मी आडकित्ता कसा झालो?
संकेतस्थळांवरील सर्व पाट्या मराठीत-मनसेचे नवीन आंदोलन या धाग्यावर मी दिलेल्या प्रतिसादात, मी आडकित्ता आय डी का घेतला? या असल्या आयडी मागे अर्थ काय? हे थोडं संक्षेपित लिहिलंय. (हा प्रतिसाद)
या प्रकारचे धागे इतर संस्थळांवर आहेत. इथे 'रिडंडंट' वाटत असेल तर कृपया मॉडरेटर्सनी हा धागा उडवावा
या धाग्यावर, तुमची इच्छा असली तर,
तुम्ही तुमचा आयडी का घेतला?
जालावर या आयडीने वावरताना तुम्हाला काय करणे अपेक्षित होते? (मला दंगा करायचा होता. पण इथे सगळेच मला डॉ. म्हणायला लागलेत. मग माझी जरा गोची झालिये.) इ. बाबी लिहा.
संदर्भ
शाळा कादंबरी. जोशाच्या वर्गाच्या टीमची म्याच असते. म्याच झाल्यावर (आणि त्यांनी जिंकल्यावर) फावड्याला आंबेकर नामक वर्गातली मॉड/चंट मुलगी काँग्रॅच्युलेशन्स म्हणते. हे अब्रह्मण्यम् असल्याने तो बावचळतो. ती निघून गेल्यावर मग तो रिकव्हर झाल्यावर विचारतो, की ती काँग्रेसच्या अधिवेशनाबद्दल काय म्हणत होती म्हणून. तेव्हा सगळे चिकार हसतात आणि अभिनंदनाला काँग्रेसचं अधिवेशन असा वाक्प्रचार त्यांच्या ग्रूपमध्ये रूढ होतो.
जालावर पहिलेप्रथम आलो
जालावर पहिलेप्रथम आलो तेव्हाची वेळ तपासून पाहिलीन् तडsssक पत्रिका बनवली. मिथुन रास येत होती. आद्याक्षर 'कि'!! पण ज्योतिषाच्या अगदीच आहारी जाऊ नये, आपलं कर्त्तृत्वही असावं थोडंफार असं म्हणतात..काय? म्हणून त्यात आपली कायतरी भर घातलीच पायजेनीत, या प्रयत्नवादी विचाराने अनुस्वाराची भर घातली आणि बेमट्या 'कि'ला सानुनासिक करून टाकलन्..!! आता आमचा मूळ स्वभाव पडला नित्य असमाधानी..पण विश्वेश्वराच्या कृपेन् सुख मात्र भरपूर. काय समजलांत्..?? म्हणून विश्वेश्वरापाठोपाठ केले स्मरण माऊलीचे. शिवाय.. अनायासे या संस्थळाच्या निर्मात्यांनीच माऊलीचे शब्द डकविले, तर आपण का मागे राहा..घेतलं नावं हे..आणि लावलं हिकडे. कसें...? ख्ख्यां...ख्ख्यां...ख्ख्यां..!! :D
मस्त धागा!!!!!!!!
माझं खररर्रं खररर्रं नाव प्राजक्ता आहे. वर्गात ४ होत्या. शिवाय,पूर्वीप्रमाणे मी आता नाजुकातलीही राहिले नाही :) जालावर सारखी चर्चा-चर्विचरणे, भारी भारी लेखक, उत्तम उत्तम ट्रोल वगैरेंची मला खरं म्हणजे भीतीच वाटते, आणि जबरदस्त इन्फिरियोरिटी कॉम्प्लेक्स येतो. जगात वावरण्याचा अजिबात अनुभव नसल्यासारखे आपण अजूनही वावरतो, ह्याचं वैषम्यही (क्वचित) वाटतं. कोणत्याही विषयाविषयी आपल्याला काहीही माहिती नाही, आणि जे आज माहिती असेल ते नक्कीच उद्या खोटे पडेल, अशी खात्री झाल्यामुळे 'फूलनामशिरोमणी' घेतलं.
अचरट आणि कटकट
In reply to 'कटकट' म्हटल्यावर कोब्रा by ३_१४ विक्षिप्त अदिती
अचरट आणि कटकट यांसाठी सारख्याच प्रमाणात शाई लागत असावी. (५ वाट्या २ मोठ्या दांड्या व २ छोट्या दांड्या. त्यातही रचा शेपटा टच्या दांडीपेक्षा थोडा मोठाच आहे. त्यामुळे ) अचरट हे कटकटपेक्षा जास्त महागडे आहे हे मान्य. मात्र त्यामुळे कोब्रांपेक्षा आपण जास्त दिलदार आहोत असे दिसणार नाही. कोब्रांना अगदीच प्रभावित करायचे असल्यास आचरट हा अतिमहागडा आयडी वापरता येईल.