ऐसीकरांच्या बैलाला होssssss
आज सोळा मार्च. आज होळी. म्हणजे 'होली है!' असं ओरडत रंगों की बौछार करत, 'होली के दिन दिल खिल जाते है' वगैरे गात, गवार कुवाऱ्यांना छेडछाड करण्याच्या हक्काची हिंदी होली नाही. होळी - ळी ळी ळी. मऱ्हाठमोळी होळी. आज कुठेतरी खड्डा खणून त्यात लाकडं, गोवऱ्या, नको असलेली फर्निचरं, किंवा नको असणाऱ्या लोकांची फर्निचरं जाळून उग्गीच्च्या उग्गीच आग पेटवण्याचा दिवस. आता आपल्यासारख्या आंतरजालावर जमून गप्पा ठोकणारांना असली आग पेटवणं काही जमणारातलं नाही. पण 'आम्हाला जमत नाय ब्वॉ' असं सरळसोट कारण देण्यापेक्षा आग न पेटवण्याची इतर कारणं मी पुढे करतो.
- त्याचं काय आहे, ती लाकडं जाळणं म्हणजे पर्यायाने झाडं जाळणं, म्हणजे पर्यावरणाचा नाश! ते करणं पाप की हो.
- त्यातच सध्या ग्लोबल वॉर्मिंग चालू आहे. पुण्यात अजून भर मार्च महिन्यात थंडी असली म्हणून काय झालं? पुण्यापलिकडे काही जग आहे की नाही? जे काही आहे ते विशेष महत्त्वाचं नसलं म्हणून काय झालं, काहीतरी एवढंसं आहे ना. काय म्हणता, तिथेही थंडीच आहे... बरं बरं. म्हणून काही ग्लोबल वॉर्मिंग डिनाय होत नै कै. तर अशा ग्लोबल वॉर्मिंगला जागोजागी आगी लावून खतपाणी घालणं म्हणजे पुन्हा पर्यावरणाचा नाश! म्हणजे पापच की हो.
- महाराष्ट्र गारपीटीने ग्रासला आहे. कोट्यवधीचं पिकांचं नुकसान झालं आहे. आणि आपल्या लोकांना जाळपोळ सुचते?
- एक होळी पेटवण्याऐवजी तितक्याच ऊर्जेत १२ मेणबत्ती मोर्चे निघतात. जरा ऊर्जेची गणितं करा.
- गुजरातकडे पहा जरा, लाकडं जाळून होळी करण्याऐवजी ते सौर ऊर्जेने आगीशिवाय शक्ती निर्माण करतात, आणि विकासासाठी वापरतात. असल्या होळ्या करत बसतो म्हणूनच महाराष्ट्र मागे पडतो.
वगैरे वगैरे.
तर मुद्दा काय, की या सगळ्या तात्विक कारणांसाठी आपण ऐसी अक्षरेवर जाळपोळ काही करणार नाहीहोत. पण होळी पेटवली नाही म्हणून काय झालं, होळीच्या मागच्या भावना तर ज्वलंत ठेवता येतातच की. होळीचा उद्देश काय, तर मोठ्ठी आग पेटवून त्यात आपल्या मनातला सगळा कटूपणा बाहेर काढून टाकून जाळून टाकणे. त्यासाठी दोन्ही हात कर्ण्यासारखे तोंडाभोवती धरायचे, मान वर करायची, मोठ्ठा श्वास घ्यायचा आणि बेंबीच्या देठापासून 'अमुकतमुकच्या बैलाला होsssssss' म्हणून आरोळी ठोकायची.
