Skip to main content

२०१३ विधानसभा अंदाज व प्रत्यक्ष निकाल: मध्य प्रदेश

राजस्थान व छत्तीसगढनंतर आज निवडणूक होत असलेल्या मध्यप्रदेशाकडे बघुयात. त्याची सद्यस्थिती व इतिहास असा:

मध्य प्रदेश २००८

पक्ष जागा मतांची टक्केवारी
काँग्रेस ७१ ३२.४%
भाजपा १४३ ३७.६%
बसपा ९%
जनशक्ती ४.७%
सपा २%
अपक्ष ८.२
मध्य प्रदेश २००३

पक्ष जागा मतांची टक्केवारी
काँग्रेस ३८ ३१.६
भाजपा १७३ ४२.५
बसपा ७.३
सपा ३.७%
अपक्ष ७.७%
इतर ७.२

असे दिसते की २००३ पेक्षा २००८ मध्ये काँग्रेसची मते व जागा वाढल्या आहेत मात्र काँग्रेसला सत्ता मिळणे अजूनही लांब होते. त्याचवेळी भाजपाची मते ६%ने कमी झाली.

२००९चे लोकसभा निकाल बघितले तर हा कल काँग्रेस व भाजपामध्येअम्धील अंतर अधिकच कमी झालेले दिसते. लोकसभेचा कल बघितला तर काँग्रेसने १०० जागांच्याआसपास भाजपापुढे मुसंडी मारलेली दिसते. तुर्तास अंदाज वर्तवण्यासाठी प्रत्येक मतदारसंघाचा विचार करून अंदाज देत आहे.
त्याआधी माझे गृहितक मांडतो:
-- भाजपा सौम्य अ‍ॅन्टि-इन्क्म्बन्सीला सामोरी जात आहे (किमान ०.७५% ते १.५% मतांचे नुकसान)
-- ज्योतिरादित्य सिंदीयांचा काही ठराविक ग्रामिण भागात चांगला प्रभाव (त्या भागात काँग्रेसच्या मतांत १.५%पर्यंत वाढ)
-- मोदींच्या देशपातळीवर नेतृत्त्व घोषणेमुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांपेक्षा अधिक उत्साह आहे, मात्र जनतेमध्ये स्थानिक मुद्देच अधिक प्रभावी.
-- भाजपा व काँग्रेस निवडणूका होईपर्यंत कोणत्याही नव्या मूलभूत चुका करत नाहीत.

अंदाजः

पक्ष माझा अंदाज CNN-IBN इंडीया टुडे इंडीया टिव्ही-सी वोटर ORG Poll ABP न्यूज CNN-IBN एग्झिट पोल प्रत्यक्ष निकाल
काँग्रेस ९५-१०० ५२-६२ ७८ ८१ ७८ ६५ ६७-७७ ५८
भाजपा ११५-१२६ १४८-१६० १४३ १३३ १४० १५५ १३६-१४६ १६५
बसपा ७-८
इतर ३-४ २१ १६ १६ १३-२१

थोडक्यात माझ्यामते मध्यप्रदेश सलग तिसर्‍यांदा भाजपा राखेलही पण बहुमत कमी झाले असेल अथवा अगदी निसटते असेल.
सदर धाग्यावर तुमचेही अंदाज, मध्यप्रदेश निवडणूकांसंबंधीच्या बातम्या, चर्चा आल्यात तर अधिक मजा येईल. शेवटी निकाल लागल्यावर याच धाग्यावर प्रत्यक्ष विदा दिला जाईल. तुमचे ढोबळ अंदाज किंवा विजेते पक्षाचे/आघाडीचे नावाचा अंदाज केला असल्यास तेही द्यावे.

