Skip to main content

ऐसीकरांच्या बैलाला होssssss

आज सोळा मार्च. आज होळी. म्हणजे 'होली है!' असं ओरडत रंगों की बौछार करत, 'होली के दिन दिल खिल जाते है' वगैरे गात, गवार कुवाऱ्यांना छेडछाड करण्याच्या हक्काची हिंदी होली नाही. होळी - ळी ळी ळी. मऱ्हाठमोळी होळी. आज कुठेतरी खड्डा खणून त्यात लाकडं, गोवऱ्या, नको असलेली फर्निचरं, किंवा नको असणाऱ्या लोकांची फर्निचरं जाळून उग्गीच्च्या उग्गीच आग पेटवण्याचा दिवस. आता आपल्यासारख्या आंतरजालावर जमून गप्पा ठोकणारांना असली आग पेटवणं काही जमणारातलं नाही. पण 'आम्हाला जमत नाय ब्वॉ' असं सरळसोट कारण देण्यापेक्षा आग न पेटवण्याची इतर कारणं मी पुढे करतो.

- त्याचं काय आहे, ती लाकडं जाळणं म्हणजे पर्यायाने झाडं जाळणं, म्हणजे पर्यावरणाचा नाश! ते करणं पाप की हो.

- त्यातच सध्या ग्लोबल वॉर्मिंग चालू आहे. पुण्यात अजून भर मार्च महिन्यात थंडी असली म्हणून काय झालं? पुण्यापलिकडे काही जग आहे की नाही? जे काही आहे ते विशेष महत्त्वाचं नसलं म्हणून काय झालं, काहीतरी एवढंसं आहे ना. काय म्हणता, तिथेही थंडीच आहे... बरं बरं. म्हणून काही ग्लोबल वॉर्मिंग डिनाय होत नै कै. तर अशा ग्लोबल वॉर्मिंगला जागोजागी आगी लावून खतपाणी घालणं म्हणजे पुन्हा पर्यावरणाचा नाश! म्हणजे पापच की हो.

- महाराष्ट्र गारपीटीने ग्रासला आहे. कोट्यवधीचं पिकांचं नुकसान झालं आहे. आणि आपल्या लोकांना जाळपोळ सुचते?

- एक होळी पेटवण्याऐवजी तितक्याच ऊर्जेत १२ मेणबत्ती मोर्चे निघतात. जरा ऊर्जेची गणितं करा.

- गुजरातकडे पहा जरा, लाकडं जाळून होळी करण्याऐवजी ते सौर ऊर्जेने आगीशिवाय शक्ती निर्माण करतात, आणि विकासासाठी वापरतात. असल्या होळ्या करत बसतो म्हणूनच महाराष्ट्र मागे पडतो.

वगैरे वगैरे.

तर मुद्दा काय, की या सगळ्या तात्विक कारणांसाठी आपण ऐसी अक्षरेवर जाळपोळ काही करणार नाहीहोत. पण होळी पेटवली नाही म्हणून काय झालं, होळीच्या मागच्या भावना तर ज्वलंत ठेवता येतातच की. होळीचा उद्देश काय, तर मोठ्ठी आग पेटवून त्यात आपल्या मनातला सगळा कटूपणा बाहेर काढून टाकून जाळून टाकणे. त्यासाठी दोन्ही हात कर्ण्यासारखे तोंडाभोवती धरायचे, मान वर करायची, मोठ्ठा श्वास घ्यायचा आणि बेंबीच्या देठापासून 'अमुकतमुकच्या बैलाला होsssssss' म्हणून आरोळी ठोकायची.

