Skip to main content

वॅलेंटाईन्स डे...

नेहमीच्या वेळेआधीच मी जागा होतो, अलार्मला अजून एक तास अवकाश आहे. आज काय समोर मांडलयं कोणास ठाऊक. फकिंग प्रोबॅबिलिटी!!

अलार्म मोड ऑफ करून मी उठतो. अरिझोनातील गुलाबी सकाळ, डोक्यात घुटमळणार्‍या अनिश्चिततेने वेगळाच उत्साह भरल्यासारखा जाणवतोय. अ‍ॅड्रेनलिन.. की एन्डॉर्फिन्स?

फोर्टीन फेब..

साला, बाप जन्मात फोर्टीन फेब माझ्या आयुष्यात येईल असा विचार कधी केला नव्हता. पुरोगामी विचारसरणी असली तरी याबाबतीत आम्ही प्रतिगामीच! बारमध्ये वगैरे जाऊन पोरींना प्रपोज करायची कधी हिंमत वगैरे झाली नाही. डेटिंगच्या सीटकॉम्स जरा लवकर पाहिल्या असत्या आयुष्यात तर काहीतरी उपयोग तरी झाला असता. शेवटी हिय्या करून ऑनलाईन डेटींग साईटवर रजिस्टर केलं. पण तरी स्वतःहून कोणाला मॅसेज करायची हिंमत होत नव्हती. डेटिंगसाईटचं अ‍ॅप मात्र भारी होतं, डेट्स अ‍ॅक्टीव्ह इन युवर एरिया वगैरे. आम्ही आपलं महिनाभर फोटो बघणे, प्रोफाईल्स चाळणे वगैरे अभ्यास करत होतो. अरिझोना फार कंझर्वेटिव्ह आहे, इथल्या 'गॉड फिअरींग' पोरी काय ब्राउन स्कीनवाल्यात इंटरेस्ट दाखवणार? असं वाटायला लागलं होतं. एके दिवशी ऑफिसात फोनवर नोटीफिकेशन आलं. ब्ला ब्ला मेसेज्ड यू! टिपीकल मेसेज, प्रोफाईल आवडलं वगैरे वगैरे. उत्तर देताना परिक्षेत केला नसेल एव्हढा विचार केला. मॅनेजमेंटमध्ये शिकवतात तसली सगळी कन्व्हर्सेशनल स्किल्स वाचून काढली. एखाद्या अमेरीकन पोरीने स्वतःहून मेसेज करण्याची शक्यता इतकी कमी होती की, उत्तराला उत्तर मिळवण्याशिवाय पर्याय नव्हता. थोड्याश्या मेहनतीने हे जमलं. पुढे इमेल देवाण घेवाण झाली, टेक्स्ट झाले आणि फोनवर बोलणंही झालं. भेटायचं ठरलं. सगळीकडे पुढाकार तिचाच. दोन दिवसात इतकी प्रगती माझ्या पुढाकाराने होण्याची शक्यता तशी नव्हतीच म्हणा.

मित्राचे आईवडील भारतातून आले होते त्यांना भेटायचं म्हणून विकेंडला जमलं नाही. येडपटच आहे मी!! मग तिचाच इमेल आला, हाऊ अबाऊट वॅलेंटाईन्स डे? बोंबला! व्हाट डझ इट मीन? इमेल पन्नास वेळा वाचला, गुगलवर अभ्यास करून झाला पण अर्थ काही लागेना. बराच वेळ गेल्याने तिला अंदाज आला असावा. तिचाच नवा इमेल आला, "डोंट वरी, वुई डोंट हॅव टु सेलिब्रेट इट अ‍ॅज ए वॅलेंटाईन्स. जस्ट अ कॅज्युअल डेट" वगैरे. याह, राईट! मी स्वत:शीच म्हणालो. पण एखाद्या सुंदर मुलीने विचारल्यावर तुमच्याकडे काही ऑप्शन असतो का?

एकदम फाटली होती. समबडी डेटींग मी वॉज ए मॅथेमॅटिकल इंपॉसिबिलीटी. भलत्यासलत्या शंका होत्याच, पण फाटली होती वेगळ्याच कारणाने. त्या अमेरिकन पोरीची ही शंभरावी डेट असेल आणि आमची इथे सुरुवात होती. तीन दिवस गुगलवरून जितकं जमेल तितकं ज्ञान गोळा केलं होतं. पण व्हेरीबएल्स, टू मेनी व्हेरीएबल्स!! आज जमणार नाही, एकदम मिटिंग लांबली, सर्दी झाली, गाडी बिघडली, काहीतरी कारण काढून टेक्स्ट करावं वाटत होतं. नर्व्हसनेस आणि लूज मोशनचा काही संबंध आहे का? गुगलायला पाहिजे. शंखवटी घेऊन दिवस काढावा लागणार आज!

