Skip to main content

(तुझ्या बरमुडा चड्डीचे आकर्षण)

प्रेरणा - अविनाश कुलकर्णी यांची शृंगारिक कविता 'तुझ्या बरमुडा त्रिकोणाचे आकर्षण'

तुझ्या बरमुडा चड्डीचे आकर्षण....
...........
तू आहेसच सागरा सारखा
प्रचंड.... अस्ताव्यस्त
शिस्तप्रिय... कधी खवळलेला
उंच लाठ्या.. वरखाली.. कधी शांत..
आत कर्मठलेला
आवडतं अनेकांना... तुझ्या लाटांवर स्वार व्हायला
तुझ्याशी सामीलही व्हायला.
त्याला कारण कदाचित तुझी ती सदासर्वकाळ दिसणारी
Bermuda Short.... बरमुडा चड्डी...
ढगळ... अनाकलनीय विदुषकी
विचित्र आकर्षणशक्ती असलेली
खेचते सर्वांना आत...आत...
अचानक गटारातून येणारा वारा घुसावा
मॅरलिन मन्रोच्या झग्यात तसंच... विसरून देहभान...
अन खेचलं गेल्यावर फुलते ती बर्मुडा चड्डी
पण सावरून उभा तू.. सवस्त्र... ताठ.. दक्षतेत

दत्ता काळे Mon, 21/11/2011 - 14:35

अचानक गटारातून येणारा वारा घुसावा
मॅरलिन मन्रोच्या झग्यात तसंच... विसरून देहभान...

.. हे जरा अपवादात्मक वाटतं. म्हणजे संलग्नता गेली. ह्याशिवायसुध्दा विडंबन बरे वाटते. ह्या दोन ओळी सोडून वाचा. बघा
अवांतर : मेरिलीन मन्रोच कां ? आणि गटाराकडून येणारा वारा ? अरेरे ..
काही जुनी देणी राहलीयेत कां ?

राजेश घासकडवी Mon, 21/11/2011 - 18:20

In reply to by दत्ता काळे

सेव्हन इयर इच मध्ये मेरलिन मन्रोचा एक प्रसिद्ध सीन आहे. प्रचंड उकाडा असताना ती एका गटाराच्या तोंडावर उभी रहाते, खालून वारा येतो आणि तिचा झगा उडतो. फोटो इथे बघायला मिळेल.

देणी वगैरे काही नाही. बरमुडा त्रिकोणावरून बरमुडा चड्डीवर जाण्यात जी गंमत आहे तेवढीच.

राजेश घासकडवी Tue, 22/11/2011 - 17:33

In reply to by दत्ता काळे

हातात लाठी घेतलेल्या, दक्षतेत उभ्या असलेल्या, एखाद्या मिशाळ बाप्याची ढगळ बरमुडा चड्डी फुलते हे मेरलिनच्या झग्याशेजारी ठेवून त्यातला विरोधाभास दाखवायचा होता.

अशोक पाटील Wed, 23/11/2011 - 10:20

In reply to by राजेश घासकडवी

कवितेबद्दल नाही, पण मेरिलिनच्या 'त्या' प्रसिद्ध सीन संदर्भात हा खुलासा (मी पाहिला आहे हा चित्रपट). वारा येतो तो सबवे रेल्वेच्या सुसाट वेगामुळे. अंडरग्राऊंड रेल्वे परिसरात गाड्यांच्या ये-जा मुळे असा निर्माण होणारा झोत निर्गमन करण्यासाठी छ्तामध्ये ज्या जागा केल्या जातात त्याना सबवे-ग्रेट म्हणतात. अशा एका ग्रेट्च्या जाळीवर मेरिलिन उभी आहे. तिच्यामुळे...अर्थात त्या दृष्यामुळे...सबवे ग्रेट इतके फेमस झाले की नंतर त्यावर गाणीही रचली गेली होती.

[तिच्यासारख्या अप्सरेला 'गटारा'वर उभे करावे असे वाटत नाही, म्हणून हा खुलासा]

अशोक पाटील

शशिकांत ओक Sun, 17/08/2014 - 23:59

In reply to by राजेश घासकडवी

विलॅस्टिक व नाडी दोन्हीची सोय असते म्हणतात...
मन्रोबाईंना नको त्या जागी उभे करून वर करायला लावायचा फाजिलपणा शोभतो ... तर मग चड्डीतील दक्षता विभागासाठी नाडी बरी पडत असेल, म्हणतो मी?

टारझन Mon, 21/11/2011 - 15:59

गुर्जी रॉक्स.
टारेश नाडीसोडवी

हिटलर Mon, 21/11/2011 - 17:45

In reply to by टारझन

गुर्जी क्रॅक्स इट द बेस्ट...