आणि कोणी कोणाच्या नावाने बोंब ठोकायची याला काहीच निर्बंध नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ गरीब बिचारे अनिवासी भारतीय उर्फ हिरवा माजवाले भारतात वारंवार भरणाऱ्या कट्टेकऱ्यांबाबतची आपली मनात असलेली जलन बाहेर काढू शकतील. किंवा आपण निव्वळ भडकाऊ प्रतिसाद देतो म्हणून हे हरामखोर श्रेणीदाते भडकाऊ श्रेणी देऊन प्रतिसाद बंद करून टाकतात याचा काहींना राग असेल, तर त्यांनी तो खुशाल बाहेर काढावा. अगदीच काही नाही तर पाय दिनाला लावलेल्या आर्टवर्कमध्ये लाल रंगाऐवजी एखाद्या मॅक्सीपॅडच्या जाहिरातीप्रमाणे निळा रंग वापरल्यामुळे ते धड दिसतही नाही, तर त्या 'लोगो बदलणाराच्या बैलाला होsssssss' म्हणावं. नुसतं मोघम वर्णन करून नाही, तर शिवाय आयडीचं नाव घेऊनही म्हणा. त्यात आयडीच्या लेखनाची, शैलीची, व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्यं उल्लेखून बोंब मारायला हरकत नाही. जोपर्यंत सगळं मौजमजेत, खेळीमेळीने चाललं आहे तोपर्यंत कोणाच्याही बैलाला हो, नानाची टांग, आबाचा ढोल वगैरे बिनधास्त म्हणा. कोणी तुमच्या बैलाला हो केलं, तर तुम्ही आणखीन तिसऱ्याच्या नानाची टांग म्हणा. पास इट ऑन, शेअर द फन.

मी सुरूवात करून देतो. 'असले बंडल धागे काढून ऐसी अक्षरेची ब्यांडविड्थ फुकट घालवणाऱ्या घासकडवींच्या बैलाला होsssssss'

रुची Mon, 17/03/2014 - 08:06

माझ्या नावाने शंख करणाऱ्यांच्या बैलाला होssssss..

122 120

होळी रे होळी,
पुरणाची पोळी!
पोळी बघून जळणाऱ्यांना
हाजमोलाची गोळी!

मन Mon, 17/03/2014 - 09:07

अलम दुनियेच्या नावानं बोssssss

गब्बर सिंग Mon, 17/03/2014 - 13:18

In reply to by मन

शिव्या देण्यासाठीच निर्माण केलेल्या धाग्यावर सुद्धा एक ही शिवी धड येत नसल्याने शून्यावर धावचीत होणार्‍या, व सात्विकतेप्रति नैष्ठिक निग्रह असणार्‍या व सोज्वळहृदयसम्राट मनोबा च्या नावानं ...... !!!

मिहिर Mon, 17/03/2014 - 09:28

टंकलेखनाच्या खंडीभर चुका करून, 'पूर्वपरीक्षणा'ची सुविधा न वापरून आमचं वाचणं अवघड करणार्‍या मनोबाच्या बैलाला होऽऽऽ!!! ;)

मेघना भुस्कुटे Mon, 17/03/2014 - 10:17

चार म्हराटी वेबसायटींवर हाणामार्‍या करून स्वतःच्या खुजल्यांसाठी हक्काची चूल मांडणार्‍या आणि वर तिथं वातावरण मंगलमय ठेवू पाहणार्‍या विद्रट गुर्जींच्या नावानं....
कायम पॉलिटिकली कर्रेक्ट आणि विद्वान भाषेत बोलल्याचा आव आणून खवचट्ट कमेंटा करणार्‍या मुसुच्या नावानं...
स्त्रीवादाच्या आणि आक्रस्ताळेपणाच्या सीमारेषेवर तळ्यातमळ्यात करणार्‍या विक्षिप्तबैंच्या नावानं....

बोबोबोबोबोऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ

कधीच तोल न सोडता आमच्यासारख्या एक्स्ट्रीमिस्ट लोकांची मारून ठेवणार्‍या रुचीच्या....
खर्रेखुर्रे अभ्यासपूर्ण प्रतिसाद लिहून आमचं अभ्यासाचं पितळ उघडं पाडणार्‍या रोचनाच्या...
महाग ठिकाणी कट्टा नको... अशी कुचकुच कुचकुच करून शेवटी पॉपटेट्सची पोटभर भर करणार्‍या राधिकाच्या....