फक इट, आय एम गोईंग ऑन अ डेट टुनाईट!!

कसाबसा आवरून ऑफिसात पोहोचलो. आज क्लायंट बरोबर मिटिंग, माझं मॉडेल अजेंडावर आहे. सकाळी सकाळी मॉडेलवरून बॉसशी वाजतं. च्यायला, बायकोबरोबर भांडून येतो की काय रोज? झालं, ऐनवेळेला मॉडेलमध्ये बदल! माझं सगळं लक्ष मात्र मोबाईलकडे.

एक बरं झालं की भारतीय हॉटेलात जेवायला जायचं ठरलं. तीन वर्षं होऊन गेली इथे तरी मी अजून फारसा भारतीय हॉटेलांच्या पलिकडे गेलो नव्हतो. नॉन्व्हेज अगदी वर्ज्य नसलं तरी जीभ काही अजून सरावली नव्हती. मिटींग ठीकठाक झाली, औपचारिक बदल वगैरे सोडले तर काही टेंशन नाही. माझं प्रेझेंटेशन उरकल्यानंतर मात्र मिटिंग माझ्यासाठी संपलीच होती. काहीही न ऐकता आपण मान डोलावून ऐकतो आहोत असं दाखवण्याची प्रतिक्षिप्त क्रिया एव्हाना मला जमली होती. आता एकच विषय डोक्यात उरला होता...

नखं कापायची राहिलीएत. शॅंपू करूनच जावं. इस्त्री? फॉर्मल घालावेत की कॅज्युअल? डेटला घालावा असा एकही स्वेटर किंवा जॅकेट नाही आपल्याकडे. टेबल बुक करायला पाहिजे, आज गर्दी असणार. बरं झालं आठवलं नाहीतर पचका झाला असता. पोटाचा घेर वाढतोय!! च्यायला, गाडीत फार कचरा झालाय. माझा फेवरेट बँड कोणता? मेटॅलिका डाऊनलोडकरून जमाना झाला, पण अजून ऐकलं नाहीए. सालसा वगैरे तरी शिकायला हवा होता. यूझलेस!! भूक लागलीए, पण आता काही खाल्लं तर वांदा होणार. हा फारच कॅज्युअल वाटतोय टीशर्ट. एकदम प्लेन टीशर्ट म्हणजे बोअरींग होईल. फुल शर्ट घालावा, थंडीचीपण सोय होईल. वॉक वगैरे घ्यायची वेळ आली तर कुडकुडकायला नको. च्युईंगम ठेवावा बरोबर. इंडियन म्हणजे कांदा-लसूण असणार. अशीच आमुची आई असती हा डायलॉग मला आत्ता का आठवतोय!! तीचं प्रोफाईल परत एकदा वाचून घ्यावं. ह्यातला एकही लेखक ओळखीचा नाही!! टीव्ही फारशी बघत नाही वाटतं!...

वेळ झाली, तिला तिच्या घरून पिक अप केलं. फोटोत दिसते तशीच आहे तर. प्रोफाईलवरचं वयही खरंच असावं. मला न्याहाळणारी तिची नजर मला आतल्या आत लाजवून गेली. या क्षणी माझं बिपी किती असेल? अ‍ॅक्सरलरेटर जरा जास्तच दाबतोय का मी? चिल इट, मॅन!! हॉटेलपाशी पोहोचलो, पार्किंग लाईटमध्ये पहिल्यांदाच एकमेकांना नीट पाह्यलं. बरं झालं फुल शर्ट घातलाय, नाहीतर हातावरचे उभे राहिलेले केस तिला दिसले असते. तिने पंजाबी ड्रेस घातलाय की काय!! काहीही!

