(आणखी एक) कवितास्पर्धा

एक नैमित्तिक आणि एक प्रतिवार्षिक प्रसंग साजरा करण्यासाठी कवितास्पर्धेचे आयोजन करीत आहोत; तेव्हा 'ऐअ' च्या वाचकांनी आपल्या कविता पाठवाव्यात ही विनंती. कवितेसाठी विषय पुढीलप्रमाणे:

(१) विल्यम आणि केट, उर्फ ड्यूक अँड डचेस ऑफ केंब्रिज, यांना झालेली पुत्रप्राप्ती. भारतावर अजूनही इंग्रजांचं राज्य आहे अशी कल्पना कवितेमागे असावी. मातापित्यांचं अभिनंदन, जॉर्जबाळासाठी पाळणा, उर्वरित आयुष्य कॅमेराफ्लॅशसमोर जाणार असल्याबद्दल त्याचं सांत्वनगीत, अशासारखी या विषयाला सर्वसाधारणपणे धरून असलेली कोणतीही रचना चालेल.

(२) स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाच्या उज्वल परंपरेचा उदोउदो करणारं स्फूर्तिगीत, किंवा त्याची कशी वाट लागली आहे यावर रडगाणं. यात १४ आणि १५ ऑगस्ट असे दोन स्वातंत्र्यदिन अभिप्रेत आहेत; याचाच अर्थ पाकिस्तान किंवा भारत यांपैकी कुठलाही एक देश चालेल. (हिंट: पाकिस्तानची स्तुती करताना मोहेंजोंदारो, प्राचीन वैदिक संस्कृती वगैरे वेठीला धरता येतील.)

जयदीप चिपलकट्टी आणि राजेश घासकडवी हे 'ऐअ' चे सदस्य स्पर्धेचे परीक्षक असतील. स्पर्धेसाठीच्या कविता या धाग्याला प्रतिसाद म्हणून जोडाव्यात, किंवा या दोघांपैकी (किमान) एकाला व्यनिद्वारे पाठवाव्यात. मुदत: ११ अॉगस्टपर्यंत. स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. निकाल (भारताच्या) स्वातंत्र्यदिनी जाहीर केला जाईल.

निकाल खाली प्रतिसाद म्हणून जोडला आहे.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

केंब्रिजच्या राजपुत्रा
---------------

केटच्या बाळका! विल्लच्या शावका!
डायना-चार्ल्सच्या नातवा! लाडक्या!
एलिझाबेझच्या वंशवर्धापका!
राजपुत्रा! तुला वंदितो, मालका!

न्यूझिलंड्, आफ्रिका, हिंद, ऑस्ट्रेलिया
मॅसच्यूसेट्सही मेरिलंड् जॉर्जिया
फॉल्कलंड्, मॉरिशस्, कॅनडा, केनिया
पूजते जॉर्जला आवघी दूनिया

दिव्य कर्तृत्व हे जन्मलेल्या क्षणी :
चोखता दूधही झोपतो तू झणी.
रेशमी केस, ना लागते त्यां फणी
शंख केका तुझ्या राजवाडा रणी

धन्य तू वाढशी, आस तू ठेव की!
वृद्ध झाल्यावरी प्राप्य सम्राटकी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाटाआ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

.

(चाल : कुठल्याही सर्वसाधारण 'जय्देवजय्देव' छाप आरतीची)

जयदेव जयदेव जय जॉर्जबाळा
अवतरलासी तू अन् मिडियाला चाळा
जयदेव जयदेव ...

विल्या-केट प्रायव्हसीची होइ पुरती बोंब
उन्मादित पापारात्सी दिसतां बेबी-बम्प
"कुठे ठेवू, कुठे नाही", म्हणता राणि लीझ
दिन मोजे मिडिया अन् गॉसिपि प्रसवकळां
जयदेव जयदेव ...

किति माय्क्रॉन घेर वाढे रोज रोज वार्ता
किती पाँव भारी ते अप्डेट दिन सरतां
अखेरीस ट्रंपेट-ड्रम-तोफां दुमदुमतां
भो भो सप्तम् जॉर्जवतरे शुभसंध्यावेळां
जयदेव जयदेव ...