आबाचा ढोऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽढोऽल.......

लांबलच्च्च्च्चक रिक्कामचोट प्रतिसाद देणार्‍या आणि तळटिपांची फ्याशन संस्थळावर पसरवणार्‍या कुचकट्ट ''न'वी बाजूं'च्या...
लिंका आणि कोट्यांमध्ये अडकून आपल्या लेखनक्षमतेला बुडाखाली कुजवत ठेवणार्‍या नंदनच्या...
सानेगुर्जीमुखवटा चढवून खालमुंडीनं खरडवह्या ढुंढाळणार्‍या आणि गॉसिपची कानोकान खबर ठेवणार्‍या अमुकच्या...

नानाची टिंगणी होऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ

धूमकेतू असल्याच्या थाटात इथे कधीमधी अवतरणार्‍या आणि कट्ट्यावर येऊनच्या येऊन आपलं उच्चभ्रू ब्लॉगर नाक मुरडणार्‍या मणिकर्णिकाच्या...
विदर्भात कट्टा आयोजित न करता इथल्या कट्ट्यांवर जळफळणार्‍या उसंत सखूच्या...
'आपल्याला भेटायला मिळत नाही' म्हणून कट्टेकर्‍यांवर खार खाऊन कोल्हेकुई करणार्‍या अतिशहाण्याच्या....

आबाचा ढोऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽढोऽऽऽल....

भेटून गप्पा ठोकायला नखरे करणार्‍या आणि खरडव्हयांतून विद्वत्ता पाजळणार्‍या बॅट्याच्या....
प्रतिसादातून लोकांना लिहायला उचकवणार्‍या नि स्वतः मात्र 'धागा भरकटतोय'चं पालुपद कुंथत बसणार्‍या मनोबाच्या...
भेटल्यावर आपलं इतिहासज्ञान पाजळणार्‍या नि संस्थळावर त्याबद्दल कधी न लिहिणार्‍या शिष्ट बिकाच्या....

नावानं बोऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ

विद्वत्तेच्या वजनाचा नि प्रतिमेचा गैरफायदा घेऊन मराठीवर संस्कृत लादू बघणार्‍या कोल्हटकरांच्या नावानं..
बोऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ

मला न कळणार्‍या चावट्ट संस्कृत कविता करणार्‍या चिपलकट्टींच्या नावानं....
बोऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ

तर्कानं आणि क्लिष्ट वाक्यरचनेनं आमची मारून ठेवणार्‍या धनंजयच्या नावानं...
बोऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ

१०० वर्षं उशिरा जन्माला येऊन, निरागसपणे प्रश्न विचारून, त्यातून जजमेंट करून... वर आपण त्या गावचेच नाही असा आव आणणार्‍या आणी तोंडावर आपटायला झालंच - तर त्याचं खापर भाषेच्या मर्यादांवर फोडणार्‍या, ऐसीची जान असणार्‍या अरुणजोशींच्या नावानं.... पेश्शल बोबोबोबोबोबोब्ब्बोबोऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ

राजेश घासकडवी Mon, 17/03/2014 - 13:23

In reply to by मेघना भुस्कुटे

दहा प्रतिसादांचा ऐवज एकातच भरून लेखाची प्रतिसादसंख्या कमी करणाऱ्या मेघनाच्या नावाने बोssssssss

बिपिन कार्यकर्ते Tue, 18/03/2014 - 15:38

In reply to by मेघना भुस्कुटे

शर्टाच्या बाहीवर बसलेली माशी उडवताना मारतो तशी टिचकी मारणारी स्मायली आहे का रे कुठे?

