 'या प्रसंगामुळे आमचे आईवडील आनंदी बनले' असे का असावे? मुंज केली नाही म्हणून त्यांनी दु:खी का व्हावे ?

लै त्रास होतो राव....

*यात तुमच्या आईवडिलांना नावे ठेवण्याचा / कमी लेखण्याचा हेतू नाही. हे माझ्या काही नातेवाईकांच्याबद्दल आहे असे समजा.

माझ्या एका काकूच्या इच्छेसाठी आमच्या मूळ गावाला (जिथे मी गेल्या तीसएक वर्षांत गेलो नव्हतो) जाऊन तिथल्या ग्रामदेवतेची ओटी भरणे वगैरे (प्रचंड मनाबिरुद्ध- मानसिक बलात्कारी) कार्यक्रम केले. आता मी आमच्या कुलदैवताला जाऊन अभिषेक करावा असा धोषा तिने लावला होता. त्याला मी स्पष्ट नकार दिला आहे.

अजो१२३ Wed, 30/04/2014 - 10:51

In reply to by नितिन थत्ते

१. तुम्ही काहीही शहाणपणा/मूर्खपणा कराल, असला विक्षिप्तपणा म्हणजे अभिव्यक्तिस्वातंत्र्य?
नि घरच्या लोकांनी एखादी गोष्ट सांगीतली तर तो बलात्कार?

२. उदाहरण द्यायचे झाले तर कायद्याने, विधिवत, इ लग्न करणे इष्ट म्हणून तुम्ही (समजा कुणा जवळच्याला) लिवइनवाल्याला धोषा लावणार. (संदर्भ - आत्ताचाच एक धागा) नि त्याच वेळी कुणी तुम्हाला कुठे अभिषेक करा धोषा लावला तर त्रास होणार. समान परिस्थिती समजा.

जरा फरक सांगाल का? त्रास का होतो? धोषा कशाचा (कोनत्या तत्त्वावर लावावा), कोणाला, कोनाला नाही, इ इ

(आपले विपरित भोमिका घेताना समीकरण चांगलेच राहते, तेव्हा दिलखुलास उत्तर द्या.)

नितिन थत्ते Wed, 30/04/2014 - 10:56

In reply to by अजो१२३

>>उदाहरण द्यायचे झाले तर कायद्याने, विधिवत, इ लग्न करणे इष्ट म्हणून तुम्ही.....

सगळे पॉइंट, हक्क, जबाबदार्‍या लिव्ह-इन वाल्यांना लग्नासारख्याच हव्या आहेत म्हणून आहे तोच कायदा का नको असा प्रश्न विचारला. पुरुषांनी तिकीट काढावे आणि स्त्रियांनी तिकीट काढावे असे दोन कायदे कशाला? एकच कायदा असावा.

मी "विधिवत" लग्न करण्याचा सल्ला कधीच दिलेला नाही हे निदर्शनास आणून देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. :)

मन Wed, 30/04/2014 - 11:50

In reply to by नितिन थत्ते

माझ्या एका काकूच्या इच्छेसाठी आमच्या मूळ गावाला (जिथे मी गेल्या तीसएक वर्षांत गेलो नव्हतो) जाऊन तिथल्या ग्रामदेवतेची ओटी भरणे वगैरे (प्रचंड मनाबिरुद्ध- मानसिक बलात्कारी) कार्यक्रम केले. आता मी आमच्या कुलदैवताला जाऊन अभिषेक करावा असा धोषा तिने लावला होता. त्याला मी स्पष्ट नकार दिला आहे.

हे बरचसं आमच्याकडे असच आहे.
विनाकारण मवाळ व समन्वयवादी बनण्याचा प्रयत्न केल्याने ठाम नकार वगैरे देता आला नाही.
ओढाताण, धावपळ, डोक्याला कटकट, व पाच सात दिवसांचं आजारपण सोसूनही हे सगळच करायला लागलं.
पुढच्या सात जन्मात मवाळ वागणूक, सौजन्यपूर्ण व्यवहार ठेवण्याची , त्याची किंमत देण्याची आता माझी हिंमत होणार नाही.

अजो१२३ Wed, 30/04/2014 - 13:13

In reply to by गब्बर सिंग

खरं तर तो डॉयलॉग आपण आढ्यतेने* दुर्लक्षित केलात. त्यावर नीट विचार करून पहाल तर असे दिसेल कि सरासरी चारच काय सरासरी ४० पुस्तके वाचलेले भारतात ६५% लोक आहेत. त्यांना अभिप्रेत अर्थाने २५% च मानू. देशात २५ कोटी अ‍ॅडल्ट विद्वान असताना देशात मुतार्‍या तरी नीट (किंवा आहेतच) का?

* आपल्या दोघांतले मीमराठीच्या दिवसांपासूनचे गब्बर्-ठाकूर समीकरण पाहून शब्द वापरायचे स्वातंत्र्य घेत आहे. अन्यथा इतर कोणताही सौम्य शब्द त्याठिकाणी वाचावा.

मेघना भुस्कुटे Wed, 30/04/2014 - 13:28

In reply to by अजो१२३

देशात २५ कोटी अ‍ॅडल्ट विद्वान असताना देशात मुतार्‍या तरी नीट (किंवा आहेतच) का?

=)) काय संबंध???

बॅटमॅन Wed, 30/04/2014 - 13:30

In reply to by मेघना भुस्कुटे

हो नैतर काय.

वैसे तो इस्रो मंगळावर यान पाठवते आणि भारतातल्या मुतार्‍या नीट नाहीत म्हणजे काय??? भौत नाइन्साफी है.

अजो१२३ Wed, 30/04/2014 - 13:49

In reply to by बॅटमॅन

Let me rephrase what I said. If there are 25 crore erudites in the nation who hold competence to challenge even trivial (like munj) matters, why abysmal state of affairs? 66% marital rapes each year? Why poor voter turn-out?

Or for those citing Mangalyaan, are they all engaged in transcendental, super-intellectual activities and they have nothing to do with the basic problems of the country? I am trying to question either their benevolence or the intellect.

बॅटमॅन Wed, 30/04/2014 - 14:05

In reply to by अजो१२३

२५ कोटी लोक इरुडाईट आहेत हा आकडाच चूक आहे. इरुडाईटची व्याख्या काय अन आकडा कुठे. आणि त्याचा याच्याशी संबंध काय हा प्रश्न विचारावा लागतो याचा अर्थ तुम्ही कार्यकारणभावाची गल्लत करत आहात.

अजो१२३ Wed, 30/04/2014 - 15:06

In reply to by बॅटमॅन

बॅटमॅनसाहेब, ज्या गोष्टी हजारो वर्षे प्रस्थापित आहेत (जसे मुंज) त्यांना चॅलेंज करणारा, त्यांत शुद्ध मूर्खपणा पाहू शकणारा (ते ही अतिशय निकटच्या लोकांच्या प्रभावाचा परिणाम न होऊ देता)दूरदर्शी माणूस म्हणजे विद्वानच ना? त्याला कळतं ना काय योग्य काय अयोग्य? रुढ गोष्टींना परिक्षून त्यांची योग्यायोग्यता ठरवू शकणारा तो विद्वानच म्हणेन मी. अर्थातच असे लोक शिक्षितांतही कमी आहेत हे मान्य. ४ पुस्तके वाचलेली वरून मी तो २५ कोटीचा आकडा काढला. आपण सगळे आकडे बाजूला ठेऊ. मूंजीतला मूर्खपणा पाहण्याची विद्वत्ता असणारे लोक इतकेच सँपल घेऊ. ते कितीका असेन.

