ब्रेकिंग न्यूजची आस
आजची शिक्षणपद्धति
पसरणारी वेश्यावस्ती
हाँलमधला टिवी
टायलेटमधला पेपर
कमोडवर बसून वाचलेल़्या
करप्शनच्या बातम्या
रात्रीच्या बाँमबहल्ल्यात फक्त बारा ठार
बसचा शेड नसलेला स्टाँप
एक बेवारस बँग
घरी परतण्याआधी
मला निकामी करा
बाँम्ब विव्हळतो
शहराच्या पायथ्याला
डेरे टाकून बसलेल्या झाडाची मूळ
उखडत आहेत मूळापासून
लीव इन मध्ये मूव होणच चांगल आहे
नाहीतर कुत्र्यासोबत राहा
वीकेंडला कुठे बीअर प्यायची
बीअरचा फेस
आणि माझा देश एकच आहे
सी यू अँट न्यूली ओपनड इटालियन रेस्तरां
आणि नंतर आईस्क्रीम खायला जाउया
आईस्क्रीम वितळेपर्यंत
ट्रफिकपण शांत झाली असेल
मला फक्त फ्लँटवर पोचायच आहे
सुखरूप
आणि रात्रीच्या बातम्या
ब्रेकिंग न्यूज
प्रतिक्रिया
नामदेव ढसाळ 'स्टाईल'!
नामदेव ढसाळ 'स्टाईल'!