आणि कोणी कोणाच्या नावाने बोंब ठोकायची याला काहीच निर्बंध नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ गरीब बिचारे अनिवासी भारतीय उर्फ हिरवा माजवाले भारतात वारंवार भरणाऱ्या कट्टेकऱ्यांबाबतची आपली मनात असलेली जलन बाहेर काढू शकतील. किंवा आपण निव्वळ भडकाऊ प्रतिसाद देतो म्हणून हे हरामखोर श्रेणीदाते भडकाऊ श्रेणी देऊन प्रतिसाद बंद करून टाकतात याचा काहींना राग असेल, तर त्यांनी तो खुशाल बाहेर काढावा. अगदीच काही नाही तर पाय दिनाला लावलेल्या आर्टवर्कमध्ये लाल रंगाऐवजी एखाद्या मॅक्सीपॅडच्या जाहिरातीप्रमाणे निळा रंग वापरल्यामुळे ते धड दिसतही नाही, तर त्या 'लोगो बदलणाराच्या बैलाला होsssssss' म्हणावं. नुसतं मोघम वर्णन करून नाही, तर शिवाय आयडीचं नाव घेऊनही म्हणा. त्यात आयडीच्या लेखनाची, शैलीची, व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्यं उल्लेखून बोंब मारायला हरकत नाही. जोपर्यंत सगळं मौजमजेत, खेळीमेळीने चाललं आहे तोपर्यंत कोणाच्याही बैलाला हो, नानाची टांग, आबाचा ढोल वगैरे बिनधास्त म्हणा. कोणी तुमच्या बैलाला हो केलं, तर तुम्ही आणखीन तिसऱ्याच्या नानाची टांग म्हणा. पास इट ऑन, शेअर द फन.
मी सुरूवात करून देतो. 'असले बंडल धागे काढून ऐसी अक्षरेची ब्यांडविड्थ फुकट घालवणाऱ्या घासकडवींच्या बैलाला होsssssss'
घासकडवींच्या बैलाला...
होळीचे काही एवढे नाही. आमची प्रतिभा(!) धुळवडीला अधिक फुलते. त्यामुळे काहीतरी केमिकल लोचे करुन आपल्या फायद्यासाठी आपल्या फळबागेला आगाऊ बहर आणण्याचा प्रयत्न करणार्या शेतकर्यासारखे वीकेंड चढतो न चढतो तोच (उतरायची तर बातच सोडा!) होळी पेटवून तिच्यावरच आपली सिग्रेट शिलगावून कोपर्यात तृप्त मिष्किल झुरके घेत उभे राहाणार्या घासकडवींच्या बैलाला हो....
बोंब मारण्याचे फायदे
ऐसीकरांना सूचना - बोंब मारताना शास्त्रशुद्ध धार्मिक पद्धतीनेच बोंब मारावी. कारण बोंब म्हणजे हुताशनी निनादाचे स्थुलातून प्रकटीकरणाचे प्रतीक होय. योग्य पद्धतीने बोंब मारल्यास अनेक फायदे होतात. जसे की शक्तीच्या सर्पिलाकार वलयाचे प्रक्षेपण, आणि चैतन्याच्या वलयातून प्रवाहाचं प्रक्षेपण वगैरे वगैरे. अधिक माहितीसाठी हा अनमोल लेख वाचावा.
.. गवार कुवाऱ्यांना छेडछाड
.. गवार कुवाऱ्यांना छेडछाड करण्याच्या ..
च्याय्ला! पूर्वी चवळीच्या शेंगेची उपमा देत असत. आजकाल गवारीवर आलंय का?
बाकी आमच्या बैलाला नेहेमीप्रमणेच यंदाही कर्तव्य नअसल्याने आमच्या बैलाला भोऽऽऽऽऽ करत कुणी कितीही गायी आणाल्या- आय मीन बोंबा ठोकल्या तरी आमच्याकडून वेल्कमच
डाक्तर होणे अर्धवट सोडणार्या
डाक्तर होणे अर्धवट सोडणार्या आडकित्त्यांच्या बैलाला हो SSSSSS
हॅ
चक्क आत्मपरिक्षण, चिंतन वगैरे करून भांडणातली सारी मजा, सारा त्वेष हिरावून घेणार्या गब्बरच्या बैलाला होऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ
+१
शुद्ध आणि अभिजात मराठी संस्थळावर मध्येच बंगालीचे ज्ञान पाजळणार्या बॅटॅच्या बैलाला हो...sssssss
शुद्ध आणि अभिजात मराठी संस्थळावर मध्येच संस्कृतची टामटाम करणार्या बॅटॅच्या बैलाला हो...sssssss
शुद्ध आणि अभिजात मराठी संस्थळावर मध्येच अरबी का कुठल्या मसण्या सह्या टाकणार्या बॅटॅच्या बैलाला हो...sssssss
उत्सुकतेने बोंब मारणाऱ्या बैलाला हो ssss ...