आता मी ते ऑफिसमधल्या वैतागाचे उदाहरण वर दिले आहे ते वाचा. तिथेही बराच मूर्खपणा आहे. पण तो फॅशनमधे आहे. माझा मुद्दा साधा आहे - हेच मुंजीमधील मूर्खपणा पाहून वैताग करणारे लोक, कुटुंबसंस्था नि परंपरा यांच्यावर पोटतिडीकिने बोलणारे लोक, नि मुंजीमुळे एक गळचेपी, दडचेपी सहन करणारे लोक इतक्याच तुच्छतेने ऑफिसच्या नियमांबद्दल का नाही बोलत? त्यांना वैताग का नाही येत?

ऑफिसात पैसे मिळतात हे खरे, पण समजा मुंजीतही पैसा मिळाला असता तर त्यांनी तिथे ही तक्रार केली नसती असा काही प्रकार आहे का? अन्याय, मूर्खपणा केवळ एकाच जागचा वेगळा का काढायचा आणि रडायचे. मुंज तर हळूहळू बंद पडणार आहे. ऑफिसात अनेक पिढ्यांना अजूनही जायचे आहे. म्हणून मुंजीत ज्या ज्या मूर्खता आहेत त्या त्या सगळ्या (qualitatively as well as quantitatively) ऑफिसात असताना, तिथे शांतता का? पुरोगामीतेचे कूल पाँइटस मिळवायला? आणि ऑफिसमधे एकूण जितक्या प्रकारचा मूर्खपणा आहे ते पाहता, अशा वृत्तीच्या लोकांनी मुंज किस झाड कि पत्ती म्हणून तिचा आनंद घेतला पाहिजे.

बॅटमॅन Wed, 30/04/2014 - 15:10

In reply to by अजो१२३

ऑफिसात पैसे मिळतात हे खरे, पण समजा मुंजीतही पैसा मिळाला असता तर त्यांनी तिथे ही तक्रार केली नसती असा काही प्रकार आहे का? अन्याय, मूर्खपणा केवळ एकाच जागचा वेगळा का काढायचा आणि रडायचे. मुंज तर हळूहळू बंद पडणार आहे. ऑफिसात अनेक पिढ्यांना अजूनही जायचे आहे. म्हणून मुंजीत ज्या ज्या मूर्खता आहेत त्या त्या सगळ्या (qualitatively as well as quantitatively) ऑफिसात असताना, तिथे शांतता का? पुरोगामीतेचे कूल पाँइटस मिळवायला? आणि ऑफिसमधे एकूण जितक्या प्रकारचा मूर्खपणा आहे ते पाहता, अशा वृत्तीच्या लोकांनी मुंज किस झाड कि पत्ती म्हणून तिचा आनंद घेतला पाहिजे.

पैसा मिळतो म्हणून हपिसातला जो कै मूर्खपणा आहे(असं तुमचं मत आहे) तो सहन केला जातो. हपिसात सर्व शहाणपणाच असतो असं कै नै पण ष्टिल..

बाकी, कोणी कशाचा आनंद घेतला पाहिजे हे डिक्टेट करण्यात प्वाइंट काय आहे हे जरा सांगा की.

अजो१२३ Wed, 30/04/2014 - 15:23

In reply to by बॅटमॅन

बाकी, कोणी कशाचा आनंद घेतला पाहिजे हे डिक्टेट करण्यात प्वाइंट काय आहे हे जरा सांगा की.

मुंज करा, न करा, ओफिसात जा, न जा. कशाचाही आनंद घ्या.

पण मुंजीत(च) नेमके तेवढे मन मारून घ्यावे लागले अशी जी पुरोगामी रड आहे त्याला तोड नाही. आपल्या आधुनिकत्वाला मुरड घालावी लागल्याचे विषेष दु:ख.

आता माझी बस मला ओफिसला ३० मिनिटे अगोदर पोचवते. दुसरी एक तासानी आहे. माझे (एकट्याचे, कारण प्रश्न एकट्याचाच आहे) ड्यूटी अवर्स अ‍ॅडजस्ट करा म्हटले तर होणार नाही. फ्लेक्सि टाईम असेल तर सगळ्यांनाच नाही कोनालाही नाही. आता हा बाबा मुंज कशी करावी लागली वा अटेंड करावी लागली म्हणून पुरोगामाई अंगात आणून तण तण करणार - अशी कुंचबंणा झाली, तशी झाली, त्या मागास परंपरा पाळायच्या वेळेस- असे म्हणणार. तेच ऑफिसचे बोलताना एक तद्दन मूर्खपणा 'आयुष्यभर' सहन करत असताना शांत चित्ताने , 'अरे, नोकरी म्हटल्यावर चालायचेचे इतके' असे म्हणणार.

नोकरीत पैसे कौशल्याचे, कामाचे, इ असताना. तत्त्वाना मुरड घालायला नसतात.

बॅटमॅन Wed, 30/04/2014 - 15:27

In reply to by अजो१२३

मुंज हा जगात एकमेव तसा विधी नाहीच.

तदुपरि मन मारावे लागते हेही आहेच.

नोकरीत पैसे कशासाठी असतात याची तुम्ही फार छान गल्लत केलेली आहे. पैसे मिळतात म्हणताना लोक गप असतात म्हणजे मुरड घालायचे पैसे मिळतात असे म्हटले तर खायला मिळते म्हणून बाप नामक हिटलरच्या आधिपत्याखाली घर नामक तुरुंगात राहतो असेही म्हणता यावे.

तुमचा प्रॉब्लेम हा आहे की तुम्हांला जी गोष्ट अ‍ॅब्सर्ड वाटते त्यासाठी दुसरी इर्रिलेव्हंट गोष्ट तुम्ही टोकाला जाऊन त्यातला तुमच्या लेखीचा फोलपणा दाखवता. त्याने मूळ मुद्दा सिद्ध होत नाही. किमान तुम्हांला जे अपेक्षित आहे ते तरी होतच नाही.

अजो१२३ Wed, 30/04/2014 - 15:35

In reply to by बॅटमॅन

वेल, आपण इथे थांबू.

माझा मुद्दा - मुंजीमुळे होणारी कुंचबणा ही अगदी एका दिवसाच्या अंगवळणी पडलेल्या कूचंबणांच्या हजारो पट कमी असते. तिला हाईलाईट करण्याचे कारण आपण कसे 'सुधारलेले' आहोत हे कळत नकळत दाखवणे. किंवा असे दाखवणे समाजात अगदी स्वार्थाशिवाय रुढ असणे.

तुझा मुद्दा - असे नाही.

मन Wed, 30/04/2014 - 15:41

In reply to by अजो१२३

वेल, आपण इथे थांबू.

असं कसं .असं कसं चालेल ?
अजून उणेपुरे त्रिशतकही झाले नाही.
विषय पुरेसा भरकटलेलाही नाही, कशापायी थांबायचं?

बॅटमॅन Wed, 30/04/2014 - 17:04

In reply to by अजो१२३

कुचंबणा कमी असेलही, पण साला काँप्रोमाईज करायचं तरी किती ठिकाणी? कुठेतरी औटलेट असूद्या की. आता फक्त मुंजीचेच औटलेट पाहिजे का, अन्य काही नाही का, इ.इ. प्रश्नांचा खल इर्रिलेव्हंट. असो.