केटचि दुपटीं आणि विल्यमची मीठीं
पिप्पाचा पापा अन् एलिझाची दृष्टी
मुरडलेलि नाकें अन् कौतुकाचि वृष्टीं
खेळवतो लिलया ! किती 'कूल' तू खट्याळां
जयदेव जयदेव ...

जन्मलांस या घटकी; सांभाळ रे मिडिया
नीजशी तू जरी शांत, जागा विकिपेडिया
'गूगल'ला दे बगल् नि 'बिंग'ला गुंगारा
आज्जीला स्मरोनी दे सॅल्युट सर्त्या काळां
जयदेव जयदेव ...

............°-------Ö-------°

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(१) विल्यम आणि केट, उर्फ ड्यूक अँड डचेस ऑफ केंब्रिज, यांना झालेली पुत्रप्राप्ती. भारतावर अजूनही इंग्रजांचं राज्य आहे अशी कल्पना कवितेमागे असावी. मातापित्यांचं अभिनंदन, जॉर्जबाळासाठी पाळणा, उर्वरित आयुष्य कॅमेराफ्लॅशसमोर जाणार असल्याबद्दल त्याचं सांत्वनगीत, अशासारखी या विषयाला सर्वसाधारणपणे धरून असलेली कोणतीही रचना चालेल.

(१) रचना मराठीतच असणे अपेक्षित आहे काय?

(२) रचना स्वतःचीच असणे अपेक्षित आहे काय?

(३) त्या विशिष्ट रचनेच्या विषयासंबंधाने निर्माण झालेला (अकारण) वाद लक्षात घेता, 'जन गण मन' चालेल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनुक्रमे हो, हो, नाही.

मात्र 'स्पर्धेसाठी नाही' किंवा 'अमुकतमुककडून साभार' असं लिहून कविता सादर करायला हरकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"वांझोटी" जपमाळकथेचे काय झाले?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

अरेच्चा :O सुफळ संपुर्ण झालेली की ती! वाचा की पुर्ण कथा. चांगली होती. आणि प्रयोगाची आयडीआची कल्पनापण चांगली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'मारुती कांबळेचं काय झालं?'ची आठवण करून देणारा प्रश्न आहे हा अगदी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

चांगल्या कवितेला बक्षिस देणार की महाभिकार कवितेला ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'काव्यमेवाधिकारस्ते मा फलेशु कदाचन' बक्षिसाची मुळात अपेक्षाच का ठेवावी असा प्रश्नही उद्भवू शकतो. पण स्पर्धेचे परीक्षक असल्यामुळे आम्हाला काय निकष वापरणार हा प्रश्न असा सोयीस्करपणे डावलता येत नाही. म्हणून हा प्रयत्न.

चांगलं आणि महाभिकार हे प्रचंड सापेक्ष आहे. जॉर्ज बाळासाठी पाळणा, अंगाईगीत लिहिणे ही कल्पना काहींना भिकार वाटेल. पण त्यावर उत्कृष्ट, उत्कट कविता लिहिता येतेच ना? आणि इंग्रजांचं राज्य चालू राहिलं असतं तर आज अनेक कवड्यांनी अशा कविता लिहिण्यासाठी चढाओढ केलीच असती ना? केवळ इंग्रजांचं दुर्दैव म्हणून ते राज्य टिकलं नाही. आणि या ऐतिहासिक-राजकीय कारणांमुळे त्या बाळाला जे मराठीभाषिकांचं काव्यप्रेम मिळालं असतं त्यापासून वंचित रहावं लागणं हा अन्याय नव्हे का?

भारत-पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाबाबतही तेच. वेदांची रचना पाकिस्तानातच झाली. मग आपल्या स्वातंत्र्यदिनी आपल्या संस्कृती-मातृभूची आठवण काढण्यात काय गैर आहे? जर फाळणी झालीच नसती तर त्या सिंध प्रांताचे गोडवे आपण गायलेच असते ना?