सदर अंदाज हा अत्यंत वैयक्तिक असून यासाठी कोणताही सर्व्हे घेतलेला नाही. निव्वळ आकडेमोडीवर आधारीत अंदाज काढून, एकेक मतदारसंघाचा इतिहास अभ्यासून व्यक्त केलेला ढोबळ + 'कंसर्व्हेटिव्ह' अंदाज आहे. या अंदाजासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केलेला नाही

ऋषिकेश Mon, 25/11/2013 - 15:12

In reply to by अजो१२३

दिल्लीचे अंदाज देण्याचा विचार रहित करावा असे माझे मत बनत चालले आहे. 'आआप'ची हाईप किती आणि प्रत्यक्ष प्रभाव किती हे समजायला काहीच बेस नाही. :(
दिल्लीचं काहीच कळत नैये

ऋषिकेश Mon, 25/11/2013 - 15:19

In reply to by बॅटमॅन

ओह.. एम्पीकर वाचलेच नाही.. माय बॅड

बाकी मध्यप्रदेशात 'मोदी फॅक्टर' किती आहे याबद्दल मात्र मी साशंक आहे.
माझे काही स्थानिक मित्र म्हणाले की त्यांच्या सभांना विशेष म्हणावा असा प्रतिसाद नव्हता.

फक्त आज दुपारपर्यंत मतदान कमी झाल्याच्या बातम्या येताहेत. ते भाजपाला पथ्यापर पडू शकते.

मन Mon, 25/11/2013 - 15:24

In reply to by ऋषिकेश

मतदानाची कमी टक्केवारी ही सत्ताधारी, इनकम्बण्ट पक्षास सहाय्यक ठरते हा अलिखित नियम आहे.
टक्के वाढले, ही अ‍ॅण्टी इन्कम्बन्सी येण्याची शक्यता दाट होते.(दाट कसली, खात्रीच होते.)

ऋषिकेश Tue, 03/12/2013 - 16:48

In reply to by बॅटमॅन

उद्या दिल्लीत निवडणूक आहे. ढोबळ अंदाज बांधायचाच तर विरोधी मतांचं विभाजन होऊन काँग्रेसला निसटतं बहुमत मिळेल असे वाटते.

मन Mon, 25/11/2013 - 15:25

बिगर भाजप निवडणुकीनंतरची आघाडी (बसप + कॉंग्रेस) काठावर येण्याची शक्यता जास्त वाटते.

राजेश घासकडवी Tue, 26/11/2013 - 09:40

निवडणुकांमध्ये ७०% मतदान झाल्याची बातमी वाचली. मोठ्या संख्येने लोक आले याचा अर्थ सरकारविरोधी मतदान अधिक झालं असा होतो का?

मन Tue, 26/11/2013 - 09:43

In reply to by राजेश घासकडवी

भूतकालीन ट्रेंडवरून/प्याटर्नवरून नजिकच्या भविष्याचा वेध घ्यायचा, तर तसच (सरकारविरोधी मूड आहे) म्हणावं लागेल.
ज्योतिरादित्य सिंधिया ह्यांचा विजय असो.
भारत के लोगो एक बार फिर दिग्गी फॅमिली को एम पी का राजमुकुट पहनते देखो.
ढिच्यांग ढिच्यांग

ऋषिकेश Tue, 26/11/2013 - 10:05

In reply to by राजेश घासकडवी

साधारणतः असं होतं

पण यंदा हेच कारण आहे की नाही सांगणं कठीण आहे कारणः
१. पहिल्यांदा मतदानास पात्र ठरलेल्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ आणि हा ग्रुप आधीच्या पिढीइतका राजकीय दृष्ट्या उदासीन नाही
२. मतदार याद्या ठिक करण्यात निवडणूक आयोगाने घेतलेले कष्ट
३. अधिक सोयीस्कर जागी व संख्येने अधिक पोलिंग बुथ
४. अधिक चांगली सुरक्षा व्यवस्था

या व्यतिरिक्त "यापैकी कोणीच नाही" हा पर्याय असल्याने आणखी काही व्यक्ती बाहेर पडलेल्या असु शकतात.

मात्र ओव्हर ऑल विचार करता सॉफ्ट अ‍ॅन्टी एन्कंबसी असण्याची शक्यता धरूनच अंदाज वर्तवले होते. (मी केलेल्या गणितात ६५ ते ७०% टर्नाअऊट धरला होताच त्यामुळे अंदाजात बदल करायची गरज वाटत नैये

ऋषिकेश Thu, 05/12/2013 - 10:30

मध्य प्रदेशातही माझे अंदाज चुकलेले असण्याची शक्यता अधिक आहे.
इथेही भाजपा गेल्यावेळइतक्याच जागा मिळवू शकेल. ज्योतिरादित्यांची निव्वळ हवा होती / लिमिटेड भागात प्रभाव पडला असे दिसते.