मन Wed, 30/04/2014 - 14:06

In reply to by अजो१२३

शिम्पल है अरुणबाबू.
तुम ऐसा देखो की भाया एक येडा दस शाणे लोगो को पागल बना सकता हय.
तुम यहां पे ७५ कोटी येडो से २५ कोटी शाणो को भिडा रहा हय

a fool can create so much mess that not even 10 wise people can handle!!!

बॅटमॅन Wed, 30/04/2014 - 14:56

In reply to by अजो१२३

एक वेडा दहा शहाण्यांना भारी पडू शकतो याचा अर्थ शहाणे वेड्यांवर जबरदस्ती करू शकत नाहीत असे नाही. दोन्ही विधाने परस्परविरोधी नाहीत.

अजो१२३ Wed, 30/04/2014 - 15:29

In reply to by बॅटमॅन

एक वेडा दहा शहाण्यांना भारी पडू शकतो.
शहाणे वेड्यांवर जबरदस्ती करू शकत नाहीत असे नाही.

ओके

दोन्ही विधाने परस्परविरोधी नाहीत.

provided शहाण्यांची संख्या = वेड्यांची संख्या * १० + १

बॅटमॅन Wed, 30/04/2014 - 15:33

In reply to by अजो१२३

नॉट नेसेसरिली. वेडा व शहाणा या दोघांनीही आपली क्षमता पूर्ण वापरली व ती सर्वकाळ एकच एक व्हॅल्यू आली तर आणि तरच. नपेक्षा नाही.

घनु Wed, 30/04/2014 - 13:25

In reply to by गब्बर सिंग

आणि मोठ्यांना 'हे का करायचं' अशी कारणं विचारलं की मग फक्त "करावं लागतं बाबा/बाई..आपल्या पूर्वजांनी केलं - आपल्याला न करून कसं चालेल.. शिवाय ही संस्कृती आहे आपली" हे असं ढोबळ उत्तर मिळतं पण नेमकं "का" ह्याचं उत्तर कधीच मिळत नाही.

बॅटमॅन Wed, 30/04/2014 - 13:28

In reply to by घनु

खरे तर तुमचे समाधान होत नाही म्हणून वरील उत्तरे नेमकी वाटत नाहीत. ती खरी तर अतिशय नेमकी उत्तरे आहेत. खरेखोटेपणाच्या फंदात न पडता नेमकेपणा पाहिला तर तो वरील उत्तरांत आहे याबद्दल दुमत नसावे.

आता मनाचं समाधान होत नसेल तर तो नेमकेपणा काय कामाचा एट ऑल तर आहेच-पण यू आस्क्ड फॉर नेमकेपणा अँड यू गॉटिट. तस्मात वरील उत्तर हे न पटण्यासारखे म्हणू शकता पण नेमके नाही असे म्हणू शकत नाही ;)

घनु Wed, 30/04/2014 - 14:03

In reply to by बॅटमॅन

काही तरी गोंधळ होतोय. मला "नेमकं" उत्तर नकोय, "नेमकं का?" म्हणजे थोडक्यात एखादी गोष्ट का करायची ह्याचं उत्तर नाही मिळत. ते केवळ करायचं म्हणून किंवा चार लोक करतात म्हणून करायचं असं बर्‍याच मोठ्यांना वाटत असतं ते पटत नाही असं माझं म्हणणं आहे.

बॅटमॅन Wed, 30/04/2014 - 14:09

In reply to by घनु

तुमचा मुद्दा अगोदरच कळाला होता ओ. तुम्हाला पटेल असे उत्तर अपेक्षित आहे हे माहितीच आहे. जरा मजा केली इतकंच.

(मोठ्या लोकांच्या आज्ञापालनातून वेळीच बाहेर पडून वाद घातलेला) बॅटमॅन.

नितिन थत्ते Wed, 30/04/2014 - 14:16

In reply to by मन

मुंज एकदाच असते वगैरे म्हटलं किंवा माझ्या काकूच्या दोनच इच्छा होत्या असं म्हटलं तरी ....

मला एकच काकू नसते, आणखी दोन तीन माम्या, एक दोन आत्या, सख्ख्या - चुलत मावस वगैरे; शिवाय आईला-वडिलांना असेच नातेवाईक असतात. त्यांच्या सुद्धा इच्छा वगैरे निघतात. त्यांचंसुद्धा मन न मोडणे इत्यादि इत्यादि.

मी Wed, 30/04/2014 - 14:23

In reply to by नितिन थत्ते

पण ह्यासगळ्यामधे एक डिल असतं न? म्हणजे मन न मोडण्यासाठी काकू तेवढी भारी(पुरेशी प्रेमळ, परोपकारी वगैरे) असायला हवी, नसल्यास मन मोडण्यास काहीच प्रॉब्लेम नसावा. आणि 'कोणासाठी' 'कॉम्प्रमाईझ' केल्यावर ते वैतागदायक वाटणार नाही?

मन Wed, 30/04/2014 - 14:33

In reply to by मी

देश व समाज ह्यांचे खरोखर मूलगामी फायदे होणार असतील तर कॉम्प्रमाइझ म्हणा अ‍ॅडज्स्टमेंट म्हणा मी करण्यास
अवश्य तयार आहे/असतो/असेन.
मला कार परवडते. त्यातून फिरताना मजाही येते. पण होता होइल तोवर मी दुचाकीवर भागवतो.
त्यातही कित्येकदा सार्वजनिक व्यवस्था वापरतो.
ह्या सर्व वेळासाठी मी माझी मजा,हौस बाजूला ठेवली आहे.

किंवा माझ्याकडे इतकी रक्कम नक्कीच आहे की मी विविध देशांमध्ये फिरण्याची किंवा इतर काही हौस मौज
करण्याची इच्छा पूर्ण करेन. पण मी ते करत नाही. माझ्या पुढील पिढीस शिक्षण म्हणा, धंद्यास भांडवल म्हणा
अशी गरज पडल्यास लागेल म्हणून मी ती रक्कम जपून ठेवतो आहे.
हे सुद्धा कॉम्प्रमाइझ म्हणता यावे.

थोडक्यात, दूरगामी हिताचे काही खरोखर करणार असाल तर तक्रार नाही.
पण निरर्थक गोष्टींसाठी का त्रास करुन घेउ.
(जी गोष्ट न केल्यानेही काका-मावशांना तसा काहिच त्रास होणार नसतो; अशा गोष्टी करण्यास हे भरीस का पाडतात ?)

मी Wed, 30/04/2014 - 14:35

In reply to by मन

(जी गोष्ट न केल्यानेही काका-मावशांना तसा काहिच त्रास होणार नसतो; अशा गोष्टी करण्यास हे भरीस का पाडतात ?)

जर त्यांना त्रास होत नसेल तर भरीस का पडता? ह्याचे उत्तर खालिल वाक्यात आहे काय?

थोडक्यात, दूरगामी हिताचे काही खरोखर करणार असाल तर तक्रार नाही.

मन Wed, 30/04/2014 - 14:50

In reply to by मी

भरीस का पडता?
माणसे कशाला दुखावायची उगीच असा आमचा नेमस्त ष्ट्यांड असे. तो आम्हाला महागात पडला.

उदा :-
मी तुमच्या देवाचय पाया पडलो नाही तर तसेही तुमचे काहिच बिघडणार नसते.
अगदि एक सोंड आणि चार हाताचा देव खरोखरोच आकाशी अस्तित्वात आहे, असे गृहित धरले तरी.
फार तर पाया न पडल्याबद्दल तो माझे वाटॉळे करील. तुमचे नाही.
तरीही विविध वेळी "उगीच लोकांना कशाला आपला तोरा दाखवा " असे म्हणत आपणही देवाच्या पाया पडतोच की.
नाहीतर लोकांच्या भावना वगैरे "दुखावल्या" जायला तयारच असतात.