असो, मी थोडा वहावलो. कवितास्पर्धेचा उद्देश असा आहे इतिहासाच्या या साहित्यिक मूल्यांवरच्या अतिक्रमणाकडे पूर्ण दुर्लक्ष करून हव्या तशा कविता कराव्यात. हे दुर्लक्ष करण्यात आलेलं यश, निवडलेल्या विक्षिप्त विषयावर दिसून येणारी श्रद्धा, ती कविता लिहिण्यामागची तळमळ या सर्व गोष्टींना कवितेच्या दर्जाइतकंच महत्त्व देण्यात येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राजेशजी, मागच्या कवितास्पर्धेत चिपलकट्टींनी सर्वात निकृष्ट कवितेला बक्षिस जाहीर केले होते म्हणून विचारले हो! म्हणजे त्याप्रमाणे जिलब्या पाडायला बसता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेदांची रचना पाकिस्तानातच झाली.

इल्ले इल्ले. सरस्वती नदी भारतातूनही वाहायची. भारतात कैक मोठमोठे आश्रम होते. हां आता दाशराज्ञ युद्ध झालं असेल पाकिस्तानात-पंजाब टु बी स्पेसिफिक, पण सगळे वेद कै पाकिस्तानात नै रचले गेले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पेट्रोबांगलाच्या निवृत्त चेअरमननी मला वेद बंगाल मधे बनले असे सांगीतले होते ते आठवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पेट्रोबांगलाच्या निवृत्त चेअरमननी मला वेद बंगाल मधे बनले असे सांगीतले होते

एक तर ते वेद नसून "बेद" असतात आणि बंगाल्यांचे शॉम्श्क्रितो उच्चार ऐकून तर आपला "शॉर्बोनाश" होतो, उदा.

धॉर्मोखेत्रे कुरुखेत्रे शॉमोबेता जुजुत्शोबो:
मामका: पाण्डोबाश्चोइबो किमकुर्बत शाँजोयो ||

(प्रॉथोम श्लोक इन भॉगोबोद-गीता).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पेट्रोबांगलाच्या निवृत्त चेअरमननी मला वेद बंगाल मधे बनले असे सांगीतले होते ते आठवले.

पेट्रोबांगलाच्या (बहुतकरून मुसलमान) चेअरमनना वेद बंगालात लिहिले जाण्याचा एवढा अभिमान का असावा, हे कळत नाही.

यावरून एक किस्सा आठवला. दूरदर्शनवर 'रामायण' मालिका चालू असते. लंकादहनाचा एपिसोड चालू असतो. उपस्थित प्रेक्षक*: एक अमेरिकन, एक मुसलमान नि एक सरदारजी.

तिघांनाही एपिसोड प्रचंड आवडतो. नि मग 'हनुमान आपल्याच समाजाचा' हे 'सिद्ध' करून ठसवण्याची तिघांत अहमहमिका लागते.

अमेरिकन म्हणतो, "वी हॅव सुपरमॅन, बॅटमॅन, स्पायडरमॅन, अँड सो डू वी हॅव हॅनूमॅन."

मुसलमान म्हणतो, "अरे जा जा| उस्मान, सुलेमान, वैसे हमारा हनुमान|"

सरदारजी नुसता हसतो. नि खोदून खोदून विचारल्यावर हसण्याचे कारण सांगतो.

"दूसरे की बीवी के लिए तीसरे की लंका जलाने वाला, और उस के लिए ख़ुद की पूंछ को आग लगवाने वाला, सिर्फ़ एक सरदार ही हो सकता है|"

================================================================================================================

* हिंदीत: 'दर्शक'.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इल्ले इल्ले. सरस्वती नदी भारतातूनही वाहायची. भारतात कैक मोठमोठे आश्रम होते. हां आता दाशराज्ञ युद्ध झालं असेल पाकिस्तानात-पंजाब टु बी स्पेसिफिक, पण सगळे वेद कै पाकिस्तानात नै रचले गेले.

पण ज्या सिंधू नदीवरून हिंदू हे नाव पडलं ती तर पाकिस्तानातच आहे ना! आपल्या संस्कृतीचे त्या प्रदेशाशी असलेले ऋणानुबंध असे सहज कसे तोडून टाकता येतील?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण ज्या सिंधू नदीवरून हिंदू हे नाव पडलं ती तर पाकिस्तानातच आहे ना! आपल्या संस्कृतीचे त्या प्रदेशाशी असलेले ऋणानुबंध असे सहज कसे तोडून टाकता येतील?