;)

आपला,

(शिष्ट) बिपिन कार्यकर्ते

निनाद Mon, 17/03/2014 - 10:38

आज या दिवशी स्वातंत्र्य
मिळाले या प्रसंगी
आपण राखीचे पवित्र बंधन
मान्य केले पाहिजे.
राखीमुळेच सिनेमा चालतो.
थेटर मध्ये दिवे नसतात.
घराघरात दिवे लावले पाहिजेत.
कारण आजच गांधीजींनी
रावणाला मारून
अमेरिकेला स्वातंत्र्य
मिळवून दिले म्हणून या
निमित्ताने आपल्या
सगळ्यांना वाढदिवसाच्या
परत एकदा शुभेच्छा!
मला वाटतय की
भांग थोडी कडक
आहे पण होळीला
रम तर पाहिजेच!
सगळे रमले खेळायला...

एनी वे, हॅप्पी होली,टू
ऑल ऑफ यू अगेन हां!!

Nile Mon, 17/03/2014 - 11:45

लोकांना शिव्या द्यायला होळीची वाट पाहणा-यांच्या बैलाला .. होऽऽऽ नाही म्हणणार. तुम्हा रिकामटेकड्या लोकांचे बैल हाकायला वेळ कोणालाय इथे!

राजेश घासकडवी Mon, 17/03/2014 - 12:00

In reply to by Nile

सर्वद्वेष्टे असूनही ऐसीवर अजून बॅनच काय पण बोंबा मारायची वेळ आल्यावर लोकांना शिव्या घालण्यापुरती आठवणही येत नाही या कल्पनेने जळजळ झालेल्या नायल्याच्या बैलाला होssss

तिरशिंगराव Mon, 17/03/2014 - 12:49

समस्त आजी,माजी आणि पाजी सभासदांच्या, कंपूबाजांच्या आणि एकुलांच्या बैलाला मोठ्ठा घो!

काळा मठ्ठ बैल … Mon, 17/03/2014 - 13:27

गाय आपली माता असते
बैलाचा अपमान म्हण्जे
गोमातेच्या बापभावाचा अपमान
पण याद राखा
लाट आल्ये
आमचा जातभाई
दिल्लीत मुसंडी मारतोय
त्याला पण
अंधारात राहाय्ला आवडतं
त्याच्या सिंगांना
टोक आहे
तुमच्या त्या पांढरी दाडी
सिंगासारखं बावळ्ट नाही ते
बैलांचा राजा दिल्लीत
मग बघाच तुम्च्या गल्लीत
आवो मारी साथे
नैतर पडेंगी लाथे

मी Mon, 17/03/2014 - 13:49

१. डू आयडी घेउन 'ऐसीवर' गोंधळ न घालणार्‍यांच्या बैलाला
२. डू आयडीच न घेतलेल्यांच्या बैलाला
३. कुरुसुंदीकरांच्या बैलाला
४. एकमेकांना श्रेणी देउन 'तु माझी पाठ खाजव, मी तुझी पाठ खाजवतो' असे करणार्‍यांच्या बैलाला
५. 'रुमाल' टाकुन ठेवणार्‍यांच्या बैलाला
६. +१ करणार्‍यांच्या बैलाला
आणि सरते शेवटी समष्टीच्या बैलाला...

चिंतातुर जंतू Mon, 17/03/2014 - 14:23

वाराणसीहून खास ऐसीकरांसाठी...

Title: Man performing with large phallus while waving to the camera
Benares, India
Holi Festival
Date ca. 1970
Gedney, William Gale, 1932-1989
स्रोत : Duke Digital Collections, ड्यूक युनिव्हर्सिटी
William Gedney Photographs and Writings
Duke University David M. Rubenstein Rare Book & Manuscript Library
http://library.duke.edu/digitalcollections/gedney/

चिंतातुर जंतू Mon, 17/03/2014 - 14:57

In reply to by मन

प्रतिसाद का काढला ते समजलं नाही. होळी ही तुंबलेल्या गोष्टींचा निचरा करून मन मोकळं करण्यासाठीच असते. माझा त्या प्रतिसादाला अजिबात आक्षेप नाही.