भेंडी, नेमकं कोणीतरी ओळखीचं दिसणार इथे. छ्या! हे कसं लक्षात आलं नाही आधी! हॉटेलात गेल्यावर पहिले नजर फिरवली. हुश्श! कोणी नाही. एकमेकांना पारखत असतानाच ऑर्डरी गेल्या. हा प्रकार एकदम गमतीदार होता. आईस ब्रेक झाला आणि जरा हलकं वाटलं. एकंदरीत गप्पा टप्पा ठीकच झाल्या. आपल्याला तर पोरगी आवडली. भूक मात्र का मेली होती काय माहित! टिपीकल अमेरीकन लोकांसारखं लो इन स्पाईस न मागता तिने 'स्पाईसी' मागवलं होतं. इंटरेस्टिंग! पॉलिटीक्स, इनइक्वॅलिटी वगैरे विषय म्हणजे काय रोम्यांटिक नाहीत, पण तरी तिला त्यात इंटरेस्ट असावा. नाहीतर वांदाच झाला असता. टु गो बॉक्सेस आल्यानंतर निघूया म्हटलं. तिला बहूतेक बसून गप्पा मारायच्या होत्या! मिडलक्लास मोरॉन आहे मी!

हाऊ अबाऊट अ मूव्ही? तिनेच विचारलं. दगड आहेस लेका तू, दगड! जवळच्याच थेटरात गाडी दामटवली. 'द डिसेंडन्ट्स'ची तिकिटं काढली. खरं तर 'द व्हाव'ची काढायला हवी होती. पण तेव्हढी अक्कल असती असती तर ना. आख्ख्या थेटरात आम्ही दोघंच होतो. 'द डिसेंडन्ट्स' सारखा बायको कोमात वगैरे असलेला रडका सिनेमा वॅलेंटाईन्स डे-ला पहायला अजून कोण येणार? आम्ही दोघंच असल्याने माझं बिपी पुन्हा वाढलं. थेटरात विशेष काही घडलं नाही. मला अपेक्षा होती असं नाही, पण प्रोबॅबिलिटी!!

सिनेमावरून घरी निघालो. माझं घरं जाताना रस्त्यातच होतं. सिग्नलला थांबलो असताना तिला बोट करून दाखवलं. दॅट इज माय अपार्टमेंट. दोन पाच मिनिटांनी तिने विचारलं. डू यु हॅव वाईन अ‍ॅट होम?

येड** आहेस तू! दॅट शूड हॅव बिन यूअर लाईन! पुढे यु टर्न मारला आणि ट्युब पेटली. शीट!!! काँडम??? या शक्यतेचा विचारच नव्हता केला. फकिंग प्रोबॅबिलिटी!! एकदम थंडच पडलो. चेतन भगतच्या पुस्तकापासून ते हॉलिवूड सिनेमात पाहिलेले सगळे प्रसंग डोळ्यासमोर तरळून गेले. समोरच मिळेल, पण आता कसं घेणार? मनात फक्त शिव्याच येत होत्या. आता काय??
...

चार पाच वेळा अलार्म स्नूझ करून झाला होता. ऑफिसची वेळ केव्हाच टळली होती. नंतरची रात्र फारच वेगात गेली. माझ्याकडून गाढवपणा झाला नाही असं नाही, पण प्रत्येकवेळी तिनंच प्रसंगावधान राखलं होतं. ज्या दिवशी वॅलेंटाईन मेला त्या दिवशीच माझ्यातला उरलासुरला मध्यवर्गीयही मेला होता. अलगद बिलगून मी तिच्या कानात म्हणालो, हॅपी वॅलेंटाईन्स डे...

नंदन Sun, 19/02/2012 - 14:34

या शक्यतेचा विचारच नव्हता केला. फकिंग प्रोबॅबिलिटी!!

हा समास कसा सोडवायचा - षष्ठी तत्पुरूष की द्वंद्व? :)
बाकी 'द डिसेन्डन्ट्स' हे शीर्षक वेगळ्या संदर्भात परिणाम-कारक आहे यात शंका नाही ;)

ज्या दिवशी वॅलेंटाईन मेला त्या दिवशीच माझ्यातला उरलासुरला मध्यवर्गीयही मेला होता.

बोंबला, रिक "सॅनिटोरियम" सँटोरमची अ‍ॅब्स्टिनन्स वॉर्निंग खरी ठरतेय म्हणजे! :)

राजेश घासकडवी Sun, 19/02/2012 - 20:25

In reply to by नंदन

हा समास कसा सोडवायचा - षष्ठी तत्पुरूष की द्वंद्व?