किंवा, खरेतर
"भरीस का पडता" ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे नवीन स्वतंत्र चर्चा असू शकते.
आजवर कधीकधी भरिस पडून झाले आहे.
क्वचित नकारही देउन झालाय.

पण तो स्वतंत्र मुद्दा आहे, "भरिस पडल्याने त्रास झाला" हा अनुभव व निष्कर्ष आहे.
"भरिस का पडलो?", हा वेगळा विषय.

मी Wed, 30/04/2014 - 15:12

In reply to by मन

माणसे कशाला दुखावायची उगीच असा आमचा नेमस्त ष्ट्यांड असे. तो आम्हाला महागात पडला.

न दुखावल्यामुळे तुम्हास जो (मानसिक)फायदा होतो ते डिल आहे.

राजन बापट Wed, 30/04/2014 - 19:11

In reply to by नितिन थत्ते

>>माझ्या एका काकूच्या इच्छेसाठी आमच्या मूळ गावाला (जिथे मी गेल्या तीसएक वर्षांत गेलो नव्हतो) जाऊन तिथल्या ग्रामदेवतेची ओटी भरणे वगै

मला अशा स्वरूपाच्या गोष्टींची कल्पना लहानपणापासून आहे.

माझ्यामते मी वर उल्लेख केलेल्या आमच्या मुलांच्या मुंजीमधे आमच्या मुलांसकट सर्व माणसं हसतखेळत एखाद्या संमेलनाला जमल्याप्रमाणे होती. मुंजीचं ठिकाण आणि दिवसवेळ या गोष्टी सोयीच्या नि सुटीच्या होत्या. या सर्व बाबी मला महत्त्वाच्या वाटतात. कुणाला भयंकर त्रास, कुणाची कुचंबणा, कुणाच्या भावना दडपणं , कुणाला गैरसोयीमधे टाकणं हे होत नसेल तर धार्मिक गोष्टींमधे भाग घेण्याचं माझं धोरण आहे खरं. गणपतीच्या आरत्या नास्तिक असून मलाच पाठ येतात म्हणून गणपतीभक्तांमधे मला मागणी असते नि मी रमतो सुद्धा. आरास , सजावट, खाणंपिणं वगैरे गोष्टी एंजॉय करतो.

थोडक्यात सांगायचं तर खाप्यामजाकरा डिपार्टमेंटमधे आता धर्म बसतो.तिथवर माझं काही विशेष म्हणणं नाही. पूर्वी धर्म कुंचबणा-अन्याय-दडपशाही या डिपार्टमेंटमधे यायचा. तो काही मला आवडायचा नाही, बट देन आय वॉज अ‍ॅट द राँग एंड ऑफ द प्रोव्हर्बियल् स्टिक्.

अतिशहाणा Wed, 30/04/2014 - 19:13

In reply to by राजन बापट

वाढदिवस साजरा करणे आणि मुंज साजरी करणे यात गुणात्मक फरक दिसत नाही. (काही विशिष्ट जातींना मुंजीची परवानगी नसते किंवा काही विशिष्ट आर्थिक परिस्थितीतील व्यक्तींना वाढदिवस साजरा करणे परवडत नाही हे थोडेसे अपवाद.)

वाढदिवस जितका निरर्थक आहे तितकीच मुंज निरर्थक (किंवा ज्याला सार्थक वाटते त्याच्यासाठी सार्थक) आहे असे वाटते.

नितिन थत्ते Wed, 30/04/2014 - 20:36

In reply to by राजन बापट

>>गणपतीच्या आरत्या नास्तिक असून मलाच पाठ येतात म्हणून गणपतीभक्तांमधे मला मागणी असते नि मी रमतो सुद्धा. आरास , सजावट, खाणंपिणं वगैरे गोष्टी एंजॉय करतो.

त्यात काहीच अडचण नाही. ते तुम्ही स्वत:च्या आवडीने करत असता. कुणाचे तरी मन राखण्यासाठी नाही.

अतिशहाणा Thu, 01/05/2014 - 18:12

In reply to by नितिन थत्ते

ते तुम्ही स्वत:च्या आवडीने करत असता. कुणाचे तरी मन राखण्यासाठी नाही.

कुणाचे तरी मन राखणे ही सुद्धा आवड असू शकते. कुणाचे तरी मन न राखणे हे स्वतःला न आवडण्याची शक्यताही आहे.

अजो१२३ Tue, 29/04/2014 - 23:14

In reply to by राजन बापट

इतकं डिफेन्सीव वर येऊन का खेळता? मूंज करण्यात नि ऑफिसातली दर महिन्याची रिव्ह्यू मिटिंग करण्यात कोणत्याही वेगळ्या अंधश्रद्धा लागत नाहीत. कोणत्या जमान्यात कोणती फॅशन असते इतकेच.

राजन बापट Tue, 29/04/2014 - 23:57

In reply to by अजो१२३

>>इतकं डिफेन्सीव वर येऊन का खेळता?

मूळ धाग्यात अलिकडच्या काळातल्या मुंजीसंबंधातल्या प्रथांबद्दल पुष्कळसा ऑफेन्सिव्ह रोख आहे. त्यामुळे, मुंजीप्रकरणात भाग घेतलेल्या कुणाचाही प्रतिसाद डिफेन्सिव्ह वाटत असावा :)

मन Wed, 30/04/2014 - 11:52

In reply to by अजो१२३

द्यायला लागलेली किंमत वेगळी असू शकते.
काही धार्मिक विधी पाळायचे म्हणजे भयंकर शारिरिक छळ असतो.
प्रसंगी ब्येवकूफ लोक तब्येती चुलीत घालून धार्मिक विधी पाळतात; इतरांनाही तब्येती चुलीत घालून पाळायलाही लावतात.
थुत् त्या प्रथा परंपरांच्या.
(हे अत्यंत वैतागाने म्हणत आहे.)

अजो१२३ Wed, 30/04/2014 - 12:12

In reply to by मन

एक सॉफ्टवेअर प्रोग्राम/अ‍ॅप्लिकेशन बनवताना म्हणा वा एक आय टी प्रोजेक्ट उभा करून चालू करताना जे जे काही होते ते सर्व सुद्धा भयंकर शारिरीक छळ, अंधश्रद्धा, ब्यवकूफी, थूत्तीकरणीय, वैतागवाण्या इ इ असतात.

जर एक आनंदाने करायचे सवय असली तर दुसरे चूकूनमाकून कधी करायची सवय असायला काय हरकत?

अजो१२३ Wed, 30/04/2014 - 12:29

In reply to by नितिन थत्ते

चला, म्हणजे तत्वतः 'प्राचीन काळी' मुंज होण्यास तुमची हरकत नाही. कारण त्या संमारंभाने मुल शाळेत जाई व त्या समारंभाच्या निमित्ताने त्याला शालेय कालाचे संस्कार सांगीतले जात. याचा पुढे त्याला उदरनिर्वाहासाठी 'आर्थिक' फायदा होतच असे.

मग प्रश्न असा येतो कि ज्यांतून पैसे मिळत नाहीत अशा वैतागवाण्या, थूत्तनीय, लादलेल्या, समाजात रुढ आहेत म्हणून केलेल्या जाणार्‍या सगळ्या गोष्टींची यादी मी द्यावी का?