सिंधूचा उगम लद्दाखात की कोठेसातरी आहे असे कायसेसे कधीतरी ऐकल्याचे अंधुकसे आठवते. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सिंधु नदीचा भारतातला पत्ता: लेह, लडाख येथील घाट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण ज्या सिंधू नदीवरून हिंदू हे नाव पडलं ती तर पाकिस्तानातच आहे ना! आपल्या संस्कृतीचे त्या प्रदेशाशी असलेले ऋणानुबंध असे सहज कसे तोडून टाकता येतील?

तोडू नका ऋणानुबंध, पण सिंधूवरून हिंदू हे तसेही बाहेरच्या यवनांनी दिलेले नाव आहे, यद्यपि आज ते रूढ झालेले असले तरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हिमालयाच्या माथ्यावरुनी
शीतळ जळ खळखळत खालति
ब्रह्मपुत्र-सिंधू दो बाहू
अखंड हिंदाला आलिंगति

रजत विरजती पर्वतरांगा
सरस्वतीसह सतलज गंगा
मध्ये मध्ये जणु मरकतमाला
लपेटल्या या भूच्या अंगा

धर्मपरायण जन गण येथे
अध्यात्माचे उधाण येते
पंथ जितांचे टिकुन राहती
नवधर्मा जरि आणति जेते

बदरि-पुरी-शृंगेरि-द्वारिका
देवबंदची उलुमपालिका
प्रतिधर्माची पीठे वसली
फतवे काढत फुंकत शंखा

(क्रमशः , उपप्रतिसाद न-दिल्यास वाढवत जाईन)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रेरणा १ - पोलंडचं राष्ट्रगीत
प्रेरणा २ - American English: the new lingua franca

राष्ट्रकुल एकीकरणा
सज्ज आहे आता
पारिपत्य अमेरिकनचे
तूच कर बाळा॥

भो भो बाल जॉर्जा
केट-विल्यमच्या सुपुत्रा
खुद्द इंग्लिश भाषा
आहे लावून आशा॥धृ॥

बर्मुडा ते पठाणकोट
सारी पृथ्वी जागी
जर्सी आणि निकराग्वा
गाती गाणी तुझी॥

भो भो बाल जॉर्जा
केट-विल्यमच्या सुपुत्रा
खुद्द इंग्लिश भाषा
आहे लावून आशा॥धृ॥

जशी थॅचर सोडवी
फॉकलंड भूमी
करी पुनर्स्थापन
जुने उच्चाटूनी॥

भो भो बाल जॉर्जा
केट-विल्यमच्या सुपुत्रा
खुद्द इंग्लिश भाषा
आहे लावून आशा॥धृ॥

---

व्हीडीओचे अधिक मार्क मिळणार का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आयो.......कळायचं बंद झालं ROFL ROFL ROFL ROFL

दण्डवतगळु _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अदिती , धन्य आहेस ! आता बारशाचे आमंत्रण पक्केच झाले Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही कविता/गीत/पाळणा/जे काय असेल ते या स्पर्धेत बक्षीसपात्र नाही. उलट इतकी आलंकारिक रचना स्पर्धेतून बादच केली पाहिजे.

उदा. हेच पहा ना,

"बर्मुडा ते पठाणकोट
सारी पृथ्वी जागी
जर्सी आणि निकराग्वा
गाती गाणी तुझी॥"

या कडव्यात किती गहन अर्थ भरलेला आहे!! 'सारी पृथ्वी' असे वर्णन करताना वापरलेल्या देशा-प्रदेशांची नावे प्रचलित वस्त्रप्रकारांचा निर्देश करतात.
बर्मुडा, कोट, जर्सी, निकर हे ते वस्त्रप्रकार. म्हणजे या प्रावरणांनी झाकलेला देह आणि( कवियत्रीला वैज्ञानिकदृष्ट्या मान्य नसले तरी आमच्यासारख्या सर्वसामान्यांना प्रिय असलेले )त्यातले 'जितेजागते' पंचप्राण गाणी गात आहेत.(म्हणजेच हृदयींची स्पंदने हो, स्पंदने!) एकीकडे भौगोलिक पृथ्वी आणि दुसरीकडे (आमच्यासारख्यांच्या) शारिरीक पृथ्वीचाही उल्लेख कवियत्रीने मोठ्या खुबीने केला आहे.
(हे ढोबळमानाने लक्शात येणे तसे अवघड आहे.)
काय ती अलौकिक प्रतिभा! अहाहा.