मला वाटतं इथे समासाला नाही तर 'संधी'ला अधिक महत्त्व आहे. :)

ज्या दिवशी वॅलेंटाईन मेला त्या दिवशीच माझ्यातला उरलासुरला मध्यवर्गीयही मेला होता.

पुलंच्या सखाराम गटणेतल्या 'पाणी वाहतं झालं' ची आठवण झाली. तिथे अर्थातच रूढ अर्थाने मध्यमवर्गीय जिवंत झालेला आहे, पण भावना साधारण त्याच.

बाकी कथा आवडली. शेवट अनपेक्षित होता.

ही कथा माहिती या सदरात देण्याचा मोह आवरला की काय अशी शंका आली. ;)

नंदन Sun, 19/02/2012 - 23:21

In reply to by राजेश घासकडवी

मला वाटतं इथे समासाला नाही तर 'संधी'ला अधिक महत्त्व आहे.

खरंय,

गूढ खूण तव कळून नाकळून भांबावून मागे मुरडे
निसटुनि जाई संधीचा क्षण, सदा असा संकोच नडे

ह्या ओळी आठवल्या :)

Nile Thu, 23/02/2012 - 19:46

In reply to by नंदन

कितीही अश्लील निबंध लिहला तरी एखाद्या धार्मिक मासिकात छापता येईल असं त्याचं सोज्वळ भाषांतर करून देईल हा नंदन! अन ते ही गर्भित अर्थ तोच ठेवून. ;-)

बाकी वरचे दोन तीन प्रतिसाद नीटसे कळले नाहीत. ;-)

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 24/02/2012 - 01:10

In reply to by Nile

कितीही अश्लील निबंध लिहला तरी एखाद्या धार्मिक मासिकात छापता येईल असं त्याचं सोज्वळ भाषांतर करून देईल हा नंदन! अन ते ही गर्भित अर्थ तोच ठेवून.

मागे राजेशने पूजेची पथ्य लिहीली होतीच. नंद्याने आता सोवळ्या-ओवळ्याबद्दल लिहावे ही विनंती.

धनंजय Sun, 19/02/2012 - 21:04

हाहा.

आजवर मला वाटत असे, की सुखांत डेट्स या सर्व एकसारख्या असतात, प्रत्येक फसलेली डेट ही आपल्याच तर्‍हेने फसलेली असते.

पण इथे एका सुखांत डेटचे वेगळेपण दाखवले आहे.

............सा… Mon, 20/02/2012 - 20:22

अफलातून!!! :)
कितीदा तरी हे स्फुट वाचले आणि खो खो हसले.
"मिडलक्लास मोरॉन आहे मी" =))
"अशीच अमुची आई असती हा डायलॉग मला आत्ता का आठवतो आहे?" =))
"नर्व्हसनेस आणि लूझ मोशन्चा काही संबंध आहे का?" =))

ओह माय गॉड!!!!! It's hilarious!!!!
मस्त मस्त मस्त!!!!!!

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 21/02/2012 - 21:24

In reply to by ............सा…

अरे वा वा वा! निळोबांचा लेखनातला बोळा निघाला हे तर उत्तमच. काही काही वाक्य एकदम झकास जमली आहेत!

आणि एकूणच माहितीपूर्ण कथा आवडली. नंदन आणि राजेशचे प्रतिसादही 'माहितीपूर्ण' आहेत.

श्रावण मोडक Thu, 23/02/2012 - 12:19

चेतन भगतच्या पुस्तकापासून ते हॉलिवूड सिमेनात पाहिलेले सगळे प्रसंग डोळ्यासमोर तरळून गेले.

हुश्श!! मी ती पुस्तकं वाचत नाही, किंवा असले हॉलिवूडसिनेमेही पहात नाही याचं समाधान झालं. ;)

Nile Thu, 23/02/2012 - 19:15

In reply to by श्रावण मोडक

तुम्ही ह्या गोष्टी वाचल्या, पाहिल्या असत्या आणि त्या तुमच्या शिष्यांना शिकवल्या असत्या तर आमची ऐनवेळी अशी फजिती तरी झाली नसती. ;-)

श्रावण मोडक Fri, 24/02/2012 - 11:13

In reply to by Nile

मला वाटलं होतं की विद्यार्थी हुशार आहेत. नको ते वाचणार/पाहणार/ऐकणार नाहीत आणि स्वतः मार्ग काढतील. पण इथं अनुभवातून शहाणं होण्याची वाटचाल दिसते आहे. ;)
नायल्या, तू निराशा केलीस राव माझी. ;)

Nile Sat, 25/02/2012 - 00:51

In reply to by श्रावण मोडक

. नको ते वाचणार/पाहणार/ऐकणार नाहीत आणि स्वतः मार्ग काढतील. पण इथं अनुभवातून शहाणं होण्याची वाटचाल दिसते आहे.