१. मुंबै पुण्यातल्या कूपमंडूकांच्या बैलाला हो sssss काणकी बेडकाने कितीही छाती फुगवली तरी तो बैल होत नाही हो ssss
२. वेगळ्या विदर्भाच्या बैलाला हो ssss
३. मी सभासद नसलेल्या संस्थळांच्या बैलाला हो ssss आणि असलेल्या ऐसिच्या बैलाला डब्बल होssss हो sss
४ विनोदाचे स्पष्टीकरण देणार्या बैलाला हो ssss
५ . प्रेमभंगाचा चिखल तुडवणार्या कवड्यांच्या बैलाला हो sss
एरवी नक्को तिथे वाद घालत
एरवी नक्को तिथे वाद घालत बसतील, आणि अॅडमिनना सभ्य संवादाची मर्यादा पाळली जाते की नाही हे तपासण्यासाठी भिंग लावायला लावतील. पण मारा बोंबा म्हटलं तर 'तुम्ही व्हा पुढं, आम्ही आहोतच इथे' असं म्हणतील. युसलेस साले.
तेव्हा बोंबा मारायच्या धाग्यावर बोंबा मारणं सोडून नुसतीच मजा बघत बसलेल्या किंवा या धाग्याकडे लक्ष न देता संसारात रमलेल्या किंवा असंच आपलं लोळत पडलेल्या इतर सर्व ऐसीकरांच्या बैलाला होsssss
१. मध्येच पिना मारणार्या
१. मध्येच पिना मारणार्या अनुप ढेरेच्या बैलाला होऽऽऽऽऽ
२. कॉकटेलं अन मॉकटेलं का काय ती सगळी अपेयं टाकून टीटोटलरांना फुक्क्क्कट जळवणार्या सोका(वलेल्या)जीनानांच्या बैलाला होऽऽऽऽऽ
३. खौचट नि दूष्ट शेर्यांना दुजोरा देणार्या शहराझादांच्याही बैलाला होऽऽऽऽऽ
४. सगळीकडे विदा, विदा, विदा करणार्या घासूगुर्जींच्या बैलाला(विद्याला) होऽऽऽऽऽ
५. इतरांना नुस्त्या पिना मारून स्वतः लेखनकष्ट न घेणार्या मनोबाच्या बैलाला होऽऽऽऽऽ
६. निरागसपणे बिगर निरागस प्रश्नांची माळका टाकून ऐसीचा सर्व्हर तुंबवणार्या ठाममत अन परंपराप्रेमी अरुणजोशींच्या बैलाला होऽऽऽऽऽ
७. स्त्रीवादमार्तंडिनी अदितीच्या गाईला होऽऽऽऽऽ
८. शब्दांची जबाबदारी उचलावयास नकार देणार्या चिंतातुर जंतूंच्या बैलाला(जंतूला) होऽऽऽऽऽ
९. चवदार ब्रेडचे फटू टाकून लोकांना फुक्क्क्कट जळवणार्या रुचीतैंच्या बैलाला(ब्रेडाला) होऽऽऽऽऽ
१०. सर्वद्वेष्ट्या अन मृतमध्यमवर्गीय निळ्याच्या बैलाला होऽऽऽऽऽ
११. झालंच तर लोकांना घाबरवणार्या मेघनाच्याही बैलाला होऽऽऽऽऽ
१२. कोटिभास्कर नंदनच्या बैलाला होऽऽऽऽऽ
१३. खवपिनमारक अमुकच्या बैलाला होऽऽऽऽऽ
१४. आणि सर्व हुच्च(भ्रू) लोकांच्या बैलाला होऽऽऽऽऽ
कवितेचं रसग्रहण असो किंवा एक
कवितेचं रसग्रहण असो किंवा एक उलटा टाका दोन सुलटे टाके टाइप शाल विणण्याची कृती असो, कुठचाही विषय शेवटी सरकार टॅक्स लावून बिच्चाऱ्या श्रीमंतांना कसं छळते या विषयावर गाडी नेऊन मग शिकागो स्कूल, ऑस्ट्रियन स्कूल वगैरे लोकांना काय्येक (हायेक नव्हे) न कळणाऱ्या गोष्टींचं नेमड्रॉपिंग करणाऱ्या गब्बरच्या बैलाला होsssss
टॅक्स चा विषय बळजबरीने वसूल