आणि त्यानंतर त्या गीताला स्वरसाज चढवून तर... पोलंडचे राष्ट्रगीतही आजवर इतक्या गोग्गोड आवाजात कोणी गायले नसेल. छे!छे!छे!
स्पर्धेत या उत्कृष्ट रचनेचा बक्षीसासाठी मुळीच विचार करू नये ही जोरदार मागणी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विसुनाना हा माझा आयडी नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

विसुनाना ____/\_____ रोचक रसग्रहण !वस्त्रप्रकार आणि एका गूढ गहन अर्थाकडेही लक्ष वेधून तरीही
ते गुलदस्त्यात ठेवून तुम्ही प्रतिसादाला एक रहस्याची डूब दिली आहे ती लाजवाब आहे . Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्य जॉर्ज भूपती नि धन्य जोशि अऽदिती!!
जावई मिळो तिला हा, व्हावी ती अरब्पती!! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंबहुना सर्वसुखी| आंतरजाली फेसबूकी||
संस्थळी कीपॅड ठोकी| अखंडित||

व्हावी ती अरब्पती!!

अरबांनी तुमचे नेमके काय घोडे* मारले हो?

आणि बाकी काही असो, पण ती अरबाची 'पती' नेमकी कशी होणार**?

- (** बाळबोध) 'न'वी बाजू.

================================================================

* घोडे अरबी किंवा कसे, हा मुद्दा येथे गौण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता गुलामगिरी बंद केल्यामुळे माझा चान्स हुकला, अरब गुलाम बाळगून अरब्पती होण्याचा! शॅ, थोडा उशीरच झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आसिंधुसिंधू वगैरे हिंदुस्थान किंवा आमची अनादि-अनंत महान संस्कृती वगैरे पोकळ गफ्फांना वैतागून, अध्यात्म-धर्म वगैरेच्या बाजाराला विटून,
इतिहासादिंविषयीच्या वृथा अभिमानाचे डंके असह्य होऊन, पुरोगाम्यांच्या अव्यवहारी, उच्चभ्रुत्वगामी परंपरांच्या इतिहासाला आणि सुखासीन विद्वत्तेला स्मरून, जगातील वास्तवे नाकारत आपल्या विश्वात रमणाऱ्या विचारवंतांना, इतरांना भोचकपणे खिजवत सुखाने जगणाऱ्या हॅप्पि गो लकी ड्यूड्स् वगैरेंना विनम्र अभिवादन करून आणि पुरोगामी-प्रतिगामी-धार्मिक-नास्तिक-कम्युनल-नॉनकम्युनल अशा सर्वांच्या अहंकारांना चुचकारून, ओरबाडत सौथ-आशियायी इतिहास-धर्म-भाषा विषयात काम करणाऱ्या, स्मरणरञ्जनरत अशा आटपाट नगरीत उञ्छ-वृत्तीने राहणाऱ्या गरीब ब्राह्मणाने दृष्टांत देऊन ही आरती लिहवून घेतली. तीच येथे डकवित आहे.

बोलो सब संतन की जय!!


आरती अँग्लो-पाक्-हिंदुस्थानाची

(चाल: सुखकर्ता-दुखहर्ता / भिकाजी जोशींनी लावलेली स्वकुलतारक सुता सुवरा..)

वैकुंठाचे आधी, कैलासापुर्वी
विश्वोत्पत्तीच्याही अर्लीयर-पर्वी |
ईश्वर-निश्वसितांना ठेऊनि हो गिरवी
येथील दुनियादारी जग सारे फिरवी ||

जय-देव जय-देव पाक्-हिंदुस्थाना
आर्यांच्या लुटलेल्या भ्रष्ट जनस्थाना|| जय देव जय देव..

