Skip to main content

बहरलेला वृक्ष होतो एकदा मी छानसा

बहरलेला वृक्ष होतो एकदा मी छानसा
दूर गेली फूल पाने एकटा मी हा असा

जन्मता मी खूष झाले का बरे गणगोतही
जीव होता पुरुष माझा नवस जन्माचा तसा

देवही ना जाणतो तो मुकुटचोरी जाहली
मी सदा डोकावतो झोळीत माझ्या का असा

मॉलमध्ये जात असता खूप असतो खूष मी
लांब असताना भिकारी मीच बघतो का खिसा

श्वानही वर मान करुनी आज भुंकेना मला
राव असता मान होता आदबीचा या बसा

विदेश Wed, 23/11/2011 - 15:44

अरेच्चा ! इथे गझल आणि प्रतिक्रिया दिसत आहे , मग नवीन लेखन आणि कविता या अनुक्रमणिकेत का दिसत नाही ?