मन Mon, 17/03/2014 - 15:03

In reply to by चिंतातुर जंतू

मला वाटलं मला तुमचा प्रतिसाद समजला नाही.
(त्यात सद्य वाराणसीबद्दल काही क्रिप्टिक मेसेज वाटलं.पण मनोबांना तो समजला नसावा असं वाटलं.)
असो. मग पुनःप्रतिसाद देत आहे.
मूळ प्रतिसाद :-
हात्तेच्या .
वाराणसी हा शब्द पाहून मला वाटलं काहीतरी सवंग किंवा निदान खमंग , प्रचारकी असं काहीतरी वाचायला मिळणार.
पण असं सवंग काही लिहिण्यात पुन्हा एकदा घोर अपयश आलेलं दिसतं.
.
.
पुढची सुचलेली ओळ :-
इतकी महत्वाची घडामोड प्रतिसादातून टिपायची सोडलित.
आपण देशभक्त असण्याचं सर्टिफिकेट मिळवायची संधी गमावलीत.

राजेश घासकडवी Tue, 03/03/2015 - 01:05

In reply to by वृन्दा

मन? कोण मन? तुम्हाला 'आता आवरा की चर्चा' म्हणायचं आहे का? हे हरामखोर सदस्य सतत नाव बदलत असतात त्यामुळे नक्की कोणाच्या नावाने बोsssssss करायचं हे पण कळत नाही. तेव्हा उग्गाच्च्या उग्गाच सदस्यनाम बदलण्याच्या प्रवृत्तीच्या नावाने बोsssssss असं म्हणतो.

वृन्दा Tue, 03/03/2015 - 01:08

In reply to by राजेश घासकडवी

एक तर सदस्यनाम बदलायचं मस्त मस्त स्वातंत्र्य द्यायचं अन वर ते उपभोगल्यास शिव्या द्यायच्या असा दुटप्पीपणा करणार्‍या राघांच्या बैलाला हो.

राजेश घासकडवी Tue, 03/03/2015 - 01:13

In reply to by वृन्दा

मनोबाला अनुषंगून त्याने दाखवलेल्या प्रवृत्तीला बोलल्यावर उग्गाच्च्या उग्गाच स्वतःच्या अंगावर ओढवून घेऊन त्यावर निषेध करायला उभ्या राहिलेल्या हर्मिट क्रॅबच्या बैलाला हो. या क्रॅबचा एकांत 'हर' घडी 'मिट' जाये असं म्हणत कानावर कडकडून बोटं मोडतो.

वृन्दा Fri, 06/03/2015 - 19:34

In reply to by गब्बर सिंग

गब्बर तुला तो विनोद माहीत आहे का .... बसंती धन्नो च्या मागे घोड्यावर स्वार अनेक डाकू लागतात. तेव्हा बसंती म्हणते "धन्नो भाग, मेरी इज्जत तेरे हाथमे है"
तेव्हा धन्नो म्हणते "मेरी इज्जतको भी तो खतरा है" = ))
अरे जितके डाकू तितकेच घोडे असतात ना. हाहाहा

परी Fri, 06/03/2015 - 14:51

क्रमशः म्हणून चांगल्या लेखाचे पुढचा भाग लवकर न टाकणार्यांच्या बैलाला होऽऽऽऽऽ
लेखाला प्रतिसाद न देणाऱ्याच्या बैलाला होऽऽऽऽऽ J) J) J) J) J) J) J) J) J) J)

चिमणराव Fri, 06/03/2015 - 15:22

होळीत टाकलेला नारळ वेळीच बाहेर काढून खोबरं खाऊ न देता त्याचा कोळसा करवणाऱ्यांच्या बैलाला ढोऽऽऽल.

चिंतातुर जंतू Mon, 13/03/2017 - 15:06

In reply to by अनुप ढेरे

>> बैलाला हो....