टॅक्स चा विषय बळजबरीने वसूल करण्याचा असूनही पद्धतशीरपणे टा़ळणार्यांच्या बैलाला SSSSSSSSSSSSS
---
श्रीमंतांवर अनन्वित अत्याचार करणार्यांच्या बैलाला SSSSSSSSSSSSS
---
ज्यांची कत्तल करणेच फक्त योग्य आहे अशा फडतूस गरीबांना (एक पै ही टॅक्स न घेता) वेल्फेअर, सेवा सुविधा, कर्जमाफी/कर्जमुक्ती, लाडली लक्ष्मी योजना, रोहयो देणार्यांच्या बैलाला SSSSSSSSSSSSS
ज्यांची कत्तल करणेच फक्त
ज्यांची कत्तल करणेच फक्त योग्य आहे अशा फडतूस गरीबांना (एक पै ही टॅक्स न घेता) वेल्फेअर, सेवा सुविधा, कर्जमाफी/कर्जमुक्ती, लाडली लक्ष्मी योजना, रोहयो देणार्यांच्या बैलाला SSSSSSSSSSSSS>>
गरीबांच्या भलाईसाठी आणलेल्या ओबामाकेअर योजनेला विरोध करणार्या गब्बरच्या बैलाला होऽऽऽऽ.
वर्गविहीन समाजाच्या उभारणीत खोडा घालणार्या गब्बरच्या बैलाला होऽऽऽऽ.
डी-क्लास होण्यास विरोध करणार्या गब्बरच्या बैलाला होऽऽऽऽ.
युनिअनिजमचा विरोध करत अल्पसंख्य धनदांडग्याचा हायर-अँड-फायर हक्क मात्र स्वीकारार्ह मानणार्या गब्बरच्या बैलाला होऽऽऽऽ.
उद्योगधंद्यांवर सरकारी नियंत्रणे नकोत असा आग्रह धरताना उद्योगधंद्यांच्या अकौंटिबिलीटीबाबत मौन बाळगणार्या गब्बरच्या बैलाला होऽऽऽऽ.
:)
गोsss
१. महामूर्ख ऐसीकरांच्या (अ) बैलाला गो sssssss
२. उत्क्रांतीचा ३६० कोटी वर्षांचा व्हिडिओ (ब) रियलटाईममधे प्रत्यक्ष पाहिलेल्या लोकांच्या बैलाला गो sssss. ज्या लोकांनी त्यामागचा १०० कोटी वर्षांचा इतिहासही व्हिडिओत पाहिला त्यांच्या गाइचाही गोssss
३. बिग बँगच्या वेळेस (क) (निष्कारण) कानात बोळे घालून आणि डोळ्यावर प्रारण रोधक चष्मा घालून उभे असणारांच्या कालवडीला गोsssss
४. मास्लोच्या पिरॅमिडमधला हालचालीचा प्रत्येक सजीवाचा गुप्तमार्ग मुख्पाठ असणार्या समाजशास्त्र्यांच्या (ड) म्हशींला गोsssss
५. ज्यांच्या पूर्वजांना किंवा ज्यांना स्वतःला देवाने /देवीने/ देवने अधिकृत संस्थेकडून मिळालेले (इ) certificate of having created universe दाखवले आहे त्यांच्या फार्ममधल्या सगळ्या प्राण्यांला गोssss
६. शास्त्रज्ञांचे अतींद्रीय शोध ज्यांना कळतात, पटतात अशा वैज्ञानिक दृष्टिकोन असणार्या अतींद्रीय दांडुकेधार्यांच्या (फ)समस्त सजीव विश्वाला गोssss
फूटनोटा-
अ. आता हे लिहायचे गरज नाही, पण या विधानाचा अर्थ "सारे ऐसीकर महामूर्ख आहेत" असा होत नाही. विशिष्ट वाक्यरचनेचा विशिष्ट मर्यादेपलिकडे अर्थ होत नाही.
ब. म्हणजे व्हिडिओची लांबी ३६० कोटी वर्षे. उगाच गैरसमज नको.
क. ही वेळ महत्त्वाची आहे. बिग बँगेच्या फटाक्याला यांच्यापैकीच कोणी पेटवले असणार.