खापर-मुद्रा-चिह्ने-अगम्यलिपिसारी
लोथलगोदी-महाबाथ्रुम लै भारी|
इन्फ्रास्ट्रक्चर प्राचीन-सहाहजारी
संपले संपले सगळे कलियुगबाजारी||१|| जय-देव

गोरे हिरण्यकेशी वैदिक जन आले
मन्त्र-उपनिषदांनी जग सॅक्रेड झाले|
पिडले वंशजांनी दीनजनां पिडले
अन् परिणामी तेचि रौरव जगि पडले||१|| जय-देव..

बुद्ध-प्रिन्सिपल्सची होते दीवाळी
महावीराच्या तत्त्वां फोडा हरताळी|
ब्रह्मचि एव्ह्रीथिंग कानी कपाळी
फिय्यास्को हो सगळा तत्त्वाची होळी||२|| जय-देव..

पुरुषोत्तम मर्यादा पाळत ऊदंड
सोळा सहस्र बाया सॉल्लिड हजबंड|
वॉरफिल्डवरती गीता गात असे गॉड
पञ्चपतिव्रति बाई ती अल्ट्रामॉड||३|| जय-देव..

गोरे कनिंग-हॅऽम साहेब्लोक आले
संस्कृती-कंट्रीला त्यांनी व्यापियले|
पुनरुज्जीवित धर्मा डिलॅपिडेटियले
भ्रष्टवुनी संस्कृति वेस्टनाईझ केले||४|| जय-देव..

इंग्रजि शाळा शिकुनि लोक मातले
विज्ञानव्यवहारे प्रॅक्टीकल झाले|
संस्कृति कंडम म्हणुनी कर्दमि पातले
फ्रीडम मिळवुनि देश दुभंग पावले||५|| जय-देव

बी इट पाकिस्तान, बी इट भारत
आसिंधु-सिंधु गोग्गोड ड्रिम हो खारट|
चवदा-पंधरा ऑगस्टि शायनिंग मारत
बघवेना 'किंबहुनां', जर्मन-जन-रत||६|| जय-देव...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंबहुना सर्वसुखी| आंतरजाली फेसबूकी||
संस्थळी कीपॅड ठोकी| अखंडित||

जैदेव जैदेव जै रे सर्वसूखी
कैसे कैसे जब्री कीप्याडास ठोकी
आर्यांच्या साय्टीवरी आंग्लांचा हो घाला
होई सावध तू घाला तो आला ||

आंग्लस्तोत्रासी सगळेही चहाती
त्यांते पैं जेव्हा भारतासी पहाती
देशाभिमाने उसळो ये छाती
गॉथमातुनि बॅट्मॅन ये भारती ||

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जॉर्ज युवयुवयुवराजा ब्रिटनच्या
------------------------------------------

------------------------------------------
जॉर्ज युवयुवयुवऽराजा ब्रिटनच्या
तेराहि कॉलन्या आफ्रीका-इंडिया
आतुर वंदाया
तेराहि कॉलन्या आफ्रीका-इंडिया
आतुर वंदाया

ठेवणितला मुगूट घालील
गोमटी तुझी डोई
ठेवणितला मुगूट घालील
गोमटी तुझी डोई

केट आणि चार्ल्स-विल् तुझ्या घरात
चौफेर मिरवू तुझी वरात
फुलून इंग्लंड दावेल मिजास
मॅन्-यू टीम झोडेल आर्सेनालास

------------------------------------------
(प्रेरणा)

कुश्टोबा

कुश्टोबा, मिराशी इन्दियेचो
तेरोरु गोंयचो, कोन्फ्लित पोवाचो
इन्मिंगो भोटांचो
तेरोरु गोंयचो, कोन्फ्लित पोवाचो
इन्मिंगो भटांचो

"दावणीतल्यान सुटून भटांची
गोमटी उडयन कापून!
दावणीतल्यान सुटून भटांची
गोमटी उडयन कापून!"

भटांकु मार्ल् म्हुणून आपल्या घरांत
चवकश पावयली सगळ्या गावांत
ओफीस पाठयलो फिसीकालांक
कुश्टोबाक घालूंक आर्सेनालात.