राजेश घासकडवी Thu, 05/12/2013 - 19:27

म्हणजे एक्झिट पोलनुसार मध्य प्रदेशात जैसे थे परिस्थिती राहणार तर.

मध्य प्रदेशातही माझे अंदाज चुकलेले असण्याची शक्यता अधिक आहे.

तुमच्या अनुभवानुसार एक्झिट पोल्स कितपत अचूक असतात? मला काहीच कल्पना नाहीये.

विषारी वडापाव Sun, 08/12/2013 - 10:44

सौ बातो की एक बात. कांग्रेस चा धुव्वा उडाला आहे. देशाच्या या भागात कांग्रेस विरोधी लाट आहे हे स्पष्ट आहे. पण मोदी लाट आहे का याबद्दल माझ्या मनात काही शंका आहेत . मध्य प्रदेश मधल्या विजयाचे श्रेय शिवराज सिंग चौहान याना जाइल . त्यांनी सरकार खूप चांगल्या प्रकारे चालवले. दिल्ली आणि छत्तीसगड मध्ये मोदी factor फारसा चालला नाही हे तर स्पष्टच आहे . राजस्थान मध्ये मात्र मोदी factor चालला असे मानायला भरपूर वाव आहे. या विजयाने भाजप हुरळून जाणार असेल तर ती मोठी चूक ठरेल . २००३ मध्ये भाजप ने विधानसभा निवडणुकात असाच clean स्वीप केला होता मात्र लोकसभा निवडणुकीत त्याना पराभव स्वीकारावा लागला . यावेळेस्चे भाजप नेतृत्व अति आत्मविश्वास मोड मध्ये जाण्याची चूक करणार नाही हि अपेक्षा . बाकी दोन मोठ्या पक्षाना उरावर घेऊन दिल्ली मध्ये घवघवीत यश मिळवणारे अरविंद केजरीवाल आणि सुशासन देऊन आक्रस्ताळा प्रचार न करता सलग ३ री टर्म मिळवणारे शिवराज सिंग चौहान हे पप्पू आणि फेकू पेक्षा या निवडणुकांचे मोठे नायक .

बाकी कॉंग्रेस आणि भाजप हे दोन्ही भ्रष्ट पक्ष हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे रास्त मत असणार्या अनेक लोकांच्या मनात आप च्या यशाने आशा पालवल्या आहेत .

पूर्ण विजार Sun, 08/12/2013 - 11:47

अल कायदा गेली, तालिबान आले.

शीला दीक्षित केजरीवालांपेक्षा ५००० मतांनी मागे आहेत. राजस्थान मधे गेहलोतांनी चांगले काम करूनही काँग्रेस पिछाडीवर आहे. कारणमीमांसा काय असेल ते असो, काँग्रेसचा धुव्वा उडालेला स्पष्ट दिसतो आहे. दिल्लीत आपला मिळालेलं यश पाहता मतदारांनी काँग्रेसवरचा राग व्यक्त करतांना पर्याय ठरू शकेल अशा पक्षाची निवड केली आहे हे दिसतं. भाजपाची लोकप्रियता वाढली किंवा लाट आली असा त्याचा अर्थ नसून नकारात्मक कौलाचा फायदा जिथे जो निवडून येऊ शकेल त्याला झालेला आहे. वास्तविक दिल्लीत शीला दीक्षितांना भरपूर कामं केली आहेत. भारतातल्या कुठल्याच राज्यात, शहरात नसतील इतकी विकासकामं इथं झालीत. पण विरोधकांनी पाणीप्रश्नाचा मुद्दा केला ज्याला उत्तरच दिलं गेलं नाही. राजस्थानात विकासकामांबद्दल बोलू नका असा फतवा एकदा काढला गेला, तर एकदा मुख्यमंत्री याबाबत बोलतील असा फतवा काढला गेला. याचा परिणाम म्हणून प्रचार विस्कळीत झाला. पण शिस्तशीर प्रचाराने किती फरक पडला असता ?
हा राग राज्यातल्या सरकारांविरुद्ध नसून केंद्रातल्या युपीए २ च्या काळात उघडकीस आलेल्या महाघोटाळ्यांचा आणि त्यांच्या हाताळणीबद्दलचा आहे हे स्पष्ट आहे. विरोधकांना शुभेच्छा ! राजकारणात संधी मिळेपर्यंत संयम ठेवावा लागतो हेच खरं. केजरीवालांना केवळ जनलोकपाल एके जनलोकपाल करून चालणार नाही हे लवकरच कळून येईल. त्यांच्या नेतृत्वाचा कस आता ख-या अर्थाने लागणार आहे. त्यांच्या हातात सहा महीने आहेत. लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत.