अजो१२३ Wed, 30/04/2014 - 13:01

In reply to by मन

वैताग हा मुद्दा घेतो.

आजच्या व्यवस्थेत ओफिसात किती काम आहे, केव्हा आहे याचा नि ऑफिसच्या नियमांनी आवश्यक अशा उपस्थितीचा काही संबंध नाही. हे मूर्खपणाचे तर आहेच. वैतागवाणे देखिल आहे. शिवाय याला आर्थिक नि मानसिक अंगे आहेत. म्हणजे पिक ट्रॅफिकला यावे लागते. ज्या दिवशी कामच नाही त्याही दिवशी यावे लागते. ज्या दिवशी खूप काम आहे त्या दिवशी उशिरा थांबूनही दुसर्‍या दिवशी (सहसा) वेळेत हजर राहावे लागते. ८ तासांची ड्यूटी असताना चेन्नई विजिटच्या दिवशी ३ वाजता उठून रात्री १२ ला घरी यावे लागते. पुन्हा दुसर्‍या दिवशी वेळेत. बाळ ३ महिन्याचे असताना घरी सोडून जावे लागते (भारतात फार कमी ओफिसांत सोयी आहेत.) महिन्यात २-३ दिवसापेक्षा १ दिवस जास्त १ मिनिटाने ठरलेल्या वेळेच्या उशिरा गेले तर तो दिवस अनपेड लिव मानला जातो.

ऑफिसात अजून करोडो प्रकारचे वैताग असतात.

आता हे
१. तुम्हाला वैताग किंवा मूर्खपणा म्हणून मान्यच नसतील. मला आदर आहे.
२. असतील पण त्याचा मोबदला मिळतो म्हणाल.

मी काही उदाहरणे दिली आहेत ज्यांत परिस्थिती अशी आहे -
१. वैताग टाळायचे ऑप्शन तुमच्याकडे नाहीच. नियमांबाहेर असूनही तुम्हाला तो सहन करावा लागतो. समजा माझे ऑफिस ९ ते ६ आहे. तो चेन्नई प्रवास या काळातच संपवायचे मूलभूत घटनादत्त, कायदेशीर नि करारांतर्गतही (अतिशहाणा, स्पेलिंग चेक करा हो)मजकडे नाहीच.
२. गैरसोयीचा मोबदला बर्‍याचदा नसतोच.
३. तो न्याय्य नसू शकतो.
हा अन्याय तुम्ही रोज सहन करता (मुंज क्वचित असते) पण वैताग येत नाही. मेंदूची घडणच आहे तशी. आता तुम्ही म्हणाल कि असली नोकरी सोडण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहे. पण एकतर असल्या नोकर्‍या कमी असतात ज्यात जॉब प्रोफाईल फार व्यवस्थित सांगितलेले असते, पालन तंतोतंत होत नि तिच्यात बदल होताना दोन्ही बाजूंनी इक्वितेबल निगिशिएशन्स होतात. भारतात तर सगळा आनंदी आनंदच आहे.

पण शेवटी पैश्यासाठी काम करणे ठिक, वैतागातून पैसा?

सविता Wed, 30/04/2014 - 16:33

In reply to by अजो१२३

अजो आता हे बघा

तुमचे सरासरी प्रतिसाद बघितले निदान सध्यातरी इकडे जे दोन तीन धागे आहेत तिथे... ते लंबेचवडे प्रतिसाद टायपायला जो वेळ लागतो तो बघता, ऑफिस तुम्हाला समजा ८ तासाचा पगार देते तर त्यातले किमान तीन तास तुम्ही इकडे नक्कीच मोडले आहेत.

त्यांच्याक्डून इकडे काम केल्याबद्दल पगार घेऊन, त्यांचीच इंटर्नेट बँड्विड्थ वापरून तुम्ही ज्या बद्दल पगार मिळतोय ते काम ठरवलेला सगळा वेळ नाहीच करत आहात.

पण ऑफिस चालवून घेतय ना? त्यांच्यावर अन्याय नाही का हा?

जाता जाता हे नमूद करू इच्छिते की ब-याच वेळेला असे दिसते की बाकी सगळ्या "एक्स्ट्रा करुक्युलर अ‍ॅक्टिव्हिटी" न करता फक्त कामावरच लक्ष केंद्रित केले की ड्युटी अवर्स मध्ये ९९% टक्के वेळेला काम संपते.

८/९ तास फक्त काम करूनही नेहमीच उशिरापर्यंत थांबणारी/ थांबावे लागणारी मंडळी अजून पाहिली नाहीत.
हा आता...यातून स्वतला खाज किंवा जास्त बढती/पगार हवा म्हणून काम ओढावून घेणारी मंडळी धरली नाहीत.

मन Wed, 30/04/2014 - 16:33

In reply to by सविता

तुमचे सरासरी प्रतिसाद बघितले निदान सध्यातरी इकडे जे दोन तीन धागे आहेत तिथे... ते लंबेचवडे प्रतिसाद टायपायला जो वेळ लागतो तो बघता, ऑफिस तुम्हाला समजा ८ तासाचा पगार देते तर त्यातले किमान तीन तास तुम्ही इकडे नक्कीच मोडले आहेत.

त्यांच्याक्डून इकडे काम केल्याबद्दल पगार घेऊन, त्यांचीच इंटर्नेट बँड्विड्थ वापरून तुम्ही ज्या बद्दल पगार मिळतोय ते काम ठरवलेला सगळा वेळ ते काम नाहीच करत आहात.

ठ्ठो

अजो१२३ Wed, 30/04/2014 - 16:41

In reply to by मन

त्या माझ्यावर जो व्यक्तिगत आरोप करत आहेत ( असे समजून कि मी ऑफिसात आहे, ऑफिसच्या पैशाने , वेळाने हे करतो आहे, इ इ ) तो मान्य करून चालू. पण नीट पाहिले तर सर्वांना मुंजीपेक्षाही याचा जास्त तिटकारा आला पाहिजे. असे होत नाही. कारण असा तिटकार आल्याने पुरोगामीत्व सिद्ध करायची खाज भागत नाही.

मन Wed, 30/04/2014 - 16:46

In reply to by अजो१२३

लोकांना पुरोगामित्व सिद्ध करु देत.
तुम्ही प्रतिगामित्व सिद्ध करा.
ऑफिस व नोकरीमधील अंधश्रद्धांवर कोरडे ओढा.
हाकानाका.

अजो१२३ Wed, 30/04/2014 - 16:37

In reply to by सविता

अर्थातच आपला मुद्दा मान्य आहे.

ऑफिसातल्या "मूर्खपणाला" एम्प्लोयीच्या दृष्टीने पाहणे काय नि एम्प्लोयरच्या दृष्टीने पाहणे काय, मूर्खपणा आहेच ना? त्याच्याने त्रागा का होत नाही.
क्षणभर तुम्ही अरुणजोशी हा एक एम्प्लॉयी / एम्प्लॉयर आहे नि घरी बसून सगळे मुद्दे मांडतो आहे असे माना. काय फरक पडतो? या सगळ्या "प्रथांचा" तितकाच तिटकारा नको का यायला?

सविता Wed, 30/04/2014 - 16:52

In reply to by अजो१२३

प्रत्येक गोष्टीचा वैताग येऊन फुटाण्यासारखे टणटण उडत बसले तर आयुष्यात काय साध्य होणार आहे?