--------------------------------

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मॅन्-यू टीम झोडेल आर्सेनालास

लहान मुलासाठी हा विनोद थोडा जास्तच नाही का? Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे 'युवयुवयुव' पप्पीला (इंग्रजी कुत्तेका पिल्ला) यूयूयू केल्यासारखे वाटते. Wink
(हे वर ३_१४विअ यांनी भोभो केल्याला उत्तर आहे का?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्व काव्यरसिकांना दोन्ही स्वातंत्र्यदिनांच्या शुभेच्छा. कवितास्पर्धेचा निकाल जाहीर करतो आहोत.

अदितीताईंची काव्यप्रतिभा आणि स्वरतंतू यांपैकी कुठली गोष्ट किती बक्षीसपात्र आहे हा गुंता न सुटल्यामुळे या प्रश्नाला बगल देऊन त्यांच्या 'राष्ट्रकुल एकीकरणा' या व्हिडिओला क्रिटिक्स' स्पेशल अवॉर्ड देण्यात येत आहे. याचबरोबर धनंजय यांच्या 'जॉर्ज युवयुवयुवऽराजा' या श्रवणीय रचनेचाही विशेष उल्लेख करतो आहोत.

कवितास्पर्धेत दुसरे बक्षीस:

रचना: जयदेव जयदेव, कवी: अमुक

या कवितेतली 'उन्मादित पापारात्सी दिसतां बेबी-बम्प' ही ओळ आम्हाला विशेष आवडली. 'नीजशी तू जरी शांत, जागा विकिपेडिया' ही ओळ 'तस्यां जागर्ति संयमी' आणि अॉरवेलचा 'बिग ब्रदर' यांची एकाच वेळी आठवण करून देणारी, आणि म्हणूनच अंतर्मुख करणारी आहे.

कवितेतला ''गूगल' ला दे बगल् नि 'बिंग' ला गुंगारा' हा सल्ला सुज्ञपणाचाच आहे, पण आता बहुतेक उशीर झाला. कुतूहल म्हणून आम्ही 'Baby Prince George' असा गूगल सर्च करून पाहिला, तेव्हा एकोणीस कोटी चाळीस लाख हिट्स आल्या.

कवितास्पर्धेत पहिले बक्षीस:

रचना: केटच्या बाळका, कवी: धनंजय

धनंजय यांनी निवडलेला यमकांचा आकृतीबंध अवघड आहे, कारण प्रत्येक कडव्यात चार शब्दांचं एकमेकांशी यमक जुळावं अशी त्यात अपेक्षा आहे. पण अपेक्षेप्रमाणे त्यांनी तो उत्तम पेललेला आहे. कवितेचा 'फील' आम्हाला काहीसा अत्र्यांच्या 'झेंडूची फुले' सारखा वाटला.

कवितेतल्या 'तुला वंदितो, मालका (म्हणजे Lord)' आणि केनिया-दूनिया या जागा आम्हाला विशेष आवडल्या. सुरवातीला 'जॉर्जिया' मुळे आम्ही काहीसे बुचकळ्यात पडलो, कारण अमेरिकेतलं 'जॉर्जिया' हे राज्य राष्ट्रकुलामध्ये नाही. पण अधिक विचार करता असं लक्षात आलं की हे नाव दुसऱ्या किंग जॉर्जवरून पडलेलं असल्यामुळे 'स्पिरिच्युअली' ते उचितच आहे. पुढेमागे हीच कविता विल्केटच्या दुसऱ्या अपत्यासाठी वापरावी लागली तर 'जॉर्जिया' ऐवजी झांबिया किंवा गॅँबिया हे देश वापरून भागवून नेता येईल असं वाटतं. मॅसच्युसेट्स, आणि (अर्धवट) मेरिलंड ही यांकी राज्यं असल्यामुळे अडीअडचणीला ब्रिटिश म्हणून खपतील, तेव्हा त्यांची इतकी अडचण नाही.

बाळाला 'सम्राटकी' (पाटीलकीच्या धर्तीवर) मिळण्यासाठी एलिझाबेथपणजी वर गेल्यानंतर चार्ल्स, त्यानंतर विल्यम, आणि त्यानंतर जॉर्ज अशी लांबलचक उतरंड असल्यामुळे 'वृद्ध झाल्यावरी' तरी ती 'प्राप्य' आहे की नाही याबद्दल थोडी शंकाच आहे. हे सगळं पाहायला आम्ही नसू हाच एक त्यातल्यात्यात दिलासा आहे.