गुर्जींनी सांगितलं नाही तर ढमुकतमुक "नको ते" आहे हे अनुभव घेतल्याशिवाय कसं कळणार? उलट तुमच्या सारख्या गुर्जींनी अशा गोष्टी रस घेऊन शिकवल्या तर शिष्यांना पण कशात किती गोडी आहे हे कळेल!!

मणिकर्णिका Thu, 23/02/2012 - 19:25

हे म्हणजे उदाहरणार्थ लैच गंमतीदार आहे. आवडलं.
आमचे एक मित्रवर्य म्हणतात ज्यांचा कधीकाळी असाच तुमच्यासारखाच नाम्या व्हायचा- पोरीला घोळात घ्यायचं असेल तर 'यू आर डिफ्रंट-स्पेशल' अशा भरतवाक्य सलामीलाच टाकणं हा सुपरहिट फॉर्म्युला आहे. मग पुढे काय वाटेल ते बडबडलं तरी ते 'डीप' वाटतं.
पण तुम्ही सुषुम्नावस्थेत असल्याने तुम्हाला सुचलं नसावं बहुतेक. :D

Nile Thu, 23/02/2012 - 19:42

In reply to by मणिकर्णिका

एखाद्या सुंदर मुली समोर बसलेलं असताना असं खोटं बोलवत नाही हो. खोट्याचं सोडा, जे काय ठरवलं आहे ते सुद्धा बोलायला जमत नाही. ;-)

राजेश घासकडवी Thu, 23/02/2012 - 20:00

In reply to by Nile

नायल्या, नायल्या, अरे खऱ्या खोट्याचं काळंपांढरं करू नये माणसाने. नेहमी मधल्या प्रशस्त ग्रे एरियामध्ये रहावं. आता समज तू जर सुंदर मुलीसमोर बसला आहेस, तर तिला तू सुंदर आहेस असं सांगणं खोटं का? समजा ती मुलगी सुंदर नाही, पण म्हणून तिला तसं सांगणं खोटं ठरतं का? अरे, प्रत्येकच जण अंतरी सुंदरच असतो. हे अंतरंग पहायचे असतील तर बाह्य कृत्रिम सत्यावर का भर द्यावा?

Nile Fri, 24/02/2012 - 02:49

In reply to by राजेश घासकडवी

अरे, प्रत्येकच जण अंतरी सुंदरच असतो. हे अंतरंग पहायचे असतील तर बाह्य कृत्रिम सत्यावर का भर द्यावा?

पटलं हो गुर्जी! (घासू गूर्जी आहेत म्हणून बरं, ते मोडक गुर्जी एकही कामाची गोष्ट शिकवत नाहीत!) पण अंतरंग पाह्यल्याशिवाय सुंदर आहेत हे कळणार कसं? शिवाय अनेक अंतरंग पाहिल्याशिवाय 'यु आर डिफरंट' तरी म्हणणार कसं. हा लोच्या झाला होता. (पण हळू हळू खोटं बोलायची सवय करून घेतली पाहिजे असं दिसतंय! ;-) )

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 24/02/2012 - 02:59

In reply to by Nile

घासू गूर्जी आहेत म्हणून बरं, ते मोडक गुर्जी एकही कामाची गोष्ट शिकवत नाहीत!

इथे कोटी आहे का नाहीये? नाही म्हणजे घासू गुर्जींची हिस्टरी असली तरी तुझी नाहीये, म्हणून विचारलं!

बाकी तू ही लायनीवर येण्याचा विचार करतो आहेस हे पाहून बरं वाटलं.

पैसा Thu, 23/02/2012 - 22:33

विडंबन जमलंय, अगदी स्वतंत्र लेखच झालाय! तू जन्मात सगळे मिळून टाईप केले नसशील इतके शब्द एकाच वेळी टाईप केल्याबद्दल अभिनंदन!

खवचट खान Thu, 23/02/2012 - 22:44

In reply to by पैसा

एक्झॅक्टली! मूळ लेख वाचलेला असल्याचीही गरज नाही एवढं जमलंय!