एखाद्या गोष्टीची "न्युसन्स व्हॅल्यू", त्यामुळे किती त्रास होतो , काय फायदा होतो याचा सरासरी विचार करावा. ती गोष्ट करून माझी किती शक्ती खर्च होते आणि त्या गोष्टीला विरोध करण्यात माझी किती शक्ती खर्च होते... यावरून निर्णय घ्यायचा ना!

मग ते मुंज, लग्न आणि धार्मिक संस्कार असोत नाहीतर ऑफिसचे वेडपट नियम असोत.

आणि मला असे दिसतेय की बहुसंख्य "विद्वान" लोक तेच करतायेत आणि शक्ती महत्वाच्या गोष्तींसाठी राखून ठेवताहेत!

चला मी पण आज वाचन आणि लेखन यात इकडे आज किमान १.५ तास घातला आहे.

आणि मला माझी शक्ती इकडे वांझोटे वाद/चर्चा करण्यापेक्षा माझ्या लेकीबरोबर क्वालिटी टाइम घालवणे, कामावर जो पगार मिळतो त्या लायकीचे काम करून नोकरी टिकवणे आणि त्यात प्रगती करणे याकरता राखून ठेवायची आहे त्यामुळे माझ्या कडून पुर्णविराम!

जाता जाता... बॅटमॅन यांना प्रश्न.. ते सारखे "तदुपरि" काय वापरता हो? मला उन्हाळ्यातली टळटळीत दुपार आठवते. माझे मराठी वाचन ब-यापैकी असून (असे मला वाटते) अजून इतर कुठेही हा शब्द वाचनात आल्याचे आठवत नाही.

अजो१२३ Wed, 30/04/2014 - 16:57

In reply to by सविता

प्रत्येक गोष्टीचा वैताग येऊन फुटाण्यासारखे टणटण उडत बसले तर आयुष्यात काय साध्य होणार आहे?

एखाद्या गोष्टीची "न्युसन्स व्हॅल्यू", त्यामुळे किती त्रास होतो , काय फायदा होतो याचा सरासरी विचार करावा. ती गोष्ट करून माझी किती शक्ती खर्च होते आणि त्या गोष्टीला विरोध करण्यात माझी किती शक्ती खर्च होते... यावरून निर्णय घ्यायचा ना!

मग ते मुंज, लग्न आणि धार्मिक संस्कार असोत नाहीतर ऑफिसचे वेडपट नियम असोत.

आणि मला असे दिसतेय की बहुसंख्य "विद्वान" लोक तेच करतायेत आणि शक्ती महत्वाच्या गोष्तींसाठी राखून ठेवताहेत!*

चला मी पण आज वाचन आणि लेखन यात इकडे आज किमान १.५ तास घातला आहे.

आणि मला माझी शक्ती इकडे वांझोटे वाद/चर्चा करण्यापेक्षा माझ्या लेकीबरोबर क्वालिटी टाइम घालवणे, कामावर जो पगार मिळतो त्या लायकीचे काम करून नोकरी टिकवणे आणि त्यात प्रगती करणे याकरता राखून ठेवायची आहे त्यामुळे माझ्या कडून पुर्णविराम!

१००% सहमत.
* हे खोचकपणे इथल्या बहुसंख्यांना समर्थणारे नि मला चूक ठरवणारे विधान असले तरी (दावा नाही तसा) १००% सहमत.

चिंतातुर जंतू Wed, 30/04/2014 - 13:13

In reply to by राजन बापट

>> माझे नि बायकोचे आईवडील, नातेवाईक यांची, आमच्या मुलांच्या मुंजी व्हाव्यात अशी इच्छा होती. मात्र केवळ "त्यांच्या इच्छेला मान देऊन आम्ही तत्वांना मुरड घातली" असं म्हणता येत नाही. त्यांच्या भावनांना मान दिला हे खरं आहे. पण मुंजीला अगदी हमरीतुमरीवर येऊन विरोध करायचा होता असं काही नाही.

>> मुंज कशी केली :
"हसत खेळत" असं थोडक्यात उत्तर देता येईल.

थोडक्यात काय, तर कुटुंबसंस्था अश्शीच आहे. किंवा, "if you can't prevent मुंज, you should enjoy it" वगैरे वगैरे. ;-)

सुशेगाद Tue, 29/04/2014 - 22:45

बंड्याच मुंज
सकाळी सात ला उठून एक पिंट मारून भटजी आणि बंड्या आणि काका काकू मामा मामी लांबचे जवळचे ढीगभर नातेवाईक खंडाळ्याच्या फार्म हाउस वर बोलावले . मनोरंजांसाठी भोजपुरी आयटम गर्ल दिव्या द्विवेदी व मराठी तडका मानसी नाईक आणि चैत्रालीचा नाद करायचा नाही यांचे डान्स पेर्फोर्मंस चा कार्यक्रम ठेवला. मुंजीला मांडव न घालता सगळे विधी पूल साईड केले.
भिक्षा बिक्षा काय मागणार आता म्हणून एक एके खम्ब्या मामांनी मुलाच्या झोळीत टाकला.
केस पूर्ण कापायचे सोडून यो यो कट कार्याला भटजींची हरकत नव्हती
रात्री खास ब्रज़िलिअन कलाकारांचा स्ट्रीप शो ठेवण्यात आला आणि आमच्या बंड्याची मुंज दहा लाखात आटोपली.

पोस्त्मोडर्ण मराठी माणूस.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 30/04/2014 - 03:38

मी आयुष्यात पहिला नॉनव्हेज विनोद ऐकला भावाच्या मुंजीच्या वेळेस. ही साधारण २२-२५ वर्षांपूर्वीची गोष्ट. त्याच्या वयाच्याच एका मित्राकडून. त्यातला विनोदी भाग काय आहे हे मला बऱ्याच वर्षांनंतर समजलं. आणि हा असा जोक सांगताना त्या मित्राचा विचार लैंगिक अत्याचार असा काही होता असं मोठं झाल्यावरही काही वाटत नाही; पोराटोरांची आपसातली मजा. पण मुंज आणि नॉनव्हेज विनोद असं समीकरण माझ्या डोक्यात बसलं. बरं हा विनोद सांगणारा मुलगा आणि त्याचं कुटुंब हे आमच्या घरापेक्षा बरेच जास्त धार्मिक आणि रूढी पाळणारे वगैरे आहेत.

सुनील Wed, 30/04/2014 - 14:36

मी लग्न करायचे ठरल्यानंतर अस्मादिकांची मुंजच झाली नसल्याचा साक्षात्कार समस्तांस झाला! (वडीलांची फारशी इच्छा नसल्याने त्यांनी आमची मुंज केलीच नव्हती आणि आईनेदेखिल फार आग्रह धरला नव्हता)

मग एक सोईचा रविवार बघून मी आणि धाकटे बंधुराज यांची मुंज घरच्या चार मंडळींच्या साक्षीने "उरकली"!

रविवार असूनही गोडाचे जेवण जेवावे लागल्याने एक किंचित घरगुती कुरकुर झाली एवढंच! ;)

अजो१२३ Wed, 30/04/2014 - 15:11

In reply to by सुनील

एव्हढा त्रास का करून घेतला? काय वाटतं? म्हणजे हे अगदी कामाचं नव्हतं तरी तुम्ही केलंत? पटत नसलेलं काय काय करण्याची शक्यता आहे? मॅक्स लिमिट? हिच?

सुनील Wed, 30/04/2014 - 15:16

In reply to by अजो१२३

अहो, करायची नव्हती असा काही पण नव्हता. नव्हती झाली मुंज अन् त्यावाचून काही अडलेही नव्हते, इतकंच.