ड. इ हे सर्टी. त्या चमकणार्या ३ डी लोगोसहीत
इ. ही शुद्ध जळजळ आहे. काय कसे झाले असावे याची समान उत्सुकता असताना काही विशिष्ट लोकांनाच देवाने/देवीने/देवने/उत्क्रांतीने सगळे कळायची जास्त शक्ती बुद्धी का दिली असावी म्हणून.
यात १ बद्दल अजून एक टीप
यात १ बद्दल अजून एक टीप द्यायची राहिली. या विधानाचा अर्थ, in any case, अरुणला ऐसीवर किमान दोन लोक महामूर्ख आहेत असा होतो, असे सिद्ध करता येते इ इ वाटेल. पण असे नाही.
उदा. मी असे म्हणालो असतो - " ऐसीवरील श्रीमंत सदस्यांच्या बैलाचा गो sssss". याचा अर्थ असा होत नाही कि मला पक्के माहित आहे ऐसीवर कोणी विशिष्ट वा किमान दोन सदस्य श्रीमंत आहेत. पण कोणी असतील तर नक्कीच गो ssss.
अहो अशा टिपा नाही दिल्या
अहो अशा टिपा नाही दिल्या तर
१. स्वातंत्र्य आणि त्यासोबत येणार्या जबाबदार्या
२. आरोप आणि हेत्वारोप यांचेतील फरक
३. निरागसतेच्या आडोशाने मुद्दाम खोडसाळ बोलणे लपवता येत नाही
४. विदादान पद्धतींचे गुण आणि दोष
इ इ विषयांवर लेक्चर्स ऐकून घ्यावी लागतात.
चला त्या निमित्ताने, विषय सोडून व्यक्तिच्याच नावाने बोंबा मारणार्या बैलांचा गो ssss.
पाळी, वैगेरे बद्दल बोलणे
पाळी, वैगेरे बद्दल बोलणे स्त्रीयांचे प्रागतिक लक्षण आहे (आणि सामान्य बाब नाही) अशी मागास भावना अध्याहृत असणारे विधान लिहिणार्या आणि "स्त्रीया (अशा क्षुद्र गोष्टीसाठी )लाजत आहेत" असा पुरुषप्रधानवादी संस्कृतीचा शब्द वापरणार्या घासकडवींच्या बैलाच्या शेपटाच्या शेवटच्या केसाच्या शेवटच्या रेणूचा होsss, गो ssss आणि सगळे दीर्घ ओकार.
दिनवैशिष्ट्यात होळीचा उल्लेख
दिनवैशिष्ट्यात होळीचा उल्लेख न करणार्या किंवा लोगोमधे होळीचे प्रतीक न दाखवणार्या संपादकांच्या बैलाला....
एक संपादक होळीवर धागा काढतो पण दिनवैशिष्ट्य किंवा लोगो न बदलणे(ह्या प्रत्येक कामासाठी वेगवेगळे संपादक आहेत असे समजून) ह्यातून संपादकांमधे असलेली दुही स्पष्ट होत आहे का? ;)
१.माझ्या खरडवहीत कधीच काहिही
१.माझ्या खरडवहीत कधीच काहिही न लिहिणार्या सगळ्यान्च्या बैलांचा घोsssss... (केतकी सोडून..)
२.सगळ्याच संस्थळांवर शाणपणा मारणार्या सुपरहिरोंच्या बैलाचा घोsssss...
३.फार प्रश्ण विचारणार्या आणि फार प्रश्ण पडणार्या येड्यांच्या बैलाचा घोsssss...
४. दारुड्यान्च्या बैलाचा घोsssss...
५. तसा सगळ्यांच्याच बैलाचा घोsssss..., त्यांच्या आबाचा ढोsssssल, त्यांच्या नानाची टांsssssग...(मी सोडून आणि केतकी सोडून)
शंका (सवांतर)
(१) बैलाला 'हो' की 'घो'? (दोन्हीं लोकप्रवाद ऐकण्यात आलेले आहेत.)
(२) 'बैलाला हो/घो'चा नक्की अर्थ काय?
(२अ) 'घो'चा कोंकणी अर्थ घेतल्यास, 'बैलाला नवरा' यातून नेमके कोणते संकेत अभिप्रेत आहेत?