पहिल्या दोन बक्षिसांसाठी वरखाली क्रम ठरवणं आम्हाला अवघडच गेलं; तेंव्हा त्यांना खरंतर पहिलं अाणि सव्वावं बक्षीस असंच म्हणावं लागेल.

सर्व स्पर्धकांचे आणि प्रतिसाददात्यांचे मनापासून आभार!

- जचि + राघा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

(झुकून नम्रपणे टाळ्यांचा कडकडाट स्वीकारत)
धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद.
(हात वर करून "अत्यानंद झाला पण माझ्या बोलण्यापर्यंत टाळ्या पुरे, आता" असा संकेत करत.)
हा जितका माझा बहुमान आहे, तितकाच राजपुत्र जॉर्जचाही. केटला प्रसववेदना झाल्या तशा मलाही झाल्या (स्वगत : जरी केटला एपिड्यूरल भूल मिळाली). ही कृती म्हणजे माझे पोटचे मूलच आहे.
माझ्या या यशात सहभागी आहेत, माझी इयत्ता ____तली* मराठी टीचर _____*, इयत्ता ___चे* मराठी सर, _____*, आणि इयत्ता ___*मध्ये मला मराठी न-शिकवून उपकार करणारे गुरुवर्य ___**. तसेच माझे खापपणजोबा आणि खापरपणजी ______**, माझे पणजे _____**, माझे आजे, ____**, आणि ____*** नसते, तर कळफलक कुरवाळणारे माझे हातही कुठे असते? माझ्या असंख्य चाहत्यांनी (स्वगत : होय, तुम्ही दोघे-तिघे कोण आहात ते तुम्हाला ठाऊक आहे) मला प्रचंड प्रमाणात दिलेली दाद होती, म्हणूनच हे मोठे कार्य मी करू शकलो.

(*त्यांनी नाव वापरायला अनुमती दिल्यावर ते भरता येईल. ** अनुमतीबाबत मुद्दा आहेच, आणि ८ खापरपणजोबा आणि ८ खापरपणज्यांपैकी कोण, पणज्यांपैकी आणि आज्यांपैकी कोण हे येथे कळत नसल्यामुळे अनुमतीशिवाय नाव सांगितल्यासारखे होत नाही, *** हे कोण ते अनुमतीशिवाय सांगताच येत नाही, )

---

ता. क. : मॅसच्युसेट्स, मेरिलंड आणि जॉर्जिया या ब्रिटिश साम्राज्याच्या अमेरिकेतील तेरा कॉलन्यांपैकी प्रातिनिधिक होत (उत्तर, मध्य, दक्षिण प्रतिनिधी). या तेरा कॉलन्यांमधले फुटीरवादी पूर्वी माजले होते, तेव्हा ३र्‍या राजा जॉर्जने त्यांचे दमन करण्याकरिता फौज पाठवली होती. त्यानंतरचे तपशील मला सध्या नीट आठवत नाहीत, पण अमेरिकन कॉलन्यांमध्ये मर्दुमकी गाजवलेले लॉर्ड कॉर्नवॉलिस पुढे हिंदचे गव्हर्नर जनरल झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझं भाषण ढापल्याबद्दल मी वरच्या प्रतिसादाला 'वाङ्मयचौर्य' अशी श्रेणी दिलेली आहे.

यानंतरचे तपशील मला सध्या नीट आठवत नाहीत, पण अमेरिकन कॉलन्यांमध्ये मर्दुमकी गाजवलेले लॉर्ड कॉर्नवॉलिस पुढे हिंदचे गव्हर्नर जनरल झाले.

हे आलंच लक्षात ... अमेरिकन कॉलन्यांमध्ये मर्दुमकी गाजवलेले लॉर्ड कॉर्नवॉलिस पुढे शिक्षा म्हणून हिंदचे गव्हर्नर जनरल झाले. Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सव्वाव्या बक्षिसाबद्दल धन्यवाद.

परीक्षकांना व्यनिंतून आलेल्या इतर कविता कधी वाचायला मिळणार ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

> परीक्षकांना व्यनिंतून आलेल्या इतर कविता कधी वाचायला मिळणार ?

अशा काही नव्हत्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)