छायाचित्रण पाक्षिक-आव्हान २९ : पॅटर्न
आपल्याला आजूबाजूला अनेक पॅटर्न दिसतात, पुन:पुन्हा घडणारी, दिसणारी भौमितिक किंवा इतर कोणतीही घटना. जुन्या देवळांमधल्या शिल्पांमधे दिसणारी नियमितता, किंवा तारांच्या जाळीतली नियमितता, किंवा ऋतूंमधे दिसणारी नियमितता, किंवा वागण्या-बोलण्याचे पॅटर्न्स हा या आव्हानाचा विषय आहे. एकावर एक आलेले, वेगवेगळे पॅटर्न्स (उदा: हा फोटो पहा.) बघायला आवडतील.
याशिवाय विषयाचा काही वेगळा अर्थ लावला तरीही स्वागतच आहे.
------------
अनेक वेळा कच्चे फोटो हे काहीसे धूसर आणि रंगांनी कमी संपृक्त असतात. गिंप, पिकासासारख्या चित्रसंस्करण प्रणाली वापरून छायाप्रकाशभेद, रंगप्रमाण बदलून तर चित्र खुलविता येतील. तसेच योग्य प्रमाणात कातरल्याने मांडणीही संतुलित आणि आकर्षक होऊ शकते. तसा प्रयत्न जरूर करावा आणि केलेले संस्करण नमूद करावे.
स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:
१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही. स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी धरले जाणार नाही.
२. एका सदस्याला जास्तीत जास्त ३ चित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करता येतील. जर/जी छायाचित्रे स्पर्धेसाठी नसतील तर प्रतिसादात ठळकपणे तसे नमूद करावे.
३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परिक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व निरीक्षक असे चालू राहील.)
४. ही स्पर्धा २ आठवडे चालेल. म्हणजे आज सुरू होणार्या स्पर्धेचा शेवट १९ जानेवारी रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल. २० जानेवारी रोजी निकाल घोषित होईल व विजेती व्यक्ती पुढील विषय देईल.
५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिपण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. अर्थात तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त, निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.
६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठराविकच निकष लावावेत असे बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाची व्यक्ती आव्हान देईल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले, तरी अपेक्षा जरूर आहे.
७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच विजेता/विजेती घोषित करणे बंधनकारक आहे.
८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.
९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.
१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.
----------
सूचना : 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर आपली चित्रे कशी प्रदर्शित करावीत, याबद्दल अधिक मार्गदर्शन या धाग्यावर आहे. त्याचा लाभ घ्यावा.
चित्रे या संकेतस्थळावर टाकताना, जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर ते फोटो इंटरनेट एक्सप्लोरर् (९) वर दिसत नाहीत. (पण फायरफॉक्सवर दिसतात.) यावर उपाय म्हणजे Width आणि Height दोन्ही रोमन अंकांमध्ये द्यावेत किंवा त्यांचा उल्लेखच इमेज टॅगमधून वगळावा. कृपया याची नोंद घ्यावी.
----------
मागचा धागा: सावली, आणि विजेते छायाचित्र.
प्रतिक्रिया
हे नागांव समुद्रकिनार्यावरील
हे नागांव समुद्रकिनार्यावरील छायाचित्र आहे.
लाटांसारखा दिसणारा पॅटर्न हा त्रिमित नाही. म्हणजे वाळूवर उंचसखल लाटा नाहीत. वाळूचा प्रूष्ठभाग पूर्ण सपाट आहे. हे पॅटर्न दोन रंगांच्या वाळूतून भरतीच्या लाटांनी बनले आहेत.
कॅमेरा ऑलिंपस एस झेड १४
नॉन डी एस एल आर असल्याने भिंगे वगैरे काही नाही.
एक्स्पोजर १/२५० सेकंद
आय एस ओ ८०
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
चित्र स्पर्धेसाठी नाही.
चित्र स्पर्धेसाठी नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
(No subject)
कॅमेरा- आयफोन ४.
-Nile
मस्त!!!!!!!!!!!!!!!!
मस्त!!!!!!!!!!!!!!!!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
गवाक्ष : हळेबीड-बेलूर मंदिरे
चित्र स्पर्धेसाठी नाही.