बैलाला नको गाईला करा हो.

(तक्रार : ब्लॉककोटातले शेवटचे 'लेस दॅन‌' खाल्ले जातायत हो...)

अबापट Mon, 13/03/2017 - 15:23

१. जुना लोकांच्या भावना भडकावणारा धागा परत वर काढून , सामाजिक अशांती पसरवणाऱ्या ढेरेशास्त्रींच्या बैलाला .....
२. फालतू कारणे देऊन कट्ट्याला न येणाऱ्या ढेरे , जंतू , ऋषिकेश , थत्ते , बॅटमॅन आणि सगळ्यात हरामखोर अभ्याच्या बैलाला ....
३. ४० अब्ज डॉलरचे हिरे घेऊन येऊन , कोणालाही त्यातील एकही हिरा न देणाऱ्या आणि कट्ट्याला यून स्वतः गप्प बसणाऱ्या मनोबाच्या बैलाला ...
४. शोषणवादी , कॅपिटॅलिस्ट , लिबेरटेरिअन तुणतुणे हाय डेसिबल ला सारखे वाजवून ( चुकून दुसऱ्या कोणाचा आवाज आलाच तर त्याला हॅ हॅ हॅ म्हणून गप्प करणाऱ्या ) त्या दोंघांच्या बैलाला ... डब्बल हो ..( त्या दोघांना मी अनु ल्लेखाने मारतोय )
५. कर्मठ , परंपरावादी , प्रतिगामी , जरठ विचारयांच्या सगळ्यांच्या बैलाला ...
६. स्वतः कट्टर पुरोगामी असूनही प्रतिगामी कातडं पांघरणाऱ्या सगळ्यांच्या बैलाला ...
६. घनघोर वादाच्या वेळी कुंपणावर बसणाऱ्या आबाच्या बैलाला ... ( आमचा बॅट्या बघ जरा .... )
७. कायम गायब असणाऱ्या घासू गुर्जी आणि मुक्तसुनीत च्या बैलाला .... ( मालक झालात म्हणून काय झालं ? .... )
६. केवळ उच्चंभ्रू बेअरिंग पातळ होईल म्हणून उंची दारू ची लालूचहि टाळणाऱ्या जंतू च्या बैलाला ...

कोण कोण राहिले ? , आचरट , अजो , अदिती आणि शुचि मामी .. त्यांना सोडलं या वेळेला , कारण अजो , आचरट आणि माझा शेक हॅन्ड आहे सध्याला , अदिती आमच्या पार्टीतील आहे , आणि शुचि मामी फार म्हणजे फार 'कर्केच्या 'चांगल्या आहेत , त्यांना काय बोलणार

अभ्या.. Mon, 13/03/2017 - 15:27

In reply to by अबापट

सगळ्यात हरामखोर अभ्याच्या बैलाला ....
३. ४० अब्ज डॉलरचे हिरे घेऊन येऊन , कोणालाही त्यातील एकही हिरा न देणाऱ्या आणि कट्ट्याला यून स्वतः गप्प बसणाऱ्या मनोबाच्या बैलाला ...

हरामखोर तर हरामखोर. त्याचं कै नै एवढं.
ते मनोब्याने हिरे आनलेत त्याचं काय? काय म्याटरए? वाजवायचा का गेम? निम्मे देतो तुम्हाला.

गब्बर सिंग Tue, 14/03/2017 - 09:21

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

परन्परावादी नसलात तरी परन्परा (रस्म्) पाळलीत्. जय हो !!!

आँखों से ही पिला दो थोड़ी सी के अब होश में रहना नही है
क्या हाल है मेरा खुद आके देखो अपनी जुबान से कहना नही है

गब्बर सिंग Tue, 14/03/2017 - 09:30

मार्क्स च्या बैलाला हो.

आज त्याची पुण्यतिथी आहे. विश्वाच्या इतिहासातला सर्वात मोठा अतिरेकी.