का रे बा विठ्ठ्ला का न भेटी मला?

का रे बा विठ्ठ्ला का न भेटी मला?

का रे बा विठ्ठ्ला का न भेटी मला? ||धृ||

गेलो तुळशी मंजीरा घ्याया
तेथे न तू गावला राया ||१||

गेलो राऊळी शोधाया
शोध व्यर्थ गेला वाया ||२||

चंद्रभागेकाठी तू न सापडेना
तुझ्याविण मन शांत होईना ||३||

शोध घेतला शोध घेतला
अंती नाही तू भेटला ||४||

पाषाण म्हणे का शोधसी इथेतिथे
चित्ती तुझ्याच विठ्ठल वसे ||५||

- पाभे

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

सोपी सुंदर कविता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कवितेचे विड्॑बन करण्याचा प्रयत्न करत आहे. (पाषाणभेद या॑ची माफी)
प्रश्न : का रे बा विठ्ठ्ला का न भेटी मला? ||धृ||
गेलो तुळशी मंजीरा घ्याया
तेथे न तू गावला राया ||१||
उत्तर : भक्ता मी तेथे गावणार कसा
सा-या भक्ता॑नी माझ्या तुळशी म्॑जीरा खुडल्या ||१||

प्रश्न :गेलो राऊळी शोधाया
शोध व्यर्थ गेला वाया ||२||
उत्तर : भक्ता॑च्या गर्दिने जीव गुदमरला माझा
सोडली राउळे मी नाही तिथे आता ||२||

प्रश्न : चंद्रभागेकाठी तू न सापडेना
तुझ्याविण मन शांत होईना ||३||
ऊत्तर : च्॑न्द्रभागेकाठी मला पाय् ठेववेना
भक्ता॑च्या पपा॑नि सारा किनारा भरला ||३||
प्रश्न : शोध घेतला शोध घेतला
अंती नाही तू भेटला ||४||
ऊत्तर : शोध घेउनिया माझा मी भेट्णार नाही तुला
मुर्ति रुपाला माझ्या मी सोडुनी आलोया ||४||
प्रश्न : पाषाण म्हणे का शोधसी इथेतिथे
चित्ती तुझ्याच विठ्ठल वसे ||५||
उत्तर : भक्ता फक्त तुच ओळ्खले मला
विठ्ठल दिसे त्याला ,चित्ती वसे मी ज्याच्या ||५||

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0