Skip to main content

व्यंगचित्र

(मोठ्या चित्रासाठी चित्रावर क्लिक करावे)

संकल्पना - जयदीप चिपलकट्टी
चित्रकार - अमुक

राजेश घासकडवी Sat, 02/11/2013 - 18:06

In reply to by अनिल सोनवणे

उत्कृष्ट संकल्पना. न्यूयॉर्करमधल्या तरल कार्टूनांच्या जातकुळीची. ती पेलून घेणारं चित्रही समर्थपणे काढलेलं आहे.

व्यंग लक्षात आले नाही

दोन बैल भरपेट जेवण करून तट्ट झालेले आहेत. आणि त्यातला एक दुसऱ्याला म्हणतो 'पान खाणार?' बैलांचं जेवण म्हणजे गवत, पानं. त्यामुळे त्यानंतर पान खाणं हे गमतीदार आहे. द. मा. मिरासदारांची एक कथा आठवते. त्यात एक दूध, दही, लोणी, तूप विकणारा माणूस पैज लावून एक किलोभर लोणी खायला तयार होतो. सुरूवात ठीक होते. पण जसजसं तो जास्त जास्त लोणी खातो तसतसं त्याला कसंतरी वाटायला लागतं. (हे मी एका वाक्यात लिहिलेलं असलं तरी मिरासदारांनी याचं वर्णन जबरदस्त केलेलं आहे.) शेवटी तो जेव्हा ते संपवतो तेव्हा त्याला अजीर्ण होतं. तो वैद्याकडे जातो. वैद्य त्याला पोट ठीक करण्यासाठी औषध देतो, आणि म्हणतो 'हे कडू आहे. तेव्हा लोण्यात मिसळून खा.' हे ऐकूनच त्याची जी अवस्था होते की विचारायला सोय नाही. थोडासा त्या प्रकारचा विनोद इथे आहे.

'न'वी बाजू Sat, 02/11/2013 - 19:07

In reply to by राजेश घासकडवी

दोन बैल भरपेट जेवण करून तट्ट झालेले आहेत. आणि त्यातला एक दुसऱ्याला म्हणतो 'पान खाणार?' बैलांचं जेवण म्हणजे गवत, पानं. त्यामुळे त्यानंतर पान खाणं हे गमतीदार आहे.

पण... पण... हे कळायला दुर्बोध आहे हो! (मलाही कळले नाही!)

अवांतर: विनोदाचे गाइड काढण्याची गरज पडू लागली, तर 'विनोद फसला' असे म्हणता यावे काय? की विनोदाच्या साटल्याचे कौतुक व्हावे? (पहिले कोणत्या परिस्थितीत व्हावे, नि दुसरे कोणत्या परिस्थितीत व्हावे?)

आडकित्ता Sat, 02/11/2013 - 22:17

In reply to by 'न'वी बाजू

पण सामान्यतः सरदार लोकांना जोक्स समजवून सांगावे लागतात असा प्रवाद आहे ;)