इममिन दीड्-दोन तासात सगळं आटोपलं. काही त्रास्-बीस नाही झाला!

अजो१२३ Wed, 30/04/2014 - 15:26

In reply to by सुनील

इथे वडिलांची नि आईची इच्छा नसताना मुंज करावी, करायची आहे असे तुम्हाला का वाटले? हा विधी पटतो का असे विचारयचे आहे. केवळ सोपा आहे म्हटले तरी बर्‍याच करू नयेत अशा गोष्टींचे सोपे वर्जन सांगता येईल.

सुनील Wed, 30/04/2014 - 15:37

In reply to by अजो१२३

किंचित गल्लत होते आहे अरुणराव.

माझ्या आई-वडिलांची फारशी इच्छा नव्हती हे खरे. पण अगदी तात्विक विरोध होता असे नाही. खेरीज, केवळ एक "रीत" म्हणून मुंज करून घ्यावी असा विचार सर्वानुमते (आई-वडील, मी आणि भाऊ) घेतला गेला होता.

काळा मठ्ठ बैल … Wed, 30/04/2014 - 15:49

साडेतिन टक्क्यांचा प्रोब्लेम
११० प्रतिसाद
बरंय बुवा तुम्चं
-----xxx-----
बिनमुंजीचा,
बिनलग्नाचा,
मजेत जगणारा,
बैल

काळा मठ्ठ बैल … Wed, 30/04/2014 - 16:08

In reply to by अजो१२३

साला, साडेतीनी लागलीय देशाला, संस्थळाला

सांग्सांग भोलानाथ...
उगी उगी
आता मोदी लागणारेत किनै देशाला
मग चांग्ले दिवस येतील हं
बुगु बुगु

काळा मठ्ठ बैल … Wed, 30/04/2014 - 17:12

In reply to by अजो१२३

हे प्रतिसाद ११० असले तरी तुमचा प्रतिसाद इतका जातीयवादी असताना त्याची कोणी दखलही घेत नाहीय.

विषय साडेतिन टक्क्यान्चा
प्रतिसाद ११०
अस नुस्त म्हटल तर बैल जातीयवादी
तुम्चं जग विनोदी आहे :O

अजो१२३ Wed, 30/04/2014 - 17:40

In reply to by काळा मठ्ठ बैल …

३.५% टक्क्यांचा प्रश्न ११० प्रतिसादांच्या आतच सोडवला गेला पाहिजे ही मागणी बाहेरच्यांनी करणे अयोग्य आहे. लोक ११० प्रतिसाद देवोत नाहीतर ११००० देवोत नाहीतर सारेच रिसोर्सेस त्यामागे लावोत. हे ठरवणारे बाहेरचे कोण?

उद्या बैलांच्या वृषणभंजनाचा प्रश्न सोडवण्याचा रिपोर्ट २ पानीच असावा असे सांगणारे अ-बैल लोक कोण?

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 30/04/2014 - 20:30

In reply to by अजो१२३

श्री./कु. बैल यांना कारणे द्या अशी नोटीस देण्यात येत आहे. त्यांच्या प्रतिसादातून, प्रश्न सुटेल असा अर्थ काही लोकांना ध्वनित होत आहे. अशा रीतीने, एकेक करत प्रश्न सुटत गेल्यास संस्थळाचा (आधीच कमी असलेला) टीआर्पी (आणखी) कमी होण्याची (रास्त) भीती वाटते. कृपया त्यांनी कोणत्याही प्रकारे सदस्यांची गैरसमजूत होईल, चर्चा करून प्रश्न सुटतील असं वाटेल असे प्रतिसाद लिहू नयेत. अन्यथा त्याबद्दल कारणे द्या ही नोटीस बजावण्यात येईल.

सलील Wed, 30/04/2014 - 19:23

In reply to by सुशेगाद

सगळीकडे असेच असते. कारण एक मुद्दा असा नसतो बरे आपला मुद्दा पडला की गडी दुसरीकडे वळवली जाते मग अशी बरीच वळणे होतात आणि कोणीच आपली भूमिका सोडत नाही. शिवाय जालिया चर्चेतून लोकांची मते बदलेली पहिली नाहीयेत उलट आपल्या मुद्द्यावर अजून जास्त घट्ट होताना बघितली आहेत मग कितीही चुकीचेका असेना. तसेही सगळ्या टी.व्ही. बातम्या वा रिआलिटी शो म्हणा हवे तर पहा ते पाहून किती लोकांनी मते बदलली आहेत?

उडन खटोला Mon, 27/07/2015 - 18:03

या धाग्याशी तसा सम्बन्धित नसला तरी थोडासा अवान्तर आणि थोडसा धाग्यालाच चिकटलेला एक मुद्दा मान्डतो-

नुकतेच एक महामहिम कथित (?)धर्मशास्त्रकार ढुढ्ढाचार्य व्यक्तिशी भेट झाली . त्यान्च्याशी बोलताना ब्राह्मण आयटी किंवा सॉफ्टवेअर इन्जिनियर्स व इतर परदेशी जाणार्या मन्डळींच्या धर्मबाह्य वर्तनाचा विषय निघाला . म्हणजे असे की अशी बाहेर जाणारी मन्डळी ब्राह्मण्याचे नियम सर्रास पायदळी तुडवतात. उदा. मद्य-मांस भक्षण , परस्त्रीगमन ( वन-नाइट स्टॅन्ड इ.इ.इ.) तर अशा मन्डळीनी केलेल्या पापाचरणाबाबत धर्माचे काय मत आहे?

यावर त्या "महामहिम कथित (?)धर्मशास्त्रकार ढुढ्ढाचार्य "नी दिलेले उत्तर ऐल्कून मी उडालोच! ते म्हणाले की "आयटी इन्जिनियर्स परदेशात जावुन भारताचे भले (?) करत असलेने आम्ही त्याना नियमातून सूट दिली आहे. गळ्यातील जानवे काढून ठेवावे व मग सर्वकाही (मद्य-मांस भक्षण , परस्त्रीगमन इ.इ.इ.) जे करायचे ते करा . फक्त एकादशीला किंवा गणपती /सत्यनारायण पूजेच्या वेळेला गोमूत्र पिवून जानवे घाला , मग काही दोष नाही , ब्राह्मण्य अबाधित राहते "

च्यायला , हे मला इतकी वर्षे माहित नव्हते . धर्मात अशीदेखील सोय आहे तर ! आम्ही फुकट गेली ५० वर्षे ब्राह्मण्य धर्माचे पालन करीत राहिलो !

हिंदू धर्म इतका सुधारला ? मला माहितच नव्हते बुवा !

* कॄपया कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही , पण उपरोल्लेखित प्रसन्ग १००% खरा आहे !

बॅटमॅन Mon, 27/07/2015 - 18:07

In reply to by उडन खटोला

ब्राह्मणांनी मद्यमांसभक्षण करू नये असे कन्क्लूसिव्हली सांगितलेय का कुणी?

नै म्हणजे आमच्या तोकड्या वाचनात दोन्ही बाजूने अर्ग्युमेंटे आलीत (दोन्ही बाजू जुन्या ग्रंथांमधल्याच आहेत) म्हणून इच्यारतो.

नितिन थत्ते Mon, 27/07/2015 - 19:25

In reply to by बॅटमॅन

मांसभक्षणासंबंधी (किंबहुना गोमांसभक्षणासंबंधानेदेखील)अनेकजण जुन्या ग्रंथातले दाखले देऊन पूर्वी मांसभक्षण अलाउड होते असे प्रतिपादन करतात. त्याच्या आधारे आजही मांसभक्षण करणे योग्य आहे असे म्हणतात. अगदी सावरकरांनीसुद्धा हे आर्ग्युमेंट वापरले आहे.