प्रियाली Mon, 21/11/2011 - 18:29

वरल्या दोन प्रतिसादांवरून प्रश्न पडला.

शृंगारिक आणि पॉर्न (किंवा अश्लील साहित्य) यांत नेमका फरक काय? की दोन्ही एकच?

मी Mon, 21/11/2011 - 18:54

In reply to by प्रियाली

फरक उद्देशात असावा असे वाटते, घरी बनलेले जेवण आणि खानावळीत बनलेले जेवण ह्यात जो फरक आहे तोच इथे पण आहे, एकात नुसतेच पोट भरण्याचा व्यवसायिक जिभ-जाळू उद्देश आहे तर घरी बनलेल्या जेवणात स्वाद-प्रेम-भूक ह्याची उत्तम फोडणी असते.

-----------------------
"नीर-गाठ-उकल" तंत्राने विवस्त्र होणे आणि एकदम धोतराला हात घालणे ह्यात जो फरक आहे तो.

आडकित्ता Mon, 21/11/2011 - 21:36

In reply to by मी

लग्न झालं नाहिये,
किंवा लग्नाला १४ वर्षे होऊन चुकलीत तुमची!
अहो, ती फोडणी गडबडीची अस्ते सुरुवातीला. पडते म्हणा नंतर अंगवळणी..

प्रियाली Mon, 21/11/2011 - 22:25

In reply to by आडकित्ता

आम्चा तो शृंगार.. तुमचं ते पोर्नोग्राफी!

अशी शिंपल उत्तरे दिली तर खुसपटं कशी काढणार? चर्चा कशी वाढवणार? वाद कसा घालणार? :( ;)

Nile Mon, 21/11/2011 - 21:04

आम्हाला मीनी स्कर्ट अन फ्रॉकचे प्रेम असल्याकारणाने कविता भावली नाही! ;-)

राजेश घासकडवी Mon, 21/11/2011 - 21:09

In reply to by Nile

तुमचा मिनी स्कर्ट आणि/किंवा फ्रॉकमधला फोटू चिकटवावा ही विनंती. त्यावर एक नवीन कविता लिहिण्याची जबाबदारी आमची.

Nile Mon, 21/11/2011 - 21:16

In reply to by राजेश घासकडवी

तुमचा स्कर्ट किंवा फ्रॉक पाठवून द्या, विचार केला जाईल! बाकी, तुमच्या आवडीनिवडी असल्या असतील असं वाटलं नव्हतं! ;-)

आडकित्ता Mon, 21/11/2011 - 21:34

In reply to by Nile

नाय्ला, तुमी दोगं ते स्कर्टं घालाया स्कोट्लंडात कधीपस्न ग्येलात? ब्याग्पाईपं फुंकाया लाग्लात की काय?

Nile Tue, 22/11/2011 - 00:24

In reply to by आडकित्ता

काय हे तुमचं पाश्चात्य प्रेम!!

आमच्या लुंगीला विसरून तुम्हाला ते स्काटलंडातले स्कर्टं आठवावेत!!!

हे पहा:

लुंगीला योग्य ठिकाणी घडी केली की झालं मिनी स्कर्ट, हाकानाका!

पैसा Mon, 21/11/2011 - 21:05

ही स्वतंत्र कविताच झालीय!

आडकित्ता Mon, 21/11/2011 - 21:32

In reply to by पैसा

शिमग्याचं कवित्व! दुसरं काय?
बाकी मचाक(न्यू) मधे शोभेल हो ओरीजिनल. "तुझ्या बर्मुडा ट्रँगलचं आकर्षण" अशी कविता 'तिकडे' वाचली..

शहराजाद Wed, 23/11/2011 - 09:18

च्यामारी! ढगळ बर्मूडा घालून दक्षतेत उभा वाचून 'संघ दक्ष'डोळ्यापुढे उभे राहिले.;)

विनायक प्रभू Wed, 23/11/2011 - 12:38

जहाजे आणि विमाने अदृष्य होणारा बर्म्युडा ट्रँगल(त्रिकोण) आठवला.

धर्मराजमुटके Sat, 16/08/2014 - 13:05

सो कॉल्ड कविता किंवा विडंबन जे काही असेल ते. नाही आवडले !

विवेक पटाईत Sat, 16/08/2014 - 18:29

मस्त आवडली, बाकी एक सुचवू

अन खेचलं गेल्यावर फुलते ती खाकी चड्डी
पण सावरून उभा तू.. सवस्त्र... ताठ.. दक्षतेत