Camera: Canon PowerShot S2 IS
ISO: n/a
Exposure: 1/60 sec
Aperture: 3.5
Focal Length: 16mm
Flash Used: No
१. कॅलिडोस्कोपमधून
Camera : NIKON COOLPIX L120
ISO : 800
Exposure : 0.7692308 sec
Aperture : 3.1
Focal Length : 5mm
Flash Used : No
२. 'ओळखी'चा पॅटर्न्
Camera : NIKON COOLPIX L120
ISO : 500
Exposure : 1/10 sec
Aperture : 4.7
Focal Length : 23mm
Flash Used : No
टांगत्या फोल्डरांची रास
टांगत्या फोल्डरांची रास
कॅमेरा : सामसंग (मोबाईल, गॅलॅक्सी एस३)
उघडीप : १/११९
छिद्र : f/2.6
केंद्रमान : ३.७ मिमि
ISO : ८०
फ्लॅश : होय
चित्र दिसत नाहिये
पण तिघंजणं 'रोचक' म्हणतायत ...
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
हे चालते का बघू
हे चालते का बघू :
१. दिपमाळ (निमगाव-दावडी)
Camera - NIKON D50
Lens - Sigma 10-20mm
Exposure -1/320 sec
Aperture -9.0
१. कबुतरे आणि चिमण्या
Camera - NIKON D50
Lens - AF-S DX VR Zoom-Nikkor 55-200mm
Aperture -10.0
Focal Length -55mm
३. कमानी(निमगाव)
Camera - NIKON D50
Lens - AF-S DX VR Zoom-Nikkor 55-200mm
Aperture -1/250 sec
Aperture 8.0
चित्र स्पर्धेसाठी नाही.
कारण साध्या काँपॅक्ट डीजीटल कॅमेराने काढलेले आहे.
संपादकीय टिपः width="" height="" टाळावे
संवाद
राजहंसाचे चालणे | भूतळी जालिया शाहाणें | आणिकें काय कोणें | चालावेचिना?
स्पेर्धेत देण्यासाठी चित्रे
स्पेर्धेत देण्यासाठी चित्रे ठराविक क्यामेरानेच काढलेली हवीत असे कोणतेही बंधन नाही. चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप हवीत इतकेच
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
पण त्यामुळे मला त्याच्या शटर
पण त्यामुळे मला त्याच्या शटर स्पीड, अॅपर्चर लेन्स वगैरे बद्दल काहीही सांगता येत नाहीय.
संवाद
राजहंसाचे चालणे | भूतळी जालिया शाहाणें | आणिकें काय कोणें | चालावेचिना?
पिकासा किंवा अशा कोणत्या
पिकासा किंवा अशा कोणत्या सॉफ्टवेअरमधे दिसत असेल ही माहिती तर ठीक. नाहीतर कॅमेऱ्याचं नाव लिहीलं तरी ठीक. फोटो महत्त्वाचे. बाकी सगळं पुढचं पुढे पाहू.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
नियमांतही स्पष्ट म्हटलंय की
नियमांतही स्पष्ट म्हटलंय की 'शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत' तेव्हा बिंदास आगे बढो
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
चित्रे आवडली पण....
पहिली दोन चित्रे ही चित्रे म्हणून आवडली परंतु 'पोत' या विषयासाठी अधिक समर्पक ठरली असती असे वाटते. पहिल्या दोन चित्रांत निदान सुरकुत्यांचा काही आकृतीबंध दिसतो पण तिसर्या चित्रात कसला आकृतीबंध (वा आकारसंगती) आहे ते कळले नाही.
हार्मनी इन केऑस
मला उलट आलेल्या चित्रातील हे तिसरे चित्र अधिक रोचक वाटले.
इथे काहितरी समान धागा - संगती आहे हे जाणवतेय पण काय ते सांगता येत नाहिये. पुन्हा पुन्हा बघावे आणि नक्की कुठे बघावे हे ठरवू न देणारे तिसरे चित्र अधिक आवडले.
आकृतीबंध/संगती माहित नाही पण काहितरी 'हार्मनी इन केऑस' धर्तीचं वाटतंय.. अगदीच वेधक! ('मुक्तहस्तचित्रां'त नै का काही चित्र सिमेट्रिक असायची नंतर इंटरमिजिएटला असिमेट्रिक झाली तरी अंगभूत काहितरी असायचंच. किंवा काही छान मुक्तछंदातल्या कवितांतही छुपा ठेका/लय असावा/वी तसं काहीस!)