(२ब) 'हो'चा आमच्या अमेरिकन (कृष्ण?)बोलीतील (स्ल्यांग?) अर्थ लक्षात घेतल्यास कदाचित हा वाक्प्रचार अर्थपूर्ण ठरू शकावा. त्या परिस्थितीत, हा वाक्प्रचार अमेरिका-भारत सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या फलिताचा भाग असण्याची शक्यता काय असावी?
असो.
- आमच्या बैलास अद्याप अनुल्लेखाने मारू पाहणार्या सर्वेजनांच्या बैलाला घोऽऽऽऽ!!!
- आमच्या (अनुल्लेखाने मारलेल्या) बैलाला बचकभर ए-१ ष्टेकसॉऽऽऽऽस!!!
नुकतेच वाचलेले
नुकतेच वाचलेले येथे देतोय, एंजॉय माडी.
---------------------------------------------
संस्कृत शॊलॆ
* बसंती किम तव नामधेयं ?
* बसंती अस्य सारमॆयापरॊक्शं नृत्यं न करिष्यामि।
* : ठाकुर इदं हस्तं मह्यं ददासि ।
: न ।
: ठाकुर इदं हस्तं मह्यं ददासि । (louder)
: न ।
: ठाकुर इदं हस्तं मह्यं ददासि ।( loudest )
: न ।
एषा मम कथा
तत्कारनेन अहम त्वया बन्दुकम न ददाति शक्तुम
* गब्बर: श्वान: अहम् त्वम् न सॊडयामि
* भो ग्रामवासी सा बसंती सा मम खलु रोचते
किन्तु तस्या मौसी नाट्यम करिष्ये।
* हा हा. अहम् आंग्लकालॆन कारागृह अधिक्शक: भवति ।
* बंधॊ: एशाम् स्मशानशांतता किम् कारणॆन भवति
* रे गब्बरः एषाम हस्ता न भवति
एषाम फासाय फंदः सन्ति ।
* सरदारःवयं सर्वे तव लवणं भक्षयति स्म
अतः गोली खादयती त्वम
* वसंतॊत्स्वम् दिनम् ह्रदयम् उन्मिलित: भवन्ति।
रंगानाम् रंगम् एकरूप: भवन्ति ।।
* यदा आंग्लपुरुष: मृत्यु: भवति तदा तेन सुसाइड इति वदन्ति
* यत्व प्राणम असती तत्त्व अहम नृत्यते अहम नृत्यते अहम नृत्यते
* यः भयभीतः
सः मृतः भवति
* वसंतॊत्सवम् किम् मुहूर्तम्? किम्?
सरदार:, इति 17 मार्चे
गल्ली: न चुकन्ति
वसंतॊत्सवम् किम् मुहूर्तम्? किम्?
सरदार:, इति 17 मार्चे
...
बंधॊ: एशाम् स्मशानशांतता किम् कारणॆन भवति
संस्कृतात बोलणारे हे इमाममहोदय गझनीच्या महमूदाचे वंशज असावेत, की अल्लोपनिषद लिहिणारा जो कोणी असेल, त्याचे?
असो. संस्कृत अनेक ठिकाणी गंडल्याचे माझ्यासारख्या संस्कृत नीटसे न येणार्यालाही दिसते, पण आजच्या दिवसापुरते ते होळीत घालायला प्रत्यवाय नसावा.
बोंबा ठोकण्याबद्दल
आमच्या कॉलेजजीवनात मुलग्यांच्या प्रसाधनगृहात वाचलेल्या भित्तीलेखांमधे एक ओळ होती : "**** ऑल गर्ल्स". तेव्हाही मी विश्वबंधुत्वाशी सामंतर्य साधणार्या या अशा शब्दांना दाद दिली होती. म्हण्टलं वा. काय व्याप्ती आहे यांच्या इच्छेची. जवाब नहीं.
तद्वत् "सर्व ऐसी अक्षरेच्या वाचकांच्या आणि वाचनमात्र असलेल्या शुभचिंतकांच्या बैलाला हो. नानाची टांग. नि आबाचा खुळखुळा."
बैलांचा विषय निघाला तरच आपली
बैलांचा विषय निघाला तरच आपली शिंगं उजेडात बाहेर काढणाऱ्या, आणि एरवी अंधारात लपून बसणाऱ्या मठ्ठ काळ्या बैलाच्या बैलाला होsssss