पण हे आर्ग्युमेंट काही तितके टेनेबल नाही. जुन्या ग्रंथात मांसभक्षण चालेल असे म्हटले असेल आणि नंतरच्या ग्रंथात निषिद्ध म्हटले असेल तर लेटर लॉ सुपरसीड्स ओल्डर लॉ या तत्त्वाने नंतरच्या ग्रंथात जे म्हटले ते ग्राह्य असे म्हणायला हवे.

जे लोक आधीच्या ग्रंथात लिहिलेले ग्राह्य असे म्हणतात ते पुराणमतवाद्यांप्रमाणेच आधीचे नंतरच्यांपेक्षा जास्त शहाणे असे मानतात असे म्हणावे लागेल.

बॅटमॅन Mon, 27/07/2015 - 20:15

In reply to by नितिन थत्ते

जुन्या ग्रंथात मांसभक्षण चालेल असे म्हटले असेल आणि नंतरच्या ग्रंथात निषिद्ध म्हटले असेल तर लेटर लॉ सुपरसीड्स ओल्डर लॉ या तत्त्वाने नंतरच्या ग्रंथात जे म्हटले ते ग्राह्य असे म्हणायला हवे.

मग स्मृतिग्रंथ बघावे लागतील- आचार प्रिस्क्राईब करणारे ग्रंथ याच क्याटेगरीत मोडतात म्हणून. किमान मनुस्मृतीमध्ये तरी परस्परविरोधी अर्ग्युमेंटे आहेत. अगदी एकमताने मांसाहारनिषेध केलेला त्यानंतरचा ग्रंथ कुठला आहे ते माहिती नाही.

बाकी देशभाषांतून रचना करणार्‍या संतमंडळींनी मद्यमांसाचा निषेध तर केलेलाच आहे- किमान मराठीपुरते हे माहिती आहे. पण पॅन-इंडियन व्याप्ती असलेल्या संस्कृत वाङ्मयात एकमताने काही असल्यास बघायला आवडेल. या संदर्भात बंगालमधली एक कथा आठवली. वाराणसी हे भारतभरच्या ब्राह्मणांचे मोठे केंद्र, तिथे बंगाली ब्राह्मणांवर टीका झाली की मांस वगैरे खातात म्हणून- तेव्हा एकाने मांसतत्त्वविवेक नामक ग्रंथ लिहिला. त्यात मांसाशन हे हराम नसून हलाल आहे असे प्रतिपादन केलेले होते इ.इ.इ. मला ही कथा सांगणार्‍यांना बाकी तो ग्रंथ कोणी लिहिला, कधी लिहिला, इ. माहिती नव्हते. जालावर सर्चवुनही काही मिळाले नाही. तेव्हा असा एखादा अ‍ॅबॉर्टिव्ह अटेम्प्ट झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अर्थात शेवटी हे रेट्रोफिटिंग आहे (तेव्हाच्या विचाराधारे सध्याचा आचार जस्टिफाय करणे) यात संशय नाही, पण खाण्यापिण्यावरून जजमेंटल होणार्‍यांना आपल्याच धर्माचा आहेर दिला की बरे असते. त्यांचे अज्ञान त्यातून उघड होते आणि तेवढ्यापुरते तरी ते डिफेन्सिव्ह किंवा डिनायल मोडवर जातात आणि बाकीच्यांना जरा तरी दिलासा मिळतो.

अतिशहाणा Mon, 27/07/2015 - 20:32

In reply to by बॅटमॅन

अर्थात शेवटी हे रेट्रोफिटिंग आहे (तेव्हाच्या विचाराधारे सध्याचा आचार जस्टिफाय करणे) यात संशय नाही, पण खाण्यापिण्यावरून जजमेंटल होणार्‍यांना आपल्याच धर्माचा आहेर दिला की बरे असते. त्यांचे अज्ञान त्यातून उघड होते आणि तेवढ्यापुरते तरी ते डिफेन्सिव्ह किंवा डिनायल मोडवर जातात आणि बाकीच्यांना जरा तरी दिलासा मिळतो.

+१

उडन खटोला Mon, 27/07/2015 - 19:15

In reply to by उडन खटोला

सर्वकाही (मद्य-मांस भक्षण , / विवाहबाह्य- विवाहपूर्व शरीरसम्बन्ध ,परस्त्रीगमन इ.इ.इ.)पापाचरणाबाबत धर्माचे काय मत आहे? असे वाचावे!

बॅटमॅन Mon, 27/07/2015 - 20:25

In reply to by उडन खटोला

अहो उडन खटोले, मद्यमांसभक्षण हे पाप असते तर सगळ्या वेदग्रंथांत पापच भरले आहे असेच म्हटले पाहिजे. विवाहबाह्य शरीरसंबंध आणि परस्त्रीगमन (कारण ते विवाहपूर्व काळातही होऊ शकते म्हणून) वगळता बाकी गोष्टी पाप नाहीत बरं का आपल्या धर्माप्रमाणे. आपल्या धर्माबद्दलचे तुमचे ज्ञान बघून डोळे पाणावले.

तिरशिंगराव Mon, 27/07/2015 - 19:15

मूळ धाग्यापेक्षा, सर्व प्रतिक्रिया वाचताना वैचारिक दिवाळी अनुभवल्यासारखे वाटले. याच धर्तीवर उरलेल्या १५ संस्कारांबद्दलही चर्चा घडावी.

.शुचि. Mon, 27/07/2015 - 21:50

मुंज हा आऊट-डेटेड संस्कार वाटतो. पूर्वी मुले गुरुगृही जात त्यामुळे मातृघास वगैरे पद्धती ठीक होत्या. आता कुठे तसं काही असतं?

आडकित्ता Wed, 29/07/2015 - 21:39

In reply to by बॅटमॅन

मुंजीसोबत मयत अन लग्न जोडल्याने, एक 'बावळट' किंवा 'घालवेडा' अशी श्रेणी द्यायची होती. तशी श्रेणी उपलब्ध नाही म्हणून हा प्रतिसाद टंकून तुम्हाला सांगतो आहे.

मुंजीचे आजच्या जगातले महत्व व रिलेव्हन्स याबद्दल जरा निरुपण करा बरे, ब्याटोबा?

.शुचि. Thu, 30/07/2015 - 19:48

In reply to by बॅटमॅन

बॅट्या वाईड बॉल नाहीये बरं का. आता तुझ्याकडे नसतील मुद्दे तर मान्य आहे तदुपरी मुद्दे असल्यास सांगणे करावेच.

नितिन थत्ते Fri, 31/07/2015 - 22:27

In reply to by बॅटमॅन

१. मयत हा काही संस्कार नाही.

२. लग्न आणि मयत या दोन इव्हेण्टचे ऐहिक परिणाम असतात. मुंजीचे तसे काही नसतात (पूर्वीसुद्धा नव्हते).

बॅटमॅन Fri, 31/07/2015 - 22:50

In reply to by नितिन थत्ते

संस्कार = कर्मकांड अशा अर्थी म्हणायचे होते. ऐहिक परिणाम म्हटले तर काही अंशी शिक्षणारंभाशी त्याचे नाते जोडता येते. अर्थात प्रॉपर्टी वगैरेमध्ये फरक पडत नाही हा भाग वेगळा.