सत्ताधा-यांवरचा राग निघाल्याने जनतेत असलेली नकारात्मक लाट ओसरण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. झाल्या चुकांपासून धडा घेऊन काँग्रेस कम बॅक करेल का ? शंकाच आहे. त्यासाठी जे धडाडीचं नेतृत्व लागतं त्याची वानवा दिसते आहे. मौनव्रतात जाऊन जनतेचा राग शांत होण्याची ते वाट पाहतील असं वाटतं. दुसरीकडे मोदींच्या मुद्यांतला तोचतोचपणा जाणवला कि त्यांचा कंटाळा येऊ शकतो. अर्थात प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात काश्मीरमधे जाऊन ३७० व्या कलमाबद्दल हेतुपुरस्सर वक्तव्य करून चर्चा छेडण्याच्या कल्पकतेला दाद द्यायला हवी. ही हर्चा त्यांना अब्दुल्ला किंवा नॅकॉ कडून हवी होती असं दिसतं. या पार्टीलाही मोदींनी चर्चा छेडल्याने आनंद झाला असेल. दोघांना आपले मतदार खूष ठेवून दूर गेलेल्या मतदारांना बोलवण्यासाठी त्याचा उपयोग झाला, ज्याचा आणखी फायदा काँग्रेसला बसला असावा.

विश्लेषण होत राहील. इथं थांबतो.

चायवाला Mon, 09/12/2013 - 15:32

In reply to by पूर्ण विजार

भाजपाची लोकप्रियता वाढली किंवा लाट आली असा त्याचा अर्थ नसून नकारात्मक कौलाचा फायदा जिथे जो निवडून येऊ शकेल त्याला झालेला आहे. >>

अय्या हो? मोदी लाट स्पष्टपणे दिसते आहे. इतके भरघोस यश भाजपाला कधीच मिळाले नव्हते.
असो तुम्ही लिहीत रहा. चांगली करमणूक होते.

अवांतरः वीरू, अर्धवटराव, भारतिय कुठे आहेत?

ऋषिकेश Mon, 09/12/2013 - 16:00

In reply to by चायवाला

मोदी लाट स्पष्टपणे दिसते आहे. इतके भरघोस यश भाजपाला कधीच मिळाले नव्हते.

म्हणजे तुम्हाला "भारतात" मोदी लाट आहे असे म्हणायचे आहे? की हे विधान राजस्थान पुरते सिमीत आहे?

बॅटमॅन Mon, 09/12/2013 - 18:13

In reply to by चायवाला

सहमत. महाराष्ट्राच्या वरच्या एका प्रदेशात तरी नक्कीच आहे. गुजरातच्या एका भागाला "लाट" देश अशी बहुत प्राचीन संज्ञा आहे हा निव्वळ योगायोग नसावा.

राजेश घासकडवी Sun, 08/12/2013 - 11:25

आत्ता एनडिटिव्हीवर २२९ जागांकडून कल दिसत आहेत
भाजपा १५०
कॉंग्रेस ६७

म्हणजे भाजपाला ७ जागा गेल्यावेळपेक्षा जास्त. कॉंग्रेसला ३ जागा कमी.