Nile Fri, 24/02/2012 - 02:51

In reply to by पैसा

तू जन्मात सगळे मिळून टाईप केले नसशील इतके शब्द एकाच वेळी टाईप केल्याबद्दल अभिनंदन!

ओ काकू!!! काय वाट्टेल ते आरोप सहन एकवेळ केले जातील, पण जन्मात!!! च्यायला, समस्त मराठी संस्थळांवर मिळूनच आम्ही पाच-दहा हजार प्रतिसाद दिले असतील आजपर्यंत. अ‍ॅव्हरेज प्रतिसाद एक ओळीचा असला म्हणून काय झालं?

नगरीनिरंजन Sun, 26/02/2012 - 09:07

मस्त जमलं आहे!!
लिहीत राहा भो.

ज्या दिवशी वॅलेंटाईन मेला त्या दिवशीच माझ्यातला उरलासुरला मध्यवर्गीयही मेला होता.

हे वाक्य म्हणजे विडंबनाचा उत्कर्षबिंदू आहे.

सागर Tue, 12/02/2013 - 16:13

झकास

नाईल्याच्या लेखनाचा हा पैलू अजिबात परिचयाचा नव्ह्ता.. ;)

नाईल्याला फोटोग्राफी आणि आकाशातल्या गोष्टींचाच छंद आहे असा (गैर)समज होता
शेवटची पंच लाईन जाम आवडली
"ज्या दिवशी वॅलेंटाईन मेला त्या दिवशीच माझ्यातला उरलासुरला मध्यवर्गीयही मेला होता. अलगद बिलगून मी तिच्या कानात म्हणालो, हॅपी वॅलेंटाईन्स डे..."

एकदम जबरा.

परिकथेतील राजकुमार Tue, 12/02/2013 - 17:04

ह्यांचे लिखाण बरे सारखे सारखे वर येत असते.

नंदन Tue, 12/02/2013 - 23:08

In reply to by अमुक

तुम्हीही गाडीखाली जाण्याची तयारी ठेवा मग तुमचेही लिखाण असेच वर वर येत राहील.

म्हणजे गाडीखाली जायचे असेल किंवा लेखन वर आणायचे असेल तर 'जॅक' हा हवाच, असं तुम्हांला म्हणायचंय की काय? ;)

अमुक Wed, 13/02/2013 - 00:17

In reply to by नंदन

आणि तुम्ही स्वतः GAK जॅक असाल तर त्याचीही गरज पडणार नाही. ;)
(सन्दर्भ : माणसे - अरभाट आणि चिल्लर)

अजो१२३ Thu, 14/11/2013 - 15:24

चार पाच वेळा अलार्म स्नूझ करून झाला होता. ऑफिसची वेळ केव्हाच टळली होती. नंतरची रात्र फारच वेगात गेली. माझ्याकडून गाढवपणा झाला नाही असं नाही, पण प्रत्येकवेळी तिनंच प्रसंगावधान राखलं होतं. ज्या दिवशी वॅलेंटाईन मेला त्या दिवशीच माझ्यातला उरलासुरला मध्यवर्गीयही मेला होता. अलगद बिलगून मी तिच्या कानात म्हणालो, हॅपी वॅलेंटाईन्स डे...

मला भाषा कळायचंच बंद झालंय वाटतं.

'नंतरची रात्र' म्हणजे त्या रात्रीचा उरलेला भाग की अजून पुढच्या दिवशीची रात्र?

आणि गाढवपणा झाला नाही असं नाही म्हणजे गाढवपणा झाला. तुम्ही कशाला गाढवपणा म्हणताय त्याचा काही अर्थ काढू पाहायला गेलं तर प्रसंगावधान हा शब्दही पुढे आहेच.

मध्यमवर्गीय मेला म्हणजे तीने तुम्हाला (पैशाने बरं) लुटला किंवा तुम्ही तिला, अन्यथा सामाजिक स्तर बदलायचं कारण नाही.

जाउ द्या. असो.

Nile Thu, 14/11/2013 - 19:06

In reply to by अजो१२३

अहो, बेबी स्टेप्स घ्या. डायरेक अ‍ॅडल्ट लेखन वाचायलात तर कसं व्हायचं! ते ब्याट्या एक वर काढणार अन तुम्ही लगेच हातात घेणार. (पुस्तक हातात घेणारच्या चालीवर वाचावे, उगाच आचरटपणा करू नये.)