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
या स्पर्धेची मुदतवाढ होण्याची
या स्पर्धेची मुदतवाढ होण्याची काही शक्यता आहे का? वर लिहिल्यानुसार 19 जानेवारीला स्पर्धा संपते.
अदिती चित्रांचा निकाल
अदिती चित्रांचा निकाल लावेपर्यंत.. आय मीन स्पर्धेचा निकाल देईपर्यंत स्पर्धा चालु आहे असे समजा.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
निकाल-मुदतीचा पॅटर्न्
गेल्या काही आव्हानांत निकालाची मुदत न पाळण्याचा बिहेवियरल् पॅटर्न् दिसू लागला आहे असे एक निरीक्षण नोंदवतो.
अमुक, मार्मिक आणि विनोदी
अशी श्रेणी दिली आहे.
मर्मविनोदी
धन्यवाद.
(नर्मविनोदीच्या चालीवर) 'मर्मविनोदी' अश्या नव्या श्रेणीची शिफारस करणार काय ?
(होऊ द्यात खर्ची, श्रेणी आहे घरची, वगैरे वगैरे..)
नावं ठेवून झालेली आहेतच तर २६
नावं ठेवून झालेली आहेतच तर २६ जानेवारीपर्यंत फोटो टाका. २७ जानेवारीच्या सोमवारी निकाल जाहीर करता येईल. या निमित्ताने चांगले फोटो बघायला मिळत आहेत.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
धन्यवाद
आज टाकते फोटो!
या कारणामुळे मुदत वाढवता येईल
या कारणामुळे मुदत वाढवता येईल की. जास्त लोकांनी भाग घेणं महत्त्वाचं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मुरुड जंजिरा
- (फोटोजेनिक) सोकाजी
ब्लॉग हा माझा...
अरेच्चा, फोटॉ कट झाला -
अरेच्चा, फोटॉ कट झाला
- ('निकाल' लागला ह्या विचाराने हळहळणारा) सोकाजी
ब्लॉग हा माझा...
आता बघ. तु(ही) width=""
आता बघ. तु(ही) width="" height="" टाकलं होतंस
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
फोटो छान, पण सॉरी, यात पॅटर्न
फोटो छान, पण सॉरी, यात पॅटर्न काय आहे?
बुरुजसदृश्य भिंतींचे
बुरुजसदृश्य भिंतींचे सिलींड्रीकल पॅटर्न्स!
- (पॅटर्न दिसत नाहीयेय का हा प्रश्न पडलेला) सोकाजी
ब्लॉग हा माझा...
बहुतेक प्रखर सूर्यप्रकाश
बहुतेक प्रखर सूर्यप्रकाश नसल्याने बुरूज असे वेगवेगळे दिसत नाहीयेत. पण मी माझ्या मॉनीटरचा ब्राइटनेस वाढवून पाहिला तेव्हा दिसले.
हे माझे
स्पर्धेसाठी वेळेत बसत असेल तर!
कॅमेरा: कॅनन एसएक्स २००, बाकी माहिती पिकासावर उपलब्ध आहे.
गोड गोमटा पॅटर्न!
मला हा फोटो दिसतोय कि नाही हे काहीच कळत नाहीये. दिसत नसल्यास जरुर कळवावे, मी घरुन परत प्रयत्न करुन बघेन.
-मयुरा.
१.सेल्यूलर जेल २. गारेगार
१.सेल्यूलर जेल
२. गारेगार गोळा
३.लालेलाल
४.पेपर क्विलिंग पॅटर्न्स
पायर्या
कॅनन 1000 D,
1/500 से., f/7.0 , आयएसओ 200 , 17.0 मिमि.
संस्करण : 'डार्कटेबल' ही चित्रसंस्करण प्रणाली वापरून - मूळ चित्र रंगीत होते, ते कृष्णधवल केले. अनावश्यक भाग कातरला. छायाप्रकाशभेद आणि सुस्पष्टता वाढवली.
३. भंजाळलेला पॅटर्न् ?
.
Camera: NIKON COOLPIX L120
ISO: 80
Exposure: 1/40 sec
Aperture: 3.1
Focal Length: 4.5mm
Flash Used: No
अरे काय हे!
किती तो अश्लीलपणा?
अमुकरावांनाकडून तरी अशी अपेक्षा नव्हती ब्वॉ!
(आज, २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक मुहुर्तावर बॅन होणार मी असं दिसतंय!)
-Nile
बॅनरत्न
२६ जानेवारीच्या निमित्ताने बॅनरत्न, बॅनविभूषण, बॅनभूषण, बॅनश्री, इ. सर्व सन्मान पात्र अश्या व्यक्तीस जाहीर करावेत अशी व्यवस्थापकांना विनंती.
अय्या , मी सुद्धा ब्यानप्रवण :)
ब्यानोत्सुकशी थोपू फ्रेंडशिप :D> होताच मी सुद्धा ब्यानप्रवण झाले आहे . ;;) मला संपादक महोदय ऐसिवरून काढून
टाकण्याच्या धमक्या देऊ लागलेत .
खायचे पॅटर्न्स.
"
NIKON D90
f stop- f/4
Exposure-1/1000S
स्पर्धेसाठी नाही
एडफू येथील हॉरस मंदीरातील खांब
आवडले. इयत्ता नौवीत असताना
आवडले. इयत्ता नौवीत असताना पाहिलेल्या 'द ममी' नामक पिच्चरने इजिप्तप्रेमाचे रोपण मनात केले त्याची आठवण झाली.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
खिडाक्या
(उशीर झाला असला तरी)
कॅमेरा : सॅमसंग फोनवरचा. मग चित्र कातरून कृष्णधवल केले.
पाऊलखुणा
कॅमेरा : सॅमसंग फोनवरचा
या वेळच्या पाक्षिक(!) आवाहनात
या वेळच्या पाक्षिक(!) आवाहनात बरीच वेगवेगळी चित्रं आली. आणि बहुतेकशी चित्रं मला आवडली. त्यामुळे पहिलं कोण, दुसरं कोण हे सांगणं कठीण आहे.
या धाग्यात नियमितपणे फोटो न टाकणाऱ्या लोकांनीही पॅटर्न मोडला हे आवडलं.
अतुल ठाकुर यांचे पहिले दोन फोटो आवडले, पण त्याबद्दल अमुकच्या मताशी सहमत आहे. सगळे बदाम एकत्र रचलेले आणि कोपऱ्यात एकच आक्रोड किंवा जर्दाळू असं काहीतरी थोडं लांबून पहाताना त्यात नियमितता, पॅटर्न आणि त्याचा भंग होणं, अशी काहीतरी माझी कल्पना आहे. नितिनच्या चित्रातून होणारा त्रिमितीचा भास, बोका यांच्या चित्रातून एशरच्या चित्रांची आठवण होणं, रटाळ काम वाटणाऱ्या फायलींच्या थप्प्यांमधली नियमितता रोचक आहे. प्राचीन शिल्पकलेत नियमितता दिसते ती ही बघायला आवडली. पण रोजचं, तेच-तेच आणि रटाळ वाटणारं घरकाम-स्वयंपाक पण त्यातून तयार होणाऱ्या खाण्यापिण्यातली नियमितता चित्रांमधून आवडली. लाडू वळणे, केक बनवणे किंवा केतकीने दाखवलेल्या नीट कापलेल्या कलिंगडाएवढी मी कशावरही घेतली नसती, पण फोटो पाहिल्यावर असं काहीतरी करावंसं वाटलं. अमुकच्या दोन कल्पना, 'ओळखीचा' पॅटर्न आणि भंजाळलेला पॅटर्न दोन्ही आवडले; चित्रसुद्धा सफाईदार आहेत. या सगळ्या माझ्या कल्पना; वेगवेगळ्या लोकांची मतं वेगवेगळी असणारच. आव्हानाच्या निमित्ताने प्रतिसादांतून वेगवेगळी मतं नियमिततेने दिसावीत अशी अपेक्षा आहे.
मला सगळ्यात आवडला तो गारेगार गोळा. फोटोत दिसणारा भगभगीत प्रकाश, अशा हवेत हवासा वाटणारा गोळा, या भावनेतली नियमितता, आणि चित्राचा विषय असं सगळंच आवडलं. पुढचा विषय केतकीने द्यावा.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
धन्यवाद
पुढचा विषय लवकरच देते.